Welcome to misalpav.com
लेखक: शरद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

एक फुस. (शरद सरांचा फुकटचा सल्ला) वेळ सत्कारणी लावावयाचा असेल हठयोगावर वेळ घालवू नका. तो वायाच जाईल. त्या ऐवजी सहजयोग, राजयोग, भक्तीयोग यांपैकी कोणताही मार्ग जास्त फायदाचा आहे !
फुस तर लेखाच्या विरुद्धच वाटतो आहे ;) हठयोग करण्यात अर्थ नसेल तर इतके माहात्म्य कशास सांगावे कुंडलिनीचे? रागावू नका सर पण आपल्या लेखात अंतर्विरोध वाटतो आहे.

छ्या !! समाधी लावायला येव्ढा आटापिटा कशाला !! मुगाची खिचडी, पोह्याचे पापड आणि आलं मिरची घातलेलं दीडेक ग्लास ताक पोटात गेलं की आपोआप समाधी लागते.

माझ्या स्वतःच्या एका अवचित, काहीही सहेतुक प्रयत्न वा साधना न करता आलेल्या अनुभवामुळे मला कुंडलिनी 'जागृत होणे' या शब्दप्रयोगाऐवजी 'कुंडलिनिची जाणीव होणे' हा शब्दप्रयोग जास्त नेमका वाटू लागला आहे. शरीरांतर्गत रक्ताभिसरणादि क्रिया अव्याहत चाललेल्याच असून त्यांची जाणीव आपल्याला होत नसते. तसेच 'कुंडलिनि' चे कार्यही जन्मभर अव्याहत चालत असते, पण आपल्या जाणीवेच्या कक्षेत ते येत नाही, असे माझे मत झाले आहे. काही वर्षांपूर्वी एकदा पहाटे उठून बसताच मला संपूर्ण पाठीच्या कणात - अगदी खालपासून मस्तकापर्यंत- विलक्षण जोरात विद्युत्प्रवाह चालत असल्यासारखे जाणवले. त्यावेळी काहीतरी विलक्षण वेगळाच आनंद दाटून आला होता. आधी मी जरा घाबरलो, तेवढ्यात "ही कुंडलिनी आहे, नुस्ते बघत रहा" असे जणू शब्द कानावर आले. हा अनुभव किती वेळ चालला, हे कळले नाही, नंतर हळू हळु हा प्रकार थांबला. या अनुभवाबद्दल मी फारसे कुणाला सांगितले नव्हते, पण आज आठवले. हा अनुभव त्यानंतर आजतागायत कधीही आला नाही, आणि त्याची आसही नाही. मात्र या अनुभवापूर्वी मला मोक्ष, कुंडलिनी, समाधी, ध्यान इत्यादिंबद्दल वाचायला, बोलायला फार आवडायचे आणि हे सर्व जाणून घ्यावे असे वाटायचे. या अनुभवानंतर मात्र हे सर्व थांबले, आणि मिपाच्या भाषेत 'अध्यात्म वगैरेंना फाट्यावर मारून' मी आपले साधे, सहज, आणि सृजनशील जीवन समरसून जगू लागलो. हा माझा अगदी वैयक्तिक अनुभव आहे, त्यावरून मला कसलेही खंडन वा मंडन करायचे नाही, या अनुभवाला मी 'कुंडलिनी ची अनुभूति' असे मानत असलो, तरी इतरांनीही तसेच मानावे, असा माझा बिल्कुल आग्रह नाही. जे झाले, ते अवचित घडून आले, आणि त्यानंतर माझे जीवन जास्त समाधानी, आनंदी झाले, एवढेच.

' @@@@@@कुंडलिनि' चे कार्यही जन्मभर अव्याहत चालत असते, पण आपल्या जाणीवेच्या कक्षेत ते येत नाही, प्रचंड सहमत

+१ या उपाधीमाजी गुप्त| चैतन्य असे सर्वगत| ते तत्त्वज्ञ संत| स्वीकारीती|| ;) >>>जे झाले, ते अवचित घडून आले, आणि त्यानंतर माझे जीवन जास्त समाधानी, आनंदी झाले, एवढेच. +१११११११ रुखरुख, वखवख थांबणे, एखाद्या गोष्टीबाबत हाव न वाटणे, असली तरी ठीक, नसली तरी ठीक असं काही होतं का?

बापरे हे तर गजब वेगळे विज्ञान आहे हो!!! सुरस आहे!!! सही वाटले वाचायला!!! मुख्य म्हणजे ते कुंडलिनी चे प्रतिक असलेले सर्पाचे चित्र!!! , मी गेले कित्येक दिवस "भारतीय संस्कृतीतले शक्ति चे महत्व अधोरेखीत करणारे पण सटल" अशी एक टॅटू आयडीया शोधत होतो आता हेच वापरेन म्हणतोय!!!!, माझे स्वत: चे आबा आयुर्वेदाचार्य होते सो मी ह्या विज्ञानाचा आदर करतोच करतो. :) ह्यावर वाचन केलेच पाहीजे!!! (चेक्ड)

ही कुंडलिनी जागृत करण्याची कला अथवा सिध्दि म्हणू फारच थोड्यांना अवगत असावी असे वाटते . इलेक्ट्रिक रे नावाचा मासा नाही का आठशे व्होल्टसचा झटका देऊ शकतो . असं काही असेल यावर माझातरी विश्वास आहे .फक्त मोरोपंतांची शिकवणी लावली की मलाही केकावली करता येईल असा गैरसमज मला नाही . इतका लेखप्रपंच करून सविस्तर माहिती दिलीत फार फार धन्यवाद . ज्या कोणास साध्य आहे त्यांनी ही कला पुढच्या पिढीत पोहोचवली मात्र पाहिजे .

शरीरात करंट वाहताना मी अनुभवले (जाणिवेने, चित्रगुप्तजींसारखे) आहेत. पण ते लोकल फॉल्टी फंक्शन असावे. मला तर ताणच वाटला. नो अदर चेंज.

इथे मिपावर एक सदस्य होते. त्याना नर्मदा परीक्रमी दरम्यान कुंडलिनी जागृतीचा काही अनुभव आला. मात्र त्याची परिणीती वेगळ्याच घटनेत झाली

वेळ सत्कारणी लावावयाचा असेल हठयोगावर वेळ घालवू नका. तो वायाच जाईल. त्या ऐवजी सहजयोग, राजयोग, भक्तीयोग यांपैकी कोणताही मार्ग जास्त फायदाचा आहे !
सहमत.
हठयोग करण्यात अर्थ नसेल तर इतके माहात्म्य कशास सांगावे कुंडलिनीचे?
हठयोग हा १ मार्ग झाला . इतर मार्ग आहेत कि कुंडलिनी जागृत करण्याचे. आणि एखादा विषय अवघड असेल तर त्याची माहितीच घ्यायची नाही असं थोडाच असतं.... शरद साहेब.. पुढचा लेख लिहिणार आहात का? त्यात सप्तचाक्रांची माहिती आली तर बऱ होईल

>>नाडीशुद्धी झाली व चित्ताची एकाग्रता साधता आली की साधकाला अनाहत नाद ऐकू येऊ लागतो. तबल्यावर थाप मारल्यावर जो आवाज येतो तो आहत, "ठोकल्याने", तार "छेडल्याने" आलेला नाद. अनाहत नाद अशा कोणत्याही आहताने निर्माण झालेला नसतो. हा अनाहत नाद तुम्हाला ऐकू येऊ लागला की तुम्ही तुमच्या लक्षाच्या जवळ आला आहात असे समजावे. असा अनाहत नाद कानात इन्फेक्शन झालेले असले तर ऐकु येतो. पोहणे शिकत असताना मला त्याचा भयाण अनुभव आला. कसलि नाडीशुद्धी आणि कसली चित्ताची एकाग्रता....डोके फिरून गेले होते नुसते... :(

एका मोठ्या विषयाचा संक्षिप्त परिचय चांगला झाला आहे. चित्रगुप्त यांनी सांगितलेला अनुभव हा अनेक इतर ठिकाणी वाचलेल्या अनुभवांसारखाच आहे. जसे की पॉल ब्रंटन (हिमालयातील एक तपस्वी), जगन्नाथ कुंटे (नर्मदे हर हर) व इतर अनेक. त्याअर्थी हा अनुभव बहुदा निसर्गाशी तादात्म्य पावलेल्यांना येत असावा असे वाटते. अजून वाचायला आवडेल. शक्तीपात साधनेशक्तीही कुंडलिनी जागृती होते असे म्हणतात. परंतु त्याचे उपाय ऐकल्यावर ते जमणे अशक्य वाटले. जसे की ३ लक्ष वेळा कपालभाती प्राणायाम. शिवाय त्याच्या जोडीला लागणारी इतर योगासने व बंध. कुणाकडे काही शॉर्टकट ;) ???

ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका मध्ये कुंडलिनि बद्दल सांगितले आहे पण कोणता अध्याय ते आठवत नाहि. पण कुंडलिनि कशी जागृत करता येते योग मागाने हे सांगितले आहे. लेख आवडला

अजून वाचायला आवडेल. शक्तीपात साधनेशक्तीही कुंडलिनी जागृती होते असे म्हणतात. परंतु त्याचे उपाय ऐकल्यावर ते जमणे अशक्य वाटले. जसे की ३ लक्ष वेळा कपालभाती प्राणायाम. शिवाय त्याच्या जोडीला लागणारी इतर योगासने व बंध.
३ लक्ष वेळा कपालभाती प्राणायाम, योगासने व बंध हे सगळा हठ्योगामध्ये करतात. शक्तिपात साधनेत ह्याची गरज नसते. कारण शक्तिपाताने आधी कुंडलिनी जागृत होते आणि मग ती साधकाच्या प्रगतीसाठी लागणारी योगासने, प्राणायाम, बंध स्वतः करून घेते. (साधक करत नाही. आपोआप त्याच्याकडून करून घेतल जातं)
ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका मध्ये कुंडलिनि बद्दल सांगितले आहे पण कोणता अध्याय ते आठवत नाहि.
६ व अध्याय आहे. पण मला वाटतं ह्या अध्यायात हठ्योगाबद्दल सांगितलेला नसून राज योगाबद्दल (कलियुगात ह्याला शक्तिपात नाव पडलंय )

विवेचन उत्तम आहे. पण त्यात जो विषय आहे त्याकडे शक्यतो कोणी वळू नये अशी व्यक्तिगत इच्छा.. या सर्व कल्पनाच आहेत, पण त्यांना सत्य मानल्याने भलतेच काही होऊ शकते.. असो..

या सर्व कल्पनाच आहेत कशावरून? येथे विषयांतर होवून चर्चा भरकटेल म्ह्णून जास्त उहापोह करण्याची अपेक्षा नाही. पण त्यात जो विषय आहे त्याकडे शक्यतो कोणी वळू नये अशी व्यक्तिगत इच्छा.. ह्याबद्दल आदर आहे. ही इच्छा जशी वैयक्तिक आहे तसेच " या सर्व कल्पनाच आहेत" हेही तुमचे वैयक्तिक मत आहे असे जोडायला हवे होतेत असे वाटून गेले.

या सर्व कल्पनाच आहेत, पण त्यांना सत्य मानल्याने भलतेच काही होऊ शकते..
+१. नियमित योगासनांनी आणि प्राणायामाने शरीराला आणि मनाला अनेक फायदे होऊ शकतात इथपर्यंत मला मान्य आहे. पण हे नाडी, कुंडलिनी वगैरेला काही अर्थ नाही. अंगातनं जाणारे इलेक्ट्रिक करंट, आतून येणारे आवाज वगैरे गोष्टी फायद्याच्या वाटत नाहीत. मिपावरच्या डॉक्टरांनी याबाबत थोडा प्रकाश टाकावा ही विनंती.

अहो त्या पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्रीचा शक्तिमान झाला होता कुंडलिनि जागृत झाल्यामुळे. हे पहा... http://en.wikipedia.org/wiki/Shaktimaan#Origin_of_Shaktimaan

blockquote>अंगातनं जाणारे इलेक्ट्रिक करंट, आतून येणारे आवाज वगैरे गोष्टी फायद्याच्या वाटत नाहीत. +१०००० उगाच या करंटने मेंदूतल्या एखाद्या कक्षात काही लोचा/डॅमेज झाले तर लेने के देने होऊ शकते.

शरद, विवेचन आवडले. असेच, संक्षिप्त स्वरूपात प्राण/ अपान/ व्यान/ उदान व समान हे वायू व सुषुम्ना नाडी विषयी काही देता आले तर वाचायला आवडेल.

आवडले. बाकी "कुंडलिनी ही जागृत व्हायची असते, करायची नसते!" असे संतवचन आहे. त्याबद्दलही थोडे विशद करावे ही विनंती.

कशी होते कुंडलिनी जागृती? जागृती नंतर पूढे काय? प्राचीन योगग्रंथात उल्लेखलेले अनुभव आजही खरोखरच येतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे अनुभव कथन. देवाच्या डाव्या हाती या बिपीन जोशी यांच्या पुस्तकात वाचावयास मिळतात

हे पुस्तक मी पुण्यामध्ये शोध शोध शोधलं पण काही मिळालं नाही. :( ह्यामध्ये लेखकाने स्वताहून कुंडलिनी जागृत केली आहे. सगळ्यांना ते जमेल असं नाही. स्वामी मुक्तानंदांचा 'चित्शक्ती विलास ' नावाचा पुस्तक आहे. त्यातही त्यांनी कुंडलिनी जागृती नंतरचे स्वताचे अनुभव सांगितले आहेत. पण अनुभव थोडे आणि तत्वज्ञान जास्त असं असल्यामुळे थोडं बोर होऊ शकतं.