Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Sun, 03/02/2014 - 07:16  ·  लेख
लेख
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर लोकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. फलज्योतिषावर आपले मत काय? हे अजमावण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे.कारण तो चाचणीशी संबंधीत नाही. तो स्वतंत्र विषय आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी हा धागा नाही. . या पुर्वी २००८ मधे प्रो.जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या मतिमंद व हुशार मुलांच्या बाबतची फलज्योतिषाची चाचणीचा अहवाल खालील दुव्यावर उपलब्ध आहेत http://faljyotishachikitsa.blogspot.in/2008/10/blog-post_09.html

प्रतिक्रिया द्या
23064 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

आ
आत्मशून्य Sun, 03/02/2014 - 07:39 नवीन
.
  • Log in or register to post comments
आ
आबा Sun, 03/02/2014 - 16:22 नवीन
वेळ घालवू नये, असे मत आहे... "जन्माच्या वेळी असलेली ग्रहांची विशिष्ठ स्थिती भविष्य ठरवते" ही भंपक कल्पना टेस्ट करून घेण्याएवढा पुरावा प्राथमिक चाचणीत सुद्धा मिळाला नाही... तेंव्हा इलॅबोरेट चाचणी तयार करण्याची गरजही नाही
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sun, 03/02/2014 - 17:00 नवीन
फोरकास्टिंग साठी वापरावे : एखाद्या घटनाक्रमाच्या पुढील घटना जेव्हा 'प्रेडिक्टेबल' असतात तेव्हा त्या शक्यतांची टक्केवारी बघावी.. उदा : एखादी गुंतवणूक लाभदायी ठरेल कि नही १. ९० % लाभदायी ठरेल कारण ....कारण ...अमुक ग्रहमान अनुकूल ...... २. ३०% ३ महिन्यांनी धोका वाढेल ... कारण..अमुक ग्रहमान प्रतिकूल.. आणि अजून काही... किंवा क्ष गुंतवणूक कि य गुंतवणूक करावी आणि त्याची कारणे .. वरील शक्यता जेव्हा एखादा अर्थतज्ञ नेमका असेच सांगेल तर त्याची 'कारणे' वेगळी असतील आणि मग ते रिझल्ट्स पडताळून बघता येतील... पण ज्योतिषी आणि अर्थतज्ञ ह्यांची भाकिते जुळत नसतील तर दोघांचाही कस लागेल आणि रिझल्ट्स पडताळून बघतांना कुणाचे कुठे चुकले हे बघून त्यात दुरुस्ती करता येईल...तसेच पुढचा डेटा पोइट निर्माण करतांना अजून अचूकता अंत येईल... हे असेच ...वेगवेगळ्या बाबतीत बघता येईल..जसे कि आरोग्य विषयक / नौकरी विषयक / आयुर्हीत साहेब म्हणतात त्याप्रमाणे कर्मचारीनिवड विषयक ... शेवटी जर हे अनुमान आहे तर हे असेच होईल नं ? पटतंय का?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 03/02/2014 - 17:31 नवीन
फलज्योतीष लोक का वापरतात या प्रश्नाचं उत्तर शोधल्यास त्याची चाचणी काय असावी याबाबत काही मदत होऊ शकेल. म्हणजे जो उद्देश ठेऊन लोक ज्योतिषाकडे जातात तो उद्देश समजल्यास तो सफल होतो का? याची चाचणी करता येईल.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sun, 03/02/2014 - 18:05 नवीन
कोणीही इन्फ्लुएन्शियल माणूस क्लायंट नसलेला, पण आपल्या ज्योतिषशास्त्राच्या आधारावर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक करून अब्जाधीश झालेला ज्योतिषी दाखवावा. त्याने आपल्या भविष्याच्या जोरावर १,०००,००० डॉलरचा कल्पित पोर्टफोलियो करावा, त्यात मार्केटच्या दुप्पट रिटर्न्स सतत पाच वर्षं मिळवून दाखवावेत.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sun, 03/02/2014 - 18:08 नवीन
ह्यापेक्षा वेगळे काही आहे का? आणि फलज्योतिष हा एक मार्ग आहे...कुठलेही फोर्कास्तिंग सारखेच... “Millionaires don't use Astrology, billionaires do.” ...j p मोर्गोन
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Mon, 03/03/2014 - 09:01 नवीन
घाटपांड्यांचे उद्योग इथे पण सुरु आहेत असे पाहून मौज वाटली. एका संकेतस्थळावरचे प्रतिसाद इतरांच्या वाचनानंदासाठी देत आहे. Srd | 2 March, 2014 - 17:19 उपक्रम स्तुत्य आहे . १काळ आम्ही म्हणजे आपली काही बी एन एच एस सारखी दीर्घकाळ पाठपुरावा करणारी संस्था आहे का ?कारण उदा : शनि ग्रहाचे प्रभाव पाहाण्यासाठी अठ्ठावीस वर्षाँची दोन तीन आवर्तने जावी लागतील परिणाम नोंदवण्यासाठी . २प्रश्नाचे स्वरूप काही प्रश्नांना थोडे ढोबळ अथवा व्यापक रूप द्यावे लागेल .उदा .शिक्षण =उच्चशिक्षण , धंदा /नोकरी =अर्थार्जन ,मध्यम का अल्प , राजयोग=मोठे राजकारणी /उद्योगपती ३ठोस व्याख्या हे थोडे कठीण आहे .उदा हुशार मुले , श्रीमंत माणूस ,सुखी कोणाला म्हणायचे . ४छोट्या छोट्या प्रश्नांची यादी संमत करणे फार गरजेचे आहे .मग ज्योतिषी/गट/मंडळे त्यांना हवा त्या क्रमांकाचा प्रश्न घेऊन निरीक्षणे ,नोंद आणि अनुमाने वैज्ञानिक पध्दतीने सादर करतील . प्रकाश घाटपांडे | 2 March, 2014 - 17:34 >>आम्ही म्हणजे आपली काही बी एन एच एस सारखी दीर्घकाळ पाठपुरावा करणारी संस्था आहे का ?<< आम्ही म्हणजे वैज्ञानिक चाचणी घेउ इच्छिणारे लोक. मुद्दा हा आहे कि वैज्ञानिक चाचणी कशी घ्यावी या बद्दल आपल्या मनात असलेले मॉडेल Srd | 2 March, 2014 - 18:47 ठीक आहे .बाकी मुद्दे कसे वाटले ? प्रकाश घाटपांडे | 2 March, 2014 - 19:22 या मुद्द्यावरुन चाचणीचे मॉडेल कसे तयार करणार याबद्दली आपली कल्पना सांगा. Srd | 2 March, 2014 - 23:09 नवीन "फलज्योतिष" आणि "वैज्ञानिक पध्दत" या दोन मुद्यांना विचारात घ्यायचे आहे असे धरून उदा:हरणार्थ पंचमेश उच्चीचा आहे/नाही याचे शिक्षणाबद्दल काय फल मिळते ते पाहाणे हा प्रश्न घेऊ. शंभरेक पहिलीतल्या मुलांच्या /मुलींच्या कुंडल्या नोंदवा .आता नमुने गोळा करतांना वेगवेगऴया आर्थिक /सामाजिक/धर्मांतील/स्थानांतील प्रत्येकी पंचवीस कुंडल्या लागतील .आता त्यांचे भविष्य लिहा की खूप /कमी शिकेल वगैरे .नंतर दहा /पंधरा/वीस वयाला नोंदी करत जाणे .नंतर तीसला अनुमान काढा . इथे ज्योतिष अभिप्रेत असल्याने आताच्या तीसवयाच्या शिकलेल्या मुलांच्या कुंडल्या जमा करून काढला एक आलेख असं चालणार नाही .(तसे केल्यास त्याला सांख्यिकी विश्लेषण statistical analysis असे म्हणा ) तसेच अमुक एक पध्दतीचे ज्योतिष धरलँ तर सर्वाँचे तसेच पाहिजे . बघा पटतंय का . limbutimbu | 3 March, 2014 - 10:17 नवीन एसार्डी, गुड! स्मित "परदेशप्रवास" हा शब्द देखिल मला असाच घोळात घालतो. "परदेश" कशाला म्हणावे? व्यक्तिसापेक्ष ती त्रिज्या बदलत जाईल. असो. मला येरवड्यातील वेड्यांच्या इस्पितळातील मनोरुग्ण, तसेच मुक्तांगणमधिल व्यसनाधिन व्यक्ति याबाबत अभ्यास करायचा आहे. त्यांचा जन्मतारखेचा/रोग केव्हा झाला/लक्षात केव्हा आला/रोगी केव्हा सुधारला वा अजुन बिघडला- याबद्दलचा डाटा मिळाला, तर बरीचशी कोडी सुटून, केवळ "चंद्र बिघडला" किंवा "द्वितीयात राहू/मंगळ" यांनी घोळ केला असे ढोबळ होणार नाही. याचबरोबर माझे निरीक्षण असे की शारिरीक ताकदीवर गुन्हे करणार्या व्यक्ति व संरक्षण/पोलिसदलातील व्यक्ति यांच्या अंगठ्याची/नखाची ठेवण जवळपास समान असते, मग गुरुप्रभावाची अशी कोणती उणीव गुन्हेगारात असते ते जाणून घ्यायला मला सर्व तर्‍हेचे गुन्हेगार तसेच सर्व पातळीवर काम करणारे संरक्षण/पोलिस दलातील व्यक्तिंच्या कुंडलीचा अभ्यास करायचा आहे. limbutimbu | 3 March, 2014 - 12:30 नवीन याचबरोबर, मला "सरकारी नोकरांच्याही " कुंडल्या हव्यात. ग्रेड ४ ते ग्रेड १ पर्यंत टक्केवारी लावुन पैसा खाणारी "डिपार्टमेण्ट्स" असली तर अधिक चांगले कारण मला फरक शोधुन काढायचा आहे तो असा की "सरकारी कृपाप्रसादाकरता/सेवेकरता" रवीचे स्थान माहात्म्य असावे लागते कुंडलीत, पण रविसारखा ग्रह "भ्रष्टाचाराला " कशी काय साथ देऊ शकतो, ते कोडे उलगडले नाहीये. भ्रष्टाचाराचा सरळ सरळ संबंध वेळेस 'कुटील" ठरु शकणार्‍या बुधाशी जोडता येतो, पण सरकारी नोकरीकरता चान्गला रवि अन जोडीला कुटिल बुध (चंद्राचे सापेक्ष/साथीने?) हे गणित अजुन जुळले नाहीये. तेव्हा भ्रष्टाचारी व्यक्तिंच्या कुंडल्या बहुसन्ख्येने अभ्यासण्याशिवाय व सांख्यिकी तपासणी केल्याशिवाय पर्याय नाही. याचबरोबर, भान्गेत तुळस उगवावी या पद्धतीने सरकारी नोकरीत राहुनही तेथिल "पाणीही" न पिणार्‍या अपवादात्मक व्यक्ति माहितीत आहेत, तर त्या काय कारणे अपवाद बनतात, गुरू मंङळाचा कोणता प्रभाव त्यान्ना धोकादायक परिस्थितीतही अपवाद बनवुन ठेवतो ते देखिल अभ्यासायचे आहे. इच्छा तर नाही, पण मजबुरीने देश तसा वेष या न्यायाने तिथे (सरकारी नोकरीत) वागावे लागते म्हणून पैसा खाणारे देखिल आहेत, यांचेवर शनि कसा प्रभाव टाकतो ते देखिल अभ्यासायचे आहे. वरील काहीच करणे शक्य नसल्याने, जेव्हा माझ्या नशिबात एखादी परमोच्च भ्रष्टाचारी व्यक्ति सामोरी येते, व मला तिचीकुंडली बनवायची संधी माझ्या नशिबाने जर मिळालिच, तरच मी असली सान्ख्यिकी करू शकतो हे वास्तव आहे. घाटपान्डेसाहेबांचा धाग्याचा उद्देश वरकरणी स्त्युत्य दिसत / भासत असला तरी इये मराठीचीयए नगरी पुण्यनगरित, ज्योतिष/फलनिर्देश याबाबत कोणतेही काम अधिकृत करण्याची सोय नाही/शक्यता नाही/कायदे तर नाहीच नाहीत. शिक्षणात त्याचा सहभाग नाही. आत्यंतिक प्रतिकुल परिस्थितीत हे ज्ञानशाखा मार्गक्रमण करत आहे. व असे असताना कोणत्याही प्रकारे कायद्याच्या कचाट्यात सापडून आयुष्य उद्ध्वस्त करुन घेण्याचा मूर्खपणा होण्याइतपत बुध वा शनि बिघडला असेल अशी व्यक्ति मूळात ज्योतिषी असेलच वा नाही याबद्दल स्वतंत्र संशोधन करावे लागेल मला.... डोळा मारा फिदीफिदी असो.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/03/2014 - 11:00 नवीन
घाटपांड्यांचे उद्योग इथे पण सुरु आहेत असे पाहून मौज वाटली.
मिपावरील आमचा बिल्ला क्रमांक २७ आहे. आमचे यापुर्वीचे लेखन http://www.misalpav.com/user/27/authored इथे वाचता येईल असो. मूळ मुद्दा चाचणीच्या संकल्पनांबाबत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
क
कवितानागेश Mon, 03/03/2014 - 10:18 नवीन
अहवाल वाचला. त्यात या सत्तावीस मंडळींच्या उत्तरात अचुक अनुमानांची संख्या ही कमीत कमी आठ पासुन जास्तीत जास्त चोवीस पर्यंत आहे.एकाच ज्योतिषाची चोवीस उत्तरे बरोबर आहेत. दोन ज्योतिषांची बावीस उत्तरे व बाकी २४ ज्योतिषांची उत्तरे वीसापेक्षा कमी बरोबर आहेत.सर्व २७ ज्योतिषांचा विचार करता सरासरी ४० पैकी १७.२५ उत्तरे बरोबर आहेत. याचाच अर्थ सर्वसामान्यपणे ४५ % उत्तरे बरोबर आहेत. हे महत्त्वाचं वाटलं. त्या २४ उत्तरे बरोबर देणार्‍या ज्योतिषाचा पत्ता मिळेल का? त्यांचाच आभ्यास त्यातल्या त्यात बरा दिसतोय. :)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 03/03/2014 - 18:47 नवीन
मौताई तुम्ही Data analyst आहात काहो ? मस्त परीक्षण केलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश Mon, 03/03/2014 - 19:18 नवीन
मी हे असं काहीच नाहीये. फक्त अहवाल वाचल्यावर जाम गंमत वाटली. हे म्हणजे रॅन्डम मुले गोळा केली. ती एका वर्गात जमवून सगळ्या मुलांना एकच पेपर वाटला. त्यांनी त्यांच्या "अभ्यासाप्रमाणे" उत्तरे लिहिली. मग सगळ्याच्या मार्कांची बेरीज करुन सरासरी काढून सर्वांना नापास केलं! म्हणजे (उदाहरणार्थ) ९०% वाला मुलगा एका १५% वाल्या मुलामुळे थेट ४५% टक्क्यांवर घसरला. जर सगळ्या मुलांनी एकत्र चर्चा करुन उत्तरे दिली असती तर त्यांना एकसारखी( किंवा एकच रीझल्ट लावून) मार्क देउन, "शास्त्राची" कसोटी पाहणं योग्य होतं. पण खरं तर त्यात देखिल अर्थ नाही. सगळे ज्योतिषी निदान एखादी मोठी परीक्षा पास झालेले आहेत का, हे पहाणं महत्त्वाचं आहेच. आणि तरीही अशी सरासरी काढणं फारच गमतीशीर आहे. असो. मला अजूनही त्या एका जास्तीत जास्त योग्य उत्तरे देणार्‍या ज्योतिष्याच्या पत्त्यात इंटरेस्ट आहे. ;) बाकी चालूद्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ध
धन्या Mon, 03/03/2014 - 19:27 नवीन
हे म्हणजे रॅन्डम मुले गोळा केली. ती एका वर्गात जमवून सगळ्या मुलांना एकच पेपर वाटला. त्यांनी त्यांच्या "अभ्यासाप्रमाणे" उत्तरे लिहिली. मग सगळ्याच्या मार्कांची बेरीज करुन सरासरी काढून सर्वांना नापास केलं! म्हणजे (उदाहरणार्थ) ९०% वाला मुलगा एका १५% वाल्या मुलामुळे थेट ४५% टक्क्यांवर घसरला.
हाऊ मीन यू आर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश Tue, 03/04/2014 - 10:46 नवीन
हसू की रडू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या Tue, 03/04/2014 - 18:05 नवीन
मी ते गंमतीत लिहिलं होतं. नुकतंच "अप्लाईड स्टॅटीस्टीक्स"चं एक पुस्तक वाचलं. त्यातल्या मीन, मोड आणि मीडीयन या संज्ञा डोक्यात ताज्या होत्या. वर कोट केलेलं उदाहरण "मीन"चं एक मजेशीर उदाहरण आहे. म्हणून तो विकीचा दुवा चिकटवला. तुम्ही फारच शिरेसली घेतलंत. आय माय स्वारी बर्का. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
आ
आत्मशून्य Tue, 03/04/2014 - 19:28 नवीन
तुम्ही फारच शिरेसली घेतलंत. आय माय स्वारी बर्का.
असेच म्हणतो. बाकि या आयमायच दडपण खरोखर लै मोठ्ठ असतं बगा मालक. खरे तर निव्वळ गैरसमज संपणेच/स्पश्ट होणेच पुरेसं असतं. लगेच आयमाय कायले करु रायले असे मी सुधा एका माननियांच्या अशाच नम्रतेच्या दडपणाखाली आल्याने सुचवुन पाहिलं (माझी खवं तपासा) त्यांचा मोठेपणा हा की त्यांनी माझ्या सारख्या फालतु व्यक्तीकडून ते ऐकुनही घेतलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ब
बॅटमॅन Tue, 03/04/2014 - 19:32 नवीन
स्टॅटबद्दल एका प्रॉफमहाशयांचे उद्गार : जर मीन ची संकल्पना कळ्ळी तर ९५ टक्के स्टॅट कळालं, जर व्हॅरियन्स ची संकल्पना कळ्ळी तर ९९% स्टॅट कळालं. मात्र उरलेल्या १% साठी जीव जातो. (यद्यपि मीन अन व्हॅरियन्स या अतिशय साध्या संकल्पना अतिशय मूलगामी आहेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
श
श्रीगुरुजी Tue, 03/04/2014 - 07:46 नवीन
या चाचणीत दिलेला डाटा (पत्रिका) हा पडताळून पाहिला की नाही याचा उल्लेख नाही. ज्या व्यक्तींच्या पत्रिका दिल्या आहेत त्यांच्या जन्मतारखेचे व जन्मवेळेचे प्रमाणपत्र पत्रिकेबरोबर द्यायला हवे होते. त्यामुळे ज्योतिषांना दिलेल्या पत्रिका पडताळून पाहता आल्या असत्या. ज्योतिषी विरूद्ध ज्योतिषावर विश्वास न ठेवणारे असा हा सामना होता. या सामन्यासाठी एखादी तटस्थ व त्रयस्थ व्यक्ती पंच म्हणून हवी होती. पण या चाचणीत प्रश्नपत्रिका काढणारे, पत्रिका पुरविणारे, उत्तरे तपासणारे, निकाल जाहीर करणारे हे सामन्यातील दोन खेळाडूंपैकी एक खेळाडू होता व त्यांची मते जगजाहीर होती. त्यामुळे या चाचणीला व त्यातील निष्कर्षांना काहीही अर्थ नाही. यातील ३ जणांनी ५५ टक्क्यांहून अधिक भाकीते बरोबर करून सुद्धा त्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले कारण इतरांना कमी गुण मिळाले. हा निष्कर्ष तर जास्तच धक्कादायक आहे. ज्यांनी ही चाचणी घेतली त्यांची पूर्वग्रहदूषित मते लक्षात घेतली तर ते काय निष्कर्ष काढतील हे चाचणीपूर्वीच लक्षात आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
स
सुबोध खरे Tue, 03/04/2014 - 19:53 नवीन
माऊ ताई त्या ज्योतिषांचा अनुभव पाच ते तीस वर्षे आहे आणि सरासरी १४.४ वर्षे आहे. आणि त्यांना ४० प्रश्नांची उत्तरे विचारली होती त्यापैकी एका ज्योतिषांची २४ उत्तरे बरोबर आली म्हणजे हे एक ज्योतिषी सुद्धा ६० टक्केच बरोबर आहेत. ( बाकीच्यांची परिस्थिती गंभीरच आहे कारण या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे गुण ३५ टक्के नसून ५०% आहेत) मुळात हा मुलगा हुशार आहे कि नाही याचे उत्तर छाप किंवा काटा करून सुद्धा ५० % बरोबर येऊ शकते याचा अर्थच हा कि हे साठ टक्के संक्याशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचे( significant) आहेत कि अनुमान धपका( statistical chance) आहेत हे सांगणे कठीण आहे. म्हणजेच वर केलेल्या परीक्षेत ज्योतिषशास्त्र नापास झाले असा अर्थ माझ्यासारखा सामान्य माणूस सहजपणे काढू शकतो. "त्यांचाच आभ्यास त्यातल्या त्यात बरा दिसतोय" हे म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश Tue, 03/04/2014 - 20:19 नवीन
जर अनुभवाची सरासरी काढायचे आहे, तर आधी तो अनुभव 'एकत्र' करायला हवा. तेच सांगतेय की जर त्यांनी 'एकत्र' चर्चा करुन उत्तरे लिहिले असती, तर सरासरी योग्य होती. अवांतरः छाप काट्याचे उत्तर खरोखरच नेहमीच ५०% येते का? माझ्या निरिक्षणाप्रमाणे नाही. कारण माहित नाहीत. काहींच्या मते कुठलं नाणे वापरतोय, त्यावर ही शक्यता असते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Wed, 03/05/2014 - 09:35 नवीन
या चाचणीच्या निकालासाठी त्रयस्थ/तटस्थ पंच नेमण्यात आले नव्हते असे पूर्वी वाचले होते. असे करणे म्हणजे नदाल वि. फेडरर सामन्यात या दोन खेळाडूंपैकीच एकाने खेळाबरोबरच रेफ्रीचेही काम करण्यासारखे आहे. मुळात ही चाचणी घेणार्‍या दाभोळकर व नारळीकर यांची ज्योतिषाविषयीची मते जाहीर आहेत. आपल्या मताप्रमाणेच चाचणीचा निकाल काढता यावा ही त्यांची मनातून इच्छा असणारच. त्यामुळे त्यांनी चाचणीसाठी पुरविलेल्या पत्रिका अचूक होत्या का याविषयीच शंका आहे. ज्यांचा ज्योतिष या कल्पनेलाच कडाडून विरोध आहे तेच चाचणी घेणार, तेच पत्रिका पुरविणार आणि तेच निष्कर्ष काढणार! ते काय निष्कर्ष काढणार होते हे चाचणीआधीच स्पष्ट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रकाश घाटपांडे Wed, 03/05/2014 - 10:23 नवीन
मी या चाचणीचा समन्वयक होतो. फलज्योतिष चाचणी समन्वय इथे तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/06/2014 - 09:00 नवीन
तुम्ही सुद्धा काही काळ अंनिसशी संबंधित होता असे या दुव्यात लिहिले आहे. एकंदरीत या चाचणीत तटस्थ/त्रयस्थ पंच नव्हते. ज्यांची ज्योतिष या विषयाबद्दल ठाम मते आहेत त्यांनीच ही चाचणी आयोजित केली होती व त्यांनीच निष्कर्ष काढला. म्हणजे सामना खेळणारे आणि रेफ्री एकच होते. असो. काही गोष्टींची गंमत वाटली. मतिमंद शाळेत जाणारा मुलगा म्हणजे "मतिमंद" आणि सामान्य शाळेत जाऊन सलग ३ वर्षे ७० टक्के गुण मिळविणारा तो "हुशार" ही व्याख्या गंमतीची वाटली. सर्व मुले या दोनच कॅटॅगिरीत बसतात का? सामान्य शाळेत जाणारा एक "मतिमंद" मुलगा माझ्याच सोसायटीत राहतो. वरील व्याख्येनुसार तो "मतिमंद" ठरत नाही. मग त्याची पत्रिका तपासल्यावर एखादा ज्योतिषी त्याला मतिमंद ठरवत असेल तर ते चूक कारण तो तसल्या शाळेत जात नाही आणि एखाद्या ज्योतिषाने त्याला मतिमंद ठरवले नसेल तर तेही चूक कारण तो जन्मतःच मतिमंद आहे. असो. ज्योतिषांची फक्त या एकाच मुद्द्यावर चाचणी घेऊन अंनिसने आपल्याला सोयिस्कर निष्कर्ष काढलेले दिसत आहेत. अजून काही चाचण्या घेऊन मग नंतर ठाम निष्कर्ष काढला असता तर ते योग्य झाले असते. साधी मधुमेहाची चाचणी घेताना सुद्धा २ वेगवेगळ्या दिवशी रॅन्डम शर्करा तपासून नंतरच निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे इथेसुद्धा अजून चाचण्या घेणे आवश्यक होते. मतिमंद, हुशार इ. विशेषणे सापेक्ष आहेत. ज्याप्रमाणे परदेशगमनाचा योग हा सापेक्ष आहे त्याचप्रमाणे एखाद्या मुलाला मतिमंद, हुशार, मठ्ठ, बुद्धिमान इ. म्हणणे हेदेखील सापेक्ष आहे. आईनस्टाईन ५ वर्षांचा होईपर्यंत बोलत नव्हता असे वाचले होते. अशा मुलाला काही जणांनी नक्कीच मतिमंद ठरविले असणार. असो. या चाचणीतल्या निदान काही पत्रिकांचे सर्व किंवा निदान काही ज्योतिषांनी केलेले सविस्तर विश्लेषण पहायला मिळेल का? त्यावरून ज्योतिषी चुकले का अंनिसने पूर्वग्रहदूषित निष्कर्ष काढले याचा अंदाज येईल. एखाद्या खरोखरच मतिमंद असलेल्या मुलाच्या बाबतीत वेगवेगळ्या ज्योतिषांनी कसे विश्लेषण केले होते हे वाचायला आवडेल. त्यांनी खरोखरच तो मतिमंद होता असा ठाम निष्कर्ष काढला होता का तो अत्यंत हुशार आहे असा निष्कर्ष काढला होता का त्याच्या पत्रिकेत त्यांना अभ्यासातील हुशारीऐवजी काही वेगळ्या क्षेत्रातले गुण दिसले होते का त्यांनी तो मतिमंद आहे असे स्पष्ट न लिहिता संदिग्ध शब्दात निष्कर्ष काढले होते ... हे सविस्तर वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/05/2014 - 10:41 नवीन
...त्यात या सत्तावीस मंडळींच्या उत्तरात अचुक अनुमानांची संख्या ही कमीत कमी आठ पासुन जास्तीत जास्त चोवीस पर्यंत आहे.एकाच ज्योतिषाची चोवीस उत्तरे बरोबर आहेत. दोन ज्योतिषांची बावीस उत्तरे व बाकी २४ ज्योतिषांची उत्तरे वीसापेक्षा कमी बरोबर आहेत.सर्व २७ ज्योतिषांचा विचार करता सरासरी ४० पैकी १७.२५ उत्तरे बरोबर आहेत. याचाच अर्थ सर्वसामान्यपणे ४५ % उत्तरे बरोबर आहेत. ही चाचणी पद्धती फारतर ज्योतिषी लोकांची व्यक्तिगत पात्रता ठरवण्यासाठी उपयोगी आहे, ज्योतिषशात्राची कसोटी म्हणून योग्य नाही. ज्योतिषशास्त्राची कसोटी अश्या चाचणीने करता येईलः १. सर्वप्रथम भविष्य वर्तवले जाण्यासंबंद्धिचे नियम / निकष कायम करून ते कसे वापरले जावेत ते स्पष्टपणे लिहून ठेवले पाहिजे. २. तेच (आणि केवळ तेच) नियम, त्याच (आणि केवळ तीच) मान्य पद्धती वापरून कुंडल्यांचे भविष्य लिहीले गेले पाहिजे. ३. तपासलेल्या कुंडल्यांची कमीत कमी संख्या (मिनिमम सँपल साईझ) स्टॅटिस्टिक्सने ठरवलेली असावी. ३. नियम तेच असल्याने आणि ते तसेच वापरले जात असल्याने कुंडली माणसाने वाचली किंवा संगणकाने, काही फरक पडणार नाही. जर भविष्य सांगणार्‍या माणसाचे खाजगी ठोकताळे अथवा इंटूइशन वापरली जाणार असेल तर फारतर ती (वादाकरिता) एखाद्या माणसाची अतिंद्रिय शक्ती मानली जावू शकेल पण ती प्रक्रिया शास्त्रीय नसेल. ४. हीच वरची प्रक्रिया तेच नियम, तसेच वारंवार वापरून, तशीच फलनिष्पत्ती (आउटकम) येणे जरूर आहे. ५. वरच्या प्रक्रियेने आलेले भविष्याचे निर्णय स्टॅटिस्टिक्सली सिग्निफिकन्ट (९५% कॉन्फिडन्स लेव्हल / कोएफ्फिशंट) असले तर भविष्य सांगणे शास्त्र आहे असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
आ
आदूबाळ Wed, 03/05/2014 - 11:11 नवीन
ही चाचणी पद्धती फारतर ज्योतिषी लोकांची व्यक्तिगत पात्रता ठरवण्यासाठी उपयोगी आहे
द्याट इज द होल प्वाईंट एक्का काका. ज्योतिषशास्त्रात स्टोकॅस्टिक / नॉन-डिटर्मिनिस्टिक गोष्टी (उदा. गुरूंची कृपा) एवढ्या आहेत, की फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी म्हणजे पर्यायाने फलज्योतिषी लोकांची वैज्ञानिक चाचणी - असाच अर्थ घ्यावा लागेल. गुरूंची कृपा असलेला कॉम्प्युटर कुठून आणणार? (आता बालाजीची कृपा असलेलं मंगळयान असू शकतं तर गुरूकृपा असलेला कॉम्प्युटर का नसू शकतो या प्रश्नाचं उत्तर अर्थातच नाही. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
आ
आदूबाळ Mon, 03/03/2014 - 15:59 नवीन
ज्योतिष शास्त्राची वैज्ञानिक चाचणी करू पहाणार्‍यांबाबत ज्योतिषप्रेमी असा आक्षेप घेताना आढळतात "अमुकतमुक माणूस ना? त्याला काय घंटा कळतंय? तो [फलज्योतिष/पारंपारिक/कृष्णमूर्ती/टॅरो] वाला/वाली आहे. नुस्तं [परीक्षा देऊन/मेडलं मिळवून/चार बुकं वाचून] ज्योतिषी होता येत नाही. त्याला [हजारो कुंडल्या पहाण्याचा अनुभव/पहाटे उठून घासलेली सबलॉर्ड्ची कोष्टकं/बाबांचा अनुग्रह] लागतो." हा तिढा सोडवण्यासाठी काय पाहिजे? १. अचूक उत्तरं सांगणारे ज्योतिषीच उरतील अशा कसोट्या/परीक्षा/इयत्ता २. सहज पडताळून पहाता येणारी उत्तरं पहिली इयत्ता हो/नाही उत्तरांची ठेवता येईल (म्हणजे ५०-५० प्रोबॅबिलिटी) उदा. [पुणे/मुंबई/नागोठणे/छत्तरपूर/रिओ डि जानिरो] मध्ये [१२ जुलै १९६१] रोजी पाऊस पडला होता की नव्हता? याचं उत्तर हो/नाही मध्ये देता येईल आणि सहज पडताळूनही पहाता येईल. मग दुसरी इयत्ता ३३-३३-३३ प्रोबॅबिलिटीची तिसरी २५-२५-२५-२५ ची वगैरे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 03/03/2014 - 16:17 नवीन
भविष्यकथन हे कोणत्याही पद्धतीने केलेले असो, त्यात इंद्रीयातीत, तर्कातीत बोधाचा मोठाच भाग असतो, 'अचानक सुचून जाणे' हे कला, साहित्य, काव्य निर्मितीप्रमाणेच भविष्यकथनातही घडत असते. त्यामुळे अशी चाचणी करता येईल, असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 03/03/2014 - 22:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
ध
धन्या Mon, 03/03/2014 - 19:17 नवीन
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?
फलज्योतिषाची कुठल्याच प्रकारची चाचणी असू नये. ज्यांना फलज्योतिष हे थोतांड आहे असं वाटतं ते फलज्योतिष्याच्या वाटेला जातंच नाहीत. त्यांच्यावर कितीही वाईट प्रसंग ओढवला तरी ते "बाकी सगळे उपाय करुन पाहिले, हा ही करुन पाहू." अशी तकलादू कारणं देत ते तथाकथित अधिभौतिक गोष्टींच्या कधीच नादी लागत नाही. ज्यांचा फलज्योतिष या प्रकारावर विश्वास आहे, त्यांना कुणी कितीही सांगितलं की बाबारे असं काही नसतं तरीही त्यांचा विश्वासही अतूट असतो. त्यामुळे ते फलज्योतिष हे थोतांड आहे असं सांगणार्‍यांना फाटयावर मारतात आणि अमुक एक ज्योतिषी कसे अचुक भाकीत सांगतो हे सांगत फीरतात. तसं ज्योतिष हा बर्‍यापैकी निरुपद्रवी प्रकार आहे. थोडं फार आर्थिक नुकसान होतं. अर्थात ज्योतिष्याकडे जाणारे आपल्याला फी परवडणार्‍या ज्योतिषाकडेच जातात. एखादा हातवर पोट असणारा पंचतारांकीत हॉटेलमध्ये उतरणार्‍या ज्योतिष्याकडे कधीच जात नाही. ते त्याच्या खिशाला परवडणार नसतं. फलज्योतिष्याचा सर्वात मोठा धोका असतो, स्वयंसुचना. अर्थात सेल्फ सजेशन. जर का एखादया ज्योतिषाने नकारात्मक भाकीत केले आणि ज्या व्यक्तीबद्दल भाकीत केले आहे ती व्यक्ती कमकुवत मनाची असली तर त्याचे परिणाम भीषण होऊ शकतात. त्या व्यक्तीचं मन तशी घटना घडणारंच आहे अशी सुचना स्विकारते, माणूस स्वतःच त्या घटनेसाठी पोषक वातावरण तयार करतो. आणि कधीकधी तशी नकारात्मक घटना घडतेही.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Mon, 03/03/2014 - 19:24 नवीन
फलज्योतिष्याचा सर्वात मोठा धोका असतो, स्वयंसुचना. अर्थात सेल्फ सजेशन. जर का एखादया ज्योतिषाने नकारात्मक भाकीत केले आणि ज्या व्यक्तीबद्दल भाकीत केले आहे ती व्यक्ती कमकुवत मनाची असली तर त्याचे परिणाम भीषण होऊ शकतात. त्या व्यक्तीचं मन तशी घटना घडणारंच आहे अशी सुचना स्विकारते, माणूस स्वतःच त्या घटनेसाठी पोषक वातावरण तयार करतो. आणि कधीकधी तशी नकारात्मक घटना घडतेही.
हे खरे आहे. अफ्रिकन जुजु सुधा याच पध्दतिने काम करते असे मानले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
व
विकास Mon, 03/03/2014 - 19:53 नवीन
जर का एखादया ज्योतिषाने नकारात्मक भाकीत केले आणि ज्या व्यक्तीबद्दल भाकीत केले आहे ती व्यक्ती कमकुवत मनाची असली तर त्याचे परिणाम भीषण होऊ शकतात. अमोल पालेकर, दिप्ती नवल, श्रीराम लागू, विनोद मेहरा, दिना पाठक आदी असलेला अनकही ह्या चित्रपटाची कथा अशीच काहीशी आहे. फक्त त्याचा शेवट असा विचित्र आहे की ज्योतिषाला मानणारा म्हणू शकेल की भविष्य खरे ठरले तर न मानणारा म्हणू शकेल की बघा भविष्य वर्तवणे वगैरे मध्ये काही दम नाही! चिं. त्र्य. खानोलकरांच्या कालाय तस्मै नमः या नाट्यकथेवर हा चित्रपट आधारीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
स
स्पंदना Tue, 03/04/2014 - 01:23 नवीन
त्यातली भिमसेन जोशींनी गायलेली गाणी अप्रतिम आहेत. तसच 'मुझको भी राधा बनायदे" हे दोन वेगवेगळ्या मूडमध्ये आशा भोसलेंनी गायलेल गीतही अप्रतिम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/04/2014 - 05:10 नवीन
अनकही पाहिला नाही. बघायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/04/2014 - 04:53 नवीन
ज्यांना फलज्योतिष हे थोतांड आहे असं वाटतं ते फलज्योतिष्याच्या वाटेला जातंच नाहीत. त्यांच्यावर कितीही वाईट प्रसंग ओढवला तरी ते "बाकी सगळे उपाय करुन पाहिले, हा ही करुन पाहू." अशी तकलादू कारणं देत ते तथाकथित अधिभौतिक गोष्टींच्या कधीच नादी लागत नाही.
हे मत सरसकट मान्य नाही. हा मोठा विषय आहे. बाकी गोष्टी पटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
व
विकास Mon, 03/03/2014 - 19:22 नवीन
अशी विचारपूर्वक चाचणी करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. पण अशा चाचणीचे उद्दिष्ट जर लोकशिक्षण करणे असेल तर त्याचे भविष्य मात्र मी छातीठोकपणे सांगू शकेन. ;) अवांतर पण समांतर उदाहरणः मध्यंतरी एका भारतीय आहारतज्ञाचे भाषण एका भारतीयांच्या कॉन्फरन्समधे ऐकण्याचा योग आला. भाषण / प्रेझेंटेशन एकदम प्रभावी होते. उद्देश भारतीयांना त्यांच्या आहारातील उगाच आलेले दोष दाखवणे होता आणि त्यावर किती सोपे उपाय आहेत हे सांगणे (थोडक्यात सकारात्मक) होता. पब्लीकने मन लावून ऐकले, कुतुहलापोटी योग्य ते प्रश्न विचारले आणि भाषण संपल्यावर सर्वजण मसालेदार चटमटीत जेवणासाठी कोक/पेप्सी घेण्यासाठी शिस्तित उभे राहीले. :(
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/04/2014 - 04:55 नवीन
पण अशा चाचणीचे उद्दिष्ट जर लोकशिक्षण करणे असेल तर त्याचे भविष्य मात्र मी छातीठोकपणे सांगू शकेन. Wink
लोकशिक्षण हा हेतु नाही.डॉक्युमेंटेशन हा आहे. मात्र लोकशिक्षणासाठी तो उपयोगी ठरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
आ
आत्मशून्य Mon, 03/03/2014 - 19:34 नवीन
करायची एखादी चाचणी जर आपण घेणार असाल तर त्या परिक्षेला बसायची माझी मनापासुन इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/04/2014 - 04:59 नवीन
इतर पद्धती म्हणजे फ्युचरॉलॉजी वगैरे अस म्हणता आहात काय? चाचणीचा विषय फलज्योतिष आहे.पण तुम्ही म्हणता तसे इतर पद्धतीने भाकीत व फलज्योतिषाच्या माध्यमातून भाकित यात किती तफावत येते हे पाहणे ही रोचक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Tue, 03/04/2014 - 07:44 नवीन
मी सरसकट याला पॅटर्न स्टडी इतकेच म्हणेन्/म्हणायचो. एखाद्या परिस्थीतीबाबतचे बहुतांश पॅटर्न अभ्यासले तर त्याचे अतिशय मिळते जुळते अथवा अचुक प्रेडिक्शन करता येते. जितके व्यवस्थीत पॅटर्न तपासु तितका निकाल निर्दोष बनतो असे निरीक्षण आहे. (याला थोडी अँथ्रोपोलॉजीचीसुधा कधी कधी जोड द्यावी लागते) हा प्रकार ढोबळमानाने व्यक्ती वर्तणूक, नातेसंबंध, क्रीडा स्पर्धा निकाल, मार्केट ट्रेंड सारख्या ठीकाणी उपयोगी पडू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मराठीप्रेमी Tue, 03/04/2014 - 07:32 नवीन
नंदकुमार जकातदार यांनी या ठिकाणी काही ठाम दावे केले आहेत (२ मिनिटांपासून पुढे बघावे). त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी एक संख्याशास्त्रीय चाचणी केली होती आणी त्या चाचणीचा निकाल अनुकूल असा आला. तुमच्या या ज्योतिशांच्या वर्तुळात ओळखी आहेत, तुम्ही यासंदर्भात अधिक माहिती मिळवून देऊ शकाल काय?
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Tue, 03/04/2014 - 10:01 नवीन
कशासाठी चाचणी हवी?
  • Log in or register to post comments
म
म्हैस Tue, 03/04/2014 - 11:01 नवीन
फलज्योतिषाची चाचणी काय असावी हे सामान्य लोक ज्यांना त्यातलं ज्ञान नाहीये असे लोक सांगू शकणार नाहीत. ज्यांचा फलज्योतिषाचा गहन अभ्यास आहे तेच लोक सांगू शकतील. डॉक्टर ची परीक्षा दुसरा सेनिओर डॉक्टरच करू शकेल न. कोणीही कसा करू शकेल ?
  • Log in or register to post comments
आ
आबा Tue, 03/04/2014 - 12:03 नवीन
डॉक्टरची परिक्षा दुसरा डॉक्टर करू शकतो याच कारण असं की "मेडिकल सायन्स" हे शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध होउन मान्यताप्राप्त झालं आहे. त्यामुळे चाचणी ही फक्त त्या विशिष्ठ डॉक्टरची असते, संपूर्ण मेडीकल सायन्स ची नाही. ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत ज्योतिषी चांगले आहेत की वाईट हे ठरवायचंच नाहीये, ज्योतिषशास्त्रंच शास्त्रीय कसोट्यांवर उतरतय का हे पहायचं आहे. त्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही... एखादा ज्योतिषी चांगला की वाईट हे ठरवण्याची वेळ अजून आलेलीच नाही, प्रश्न त्याहीपेक्षा जास्त मूलभूत आहे, हेच बर्‍याच जणांना कळत नाहीये. ... मला स्वतःला असं वाटतं, की कोणताही ज्योतिषी अश्या कोणत्याही अधिकृत चाचण्यांसाठी पुढे येणार नाही. पूर्ण शास्त्राचं स्टँडर्डायझेशन करून ग्राहक संरक्षण कायद्याचं लचांड मागे लाउन घेण्यापेक्षा, अडचणीत सापडलेल्या लोकांना गाठून त्यांना खोटी आशा दाखवून पैसे उकळायचे हा सेफ जुगार आहे. शास्त्रीय मान्यता हवीय कोणाला?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस
ब
बॅटमॅन Tue, 03/04/2014 - 20:08 नवीन
मला स्वतःला असं वाटतं, की कोणताही ज्योतिषी अश्या कोणत्याही अधिकृत चाचण्यांसाठी पुढे येणार नाही. पूर्ण शास्त्राचं स्टँडर्डायझेशन करून ग्राहक संरक्षण कायद्याचं लचांड मागे लाउन घेण्यापेक्षा, अडचणीत सापडलेल्या लोकांना गाठून त्यांना खोटी आशा दाखवून पैसे उकळायचे हा सेफ जुगार आहे. शास्त्रीय मान्यता हवीय कोणाला?!
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ अन हे करायचं म्हटलं की त्यांना कळायचं बंद होतं अन बिनबुडाचे व्यक्तिगत हल्ले सुरू होतात. भेद समजून घेण्याची कुवत तर नसतेच, त्यात पित्त खवळले की "आधीच मर्कट तशातहि मद्य प्याला" असे प्रताप सुरू होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/04/2014 - 20:26 नवीन
@अन हे करायचं म्हटलं की त्यांना कळायचं बंद होतं अन बिनबुडाचे व्यक्तिगत हल्ले सुरू होतात. भेद समजून घेण्याची कुवत तर नसतेच, त्यात पित्त खवळले की "आधीच मर्कट तशातहि मद्य प्याला" असे प्रताप सुरू होतात.>>> +१ कुठलंही आव्हान कधिह्ही स्विकारायचं नाही. बाहेर बाता ठोकायच्या,आणि आव्हान देणार्‍यांसमोर पार्श्वभागाला पाय लाऊन पळ काढायचा,किंवा स्वतःचे हसे करून घ्यायचे. हा ज्योतिषांचा कायमचा ठरलेला खेळ आहे. एकाही ज्योतिषाला खुलेपणानी- "हे शास्त्र खरं/खोटं कसंही असलं तरी माझ्या भविष्यकथनचा आणि उपाययोजनेस्तव होणार्‍या मार्गदर्शनाचा(म्हणजे त्यातल्या व्यावहारीक उपाय योजनांचा! ;) ...) जातकांना फायदा होतो".. हे मान्य करण्याचं धाडस किंवा सद् बुद्धी झालेली नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/05/2014 - 09:46 नवीन
"हे शास्त्र खरं/खोटं कसंही असलं तरी माझ्या भविष्यकथनचा आणि उपाययोजनेस्तव होणार्‍या मार्गदर्शनाचा(म्हणजे त्यातल्या व्यावहारीक उपाय योजनांचा! Wink ...) जातकांना फायदा होतो"..
यात "हे शास्त्र खरं/खोटं कसंही असलं तरी" हीच तर गोम आहे. हे कबूल केलं तर धंदाच बसेल ना. तस्मात फायदा होतो हे तर म्हणतात, पण शास्त्राबद्दल कसलाही संशय समोरच्याच्या मनात येऊ देत नाहीत. :) पण एक मजा आहे. अशीही तुरळक उदा. पाहिली आहेत की आर्थिक प्राप्ती होत नसली तरी ज्योतिषाची प्राणपणे भलामण केली जाते. तेव्हा मात्र त्रांगडं कळत नाही खरंच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
आ
आबा Wed, 03/05/2014 - 19:20 नवीन
रामचंद्रनच्या "फँटम ब्रेन" पुस्तकातून याचं टेंटेटिव्ह कारण कळतं फॉल्स स्टॅटिस्तिक्स तयार करण्याची, मेंदूची क्षमताच यासाठी कारणीभूत आहे... कोरीलेशन जोडण्यासाठीची आतुरता हे मानसाच्या मेंदूचं लक्षणचं आहे, आपण तीच उदाहरणे लक्षात ठेवतो जी आपल्या पूर्वग्रहांना सपोर्ट देतात, यासाठीचे इंट्रेस्टींग प्रयोग सुद्धा आहेत बिहेव्हियरल सायन्स मध्ये... त्यामुळे कागदावर डाटा मांडून ग्राफ वगैरे काढणे हा सेफ मार्ग आहे, किंवा कारण विचारणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/05/2014 - 19:36 नवीन
ते बाकी खरं!!! ढगात साईबाबा इ. शोधणे वैग्रे गोष्टी त्यातूनच येतात खर्‍या. शेवटी आकड्यांच्या शिस्तीशिवाय पर्याय नाही हेच खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
म
मंदार दिलीप जोशी Fri, 03/07/2014 - 07:19 नवीन
असहमत. हा विषय इतका मोठा आणि गुंतागुंतीचा आहे की एवढं करायला कुणालाही वेळ नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रन्गि पाउस Wed, 03/05/2014 - 11:14 नवीन
फलज्योतिष आणि हवामान अंदाज / निवडणूक अंदाज /अर्थविषयक अंदाज अशी करता येईल का ? काही ज्ञात आणि बर्याच अज्ञात parameter चा वापर करून केलेले अंदाज असं ह्याकडे बघितले तर ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
अ
अत्रन्गि पाउस Wed, 03/05/2014 - 11:16 नवीन
फलज्योतिष आणि मेडिकल ह्यांची तुलना करायची झाल्यास...रोग निदान ह्या स्टेप पर्यंतच बघितल्यास..??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा