Welcome to misalpav.com
लेखक: सोत्रि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

उच्च! बाकी ते एके ठिकाणी 'बारमातीकर' चपखल बसलंय बरं. ;) - चावडी गँगचा चाहता

दर वेळी चहा काय मागवता? यखांद्या बारीला वाईन मागवा कि! गांधीजींनी काय सांगितलय? देशी उद्योगाला चालना मिळाली पाहिजे.

पवार यानी या शेती मंत्री पदाचा चार्ज घेतल्याचे दुसर्‍या की तिसर्‍या दिवशीच शेतमालाचे भाव आता वाढणार हे भाकित " जाणता राजा" या पदावरून केले होते. भाववाढ इतर अनेक गोष्टीमुळे झाली आहे हे खरेच आहे. ( मनमोहन सिंग यांच्या मते तेलाच्या भावात वाढ व शेतमालाचा किमान भावात वाढ ही दोन त्यातीलच ) .भाववाढ नमो व केजरीवाल कुणालाही थांबवता येणार नाही. पण इतर अनेक कारणामुळे कोंग्रेस तरत्या मतदारांमधे अप्रिय ठरली आहे. बाकी केजरीवालाप्रमाणे राज ठाकरे यानीही पूर्वी काहीसा धक्का दिल्याचे लोकाना स्मरत असेल.

मस्तच.'आप्'च्या यशाने हुरळून जाण्याचे कारण नसले तरी अनेक राज्यांतले/पक्षातले 'जाणते राजे',सम्राट थोडेसे 'जळता' आहेत्.

लाटा येतात आणि जातात... आणीबाणीच्या वेळी पण जयप्रकाश यांची लाट आलीच होती. लाटेवर स्वार होतात की लाटेत डुंबतात की विरघळून जातात, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. ब्रिटिशांच्या काळात पण काँग्रेसची लाट होतीच की.(वादळच होते ते) (१९५०च्या दशकांत खासदार पण महिना अखेरीस १०रु. मागत असत, असा किस्सा फिरिझ रानडे यांनी लिहीला आहे.) जनतेला नेहमीच स्वच्छ सरकार हवे असते, इतका बोध सगळ्याच पक्षांनी घेतला तरी बराच फरक पडू शकतो.

आता दिल्लीत सत्ता चालवणे कोणालाही कठीणच होणार आहे. त्यामुळे अगोदर सत्ता मिळवण्यासाठी चाललेली स्पर्धा विरोधकांमध्ये बसण्यासाठी चालू आहे.

मिपा वर रोज यायला आणि लेख-प्रतिसादांचा पावूस पाडायला सगळेच तयार पण संपादक मंडळात सामील व्हायला कुणीच तयार नाही. (वरील वाक्य हे १००% विनोदी असल्याने गांभीर्याने घेवू नये.)

चावडी ईज बॅक ! आता तुझ( सदर-लेखक म्हणुन) कौतुक तरी किती करु :) तु हे सदर मनावर घेच !!