Welcome to misalpav.com
लेखक: मदनबाण | प्रसिद्ध:
(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ) _____________________________________ मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे वटवाघुळ मानवास संस्कॄताची उत्तम माहिती असताना, त्याने असे विधान करावे हे सर्वात धक्कादायक आहे. मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।25।। श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक २५ { जप हा मंत्रांचाच केला जातो} बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्। मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।35।। श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक ३५ { गायत्री छन्दात्मक मंत्र आहे हे तर आता सर्वश्रुत आहे.} मंत्रांचा वापर करुन त्याचा अनुभव, फायदा / तोटा घेणारी मंडळी आजच्या घडीला आहेत, तसेच उध्या ही असतील. अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे. जालावर या संदर्भात वाचन / शोध घेत असताना काही माहिती समोर आली { ही माहिती मी अजुन संपूर्ण वाचली नाहीये.} वाचकांसाठी त्याचे दुवे खाली देतो :- An Introduction to the "MantraŚãstra" MANTRAS दोन्ही दुवे हे पिडीएफ चे आहेत. ज्या वाचकांना या विषयात रस आहे त्यांनीच हे दुवे अघडुन वाचण्याचे कष्ट घ्यावेत, टिंगल करण्यास विशेष बुद्धी लागत नाही असा माझा समज असल्याने जे हा विषय एक टिंगल / थट्टा म्हणुनच पाहतात त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे ! प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो. वटवाघुळाने अनुभवा विषयी विचारणा केली आहे,म्हणुन जरा टंकन कष्ट घेतो. मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! हा मंत्र मला माझ्या तिर्थरुपांकडुन कळाला, ज्या ठिकाणी मी सध्या राहतो आहे ती जागा विकत घेतानाची ही घटना आहे.{अनुभव क्रमांक १} या जागेचे {जागा विकत घेण्यासंबंधीच्या व्यव्हारांसकट इतर महत्वाची कागदपत्रे ओरिजिनल} सर्व कागदपत्र घेउन माझे वडिल प्रवास करत होते,{मला वाटत दादर स्टेशनहुन ते डोंबिवलीला येण्यासाठी ट्रेन मधे चढत होते.}प्रचंड गर्दी आणि त्यामुळे झालेल्या धक्का-बुक्कीत त्यांच्या हाताला झटका बसुन ती फाईल त्या गर्दीत पडली. वडिल डब्यात होते,डब्यातल्या गर्दीत ती फाईल शोधणेही त्या क्षणी शक्य नव्हते इतकी गर्दी डब्यात होती.जरा गर्दी कमी झाल्यावर वडिलांनी शोध घेण्याचा प्रतय्न केला पण काहीही सापडले नाही.फाईल फलाटावर पडली का ? ट्रॅकवर पडली का ? की डब्यातच कोणाच्या पायाला लागुन ती बाहेर फेकली गेली असेल ? वडिलांनी घरी आल्यावर हे सर्व आम्हाला सांगितले,ते खूप विचारात होते... जागेच्या सर्व व्यव्हारांचे कागद गहाळ झाल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते.थोडावेळ शांत बसले आणि नंतर हातपाय धुवुन झाल्या नंतर त्यांना या वर दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले ! त्यांनी सात्यत्याने या मंत्राचे उच्चरण अनेक दिवस चालु ठेवले होते आणि अचानक काही दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधे एका माणसाचा फोन आला, त्याने वडिलांचे नाव विचारले आणि तुमची काही कागदपत्रांची फाईल गहाळ झाली आहे का ? अशी विचारणा केली.वडिलांनी त्या फाईलचे वर्णन केले आणि त्या फाईल चे एकंदर स्वरुप सांगितले,त्यावर त्या माणसाने तुमची फाईल माझ्याकडे आहे, ती घेउन जा असे सांगितले.ती फाइल महत्वाची आहे हे त्या व्यक्तीस त्यातील कागदपत्रांवरुन कळाले होते. शेवटी ती फाइल मिळाली आणि आजवर त्याच फ्लॅटमधे आम्ही राहतोय जिची कागदपत्रे त्या फाइल मधे होती. २)अनुभव २:- एकदा नरसोबाच्या वाडीला मी नदीत अंघोळ करत होतो, ३ -४ पायर्‍या खाली,ज्यांनी नरबाच्या वाडीला कॄष्णेत स्नान केले असेल त्यांना नदीच्या प्रवाहाचा अंदाज येइल.माझ्या गळ्यात साधे कसलेसे तांब्याचे लॉकेट होते, ते मैल्यवान नव्हते की कुठल्याही इतर गोष्टींसाठी उपयुक्त नव्हते,पण मी या मंत्राचा उपयोग सुरु करताच जवळपास १० मिनीटाच एका पोहणार्‍याला ते सापडले आणि तिथेच हे कोणाचे आहे अशी विचारणा सुरु केली,मी ते माझे आहे असे सांगताच ते त्यांनी मला दिले,पण नदीच्या प्रवाहात पोहताना गेलेले लॉकेट परत मिळाले यावर माझाच बराच वेळ विश्वास बसला नव्हता. ३}घरात अनेकदा मला न मिळणार्‍या,दॄष्टीस न पडणार्‍या ,भरपुर शोध घेउन न सापडणार्‍या वस्त्यु या मंत्राने आम्हाला मिळाल्या आहेत, हो आइच्या हातुन घराची किल्ली हरवली तेव्हा ती या मंत्रानेच परत मिळाली. ४)अगदी आत्ताची गोष्ट सांगतो... मी नविन पल्सर घेतली, त्याला मी पेट्रोल लॉक बसवुन घेतले,पण त्या लॉकची मुव्हमेंट घट्ट आहे,त्यामुळे व्हॉल्व ऑन्/ऑफ करताना किल्लीवर दाब येत होता, एका प्रयत्नात ती तुटली,पण त्याची अजुन एक चावी माझ्याकडे होती. मी जवळच्याच चावीवाल्याकडे जाउन तशीच अजुन एक चावी बनवुन घेतली.ती मी माझ्या बॅगेत ठेवली,व एक चावी कीचेनला अडकवली. ऑफिसात आलो...कामाला लागलो,चाव्या पॅटच्या डाव्या खिश्यात ठेवल्या होत्या,काही वेळाने त्या बाहेर काढुन बॅगेतच ठेवावा असा विचार आला,तेव्हा चाव्या खिशातुन बाहेर काढल्या,पण ल़़क्षात आले की पेट्रोल लॉकची चावी कीचेनला नाही ! ती पडली होती ! माझ्या बॅगेत आधीच चावी वाल्याकडुन तयार केलेली चावी होती,त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते,पण कीचेन मधली चावी पडली होती ते शोधणे तर गरजेचेच होते.मी परत एकदा खिसा तपासला,त्याच्यातच तर राहिली नसेल ना ? मग ज्या ज्या ठिकाणी मी गेलो होते त्या त्या ठिकाणी मी परत गेलो, ज्या मार्गाने ऑफिसात गेलो होतो त्याच मार्गाने उलट फिरुन कंपनीच्या आवारात जिथे बाइक पार्क केली होती तिथे गेलो,पण चावी काही सापडली नाही ! मग नेहमीचाच वरील उपाय केला,ऑफिसात परत जाताना मी सिक्युरिटी गार्डला सांगुन ठेवले की माझी अश्या अश्या प्रकारची चावी हरवली आहे ती सापडली तर मला कळवा,तो पर्यंत मनात अनेकदा वरील मंत्राचा प्रयोग करुन झाला होता,आणि मला चावी मिळणार याची खात्री आधीच झाली,संध्याकाळी कामावरुन घरी निघताना परत सिक्युरिटी गार्डला प्रश्न केला मेरी चाबी मिली ना ! खर तर हा प्रश्न नव्हताच ते अध्यारुतच होते माझ्यासाठी, त्यावर तो म्हणाला साब एक चाबी मिला है, आप चेक करलो वोह आपकी है क्या. मी मेमगेटवर जाउन विचारणा केली.चावी त्यांच्याकडे जमा झालेली होती. ऑफिसच्या एव्हढ्या मोठ्या कँपस मधे हरवलेली चावी परत मिळण्याची ही माझी दुसरी घटना {या आधीही एकदा चावी गहाळ झाली होती},दोन्ही वेळेला चावी मला परत मिळाली. या सर्व घटनांमध्ये वस्तु परत मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती यावर तुम्ही विचार करु शकता, याला कोणी योगायोग किंवा इतर काहीही म्हणा... माझ्यासाठी हे प्रमाणित अनुभवच आहेत. या मंत्राचा संदर्भ तुम्हाला :- बोध दत्तमाहात्याचा अध्याय ४ था मधे मिळेल. {लेखक :- डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख} जाता जाता :- गुगलुन हा मंत्र जालावर सापडतोय का ते पाहण्याचे सुद्धा प्रतय्न केले तरी माझी हरकत नाही. जे अनुभव आजवर या मंत्रा संबंधी घेतले ते तसेच लिहले आहेत. हा अनुभव मी ठाण्याच्या कट्ट्याला देखील गप्पांच्या ओघात कथन केला होता.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

द्या हो आम्हांलाही द्या. पगार वाढला तर झैरात करत हिंडू तुमच्या मंत्राची, हौदिल्लो बे यसवायजी? "आमचे येथे सर्व मंत्रांची झैरात करून मिळेल. प्रत्येक मंत्रासाठी वेगळा चार्ज पडेल!"

पहिल्या दोन महिन्यात गुण आला नाही तर पुढच्या दोन महिन्यात येईल. पैसे परत मिळणार नाहीत, मंत्र बदलून मिळणार नाही..

शहाणे करुन सोडावे सकळजन. मी दीड-शाहण्यांना शाहणं करायचा प्रयत्न करत नाही ! ;) द्या की आम्हाला पण ४ मंत्र. एकमेका सहाय्य करु. आता मी म्हणतोय की प्रयत्न करतो तर तुम्ही नाही म्हणताय. अहो हनुमान मंत्र तुम्हीच जालावर शोधलात ना ? अजुन हवे असेल तर गुगलबाबा आहेच की समर्थ ! ;) शिवाय तुम्हीच म्हणताय की प्रयत्न करतो आहे, मग करा की... कोणी अडवलय ? ;) प्रयत्न केलात की अनेक पर्याय सापडतील ! ;) फक्त तो प्रयत्न प्रामाणिक हवा ! ;)

फक्त तो प्रयत्न प्रामाणिक हवा !
अगदी अगदी. अन माणूस पुण्यवान हवा. म्हणजे तुकाराम सदेह वैकुंठास गेलेल्या विमानातला बिझनेस क्लास, ज्ञानेश्वरांनी वेद म्हणवून घेतलेला रेडा अन रामदास मिरजेच्या किल्ल्यातील ज्या जंगीतून बाहेर पडले ती जंगी असं सर्व काही दिसू शकतं.

मंत्र स्वतःच म्हणावा लागतो का दुसर्‍याने आपल्या साठी म्हटला तरी चालतो?
माझ्या माहितीत असे भटजी/ज्योतिषी आहेत की जे आपण पैसे दिले की ते आपल्यासाठी होम/हवन/याग/ग्रहांची शांती/मंत्रजप करतात. करतात ते, फल आपल्याला मिळते. आपण फक्त समिधा, त्यांचा वेळ ईत्यादीचा मोबदला दयायचा.

माझ्या माहितीत असे भटजी/ज्योतिषी आहेत की जे आपण पैसे दिले की ते आपल्यासाठी होम/हवन/याग/ग्रहांची शांती/मंत्रजप करतात. करतात ते, फल आपल्याला मिळते. आपण फक्त समिधा, त्यांचा वेळ ईत्यादीचा मोबदला दयायचा. खरं आहे, संकल्प करुन असे करतात्.मी जे सुरुवातीला २ पीडीएफ चे दुवे दिले त्यातल्या २ र्‍या पीडीएफ मधे पान क्रमांक ९ वर याचा संदर्भ मिळेल.

काय ठरलं शेवटी? कुणाकुणाचा मनोनिग्रह झालाय प्रयोग करण्यासाठी? ;) चोरी जाउ दे. निदान कुणीतरी एखादी वस्तू तरी हरवा रे....

पुरूष आहेस म्हणुन की वेलेन्टाइन डे जवळ आलाय म्हणुन असं बोल्लास?? मंत्राबद्दल सांगितल्यावर माझा नवरा हेच्च म्हणालाय काल..

त्या कार्तवीर्याने गाय चोरून नेली होती. तुम्हाला पण हृदयाच्या बदल्यात एक गाय मिळेल नंतर! ते स्वल्पहालप्राशनार्थ गाय पाळणे वैग्रे विसरलास काय?

अगागागा! =)) मग बैल (बाईल) चालेल की!

मी घरी सांगुन ठेवलय.. काही हरवलं की आधी मला सांगा... आपण मंत्र म्हणु.. मला तरी हा प्रयोग करुन पहायचय.. कारणं काही का असेनात, वस्तु मिळाल्याशी मतलब.. जर मंत्र म्हणुन मिळत असेल तर तसं.. थांबा.. थांबा... माझी सोन्याची फिरकी १-२ आठवड्या पुर्वी घरातच हरवली आहे.. कानातलं सापडलय, पण फिरकी नाही.. म्हणुन पाहु का हा मंत्र???

या मंत्राचा माझा अनुभव संमिश्र आहे… मी साधारण १०-११ वी मध्ये असताना माझ्या ताईच्या कॉलेज मध्ये आमचा क्यामेरा हरवला होत…. त्यानंतर आईने तो मंत्र खूप वेळा म्हणला आणि मग एक दोन दिवसात ताईच्याच एका मित्राला कॉलेज च्या बागेत तो क्यामेरा झाडाच्या ढोली मध्ये सापडला … आता तो तिथे कसा गेला आणि त्यालाच कसा सापडला वगैरे वर आईनी काही विचार केला नाही. त्यानंतर एखाद्या वर्षातच आमची एक सोन्याची चेन हरवली. आईनी खुपदा मंत्र म्हणला. पण ती काही मिळाली नाही. आम्ही त्या चेन बद्दल विसरून पण गेलो होतो. पण योगा योगाने एका वर्षानी ती घरातच एका वापरात नसलेल्या कोटाच्या खिशात सापडली…. आणि त्यानंतर ३ वर्षापूर्वी ट्रेन मधून जात असताना माझी एक मोठ्ठी अमेरिकन टुरीस्टर ची ब्याग गेली. त्यात माझी आयुष्यभराची कमाई म्हणजे माझी लहानपणीपासून चे शैक्षणिक दस्तावेज आणि मी कुठून कुठून जमवलेली पुस्तके आणि माझ्या हस्तलिखित गोष्टी असा जीवापाड जपलेला खजिना होता… त्यामुळे मी श्रद्धाळू नसूनही अनेक दिवस तो मंत्र म्हणत राहिले… आईने पण म्हणला…. पण आज तागायत मला त्याचा काहीच उपयोग नाही झाला…

आपण श्रद्धेने जर काम केले तरच त्याचा फायदा होईल. श्रद्धा वाढविण्यासाठी मंत्र शास्त्र म्हणजे काय, कसे काम करते हे समजून घेतल्यावर आपल्यालाही पटेल व अपेक्षित परिणाम निश्चितपणे साधला जाईल

फायदा नै झाला तर श्रद्धा नाही इ.इ. खुस्पटे काढायला लोक कायम पुढं असतात. तुमच्या संमिश्र अनुभवांना श्रद्धाहीन असल्यामुळेच तसे अण्भव आले असेही म्हणतील. अंधश्रद्धेचे दुकान चालायला पाहिजे ना शेवटी, तसे कैतरी केलेच पाहिजे!

तुमच्या संमिश्र अनुभवांना श्रद्धाहीन असल्यामुळेच तसे अण्भव आले असेही म्हणतील.
बॅटमॅन'भाऊ, तुम्ही प्रतिसाद टंकत असताना 'आयुर्हित' साहेबांनी
आपण श्रद्धेने जर काम केले तरच त्याचा फायदा होईल.
हे लिहीले व पोस्ट केले देखील... आहात कुठे? :)

पण मुळात एखाद्या गोष्टीचा अनुभवच नाही आला तर श्रद्धा कशी बसेल बरं ? आईला अनुभव आला त्यावरून माझी श्रद्धा बसणं मला शक्य नाही वाटत…. ' श्रद्धेने केले तरच अनुभव येईल ' हे विधान फारच सेफ म्हणता येइल… ते तर अनिरुध्ह बापू पण म्हणाले होते की श्रद्धेनेमंत्र की नामस्मरण काहीतरी केले की बलात्कार होणार नाही … पण अशा कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा बसणे कसे शक्य आहे ? सारासार विचार करून पटायला तर हवं ना?

आलामंतर कोलामंतर छू
ही थिअरी क्लासीक आहे. बिनतोड! फक्त अशा घटनात (जिथे) आलामंतर कोलामंतर छू न ऐकलेल्या कडुनही तिव्र अनपेक्षित सहकार्य कसे काय मिळते यावर आपले स्पश्टीकरण वाचायला आवडेल. "योगायोग" हे कारण सोडुन.

माझं जुनं मिपा हरवलंय... मंत्राचा जप सुरू करतो आहे. बघुया, परत मिळतं का, आणि किती दिवसात मिळतं ते! कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! and so on... and on...

आब्जेक्शन! ते डायवर नाय तर इन्ट्रक्टर हायेत आसं इशेष सूत्रांकडून कळतं! ;) (गांधीवादी बिका हाणणार आमाला ;) )

त्या खरच स्वभावाने प्रांजळ आहेत हेच त्यांचे चांगुलपण आहे, त्यांचे बाबत छोट्या मोठ्या तांत्रीक बाबी सोडुन आशयच ल़क्षात घ्यायचा. अन्यथा मी इतर काही शक्ती म्हणजेच मंत्रशक्ती ज्या संबंधी हा धागा आहे याचा उल्लेख केल्यानंतर त्यांचा भरकटलेला प्रतिसाद मनावर घेतला नसता काय.

धन्य आहे! आधी मंत्र, मग श्रद्धा, मग गाई म्हशी अन आता चक्क बिकांवर गाड उतरलं. असोच!

बाहुसहस्त्रवान् की बाहुसहस्रवान्? नै म्हंजे इत्का पावरबाज मंत्र चुकीचा म्हणून कसं चालेल नै का? मग बिकांना जुनं मिपा सापडायचं कसं? (शुद्धलेखनाला काय, जुनं मिपा सापडलं की पुन्हा फाट्यावर मारता येईल.)

बाहुसहस्रवान् चूक निदर्शनास आणुन दिल्या बद्धल धन्यवाद ! :) यापुढे देखील असेच सहकार्य अपेक्षित आहे. :) बाकी बिकांशी "सहमत" म्हणुन देखील प्रतिसाद दिला असता तर जुने मिपावर प्रतिसाद वाचतो आहे असा फिल त्यांना लगेच आला असता. ;)

इतक्या गंभीर विषयांवर चर्चा चालली असताना मध्येच २ ज्येष्ठ सदस्यांनी शुद्धलेखनाचा आग्रह धरलेला पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली!

अन कार्तवीयोजुनो असाही एक चुकीचा पाठ आलाय. तो 'कार्तवीर्योऽर्जुनो' अथवा 'कार्तवीर्यार्जुनो' असा पाह्यजे ओक्के. धन्यवाद. तुझ्या पाहण्यात याचा संदर्भ असेल... तर जरुर कळव. { हे खोचकपणे सांगत नाही.} म्हणजे चूक दुरुस्त करण्यात मदत होइल. मला संस्कॄत विषयक जास्त माहिती नसल्याने { ते तुला जास्त योग्य माहित असल्यानेच ही विचारणा करतो आहे.} चूक होण्याची शक्यता अधिक आहे. मुद्रा राक्षसामुळे तसेच टंकन चुकांमुळे हा त्रास होतो. मी दिलेला मंत्राचा फोटो पाहिलास तर त्यात स्त्र आहे, पण नंदन ने ती चूक {स्र} निदर्शनास आणुन दिली. ज्या पीडीएफचा संदर्भ दिला आहे त्यात सुद्धा असे दोष आहेत. बर्‍याच वेळेला असे वाटते की पूर्वी जे मौखीक स्वरुपात पाठांतर आणि त्याचे अध्ययन आणि शिकवले जायचे त्यामागे उच्चारात चूक राहु नये हा मुख्य उद्देश असावा... अर्थात हा तर्क आहे.

पण मी काय म्हणतो की बायकोचं तोंड बंद करण्यासाठी काही मंत्र आहे काय हो? तसेच तिचा संशयी स्वभाव जाण्यासाठीही काही असेल तर सांगा ब्वॉ . नाही म्हणजे घरात शिरल्या शिरल्या जी भुणभुण चालु होते त्यातुन जरा तरी शांतता मिळेल.

एका आश्रमात एक माणूस जातो. मुख्य साधू नि पाच सात सादू चटई टाकून ध्यान करत बसलेले असतात. माणूस मुख्य साधूला तुम्ही विचारला तोच प्रश्न विचारतो. साधू म्हणतो, ती कोपर्‍यातली चटई घे आणि हो ज्जा शुरु!

आज,
  • मी जन्माला आल्याचे
  • वाचायला शिकल्याचे
  • मराठी वाचायचा सोस ठेवल्याचे
  • इंटरनेटचा शोध लागल्याचे
  • युनिकोडचा शोध लागल्याचे
  • तात्या अभ्यंकराने मिपा चालू केल्याचे (पक्षी: वेलकराने तात्याला वहाणा दाखविण्याचे)
  • मला मिपावर आयडी घेण्याचे बुद्धी झाल्याचे
सार्थक झाले! आज मी धन्य झाल्या गेले आहे!! - ('मरा...मरा' असे मंत्राचरणारा) सोकाजी