अहो, जगात फक्त भारत आणि अमेरिका इतकी २च स्थळं आहेत का?
आणि कमिट्मेंटचे म्हणाल तर ती प्रत्येकालाच समोरच्याकडून हवी असते!
अगदी आईवडलांनासुद्धा अपत्यांकडून म्हातारपणी सांभाळ करण्याची हमी हवीच असते.
... मी फक्त निरिक्षण नोंदवत होते. :)
विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!!
मला एक प्रश्न पडतो या लिव इन वाल्यांबद्दल. लग्न करायच नाही, बंधन नको आहे, कुणाची जोर जबरदस्तीसुद्धा नको आहे अन जबाबदारीही नको आहे. मग राहता राहिली भूक! मग त्यासाठी वन नाईट स्टँड का नाही स्विकारला जात? उगा लिव इन मध्ये चुकुन एखादा पार्टनर गुंतला भावनिकरित्या तर लोचा होतो तो तरी नाही व्हायचा!
आमचे वाघिणीचे दूध अंम्मळ कच्चे असल्याने याचा अर्थ नीट उमजला नाही. 'वन नाईट स्टँड' म्हणजे एक रात्रभर उभे रहाणे, खडा पहारा देणे, असा आहे का? मग त्याचा लिविन वगैरेशी काय संबंध? की 'वन नाईट स्लीप' असे म्हणायचे आहे?
Sleep की Slip? Sleep असल्यास चुकलं की राव.. ते काय झोपायला एकत्र येतात की काय? ;-)
ह्यावरुन आठवलेला एक विनोद :
मुलगा, पाद्र्यास : Father, is it wrong to sleep with a girl before marriage?
पाद्री: No, son.. But the problem is you don't sleep... ;-) :-D
माझ्या पहाण्यात तरी कोणी अजुन लिवइन मधे नाहीये पण मला प्रश्ण असा पडतो की खरच लिविनची का गरज पडते यांना? बर लिविन आहत तर मग लग्नाला काय प्रॉब्लेम आहे? यातुन मुल झालच तर त्याच संगोपन कोणी करायचं?
आणि संस्कार काय आणि कोण करणार?
कदाचित काही लोकांना हे खुप बुरसटलेले विचार वाटु शकतात.
मीही अजुन कोणाला पाहिलेले नाहिये लिवइन मध्ये राहिलेल... पण मला हे पट्तच नाही. असे राहुन काय साध्य करायाचे आहे? जो आदर आपल्याला लग्न झाल्यावर मिळतो तो लिवइन मध्ये राहिल्यावर नाही मिळू शकत. उलट लोक म्हण्तात "हेच संस्कार केले का तुमच्या आई-वडील यांनी?" ह्या मध्ये फक्त आई-वडीलच बद्नाम होतात.
आता विषय चाललाच आहे तर बेसिक माहीती काही मिळेल का? कसा सुरु झाला हा लिव्ह इन चा ट्रेंड? त्याचे फायदे काय अन तोटे किती?
माझ निरिक्षण. आज ऑस्ट्रेलियात मुले १५-१६ची झाली की मातापित्यांना त्यांनी त्यांच्या घरात राहुन त्यांची कमाई खावी हे पटत नाही. त्यातच १६ वर्षापासून सरकार या मुलांना स्वतःचा भत्ता द्यायला सुरवात करते. तरुणवयातला उथळपणा, हातातले स्वतःच्या नावावर येणारे पैसे या मुळे ही तरुणाई पालकांनाही डोइजड होते. मग हे असे तरुण रक्त घराबाहेर पडुन चाचपडत जगायला सुरवात करते.
त्यातुनही काहीजण काम करत शिक्षण चालु ठेवतात यशस्वी होतात. पण त्यांची पालक त्यांच्या कोणत्याही निर्णयात सहभागी नसल्याने स्वतःचा स्वतः जोडीदार शोधुन तसेच राहीले जाते. त्यातही भांडणे, हेवेदावे असतातच. पण अश्यावेळी लग्न करुन सेटल होण्याचा जो एक महत्वाचा टप्पा असतो त्याचा निर्णय घेण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. तरीहे येथे लग्ने होतात.
इकडे पालक हळुहळु वृद्ध होत जातात. शरीर साथ द्यायच बंद करत. लग्न झाल असेल ठिक नाहीतर मग एकट रहाव लागत. प्रॉपर्टी असेल तर ती विकुन वृद्धाश्रमात १००,००० पासून ३००,००० पर्यंत पैसे भरले जातात. मुलांना फक्त माहीत असत आई या ओल्डएज होम मध्ये आहे. मी भेट दिली आहे अश्या होम्सना. परत जायची इच्छा नाही. मदत करायलाही नाही, अन ते विदिर्ण करणार आयुष्य पहायलाही नाही.
काही दिवसांनी मग मुलांना कळवले जाते आई-बाप जो कोणी असेल तो सिरिअस. जमल तर मुल जातात नाहे तर "आज माझ्या आईच फ्युनरल आहे तिकडे लांब पण मी कामामुळे जाउ नाही शकत अस सहज बोलुन जातात". उसासा वगैरे टाकुन,"धिस इज लाईफ" वगैरे बोलल जात. आई बापान असेल ती प्रॉपर्टी विकुन कधीच बंध तोडलेले असतात, त्यामुळे यांच्याकडुन अपेक्षेलाही तोंड नसत. इनमिन १५ वर्षाचा सहवास काय गोडी लावणार? मुलांना स्वतःला आपणही याच मार्गाने जाणार हे दिसत असत. अन ते त्यांनी स्विकारलेलेही असते.
बोला रहायच आहे लिव इन मध्ये?
@इनमिन १५ वर्षाचा सहवास काय गोडी लावणार? मुलांना स्वतःला आपणही याच मार्गाने जाणार हे दिसत असत. अन ते त्यांनी स्विकारलेलेही असते.
बोला रहायच आहे लिव इन मध्ये? >>> बाप रे!!!!!!!!!!!!!!!
ज्यांची जन्मापासून अशी मनोधारणा तयार झाली असेल त्यांना कदाचित ह्यात कांही वावगं वाटतही नसेल. परंतु नात्यांची घट्ट वीण असणार्या आपल्या समाजात ही परिस्थिती फारच धक्कादायक म्हणावी अशी आहे. नात्यातील अत्युच्चतम ओलावा मुलं आणि आई-वडिलांमध्ये आणि त्यानंतर इतर रक्ताच्या नात्यात दिसून येतो. (अपवाद असतीलही पण फक्त नियम सिद्ध करण्यापुरते). तिथेच एवढी शुष्कता असेल तर आयुष्यातील इतर नातेसंबंधांची काय अवस्था असेल? माणुस हा पहिल्या पासून कळपात राहणारा प्राणी आहे. नातेसंबंध हा अशा कळपाला एकत्र धरून ठेवणारा समान धागा म्हणावा लागेल. त्याचीच वानवा असेल तर असा समाज ऐहिकतेपलीकडे कसा विचार करत असेल ह्याची कल्पना करता येत नाही.
जर का आप्ल्याला कोणतीच जबाब्दारी नको आणी स्वतन्त्र जगायच असेल तर, एकट किन्वा मित्र-मैत्रिनीन सोबत राह्ता येत. लीव-इन चि गरज काय? आणी जर फक्त वासना शमविण्याचा प्रश्न असेल (शब्द जरा वाईटच आहे पण...तेच खर पण आहे. ) तर मग वन-नाईट-स्टयाण्ड आहेतच...त्यात तर काहिच रेस्पोन्सीबिलिटी नसते. एका जागी राहायचि पण नाहि...
लग्न ही संस्था पुरुषसत्ताक आहे असं ऐकून आहे.
मुलीनेच सासरी का जायचं ?
तिनेच घरकाम का करायचं ?
अपत्याच्या जबाबदा-या तिच्यावरच का ?
सासू सास-यांच्या जबाबदा-या तिने घ्यायच्या पण तिच्या आईवडिलांबद्दल काय ?
खूप कमी जोडप्यात वरील प्रश्नांचं सोल्युशन काढलेलं असतं. नाहीतर आनंदीआनंदच असतो सगळा. लिव इन म्हणजे स्वैराचार हे टोकाचं मत आहे. काही आयटी शहरात जागा शेअर करण्यातून झालेल्या लिव इन मधून झालेलं हे मत असणार. लिव -इन - रिलेशन म्हणजे विचारांती घेतलेल्या निर्णयाचाच आपण विचार करू. लग्नसंस्थेला पर्याय असला तर बिघडलं कुठं ? शेवटी लग्नसंस्था म्हणजे तरी काय आहे ? दुर्बल पुरुषाला त्याची बायको त्याच्यासोबत नांदण्याची समाजाने दिलेली ग्वाही अशीही व्याख्या करता येईल . पूर्वी एखाद्या बाहुबलीला कुणाची सुंदर स्त्री आवडली तर उचलून नेली जात होती. त्याच्याविरुद्ध अपील कुठं होतं ? आणि लग्नाचा नवरा काय करत होता ? अशा रक्षण करू न शकणा-या पुरुषाबरोबर राहण्याची ग्वाही कायद्याच्या राज्यात पुरुषाला मिळते. विवाहसंस्थेचे असे तोटे काढायचं म्हटलं तर लक्षात येईल कि ही संस्था पूर्णपणे पुरुषांच्या फायद्याची आहे.
लै भारी!
बाय द वे, आता तुम्हीच लिव-इनवर चर्चा सुरु केलीये म्हणून प्रतिसाद देतो.
विवाहसंस्थेचे असे तोटे काढायचं म्हटलं तर लक्षात येईल कि ही संस्था पूर्णपणे पुरुषांच्या फायद्याची आहे.
हे एकांगी विधान आहे.
मानवी जीवनाचा (स्त्री असो की पुरुष) समग्रतेनं (जन्म ते मृत्यू) विचार करुन विवाह ही संकल्पना निर्माण झालेली आहे. मानवी मुलाला स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वात प्रदीर्घ कालावधी लागतो (साधारण तेवीस ते पंचवीस वर्ष). या कालावधीत सुयोग्य संगोपनासाठी आई-वडीलांचा समन्वय असलेलं घर आवश्यक आहे. वार्धक्यापासून मृत्यूपर्यंत काळजी घेणारं एक घर ही आयुष्यातल्या उत्तरार्धाची आवश्यकता आहे. विवाह या दोन अवस्थांमधला उमेदीचा आणि सर्वात आनंदाचा काळ आहे.
व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही.
प्रतिक्रिया
***
थोडा ज्यादा हो गया
ह्म्म्म्म
आवडले !!
हे राम .
(No subject)
जिलबीच हायं न्हवं ?
फक्कड लिहलय!
यक्झॅक्ट!
लिव इन स्त्रियांना वरदान वाटू
भारतातल्या काय, कुठल्याच नाही
बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट
बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट
अहो, जगात फक्त भारत आणि
व्वा, जिल्ब्या!!
@ सांजसंध्या
आपल्या अफाट निरीक्षणशक्तीला मनापासून दाद!
मस्त
मस्त.
.
विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!!
हे बाकी नेमके हो!!
+१
भूकेसंबद्धीची सुरक्षा
तेव्हापासून फूड सेक्युरिटीचं
विडंबन, सुडंबन की भरकटलेली पण
वन नाईट स्टँड
तेच ते.
तेच
(No subject)
स्लीप कसे..
...
मोगँबो खुष हुआ.
धन्यवाद मंडळी.
छानच!
माझ्या पहाण्यात तरी कोणी अजुन
कमाल आहे!
विडंबन??
पुर्णपणे नकार
लिव्ह इन परदेशातले
@इनमिन १५ वर्षाचा सहवास काय
हे सगळे लग्न करून सुद्धा होऊ
निव्वळ धक्कादायक.
लोकं खरच सुखी झाली लिविनमुळे?
लीव-ईन-रिलेशन
लग्न ही संस्था पुरुषसत्ताक
लिंगबदल विदाउट शस्त्रक्रिया
संक्षींशी चक्क सहमत व्हावं
@संक्षींशी चक्क सहमत व्हावं
दोन विवाहेच्छुक सहमत झाले
Pagination