Welcome to misalpav.com
लेखक: सचीन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तुमचे अंदाज खरे ठरो यासाठी आमच्या तुम्हाला आणि तुमच्या मर्जीतल्या पक्षांना शुभेच्छा. अंदाज रोचक वाटले. - छोटा डॉन

भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत परंतु आपच्या राजकारणातील प्रवेशामुळे नि प्रादेशिक पार्ट्यांच्या सध्याच्या वर्चस्वामुळे तिसऱ्या स्थानासाठी भाजपा नि आपमध्ये चुरस राहू शकते. हे वाचुन बसलेल्या धक्क्यातुन अजुन सावरलेलो नाही आहे. सचिन पिळगावकर नंतर तुम्हीच एक सचिन. तुम्हाला दोघांनाही तोड नाही.

सच्च्चिन...सच्च्चिन... मस्त विषय निवडला...आता शतकासाठी शुभेच्छा... बाकी हे पटले.
शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.

कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी
+१. असेच होणार. काँग्रेसला स्वबळावर कमितकमी साडेतीनशे जागा मिळणार.
भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत
-१. भाजपला १९८४ मध्ये २ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यापेक्षाही कमी जागा मिळणार. एखादी जागा मिळाली तरी भाजपने स्वतःला धन्य समजावे.
तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव
ती वेळ येणारच नाही.वरच म्हटले आहे की काँग्रेसला कमीतकमी साडेतीनशे जागा मिळणार आहेत.
शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.
अगदी अगदी बाकी सचीनरावांचा हा लेख म्हणजे मी मिपावर आजपर्यंत वाचलेला सर्वोत्तम लेख आहे. मी आजपासून सचीनरावांचा मोठ्ठा फॅनच झालो आहे :)

खालील ३ वाक्यांनी पार त्रिफळाचीतच झालो आहे... "१)कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी २)तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव ३)मायावतींनी जर उत्तर प्रदेशात ४० जागांपर्यंत मजल मारली तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने त्याही प्रधानमंत्री बनू शकतात."

त्यात त्रिफळाचित व्हायचे कारण काय...दिल्लीत 'आप'ने बीजेपीचेला खिजगणीतही ठेवले नाही, सर्वात मोठा पक्ष असून....याला म्हणायचे क्लीन बोल्ड करणे.. फक्त आठ जागा असुनही काँग्रेस चर्चेत आहे व बीजेपीला दिल्लीत कुणीच विचारत नाही, याला म्हणायचे 'राजकारण'.. ते कधी भाजपला जमले नाही...

सचिन तुम्हाला आणि कॉंग्रेसला आगाऊ शुभेछा. तुमच्या प्रतिक्रिया आणि लेख फारच अभ्यासपुर्ण असतात, आपण हा लेख दिग्विजय किंवा राहुल गांधि ह्याना ईमेल केल्यास भारताचे पुढिल होम मिनिस्टर तुम्हिच असाल आणि रेल्वे मंत्रि आपले आदरणिय लालु प्रसाद असतिल. फारच रोचक महिति.

"लालूजी धर्मांधाना रोखण्यासाठी जनता तुमच्या बरोबर आहे. सत्ता कॉंग्रेस नाही तर तिसर्या आघाडीचीच येणार ह्यात शंका नाही." ईथे आपण जे भाकित वर्तवले त्यानुसार तिसरी आघाडि येणार आहे, तुमचे उद्याचे भाकित (भाबडे) मुस्लिम लीग (नवाज शरीफ) भारतात सरकार स्थापन करेल हे असणार आहे.

पप्पु पास हो गया असे म्हणावे लागेल असे झाले तर.. पण पहिले काँग्रेस राहुल किंवा सोनिया ह्यांचे नाव तर त्या पदा साठि जाहिर करु दे.

लेखकाने मुद्दे एकदम अचूक मांडले आहेत. फक्त अजून एक होईल याची मनोमन खात्री आहे... मा. राष्ट्रपती, हे श्री. लालूप्रसाद यादव यांना माफ करतील आणि जे काही धर्मांध शक्तींनी त्यांना (म्हणजे श्री. लालूप्रसाद यांना) खोट्या चाराघोटाळ्यात अडकवले आहे त्यातून बाहेर काढतील. एकदा का तो वाघ मोकळा झाला की काय विचारता! भाजपा, शिवसेना, मनसे आणि तमाम पक्ष आणि त्यातील कमकुवत नेत्यांची ऐशीतैशी होईल. त्यानंतर वडीलकीच्या आणि राजकीय गुरूच्या नात्याने श्री. लालूप्रसाद हे नवीन उमेदीच्या पंतप्रधान श्री. राहूलजी गांधी यांना नेतृत्वाचे मार्गदर्शन करतील. मग भारतवर्षात रामराज्यासारख्या खुळचट कल्पना लोप पावतील आणि लालूराज्य साकार होईल. (अवांतर - मालकांना विनंती: जसे नवे लेखन करताना विडंबन म्हणून वर्गीकरण करता येऊ शकते, तसेच प्रतिसादांचे पण विडंबन/उपरोध वगैरे म्हणून वर्गीकरण करणे अथवा टॅग लावणे शक्य करा की साहेब! ;) )

होबास राव एका प्रतिक्रियेत तुम्ही लिहता कि माझे लेख अभ्यासपूर्ण असतात एकात लिहिता कि विनोदी असतात.तुमच्या नावाप्रमाणेच तुमच्या प्रतिक्रियाही मला विनोदी वाटू लागल्यात.

तमचे हे सर्व अंदाज म्हणजे तुमच्या द्रष्टेपणाचा खणखणीत पुरावा आहे ! त्यात काळानुसार ९६ दुरूस्त्या येऊ नयेत म्हणून मनापासून शुभेच्छा !

मिपाचे भाग्य फार थोर आहे.... आजकाल हे असे जबरद्स्त..द्रष्टे मिळत नाहीत.... वरील प्रतिसाद हा चौरा काकांना असल्याने इतर जणांनी नाहक आपापला आणि माझा वेळ फुकट घालवू नये, ही नम्र विनंती.

अहो भावी घटनाकार आहेत चौरा काका. द्रष्टे असायचेच. एकही चूक न करता बिनचूक अशी दुरुस्त्या न करावी लागणारी घटना लिहिणार आहेत ते देशासाठी .

आपण अगदी घटनाकार वगैरे भूषवायला तयार नाही, पण सचिन शेठ कॉण्त्याही एका पक्षाला ( कारण आम्ही कोण्तीही एक टोपी डोक्यावर आंधळेपणाचे लावलेली नाही ) येत्या शंभर वर्षात " दो तिहाई" बहुमत मिळाले तर एकही नया पैसा न घेता घटनासमितीत काम करू व मुख्य म्हणजे त्या घटनेने काही विपरित परिंणाम झाले तर त्या प्रमाणात त्याचे उत्तरदायित्व आमचे असेल असे मृत्यू पत्रात आवर्जून लिहू !

एकही नया पैसा न घेता घटनासमितीत काम करू व मुख्य म्हणजे त्या घटनेने काही विपरित परिंणाम झाले तर त्या प्रमाणात त्याचे उत्तरदायित्व आमचे असेल असे मृत्यू पत्रात आवर्जून लिहू ! >>>>>> नव घटनाकार काका मी गम्मत करत होतो गंभीर होवू नका .मला नाही वाटत कुठल्याही पक्षाचे सरकार तुम्हाला विनामुल्याही घटना समितीत काम करायला घेईल.

मला नाही वाटत कुठल्याही पक्षाचे सरकार तुम्हाला विनामुल्याही घटना समितीत काम करायला घेईल.
हे मात्र अगदी बरोब्बर बोललात साहेब . . विनामूल्य कसं कोणी समितीत घेईल . काही तरी "सेवा" करावीच लागेल .

अरे वा ! तुमचे सगळे धागे गमतीने घ्यायचे हे सांगितलेत हे बरे केलेत ! हाबिनंदण ! हे आलेले जोकपाल ठरले तर त्या पदावर मग तुमचीच नियुकी होणार ब्वा ! तय्यारी जोरात चालू आहे ब्याकग्रांउंडची ! परत येकदा हाबिनंदण .पण एका ड्रायव्हरने अर्धवट का होईना केला ना इतिहास निर्माण? कोठलेही रिझर्वेशन न मागता !

काका तुमच्या नेमके पोटात कशामुळे दुखते ते कळाले? हे आपले विधान आहे की प्रश्न ? बर असो, आरक्षणाला विरोध अशासाठी की तोच रोग आता किती पसरत चालला आहे हे आपण पहातच आहात ! एवढे करून " त्यांच्या" तोडीचा एक तरी नेता गेल्या साठ वर्षात आरक्षणाने जन्माला घातला का?

" त्यांच्या" तोडीचा एक तरी नेता गेल्या साठ वर्षात आरक्षणाने जन्माला घातला का?
म्हणजे कुणाच्या?

चौरा मला वाटाते प्रश्न चुकीचा आहे. तसा तर गांधीजींच्या तोडीचाही एकही नेता सवर्णांमधुन गेल्या ६० वर्षात निघालेला नाही. गेल्या ४०० वर्षात एकही शिवाजी निपजलेला नाही. महान नेता रोज जन्म घेतच नसतो.

आमच्या वाक्यातून हेच ध्वनित करायचे आहे की प्रगतिसाठी जर नेता लागत असेल तर तो एकाद्या क्षेत्रात आरक्षण निर्माण करून होत नाही. कष्ट करण्याची वृती, मेधा, कल्पकता, सचोटी, हे गुण नैसर्गिकतः च येतात .ते ही आरक्षणातून येत नाहीत.आरक्षण तिथेच असावे जिथे वरील सर्व गुण समान असता संधी मर्यादित आहे तिथे गरीब माणसास प्रथम संधी मिळावी.जातीच्या आधारे नव्हे ! अशाने धर्म जात या कल्पना उलट गडद होत चालल्या आहेत.

क्रुपया कुणाच्याही नावाची जाहीर चिरफाड करू नका, ही विनंती आहे. त्यांचे नांव "होबासराव" असे आहे. (का कुणास ठावूक पण जुन्या मालकांची आठवण झाली.)

महाराणीजी असे जाहीर करतील की देशातले सर्व लोक समान आहेत. फक्त गांधी घराणे जास्त समान आहे त्यामुळे ह्यापुढे निवडणुका वगैरे भानगडी न ठेवता सर्वानुमते त्या जास्त समान घराण्यातला कोणीतरी सत्तेवर यावा. त्यामुळे खर्चिक निवडणुका टळतील आणि देशाची भरभराट होऊ लागेल. आणि देश ज्यांनी एकहाती घडवला आहे त्यांचीही! संपादित