Welcome to misalpav.com
लेखक: दिव्यश्री | प्रसिद्ध:
सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :) आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते. Milano मध्ये जे हॉटेल बुक केले होते तेथे जवळपास बर्याच गल्ल्या /बोळी होत्या.फिरून फिरून आम्ही दोनदा एकाच ठिकाणी आलो.आमचे अहो तेवढ्यात बोलले कितनी बोळी हैं यहा,बोळीबोळी मे से आणे जाने मे तकलीफ होती हय, त्या परिस्थितीत २ मिनिटे सगळेच ब्लांक झाले आता काय करायचं आणि नंतर पूर्ण ट्रीप संपे पर्यंत बोळीबोळी वरून चिडवत राहिले . *blush* ;) :D *lol* तुम्हीही असे काही किस्से असले तर जरूर शेअर करा.आपण सगळे हसुया. :) इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही. एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .अवांतर मला लिहिण्याचा अनुभव आजीबात नाही तेंव्हा काही चुकल्यास आपण सांभाळून घ्यालच(न घेऊन जाणार कुठे.) ;) :)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

माझ्या मैत्रिणीचा साधारण ३ वर्षाचा मुलगा मराठी - हिंदी ची चटपटीत भेळ करतो . जस - तू मला प्यार करू नको , मी माझी चप्पल पेहाणतो ई . एकदा आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो तेंव्हा दुसर्या मैत्रिणीचा मुलगा आगोदरच घसरगुंडीच्या शिडीवर चढून वर गेला , आणि वर उल्लेख केलेला जो होता त्याला त्या उंच शिडी वर चढता यात नव्हते . तर वरचा मुलगा कसा म्हणतो आंटी उसको कडेवर लो ना . :)

हम एक डोंगर पे गये थे. वहा इतने मक्कड थे इतने मक्कड थे, एक मक्कड तो मेरे मांडी पे आके बैठ गया. दुसरे टोक म्हणजे माझी मध्यप्रदेशात राहणारी बहीण मला तिच्या शुद्ध मराठी मधे सांगत होती ' सॉरी मला लेट झाला मी जरा देवाघरी गेली होती' ( देवळात).