Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

म्हणून नथुराम उजवा ठरतो.....

म
महेश_कुलकर्णी यांनी
गुरुवार, 02/20/2014 - 07:53  ·  लेख
लेख
गेले २-३ दिवस, २३ वर्षापासून रखडलेल्या राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या कारवाईवरून वेगवेगळया घडामोडी घडत आहेत. दया याचिकेची वेळीच दखल न घेतल्याने आपोआपच दोषींची फाशी रद्द होवून शिक्षेचे जन्ठेपेमध्ये रुपांतर झाले. इकडे लगेच तामिळनाडू सरकारने तमिळ अस्मिता दाखवत दोषींना सोडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानाची हत्या करून देखील फक्त भाषेची अस्मिता म्हणून त्या ‘दहशतवादा’चे समर्थन होते हे खरेच शोचनीय आहे. देशाला अग्रक्रमी(Nation First) ठेवून निर्णय घेणारा राजकीय पक्ष अथवा सरकारी धोरणे सध्या अभावाने पाहायला मिळतात. सगळीकडे फक्त मतपेटीचा विचार आणि त्यातच ह्या दुर्दैवी निर्णयाने अजून एक भर टाकली. गांधी घराण्यातील हत्येचा विषय निघाल्यावर आपसूकच इंदिरा गांधी आणि बापू यांच्या हत्येची आठवण झाली नाही तरच नवल. (आपण जरी विसरायाचा प्रयत्न केला तरी प्रसारमाध्यमे आणि खुद्द कॉंग्रेसचे उपाध्यक्ष श्री. राहुल गांधी ह्याची आठवण करून देत राहतील.) आज कोणतीही प्रसारमाध्यमे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना दहशतवादी संबोधण्यास धजावत नाही. परंतू बापुंचा मारेकरी(नथुराम) आता ‘पहिला दहशतवादी’ म्हणून संबोधला जातो. खरे तर वेगळ्या खलिस्तानसाठी प्रयत्न करणारे जर्नेलसिंग यांच्या हत्येचा सूड किंवा श्रीलंकेत होत असणाऱ्या तामिळींच्या अत्याचाराचा सूड म्हणून भारतातील पंतप्रधानाना जबाबदार धरणारे लोक जे भाषा आणि धर्म यांचा संकुचित विचार करत होते व भारतापासून वेगळे होण्याची मागणी करत होते ते खरे दहशतवादी होत. उलटपक्षी अखंड आणि धर्मनिरपेक्ष भारत (जिथे सर्व धर्मांना सारखी वागणूक असेल आणि कोणत्याही विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करणारी धोरणे नसतील.) याच्यासाठी कायम आग्रही राहणारा व यांच्याआड येणाऱ्या गोष्टींना बाजूला करण्यासाठी त्यावेळेस जे करता आले ते करणारा नथुराम मात्र दहशतवादी. ज्याला देशाचे नियम व कायदे मोडून काहीही करायचे नव्हते म्हणूनच स्व:ताहून शरण आला व हसत हसत फाशीला सामोरे गेला. कोणताही दया अर्ज न देता. वरील सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढेच वाटते की देशाची अखंडता डोळ्यासमोर ठेवून कायद्याने चुकीचे ठरवलेले पाऊल उचलूनदेखील त्यावर ठाम राहणारा नथुराम कायम या सगळ्यात उजवा ठरतो. टीप: इथे कोणाच्याही चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचा हेतू नसून तिन्ही गांधी जे कायमच देशाचा केंद्रबिंदू ठरले आहेत यांच्या हत्या वर मारेकरी यांचे शक्य तेवढे तटस्थपणे समीक्षण करण्याचा प्रयत्न आहे.

प्रतिक्रिया द्या
67319 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

न
नितिन थत्ते Tue, 02/25/2014 - 09:03 नवीन
जरूर लिहा. आम्ही वाचू तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
थ
थॉर माणूस गुरुवार, 02/20/2014 - 10:06 नवीन
गांधींचा खून करण्यात आला तेव्हा त्यांनी पंच्याहत्तरी पार केलेली होती. यातल्या किती घटनांपर्यंत ते तगले असते कुणास ठावूक. तसेही स्वातंत्र्य मिळणार म्हटल्यावर पदांची संगीतखुर्ची सुरू झालेली पाहील्यावरच ते उद्वीग्न झाले होते म्हणे, त्यामुळे जगले असतेच तर पुढच्या ४-५ वर्षात भारत आणि पाकिस्तानच्या परीस्थीतीकडे पाहून त्यांनी स्वतःच देह ठेवला असता बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
माहितगार गुरुवार, 02/20/2014 - 10:14 नवीन
तसेही स्वातंत्र्य मिळणार म्हटल्यावर पदांची संगीतखुर्ची सुरू झालेली पाहील्यावरच ते उद्वीग्न झाले होते म्हणे, त्यामुळे जगले असतेच तर पुढच्या ४-५ वर्षात भारत आणि पाकिस्तानच्या परीस्थीतीकडे पाहून त्यांनी स्वतःच देह ठेवला असता बहुतेक.
आपण फिरवलेल चाक आपल्या पाशीच येऊन थांबत ? गीता सांगणार्‍या कॄष्णाला यादवी पहावी लागली आणि गांधींना... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/20/2014 - 11:37 नवीन
मान्य आहे की कसाबला पाही पर्यंत गांधी खुप वृध्द झालेले अस्सते. आपण आपली कल्पना शक्ती का नाही लढवु शकत , गांधीजींचे आधीचे वर्तन पाहुन (आणि अंडर द अ‍ॅझम्शन की वर्तन खुप ड्रॅस्टीकली बदलत नाही ) आपण नक्कीच अंदाज बांधु शकतो ना की गांधी कसे वागले असते ते ... उदाहरणार्थ : मुसलमानांनी पाकिस्तान मागितला ...पहिल्यांदा नाही नाही म्हणाले पण सरते शेवटी गांधींनी पाकिस्तान दिला .... तसेच खलिस्तान्यांनी खलिस्तान मागितला असता तर गांधींनी तो दिला असता ... असे माझे मत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
महेश_कुलकर्णी गुरुवार, 02/20/2014 - 11:41 नवीन
खलिस्तान्यांनी खलिस्तान मागितला असता तर गांधींनी तो दिला असता ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ज
ज्ञानव Sat, 02/22/2014 - 05:30 नवीन
ह्या देहाबद्दल न बोलता आपण त्यांच्या विचार आणि निर्णयांबद्दल बोलतो आहोत. तेव्हा त्या विचारानुरूप ते वागले असते पण त्यांनी संपूर्ण आयुष्यात जे काही राजकीय निर्णय घेतले त्यापैकी कॉंग्रेसने किती निर्णय अमलात आणले आणि का ? आणि किती निर्णय सोडून दिले आणि का ? गांधीनी कॉंग्रेस चालवली का ? कि इतर नेतेही निर्णय घेत होते? थोडक्यात कॉंग्रेस आणि गांधी ह्यांची विचारसरणी एकाच प्रकारची होती का ? नक्की गांधी हे एक प्यादे होते की पटावरची एखादी कमी जास्त महत्वाची सोंगटी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
थ
थॉर माणूस गुरुवार, 02/20/2014 - 10:29 नवीन
एकवेळ वेगळा ठरतो म्हणू शकतो आपण. पण उजवा ठरण्याइतके वेगळे काहीच केलेले नाही त्याने. कदाचित दक्षिणेत राजीव गांधींच्या मारेकर्‍यांबद्दल ते लोक असेच काही म्हणत असतील. आपल्या भागातला माणूस म्हणजे थोडी का होईना सिंपथी आलीच. बाकी लिखाण ठीक आहे पण काही वाक्ये मात्र थोडी खटकली >>> ज्याला देशाचे नियम व कायदे मोडून काहीही करायचे नव्हते म्हणूनच स्व:ताहून शरण आला व हसत हसत फाशीला सामोरे गेला. कोणताही दया अर्ज न देता. खून केला हो त्याने... भर माणसांत. आता अजून काय केल्यावर आपण नियम व कायदा मोडला वगैरे म्हणायचं? आणि त्याने त्या काळात जवळपास संपूर्ण बहूमताने सत्तेत असलेल्या पक्षाच्या प्रमुख आधारसंभाचा खून केला होता, कुणीही कितीही आपटली असती तरी शरण येण्या शिवाय गत्यंतर नव्हते त्याला. कायद्याच्या आधारे जिवंत रहाण्याची एखादा टक्का शक्यता तरी होती. पळून जाऊन नंतर कुठे बाहेर लोकांच्या तावडीत सापडला असता तर त्यालाही चेचला असताच की लोकांनी. >>>आज कोणतीही प्रसारमाध्यमे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना दहशतवादी संबोधण्यास धजावत नाही. हे काहीसं गोंधळात टाकणारं आहे. म्हणजे नक्की काय करणं अपेक्षित आहे? कारण एलटीटीई असो किंवा खलिस्तानी दोन्हीना भारताने कधीच दहशतवादी संघटना जाहीर केल आहे. त्यांचे हस्तक असलेल्यांना परत वेगळं दहशतवादी म्हणायलाच हवंय का? ते आपोआप दहशतवादी ठरत नाहीत का? आता नथुरामला दहशतवादी म्हणत असतील तर (हे मला अजून ऐकायला मिळालेलं नाही. त्यांचा उदोउदो बराच ऐकलाय पण. नशिब जयंत्या साजर्‍या करत नाहीत अजून) ते कदाचित तो ज्या संघटनेचा होता ती संघटना दहशतवादी नाही म्हणून त्याच्या एकट्यावरच बोट उचलण्यासाठी म्हणत असतील.
  • Log in or register to post comments
म
महेश_कुलकर्णी गुरुवार, 02/20/2014 - 11:25 नवीन
थोर भाऊ, आपण प्रतिक्रिया देवून शंका उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद. जमेल तेवढे शंकानिरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. 'उजवा’ ठरतो हे कृतीपाठीमागील विचाराच्या निकषावर म्हटले आहे. देश तोडण्याच्या किंवा संकुचित भाषा अस्मितेच्या कारणासाठी त्याने ही कृती केली नव्हती. १)
"खून केला हो त्याने... भर माणसांत. आता अजून काय केल्यावर आपण नियम व कायदा मोडला वगैरे म्हणायचं?" व "कायद्याच्या आधारे जिवंत रहाण्याची एखादा टक्का शक्यता तरी होती."
एक शक्यता अशी सुद्धा होती की नथुरामची सुटका कदाचित भावनेच्या आधारावर आणि त्यांच्या कुटुंबियांनी अहिंसेचा युक्तिवाद करून झाली असती परंतु तसे नथुरामने होवून नाही दिले. खून केला म्हणजे नियम मोडला म्हणून त्यासाठी जो दंड आहे त्याला तो सामोरा गेला. २)
"कारण एलटीटीई असो किंवा खलिस्तानी दोन्हीना भारताने कधीच दहशतवादी संघटना जाहीर केल आहे. त्यांचे हस्तक असलेल्यांना परत वेगळं दहशतवादी म्हणायलाच हवंय का?
हो निश्चित. अफजल गुरु, कसाब यांच्या संघटना सुद्धा दहशतवादी संघटना म्हणूनच प्रसिद्ध आहेत की तरीदेखील पुन:उल्लेख करताना ‘दहशतवादी’ असे संबोधतो ना? ३)
आता नथुरामला दहशतवादी म्हणत असतील तर (हे मला अजून ऐकायला मिळालेलं नाही. त्यांचा उदोउदो बराच ऐकलाय पण. नशिब जयंत्या साजर्याल करत नाहीत अजून)
नुकत्याच एका वाहिनीवर वादविवाद कार्यक्रमाचा सूत्रसंचालक वारंवार म्हणताना मी ऐकले/पहिले आहे. अति स्पष्टीकरण हे ह्या चर्चेला वेगळे वळण देवू शकेल व मूळ विषयापासून दूर नेईल त्यामुळे तूर्तास एवढे पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
थ
थॉर माणूस गुरुवार, 02/20/2014 - 12:28 नवीन
>>>एक शक्यता अशी सुद्धा होती की नथुरामची सुटका कदाचित भावनेच्या आधारावर आणि त्यांच्या कुटुंबियांनी अहिंसेचा युक्तिवाद करून झाली असती परंतु तसे नथुरामने होवून नाही दिले. अशक्य. कारण वर दिले आहे. नथुरामला कोणत्याही परीस्थीती जगू देण्यात आले नसते. लक्षात घ्या, त्याने अशा पक्षाशी पंगा घेतला होता ज्याचा समाजावर आणि राज्यावर जबरदस्त प्रभाव होता. शासकीय कार्यवाहीमधून सुटला असता तरी "भडकलेल्या जमावाच्या मारहाणीचा" बळी म्हणून खपवला असता. आपण केवळ "आयडीअल सिचुएशन्स" पहातो त्यामुळे या गोष्टी लक्षातच घेत नाही. नथुराम जिवंत रहाणे काँग्रेसींसाठी कधीच फायद्याचे ठरले नसते. इतर मुद्द्यांच्या बाबतीत... कसाब किंवा अफजल गुरू विषयी बोलतानाही आजकाल त्यांना वेगळे "दहशतवादी" लेबल लावावे लागत नाही असेच दिसते (implied आहे ते). ते दहशतवादी होते, हे ही दहशतवादीच होते असे माझे स्पष्ट मत आहे. देशाविरूद्ध कारवाया करणारी कुठलीही व्यक्ती दहशतवादीच असते. आणि ती जर दहशतवादी संघटनेतली असेल तर तीला वेगळे दहशतवादी सिद्ध करायची किंवा म्हणायची गरज नाही. ते उगाच पिवळा पितांबर म्हटल्यासारखेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश_कुलकर्णी
म
महेश_कुलकर्णी गुरुवार, 02/20/2014 - 13:10 नवीन
५५ कोटींचे बळी, गांधी हत्या व मी ही पुस्तके जमेल तेव्हा एकदा कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता वाचावीत. बाकी जर-तर वर जास्त बोलण्यात तसा काही अर्थ नाही...कारण आपण दोघेही मुद्द्यावर ठाम राहणार आणि त्यातून सिद्ध काहीच करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
थ
थॉर माणूस गुरुवार, 02/20/2014 - 13:26 नवीन
'गांधीहत्या आणि मी' वाचलेलं आहे. म्हणूनच तर वरती ३र्‍या प्रयत्ना आधीचे लिखाण वाचायचे आहे असं म्हटलंय. ५५ कोटींचे बळी वाचलेलं नाही. पण ५५ कोटींच्या सुरस कथा इतक्या वेगवेगळ्या आहेत की इतिहास कुठला आणि कादंबरी कुठली हा प्रश्न पडावा. बाकी, चर्चेचा मुद्दा वेगळा आहे... माझ्या मते राष्ट्रीय नेत्यांचा खून करणारे नथुरामसहीत सगळे खुनी आणि दहशतवादीच आहेत, सगळ्यांना समान मापे आणि समान शिक्षाच हवी. आणि त्यावर राजकारण व्हायला नको. आताच्या कशातही राजकारण शोधणार्‍या जगात हे शेवटचे दोन जवळपास अशक्य आहेत हे मान्य करत आमची रजा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश_कुलकर्णी
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/20/2014 - 13:37 नवीन
बाकी, चर्चेचा मुद्दा वेगळा आहे... माझ्या मते राष्ट्रीय नेत्यांचा खून करणारे नथुरामसहीत सगळे खुनी आणि दहशतवादीच आहेत, सगळ्यांना समान मापे आणि समान शिक्षाच हवी.
मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे ह्यांच्या विषयी आपली काय मते आहेत हे जाणुन घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
थ
थॉर माणूस Fri, 02/21/2014 - 08:01 नवीन
या दोघांनी कुठल्या राष्ट्रीय नेत्यांचे खून केले होते? यांच्या मृत्यूच्या आणि भारत स्वतंत्र झाला त्या दिनाच्या मधे बराच फरक असावा नाही? तुम्हीच ठळक केलेली माझी वाक्ये मला जे म्हणयाचं होतं ते सांगतायत. बाकी, तुम्ही गाडी दुसर्‍या ट्रॅकवर टाकत आहात. तेव्हा तिकडच्या रस्त्याला जायला वेगळा धागा काढा, उत्तर द्यावे वाटले तर लोक येतीलच. उगाच इथे विषयांतर नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2014 - 09:01 नवीन
ट्रॅक बदलत नाहीये . ह्या लोकांनी ज्यांचे खुन केले ते सरकारी ऑफीसर्स होते , जे त्यांच्या नेत्यांचे प्रतिनिधित्ब करीत होते . मला म्हणायचा मुद्दा इतकाच आहे की तत्कालीन ब्रिटीश सरकारने ह्यांना खुनी म्हणुन फासावर लटकवले तसेच भारत सरकारने माथेफिरु नथु ला लटकवले ... .पण आज आपण मदनलाल , किंव्वा कान्हेरेंना खुनी मानत नाही ... कारण काळ बदलला .... तसेच पुढे मागे काळ बदलेल आणि लोक नथुलाही खुनी मानायचे बंद करतील शाश्वत सत्य असं काही नसतं ...Its all matter of perceptions !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
आ
आत्मशून्य Fri, 02/21/2014 - 09:18 नवीन
तसेच पुढे मागे काळ बदलेल आणि लोक नथुलाही खुनी मानायचे बंद करतील
शक्य आहे! जगात काहीही घड़ने शक्य आहे. जसे सध्या मी पांडवाना हीरो मानने बंद केलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ज
ज्ञानव Fri, 02/21/2014 - 10:13 नवीन
मी पण रावणाला हिरो म्हणेन कारण बहिणीसाठी त्याने जीव गमावला आणि सीतेला पळवूनसुद्धा साधा विनयभंग हि नाही केला. कालीयुग्ग का काय ते हेच का ? आणि सत्य, तर प्रत्येकाचे वेगळे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Fri, 02/21/2014 - 10:31 नवीन
......!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव
ऋ
ऋषिकेश Fri, 02/21/2014 - 09:27 नवीन
तसेच पुढे मागे काळ बदलेल आणि लोक नथुलाही खुनी मानायचे बंद करतील
हे असं काही व्हायचे दिवस भारतात माझ्या जीतेपणी येऊ नयेत इतकीच मनोकामना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
थ
थॉर माणूस Fri, 02/21/2014 - 10:08 नवीन
सध्या ह्याला राजवट उलथून टाकण्याच्या प्रयत्नांमधले काही प्रयत्न असे म्हणूयात. जर राजवट बदलली नसती तर आजही सरकार दरबारी हे खूनीच ठरले असते. पण राजवट बदलली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, अर्थातच मग आपल्याला इतिहास लिहायची परवानगीसुद्धा मिळाली. त्यानुसार त्यांची पावले जुलमी सत्तेविरूद्ध क्रांतीकारक मानली गेली. स्वतंत्र भारतात जन्मलेला आणि आजही भारताशी एकनिष्ठ असा नागरीक म्हणून मी जुन्या राजवटीविरुद्ध आणि नव्या राजवटीसाठी लढलेल्यांचा अर्थात आदरच करणार. पण स्वतंत्र भारतात घडलेल्या घटनांचा विचार करताना तोच दृष्टीकोन ठेवणे चुकीचे आहे. त्यानंतर भारतात कुठलेही स्वतंत्रता आंदोलन वगैरे यशस्वी झालेले नाही. त्यामुळे सध्या तरी या इतिहासात काही बदल घडेल अशी अपेक्षा नाही. भविष्यात कुठला नथुराम समर्थक गट किंवा तत्सम कुणी भारतात लोकशाही उलथून नवे राज्य वगैरे आणले आणि नथुरामला नायक बनवले असे काही घडेल? माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सुहासदवन Sat, 02/22/2014 - 09:04 नवीन
पिवळा पितांबर कस्तुरी लल्लाटी || देव सुरवर नित्य येती भेटी ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
म
मराठीच गुरुवार, 02/20/2014 - 13:04 नवीन
चारच माणसं चर्चा करतायत, काय हे मिपाचं झालं. :-P
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/20/2014 - 13:30 नवीन
गांधीजी व नथुरामचा विषय असूनही अजून शंभरी न भरल्याची एक मिपाकर म्हणून शरम वाटली.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन गुरुवार, 02/20/2014 - 13:51 नवीन
कंटाळा आला असेल बहुदा त्याच त्याच गोष्टीवर पुन्हापुन्हा लिहायचा. सध्या केजरीवालवर धागा काढला की कमितकमी सेंच्युरी नक्कीच.आणखी काही महिन्यांनी केजरीवालवरच्या धाग्यांवरही प्रतिसाद येणे कमी होईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/20/2014 - 14:10 नवीन
अगदी खरंय. बायदवे हाफ सेञ्च्युरी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
व
वेताळ गुरुवार, 02/20/2014 - 14:01 नवीन
कावला असेल. नथुराम जिवंत असतातर त्याने स्वःताला जाहिरपणे फासावर चढवले असते.
  • Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या गुरुवार, 02/20/2014 - 18:12 नवीन
खालिल लिन्क बघा http://www.youtube.com/watch?v=B-N3vd0Soq4 http://www.youtube.com/watch?v=gph1GtoX8Yw
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/21/2014 - 10:36 नवीन
चैतन्य ईन्या आपण दिलेल्या तूनळ्या पाहिल्या नाहीत पण त्या "तारेख फता" ची फटाफट मुलाखत टाईमस ऑफ इंडीयावर वाचण्याचा योग आला. त्यांच्या काशिर आणि बलुचिस्तान भूमिकेत सुधारणेस वाव आहे पण सर्वात महत्वाचे आमच्या १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश या धाग्याला उत्तम होप आहे तर; चैतन्य ईन्या धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
व
विटेकर Fri, 02/21/2014 - 10:06 नवीन
गांधी हत्येनंतर महराष्ट्रात ब्राहमण समाजावर जे अत्याचार झाले त्याच्यामुळे ब्राहम्न समाज अंतर्बाह्य सुधारला. पाच "त"कारापासून ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त ) त्याची सुटका झाली ती कायमचीच ! एका पिढीचे झाले नुकसान पण निदान ब्राह्मणांना कष्टाची किंमत तरी कळली !हा नथुरामने करुन दिलेला फायदा आता ६० वर्षांनी दृगोचर होतो आहे. कालौघात घटनांचे संदर्भ इतके बदलतात !
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 02/21/2014 - 10:27 नवीन
सहमत आहे. बाकी तगाई म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विटेकर Fri, 02/21/2014 - 10:35 नवीन
भाषाप्रभू , तुम्ही हा प्रश्न विचारलात ? तट्टू- घोडा , कुलकर्णीपणाच्या उचापती करायला तांबूल - विडा घ्या हो नारायणा तस्त - तांबूला नंतर तस्त येणारच , उठून थुंकायची तसदी कोण घेणार ? तक्क्या -तांबूल / तस्त नंतर तक्क्या अपरिहार्य ! दुपारचे जेवण चेपले की झाले आडवे , संध्याकाळ पत्तुर चिंता नाय ! तगाई- सदासर्वादा कर्जात , तगाई - कर्ज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 02/21/2014 - 10:41 नवीन
धन्यवाद विटेकरजी :) बाकीचं माहिती होतं, पण तगाईचा नेमका अर्थ ठौक नव्हता. धन्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2014 - 10:36 नवीन
गांधी हत्येनंतर महराष्ट्रात ब्राहमण समाजावर जे अत्याचार झाले त्याच्यामुळे ब्राहम्न समाज अंतर्बाह्य सुधारला.
१००% अनुमोदन ! आमचे ( आजोबांचे) गावाकड्चे घर जळाले पुढे उरली सुरली जमीनही गेली कुळकायद्यात ... मग पोटापाण्याच्या निमित्ताने आजोबा सातार्‍याला आले ... आम्ही दिल्ली मुंबै ला आलो .... पुढे मागे पोरं परदेशात स्थायिक होतील ... जळितकांड झालं म्हणुन बाहेर पडलो ( पडतोय ) ह्या चक्रातुन .... नाहीतर गावाकडं कुठंतरी पत्रिका पंचांगात ग्रहतार्‍यांशी खेळत राहिलो असतो देव जाणे ... खरंच कधीकधी बरंच वाटतं ,झालं हे चांगलंच झालं जो हुवा अच्छा हुवा , जो होरहा है अच्छा हो रहा है और जो होगा वह भी अच्छाही होगा :) बाकी तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त >>> ह्यातील तट्टू तगाई तस्त म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ब
बॅटमॅन Fri, 02/21/2014 - 10:42 नवीन
रामदासकाकांच्या एका लेखात एक अप्रतिम वाक्य आहे. "जे कूळकायद्यानं गमावलं ते सिलिकॉन व्हॅलीनं कमावलं". यातच याचे सार सामावले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
च
चैतन्य ईन्या Fri, 02/21/2014 - 11:13 नवीन
होय पण ते पण लोकांच्या डोळ्यावर येतय. कष्ट करून पुढे गेलेल पण पाहवत नाही आणि स्वतःही काही करवत नाही. मग उठसुठ नथुरामला शिव्या द्यायच्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 02/21/2014 - 11:14 नवीन
लोकांना घाला १२ गडगड्याच्या व्हिरीत. पण बाकी नथुराम वाय झेड होता असे माझे म्हणणे आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
च
चैतन्य ईन्या Fri, 02/21/2014 - 11:29 नवीन
त्यात काही शंकाच नाही हो. पण दुख ह्याचे आहे की अजूनही काही जनता नाथूचा उदो उदो करते आणि तितकेच लोक त्याच्या नथीमागून बमान्नाना शिव्या घालतात. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 02/21/2014 - 11:32 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
व
विटेकर Fri, 02/21/2014 - 11:32 नवीन
खरंच कधीकधी बरंच वाटतं ,झालं हे चांगलंच झालं ब्राह्मण समाजाचे खरोखरच चांगले झाले यात वाद नाही ! एकतर ९८ % लोकांनी गावे सोडली , उरलेल्या २ % लोकांचा एक पाय गावाबाहेर पडला आहेच / या पिढीत पडेलच ! पण बहुजन समाजाचे काय ? ज्या ब्राह्मण समाजाकडे त्यांचे उत्तरदायित्व होते, ते तर गावाबाहेर पडले आणि त्यांनी स्वतः चे भले करुन घेतले! बाकीच्यांचे काय ? जे माय- बाप सरकार त्यांचे भले करणार अशी हाकाटी होती , ते तर पांढर्‍या बगळ्यांनी ओरबडून खाल्ले , आरक्षणाचा फायदा किती टक्क्यापर्यंत पोहोचला ?राज्यकर्त्या जमातीवर आरक्षणाचे कटोरे घेण्याची पाळी का आली ? एका तात्कालिक उन्मादामुळे पिढ्यांपिढ्या संभाळलेली सामाजिक रचना कोलमडून पडली आणि नव्या व्यवस्थेत " बळी तो कान पिळी " हा जंगल कायदा अस्तित्वात आला ! ब्राह्मण समाजाने आपल्या कोअर मध्ये काम करुन आपले काम साधून घेतले, आता बाकीच्यांचा वाली कोण ? ( आमचे एक कराडचे काका ( वय ८५) म्हणाले , तेव्हा "आमची" घरे जाळलीत आता "तुम्हाला" आत्महत्या कराव्या लागतात ..स्वाभाविकच आहे म्हणा , आम्हाला गावाबाहेर काढले , गावातील कीर्तने , प्रवचने बंद झाली, पाठीवर हात ठेऊन समजाऊन सांगणार कोण ? ...) हा " आमचे - तुमचे " भेद किती वाईट आहे! आणि त्या तात्कालिक उन्मादाला ब्राह्मण समाज जबाबदार नव्हता की काय ? त्यांच्यावरील पिढ्यांपिढ्याचा राग एका घट्नेवाटे बाहेर पडला (वावट्ळ - व्यंकटेश माडगुळकर) तेव्हा , जे झाले ते व्यापक समाज हिताच्या दृष्टीने फारसे चांगले झाले असेही म्हणवत नाही ! गांधी हत्येचे असेही दूरगामी परिणाम आहेत, जे कुळ कायद्याने अधिक तीव्र केले ! ( बट्ट्मन - आपली यावर एकदा चर्चा झाली आहे , आठवते का ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन Fri, 02/21/2014 - 11:35 नवीन
येस, आठवते आहे. बाकी या घटनेस बरेच पदर आहेत खरे. ते यथावकाश पुढे कधीतरी समजेल तसे मांडीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
च
चैतन्य ईन्या Fri, 02/21/2014 - 11:42 नवीन
कालच चानेल ४ का बीबीसी २ वर सावूथ आफ्रिकेत सध्या गोर्यांवर काय वेळ आली आहे आणि ते आता झोपडपट्टी मध्ये जावून राहतात ह्याचे चित्रण होते. बाकी हे चित्रण एका काळ्या माणसाने केले होते. एका बाजूला काही शतके झालेला अन्याय त्यामुळे काळ्यांच्या मनात साचलेला राग आणि दुसऱ्या बाजूला सध्याच्या गोऱ्या लहान मुलांचे भवितव्य ह्यामुळे तो काळा फारच दुखी झालेला होता. ह्याला काहीच सोलूशन आहे असे मला वाटले नाही. हां झगडा संपणे कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
श
श्रीगुरुजी Fri, 02/21/2014 - 18:45 नवीन
>>> गांधी हत्येनंतर महराष्ट्रात ब्राहमण समाजावर जे अत्याचार झाले त्याच्यामुळे ब्राहम्न समाज अंतर्बाह्य सुधारला. पाच "त"कारापासून ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त ) त्याची सुटका झाली ती कायमचीच ! एका पिढीचे झाले नुकसान पण निदान ब्राह्मणांना कष्टाची किंमत तरी कळली !हा नथुरामने करुन दिलेला फायदा आता ६० वर्षांनी दृगोचर होतो आहे. + १ महाराष्ट्रातील ब्राह्मणांचे आजवर एकूण ३ वेळा स्थित्यंतर झाले. औरंगजेबाच्या मृत्युनंतर बाळाजी विश्वनाथांना पेशवेपदाची सूत्रे मिळाल्यावर जवळपास १०० वर्षे ब्राह्मण राज्यकर्ते होते. त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक ब्राह्मण सरदार व मुत्सद्दी होते. पण १७०७ नंतर ते प्रथमच राज्यकर्ते झाले. त्यानंतर १९४८ नंतर गांधीवधानंतर झालेली जाळपोळ हा त्याआधी काही दशके ब्राह्मणविरोधी वातावरण निर्माण केले गेले होते त्याचाच उद्रेक होता. पण ही ब्राह्मणांसाठी इष्टापत्ती ठरली. जाळपोळीपाठोपाठ राखीव जागा, राजकारणातून हद्दपारी, कूळकायदा इ. गोष्टींमुळे ब्राह्मण शहरांकडे वळून त्यांची उत्तरोत्तर प्रगतीच झाली. त्यानंतर १९९०-९१ मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे राखीव जागांचे प्रमाण २२.५ % वरून ४९.५ % पर्यंत वाढल्यामुळे शिक्षण व सरकारी नोकरी हे क्षेत्र ब्राह्मणांसाठी अजूनच आकुंचित झाले. पण ही पण इष्टापत्तीच ठरली. यानंतरच्या काळात ब्राह्मण मोठ्या प्रमाणात संगणक, आर्थिक क्षेत्र, प्रसारमाध्यमे, मालिका-चित्रपट इ. खाजगी क्षेत्रात गेले. परदेशी जाऊन स्थायिक होण्याचेही प्रमाण वाढले. आता पुन्हा एकदा स्थित्यंतराची वेळ आलेली आहे. २०१४ मध्येच महाराष्ट्र सरकार नवीन विधेयक आणून उर्वरीत खुल्या ५० टक्के जागांपैकी किमान २०-२५ टक्के जागा मराठा जातीसाठी राखीव ठेवण्याची शक्यता आहे. तसे झाले तर शिक्षण व सरकारी नोकरी हे ब्राह्मणांसाठी अजून अवघड होतील. पण त्याही परिस्थितीत ब्राह्मण मार्ग काढतील अशी माझी खात्री आहे. परदेशी स्थलांतर करणे किंवा इथेच राहून नोकरीच्या ऐवजी व्यवसायात गुंतणे हे पर्याय ब्राह्मण स्वीकारतील असे वाटते. अजून अंदाजे २०-२५ वर्षांनी म्हणजे २०३५ नंतरच ब्राह्मणांनी या आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर केले आहे का ते समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
म
माहितगार Fri, 02/21/2014 - 11:27 नवीन
सामान्य भिक्षूकी करून दारिद्र्यरेषे खाली जीवन कंठणार्‍यांना जमीनदाराच्या पंक्तीला बसण्याचा मान आणि तांबूल पर्याय नसलेला विराम या पलिकडे काही मिळत नसावे. तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त हि स्वातंत्र्यपुर्व सर्वच जमिनदार आणि महसूली यंत्रणेचे चित्र होते. बर्‍याच मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण होते जमिनदारी आणी महसुली यंत्रणेतील सर्वच ब्राह्मण होते हा निष्कर्ष कदाचित तपासून पहावा लागेल. कोणतीही वडलोपार्जीत समृद्धी सात पिढ्यांच्या पुढे सहसा जात नाही ती कधीतरी संपावयाची होती ती संपली आणि हा समाज स्वतःच्या पायावर उभाटाकण्यास धडपडू लागला हे बरे झाले हे निश्चित. शासकीय नौकरीच्या निमीत्ताने/आमिषाने महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज शेती अवलंबीत्व ब्रिटीशांच्या १८१८ च्या आगमना नंतर हळूवार सोडावयास लागलाच होता यात दुष्काळा सारखी कारणंही समाविष्ट होती. १८४८ मध्ये महात्मा फुलेंनी बहुजन शिक्षणाची आणि ब्राह्मणेतर चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. आणि ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त ) या गोष्टी किमान ब्रिटीश शासित प्रदेशात आणि किमान ब्राह्मण जमीन मालकांकरता चॅलेंज आणि खिळखिळ्या होऊ लागल्या. निजाम शासित प्रदेशात अधिक वेळ लागला असावा पण त्यांच्या करता तो बदल ब्रिटीश शासित प्रदेशा पेक्षा अधिक शॉकींग असा असावा. महसूल गोळा करण्याचे अधिकार गेले प्रिव्ही पर्स बंद झाल्या कमाल जमीन धारणा कायदे आणि कुळ कायदे आले. त्यामुळे तगाईची आणि तट्टूचे (कारण स्वातंत्र्यापुर्वी ग्रामीण भागात फारसे रस्ते नसत त्यामुळे बहुतांश सारा वसूली तगाईची कामे तट्टूवरून केली जात.) काम संपले. उरलेला पैसा संपे पर्यंत नौकरीची सवय नसलेल्या पिढीत तक्क्या , तांबूल, चालू होते तस्तही हरवले. ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव; महसूल गोळा करण्याचे अधिकार जाणे प्रिव्ही पर्स बंद होणे; कमाल जमीन धारणा कायदे आणि कुळ कायदे गांधी हत्या झाली नसती तरीही झालेच असते. पाच "त"कारापासून ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त ) स्वांतत्र्योत्तर काळात सुटका झाली आणि हा सर्व इतिहास मान्य केलाकी गांधी हत्या झाली नसती तरीही हे सर्व घडलेच असते किंवा कसे म्हणुन विटेकरांनी मांडलेला कार्यकारण संबंध पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे का असे वाटते. महात्मा फुल्यांनी १८४८ मध्ये
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/21/2014 - 11:30 नवीन
१८४८ ते १९४८ या दोनवर्षातील चक्क १०० वर्षांचे अंतरही लक्षात घेतले पाहिजे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
क
काळा पहाड Fri, 02/21/2014 - 13:08 नवीन
म्हणून नथुराम उजवा ठरतो.....
अजिबातच नाही. काँग्रेस ने पाकिस्तान ला ५५ कोटी दिले काय किंवा नाही काय फरक पडत होता? बहुजन समाज होता ना द्यायला? काय गरज होती समाजोद्धाराची? मरू द्यायचं ना या अडाणचोटांना!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 02/21/2014 - 13:50 नवीन
राजीव गांधींच्या मारेकर्‍यांनी सुद्धा वैयक्तीक कारणांसाठी हत्या केली नाही .. तमिळ लोकांच्या दृष्टीकोनातून ते हीरो आहेत.. नथुराम किंवा मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे यांच्या पंक्तीत त्यांना बसवायचे का ?? मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे यांनी केलेल्या हत्या भारतीयत्वाच्या दृष्टीकोनातून योग्य असतील , तर राजीव गांधींची हत्या योग्य ठरते ??
  • Log in or register to post comments
म
महेश_कुलकर्णी Fri, 02/21/2014 - 15:58 नवीन
वरील लेखात कुठे वैयक्तिक कारण असा उल्लेख आला आहे का? फरक हा आहे की राजीव गांधीचा खून हा संकुचित भाषावादाच्या अस्मितेतून झाला आहे तर नथुरामने अखंड भारत राहण्यासाठी (हैदराबाद वेगळे होवू नये यासाठी) बापूंना मारले. कृपया संभ्रमात पडू नये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Fri, 02/21/2014 - 16:58 नवीन
हैदराबाद मुक्तिसंग्राम ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश_कुलकर्णी
व
विकास Fri, 02/21/2014 - 16:53 नवीन
नथुराम किंवा मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे यांच्या पंक्तीत त्यांना बसवायचे का ?? नथुरामला तुम्ही मदनलाल धिंग्रा आणि अनंत कान्हेरेंच्या पंक्तीत बसवत आहात का? ते आक्षेपार्ह आहे. एकाने स्वतंत्र राष्ट्रात (राष्ट्रपिता म्हणून देखील नाही अगदी साधे) एका नि:शस्त्र व्यक्तीचा खून केला. ती त्याच्या दृष्टीने राजकीय हत्या असेलही पण अक्षम्यच आहे. तर दुसरीकडे, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे यांनी वायली आणि जॅक्सनचे "वध" केले कारण ते परकीय सत्तेचे प्रतिक होते. आणि त्यांना गुन्हेगार या अर्थाने खुनी म्हणायचे असले तर ब्रिटीशांच्या संपूर्ण खानदानाला आणि तत्कालीन ब्रिटीश राज्यकर्त्यांना गुन्हेगार आणि खुनीच म्हणावे लागेल. कारण त्यांनी तेच तर केले. त्याला उत्तर म्हणून जर कोणी त्या वेळेस योग्य वाटले म्हणून हत्यार उचलले असले तर त्यात गैर काहीच नाही. साधे लोकलट्रेन मधे गर्दीत कुणाचा घुसताना पाय पायावर पडला तर पब्लीक खेकसतं, इथे तर देशाला पारतंत्र्य आले होते आणि जनतेचे हाल देखील केले जात होते. आणि पारतंत्र्याच्या मुकाबल्यासाठी शस्त्र घेणे म्हणजे दहशतवाद असेल तर तसे काय जॉर्ज वॉशिंग्टनपण दहशतवादी ठरतील. एखाद्या अमेरीकन समोर असे म्हणून बघा काय मत होते ते... मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे यांनी केलेल्या हत्या भारतीयत्वाच्या दृष्टीकोनातून योग्य असतील, तर राजीव गांधींची हत्या योग्य ठरते ?? प्रामाणिकपणे ह्या प्रश्नाला माझ्या लेखी सोपे उत्तर नाही... तरी देखील एका वाक्यात - राजीव गांधींची हत्या अयोग्यच ठरते. आता किंचित स्पष्टीकरणः श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर तिथल्या स्थानिक तमिळ जनतेस कायम सापत्नभावाची वागणूक मिळालेली आहे. ती उत्तरोत्तर अधिकच अन्यायकारक होत गेली. त्याची परीणिती लिट्टे तयार होण्यात आणि प्रभाकरन सारखा तिथल्या तमिळांना सुरवातीस हिरो वाटेल असा नायक तयार होण्यात झाली. पण ह्या प्रभाकरनमुळेच एका अर्थाने कुठलीही तडजोड न झाल्याने नागरी युद्ध सुरू झाले. प्रभाकरन हा केवळ नेता न रहाता गुंड झाला ज्याचे दुष्परीणाम असंख्य तामिळींना भोगावे लागले आहेत (ज्यातील काही मी जवळून पाहीले आहेत). पुढे राजीव गांधींनी श्रीलंका सरकारच्या मदतीस शांतीसेना पाठवायची आणि भारतासाठी व्हिएतनाम तयार केला. सैनिकांचे हाल झाले आणि श्रीलंकेतील तामिळ जनतेचे देखील हाल अधिक झाले (ऑपरेशन पवन). त्या आधी राजीव-प्रभाकरन भेट झाली होती, त्यांच्यात करार झाला होत, वगैरे बरेच काही आहे, म्हणले जाते पण त्यातले खरे किती ते माहीत नाही. पण त्याचा सगळ्यास राजीव गांधी कारण आहेत असे लिट्टेला वाटले आणि मला वाटते पहीलाच ह्युमन बाँब तयार केला गेला. पण त्याचा सगळ्याचा परीणाम हा भारत श्रीलंकन तमिळींच्या विरोधात जाण्यात झाला. तामिळनाडूत मदत मिळाली असेल कदाचीत पण देशाकडून मिळणारी रसद थांबली. नंतरच्या काळात (९१ सालानंतर) जे काही संगणकक्षेत्रामुळे झपाट्याने बदल झाले त्यात तामिळनाडूचे स्वतःच्या भाषा - संस्कृतीबद्दलचा अतिरेकी अभिमान राहीला असेल कदाचीत पण आपण वेगळे आहोत आणि स्वतंत्र तमिळीस्तान वगैरेची कल्पना लोप पावत गेली. शेवटी त्या प्रभाकरनला स्वतःच्या मुलाला मुद्दामून डोळ्यासमोर मारलेले बघून मरावे लागले. पण ते त्याच्या कर्माचे फळ होते, झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/24/2014 - 17:31 नवीन
वर आधीच मुद्दा मांडला आहे , अनंत कान्हेरे , मदनलाल धिंग्रा हे तत्कालीन परीस्थितीत खुनी होते मग पुढे भारत ताब्यात आल्यावर त्यांना आपण "धेशप्रेमी कांतिकारक" घोषित केले ....पुढे मागे ... नथुराम चे ही तसे होवु शकेल ... सगळा काळाचा महीमा आहे ... कालोsह्यं निरवधीर्विपुला च पृथ्वी ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
आ
आत्मशून्य Fri, 02/21/2014 - 16:54 नवीन
दश्कांचा लढा महासत्तेविरुध्द अहिंसेने यसस्वी दिला अख्खा देश ज्यातुन एकसंध बनवला असे तत्वद्न्यानजन्माला घालून यशस्वी जोपासले आशा जागतिक पातळिवरिल नेत्याने दोन दिवसात म्यान केले असते तर तर खरी गंमत आली असती नाही ? एखाद्याच्या प्रभावाखाली गेले, अन्ना हजारे अथवा केजरीवाल झालाय, अथवा अगदीच गेला बाजार अर्ध्या हळकुंडाच्या पिव्ळ्या वाकड्या नि हमखास बायपोलार निदान तर केले च असते ;)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा