Welcome to misalpav.com
लेखक: विदेशी वचाळ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बाईंचा बाप एक उच्चपदस्थ सनदी अधिकारी आहे. अशा घरातील व्यक्तीने आरक्षण वापरुन आपले उच्च पद मिळवले असेल तर ती एक शरमेची गोष्ट आहे. अनैतिक आहे. सर्व सुखे सुविधा असताना आरक्षणाची सुविधा वापरुन डॉक्टरीला प्रवेश, प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवला असेल तर खरोखर तळागाळात असणार्‍या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला त्या सुविधेपासून वंचित ठेवण्याचा कलंक ह्या बाईंवर आहे. त्यावर कडी म्हणजे आदर्श घोटाळ्यातील ह्यांचा सहभाग. इतके जोखमीचे ब्यागेज बाळगणार्‍या व्यक्तीने नियम कायदे पाळण्यात जास्त काटेकोरपणा दाखवायला हवा होता. पण तेही भान ह्या बाईंकडे दिसत नाही. हा बहुधा सत्तेचा माज असावा. अमेरिकेत बुश अध्यक्ष असताना त्याच्या मुलींना योग्य वय नसताना मद्यपान केल्याबद्दल अटक झाली होती. ती त्यांनी भोगली होती. तेव्हा अमेरिका खोब्रागडे कन्येला जरा जपून वागवेल अशी अपेक्षा नसावी.

अमेरिकेने घेतलेली अ‍ॅकशन वरकरणी योग्यच वाटते . कोणत्याही व्यक्तीला इलिजिबीलीटी पेक्षा कमी पगार देवुन काम करवुन घेणे ही एक प्रकारची गुलामगिरीच असते. . खोब्रागडेंनी ते केले असेल तर जबर शिक्षा व्हायलाच हवी .
नोट. सांगणे न लगे, पण तुम्हाला जर का वाटत असेल की मी आरक्षणाचा फायदा घेऊन आलो आहे, तर तसे नाही आहे. मी कोठलेच आरक्षण कधीच वापरलेले नाही आहे. आणी माझे पदवुयत्तर शिक्षण आई. आई. टी. मधून झालेले आहे.
ह्याबाबत मात्र काही परसनल प्रश्न विचारु इछितो. १) तुम्ही आरक्षण वापरले नाही हे ठीक पण त्याचा तुम्हाला फटका बसलाय काय कधी ? म्हणजे तुमच्या पेक्षा १०० रॅन्क खाली असेलेल्या व्यक्तीला प्राह्दन्य मिळणे वगैरे ? २) पदव्युत्तर सिक्षण आयायतीतुन झाले ह्याबद्दल अभिनंदन १ पदवी सिक्षण कोठुन झाले कॉलेजची फी किती होती ? ती कोणी भरली ? समजा एखादा अनारक्षित गरीब विध्यार्थी असेल तर त्याला ती फी भरता येईल का ? मग त्याला आयायटीचे क्लासेस लावता येतील का ? आणि आयायटीतुन पदव्युत्तर शिक्षण घेता येईल का ? नसेल येणार तर त्यांनी जात का विसरावी ? ( मला स्वतःला आयायटी मुंबई कानपुर खरगपुर कोठेही प्रवेश मिळत होता पण तिथलीही फी भरायची ऐपत नव्हती... असो आम्ही त्यालाही पर्याय काढलाच म्हणा ) ३) आणि जर १०० पैकी ५२ % ( आणि लवकरच ७५%) लोक जात लावुन त्याचा फायदा उचलत असतील तर उरलेल्यांनी तरी जात का विसरावी ? ४) बर आता तुम्ही म्हणता जात विसरुन "इंजिनियर" अशी जात लावावी ...ओके मान्य .... फक्त मग ज्या गरीब अनारक्षित विद्यार्थाला केवळ आरक्षणामुळे इंजिनियर होता आले नाही त्याची जात कोणती ?

आता हा प्रश्ना गौण आहे. कारण आता गॅलो गल्ली इंजिनियरिंग कॉलेज झाली आहेत. आणि म्हणाल तर माझ्या पुढे आणि मागे आरक्षणाचा फायदा घेणारे अनेक होते. तसेच डोनेशन देणारे पण होते. (आई आई टी मध्ये नाही हा). त्यांची परीस्थिती असल्या मुळे ते तेथे होते. माझी परिस्थिती वेगळी होती म्हणून मी वेगळ्या जागी होतो. तसे पहाल तर कंपनी मध्ये सुधा बॉस चा आवडता माणूस चांगली जागा घेऊन बसतोच ना? त्याच्यामुळे माझी लायकी कमी होत नाही. मी माझ्या हुशारी च्या बळावर प्रयत्न करत राहतो. विवा.

हा म्हणजे कुठला प्रश्न गौण झालाय ? अजुन काही प्रश्न : गल्लोगल्लीत निघालेल्या कॉलेजेस ची फी किती असते ती अनारक्षित विद्यार्थाने कशी भरावी ? मी माझ्या हुशारी च्या बळावर प्रयत्न करत राहतो. असे तुम्ही म्हणता मग तुमची इंजिनियरींगची फी कोणी भरली ? तुम्ही कितवे जनरेशन लर्नर आहात ? समजा कोणी फर्स्ट जनरेशन लर्नर असेल तर त्या गरीब विद्यार्थाने काय करावे ? अवांतर : एकुणच तुमच्या प्रतिसादावरुन माझे सर्वसाधारण अनुमान असे आहे की : तुम्ही एका बर्‍यपैकी श्रीमंत घरातील व्यक्ती असणार , शिवाय सेकंड किंव्वा थर्ड जनरेशन लर्नर असणार , आयायटी प्रिपरेशनसाठी पुस्तके घेण्याचा क्लासेसचा खर्च करण्याची ऐपत असणार .... थोडक्यात कय तर तुम्हाला आरक्षणाचा खरा फटका कधी बसलेला दिसत नाही म्हणुन तुम्ही जात वगैरे विसरा , इंजिनियर जात लावा असे म्हणत आहात . असो हे माझे केवळ अनुमान आहे , तुम्ही प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे दिलीत तर तुमचा व्युव्हपॉईट क्लीयर होईल मला :)

श्रीमंती ही जगण्या वागण्यात असते आणि तशीच ती होती. पैशाची श्रीमंती म्हणाल तर, प्राइवेट इंजिनियरिंग कॉलेज परवडरे नव्हते. अभ्यासाच्या पुस्तकांना घरचे कधीच नाही म्हणाले नाहीत पण पोस्ट ग्रॅजुयेशन चा खर्चा तुझा तू पहा म्हणून स्पष्टा संकेत दिले होते. विशेष म्हणजे तुझे निर्णय तू घे. ह्यावर खूप जोर होता. निर्णय का घेतला म्हणून विचारणा व्हयायची पण निर्णय माझा मीच घ्यायचो. गेली ३ जेनरेशन्स शिकलेल्या आहेत (मी , वडील आणि आजोबा). पण खरा सांगायचे म्हणजे पुस्तकातून ना आलेले शिक्षण जगण्यातून शिकलेल्या आहेत. आपल्या प्रतिसडावरून असे जाणवले की आपणास वाटत असावे की मी आरक्षणाच्या विरोधात आहे. तर तसे अजिबात नाही. व्यक्‍तिगत आयुष्यात मी अनेक लोका हालखीच्या परिस्थीत पहिली आहेत आणि त्यांना मदतीचा हात लागेल हे मला कळते. मी जातीनीहयतेचा पुरस्कार करत नाही कारण परिस्थिती जाती वर अवलंबुन असतेच असे नाही. अनेकांची परिस्थिती खराब आणि जात चांगली असते तर अनेकांची जात खराब तर परिस्थिती चांगली असते. आणि हो आरक्षित सीट्स मिळत असताना जे लोक अनारक्षित सीट्स वर प्रवेश घेतात ते अजिबात चुकीचे नाहीत. ज्याच्या अंगात धमक आहे त्याने स्वाबलवर जगावे असे मी मानतो. योग्या अयोग्या तेचा विचार ज्याचा त्याचा. विवा

मायग्रेटेड साडेतीन टक्केवाले अमेरिकेत इतके वाढलेत की आता तिकडेही जातीय अत्याचार सुरू केलेत असा निष्कर्ष अजून कुणीच कसा काढला नाही. ;)

काढलाय, काढलाय ;) इथे बघा. "पहिल्या फळीत आलेले उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय भारतीय होते. त्यांच्या बोच-या जातीय-ब्राह्मणी-जाणिवा आता ‘पोलिटिकली इन्करेक्ट’ बनल्यात. ब्राह्मणेतराना ‘चॅरिटेबली’ सामावून घेतल्यासारखं दाखवायचं आता ‘अनकूल’ ठरलंय. माझ्या एका कार्यक्रमात आलेल्या नितीन कांबळे या आयटी तज्ञानं जेव्हा ही स्पर्धात्मक गुणवत्तेच्या वेष्टनाखालची आयटीवाल्यांची जातीयता खेचून बाहेर काढली तेव्हा मला कसनुसं झालेलं आठवतंय. ‘शादी डॉट कॉम’वरचा छोटा रिसर्चही या जातीय घडणीबद्दल तेच सांगतो."

काही निरीक्षणे चांगली आहेत, पण खूप त्रुटी आहेत लेखात. "रेडवुड सिटी मधले घर" ई वरून लगेच लक्षात आले. बाकी उच्चवर्णीय ई उल्लेख म्हणजे हट्टी ओव्हरलिबरलगिरी आहे. अनेक जातीतील लोकांचे फक्त जातवार ग्रूप्स आहेत, भरपूर आहेत. पण तसेच असंख्य संमिश्र ग्रूप्स ही आहेत. आणखी एक चांगली गोष्टः माझ्या ओळखीतील कुटुंबांतील लहान मुलांना आपली जात कोणती आहे याची कल्पना नसते. लग्नाच्या वेळेस ते उफाळून येत असेल. पण तेही तथाकथित उच्चवर्णियांपुरते मर्यादित नाही.

बाकी उच्चवर्णीय ई उल्लेख म्हणजे हट्टी ओव्हरलिबरलगिरी आहे. अनेक जातीतील लोकांचे फक्त जातवार ग्रूप्स आहेत, भरपूर आहेत. पण तसेच असंख्य संमिश्र ग्रूप्स ही आहेत.
हट्टी ओव्हरलिबरलगिरीबद्दल तहे दिलसे सहमत. स्वतः जातीनिहाय ग्रूपमध्ये भाग घेऊन बाकी ठिकाणी गळे काढण्याची फ्याशन सध्या लै जोरात आहे. आम्रिकेहून भार्तात वट्ट पोरांच्या मुंजीसाठी येतील पण मग कुरुंदकरांनी आपल्या पोरांच्या मुंजी केल्या अन देवळात जाऊन पूजाबिजा करीत होते त्यावर आगपाखड करतील.
आणखी एक चांगली गोष्टः माझ्या ओळखीतील कुटुंबांतील लहान मुलांना आपली जात कोणती आहे याची कल्पना नसते. लग्नाच्या वेळेस ते उफाळून येत असेल. पण तेही तथाकथित उच्चवर्णियांपुरते मर्यादित नाही.
नक्कीच!!! सर्व जातींसाठी ते व्हॅलिड आहे. प्रत्येकाला जातीचा कडवा अभिमान असतो हे पाहिलेले आहे.

बॅटमॅन किंवा क्लिंटन अशा काही सदस्यांच्या प्रतिक्रिया या कधीच "बाजू घेऊन" वाटत नाहीत. त्यामुळं कुणाला फटकावलेलं असेल तर त्याने दहादा विचारच करावा.

भारतात नाही तरी पण अमेरिकेत न्याय मिळणार असे दिसते ह्या बाईला. इथे आदर्श सारखे घोटाळे करुन तिथे पण मोलकरणीला वेठबिगारा सारखे वागवण्याची तीची कल्पना असणार. भारतात ती आदर्श मधुन सही सलामत सुटणार हे नक्की. ह्या निमित्ताने तिला अमेरीकेत तरी शिक्षा होऊ दे.

Accusing the Centre of being non-serious on the arrest of Indian diplomat Devyani Khobragade in the US, BSP supremo Mayawati on Wednesday said it has unmasked the government's "anti-dalit mentality". http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-12-18/india/45336621_1_anti-dalit-mentality-dalit-card-govt-approach या प्रकरणात जात कुठुन आली हा प्रश्न आता विचारावासा वाटतो का हो?

हे सर्व प्रकरण हेर-प्रतिहेरगिरीचे आहे. आपण उगीचच एकमेकांना मारीत सुटलो आहोत. देवयानीबाई ह्या एक तीव्रबुद्धीच्या हुशार आणि तडफदार व्यक्ती आहेत. त्यांनी एम.बी.बी.एस. करून नंतर परराष्ट्रसेवेची परी़क्षा दिली त्यात त्या अखिल भारतात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यांनी शिक्षणात आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही. त्यांनी या आधी संवेदनाशील पोस्ट्सवर काम केलेले आहे. संगीता रिचर्ड्स ही आधीपासूनच भारतीय दूतावासात अन्य अधिकार्‍याकडे कामाला होती असे अन्य एका दुव्यावरून कळते. तिची लबाडी उघडकीला आल्यापासून ती अमेरिकेत फरार होती. तिला आपल्या हवाली करण्याविषयी भारताने लिखित निवेदने अमेरिकेकडे दिली. पण त्याची दखल न घेता उलट अमेरिकेने तडकाफडकी तिच्या कुटुंबाला अमेरिकेत उचलून नेले किंवा नेवविले.(हे फक्त गुप्तहेरांच्या बाबतीतच होऊ शकते असेही त्या लेखातत आहे.) कदाचित देवयानीबाईच्या कारकीर्दीत तिची लबाडी उघडकीला आली असेल म्हणून देवयानीबाईची बढती झाली असेल. या केसमध्ये अनेक तर्क लढवता येऊ शकतील. काही गुपिते कधीच उघड होत नसतात, होऊही नयेत.

या प्रकरणात जात न आणण्याबाबत लेखकाशी सहमत. पण, आरक्षणाची सोय असूनही आरक्षण न घेणं म्हणजे ओपनमधल्या एका हुशार विद्यार्थ्याची जागा लाटण्यासारखं आहे असं माझं मत आहे. तुमची योग्यता तेवढी असेल तर कुणीही ती नाकारु शकत नाही. ती सिद्ध करायची जागा ओपन सीट्स ही नव्हे. ओपनमधील ज्या व्यक्तीची जागा जाते तिच्या अर्धीही योग्यता नसणार्‍या व्यक्तीला विनाकारण आरक्षणामधून जागा मिळते.

ती सिद्ध करायची जागा ओपन सीट्स ही नव्हे. ते ज्याने त्याने ठरवावे. रिजर्वेशनवाला ओपनची जागा हक्काने घेऊ शकतो.

सर्वांनी आपापल्या अंगभूत गुणवत्तेवर पुढे यावे, स्पर्धात्मक जागा जिंकाव्या, आरक्षणे हळूहळू कमी व्हावी असे वाटते. नाही तर आरक्षितांची गुणवत्ता कितीही वाढली तरी त्यांना आरक्षित तेवढ्याच जागा मिळणार, अधिक नाही, त्यांनी त्यांच्या कोट्यातच समाधान मानावे असा विचार येईल जो अतिशय घातक आहे. यातूनच मग लोकांख्येनुसार संधींची मागणीही पुढे येऊ शकते.