हा, आता टक्याच्या धाग्याची लिंकही टाकून द्या कसे गुर्जी! मुद्दे सुचले नाहीत की ऍड होमिनेम करायचे हे बरे नव्हे , सायबर सेल ने डिजिटल भाटांस नीट ट्रेनिंग दिलेले दिसत नाही देवा, =))
बाकी कुठल्या सदस्याने मोगाच्या थर्ड ग्रेड प्रतिसादाला टाळ्या पिटल्या आहेत हे दाखवून द्या हे उघड चॅलेंज देतो मी तुम्हाला, बीजेपी विरोधी ते सगळे थर्ड ग्रेड असे तुम्हाला वाटत असल्यास तो तुमचा प्रश्न आहे, तुमची रोजी रोटी बीजेपी चालवत असेल आमची नाही. तेव्हा तोंड सांभाळून बोलायचं हि विनंती.
मोगाच्या थर्ड ग्रेड प्रतिसादाला टाळ्या पिटून ट्रोलिंगला प्रोत्साहन दिले गेल्याची असंख्य उदाहरणे आहेत. ती पाहण्यासाठी स्वत:च शोध घ्यावा ही नम्र विनंती. जर तुम्ही तसे करत नसाल तर 'खाई त्याला खवखवे' या वाक्प्रचाराला अनुसरून तुम्हाला माझा प्रतिसाद अंगावर ओढवून घेण्याची गरज नाही कारण माझ्या प्रतिसादात मी कोणाचेच नाव घेतलेले नाही.
आणि अजून एक. माझी रोजी रोटी मीच चालवितो. माझी रोजी रोटी चालविण्यासाठी मला कोणत्याही पक्षाची गरज नव्हती, नाही आणि नसेल. भाजप किंवा इतर कोणताही पक्ष किंवा संघटना माझी रोजी रोटी चालवित नाही. हे यापूर्वीच सांगून झाले आहे. ते समजलं नसेल तर मी फक्त कीव करू शकतो.
पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी सिनेमे काढायच्या परवानगीची आणि आपल्या हजारों सैनिकांच्या जिवाची किंमत का? मांडवलीसाठी मध्यस्थी करणारे नरकात जातीलच. पण तोडगा स्वीकारणार्या सरकारचे काय? तो नालायक करण जोहर एका सिनेमामागे ५० कोटीचा निव्वळ अधिकृत फायदा कमावतो म्हणे. आणि सैनिकांच्या तोंडावर पाच कोटी फेकायची हिंमत कशी झाली त्याची?
अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर फंडचे सुद्धा वार्षिक बजेट सहज २५ कोटी असेल हो, ही काय भिकारी पंचायत लावली आहे लेकाच्यांनी आर्मीच्या नावं देव जाणे ह्या पुंड लोकांनी
अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर फंडचे सुद्धा वार्षिक बजेट सहज २५ कोटी असेल हो, ही काय भिकारी पंचायत लावली आहे लेकाच्यांनी आर्मीच्या नावं देव जाणे ह्या पुंड लोकांनी
काहीतरी चुकीची माहिती असावी. या बातमीप्रमाणे हा निधी फक्त २ महिन्यांपूर्वी ऑगस्ट २०१६ मध्ये सुरू झाला व मागील २ महिन्यात त्यात आजतगायत फक्त १ कोटी ४० लाख रूपये आलेले आहेत. जर करण जोहर त्यात ५ कोटी रूपये टाकणार असेल तर सध्याच्या शिलकीच्या तुलनेत ही खूपच मोठी रक्कम होते. तसेच निधी फक्त २ महिन्यांपूर्वीच सुरू झाल्याने निधीचे वार्षिक बजेट २५ कोटी इतके असेल असे वाटत नाही कारण निधीला अजून १/४ वर्ष सुद्धा पूर्ण झालेले नाही.
तुमचा काहीतरी गोंधळ उडालेला दिसतो आहे, तुम्ही म्हणता आहात त्या फंड बद्दल मी बोलत नाहीये, तर मी आर्मी वाईव्ज वेल्फेयर असोसिएशन बद्दल बोलतोय, १९६६ मध्ये स्थापन झालेल्या ह्या संघटनेची अध्यक्ष जो तत्कालीन चीफ ऑफ आर्मी स्टाफ असतो त्याची पत्नी असते, ह्यांचे कार्य फक्त पैसे गोळा करणे नाही तर अगदी युद्ध विधवांना (त्यांना वीरनारी म्हणले जाते) व्यवसाय शिक्षण देणे ते इन सर्व्हिस आर्मी पर्सोनेलला मानवी हक्क उल्लंघन कायद्याच्या केसेस मध्ये कायदेशीर मदत वगैरे पुरवणे इतके उत्तुंग आहे, माझा प्रतिसाद परत वाचा त्यात मी आर्मी वाईव्जबद्दल बोलतोय, नवीन फंड नुसार नाही, तसेही ह्या नव्या फंडाचे प्रयोजन कळलेले नाही कारण,
१. वर मी आर्मी वाईव्जचे योगदान मांडले आहेच
२. नॅशनल ट्राय सर्व्हिसेस फ्लॅग डे किंवा झंडा दिवसला गोळा होणारे सगळे पैसे आर्मी वेल्फेयर मध्ये लावले जातात
३. प्रधानमंत्री कोष सुद्धा असतो बहुदा एक रक्षा विभागाला वाहिलेला (ह्या बद्दल ऐकीव माहिती आहे, तरी हा ऑप्शन बाद ठरवला तरी हरकत नाही)
माझ्या प्रतिसादाचे सार,
करण जौहरच्या ५ कोटी न काय होणार आहे ? इथे आर्मीवाल्यांच्या बायका अन दुर्दैवी विधवाच कोटी कोटी रुपयात वर्गणी काढून शांतपणे करायचे ते काम करत असतात. त्यातही ते मांडवली खंडणीचे पैसे आर्मीवाले घेतील का नाही ही शंकाच आहे. असो.
आपण दोघे दोन वेगवेगळ्या निधीबद्दल बोलत आहोत. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार करण ज्या निधीला ५ कोटी रूपये देणार आहे तो निधी जेमतेम २ महिन्यांपूर्वी सुरू झालेला आहे. तुम्ही ज्या निधीबद्दल सांगत आहात तो पूर्ण वेगळा आहे.
पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी सिनेमे काढायच्या परवानगीची आणि आपल्या हजारों सैनिकांच्या जिवाची किंमत का? मांडवलीसाठी मध्यस्थी करणारे नरकात जातीलच. पण तोडगा स्वीकारणार्या सरकारचे काय? तो नालायक करण जोहर एका सिनेमामागे ५० कोटीचा निव्वळ अधिकृत फायदा कमावतो म्हणे. आणि सैनिकांच्या तोंडावर पाच कोटी फेकायची हिंमत कशी झाली त्याची?
मी एका दुसर्या धाग्यावर या विषयावर सविस्तर प्रतिसाद दिलेला आहे. सरकारला तोडगा काढावाच लागला. फडणविसांकडे दुसरा पर्यायच नव्हता. करण जोहरने पाकड्यांना चित्रपटात काम देणे कितीही संतापजनक असले तरी त्याची भूमिका कायदेशीर होती. कायदेशीर मार्गाने भारतात आलेल्या पाकड्यांना चित्रपटात काम देणे हे कायदेशीर आहे. त्यामुळे शेवटी सरकारला त्याच्या चित्रपटाला संरक्षण द्यावेच लागले असते. परंतु मनसेने हा मुद्धा प्रतिष्ठेचा केल्याने जर चित्रपट दाखविला गेला असता तर त्यातून दगडफेक, तोडफोड, दंगे, लाठीमार इ. होऊन ऐन दिवाळीमध्ये समाजात अशांतता निर्माण झाली असती. मनसेच्या काही कार्यकर्त्यांना आधीच अटक झाली होती व सरकारने चित्रपटाला संरक्षण देणार हे आधीच सांगितले होते. चित्रपट सुरू होण्याच्या आदल्या दिवशी मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांना अटक करून डांबले असते तरीसुद्धा बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांनी अशांतता निर्माण केलीच असती. अशा परिस्थितीत मनसेला आंदोलन रद्द करण्यास लावणे व त्याचबरोबर लोकभावनेचा विचार करून करण जोहरला 'भविष्यात पाकड्यांना चित्रपटात घेणार नाही' असे जाहीररित्या सांगायला लावणे हाच सर्तोत्तम तोडगा होता. असे करण्याने शांतताभंगही टळला व लोकभावनेचाही आदर झाला. जर फक्त कायदेशीर बाजू बघून चित्रपट पोलिस संरक्षणात प्रदर्शित केला असता तर लोकभावनेचा अनादर झाला असता. जर लोकभावनेचा आदर करून चित्रपट प्रदर्शित होऊन दिला नसता तर मनसेच्या गुंडगिरीपुढे झुकल्यामुळे कायद्याचे पालन झाले नसते. अशा परिस्थितीत योग्य तो तोडगा शांततेच्या मार्गाने काढला गेला आहे.
मनसेच्या आंदोलनाला घाबरून चित्रपट प्रदर्शित होऊन न देण्याची भूमिका घेणे राज्य सरकारला शक्य नव्हते. त्याचवेळी चित्रपटाला पूर्ण संरक्षण देऊनसुद्धा तोडफोड झाली असती तर संरक्षण देण्यात कुचराई केल्याचा आरोप सरकारवर झाला असता व त्यामुळे लोकभावनेचाही अनादर झाला असता. त्यामुळे हे दोन्ही पर्याय राज्य सरकारसाठी उपलब्ध नव्हते.
बाकी ५ कोटी रूपये देणगी किंवा चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्यातील शहीद सैनिकांना श्रद्धांजलीचा फलक दाखविणे या तोडग्यातूनच निघालेल्या दुय्यम गोष्टी आहेत. हिंसक आंदोलन रद्द होऊन शांतताभंग टळला आणि त्यामुळे कायदापालन झाले व निदान भविष्यात तरी पाकड्यांना काम मिळणे बंद होईल या घोषणेमुळे लोकभावनेचाही विजय झाला हेच दोन महत्त्वाचे निर्णय या यशस्वी तोडग्यातून निघाले.
सिनेमा दाऊदच्या पैशाने काढलाय असे मी म्हटलंय का? सिनेमात दाऊद आणि त्याच्यासारख्या गुन्हेगार धंदेवाल्यांचा पैसा येतो ही लोकांची समजूत आहे. तिला पुरावे देता येणार नाहीत तसेच खोटीही म्हणता येणार नाही. उद्या कोणीही दाऊदच्या पैशाने सिनेमा काढील आणि पाच कोटी सैनिक फंडाला भीक फेकेल. ते चालेल का? म्हणजे लोक गरीबाना लुबाडतात. त्यांच्या अंगावर गाड्या घालून मारतात आणि मग सिद्धीविनायकाला देणगी देऊन सगळी पापे धुवून काढतात. अजून एक दानपेटी असेच सैनिक फंडाला समजले का काय हे खंडणीखोर?
सिनेमात दाऊद आणि त्याच्यासारख्या गुन्हेगार धंदेवाल्यांचा पैसा येतो ही लोकांची समजूत आहे.
९० च्या दशकात हा प्रकार जास्त होता. आता हे फारसे होत नाही. आता कॉर्पोरेट कंपन्या सिनेमात पैसा ओततात.
आता बॉलीवूडमधले बहुतेक मोठे व्यहवार पांढरे असतात, मोठे स्टार्स चेकने पैसे घेतात, रग्गड टॅक्स भरतात.
व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि राजकारणाला लोक कंटाळले आहेत हेच मनसेच्या दारुण पराभवातून लक्षात येतेय.मोदींच्या प्रतिमेतून भाजप बाहेर पडला नाही तर भाजपचाही मनसे व्हायला वेळ लागणार नाही.
कम्युनिश्टांचे वेगळेच पक्षांतर्गत धोरण सोडले तर भारतातील असा कोणताही एक पक्ष सांगा जो व्यक्तीकेंद्रीत नाहीये. सगळेच एकसारख्या माळा आहेत आणि मधल्या पेंडंटवर त्यांची व्हॅल्यु आहे.
बादवे गेल्या इलेक्शनाला मनसेचे बरेच काम केले तेंव्हाच त्यांचा पोकळपणा लक्षात आलेला. जास्त चर्चा करण्यातही अर्थ नाही.
मोदी हे जरी अगदी निष्पाप निरागस नसले तरी ते आतापर्यंतचे सर्वोत्तम नेते आहेत. ते पुष्कळसे व्यवहारी आहेत. कारण ते इतिहास, नाटक, सिनेमा यांच्यात रमणार्या महाराष्ट्रातून पुढे आलेले नाहीत. त्यांची तुलना राज उद्धव यांच्याशी नको. भाजपा हा मोदींच्या प्रतिमेत अडकण्यापेक्षा तो कटियार कंपनीच्या तावडीत सापडणार की कसे याची खरी समस्या आहे.
मनसे म्हणजे ७०च्या दशकातली शिवसेना वाटतेय असे ह्याण्चे मत.
आधी भूमीपुत्र,मग गिरणी कामगार मग इण्दिरा गाण्धींना जोरदार विरोध मग अचानक घुमजाव करून आणीबाणीला पाठिंबा.स्वतः काहीतरी विधायक करण्यापेक्षा दुसरे पक्ष काय करता आहेत ह्याकडेच लक्ष जास्त..म्हणूनच मुंबई,ठाण्यातले खड्डे बुजवण्यापेक्षा कधी ब्रेझनेव्ह तर कधी जिमी कार्टरना 'मार्मिक' सल्ले-ईशारे शिवसेना द्यायची. मनसेचा राजकीय प्रवासही तसाच दिसतोय. दत्ताजी साळवी,प्रधान्,वामनराव महाडिक हे लोक असल्याने शिवसेना टिकली.सध्या अशा लोकांची समाजातच वानवा असल्याने मनसेचे भवितव्य कठीण दिसते.
फक्त अवघड जागीच दुखणं बनायचं हाच त्यांचा उद्देश होता.
आपल्याला सत्ता मिळणार नाहीत, आणि कोणी जवळ उभे पण करणार नाही हे त्यांना माहीत होतं.
काहीही न करता , काही करण्याचे किंवा न करण्याचे पैसे घ्यायचे केवळ या साठी पक्ष स्थापन केला. नुकत्याच झालेल्या सिनेमाच्या प्रकरणाने हेच सिद्ध केले.
लोकहो,
राज ठाकऱ्यांनी तोडपाणी केले असा काही मिपाकरांचा सूर आहे. मला मात्र तसं वाटंत नाही. राज ठाकऱ्यांनी हे पैसे स्वत:साठी वा पक्षासाठी घेतले नाहीयेत. ही करण जोहरला केलेली शिक्षा आहे. त्या शिक्षेतून निर्माण होणारा पैसा हरामाचा असल्याची जनभावना आहे. म्हणून त्या पैशास कोणी हात लावायला तयार नाही, ही बाब वेगळी.
मी राज ठाकरे यांचा समर्थक व/वा चाहता नाही. पैशांचा यथोचित संबंध स्पष्ट व्हावा म्हणून माझं मत लिहितोय.
आ.न.,
-गा.पै.
कुठल्या भारतीय कायद्यान्वये राज ठाकरेंनी करण जौहरला शिक्षा केली म्हणे?? ती करण्यासाठी कोणी परवानगी दिली ?? ते कुठल्या कायदेशीर अथवा घटनासिद्ध पदावर विराजमान आहेत म्हणे?
+१
करण जोहरने पाकिस्तानी कलाकाराला सिनेमात घेतल हे पटत असो वा नसो, पण त्यात बेकायदा काहीच नव्हतं. राज ठाकरेला हव तर त्यानी केंद्र सरकारवर आपल्या (शून्य) खासदारांच्या मार्फत दबाव आणून असा काही कायदा करण्यास वा अधिसूचना घेण्यास भाग पाडावं.
तोडपाण्याबद्दल : त्याने स्वतःसाठी वा पक्षासाठी जे काही पैसे घेतले असतील त्याची तो जाहिरात करणार नाहीच. आता याबद्दल पुरावा नाहीये असं म्हणता येईल.. पण तरी पदरात पाडून घेतलेली प्रसिद्धी, 'आपणच काय ते देशप्रेमी आणि सैन्याची काळजी वाहणारे' अशी प्रतिमा छापणं हा ही तोडपाण्याचा प्रकार आहेच.
ह्या प्रतिसादाने डोसक्यात अचाट प्रश्न उभारलेत पण विचारु पण वाटेनात. :(
गामाजी का बळंच्च्च लॉजिक फेकायलात? नसंल एखादा युक्तीवाद तर राहु द्या ना. द्या सोडून. आम्ही नाही राज ठाकरेला अशा शिक्षा देणार.
आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरताना दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी तुम्हाला मान्य आहे का हृषीकेश भाऊ? शिवाय मनसेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्या मुद्द्याला आवरायला खुद्द मुख्यमंत्र्याला मांडवली करावी लागली हा मुद्दा ग्राह्य धरला जाईल का नाही?? अशी कधी अन किती उदाहरणे झाली आहेत ह्या अगोदर महाराष्ट्रात ??
लिहून पोचतं केलंय दिवाळी अंकाकरता, तुम्हाला आवडेल असाच फॉरमॅट आहे ;) , बस कुछ दिन और, बघा खरडलंय काहीतरी गोड़ मानून घ्याल!, बाकी मनसे महत्वाची नाही पण असल्या भिकार लोकांमुळे माझ्या युद्धक परंपरा असलेल्या महाराष्ट्राचा घाऊक अपमान होतो, हा तोच महाराष्ट्र आहे ज्याच्या आराध्य दैवताचा पुतळा म्हणजे थोरल्या महाराजांचा पुतळा, अरुणाचल प्रदेशात बॉर्डर जवळ बीजिंगच्या दिशेने चीनच्या छाताडात भवानी खुपसत तीनताड उभा आहे , चीन विरुद्धच्या युद्धात मराठा लाईट इनफंट्रीने केलेल्या अतुलनीय कामगिरीची आठवण अरूणाचली लोकांनी लक्षात ठेऊन तिथे पोस्टिंग असलेल्या एका मराठमोळ्या आयएएस अधिकारी प्रशांत लोखंडे सर ह्यांच्या मदतीने लोकवर्गणी अन राज्यपाल फंडातून उस्फुर्त बांधला आहे, त्यांना कोणी खळ्ळफटॅकची धमकी दिली नव्हती रे भावा, आजही तो पुतळा नुसता डोळ्यापुढे आला की अंगाला कापरे भरते, एकदम जाणवते, ह्या सीमेवर मी परीक्षा वगैरे पास होऊन आलो असेलही पण तो आदेश थोरल्या राजांचा आहे मला आलेला, ती इज्जत जपणे परम कर्तव्य आहे माझे, माझ्या सारखे लाखो बापूसाहेब एकीकडे तो शब्द एकीकडे अरे तो देव आहे रे देव , ह्यांनी इकडे मागव्या वाटेल तितक्या खंडण्या रे त्याला फौज प्रेमाचे मुलामे देऊ नयेत, सालं 72 72 तास जागं राहून राखली आहेत ठाणी मी माझी , प्रांताच्या विचारात संकुचित न होता सर्वप्रांतीय जवानांना पोटच्या पोरांप्रमाणे जपले आहे ते का ? असल्या येडझव्या लोकांनी माझ्या प्याऱ्या अन जबाबदार महाराष्ट्राची असली बेइज्जती करायला ? सालं महाराष्ट्राचं रेप्युटेशन म्हणजे भारताचे मसाच्युसेट्स किंवा फिलाडेल्फिया असावे तसे आहे रे, सामाजिक चळवळीत अग्रणी, शिक्षण नवे विचार नवे जग ह्यात एक पाऊल पूढे देशासाठी सर्वाधिक मेहनत करणारा, राडा म्हणजे माझा महाराष्ट्र नाही, जीव तुटतो अन लेखणी मोकाट सुटते ती फक्त तितक्यासाठीच भावड्या, सांभाळा लेको सांभाळा नका खाली पडू देऊ हे वैभव
*भावनावेगात बोललोय, कोणाच्या भावना दुखवल्यास माफी मागतो अगोदरच, पण बाहेर राहून हे ताल पाहणे म्हणजे एक यातना आहे :'(
करण जोहर ने कुठला लिखित कायदा मोडला आहे/ मोडायची धमकी दिली आहे का भारताचा/महाराष्ट्राचा?? त्याने तो तोडू द्या त्याच्याही नावाने ओरडू,
बाकी एक विनंती आहे शब्दसंयोजन थोडे जपून करा, मिपावर आधीच एक अपमान पचवलाय, अजून हलाहल पचवायला मी शिवशंभो नाही, माझ्याही मर्यादा आहेत, त्या ताणून न तपासणे तुमच्या अन माझ्या हिताचेच आहे, बघा विचार करून शांतपणे...
ह्याला धमकी समजलात तरी हरकत नाही!
सोन्याबापु,
पहिल्याप्रथम अपमान पचवल्याबद्दल अभिनंदन. असेच सहनशील व्हा. चांगली सवय आहे. तुम्ही माझ्यासारखे होऊ लागलात हे पाहून मला अतीव आनंद झाला आहे. इतर कोणी केलेल्या अपमानांचा खुन्नस तुम्ही माझ्यावर काढंत नाही हे माझं अहोभाग्यच होय. असे भाग्यानंदवृद्धीचे प्रसंग माझ्या आयुष्यात वारंवार येवोत.
असो. आता विषयावर येऊया. शोभा डे या बाईंनीही कुठलेही कायदे मोडले नाहीयेत. मग त्यांच्या नावाने लोकं बोटं का मोडतात? करण जोहरला पाकिस्तानी कलाकार घ्यायचे लांडे कारभार कोणी करायला सांगितले होते? तेव्हा नाही का महाराष्ट्राचा अपमान झाला? पाकिस्तान हा शत्रू आहे हे माहित नव्हतं का?
आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. म्हणूनच आत्महत्या करतांना पकडले न जाण्याची खबरदारी घ्यायची असते. ती घ्यायची नसेल तर आत्महत्येचा विचार सोडून द्यायला पाहिजे. (खुलासा : आत्महत्या म्हणजे पाकी कलाकारांना चित्रपटात घेणे.)
आ.न.,
-गा.पै.
"शोभा डे या बाईंनीही कुठलेही कायदे मोडले नाहीयेत. मग त्यांच्या नावाने लोकं बोटं का मोडतात?"
तुझ्या त्या ट्वीटर,फेसबूकावर बोटे मोडणे व थिएटरमध्ये येऊन खुर्च्या मोडणे..ह्यात फरक आहे की नाही रे गाम्या?
करण जोहरला पाकिस्तानी कलाकार घ्यायचे लांडे कारभार कोणी करायला सांगितले होते? तेव्हा नाही का महाराष्ट्राचा अपमान झाला? पाकिस्तान हा शत्रू आहे हे माहित नव्हतं का?"
व्हिसा द्यायचा की नाही हे कोण ठरवते? जुहु-तारा लेनमधे राहणारे लोक की दिल्लीत नॉर्थ-ब्लॉक्मध्ये बसणारे मंत्री व अधिकारी? देश्प्रेमाचे भरते आलेले लोक दिल्लीत जंतरमंतर् वर उपोषणाला का नाही बसत? असा ह्याण्चा सवाल.
प्रतिक्रिया
chitraa - Sun, 23/10/2016 -
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अय्यो पापम... :- Yevaduअश्या आयडीच्या थर्ड ग्रेड
हा, आता टक्याच्या धाग्याची
बाकी कुठल्या सदस्याने
मोगाच्या थर्ड ग्रेड
धन्यवाद
...
च्यायला!
अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर
एक नंबर बंडल व्यक्ती आहे ती.
अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर
लिंक उघडत नाहीये, परत द्यावीत
http://indianexpress.com
तुमचा काहीतरी गोंधळ उडालेला
आपण दोघे दोन वेगवेगळ्या
पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी
दाऊदच्या पैशांनी सिनेमे
ओ काका
सिनेमात दाऊद आणि
व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि
कम्युनिश्टांचे वेगळेच
तू पण...? मी पहिल्या
दादा काम म्हणजे नॉट अॅज अ
पैसे वसूल केलेस
+++१११ अभ्यादादा, त्यावेळेचे
राज व मोदी ..... ?
...
भाजपचाही मनसे व्हायला वेळ लागणार नाहीपटतंयहम्म
...
फक्त अवघड जागीच दुखणं बनायचं !
राज ठाकरे यांचे काय चाललेय?
+१
मनसे = मध्यस्ती न सेटलमेंट
हे तोडपाणी नव्हे.
कुठल्या भारतीय कायद्यान्वये
+१
गुन्हा आणि शिक्षा
ह्या प्रतिसादाने डोसक्यात
अहो ते अलंकारीक सोडा हो सगळे,
शिक्षा देण्याचा अधिकार राज
काय राव मनसे ला काय
आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य
बापू.. कुठे मनसे वर वेळ
लिहून पोचतं केलंय दिवाळी
__/\__
महाराष्ट्राचा अपमान
करण जोहर ने कुठला लिखित कायदा
...
कुठला कायदा कोणी मोडला
हम्म
Pagination