Welcome to misalpav.com
लेखक: प्रमोद देर्देकर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आम्हाला काय माहित भुते आहेत का? आम्हाला मरून किती वर्षे झाली हे सुद्धा विसरून गेलोय
असा पीजे मारायचा मोह आवरवा का नाही असा विचार करतो आहे

बर :-/ लहान दर्दु काका मुंज प्रकार पाहिला नाहि कधी आम्हि सातारची घाटावरची माणसं , आमच्याकडे नै करत असलं काहि सो विचारलं ... नाय माहित म्हणुन सांगाना ... असे अंगावर का येताय :-/

अगं रागावु नाको पुजातै, आणि मला ते अगदि डाविकडे लिहण्यास शिकव कि जरा. म्हन्जे चौकोन लहान कर्ता येइल. अवांतरः- तु तिकडे अमेरिकेत ना मग तिकडे आता रात्र असेल ना मग तु का़य जागरण कर्तेस काय? कि तुला माहीत नसताना दुसर्या कुणी तुझ्या आयडी ने लिहताहे. बघ बुवा कोणि दिसतंय काय? }:> >:-] >:]

ओ दर्दु काका काय तुमी पण :-/ अहो थँक्स गिविन्ग हॉलिडेझ आहेत संडे पर्यंत सुट्टीयेओ दद्रु काका ... ओह्ह सॉरी सॉरी दर्दु काका अहो एक मोविए पाहुन झाला आजुन एक पहायचाय ...आत्ताशी तर साडबारा झालेत सुट्टी का आनंद तुम क्या जानो दर्दु काका :-/

लहानपणी जादूगार रघुवीर यानी' आपण जादू करताना हातचलाखी करतो . असे करत असताना प्रेक्षकांशी चक्क खोटे असलेले खरे मानण्याची सूचना देतो. मानवात मुळातच गहन विचारापासून दूर जाण्याची प्रवृती असते. गहन विचार हे मनास कष्ट देतात. पण हजारात एखादा वेगळा विचार करणारा माणूस असतो तो आमची जादू ओळखतो. रघुवीर जादूगार एवढे मोठे सदगृहस्थ ते कशाला खोटे बोलतील हे गृहीतच चुकीचे असते हे कायम लक्षांत ठेवा मुलानो ! ' हा त्यांचा उपदेश मनावर खोल ठसा उमटवून गेला आहे. जगातील कोणताही माणूस हा पूर्ण पणे स्वच्छ नसतो. जरा जपूनच कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवावा. मग ते बोलणे मला भूत दिसले असे असो की मला देवाने दर्शन दिले असे असो.

@नाही तर अतृप्त आत्मा त्यांच्या मानगुटीवर बसेल . >>> http://www.sherv.net/cm/emoticons/rage/creepy-troll-rage-smiley-emoticon.png ह्हा...ह्हा...ह्हा...! असो! या धाग्या निमित्तानी मला'च (इथे) सुचलेली एक भूता'ची पाककृती द्यावी म्हणतो. भूत बनविण्याची पाक-क्रुती:- साहीत्य- एक जोडी धार्मिक वातावरणात वाढलेले-पती/पत्नी, त्यांचं तसच १ श्रद्धाळू अपत्य (वय तीन वर्षापेक्षा जास्त नसावं, नाहीतर रेसीपी संपंन्न होण्यात काही बुद्धीवादी तसेच विवेकी अडचणी येतात), रहाण्यासाठी कोणत्याही देश/प्रदेशातले एक घर, आणी जगातला कुठलाही देश( देश जितका धार्मिक असेल,तितकी पाक-क्रुती दमदार व जोमदार होते) क्रुती--- प्रथम १ धर्म:श्रद्ध प्र'देश घ्यावा, तो परंपरेनी लडबडीत होइपर्यंत भारुन/माखुन घ्यावा,मग त्यात एका सुशिक्षीत,उच्चविद्याविभुषीत कींवा अशिक्षीत कींवा कश्याही...थोडक्यात ---धार्मिक असलेल्या पती/पत्नींना आणून सोडावे. त्यांना त्यांच्या या अपत्यास शक्यतोवर यथेच्छ धार्मिक संस्कार करण्यास सांगावे, मुल जर का निबर मिळालेलं असेल तर, मधुन मधुन त्याच्यावर 'ऐकत नाहीस आई बाबांचं?...थांब तुला भूत्याकडे देते' असे मंत्र मारावे,यानी पोर चांगलं मऊ पडत,आणी रेसीपी योग्य वळणावर पोहोचते...पोर फारच निबर असेल आणी धर्मश्रद्धेच्या रश्यात बुडत नसेल तर,वरतून एक जाड छडी घेऊन त्याला ''फार अक्कल वाढलीये तुझी,म्हणे आत्मा कुठ्रे असतो?'' असं वरुन खोबरं पेरत खाली टेंबाव...मग त्याला एक श्रद्धेची उकळी येऊ द्यावी... आणी जगात फिरण्यासाठी डीशमधे काढावं... इथे मुलाच्या डोक्यातलं भूत निम्म तयार होतं.. मग हा मुलगा थोडं जरी काही झालं तरी एकदम फॉर्मात येऊन घाबरेल..'माझ्यावर भूत बसलय' अश्या कथा सांगुन शाळेला दांड्या मारेल... झालं... इथुन पुढे त्याच्यावर श्रद्धेचं झाकण टाकून त्याला निवत ठेवलं की त्याच्यातलं भूत तय्यार ... http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scared-ghost-smiley-emoticon.gif टीप-स्वतःला आणी नंतर इतरांना फसविण्यासाठी... हे भूत अगदी हुकमी एक्यासारखं तयार राहातं, त्याला नासण्या,अंबण्या विटण्याचं भय फक्त जागरुक प्रशासन,सुशिक्षीत समाजमन या पासूनच असतं ... तेंव्हा ही पाक-क्रुती एकदा तयार का झाली,की सहसा हज्जारो वर्ष खराब होत नाही,अगदी बिनधोक टिकते... ०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===० आत्म्या'चे अस्तित्व अशिक्षेत असते! http://www.pic4ever.com/images/devil.gif (अशी सही घ्यावी म्हणतोय!)

मुळात हा मिपावर कोनत्या तरी एका धाग्यावर दिलेला प्रतिसाद आहे. नंतर तो मि'मवर आणी मा.बो.वर आणी त्यानंतर मुखपृष्ठा'वर टाकलेला होता. आज इथे देणं गरजेचं वाटलं म्हणून परत इथे! :)

भुताचा हसरा चेहरा फार्फार आवडला. त्यावरून आठवले, हीमॅन विरुद्ध स्केलेटॉर या सनातन युद्धात स्केलेटॉरच आमचा फेव्हरीट होता कायम. बेरकी एकदम, आलं अंगावर की घे शिंगावर, नै झेपलं तर जा पळून हा मंत्र जपत कायम हीमॅनला चकवणार...बेष्टंच जबरी. हा घ्या तुमच्यासाठी एक स्केलेटॉर आत्मूस. Skeletor

आणि पळायचा तेपण एक किलिंग ट्रोल स्माईल देऊन ;) हॅ हॅ हॅ वाली ती कवटी इतकी आवडायची की सर्वत्र तीच चित्रे काढत असे आणि शाळेतल्या बैंची बोलणी खात असे =)) चित्र अर्थात वेताळ आणि स्केलेटॉरचे हायब्रीड असे. धड वेताळाचे तर डोके स्केलेटॉरचे.

आयला बॅट्या तू बी असलाच व्हता व्हय? म्या काढलेली चित्रं मात्र परफेक्ट असायची. इव्हन ह्युमन अ‍ॅनाटोमी हीम्यान अन पामर वॉकरांची चित्रे पाहूनच शिकलो जास्त. :)

म्या काढलेली चित्रं मात्र परफेक्ट असायची.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते असेच! :) नायतर आमची चित्रकला म्हणजे......त्याला उपमाही मिळत नाहीये. हात असे कमरेजवळून फुटायचे अन पाय वाकडेतिकडे कसेही. शिवाय कायम साईड व्ह्यू, कारण चेहरा कधी जमलाच नाही. तरीही मी पट्टीचा चित्रकार होतो. पट्टीने सरळ रेषांची चित्रे बरी जमत. निसर्गचित्रातले डोंगर म्हणजे एकजात सगळे समद्विभुज त्रिकोण, आणि कावळे म्हणजे मराठी ४ चा आकडा, फक्त मधले गोंडगोळे कमी करायचे. शिवाय सूर्य म्हणजे वर्तुळपाकळी अन सूर्यकिरणांचे स्पेसिंगही ठरलेले असायचे. आणि खाली एकच एक अखंड आडवी रेष. जणू डोंगरांना ताकीद देतेय, "याच्या खाली आला तर तंगडं मोडीन". या अभेद्य रचनेतून नदी कशी आणायची हेही एक मोठे च्यालेंजच. मग एखादा डोंगर खोडणे, खोडूनखोडून चित्रकलेच्या वहीतले पान काळसर दिसणे (कारण चित्र हे दगडावरची रेघ असल्याच्या थाटात दाबून काढले जायचे) , सिमेट्रीसाठी बर्‍याचदा मधला डोंगर खालच्या बाजूने अंमळ खोडल्या जाणे अन एकाच डोंगरातून सूर्य आणि नदी दिसणे वैग्रे मनोहर प्रकार दिसत. अ डान्स ऑफ फायर अँड आईस म्हणजे नक्की काय प्रकार असतो हे तेव्हा कळाले =)) पुढे मग घर तुलनेने सोपे. दोन आयत आणि एक तिरका आयत वरती कौलारू छपरासाठी झाला की झाले. एक दार, दोन खिडक्या आणि वरच्या कौलांजवळ एक वर्तुळाकृती भोक. झालंच तर जवळ एखाददुसरे झाड वैग्रे. ते झाड तसे जमायचे, पण त्याचे डेरेदारपण दाखवताना कधी डाव्या बाजूचा डेरा मोठा तर कधी उजव्या बाजूचा मोठा दिसे, मग परत चिडचीड, अन अर्थातच खाडाखोड. एवढे झाले की मग कसेबसे रंगवणे. त्यात वॉटरकलरचे काँबिनेशन गंडणे, कधी ते सांडणे, कधी आयत्यावेळी वाटीतले पाणी संपून जाणे, कधी कागद भिजणे, इ.इ. सोपस्कार झाले की एकदाचं चित्र तयार व्हायचं आणि मास्तराला दाखवून शिव्या खायच्या. गेले ते दिवस.......तेच बरंय तेच्यायला. लै तरास दिला चित्रकलेनं. त्यापेक्षा आवडती कलाकृती म्हणजे वहीचं पान फाडून त्यावर शाईचे ठिपके रँडमलि टाकून कागद फोल्ड करायचा आणि मग उघडायचा. तर्‍हेतर्‍हेचे चित्रविचित्र शेप तयार व्हायचे. मग त्यात कधी बॅटमॅनचा शेप येतो की नाही त्याची प्रतीक्षा करण्यात उत्तम वेळ जायचा. किंवा कागद दुमडून दुमडून चित्रविचित्र कट घेऊन मग उघडण्यात एक मजेशीर ओरिगामी साकारण्यातही तितकीच मजा यायची.

कित्ती कित्ती म्हणून सारखेपणा असावा? शब्द अन शब्द अनुभवला आहे.
क्या बात पेठकरकाका! समदु:खी भेटल्याचा लयच जब्राट आनंद झाला बगा. :)

धन्य आहे तुमची चित्तरकथा _/\_ धागा वर काढल्या गेला आहे. मलाही आठवते, सातवीपर्यंत चित्रकला असे तेव्हा सातवीच्या वार्षिक परीक्षेला चक्क माणसाचे चित्र अंमळ खपेबल काढल्या गेले होते. तेव्हाही स्वतःबद्दल असा आदर दाटून आला होता. स्वतःचीच पाठ थोपटली होती मग एकदम :D

पण या कारचे चित्र बाकी मला तसे बरे जमायचे. अर्थातच आतले लोक सोडून. ही माझी लै आवडती कार होती तेव्हाच्या कार्टूनमधली. वॅकी रेसेस म्हणून कार्टून होते. mean machine.

काका आणी ब्याट्या सारखीच अमुची चीत्रकला. पोरगी तरीही गोड मानुन घेते बापाचे चित्रविचित्र चित्रकलेचे आकार. मी कंपनीच्या प्रेझेंटेशन्मधेही असे चित्रे(मशीन शेजारी उभा असलेला मनुक्ष) काढतो लोक त्याला नव्वीन विचार ! असे म्हणुन नावाजतात.

हा हा हा अगदी अगदी =)) मध्ये एकदा मराठी विश्वकोश हाती लागल्यावर त्यात पाश्चात्य चित्रकारांची काही "अ‍ॅब्स्ट्रॅक्ट" चित्रे पाहिल्यावर स्वत:च्या चार गिरगट्यांना चित्र म्हणायची फ्याशन आली होती. चित्रकलेतलं तेव्हाही काही कळत नव्हतं आणि आत्ताही कळत नाही.

@हा घ्या तुमच्यासाठी एक स्केलेटॉर आत्मूस.>>> :D अँड द इटर्निया विल बी माईईईई...न!!! http://www.sherv.net/cm/emoticons/horror/creepy-skull-smiley-emoticon.gif आणी हा घ्या बट्टमण्ण तुमच्यासाठी एक बट्टमण्ण-भुत्त! http://www.sherv.net/cm/emoticons/horror/vampire-bat-smiley-emoticon.gif =))

या विषयावर माबोवर आधीपासुनच एक धागा अस्तित्वात आहे. यावर टिचकी मारून त्याचा जरूर एकदा आस्वाद घ्यावा. www.maayboli.com/node/12295

धागा आधीपासूनच अस्तीत्वात असला तरी तो मि.पा. वर नसल्याने 'आधीपासूनच' ह्या शब्दाला मि.पा. काँटेक्स्ट मधे काहीच अर्थ नाही. तसेच, जसे तिथल्या लिंका इथे चिकटवता तसेच 'या विषयावर मि.पा.वर आधीपासुनच एक धागा अस्तित्वात आहे' अश्या प्रतिक्रीया तिकडे देता का?

मी माबो वर सदस्य नाही तर केवळ एक वाचक आहे. त्यामुळे मी माबोवर कुठल्याही प्रतिक्रिया देत नाही अथवा मिपावरील धाग्याच्या लिंका तिकडे चिकटवत नाही. केवळ विषय सारखा असल्याने मी ती लिंक इथे दिली. अनावश्यक असल्यास संमं पैकी कोणीही ती ऊडवण्यास काहीच हरकत नाही आहे.

नाहि , माळराण ... भयानक किर्र्र वातावरण ...खुस्पटासारखा आवाज ... आणि मग ... कर्र ़कर्र कर्र दार उघडल्यासारख .... आइगं ... भ्या वाटतय .... झोपते बै मी :-/

@आइगं ... भ्या वाटतय .... झोपते बै मी :-\ >>> अगं जिभ्ले...पाणवठाच असेल,अन् रातीला तु त्यात स्वतःला पाहिलं आणी घाबरलीस! =)) बालिकेचं नवं नाव- ड्यांबिस हडळ!!! =))

अगं जिभ्ले...पाणवठाच असेल,अन् रातीला तु त्यात स्वतःला पाहिलं आणी घाबरलीस !
Rolling laughter
बालिकेचं नवं नाव- ड्यांबिस हडळ!!!
ROFLMAO

बलात्कारी, भोंदु बाबा, कर्मकांडे/नाड्या/कसले-कसले नवनवे पुजाविधी वगैरे सांगून लुबाडणारी मंडळी, वेगवेगळ्या चीट-फंडाद्वारे मोठ्या गटाला फसवणारे एजन्ट्स, पोरे/बायकांचा व्यापार करणारे वगैरे अनेक जणं असताना भुते आहेत का हा प्रश्नच कसा पडतो तुम्हाला?

मिपावर किती आहेत ते मोजत होते. १. अत्रुप्त आत्मा २. पिवळा डांबीस ३. वेताळ ४. अग्यावेताळ ५. कुबड्या खवीस ६. येडा खवीस आणखी कोण राहिले असतील तर सांगा.

एक राहिला ...ते म्हणजे कधीतरी भुतासारखच उगवत आणि एकाच प्रतिसादात बोबडी वळवतो ... क व टी !!

नसावीत कारण: १.भुता-खेतांचे जे स्वभाव वर्णन (कथा-कादंबर्यातील) वाचलय त्या पेक्शा पाशवी माणस पाहिली आहेत /अनुभवलीत सबब भुतांना काही कामच शिल्लक नाही..आणि दुसरे अति-अति-अवांतर (मधले) कारणः अस म्हण्त्यात की ईछा अपूर्ण राहिलि की माणसाचं भूत होतं तर भुताची पण ईछा अपूर्ण रहिलि तर त्याचे काय होते? खर खोटं भुतालाच माहीत..