Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा दंगा....धागा क्र. १.....डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का?

म
मुक्त विहारि यांनी
Sat, 02/15/2014 - 09:09  ·  लेख
लेख
हा धागा फक्त दंगा करायलाच आहे.हा निव्वळ टाइमपास धागा असल्याने वैयक्तिक शेरेबाजी टाळावी. ह्यात कुठलाही स्वार्थ नाही...असलाच तर परमार्थच आहे.जेणेकरून तमाम मिपाकरांना एक २०० ते २५० मी. लांबी असलेल्या फडके रोडचे दर्शन घेता यावे. ह्या निमीत्ताने मला, महारष्ट्राचा तमाम भौगोलिक.ऐतिहासिक आणि सांस्क्रुतिक इतिहास पण समजेल. तुम्हाला डोंबिवली नको असेल तर. मध्यवर्ती ठिकाण म्ह्णून वडगांव बुद्रुक किंवा तळेगांव खूर्द वाटले तरी लिहा. नेहमीच्या पुणे,मुंबई आणि ठाणे करांना खास आमंत्रण.

प्रतिक्रिया द्या
15916 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

म
मुक्त विहारि Sun, 02/16/2014 - 16:41 नवीन
काही माणसे पुण्यवान असतात पण त्यांना लगेच काही स्वर्गात प्रवेश मिळत नाही... म्हणून एक जन्म त्यांना डोंबिवलीत देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ध
धन्या Sun, 02/16/2014 - 17:13 नवीन
त्याचं कारण हे असावं की या पुण्यवान माणसांना स्वर्गाची शोभा पाहून त्यांचे डोळे एकदम दिपावतील. ते होऊन नये, डोळ्यांना शोभा पाहण्याची सवय व्हावी म्हणून त्यांचा जन्म डोंबीवलीत होत असावा. एकदा का आयुष्याची काही वर्षे डोंबीवलीच्या फडके रोडवरील शोभायात्रा पाहण्यात गेली की डोळे सरावतील. असं काहीसं असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 02/16/2014 - 17:50 नवीन
फडके रोडचे म्हत्व पटायला लागले आहे... अहो, तुम्ही एकदा याच ती शोभा यात्रा बघायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
प्यारे१ Sun, 02/16/2014 - 17:52 नवीन
धन्या, तेरे कु नक्की शोभा होना या शोभायात्रा होना वो पैले तै(तय) कर. बाकी सब बाता बाद में ! ;) जन्नत जन्नत क्या कर्ते मियाँ ? तुम जाकु आये बोले ना जन्नत में? ह मेशा तो बोल्ते र्‍हयते, मय यु एस मे था तब्बी गये था कर्के!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
अ
अजया Wed, 02/19/2014 - 17:48 नवीन
देवाने यमराजाला विचारले,"ही लोकं नरकात पण मजा करत बसली आहेत"............. यमराज :-डोंबिवलीचे आहेत सगळे....... कुठेही टाका ,सेट होउन जातात..!! आली लहर केला कहर तोच खरा 'डोंबिवलीकर'. ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मुक्त विहारि Wed, 02/19/2014 - 18:32 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ज
जेपी Sun, 02/16/2014 - 16:49 नवीन
डोबिंवली -डोबिंवली चालुय , आमालाबी कळु द्या . पुर्व का पश्चिम . मायला माग आलतो डोबिंवलीला जायचे होत पुर्वेला पण पश्चिमेलाच 2 तास फिरत राहिलो . (मुंबै ची एकमेव वारी केलेला ) जेपी
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sun, 02/16/2014 - 17:10 नवीन
मायला माग आलतो डोबिंवलीला जायचे होत पुर्वेला पण पश्चिमेलाच 2 तास फिरत राहिलो .
त्यात वाईट वाटून घ्यायाचं कायबी कारन नाय. मुंबैमद्ये नविन आलेल्या मानसाचं होतंय बगा आसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मुक्त विहारि Sun, 02/16/2014 - 17:58 नवीन
तर तर..... होणारच ना.... नविन माणसांना तरी पण सांभाळून घेते आमची मुंबई... पिन कोड ४२१२०१ म्हणजे डोंबिवली पुर्व.... आणि पिन कोड ४२१२०२ म्हणजे डोंबिवली पश्र्चिम... इतके साधे सरळ गणित आहे... उगाच ३ पेठांना एकच पिन कोड देण्यात काय शहाणपण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 02/16/2014 - 18:09 नवीन
@उगाच ३ पेठांना एकच पिन कोड देण्यात काय शहाणपण? >>> Image removed. चूक..चूक..चूक... =)) ते एका पिन्०कोड मधे तिन पेठा असं अचूक-बरोबर आहे! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 02/16/2014 - 18:24 नवीन
ओके... ठीक आहे... आय माय स्वारी... (हा असा मनाचा मोठेपणा फक्त डोंबिवली करांकडेच आहे.... म्हणूनच तर म्हणतो, डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 02/16/2014 - 18:38 नवीन
@(हा असा मनाचा मोठेपणा फक्त डोंबिवली करांकडेच आहे.... >>> Image removed. @म्हणूनच तर म्हणतो, डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण...) >>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
आ
आदूबाळ Wed, 02/19/2014 - 18:54 नवीन
उगाच ३ पेठांना एकच पिन कोड देण्यात काय शहाणपण?
असं कसं? उगाच का पिनकोड वाया घालवायचे? फुकट आहेत म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 02/16/2014 - 17:54 नवीन
की, तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे ते.... डोंबिवली पुर्वेला की पश्र्चिमेला? म्हणजे पत्ता म्हणून नीट उतरवून घ्यायचा नाही...आणि खापर मात्र डोंबिवली वर.... असो.... हलकेच घ्या.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ए
एस Mon, 02/17/2014 - 09:07 नवीन
डोंबिवली महाराष्ट्रात आहे काय? रच्याकने मुविंनी 'डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का' असे विचारले आहे. कशाचे मध्यवर्ती ठिकाण हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे विशेषत: आपण पुणेकरांनी त्याकडे जास्त लक्ष देऊ नये. ;-)
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/19/2014 - 16:14 नवीन
पुणे सगळ्या जगाच्या मध्यवर्ती आहे असं पुण्याचा जाज्ज्वल्य अभिमान असणारे म्हणतात ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
य
यशोधरा Wed, 02/19/2014 - 17:02 नवीन
हो, बरोबरच अहे की ते. सगळं जगंच मुळी पुण्याभोवताली फिरतं. इतकंच काय पुण्यातले नसणारे इतरेजनही आपापल्या शहरांबद्दल बोलायचं सोडून शिव्या घालायला का होईना वा अजून काही कारणांनी किंवा विनाकारणही पुण्याबद्दल आणि पुणेकरांबद्दलच बोलतात. विरोधी भक्ती हो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुबोध खरे Wed, 02/19/2014 - 18:15 नवीन
हो ना आपले आरवणे ऐकण्यासाठीच सुर्य उगवतो असे पुणेरी कोंबड्यांचे ठाम मत असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
श
शिद Wed, 02/19/2014 - 18:33 नवीन
तुमच्या ह्या वाक्यात
आपले आरवणे ऐकण्यासाठीच सुर्य उगवतो असे पुणेरी कोंबड्यांचे ठाम मत असते
डोंबिवलीचे काश्मिर होण्यास पुरेपूर वाव आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
य
यशोधरा गुरुवार, 02/20/2014 - 17:06 नवीन
नशीब त्या डोंबोलीचे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/19/2014 - 18:50 नवीन
पुणेरी सूर्यही कालच तसे म्हणाला हे उगवत्यावेळेच्या नावाच्या वर्तमानपत्रात छापून आल्याचे कोणीतरी म्हटल्याचे ऐकले असे कोणीतरी म्हणाल्याचे कधीतरी ऐकले आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अजया गुरुवार, 02/20/2014 - 03:44 नवीन
मुवि, या वाक्यासाठी डॉक्टरांचा बाजीप्रभू चौकात सत्कार असा कट्टा आयोजीत कराच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/20/2014 - 03:54 नवीन
पण बाजीप्रभू चौकात सध्या चांगलेसे हॉटेल कुठलेच नसल्याने, २ ता.च्या "दिपक,कुवैत" ह्यांच्या बरोबर होणार्‍या कट्ट्याच्या वेळी योग्य ती काळजी घेण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया गुरुवार, 02/20/2014 - 03:54 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्यारे१ गुरुवार, 02/20/2014 - 08:52 नवीन
डॉ. खरे, तुम्ही मारलेला बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय. आता दुसरा आणून दिला नाहीत तर 'काही मुलं' आदळआपट करतील बर्का! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/20/2014 - 09:02 नवीन
अजिबात नाही..... सध्या पुणेकरांना जास्त वेळ मिळत नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 02/20/2014 - 09:11 नवीन
जाज्ज्वल्य अभिमानी पुणेकरांना वेळ नाही........??????????????????? का तथाकथित हुच्चभ्रू दुर्लक्ष करत आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/20/2014 - 13:40 नवीन
कारण सध्या ते कसला तरी कट्टा करावा, ह्याचे बेत आखत आहेत, असे माहीतगार स्त्रोताकडून समजते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ए
एस गुरुवार, 02/20/2014 - 18:39 नवीन
कालच डोंबिवली गूगल मॅप्स वर शोधून काढले. नाव ऐकले होते आधी बर्‍याचदा. बाकी असो वा नसो, पुणे हे मिपाचे मध्यवर्ती शहर नक्कीच आहे. पुण्यावर इतके धागे. आणि इतर शहरांच्या धाग्यांवरही पुण्याचीच चर्चा. आवरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
पैसा Fri, 02/21/2014 - 08:33 नवीन
डोंबिवलीला स्वतंत्र मुन्शिपालिटी/कॉर्पोरेशन पण नाय! आहे ते कल्याणला जोडीला घेऊन. हे म्हणजे स.पे. वाल्यांनी आम्हीच मध्यवर्ती म्हणण्यासारखं झालं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
य
यशोधरा Fri, 02/21/2014 - 10:36 नवीन
धागा डॉबोलीचा आणि उदो उदो सपेसकट पुण्याचा. आम्हीच मध्यवर्ती म्हणायची सपेवाल्यांना गरज पण पडायची नाही, पर्स्पर काम होऊन गेलेय की! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मुक्त विहारि Fri, 02/21/2014 - 17:26 नवीन
डोंबिवलीला मध्यवर्ती ठिकाण म्हणून मान्यता न द्यायला कित्ती जणं प्रयत्न करतात... तरी पण डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 02/21/2014 - 18:12 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 02/21/2014 - 18:43 नवीन
आमच्या डोंबिवलीच्या विरोधात , सगळे एक होतात. म्हणजेच ती उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ए
एस Sun, 02/23/2014 - 06:36 नवीन
डोंबिवलीचे मध्यवर्ती ठिकाण पुणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 02/23/2014 - 07:29 नवीन
आधीच पुण्यातले मध्यवर्ती ठिकाण नक्की कोणते, ते ठरत नाही... आणि त्यात आमच्या डोंबीवलीला पण सामील करायला निघाले आहेत.... असो, आमच्या वेळीची डोंबिवली नाही राहीली आता. मध्यवर्ती ठि़काण डोंबिवलीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 02/23/2014 - 15:23 नवीन
@आधीच पुण्यातले मध्यवर्ती ठिकाण नक्की कोणते, ते ठरत नाही...>>> शनिपार! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
श
शैलेन्द्र Mon, 02/17/2014 - 12:01 नवीन
"डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का?" का नाही?
  1. डोंबिवली हे डोंबिवलीचे मध्यवर्ती ठिकाण आहे.
    1. तिथे सगळ्या लोकल गाड्या थांबतात व रिकाम्या गाड्या भरुन पाठवल्या जातात
      1. तिथली (किंचित म्हातारी) लोकं गाडीत चढायला ठाकुर्लीला जातात
        1. कल्याण गाडी भरुन पाठवणे आणि भरून आणणे ही डोंबिवलीकरांनी घेतलेली जबाबदारी आहे
          1. डोंबिवलीकराचा प्रवास रेल्वेत सुरु होतो नी तिथेच संपतो
            1. डोंबिवलीत मध्यवर्ती ठिकाणी चार्चाकी घेवुन जाणारे चुXX समजले जातात
  • Log in or register to post comments
श
शिद Mon, 02/17/2014 - 17:24 नवीन
सौजन्यः म.टा. अन् डोंबिवलीकडे धावली ‘७ डब्यांची लोकल’
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 02/18/2014 - 09:48 नवीन
मुविंनी आम्हाला त्यांच्या पैल्या मंगळ कट्ट्यात नेले नाही त्याबद्दल त्यानी आयोजित केलेल्या कुठल्याही कट्ट्याला जायचे नाही असे ठरवलेय. ;) मग कट्टा डोम्बिवलीत करा नायतर स्पावड्याच्या ठाकुर्लीत करा. आम्हाला काय ;)
  • Log in or register to post comments
भ
भाते Wed, 02/19/2014 - 15:36 नवीन
आपण, म्हणजे तुम्ही आणि मी, डोंबिवलीत राहतो म्हणजे डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहेच! हम जहांसे खडे होते है… च्या धर्तीवर वाचावे. :) मग पुन्हा हा धागा का काढला? धाग्याचे शिर्षक 'डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहे' असे हवे होते. :)
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Wed, 02/19/2014 - 18:09 नवीन
.. 'डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण आहे' असे हवे...!!!
(डोम्बोलिकर) विनोद१८
  • Log in or register to post comments
उ
उपास गुरुवार, 02/20/2014 - 04:01 नवीन
सगळे गिरगावतले इमिग्रंटच हो.. जरा जास्त पैसेवाले हिंदू कॉलनी/ शिवाजी पार्क झालंच तर पार्ल्यात गेले, बेताची परिस्थिती असलेले मुलुंड/ ठाण्यात अगदी बोरिवलीत गेले.. आणि काहीच नाही ते विरार किंवा डोंबिवली.. लोकलच्या चकरा कुणाला चुकल्यात.. बोचरं असलं तरी सत्य आहेच! तस्मात, सगळीकडे गिरगावकरच मूळ बा़की सगळे त्यांचे उत्तरीय.. तस्मात (चलो गवालीय टँक) चालीवर, चलो गिरगाव.. ;)
  • Log in or register to post comments
ए
एम.जी. गुरुवार, 02/20/2014 - 06:56 नवीन
डोम्बिवलीमधेच दसर्‍याला, पाडव्याला मिरवणुकांमधे बायका नऊवारी नेसून, नाकात नथ घालून पायात रिबॉकचे बूट घालतात ना..?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/20/2014 - 06:59 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/20/2014 - 07:14 नवीन
हेही पादत्राणाचे डिझाईन रिबॉकने प्राचीन भारतीय चित्र/मुर्तीकलेवरून उचलले असावे? ;) ... अजंठामधल्या चित्रांतील उडणार्‍या यक्ष-गंधर्वकन्या मिनीस्कर्ट नेसलेल्या दिसतात, त्यांची नाही का पाश्च्यात्यांनी कॉपी केली? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.
स
सूड गुरुवार, 02/20/2014 - 09:45 नवीन
>>डोम्बिवलीमधेच दसर्‍याला, पाडव्याला मिरवणुकांमधे बायका नऊवारी नेसून, नाकात नथ घालून पायात रिबॉकचे बूट घालतात ना..? तसं असलं तर त्या बदलापूरच्या सुना असण्याची शक्यता जास्त आहे. ;) स्वगतः पळा आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.
अ
अजया गुरुवार, 02/20/2014 - 16:11 नवीन
अभ्यास वाढवा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 02/20/2014 - 16:37 नवीन
असो. आमच्याहून जुन्या सदस्यांना कदाचित कळलं असेल. *JOKINGLY*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
भ
भाते गुरुवार, 02/20/2014 - 11:28 नवीन
त्या मिरवणुकांमध्ये बघण्यासारखे इतर काहीच नसते असा तुमचा गैरसमज आहे का? तेवढे रिबॉकचे बूटच कसे तुमच्या लक्षात राहिले? :) ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा