Welcome to misalpav.com
लेखक: चतुरंग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आनंद रिझाईन्ड!!!!!!!!!!!! :((( फारच वाईट ..आता ४-२ चा लीड दिलाय कार्लसनने! फारच अवघड आता सामना. परंतु आज मी श्रेय कार्लसनला न देता आनंदच्या मध्य डावातल्या घाण खेळाला देईन!!

आणखी एक धोका आता आनंदला ध्यानात घ्यावा लागेल तो म्हणजे त्याने डावाच्या मध्यावर दोन पांढर्‍यांची जी सोय केली ती अंगाशी आली आहे, कारण आता शेवटचा बारावा गेम मॅग्नसला पांढर्‍या मोहर्‍यांचा फायदा देणार आहे.

सचिनने बऱ्याच वेळा समोरच्या गोलंदाजाची भिती घेऊन सुमार खेळ केला त्याने. अरे पण समोरच्या गोलंदाजाने देखील तुझी भिती घेतलीये ते पहा ना. अनेक वेळेला सुरेख मोहोऱ्या आणि चाली असून देखील केवळ स्वतःचा बचाव भक्कम करण्याच्या नादात आनंदने दोन्ही डाव गमावले. मुळात कार्लसन हा फक्त आनंदच्या बचावाशी समांतर खेळतोय. एक छोटीशी फट दिसली की लगेच छाताडावर बसायचं.

जाम चिंतेत आहे हे नक्की. लागोपाठ दोन सामन्यात मार खाऊन पुढे जाणं अवघड आहे. उद्या विश्रांतीचा दिवस. हे पत्रकार काय प्रश्न विचारतात राव? मूर्ख लेकाच्चे आनंद म्हणाला "नाऊ आय हॅव टुडू माय बेस्ट, गोईंग फॉर्वर्ड!" तर तो गाढव विचारतोय "वॉट डू यू मीन बाय डुइंग युर बेस्ट?" आनंद जवळपास चिडलाच होता "डुइंग युर बेस्ट इज डुइंग युर बेस्ट, व्हाय डोंट यु अंडरस्टँड इंग्लिश?"

आणखी एक धोका आता आनंदला ध्यानात घ्यावा लागेल तो म्हणजे त्याने डावाच्या मध्यावर दोन पांढर्‍यांची जी सोय केली ती अंगाशी आली आहे, कारण आता शेवटचा बारावा गेम मॅग्नसला पांढर्‍या मोहर्‍यांचा फायदा देणार आहे.

नाही. तसेच असते. पहिले सहा डाव जे रंग असतात त्याच्या उलट पुढच्या सहात असतात. तसा नियमच आहे. पण या नियमाचा त्याला उलट फायदा व्हायला हवा होता. लागोपाठ दोन पांढरे डाव आल्यावर किमान एक (आणि जमल्यास दोन्ही) जिंकणे अनिवार्य होते जर सामन्यात राहायचे अस्ले तर. पण आता अवघड दिसते आहे. एकच आहे, आता आनंदने सुलतानढवा करायला हवा. जो होगा सो होगा, तसंही दोन गुणांनी मागे आहे. फुलबाज्या लावून खेळला, नैसर्गिक गेम तर काही तरी शक्यता आहे लढत निर्माण व्हायची अन्यथा नवीन चँपिअन दिसायला लागलेला आहेच!!

टॉस जिंकून त्यानेच पहिला गेम काळ्या सोंगट्यांनी खे़ळण्याची निवड केली होती.

मला वाटलं होतं टॉस कार्लसनने जिंकला म्हणून! ही स्ट्रॅटेजी अंगावर येते आहे म्हंटल्यावर आता त्याला प्लान बी अ‍ॅक्टिवेट करायलाच हवा. अजून सहा डावात बरोबरी साधायची म्हंटली तरी चमत्कारच करायला पाहिजे त्याला!

पोरगं लै भारी आहेच. अन उरलेल्या 6 पैकी 3 डाव आनंद नक्कीच जिंकणार नाही. Today we have new champion only MG.

चतुरंग , रमताराम , आणी इतर मिपाकर या समालोचानासाठी . एकदम झक्कास!!!!!!