@मलाही "तू ब्राह्मण??? वाटत नाही" अशा प्रतिक्रिया एकदोनदा ऐकाव्या लागल्या आहेत>>
मलाही.. बर्याचदा..
------
बुधवारी मेसमधे चिकन असते.श्रावणा-बुधवारी आज चिकन का नाही? असे विचारले तर मेसवाल्या ताईने चार्-चौघात लायकीच काढली राव.. म्हणे "अरे काय लाज बीज वाटते का नाही? सगळं गाव श्रावण पाळतंय आणी कुलकर्ण्यांना चिकन पाहीजे झालंय.." :D
शिवाय त्यावर काही लोकांच्या "तुमच्या मुळे नॉन-व्हेज महाग झालयं अश्या प्रतिक्रिया" ;)..!!
असे मला कोणी म्हणाले तर मी म्हणतो ..." तुम्ही तुमच्या हातातली तलवार आमच्या हातात दिलीच का? आता दिलीत ना, मग आम्ही आता नॉन्वेज खाऊ नाहीतर मस्तानीला ठेऊ. काही विचारायचे नाही.".
माझ्या चुलत भावाला त्याच्या सी के पी मित्राने सांगितले कि तुम्ही भट लोक नॉन व्हेज खायला लागल्यापासून नॉन व्हेज महाग झालंय. त्यावर माझा भाऊ म्हणाला तुम्ही परभट भाज्या खायला लागल्या पासून भाज्या महाग झाल्या आहेत. यावर त्याने तसे बोलणे सोडून दिले.
मला कोणी असे म्हणाले तर मी म्हणतो "आम्हाला परवडते म्हणुन खातो, तुम्हाला जे परवडते ते तुम्ही खा, उगाच आमच्या खाण्याकडे बुभुक्षीतासारखे पाहु नका."
एकदा असे उत्तर मिळाले की परत कोणी नादाला लागत नाही.
एका गो-या आणि घा-या मित्राला कोब्रा समजून देब्रांची उडवायला गेलो तर तोच देब्रा निघाला. सावरासावर करताना पळता भुई थोडी झाली पण मित्रच होता त्यामुळे फारसं मनाला लाऊन घेतलं नसावं त्यानं
हे मात्र प्रत्यक्ष पाहीलयं. माझा एक पाटील नावाचा मित्र चांगला वैद्य आहे. त्याच्या सुरुवातीच्या दिवसात त्याला पण लोकं असचं विचारायचे आणि आता तेचं लोकं त्याच्याकडुन पथ्य-पाणी लिहुन घेतात. ;).
जातीवर काय असतय हो. सगळं डोक्यात आणि हातातल्या कौशल्यावर आहे.
अहो डॉक्टर माझे तेच म्हणणे आहे. या गोष्टींना खरेच कितीसा अर्थ उरलाय? माझ्या एका मैत्रिणीची म्हातारी काकू पहिल्या भेटीतच "आम्हाला तुम्ही आयुष्यभर कमी का लेखलत?" असे विचारत होती. अश्चर्याचा धक्का बसला होता. आपण ज्यांना पहिल्यांदा भेटतोय त्यांनी असे बोलावे? टोचून तुम्हाला, मला, आणि शेकडोजणांना बोलले गेले आहे. अगदी स्वजातीयही त्यातल्यात्यात पोटजातीतल्यांनाही बोलतात, अगदी तीच जात असली तरी आर्थिक कारण, रंग, रूप, मालमत्ता, फक्त मुली होणे असे बोलायला काय काहीही चालते. ;)पण आजकाल लगेच भावना दुखावतात आणि हातात तलवारी येतात त्याचे वाईट वाटते. मी देशस्थ असल्याने माझ्या सासरचे कोकणस्थ नातेवाईक (सासूसासरे नव्हेत.....त्यांनीच पसंत केल्याने ते काय बोलणार? ;) ) बोलल्याशिवाय राहिले असतील का? किती मनाला लावून घ्यायचे याबद्दल म्हणतीये.
माझ्या एका मित्राबरोबर, त्याच्या ओळखितल्या, श्री. वरूणगावकर नांवाच्या गृहस्थांच्या घरी गेलो असता दरवाजातच माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर माझ्या मित्राने ओळख करून दिली. 'हा माझा मित्र, प्रभाकर पेठकर'.
त्यावर त्यांची प्रतिक्रिया 'पेठकर? म्हणजे बाय कास्ट?'
मी खवटपणे 'देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण' असे खणखणीत शब्दात सांगितले. मला आपादमस्तक न्याहाळत पण उत्तरातील कडवटपणा जाणवून त्यांनी घरात तर घेतले. पण मित्राचे काम संपून पुन्हा निघेपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत.
बाहेर आल्यावर मित्राला मी म्हणालो, 'पुढच्या खेपेस मी खालीच पानवाल्याजवळ उभा राहीन तुझे काम आटपेपर्यंत.'
सुदैवाने तेवढी वेळच आली नाही.
माझ्या आयुष्यातला हा एवढा एकच प्रसंग.
बाकी, मित्रमंडळी कधी प्रेमाने, कधी कौतुकाने तर कधी 'खेचताना', 'अरे! भटा.' असे सहज म्हणायची. पण ते मैत्रीच्या नात्यातील प्रेमळ संबोधन असे, म्हणून कधी गांभिर्याने घेतलेच नाही.
भारतात प्रत्येक गोष्ट जातीय फिल्टर लावून बघितली जाते, उकडीच्या मोदकाच्या मालकीवरुन आंजावर जातीय भांडणं करणारे लोकही आहेत ,हे बघुन कदाचीत ऑक्सीजनपेक्षाही जात महत्वाची असावी असे वाटते...
(उकडीचे ,कणकेचे कोणतेही मोदक हादडून मिळतील-ग्रेथिं )
अंतरजातीय विवाह हे जे जात तोडण्याचं हत्यार आहे,त्याची परिपूर्णता अपत्याची जात ,आई/वडिलांची मिळून.. अशी मिश्र सांगितली गेली(च) पाहीजे. (उदा-ब्राह्मण मराठा/कायस्थ माळी/सोनार शिंपी)..... नाहीतर असे विवाह हे नुसतेच सोपस्कार होऊन बसतील!
असं नाही काही. समजा उदाहरणादाखल आई मराठा आणि बाप ब्राह्मण असेल, तर अपत्याला दोन्ही जातीच्या माणसांच्या बाजू समजतील आणि दोन्ही जातीतील जी काही दरी असेल, ती कमी करण्यात आणि निदान आपल्या परिवारापुरता त्यांच्यात समेट घडवण्यात त्याला यश येऊ शकतं. इतकंच नाही तर वादाच्या प्रसंगांत दोन्ही जातींपैकी कोणत्यातरी एका जातीची बाजू घेणं म्हणजे एका पालकाच्या विरोधात जाण्यासारखं झाल्याने, अपत्य हे जातींच्या बाबतीत तटस्थ भूमिका घ्यायला शिकेल. आंतरजातीय विवाहांचं प्रमाण वाढलं की अशी तटस्थ भूमिका घेणारी नवी पिढी जन्माला येईल आणि आपोआपच अगदी वैयक्तिक स्वरुपातल्या जातीभेदालासुद्धा खीळ बसेल. आणि मग सामाजिक स्तरावर, आपली राजकीय पोळी पिकवू पाहणा-यांना जातीवादाचा बोभाटा करता येणार नाही.
वडापाव,
तुंम्ही व्यवहारात सांगताय,तेच मी 'तत्वात' पूर्ण करावं असं म्हणतोय.
आपल्याकडे व्यवहार बदलतात, आणि तत्व तशीच रहातात. बरीचशी टीका ,ही तत्वावरूनच होते...आणि त्यामुळे मग 'बदललेली' माणसेपण 'बिघडायला' लागतात! म्हणुन तत्व(ही) बदलणं आवश्यक आहे.
दुसरं असं की , हा नवेपणा समाजावर संस्कारित होण्यासाठी सांगितला जाणं ही आवश्यक आहे. :)
असहमत :(
यात धोका असा की त्यामुळे "ब्राम्हण-मराठा" ही जात "ब्राम्हण-माळी" जातीपेक्षा जास्त भारी आहे अशी नविन प्रकारची जातीरचना तयार व्हायची ! :(
त्यापेक्षा जात अशी सांगायला पाहिजे:
बाप : माणूस
आई : माणूस
अपत्य : माणूस
काही दिवसांनी (पिढ्यांनी) जात सांगायचे / विचारायचे कारण आपोआप नाहिसे होईल. +D
@ त्यापेक्षा जात अशी सांगायला पाहिजे:
बाप : माणूस
आई : माणूस
अपत्य : माणूस
>>
असेच वाटते. सरकारी कागदपत्रांतुनसुद्धा जात/धर्म विचारणे बंद होईल असा दिवस बघायची इच्छा आहे..
@यात धोका असा की त्यामुळे "ब्राम्हण-मराठा" ही जात "ब्राम्हण-माळी" जातीपेक्षा जास्त भारी आहे अशी नविन प्रकारची जातीरचना तयार व्हायची ! Sad>>> होय! असल्या तूलना होत राहतील. पण त्यानंतर पुढच्या/पुढच्या पिढित जात लांबत जाऊन जात सांगणं निर्रथक व तापदायक होइल,आणि आपल्याला अपेक्षित असलेली माणूस-हीच जात सांगावी/पाळावी लागेल. :)
त्यापेक्षा जात अशी सांगायला पाहिजे:>>> सांगायला नव्हे,पाळायला पाहीजे. पण ते आपोआप होणं शक्य नाही.त्या साठि जाति 'मोडण्याचे' कार्यक्रमच हवेत.
@बाप : माणूस
आई : माणूस
अपत्य : माणूस>>> हा भाबडा आशावाद आहे... असो! :)
@काही दिवसांनी (पिढ्यांनी) जात सांगायचे / विचारायचे कारण आपोआप नाहिसे होईल.>>> ते मी म्हटलं तश्याच 'कार्यक्रमांनी' शक्य होणार आहे.
@काही दिवसांनी (पिढ्यांनी) जात सांगायचे / विचारायचे कारण आपोआप नाहिसे होईल.>>> ते मी म्हटलं तश्याच 'कार्यक्रमांनी' शक्य होणार आहे.
नो प्रॉब्लेम ! एका किंवा अनेक कोणत्याही प्रकारे भारतातील अयोग्य रुढी-परंपरा जर दूर झाल्या तर आनंदच आहे... त्या भूतकाळात जाणे जास्त महत्वाचे.
(एखादी गोष्ट करण्याचे एकापेक्षा जास्त प्रकार बरोबर असू शकतात यावर विश्वास असणारा) इए
माननीय वडापावजी, तुमच्या धाग्याच्या विषयामुळे एका संपादकाला हितं तळ ठोकून र्हावं लागतय व प्रतिसाद देत बसावं लागतय. असे धागे विकांताला काढून संपादकांना सुट्टीचा आनंद मिळू देत नाही तुम्ही! आता निदान तुमच्या धाग्याला चार प्रतिसाद दिलेत हे लक्षात ठेऊन माझा धागा येईल तेंव्हा सव्याज परतफेड करावी.
संपादकीय अधिकारांचा वापर करून "माझा कंपू" ही जात बनविण्याचा अशक्त प्रयत्न असल्याचा वास या प्रतिसादाला का ब्रे येतोय ? ;)
(मिपा जमातीच्या रितीभातींप्रमाणे टीव्र णीशेढ वेग्रे करावा काय या विचारातला) इस्पीकचा एक्का
(हघ्या)
मिळाला, नव्या धाग्याचा विषय मिळाला! "आहेच मी कंपूबाज!!! मग?" ;)
मदनबाण, वडापाव यांना एवढ्यात चार प्रतिसाद देऊन झाल्याने त्यांच्याकडून किमान दोन दोन प्रतिसाद, तुम्ही एखादा द्या, मउवा, बाबा पाटील यांना आत्ताच एक उपप्रतिसाद दिलाय त्यामुळे तेही देतील. संपादकांना चावडीवर आणि महिलांना अनाहितामध्ये आवाहन केल्यास बघता बघता शंभरेक प्रतिसाद मिळतील.
मतांची जमवाजमव करण्याची कोष्टकं पाहून निवडणूका जवळ आल्याची खात्री झाली ;) आमीपण तुमच्या कंपूत. तेवढेच दोनचार छानछान प्रतिसाद मिळले तर कोणाला नको आहेत? +D
'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार??
अहो प्राचीन काळापासुन ब्राम्हण अगदी व्यवस्थित मांसाहार करीत असत त्याला धर्माची पुरेपुर मान्यता होती. म्हणुन ब्राम्हण जर मांसाहार करीत नसतील तर ते आधुनिक ठरतात कारण ते आपल्या पुर्वजांची जुनी मांस खाण्याची परंपरा मानायला नकार देत आहेत. ते आधुनिक आणि बंडखोर आहेत म्हणुन आपल्या पुर्वज ब्राम्हणांची मांस खाण्याची परंपरा नाकारुन शाकाहार करीत आहेत.
आता यझ संचालन करण्याचा अधिकार केवळ फ़क्त ब्राम्हणांना च होता हे तुम्हाला माहीत आहे हे गृहीत धरुन चालतो. क्षुद्र आदींना त्याच्या आसपास ही येण्यास मनाई होती हे ही माहीत असेल असे समजतो. एतरेय ब्राम्हण आपण वाचलेच असेल. आणि हा त्यातील प्रसिध्द श्लोक ज्यात यज्ञात बळी दिलेल्या प्राण्याच्या अवयवांची वाटणी यझ संचालित करणार्याक ब्राम्हणांत कशी करावी याचे स्वच्छ वर्णन केलेले आहे. याचा मुळ संस्कृतश्लोका ची लिंक ही देतो आणि त्याचा इंग्रजी अनुवाद ही देतो. हे समजण्यास काही अडचण आली तर अजुनही खोलात जाउ शकतो. तुर्तास एवढे पुरेल बहुधा आणि एक मधुपर्क म्हणजे काय ? तो कोणी कोणाला द्यायचा असतो ? आणि त्याच्या व्याख्येत नांमासो मधुपर्क भवति असे का म्हटलेले आहे हे जरा शोधुन काढा. Indology चा अगदी पहीला प्राथमिक धडा जरी अभ्यासला तरी चालेल.
http://hinduonline.co/Scriptures/Brahmana/AitareyaBrahmana.html
"Now follows the division of the different parts of the
sacrificial animal (among the priests). We shall describe it.
The two jawbones with the tongue are to be given to the
Prastotar; the breast in the form of an eagle to the Udgatar;
the throat with the palate to the Pratihartar; the lower part of
the right loins to the Hotar; the left to the Brahma; the right
thigh to the Maitravaruna; the left to the Brahmanuchhamsi;
the right side with the shoulder to the Adhvaryu; the left side
to those who accompany the chants; the left shoulder to the
Pratipasthatar; the lower part of the right arm to the
Neshtar; the lower part of the left arm to the Potar; the upper
part of the right thigh to the Achhavaka; the left to the
Agnidhra; the upper part of the right arm to the Aitreya; the
left to the Sadasya; the back bone and the urinal bladder to
the Grihapati (sacrificer); the right feet to the Grihapati who
gives a feasting; the left feet to the wife of that Grihapati who
gives a feasting; the upper lip is common to both, which is to
be divided by the Grihapati. They offer the tail of the animal
to wives, but they should give it to a Brahmana; the fleshy
processes (maanihah) on the neck and three gristles
(kikasaah) to the Grahvastut; three other gristles and one half
of the fleshy part on the back (vaikartta) to the Unnetar; the
other half of the fleshy part on the neck and the left lobe
(Kloma) to the Slaughterer (Shamita), who should present it
to a Brahmana, if he himself would not happen to be a
Brahmana. The head is to be given to the Subrahmanya, the
skin belongs to him (the Subrahmanya), who spoke, Svaah
Sutyam (to morrow at the Soma Sacriice); that part of the
sacrificial animal at a Soma sacrifice which beloings to Ilaa
(sacrificial food) is common to all the priests; only for the
Hotar it is optional. All these portions of the sacrificial animal
amount to thirty-six single pieces, each of which represents
the paada (foot) of a verse by which the sacrifice is carried
up..." "To those who divide the sacrificial animal in the way
mentioned, it becomes the guide to heaven (Swarga). But
those who make the division otherwise are like scoundrels and
miscreants who kill an animal merely." "This division of the
sacrificial animal was invented by Rishi Devabhaaga, a son of
Srauta. When he was departing from this life, he did not
entrust (the secret to anyone). But a supernatural being
communicated it to Girija,the son of Babhru. Since his time
men study it." [Aitareya Brahman, Book 7, Para 1, ]
ब्राह्मणांच्या मांसाहाराचे पुरावे वेदकाळापासून आहेत- नाकारत कोणीच नाही. पण शाकाहार करणे हा प्रकार गेली दीडेक हजार वर्षे तरी सुरू आहे. त्यामुळे अगोदरची मांसाहारी परंपरा मोडली अन शाकाहारी परंपरा सुरू झाली त्यालाही लै वर्षे झाली, त्यामुळे सद्यस्थितीत मांसाहार करणे हे आधुनिक आहे इतके सांगून मी आपली (फुल्लि पेड) रजा घेतो.
अख्खी मानवजातच शाकाहारी होती आधी, नंतर ऑम्निवोरस म्हणून उत्क्रांत झाली, असे पुरावे आहेत.
मांसाहार चुकीचा नाहीच. अन आपण मानव १००% मांसाहारी ही नव्हेत.
आधुनिक, अर्वाचिन, प्राचीन, नक्की कोणत्या काळापासून हे फक्त चष्मे आहेत.
खाण्याचाच विषय आहे, तर जातींशी जोडलेला आहार हा एक चष्मा छानही आहे अन वाईटही.
रामग्याचं/शेंडीचं मटन, अन उकडीचा मोदक, किंवा आमटी-पाटवड्या, किंवा पाया सूप... जे असेल ते. एका विशिष्ट समाजघटकाच्या नेहेमीच्या खाण्यापिण्याचा भाग म्हणून विकसित झाले, अन त्या त्या 'जाती'ची ओळख म्हणून प्रसिद्ध झालेत.
पूर्वी 'क्षक्षक्ष हिंदू मटन खाणावळ' अशी पाटी कुणाला खटकत नसे, तसेच शिंप्याचे दुकान, भटाची ओसरी, वाण्याची लबाडी, तांबोळ्याचे दुकान, किंवा खाटिकखाना इ. वाक्प्रचार/शब्दही खुपत नसत...
लेखापाठचा मुद्दा, 'आजकाल अस्मिता जास्तच हुळहुळ्या झाल्यात', हा असावा.
मान्य आहे ओ साहेऽबं, ते यकदोन स्मायल्या र्हाऊन गेल्या बगा अम्मळ :) लै शिरेस न्हौतो आमी.
बाकी ते हुळहुळ्या अस्मितांबद्दल सहमत आहे. अस्मितेची गळवे लै ठसठसलेली आहेत अलीकडे ;)
तुळजाभवानी ,ज्योतिबा -मराठ्यांचे
काय राव कैच्या काय ?
दोन्ही आमच्या कडे कुलदेवता व कुलदेव आहेत
देवाला तरी जातीच्या बंधनात बांधू नकोस रे ग्रेट्या
तुम्हाला कोणी अडवलेय दत्त गुरुन्जी, गणपतीची किंवा परशुरामाची भक्ती करायला ?करत जावा कि ! (काही भाग अप्रकाशित)
- संपादक मंडळ.
स्वतःला फक्त (शाकाहारी )हिंदू समजणारा
कुलकर्णी साहेब,
त्यांनी फक्त जनरल स्टेटमेंट केलेलं आहे. नि त्यात 'थोडंसं' तथ्य आहे.
तुळजाभवानीचे पुजारी हे जन्मानं ब्राह्मण नसतात. तिथं 'वशाटा'च्या सवासणी जेवायला घातल्या जातात नि तुलनेने ब्राह्मणांची संख्या खरंच कमी असते. ज्योतिबालासुद्धा पुजारी ब्राह्मण नाहीत.
तिथं सुद्धा ब्राह्मणांची संख्या तुलनेनं कमी असावी.
कुलदेव/देवी म्हणून दर्शनाला जाणं हा भाग वगळता 'आवड' म्हणून देवाला जाणारा वर्ग पाहिला तर वरचं स्टेटमेंट लक्षात येईल.
मी वाईचा. मांढरदेवी (काळूबाई) इथं जाणारा वर्ग हा मुख्यत्वे गावाकडचा नि त्यातसुद्धा हरिजन वर्गातला असा असतो. तिथं मराठा समाज सुद्धा कमीच पहायला मिळतो.
विठोबाच्या दर्शनाला जाणारा माणूस काळा, रापलेला, सुरकुतलेल्या चेहर्याचा कष्टकरी शेतकरी असतो.
नि कृष्णाच्या दर्शनाला जाणारा गोरा, श्रीमंती छटा असलेला असतो.
हे 'सामान्य' विधान आहे. जनरल स्टेटमेण्ट.
असाच फरक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या, आश्रमांच्या विषयी करता येतो.
-इतरांपेक्षा मागास म्हणून इतरमागास ;) प्यारे
अबे अभ्या,
आम्ही गेलो ते 'कदम' म्हणून होते... अगदी देवळासमोर. त्यांनी अगदी देवीची पूजा वगैरे सगळं सांगितलं नंतर मंगळावर म्हणून सवाष्णं आहेत म्हणे, मटण होतं. आम्ही पुरणपोळ्या घेतल्या बांधून.
ते कदम पूजा करतात ना? देवीच्या पुजार्यांना काय म्हणतात ते नेमकं विसरलो बघ. (पंढरपूरचे विठोबाचे बडवे, रुक्मिणीचे उत्पात तसे)
बाकी ज्योतिबाचे पुजारी नक्की ब्राह्मण नाहीत.
भोपी भोपी.
कदम असतात ते भोपी किंवा भोप्या. कोंडो, पोफळे आहेत ते उपाध्ये. पूजेची वर्णी त्यांना असते.
जातवार डिट्टेल लैच आहेत पार आदिलशाही, निजामशाहीपासून चालत आलेत. असल्या अधिक माहितीसाठी दै. सकाळ ची उस्मानाबाद आवृत्ती वाचावी नवरात्रात. ;)
बडवे हे पांडुरंगाचे पुजारी नव्हेत हे नमूद करू इच्छितो. विठोबाच्या पुजार्याचे आडनांव पुजारी च आहे. बडवे हे केवळ विश्वस्त आहेत. बडवे हे मूळचे कर्नाटकातील देवर निंबर्गी गावचे. ह्या पुजार्यांचे आणि बडव्यांचे विळ्या भोपळ्याचे सख्य आहे. पण एकूणच संख्या बळात जास्त असल्यामुळे बडव्यांचा वचक वाढत गेला. असे असले तरी विठठलाच्या पूजेचा अधिकार पुजार्यांनाच आहे. आपण विठ्ठ्लापुढे पहिल्यांदा जी दक्षिणा ठेवतो ती बडव्यांकडे जाते (आता ती मंदिर समितीकडे जाते) आणि पुढची ठेवलेली दक्षिणा (ज्याला ओवाळणी म्हटले जाते) पुजार्यांना मिळते. ह्याच कारणामुळे आलेल्या भक्ताकडे बर्याचदा दुसर्यांदा दक्षिणेची मागणी केली जाते. ज्यांना ही विभागणी माहिती आहे ते स्वखुशीने ठेवतात, पण ज्यांना माहीत नाही, त्यांचा गैरसमज होतो आणि वादाचे प्रसंग उद्भवतात. अर्थात ह्यात भाविकांचा काहीच दोष नाही.
असो, बरेच अवांतर झाले. बाकी चर्चा चालु द्या
(विठोबाच्या पुजार्यांचा भाचा)
चावटमेला
कदम पाटलांना येथील तुळजापूर धरून १६ गावची पाटीलकी होती, ते येथील पारंपारिक पुजारी आहेत.देवीच्या विधीचे ,कार्याचे इतर काही मान आहेत ते वेगवेगळ्या समाजाला आहेत. देवीचा विड्याचा मान मुस्लिम धर्मियांना आहे.देवीच्या खानपानाचा मान दीक्षितांना आहे. देवीला मटनाचा नैवैद्य असला तरी पहिला नैवैद्य हा साधी भाजी आणि भाकरीचा असतो
'क्षक्षक्ष हिंदू मटन खाणावळ' अशी पाटी कुणाला खटकत नसे, तसेच शिंप्याचे दुकान, भटाची ओसरी, वाण्याची लबाडी, तांबोळ्याचे दुकान, किंवा खाटिकखाना इ. वाक्प्रचार/शब्दही खुपत नसत...
मी तर, 'संत ज्ञानेश्वर मटण शॉप' अशी पाटीही पुण्यात पाहिली आहे.
मी तर शेतकी महाविद्यालय चौकात (पोलिस ग्राऊंडच्या समोर) वीर चाफेकर मटण मार्केट देखील पाहीले होते. महानगरपालिकेचे मटण मार्केट होते ते. नंतर लोकांनी आंदोलन करून ते नाव बदलायला लावले.
http://www.maayboli.com/node/46230
हे असलं अजूनही असतं.
बाकी लेख उत्तम व संतुलित आहे. प्रतिसादही छान आहेत. टायटलवरून पर्सूरामब्रिगेड वर्सेस संबाजीब्रिगेड अस्लं कायतरी असेल असं वाटलेलं. ते चुकीचं निघालं याचा आनंद आहे.
-आनंदी, गोपाळ.
अजिबात धक्का बसला नाही.
कोरियातच काय, कुठेही अशा प्रकारचा जातीयवाद व उलटजातीयवादही चालतच आहे. अगदी आजही. आणि ग्रेथिंच्या म्हणण्यानुसार मुली जास्त जातीयवादी असतात हेही खरंच आहे.
"आणि तोपर्यंत?" हा प्रश्नमात्र कायम अनुत्तरितच राहतो.
काय करायचे तोपर्यंत?
अहो प्राचीन काळापासुन ब्राम्हण अगदी व्यवस्थित मांसाहार करीत असत त्याला धर्माची पुरेपुर मान्यता होती.
ऐकून आहे. म्हणूनच त्याकाळी त्यांच्याकडे गायी भरपूर असायच्या... नंतर ते जसेजसे दक्षिणेकडे वळले तसं-तसं त्यांचा मांसाहार कमी झाला आणि मग ते कालांतराने शाकाहारी झाले इ इ असंही ऐकलंय. याची आठवण करुन दिल्याबद्दल आणि त्यापुढे एवढी विस्तृत माहिती दिल्याबद्दल आभार. पण याचा अर्थ 'शाकाहार करणे' हे चल तत्त्वांत गणावे लागेल का? आधी मासांहार करायचे, मग बंद झाले, आता काही जण करतात काही जण नाही.
धर्माची काही स्थिर आणि काही चल तत्त्वे असतात . चल तत्त्वे कालानुरूप बदलतात ,जसे की १९ व्या शतकात चालू असलेल्या सतीप्रथा / विधवा केशवपन इत्यादि कुप्रथा आज बन्द झाल्या म्हणून धर्म बुडाला नाहीए . पण धर्माची स्थिर तत्त्वे असलेले व्यक्तिगत सन्स्कार ,जसे की चोरी करणे हे पाप आहे ,आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे - मंदार कात्र्यांच्या या बोलण्यावरुन ते शाकाहार हे स्थिर तत्त्वांत मोडतायत असं दिसतं.
मुळात इथे ब्राह्मणांनी किंवा कोणीही मांसाहार करावा की करु नये हा मुद्दाच मांडायचा नव्हता - नाहीये. मांसाहार करणे हे ज्याच्या-त्याच्यावर अवलंबून आहे - मान्य. पण मांसाहार न करण्यामागची भूमिका ही 'माझा धर्म किंवा माझी जात भ्रष्ट होईल' अशी असेल तर ते त्या व्यक्तीचं मागसलेपण आहे.
अहो तुम्ही नाकारत नाही ही चांगलीच गोष्ट आहे पण मी या धागाकत्यांना उत्तर देत होतो त्यांच्या लेखावरुन तरी त्यांना याविषयी काही माहीती असेल असे दिसत नाही. अन्यथा त्यांनी जे त्यांना मांसाहारा वरुन हीणवत आहेत अशांना मांसाहाराच्या उज्वल परंपरे च्या समर्थनार्थ त्याच जोशात उत्तर दिले असते ज्या जोशात त्यांनी हा लेख लिहीलेला आहे.
प्रतिक्रिया
@मलाही "तू ब्राह्मण??? वाटत
त्यात देशस्थ गोरे घारे वैग्रे
बीग्रेडी दहशतवाद
हा हा..
+१
नॉन व्हेज महाग
सगळ्या ब्राम्हणांना हे ऐकावेच लागते
सांभाळून बुवा!!
आडनाव जोशी होतं का हो त्याचं?
पाटील तुम्ही आयुर्वेदात काय करणार ?
हे मात्र प्रत्यक्ष पाहीलयं.
अहो डॉक्टर माझे तेच म्हणणे
होतं असं कधी कधी....
भारतात प्रत्येक गोष्ट जातीय
अंतरजातीय विवाह हे जे जात
असं नाही काही. समजा
वडापाव,
असहमत
+१
@यात धोका असा की त्यामुळे
@काही दिवसांनी (पिढ्यांनी)
@काही दिवसांनी (पिढ्यांनी) जात सांगायचे / विचारायचे कारण आपोआप नाहिसे होईल.>>> ते मी म्हटलं तश्याच 'कार्यक्रमांनी' शक्य होणार आहे.नो प्रॉब्लेम ! एका किंवा अनेक कोणत्याही प्रकारे भारतातील अयोग्य रुढी-परंपरा जर दूर झाल्या तर आनंदच आहे... त्या भूतकाळात जाणे जास्त महत्वाचे. (एखादी गोष्ट करण्याचे एकापेक्षा जास्त प्रकार बरोबर असू शकतात यावर विश्वास असणारा) इएमाननीय वडापावजी, तुमच्या
संपादकीय अधिकारांचा वापर करून
मिळाला, नव्या धाग्याचा विषय
रेवतीताई,
@मित्रपरिवार वाढावा असा
मतांची जमवाजमव करण्याची
ते कंपू बिंपू काय नको पण
थोड सफ्जुन घ्या !
'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार??अहो प्राचीन काळापासुन ब्राम्हण अगदी व्यवस्थित मांसाहार करीत असत त्याला धर्माची पुरेपुर मान्यता होती. म्हणुन ब्राम्हण जर मांसाहार करीत नसतील तर ते आधुनिक ठरतात कारण ते आपल्या पुर्वजांची जुनी मांस खाण्याची परंपरा मानायला नकार देत आहेत. ते आधुनिक आणि बंडखोर आहेत म्हणुन आपल्या पुर्वज ब्राम्हणांची मांस खाण्याची परंपरा नाकारुन शाकाहार करीत आहेत. आता यझ संचालन करण्याचा अधिकार केवळ फ़क्त ब्राम्हणांना च होता हे तुम्हाला माहीत आहे हे गृहीत धरुन चालतो. क्षुद्र आदींना त्याच्या आसपास ही येण्यास मनाई होती हे ही माहीत असेल असे समजतो. एतरेय ब्राम्हण आपण वाचलेच असेल. आणि हा त्यातील प्रसिध्द श्लोक ज्यात यज्ञात बळी दिलेल्या प्राण्याच्या अवयवांची वाटणी यझ संचालित करणार्याक ब्राम्हणांत कशी करावी याचे स्वच्छ वर्णन केलेले आहे. याचा मुळ संस्कृतश्लोका ची लिंक ही देतो आणि त्याचा इंग्रजी अनुवाद ही देतो. हे समजण्यास काही अडचण आली तर अजुनही खोलात जाउ शकतो. तुर्तास एवढे पुरेल बहुधा आणि एक मधुपर्क म्हणजे काय ? तो कोणी कोणाला द्यायचा असतो ? आणि त्याच्या व्याख्येत नांमासो मधुपर्क भवति असे का म्हटलेले आहे हे जरा शोधुन काढा. Indology चा अगदी पहीला प्राथमिक धडा जरी अभ्यासला तरी चालेल. http://hinduonline.co/Scriptures/Brahmana/AitareyaBrahmana.html "Now follows the division of the different parts of the sacrificial animal (among the priests). We shall describe it. The two jawbones with the tongue are to be given to the Prastotar; the breast in the form of an eagle to the Udgatar; the throat with the palate to the Pratihartar; the lower part of the right loins to the Hotar; the left to the Brahma; the right thigh to the Maitravaruna; the left to the Brahmanuchhamsi; the right side with the shoulder to the Adhvaryu; the left side to those who accompany the chants; the left shoulder to the Pratipasthatar; the lower part of the right arm to the Neshtar; the lower part of the left arm to the Potar; the upper part of the right thigh to the Achhavaka; the left to the Agnidhra; the upper part of the right arm to the Aitreya; the left to the Sadasya; the back bone and the urinal bladder to the Grihapati (sacrificer); the right feet to the Grihapati who gives a feasting; the left feet to the wife of that Grihapati who gives a feasting; the upper lip is common to both, which is to be divided by the Grihapati. They offer the tail of the animal to wives, but they should give it to a Brahmana; the fleshy processes (maanihah) on the neck and three gristles (kikasaah) to the Grahvastut; three other gristles and one half of the fleshy part on the back (vaikartta) to the Unnetar; the other half of the fleshy part on the neck and the left lobe (Kloma) to the Slaughterer (Shamita), who should present it to a Brahmana, if he himself would not happen to be a Brahmana. The head is to be given to the Subrahmanya, the skin belongs to him (the Subrahmanya), who spoke, Svaah Sutyam (to morrow at the Soma Sacriice); that part of the sacrificial animal at a Soma sacrifice which beloings to Ilaa (sacrificial food) is common to all the priests; only for the Hotar it is optional. All these portions of the sacrificial animal amount to thirty-six single pieces, each of which represents the paada (foot) of a verse by which the sacrifice is carried up..." "To those who divide the sacrificial animal in the way mentioned, it becomes the guide to heaven (Swarga). But those who make the division otherwise are like scoundrels and miscreants who kill an animal merely." "This division of the sacrificial animal was invented by Rishi Devabhaaga, a son of Srauta. When he was departing from this life, he did not entrust (the secret to anyone). But a supernatural being communicated it to Girija,the son of Babhru. Since his time men study it." [Aitareya Brahman, Book 7, Para 1, ]ब्राह्मणांच्या मांसाहाराचे
ब्याटोबा,
मान्य आहे ओ साहेऽबं, ते यकदोन
जातीशी संबंध फक्त आहाराचाच
तुळजाभवानी ,ज्योतिबा
तुळजाभवानी ,ज्योतिबा -मराठ्यांचेकाय राव कैच्या काय ? दोन्ही आमच्या कडे कुलदेवता व कुलदेव आहेत देवाला तरी जातीच्या बंधनात बांधू नकोस रे ग्रेट्या तुम्हाला कोणी अडवलेय दत्त गुरुन्जी, गणपतीची किंवा परशुरामाची भक्ती करायला ?करत जावा कि ! (काही भाग अप्रकाशित) - संपादक मंडळ. स्वतःला फक्त (शाकाहारी )हिंदू समजणाराकुलकर्णी साहेब,
जण्रल असेल स्टेट्मेण्ट तर ओके.
+१
अबे अभ्या,
>>>मंगळावर...
भोपी भोपी.
(पंढरपूरचे विठोबाचे बडवे,
कदम पाटलांना येथील तुळजापूर
चेतन कुलकर्णीं
नांवात काय आहे?
मी तर शेतकी महाविद्यालय चौकात
जात नाही ती जात.
मायबोलीवरचा लेख वाचून
अहो प्राचीन काळापासुन
अहो बॅटमॅन
पण धागाकर्त्याचे मत कै
Pagination