धुसरिका - व्युत्क्रम
कधितरी झाडांवर सावली पडेल
पण मग सुर्य ढग फ़ाडून टाकेल
अक्कलकोटला जाउन यावं म्हणतो
विषयांतर करू नकोस
विकासाच्या गतीची ऐशी तैशी
चहा पिताना कपात बसली माशी
नुस्तां वेंधळा आहेस असं म्हणुन गेली
कालची फ़ॅटल एरर कोण काढली?
सरता सरता काळ सरेना
काय मस्त खेळती ही सेरेना
मी दोन चार ठिकाणी अप्लाय् केलय
टाटा माझा स्वीकार करा
माज उतरला काका - पुतण्याचा आणि म्हैस म्हणाली शेणाचा पो.प्रचलित राजकारणावर कवीने हे बोचरी पिंक टाकली आहे. दिल्लितील म्हैस आता प्रादेशिक घराणेशाहीला भीक घालत नाही असा गर्भित अर्थ !अस्वलाच्या बेंबीत हात घालीन म्हणतो कार्ट्या हा कसला खेळ? हा तर खो खोअस्वल हे हसवून हसवून मारण्यात वाकबगार , कवीने त्याच्याच बेम्बीत हात घातला आहे.. हे म्हणजे मेलं कोंबंड आगीला भ्येत नायं .. पण सुजाण नागरिक सांगतात की असला खो -खो स्वातंत्र्यापासून्च चालू आहे.. कार्ट्या या शब्दात सामान्य लोकांना एकमेकाबद्दल जी कणव आहे ,, त्याचे प्रतिक होय .एक तारखेला पगार होतो, वैकुन्ठाला जाम गर्दीपैशाला आलेले महत्व ! ज्यांचा पगार एक तारखेला होतो ते सारे मॉलच्य सरणावर तो जालून टा़कतात. वैकुंठ हे मॉलचे प्रतिक .. एक अट्ळ संपणे .पळसाच्या पानावर अळी, तिला होईल ना का सर्दी?पळसाचे पान म्हणजे पत्रावळ , त्यावर अळी म्हणजे महागाई .. तिला सर्दी म्हणजे महागाई चे नाक चोंदणे.. या महागाईच्या आळीने रोजचे जेवण देखील अशक्य केले आहे ..माणसाचे माकड होते ,मातिमधून येतो सैनिकमाणसाचे माणूसपन संपलय आता .. त्याचा प्राणी झालायं( आहार निद्रा भय मैथुनचं...) माती सुद्धा पेटून शस्त्र हातात घेईल इतका अण्याय !गर्द रानातून चेकाळलेली माय, तिचे दैन्य दैनिकशेतमजूरी करणारी माय आता पोराला काय खायला घालेल ? हे दैन्य तर रोजचेच ! "गर्द रान" या शब्दातून कवीला "जंगल-राज" सांगायचे आहेदीनवाणा हसू लागतो कोपर्यावरचा धिप्पाड इराणीव्यापारी माण्साला देखील आता या सार्याची दया येऊ लागली आहे !! धिप्पाड या शब्दात कवी " आहे रे " आणि " नाही रे " यातील दरी स्प्ष्ट करतो .गाईच्या आचळाची धार बोथट प्या आता गढूळ पाणीश्वेत-क्रांती झाली पण दुधाचे भाव ? " गढूळ पाणी" ..दरिद्री अश्व्थ्याम्याला दिलेल पीठाचे पाणी दूध म्हणून !"बॉसच्या आईचा घो" बोंबलत उठतो कळ-बडवा" आय टी" वाले ही आता ऐटीत नाहीत . गांजलेत बिचारे , त्याचा राग वरिष्टांवर निघतो .मातीच्या वासातून कोकलतो निवडणुकीचा निळा पारवानिळा रंग दिन - दलित - दुबळ्यांचा, मातीत असणारे ' नाही रे " दर निवडणुकीला आस लाऊन बसतात पण त्यांची झोळी रिकामीच !पर्व संपले पांडव हरले, गाई- वासरे उनाड झालीस्वातंत्र्याची नवलाई संपली , पांडव म्हणजे सत्य हरले , गाई - वासरे म्हणजे सामान्य जन आता निराधार झाले !परकरातली पोर बोबडी , पाढ्यामधूनी बोलू लागली.शिक्षणाचाही खेल-खंडोबा ! मुलींच्या शिक्षणाचा तर त्याहून जास्त..पटावर नसलेल्या मुलांचे पाढे म्हनून घेतात! आणि परिक्षाच घेत नाहीत.उंच इमारत आणि पसरली आकाशाची धूसर रेघकॉन्क्रिट्चे जंगल आणि त्यातील लोक ( आयवरी टॉवर ) आणि महानगरातील मानुसकीचे प्रदूषण ! आकश म्हणजे देव ही प्रदूशित झाला आहेनभात भरला आणि उसवला मना- मनातील काळा मेघनभात भरला - आकाशातील देवाची आर्त विनवणी .. पण मनातील काळा मेघ न कोसळता नुस्ता पांगत जातो.. अधिक काळं करीत...सडक डामरी आणिक उखडला पादचारी तो गावाकडचापायाभूत सुविधा केवल महानगरातच .. गावाकडे अजून रस्तेच नाहीत , तो गावकरी का चिडणार नाही ? झपाट्याने होणारे शहरीकरण !"पैताईने" आग्रह केला डाव मांडला या कवितेचा !पैशासाठी या अर्थहीन कवितेचा आयूष्याचा डाव गावाकडच्या( विस्थापित झालेल्या) पादचार्याने ( समाजातील सर्वात निम्न स्तर ) मांडला आहे .अर्थहीन ही असेल कविता आणि कोथळा फाडेल कोणीया दीन - दलिताण्चे जगणेच अर्थहीन आहे.. त्याच्या आयुष्याचा पोचट फुगा कोणीही फोडू शकेल !"सर"- वर्यासी साद घालतो किती वाढवू आता पाणी ?ही जगण्याची लढाई "सर" व्हावी म्हणून आता डोळ्यातील किती पाणी वाहू दे ?सूड नसे हा नसेल चेष्टा , गम्मत आहे मिपावरचीही तर पूर्वपापाची फळे , कोण कशाला चेष्टा करेल ? चेष्टा : प्रयत्न .. पुरेसे प्रयत्न केले नाहीत असाही अर्थ होतो! आणि हा सूड ही नव्हे ! ( कारण सूडाला अंत असतो !) "मि - पावर ची" : येथे स्वार्थी राजकारण्याचा संदर्भ आहे .. ही त्यांचीच गम्मत आहे , त्यांच्या "मी"पणाची ही पावर आहे.हसाल थोडे नसेल थोडके , गम्मत आहे या कवितेचीतरी ही , कवी म्हणतो , हाही आनंदच आहे , थोडेसे हसा. हे आयुष्य ( कविता ) असेच गम्मतशीर आहे ! आपल्याच दु: खावर हसत आहे !! प्रेरणा आणि साष्टांग आभार - नगरवासी प्राध्यापक डॉक्टर बिरूटे सर