Welcome to misalpav.com
लेखक: विद्युत् बालक | प्रसिद्ध:
एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे २०१४ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या साहित्यिक व त्यांच्या लेखना ऐवजी एका जेष्ठ संपादकांच्या वादग्रस्त मुलाखती वरूनच जास्त गाजत आहे . ह्या महाशयांनी उधळलेली मुक्ताफळे इथे व इथे पाहायला मिळतील . आणि विशेष म्हणजे ह्याचा महाराष्ट्रातील तथाकथित सामाजिक विचारवंतानी निषेध पण व्यक्त केलेला नाही उलटे ह्यांच्या सुरात सूर मिसळलेला आहे . मोदींचा उदय व दाभोलकर यांची हत्या यांची सांगड घालणाऱ्या ह्या थोर विचारवंतास आमचा साष्टांग नमस्कार . राजकीय मतभेद कितीही असोत पण साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे राजकीय आखाड्यात रुपांतरीत होताना बरे नाही दिसत. (धाग्याची भाषा हि दोन बाटल्या थंडगार पाणी पिउन गार ठेवलेली आहे )
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

खरंतर काथ्याकुटायचा नाही हे ठरवलं होतं पण आत्ताच तो व्हिडीयो पाहिला त्यातले एक वाक्य ऐकले अन डोक्यात तिडीकच गेली ...
"देश कॉंग्रेस मुक्त करायचा म्हणजे स्वातंत्र्य चळवल बंद करायला लागेल कारण स्वातंत्र्य चळवळ काँग्रेसने लढलेली आहे "
हे म्हणजे "उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया " ह्या थाटात झाले ... स्वातंत्र्याचे श्रेय एकट्या काँग्रेस आणि गांधींचे .... बाकीचे काय तर इतिहासाच्या पुस्तकातील एका पॅराग्राफचे धनी असं काही वाचलं की आझाद , भगत सिंग ,सुखदेव , राजगुरु , नेताजी ,चाफेकर बंधु , अनंत कान्हेरे , तात्याराव , जीना , पाशा खान , अरविंद घोष , बाबु गेनु वगैरे लोकांची फार कीव वाटते ... तुमचं बलिदान पाण्यात गेलं महाराजा :(

वर्षा़त ह्यांना भारतरत्न, पद्मविभुषण, पद्मभुषण वगैरे जाहीर झाले तर आश्चर्य नको वाटायला.(**काँग्रेसची सत्ता राहिली तर)

काहीही असो केतकर सरांचे लेखन त्यांचे विचार हे रोखठोक आहेत. असे अभ्यासू व्यक्तिमत्वे, त्यांचे विचार हे समाजासाठी आदर्शच ठरतात.

किती त्रास या दर्यावर्दी आणि मंडळीना सर्व मराठी सन्केतस्थळावर्च्या मतिमंदानी केलेली घाण साफ करण्याचे कन्त्राटच मिळाले आहे यांना.

बॅटमॅन, हे दोघे इतक्या खालच्या आणि वैय्यक्तिक पातळीवर उतरल्यावर सुद्धा तुम्हाला यांच्याशी वाद घालण्याची हौस आहे? मुद्द्याला प्रतिवाद करता आला नाही ही असला उकिरडा करणारी जनावरे ही. आपण का यांच्यासारख्या फालतू लोकांकडून अपेक्षा ठवा?

दर्यावर्दी, तुम्हाला उद्देशून हा या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद. तुमचे नाव, गाव, पत्ता, फोन नंबर कळवता का? तुमचे ज्ञानामृतमय शब्द ऐकून तुम्हाला भेटण्याची फार म्हणजे फार इच्छा लागून र्‍हायली आहे. एकदा कडकडून गळाभेट घेतली की मग माझ्या मनाला शांतता लाभेल. काय म्हणता भेटता का? आणि नसेल भेटायची हिंमत, तर सांगा बुवा तसे. मग अंगात नाही बळ, अन् चिमटी घेऊन पळ असा आयडी घ्या :P

कहर म्हणजे आयबीएन लोकमत वर आजचा सवाल मध्ये कुमार केतकरांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी जे म्हटले त्याचा 'पत्रकारांवर वाढता हल्ला' असा बागुलबुवा करण्यात आला!! त्यात जरी 'केतकरांबाबतची घटना हे केवळ एक निमित्त' असं म्हटलं गेलं तरी चर्चेत उपस्थित एकूण सगळ्याच पत्रकारांचा रोख देवेंद्र फडणवीस हे आपली पातळी सोडून बोलले असाच होता. खरं तर त्यांनी 'प्राण्याला वेड लागलं की आपण त्याला मारून टाकतो; पण संपादकाला वेड लागलं की त्याच्या बोलण्याकडे फक्त दुर्लक्ष करावं' इतकंच म्हटलं होतं. यात काय चुकीचं म्हटलंय??? तरी सगळ्यांचा सूर त्यांनी याबद्दल माफी मागावी असाच दिसला. म्हणजे पत्रकारांनी लोकांबद्दल कुठेही (म्हणजे एकवेळ न्यूजचॅनल वर, किंवा पेपरात केलं असतं, तर एक वेळ त्यात वादासाठी काहीतरी मुद्दा राहिला असता. इथे प्रसंग काय, सुमार काय बोलतायत??) काहीही गरळ ओकावी, खुशाल भेदभाव पसरवणारी भाषा करावी, आणि त्याबद्दल त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं, असं म्हणणा-याने मात्र 'पातळी सोडली'??? अर्थातच त्या आजचा सवाल वर प्रत्येक ब्रेक नंतर 'पत्रकारांवर हल्ले वाढतायत का?' अशा काहीशा सवालाला आलेला लोकांचा जवाब (तो सवाल सुद्धा कसा विचारतात रे.... रे रे रे... असो) 'नाही' असाच दिसत होता. पूर्णवेळ हसत होतो.