Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धुसरिका - व्युत्क्रम

ज — जातवेद, Tue, 12/17/2013 - 12:46
कधितरी झाडांवर सावली पडेल पण मग सुर्य ढग फ़ाडून टाकेल अक्कलकोटला जाउन यावं म्हणतो विषयांतर करू नकोस विकासाच्या गतीची ऐशी तैशी चहा पिताना कपात बसली माशी नुस्तां वेंधळा आहेस असं म्हणुन गेली कालची फ़ॅटल एरर कोण काढली? सरता सरता काळ सरेना काय मस्त खेळती ही सेरेना मी दोन चार ठिकाणी अप्लाय् केलय टाटा माझा स्वीकार करा

प्रतिक्रिया द्या
15583 वाचन

💬 प्रतिसाद (75)
म
मुक्त विहारि Tue, 12/17/2013 - 14:12 नवीन
काय घंटा समजले नाही. जावू दे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/17/2013 - 15:12 नवीन
मुवि. चला काढा वही. आज आपण धुसरिका-व्युत्क्रम या कवितेचा अभ्यास करु या. धुसरिका व्युत्क्रम या कवीतेच्या शीर्षकातून कविता धुसर धुसर व्हायला लागलेली आपण दिसून येते. परंतु शीर्षक जरी संस्कृत छंद आणि त्याच पद्दतीची वाटत असली तरी कवित मात्र तशी वाटत नाही. 'व्युत्क्रम' या शब्दाचा अर्थ आहे. 'उलट क्रम' आता कवी कोणत्या धुसर झालेल्या (धुसरिका शब्दाचा अर्थ काही सापडेना) गोष्टीचा उलट क्रम लावतो त्याचा अभ्यास आपल्याला कवितेतून करायचा आहे. कवीच्या ओळीतूनच कवीचं पांगलेपण आपल्या डोळ्यासमोर येते. कवितेतून एका ओळीनंतर दुस-या ओळीतून एकमेकांच्या सोबत काहीएक अर्थ प्राप्त व्हावा अशा हेतूने ही कविता लिहिलीच नाही असे वाटते. कविता सहज सोप्या आणि समजणा-या असल्या पाहिजेत असे आपण सतत म्हणत असतो, वरील कविता तशी नाही. ''कधितरी झाडांवर सावली पडेल पण मग सुर्य ढग फ़ाडून टाकेल अक्कलकोटला जाउन यावं म्हणतो विषयांतर करू नकोस'' आता पहिल्याच ओळीतून आपल्या पारंपरिक कल्पनेला इथे कवीने तडा दिला आहे. झाड सावली देते हे आपल्याला माहिती आहे, पण इथे झाडाला सावली हवी आहे. आता कशाला सावली हवी आहे तर झाडही सतत कार्यरत आहे, झाड थकून गेलं आहे, उन, पाऊस, थंडीने झाड सावली देत त्यालाही सावलीची गरज भासत आहे तेव्हा इथे झाडाच्या ऐवजी आपण कवी किंवा समाजासाठी काम करणा-या थोर पुरुष डोळ्यासमोर आणायचे आणि त्यांनाही स्वतःचे असे आयुष्य असते आणि त्यांनाही कधी तरी सावलीची म्हणजे आयुष्यात सुखाची अपेक्षा मनात निर्माण होते पण अशी सावली देणारे कोणी तरी येईल का ? येईल कोणी तरी म्हणजे मग इथे कवी म्हणतो '' पण मग सुर्य ढग फाडून टाकेल' मग अशा या झाडाच्या आयुष्यात सावली देण्यासाठी कोण येतंय तर ढग येतात. काही वेळ काही क्षण त्यांच्याही आयुष्यात सावली येते परंतु सुर्य नावाचा त्यापेक्षा मोठा कोणीतरी त्या झाडाची सावली काढून घेतो. आणि कवीच्या वाटेला किंवा त्या समाज सुधारकाच्या वाटेला पुन्हा दु:खच येते. आता आयुष्यात संकंट आली दु:ख आली तर माणूस सैरभैर होतो. कवीही इथे सैरभैर झाल्याचे दिसते आणि तो मार्ग शोधायला लागतो. ''अक्कलकोटला जाउन यावं म्हणतो विषयांतर करू नकोस'' अक्कलकोट या शब्दाचा संबंध हा संत महापुरुषांशी संबंधीत शब्द आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे गाव श्रीदत्त संप्रदायाशी संबंधित आहे. श्री स्वामी समर्थ हे श्री श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. माणसावर संकटं आली की तो कारणांचा शोध घेतो. दु:ख आहे, दु:खाला कारण आहे आणि दु:खाचे निवारण होऊ शकते हे तो विसरुन जातो आणि तो काहीतरी आयुष्यात असा चमत्कार घडून येईल अशा गोष्टींचा शोध घेतो आणि तो श्री स्वामी समर्थचा विचार करायला लागतो नतमस्तक होऊन यावं म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व दु:ख दैन्य दूर होईल असे त्याला वाटते. पण, तोच विचार करतो की असं करणं बरं नव्हे कारण स्वतःवर विश्वास असणारी माणसं स्वतःहुन आयुष्य बदलून टाकतात म्हणून तोच म्हणतो 'विषयांतर करु नकोस' आणि तो अक्कलकोटचा विचार पुढे ढक्लून देतो किंवा काढून टाकतो. ''विकासाच्या गतीची ऐशी तैशी चहा पिताना कपात बसली माशी नुस्तां वेंधळा आहेस असं म्हणुन गेली कालची फ़ॅटल एरर कोण काढली?'' कवीने स्वातंत्र्यानंतर काही स्वप्न पाहिली परंतु त्याच्या वाटेला निराशाच येत गेली सतत वाढणारी जातीयतेची बजबजपुरी, भ्रष्टाचार, अनागोंदी आणि सतत आजूबाजूला व्यवस्थेचा विकास झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, अशा सततच्या निरर्थक टाहोंची त्याला चीड येते आणि तो या व्यवस्थेच्या गतीची ऐशी तैशी म्हणतो. एक सुखाचा क्षण वाटेला येत नाही. थकल्या भागल्या दमल्या मनाने शांतपणे खिडकीतून रस्त्यावरच्या येणा-या जाणा-याकडे पाहात ही माणसं धावत पळत कुठे जात आहेत उगाच असा मनाशी विचार करत चहाचा गरमागरम घोट घ्यावा अशा विचाराने चहाचा एखादा घोट झालेला असेल तोच कपात लक्ष गेल्यावर चहात एखाद्या माशीने एका गोड घोटासाठी आपले प्राण पणाला लावलेले दिसलेले दिसून येते आणि कवीला वाटतं आपण आणि या माशीत फरक आहे. कोणत्या सुखासाठी आपल्या आयुषाची ही धडपड चाललेली आहे. आणि तेव्हाच त्याला आपल्या प्रेयसीची आठवण होते तिला त्याची सोबत हवी असते पण तीही त्याच्यावर रुसलेली असते, तिने आधार द्यावा तर तीच सर्वांसमोर त्याला वेंधळा म्हणत असते. ती कवीला प्रेमाने वेंधळा म्हणते पण त्याचा अर्थही त्याच्यापर्यंत पोहचत नाही. संगणकीय कामात प्रेयसीला फॅटल येरर काढता येत नाही, तेव्हा तो येरर कवी दूर करतो आणि तिला दाखवून देतो की मी वेंधळा नाही. ''सरता सरता काळ सरेना काय मस्त खेळती ही सेरेना मी दोन चार ठिकाणी अप्लाय् केलय टाटा माझा स्वीकार करा'' कवी जरा मिश्किल वृत्तीचा आहे. आपल्या आयुष्यातील या कटकटी कशा संपत नाही. काळ का पुढे जात नाही असा विचार करतांना 'सरेना' आणि ’सेरेना’ अशी शब्दाने लॉन टेनीसमधील 'सेरेना विल्यम' आठवून जाते. किती तीचा शारिरीक धडधाकटपणा पाहून आपण पुरुषासारखे पुरुष असून असा हताशपणा बरा नाही म्हणून तो पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहण्याचा प्रयत्न करतो. पुन्या आयुष्यात कुठे तरी उत्तम संधी मिळावी म्हणून प्रयत्न करु पाहतो आणि श्रीमंतीचे प्रतिक असलेले 'टाटा' नावाच्या व्यवस्थेत काही तरी आयुष्यात आधार मिळेल असा तो प्रयत्न करतो. आता कवितेत काय नै समजलं ते खरड करुन विचारा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रभाकर पेठकर Tue, 12/17/2013 - 15:23 नवीन
कवितेचे(?) शवविच्छेदन आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मृत्युन्जय Wed, 12/18/2013 - 05:52 नवीन
+ १ . शवविच्छेदन हा एकच शब्द योग्य आहे याला. वाईट चिरफाड आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मुक्त विहारि Tue, 12/17/2013 - 16:23 नवीन
दंडवत स्वीकारा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अभ्या.. गुरुवार, 12/19/2013 - 20:29 नवीन
बिरुटे सर आमचा बी दंडवत रुजु करुन घ्या हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ज
ज्ञानव Tue, 12/17/2013 - 16:58 नवीन
कविता वाचल्याबद्दल (जो आपला प्रान्तच नाही ) मी स्वतःला "व्युत्क्रमी" (शीर्षासनावस्थेत)अवस्थेत बडवून घेत आहे असे काहीसे धूसरच भास होताहेत......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
जातवेद Tue, 12/17/2013 - 19:01 नवीन
केवळ अप्रतिम. नतमस्तक मी लिहीताना असा अजिबात विचार केला नव्हता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ल
लॉरी टांगटूंगकर Wed, 12/18/2013 - 04:18 नवीन
जमलंय! वा वा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विटेकर Wed, 12/18/2013 - 05:41 नवीन
दंडवत स्वीकारा.. क्लास चाले मराठीचा भास मजला होत आहे.. मागच्या बाकावरून मायबोलीचा प्रांत आहे... भणंग ओल्या कुशीत बालक अंगठा चोखित आहे. स्वारगेटच्या बसवर माझ्या कंडक्टरचा माज आहे.. लक्तरांचे उभे ओझे अंधारातील भूत आहे.... आदिम आणि इव्ह मधला आद्य नंगानाच आहे. भाल्याच्या टोकावर मुंगळ्याचे प्रेत आहे .. बांधावर हलणारे कुल्ले जीवनाचा श्वास आहे... आगिच्या लोळात झुलते प्रीतीची आस आहे.. आणि मो़कळ्या केसात मारवा खास आहे... खोपटात भेसूर चिमणीचा प्रकाश आहे.. रंक आहे राव आहे आणि कोणी खास आहे.. या युत्पन्नाचे उत्पन्न करुन दाखवाच ! होऊ दे खर्च ! चर्चा तर होणारच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/18/2013 - 06:52 नवीन
होऊ दे खर्च ! रसग्रहण तर होणारच ! ;) - दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
म
मुक्त विहारि Wed, 12/18/2013 - 09:11 नवीन
मस्त... उत्तम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
स
सुहास.. Wed, 12/18/2013 - 09:10 नवीन
अग्गागा !! बिरुटेसर ...पायाचा फोटो पाठवुन देणे ... अरे काय ती कविता आणि काय ते विवेचन ....अगदी बरखा दत्त अन्ना हजारेच्या एका वाक्यावर न्युज चॅनेलवर दिवसभर टिआरपी गोळा करू शकते अगदी तस .....;) वाईड बॉल सिक्सर मारताना पाहिला आहे का कोणी ?? नाही मग प्रतिसाद नक्की वाचा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्यारे१ Wed, 12/18/2013 - 09:14 नवीन
+११११ अगदी अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
य
यसवायजी गुरुवार, 12/19/2013 - 20:33 नवीन
तीचा शारिरीक धडधाकटपणा पाहून आपण पुरुषासारखे पुरुष असून असा हताशपणा बरा नाही म्हणून तो पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहण्याचा प्रयत्न करतो
_/\_ साष्टांग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 12/20/2013 - 06:48 नवीन
बिरुटे सरांचा विजय असो. काय ती कविता आणि काय तो अर्थ. सरांच्या प्रतिभेला मनापासुन दंडवत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अद्द्या गुरुवार, 01/22/2015 - 10:50 नवीन
बाप्रे . . !!! दंडवत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पैसा Tue, 12/17/2013 - 14:29 नवीन
धुसरिका म्हणजे काहीतरी गूढ असावं. पण कै कळ्ळं नै.
  • Log in or register to post comments
ज
जातवेद Tue, 12/17/2013 - 15:20 नवीन
हा एक नवकाव्याप्रकार आहे, ज्यामधे कशाचा कशालाच पत्ता नसतो. ;)
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 12/17/2013 - 16:11 नवीन
सांगून टाकलंत? आता प्रा. डो. बिरुटे सरांनी अर्थ लावलाय तसा नवा नवा अर्थ कोण लावणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद
ज
जातवेद Tue, 12/17/2013 - 19:17 नवीन
येथे हवेत मिपाचे :) येरागबाळ्याचे काम नव्हे तरी सरांनी शुन्यातून एवढा मस्त अर्थ लावलाय कि कसलेले म्यान व्हावेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मुक्त विहारि Tue, 12/17/2013 - 16:42 नवीन
"हा एक नवकाव्याप्रकार आहे, ज्यामधे कशाचा कशालाच पत्ता नसतो." असे असेल तर मस्त आहे हे प्रकरण.... आवडल्या गेले आहे. जमल्यास अजून टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद
ज
जातवेद Tue, 12/17/2013 - 19:40 नवीन
करिन प्रयत्न फावल्या वेळातुन :) याचे जनक बहुधा पुलं आहेत. नक्कि आठवत नाहिये. कोणी यावर प्रकाश टाकू शकेल काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
र
रुमानी Wed, 12/18/2013 - 07:25 नवीन
तुमच्या रसग्रहनाने कविता जरातरी उलगडली...:) असे हि कै अस्तय होय हो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद
ज
जेपी Tue, 12/17/2013 - 16:30 नवीन
---^--- दंडवत . लेखकाला आणी बिरुटे सरांना . आणी मी ..... जातो अभ्यास वाढवतो . =)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 12/17/2013 - 16:47 नवीन
शिघ्रकविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 12/17/2013 - 16:54 नवीन
आडौली कविता का काय जे आसंन ते!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 12/17/2013 - 16:55 नवीन
सरता सरता काळ सरेना काय मस्त खेळती ही सेरेना >>> =))
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Tue, 12/17/2013 - 17:03 नवीन
मला न्युनगंड आला होता, की आपल्याला कवितेतलं अगदी काय्बी-म्हंजे काय्बी समजत न्हाई म्हणुन.. प्रतीक्रिया वाचुन जीव भांड्यात पडला.. कशाचाच कशाला पत्ता नसतो?? गूड.. मग हे पण वाचा- बाई- एका हौदात साडेतीन चिक्कू होते, त्यातले ५ पेरु खाल्ले तर किती आंबे उरले? बंड्या- बाई पांड्याने आज डब्यातुन बटाट्याची भाजी आणलीय. लगेच पांड्या चिडुन- न्हाई बाई खोटं बोलतोय त्यो.. आमच्या घरात उंदीर जास्त झालेत.. :))
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 12/17/2013 - 17:53 नवीन
मी तर व्युत्क्रम हा शब्दच फार वर्षांनी वाचून अत्यानंदानी धावत आले. कविता वाचली. व्युत्क्रम लिहिल्याने एकदा खालून वर पण वाचली. दोन्ही वेळेस तितकीच समजली नाही. बरोबर आहे! :)
  • Log in or register to post comments
ज
जातवेद Tue, 12/17/2013 - 19:51 नवीन
वर सरांनी विस्तारीत केलेला अर्थ वाचा म्हणजे मतितार्थ लक्षात येईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
न
निनाद Wed, 12/18/2013 - 04:14 नवीन
व्युत्क्रमी परिकर्म हे विसरलात की क्काय??? सर आमच्या कवितेचे नाही केले ते शव विच्छेदन? का आमची जिवंतय आजून? ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/18/2013 - 05:22 नवीन
एक तर तुम्ही मला विसरून गेला आहात त्यामुले मी तुमच्या लेखन प्रतिसादाकडे दुर्लक्ष करायचे ठरविले आहे. :( सालं आमच्या गुंडोपंतानं जालावर आम्हाला खरा जीव लावला. आमचा खरा मित्र तोच, तुम्ही नै धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद
न
निनाद गुरुवार, 12/19/2013 - 04:24 नवीन
आहो सर आता गुंडोपंत 'गेले' त्याला काय करणार? वय झालं होतं त्यांच. गेलेले का परत येतात? :( आणि मी कसा विसरणार सर तुम्हाला? :) असो करा दुर्लक्ष्य! खा मटारची उसळ खा! खा शिकरण!! आम्ही पण करू नवीन कविता... पाहाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विटेकर Wed, 12/18/2013 - 05:31 नवीन
काय वाचू कविता नवती नुक्तीच न्हालेली पाती श्वास कोंड्ला घास अडकला आतल्या उजेडातील पण-ती ( जमलयं काय ? अजून २-४ कडवी टाकू का ? )
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 12/18/2013 - 05:55 नवीन
साक्षात कवींनीच खुल्लं आमंत्रण दिलंय. मक्काय!! कोणाच्या परवानगीची वाट बघताय? होऊ दे ब्याण्डविड्थ खर्च. मिपा आहे घरचं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
P
psajid Wed, 12/18/2013 - 08:16 नवीन
नुसती कविता कळली नाही मात्र तिचे डॉक्टरांनी केलेले विवेचन आवडले. डॉक्टरांचे प्रभुत्व निर्विवाद मान्य !
  • Log in or register to post comments
व
विटेकर Wed, 12/18/2013 - 08:27 नवीन
माज उतरला काका - पुतण्याचा आणि म्हैस म्हणाली शेणाचा पो. अस्वलाच्या बेंबीत हात घालीन म्हणतो कार्ट्या हा कसला खेळ? हा तर खो खो एक तारखेला पगार होतो, वैकुन्ठाला जाम गर्दी पळसाच्या पानावर अळी, तिला होईल ना का सर्दी? माणसाचे माकड होते ,मातिमधून येतो सैनिक गर्द रानातून चेकाळलेली माय, तिचे दैन्य दैनिक दीनवाणा हसू लागतो कोपर्यावरचा धिप्पाड इराणी गाईच्या आचळाची धार बोथट प्या आता गढूळ पाणी "बॉसच्या आईचा घो" बोंबलत उठतो कळ-बडवा मातीच्या वासातून कोकलतो निवडणुकीचा निळा पारवा पर्व संपले पांडव हरले, गाई- वासरे उनाड झाली परकरातली पोर बोबडी , पाढ्यामधूनी बोलू लागली. उंच इमारत आणि पसरली आकाशाची धूसर रेघ नभात भरला आणि उसवला मना- मनातील काळा मेघ सडक डामरी आणिक उखडला पादचारी तो गावाकडचा "पैताईने" आग्रह केला डाव मांडला या कवितेचा ! अर्थहीन ही असेल कविता आणि कोथळा फाडेल कोणी "सर"- वर्यासी साद घालतो किती वाढवू आता पाणी ? सूड नसे हा नसेल चेष्टा , गम्मत आहे मिपावरची हसाल थोडे नसेल थोडके , गम्मत आहे या कवितेची बास का ? का अजून हाणु?
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 12/18/2013 - 08:54 नवीन
*lol* :D *clapping* *crazy* *mosking* *ROFL* *yahoo* *HELP* *dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
म
मुक्त विहारि Wed, 12/18/2013 - 08:58 नवीन
अजून हाणा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
प
प्रचेतस Wed, 12/18/2013 - 09:03 नवीन
हायला विटेकर बुवा लै फ़ॉर्मात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर गुरुवार, 12/19/2013 - 06:25 नवीन
कसचं कसचं ! उगाच आप्ल कायतरी... थकल्या जीवाला विरंगुळा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अभ्या.. गुरुवार, 12/19/2013 - 20:26 नवीन
विटेकर साहेब लैच भारी. लै म्हणजे काय लैच भारी :) कविता जबर्‍या अन नीरस ग्रहण खोबर्‍या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ज
जातवेद Wed, 12/18/2013 - 09:08 नवीन
लैच पुढपर्यंत गेलं हे सगळं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/18/2013 - 10:59 नवीन
@माज उतरला काका - पुतण्याचा आणि म्हैस म्हणाली शेणाचा पो. अस्वलाच्या बेंबीत हात घालीन म्हणतो कार्ट्या हा कसला खेळ? हा तर खो खो एक तारखेला पगार होतो, वैकुन्ठाला जाम गर्दी पळसाच्या पानावर अळी, तिला होईल ना का सर्दी?>>> Image removed. __/\__/\__/\__ =)) पूर्ण वारल्या गेलो आहे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
म
मनीषा गुरुवार, 12/19/2013 - 11:50 नवीन
बरीच सुस्पष्टं आहे. पण कविता छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ज
जातवेद गुरुवार, 12/19/2013 - 19:46 नवीन
धन्यवाद. तुम्ही पहिल्याच अशा निघलात, कविता चांगली आहे आणि समजत आहे म्हणनार्‍या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
प
प्यारे१ गुरुवार, 12/19/2013 - 20:18 नवीन
नाय नाय ते तुम्हाला नाय. ते विटुकाकांना हाय. तुमचं 'औघड' च हाय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद
व
विटेकर Wed, 12/18/2013 - 10:24 नवीन
माज उतरला काका - पुतण्याचा आणि म्हैस म्हणाली शेणाचा पो. प्रचलित राजकारणावर कवीने हे बोचरी पिंक टाकली आहे. दिल्लितील म्हैस आता प्रादेशिक घराणेशाहीला भीक घालत नाही असा गर्भित अर्थ ! अस्वलाच्या बेंबीत हात घालीन म्हणतो कार्ट्या हा कसला खेळ? हा तर खो खो अस्वल हे हसवून हसवून मारण्यात वाकबगार , कवीने त्याच्याच बेम्बीत हात घातला आहे.. हे म्हणजे मेलं कोंबंड आगीला भ्येत नायं .. पण सुजाण नागरिक सांगतात की असला खो -खो स्वातंत्र्यापासून्च चालू आहे.. कार्ट्या या शब्दात सामान्य लोकांना एकमेकाबद्दल जी कणव आहे ,, त्याचे प्रतिक होय . एक तारखेला पगार होतो, वैकुन्ठाला जाम गर्दी पैशाला आलेले महत्व ! ज्यांचा पगार एक तारखेला होतो ते सारे मॉलच्य सरणावर तो जालून टा़कतात. वैकुंठ हे मॉलचे प्रतिक .. एक अट्ळ संपणे . पळसाच्या पानावर अळी, तिला होईल ना का सर्दी? पळसाचे पान म्हणजे पत्रावळ , त्यावर अळी म्हणजे महागाई .. तिला सर्दी म्हणजे महागाई चे नाक चोंदणे.. या महागाईच्या आळीने रोजचे जेवण देखील अशक्य केले आहे .. माणसाचे माकड होते ,मातिमधून येतो सैनिक माणसाचे माणूसपन संपलय आता .. त्याचा प्राणी झालायं( आहार निद्रा भय मैथुनचं...) माती सुद्धा पेटून शस्त्र हातात घेईल इतका अण्याय ! गर्द रानातून चेकाळलेली माय, तिचे दैन्य दैनिक शेतमजूरी करणारी माय आता पोराला काय खायला घालेल ? हे दैन्य तर रोजचेच ! "गर्द रान" या शब्दातून कवीला "जंगल-राज" सांगायचे आहे दीनवाणा हसू लागतो कोपर्यावरचा धिप्पाड इराणी व्यापारी माण्साला देखील आता या सार्याची दया येऊ लागली आहे !! धिप्पाड या शब्दात कवी " आहे रे " आणि " नाही रे " यातील दरी स्प्ष्ट करतो . गाईच्या आचळाची धार बोथट प्या आता गढूळ पाणी श्वेत-क्रांती झाली पण दुधाचे भाव ? " गढूळ पाणी" ..दरिद्री अश्व्थ्याम्याला दिलेल पीठाचे पाणी दूध म्हणून ! "बॉसच्या आईचा घो" बोंबलत उठतो कळ-बडवा " आय टी" वाले ही आता ऐटीत नाहीत . गांजलेत बिचारे , त्याचा राग वरिष्टांवर निघतो . मातीच्या वासातून कोकलतो निवडणुकीचा निळा पारवा निळा रंग दिन - दलित - दुबळ्यांचा, मातीत असणारे ' नाही रे " दर निवडणुकीला आस लाऊन बसतात पण त्यांची झोळी रिकामीच ! पर्व संपले पांडव हरले, गाई- वासरे उनाड झाली स्वातंत्र्याची नवलाई संपली , पांडव म्हणजे सत्य हरले , गाई - वासरे म्हणजे सामान्य जन आता निराधार झाले ! परकरातली पोर बोबडी , पाढ्यामधूनी बोलू लागली. शिक्षणाचाही खेल-खंडोबा ! मुलींच्या शिक्षणाचा तर त्याहून जास्त..पटावर नसलेल्या मुलांचे पाढे म्हनून घेतात! आणि परिक्षाच घेत नाहीत. उंच इमारत आणि पसरली आकाशाची धूसर रेघ कॉन्क्रिट्चे जंगल आणि त्यातील लोक ( आयवरी टॉवर ) आणि महानगरातील मानुसकीचे प्रदूषण ! आकश म्हणजे देव ही प्रदूशित झाला आहे नभात भरला आणि उसवला मना- मनातील काळा मेघ नभात भरला - आकाशातील देवाची आर्त विनवणी .. पण मनातील काळा मेघ न कोसळता नुस्ता पांगत जातो.. अधिक काळं करीत... सडक डामरी आणिक उखडला पादचारी तो गावाकडचा पायाभूत सुविधा केवल महानगरातच .. गावाकडे अजून रस्तेच नाहीत , तो गावकरी का चिडणार नाही ? झपाट्याने होणारे शहरीकरण ! "पैताईने" आग्रह केला डाव मांडला या कवितेचा ! पैशासाठी या अर्थहीन कवितेचा आयूष्याचा डाव गावाकडच्या( विस्थापित झालेल्या) पादचार्याने ( समाजातील सर्वात निम्न स्तर ) मांडला आहे . अर्थहीन ही असेल कविता आणि कोथळा फाडेल कोणी या दीन - दलिताण्चे जगणेच अर्थहीन आहे.. त्याच्या आयुष्याचा पोचट फुगा कोणीही फोडू शकेल ! "सर"- वर्यासी साद घालतो किती वाढवू आता पाणी ? ही जगण्याची लढाई "सर" व्हावी म्हणून आता डोळ्यातील किती पाणी वाहू दे ? सूड नसे हा नसेल चेष्टा , गम्मत आहे मिपावरची ही तर पूर्वपापाची फळे , कोण कशाला चेष्टा करेल ? चेष्टा : प्रयत्न .. पुरेसे प्रयत्न केले नाहीत असाही अर्थ होतो! आणि हा सूड ही नव्हे ! ( कारण सूडाला अंत असतो !) "मि - पावर ची" : येथे स्वार्थी राजकारण्याचा संदर्भ आहे .. ही त्यांचीच गम्मत आहे , त्यांच्या "मी"पणाची ही पावर आहे. हसाल थोडे नसेल थोडके , गम्मत आहे या कवितेची तरी ही , कवी म्हणतो , हाही आनंदच आहे , थोडेसे हसा. हे आयुष्य ( कविता ) असेच गम्मतशीर आहे ! आपल्याच दु: खावर हसत आहे !! प्रेरणा आणि साष्टांग आभार - नगरवासी प्राध्यापक डॉक्टर बिरूटे सर
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Wed, 12/18/2013 - 10:34 नवीन
प्रेरणा आणि साष्टांग आभार - नगरवासी प्राध्यापक डॉक्टर बिरूटे सर नगर का? वा ! वा ! मराठवाड्याचं ग्रहण सुटलं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा