Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Sun, 03/02/2014 - 07:16  ·  लेख
लेख
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर लोकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. फलज्योतिषावर आपले मत काय? हे अजमावण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे.कारण तो चाचणीशी संबंधीत नाही. तो स्वतंत्र विषय आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी हा धागा नाही. . या पुर्वी २००८ मधे प्रो.जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या मतिमंद व हुशार मुलांच्या बाबतची फलज्योतिषाची चाचणीचा अहवाल खालील दुव्यावर उपलब्ध आहेत http://faljyotishachikitsa.blogspot.in/2008/10/blog-post_09.html

प्रतिक्रिया द्या
23064 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

आ
आबा Wed, 03/05/2014 - 15:45 नवीन
अत्रंगी, दोन मिनिटासाठी ज्योतिषा बद्दलचं "माझं" मत सोडून द्या, असंही गृहीत धरा, की ज्योतिशांचे अंदाज आणि हवामानाचे अंदाज यांचं एरर मार्जिन सारखच असतं... तरीही "शास्त्र" म्हणण्यासाठी नुसतं कोरीलेशन असून चालत नाही (हे नेसेसरी आहे सफिशियंट नाही) भविष्य वर्तवण्याचं एक मॉडेल तयार करावं लागेल आणि त्या मॉडेल साठी कोरीलेशन, फॉल्सीफायेबिलीटी आणि रीप्रोड्युसीबीलीटी या अटी पूर्ण व्हाव्या लागतील... हवामानाचं मॉडेल वरील अटी पूर्ण करतं, ज्योतीषशास्त्राचं तपासावं लागेल (हे करण्यात वेळ घालवू नये असं माझं मत आहे, कारण कोरीलेशनची अट सुद्धा पूर्ण होत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
स
सुबोध खरे Tue, 03/04/2014 - 20:02 नवीन
आबा तुम्ही तर त्यांच्या चडडीलाच हात घालताय *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments
म
म्हैस Wed, 03/05/2014 - 11:52 नवीन
मला स्वतःला असं वाटतं, की कोणताही ज्योतिषी अश्या कोणत्याही अधिकृत चाचण्यांसाठी पुढे येणार नाही
हम्म अब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे .. कारण ते ज्योतिषी नाहीचेत . ते फक्त लोकांना ठगाव्णारे भोंदू आहेत .आत्ताच्या काळामध्ये फलज्योतिषातला खरा ज्योतिषी सापडणं दुर्मिळ. त्यामुळे त्याची चाचणी हि ठरवणं हि तेवढंच अवघड . पण त्यातलं तज्ञ सापडत नाही म्हणून त्या शास्त्रालाच खोटं ठरवणं चुकीचा आहे असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/05/2014 - 12:07 नवीन
कारण ते ज्योतिषी नाहीचेत . ते फक्त लोकांना ठगाव्णारे भोंदू आहेत . Image removed. Image removed. आत्ताच्या काळामध्ये फलज्योतिषातला खरा ज्योतिषी सापडणं दुर्मिळ. >>> Image removed. एकाच मुद्यात दोन दोन खेळ एक चिवडा तर दुसरी भेळ!!! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस
ब
बॅटमॅन Wed, 03/05/2014 - 12:10 नवीन
एकाच मुद्यात दोन दोन खेळ एक चिवडा तर दुसरी भेळ!!! कशाचा कशाला नाही मेळ हाताला लागलं फक्त केळ ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/05/2014 - 12:58 नवीन
@हाताला लागलं फक्त केळ >>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मंदार दिलीप जोशी Fri, 03/07/2014 - 07:20 नवीन
पण त्यातलं तज्ञ सापडत नाही म्हणून त्या शास्त्रालाच खोटं ठरवणं चुकीचा आहे असं मला वाटतं. बरोबर !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस
क
कवितानागेश Wed, 03/05/2014 - 12:27 नवीन
'परीक्षा' याबाबतची फक्त एक दोन छोटी छोटी उदाहरणं देते. शाळेतल्या मुलांसाठी (५वी व ८वी) एक गणिताची परीक्षा आहे. विशेषतः अंकगणिताची. प्रज्ञा परीक्षा. त्याला आधी एक प्राविण्य परीक्षा घेउन मुले निवडली जातात. फायनल परीक्षेला जी बसतात त्यापैकी २० मध्ये १ अश्या प्रमाणात पास होतात. अशा वेळेस अंकगणिताला आपण 'थोतांड' ठरवत नाही. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एक राज्यपातलीवरची भौतिकशास्त्राची परीक्षा घेतली जाते. त्यातून फक्त पहिल्या १% मुलांना सर्टिफिकेट मिळतं. बाकीच्यांना काही नाही. त्या परीक्षेला बसलेल्या मुलांच्या मार्कांची सरासरी काढली तर ती सुद्धा ५०% च्या खाली जाईल. पण आपण भौतिकशास्त्र 'थोतांड' ठरवत नाही. ;) ..... ...... कारण आपल्याला माहित असतं (पक्षी:कबूल असतं!) की हे विषय गुंतागुंतीचे आहेत! पण ज्योतिषदेखिल गुन्तागुन्तीचे आहे हे लक्षात घेण्याइतकादेखिल त्याचा अभ्यास फारसा कुणी केलेला नसतो. कारण ते जुने आहे!! :D तसेही मधल्या काळात या शस्त्राचा इतका र्‍हास झाला आहे की लग्नासारख्या गोष्टीत फक्त चंद्र नक्षत्र बघितले जाउ लागले, आणि बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाउ लागले. फक्त चंद्र बघणे/ फक्त नाड बघणे ही केवळ आळशीपणाची हद्द आहे. त्यामुळे ऑलरेडी हे शास्त्र लयालाच गेले आहे. चाचण्या घ्या अथवा घेउ नका, हे ज्ञान बुडालेलं आहेच. असो. राहता राहिलं फसवणुकीबद्दल. एकजण अडचणीत आहे असं पाहिल्यावर दुसरा ताबडतोब त्याची अडचण वाढवून स्वतःचा फायदा घ्यायला बघतो. मनुष्यस्वभाव 'बनेल'च आहे. अगदी ८-१० वर्षाची भावंड देखिल एकमेकांना 'आईला नाव सांगेन' म्हणून ब्लॅकमेल करुन गैरफायदा घेताना दिसतात. 'अभ्यासात मदत करतो. बदल्यात तुझ्याकडची अमुकतमुक वस्तू मला दे गपचुप'. असे कुठलंही मोठं भावंड लहान भावंडाला करताना दिसेल. थोडक्यात, गैरफायदा घेणं हा माणसाचा स्वभाव आहे. त्याला कुठलेतरी निमित्त मिळतंच. शिवाय, ज्या समाजांमध्ये ज्योतिष वगरै नाही, तिथे नखशिखांत प्रामाणिकपणा दिसतो का? आज ज्योतिष आहे, उद्या अजून काहितरी असेल... माणूस दुसर्‍याला फसवायचा थांबणार नाही.
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Wed, 03/05/2014 - 13:03 नवीन
त्यापैकी २० मध्ये १ अश्या प्रमाणात पास होतात. अशा वेळेस अंकगणिताला आपण 'थोतांड' ठरवत नाही
ढ विद्यार्थ्यांमुळे विषय थोतांड ठरत नाही हे खरे. नापास होणार्‍या सर्वच ज्योतिष्यांना 'ढ' ठरवुन किती वेळ ज्योतिषशास्त्राची पाठराखण करणार?? आणि अशाप्रकारे जर जगात एकही ज्योतिषी हुषार ठरणार नसेल तर ज्योतिष हे 'मृतशास्त्र' म्हणून आत्ता ज्योतिषाचा व्यवसाय करणार्‍या व्यक्तिंचा बुरखा का फाडु नये??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
आ
आबा Wed, 03/05/2014 - 17:42 नवीन
सप्रे साहेब, "कुंडलीवरून भविष्य ठरू शकतं" हा दावा तपासण्यासाठी ज्योतीषशास्त्राच्या ज्ञानाची गरजच नाही १) सारख्या कुंडल्या असलेल्यांच्या आयुष्यात एकाच प्रकारच्या घटना घडतात का? २) ज्यांच्या आयुश्यात सारख्या घटना घडतात त्यांच्या कुंडल्या एकाच प्रकारच्या असतात का? या "दोन्हीं"ची उत्तरे "हो" आहेत का हे पहावं लागेल... यासाठी ज्योतिषाचं नॉलेज लागतच नाही.. घाटपांडेंच्या अहवालातून दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी मिळतंय... त्यामुळे पुढच्या चाचण्यांची गरजचं नाही ती चाचणी मुद्दामच अशी तयार केली आहे की जिच्या निकालावर ज्योतिष्यांच्या ज्ञानाचा काहीही परिणाम होणार नाही. मी म्हैस यांना हेच सांगायचा प्रयत्न करतोय. असो, याचाचणीत पास होणं ही पहिली स्टेप झाली... भविष्य वर्तवण्याचं मॉडेल तयार करण ही फार नंतरची गोष्ट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 03/06/2014 - 06:49 नवीन
तुमचे मुद्दे बरोबरच आहेत.. पण आत्ताच्या ज्योतिषांना ज्ञान नाही.. ज्यांची चाचणी घेतली ते भोंदु आहेत अशा कुशंकांना उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय मी.. जर कोणीच पास होत नाही तर सध्या जगात ज्योतिषाचे ज्ञान असणारं कुणीच नाही .. असं असेल तर व्यवसाय करणारे सगळेच भोन्दु..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
ब
बॅटमॅन Wed, 03/05/2014 - 13:07 नवीन
जयंत नारळीकर, घाटपांडेकाका, इ. लोकांच्या जॉइंट पेपरबद्दल काय मत आहे? http://www.currentscience.ac.in/Downloads/article_id_096_05_0641_0643_0.pdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश Wed, 03/05/2014 - 14:11 नवीन
त्याच अहवालाबद्दल तर सुरु आहे चर्चा. ( ती कपाळावर हात मारणारीस्मायली आहे का कुठे?) असो. माझं या अहवालाबद्दलचं मत 'बाबावाक्यम प्रमाणम' असं आहे. =)) अवांतरः या धाग्यावर जेम्स रॅन्डी आणि अब्राहम कोवूर यांचं नाव अजून आलं नाहीये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/05/2014 - 14:19 नवीन
ओके. सिलेक्शन बायसचा आरोप करावयाचा झाला तर तो दोन्ही बाजूंनी करता येतो. :) अन तुझ्या प्रतिसादात 'ज्योतिषाचा र्‍हास' अन काही अनरिलेटेड उदा. यांची सांगड घालून ज्योतिषाचे छुपे समर्थनच दिसते आहे. त्यापलीकडे हाती काहीच लागत नाही. मुळात ती उपमा वेल-फॉर्म्ड नाहीच्चे. असो. ज्योतिषात इतके वाद आहेत की सांगता पुरवत नाही. एकदा प्रेडिक्शनची मानके काय ती नीट ठरवा तरी, च्यायला यांचंच आपापसात धड नाही आणि वर इतरांनी चुका दाखवल्या की ओरडायचे याला काय अर्थ आहे? हे तुला उद्देशून बोलत नाहीये. काही ज्योतिषांना दाखवल्यावर असे म्हणाल्याची उदा. ठौक आहेत त्याबद्दल म्हणालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
आ
आबा Wed, 03/05/2014 - 15:32 नवीन
व्यक्तीनिरपेक्षता असावी असंच म्हणतोय की हो मी ताई, ज्योतिषी कसा आहे याची परिक्षा घ्यायचीच नाहीये आपल्याला (म्हणजे घाटपांडेंना) असं बघा... ज्योतिषशास्त्रातील मूलभूत गृहीतक असं आहे की, "आकाशातल्या ग्रहांच्या आपल्या जन्माच्या वेळच्या आभासी स्थितीवरून आपले भविष्य निश्चित होते"... ही आभासी स्थिती नोंदवण्याची पद्धत म्हणजे कुंडली मांडणे, ही कुंडली कोणीही मांडू शकतो त्यात काही विषेश नाही आता यावरून जर ज्योतिषशास्त्र खरं ठरवायचं असेल तर खालील अटी पूर्ण व्हाव्या लागतील १) भविष्य वर्तवण्याचं तंत्र सारख्या परंतू दोन वेगळ्या व्यक्तींच्या कुंडल्यांवर वापरलं असता, एकच उत्तर यायला हवं २) भविष्य वर्तवण्याचं तंत्र एकाच कुंडलीवर दोन वेगळ्या व्यक्तींनी वापरलं असता एकच उत्तर यायला हवं (हेच तुम्हीही म्हणताहात) ३) हे तंत्र सर्व कुंडल्यांसाठी वापरता यायला हवं. (ज्या कुंडली साठी वापरता येणार नाही तीजसाठी रिप्रोड्युसीबल कारण देता यावं) ४) आणि हे तंत्र फॉल्सीफायेबल असावं हे झाले प्राथमिक चाचणी साठीचे निकष, प्रत्येक ग्रहाचा वेगवेगळा परिणाम तपासणारी चाचणी जास्त काँप्लीकेटेड असेल, पण करता येणं शक्य आहे... आता इथून पुढच्या पॅराग्राफ कडे दुर्लक्ष केलं तरी चालेल... आता प्रोब्लेम असा होतो की, कुंडली मांडेपर्यंत सर्व ठीक आहे, कोणालाही करता येईल. भविष्य वर्तवण्याचं रिप्रोड्युसीबल "तंत्र" मात्र कोणी सांगत नाही. "गुरूकृपा असावी लागते", "देवावर विश्वास असावा लागतो" अशी अक्षरशः काहीही उत्तरं मिळतात, मुद्दा असा आहे गुरूकृपा वगैरे लागत असेल तर दुसरी अट पूर्ण होत नाही. ब्लॅकमेलींग किंवा गैरफायदा घेण्याची वृत्ती यावर काही लिहीत नाही, विषयांतर होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ब
बॅटमॅन Wed, 03/05/2014 - 18:21 नवीन
तहे दिल से सहमत. अन 'काही ज्योतिषांमुळे पूर्ण शास्त्राला बोल लावता येत नाही' असे म्हणायचे असेल तर घाटपांडेकाका अन नारळीकरांना सगळे बोगस ज्योतिषीच भेटले होते असे म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
आ
आबा Wed, 03/05/2014 - 18:33 नवीन
मी जास्त जनरल दावा करतोय... सप्रेंना दिलेलं उत्तर इथे पण देतो "कुंडलीवरून भविष्य ठरू शकतं" हे कोरिलेशन तपासायचं आहे त्यासाठी १) सारख्या कुंडल्या असलेल्यांच्या आयुष्यात एकाच प्रकारच्या घटना घडतात का? २) ज्यांच्या आयुश्यात सारख्या घटना घडतात त्यांच्या कुंडल्या एकाच प्रकारच्या असतात का? या "दोन्हीं"ची उत्तरे "हो" आहेत का हे पहावं लागेल... यासाठी ज्योतिषाचं नॉलेज लागतच नाही.. घाटपांडे एट ऑल. मधली चाचणी अशीच आहे की जिच्या निकालावर ज्योतिष्यांच्या ज्ञानाचा काहीही परिणाम होणार नाही. या चाचणीत पास झालं तर फक्त कोरीलेशन आहे हे कळेल भविष्य वर्तवण्याचं मॉडेल तयार करणं ही फार नंतरची गोष्ट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/05/2014 - 18:49 नवीन
काहीएक एरर मार्जिन अलाउ करूनही हे मॉडेलच्या चौकटीत बसवणे मुष्किलच नै तर नामुमकिन आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
आ
आबा Wed, 03/05/2014 - 18:53 नवीन
शिवाय नुसतं कोरीलेशन कळून मॉडेल तयार करताही येणार नाही मॉडेल साठीची समीकरणे लिहायला.. "ग्रहांचा आयुष्यावर का (आणि किती) परीणाम होतो" याचा साधा नियम माहीत पाहीजे या बाबतीत अंधार आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/05/2014 - 18:55 नवीन
अगदी अगदी!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
म
मंदार दिलीप जोशी Fri, 03/07/2014 - 07:22 नवीन
चर्चचे सार आले आहे या प्रतिसादात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
स
सुबोध खरे Wed, 03/05/2014 - 14:57 नवीन
राहवत नाही म्हणून लिहित आहे. आतापर्यंत लोक फक्त फायदा होतो किंवा नाही या बद्दल लिहित आले. ज्योतीष शास्त्रामुळे( ज्योतीषांमुळे) अपरिमित नुकसान झालेल्या दोन मी स्वतः पाहिलेल्या घटना लिहित आहे. १) नौदलाचे हेलीकोप्तर गोव्याजवळ समुद्रात कोसळले आणि दोन्ही वैमानिक बेपत्ता होते. नौदलाच्या पाणबुड्यांनी ते समुद्रात जेथे बुडाले तेथे त्याचे अवशेष शोधून काढले. मधल्या कालावधीत एका वैमानिकाच्या बायकोला एका ज्योतिषाने सांगितले कि तुमचा नवरा कुठल्यातरी किनार्याला लागला आहे आणि बेशुद्ध आहे तुमची ग्रह दशा सुधारली कि परत येईल. या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली आणि अपघातीमृत्यू म्हणून दोन्ही पायलटच्या बायकांना विमा, निवृत्तीवेतन, प्रोवीडंट फंड असे सर्व आर्थिक लाभ देण्याची वेळ आली त्यावेळी या बायकोने आपले यजमान मृत आहेत हे स्वीकारण्याचे नाकारले. जोवर ती त्या चौकशी अहवालाचा स्वीकार करीत नाही तोवर तो सैनिक( अधिकारी) missing in action(कामाच्या अनुषंगाने बेपत्ता) म्हणून मानावे लागते आणि बायकोला सात वर्षे पर्यंत अर्धाच पगार मिळतो आणि बाकी सर्व अनुषंगिक फायदे सात वर्षे पर्यंत मिळत नाहीत. नौदलाच्या पाणबुड्यांनी त्या अपघात केलेल्या कसून तपासणी मध्ये तेथे समुद्रात एक मूत्रपिंड आणि आतड्यांची काही वेटोळी सापडली होती. ती चौकशीसाठी जपून ठेवलेली होती.त्या अवशेषांची डी एन ए चाचणी केली गेली. त्या वैमानिकाच्या वडिलांचे डी एन ए त्या मूत्रपिंडातील आणि आतड्यातील पेशींच्या डी एन ए शी जुळले आणि त्यानंतर त्या वैमानिकाच्या वडिलांनी आपला मुलगा मृत झाला आहे हे मान्य केले आणि आपल्या सुनेलाही समजावले आणि या कहाणीवर पडदा पडला. सुदैवाने दुसर्या वैमानिकाच्या बायकोने हा अपघात मान्य केलेला होता( तिच्या यजमानांचे अवशेष सापडले नाहीत). जर पहिल्या वैमानिकाचे अवशेष जुळेल नसते तर सात वर्षे तिच्या मुलांना अर्ध्या पगारावर कोणतेही फायदे न मिळता जगावे लागले असते. शिवाय जोवर नवरा मृत घोषित होत नाही तोवर अनुकंपा तत्वावर बायकोला नोकरी देत आली नसती. आज ती नौदलाने दिलेले पूर्ण आर्थिक फायदे आणि नोकरी करून मुलांचे शिक्षण पुरे करू शकत आहे( नवरा गेल्याचे दुक्ख आयुष्यभराचे आहे पण त्याला कोणी काही करू शकत नाही. २) मी मुंबईतील एका मोठ्या कोर्पोरेट रुग्णालयात काम करीत असताना एक निम्न मध्यमवर्गातील रुग्ण हृदयविकाराच्या झटक्यानंतर भरती झाला. तो प्रथम एका छोट्या रुग्णालयात भरती झाला होता तेथून त्यांनी तातडीने आमच्याकडे त्याला हलविले दुर्दैवाने याला आलेला झटका इतका मोठा होता कि त्याला आणेपर्यंत तो बेशुद्ध होता आणि त्याचा मेंदू मृत झाला होता. सर्व उपाय करूनही फारसा फायदा झाला नव्हता.त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास चालू होता. आता त्याला व्हेन्टीलेटर वरून काढण्यासाठी नातेवाईकांची परवानगी आवश्यक होती. मधल्या काळात त्यांना एका ज्योतिषाने सांगितले आहे कि त्यांच्या कुंडलीत मृत्युयोग नाही. यामुळे त्या रुग्णाच्या बायकोने कृत्रिम श्वासोच्छ्वास चालू ठेवा असे सांगितले. मोठ्या रुग्णालयात अती दक्षता विभागात बिल फार झपाट्याने वाढत जाते. जेंव्हा त्या बायकोच्या खिशातील( उधार आणलेले इ ) सर्व पैसे संपले तेंव्हा मोठ्या मुश्किलीने तिने कृत्रिम श्वासोच्छ्वास बंद करण्यासाठी परवानगी दिली. यावेले पर्यंत तिच्या खिशातुन जवळ जवळ चार लाख रुपये खर्च झाले होते. तिला आणल्या दिव्शीच स्पष्टपणे सांगितले होते कि नवर्याचा मेंदू मृत झाला आहे तेंव्हा उगीच पैसे खर्च करून फायदा नाही. पण ज्योतिषावर विश्वास ठेवल्यामुळे तिचे अपरिमित नुकसान झाले. हेच चार लाख रुपये तिला फार मोलाचे होते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 03/05/2014 - 15:13 नवीन
दुहेरी नुकसान योग होता असा तर्क आणखी एक ज्योतिषी काढेल .आडांख्यांचा आधार घेऊन किती चालायचे याचे तारतम्य हवेच .
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 03/05/2014 - 18:32 नवीन
माझ्या कल्पनेपलिकडे वाट लागलिये!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/06/2014 - 06:52 नवीन
कशाची ज्योतिषाची ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश गुरुवार, 03/06/2014 - 08:29 नवीन
लोकांच्या ज्योतिषाबद्दलच्या कल्पनांची.... असो. मला समाजप्रबोधन करण्यात इन्टरेस्ट नाही. ...हर एक दुजेसे ज्यादा सयाने है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/06/2014 - 08:32 नवीन
लोकांच्या ज्योतिषाबद्दलच्या कल्पनांची....
त्या पेपरमध्ये नक्की काय चूक आहे ते सांग गं. लोकांच्या कल्पनांशी करायचेय काय? लोक तर बह्वंशी मूर्खच असतात. समाजप्रबोधन वैग्रे जाऊदे खड्ड्यात. तो तीन पानांचा पेपर नक्की कुठे चुकला आहे इतकं समजलं तरी बास आहे आमच्यासारख्यांना. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
म
म्हैस गुरुवार, 03/06/2014 - 08:21 नवीन
अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता हसण्यापेक्षा नक्की काय म्हणायचं ते सांगा. चाचणी 'ज्योतिषांची' आहे कि 'ज्योतिष शास्त्राची' ? लीमाउजेट चा 'ज्याम कंटाळा येतोय, तरी लिहितेय..' हा प्रतिसाद वाचा. मला जे म्हणायचं तेच exactly त्यांनी म्हनला आहे .
डॉक्टरची परिक्षा दुसरा डॉक्टर करू शकतो याच कारण असं की "मेडिकल सायन्स" हे शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध होउन मान्यताप्राप्त झालं आहे.
शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध करणारे त्या विषयातले तज्ञ असावे लागतात न. दुसरी गोष्ट अशी कि चाचण्या घेताना त्यासाठी काही माध्यम असावी लागतात. जसा कि ह्या केमिकल मध्ये ते केमिकल मिसळला कि हे तयार होतं. इथे हि केमिकल्स माध्यम म्हणून काम करतात . तसा फलज्योतिष शास्त्राची चाचणी घेण्यासाठी अशी कोणतीही माध्यम उपलब्ध नसतात. मग ती कशी करायची ?
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य गुरुवार, 03/06/2014 - 08:48 नवीन
तुम्हाला घडणार्‍ञा गोष्टी मनासारख्या वाटत नसल्याप्रमाने का उत्तरे लिहताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/06/2014 - 08:51 नवीन
@अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता हसण्यापेक्षा नक्की काय म्हणायचं ते सांगा. >>> आधी तुंम्ही घाटपांडे काकांचा ब्लॉग अख्खा वाचा! मग कदाचित तुंम्हाला आमच्या हसण्याचे कारण कळेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/06/2014 - 09:46 नवीन
असेच म्हणतो. बर्डन ऑफ प्रूफ ज्योतिषांवर असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
आ
आबा गुरुवार, 03/06/2014 - 13:50 नवीन
ठीक आहे परत लिहितो, ज्योतिष शास्त्राचं मॉडेल तयार करणे, आणि ते तज्ञांकडून तपासणे, ही फार नंतरची गोष्ट झाली "आकाशातील ग्रहतार्‍यांच्या आपल्या जन्माच्या वेळी असलेल्या भासमान स्थितीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो" फक्त हा दावा तपासायचा आहे... त्यासाठी प्रचंड ज्ञानाची गरज नाही, फक्त १) सारख्या कुंडल्या असलेल्यांच्या आयुष्यात एकाच प्रकारच्या घटना घडतात का? २) ज्यांच्या आयुश्यात सारख्या घटना घडतात त्यांच्या कुंडल्या एकाच प्रकारच्या असतात का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे "हो" आहेत का हे पहावे लागेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/06/2014 - 16:29 नवीन
>>> १) सारख्या कुंडल्या असलेल्यांच्या आयुष्यात एकाच प्रकारच्या घटना घडतात का? एक उदाहरण देतो. माझ्या ओळखीचे एक जुळे भाऊ-बहीण आहेत. दोघेही काही मिनिटांच्या अंतराने जन्माला आले. त्यांच्या कुंडल्या अर्थातच बहुतेक सारख्या आहेत. त्यांच्या आयुष्यातील मला आढळलेले साम्य - (१) दोघांनीही एकाच महाविद्यालयातून शास्त्र शाखेत पदवी घेतली (भावाने भौतिकशास्त्रात व बहिणीने संख्याशास्त्रात. द्वितीय वर्षापर्यंत दोघांचेही सर्व विषय समान होते. फक्त शेवटच्या वर्षात विषय बदलले.) (२) दोघांनीही विद्यापीठात संगणक शास्त्राच्या मास्टर्स पदवीची प्रवेश परीक्षा दिली. दोघांनाही प्रथम यादीत प्रवेश मिळाला नाही. दोघेही प्रतिक्षा यादीत होते. कालांतराने बहिणीला कसाबसा प्रवेश मिळाला. भावाला न मिळाल्यामुळे त्याने बाहेरून संगणक प्रशिक्षण घेतले. (३) दोघांनीही माहिती तंत्रज्ञान विषयात करिअर केले. (४) दोघेही लग्नानंतर अमेरिकेत एकाच शहरात स्थायिक झाले आहेत. (५) दोघांनाही एकच अपत्य आहे. (६) दोघांचेही लग्न मुलगा/मुलगी पाहून, ठरवून झाले. दोघांचेही जोडीदार त्यांच्याच जातीतलेच आहेत. अजून एक उदाहरण आहे. दोन भिन्न कुटुंबातील महिलांचा जन्मदिवस एकच आहे. जन्मवेळ नक्की माहिती नाही. पण दोन तासांच्या फरकाने जन्मलग्न बदलते. त्यामुळे कुंडली काही प्रमाणात एकच व काही फरक आहेत. (१) दोघीही पुणे शहराच्या आसपास जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या. (२) दोघी हिंदी व मराठी हेच विषय शिकवत होत्या. (३) दोघीही वर्णाने सावळ्या, दिसायला सर्वसाधारण व चष्मा होता. (४) दोघीही दिर्घायुषी आहेत. >>>> २) ज्यांच्या आयुश्यात सारख्या घटना घडतात त्यांच्या कुंडल्या एकाच प्रकारच्या असतात का? अशांच्या कुंडलीत काही ग्रहयोग एकसारखे असतात. घटस्फोट, शिक्षण, काही विशिष्ट रोग्/आजार हे अशी विशिष्ट ग्रहस्थिती असलेल्या बहुसंख्य कुंडल्यात दिसून येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
आ
आबा गुरुवार, 03/06/2014 - 16:53 नवीन
एक्झॅक्टली हेच टेस्ट करायचय (आणि उलटं सुद्धा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बाळ सप्रे Fri, 03/07/2014 - 07:06 नवीन
दोघेही काही मिनिटांच्या अंतराने जन्माला आले. त्यांच्या कुंडल्या अर्थातच बहुतेक सारख्या आहेत.
या उदाहरणावरुन या जुळ्यांचे भविष्य बर्‍यापैकी सारखे ठरले याला समान कुंडली (पक्षी- त्यावेळची ग्रहस्थिती सारखी होती) हे कारण अजुनही सिद्ध होत नाही. कुंडलीपेक्षा ज्या वातावरणात वाढले त्यातील समानता, एकमेकांवरील प्रभाव ही कारणे जास्त योग्य वाटतील. याउलट त्याच वेळी जन्मलेल्या इतर मुलांच्या भविष्यातील समानता दाखवता येईल का ?? तरच हे सिद्ध होउ शकेल . त्यातही consistency हवीच.. जी जुळ्यांच्या उदाहरणात देखिल नाहिये.. कारण जीवनात समानता नसणारी कित्येक जुळ्यांची उदाहरणे पहायला मिळतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/07/2014 - 08:02 नवीन
>>> या उदाहरणावरुन या जुळ्यांचे भविष्य बर्‍यापैकी सारखे ठरले याला समान कुंडली (पक्षी- त्यावेळची ग्रहस्थिती सारखी होती) हे कारण अजुनही सिद्ध होत नाही. कुंडलीपेक्षा ज्या वातावरणात वाढले त्यातील समानता, एकमेकांवरील प्रभाव ही कारणे जास्त योग्य वाटतील. याउलट त्याच वेळी जन्मलेल्या इतर मुलांच्या भविष्यातील समानता दाखवता येईल का ?? तरच हे सिद्ध होउ शकेल . त्यातही consistency हवीच.. जी जुळ्यांच्या उदाहरणात देखिल नाहिये.. कारण जीवनात समानता नसणारी कित्येक जुळ्यांची उदाहरणे पहायला मिळतात.. याकडे बघण्याचे पूर्णपणे परस्परविरोधी दृष्टिकोन असू शकतात. माझ्या दृष्टीने या जुळ्या मुलांची आयुष्ये म्हणजे एकाच स्थानकातून एकाचे वेळी सुटलेल्या व एकाच दिशेने व एकाच गतीने जाणार्‍या दोन शेजारच्या रुळांवरील गाड्या आहेत. दोघांचीही आतापर्यंतची आयुष्ये जवळपास एकसमान घटनांनी भरलेली आहेत. हा योगायोग आहे असाही काही जणांचा दृष्टीकोन असू शकेल. पण एकाच घरातील जुळ्या नसलेल्या भावंडांची आयुष्ये समान वातावरणात वाढून सुद्धा पूर्णपणे भिन्न असलेली अनेक उदाहरणे पाहण्यात आहेत. त्यामुळे एकाच घरात जन्मलेली जुळी मुले व जुळी नसलेली मुले यांची तुलना केली तर जुळ्या मुलांचे आयुष्य बरेचसे एकसारखे दिसते पण जुळ्या नसलेल्या मुलांची आयुष्ये बरीचशी भिन्न असतात असा निष्कर्ष काढता येईल व त्यासाठी ग्रहस्थिती कारणीभूत आहे असेही म्हणता येईल. (जुळ्या मुलांचे अजून एक उदाहरण म्हणजे पोलिसदलात उच्च पदावर गेलेले जुळे अवस्थी बंधू). मी दिलेल्या दुसर्‍या उदाहरणात दोन भिन्न कुटुंबात एकाच दिवशी एकाच शहरात जन्मलेला दोन महिलांची माहिती दिली आहे. त्यांची प्रत्यक्ष जन्मवेळ मला माहीती नाही परंतु जन्मदिवस एकच आहे. त्यांच्याही आयुष्यात बराचसा सारखेपणा दिसलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Fri, 03/07/2014 - 08:09 नवीन
हा योगायोग आहे असाही काही जणांचा दृष्टीकोन असू शकेल
जेव्हा एकाच वेळी जन्मलेल्या अनेक मुलांचे भविष्य सारखे दाखवता येईल तेव्हा तो नियम ठरेल .. तिथपर्यंत तो योगायोगच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/07/2014 - 08:23 नवीन
माझा ज्योतिषशास्त्राचा थोडासा अभ्यास आहे. त्यावरून हे मी नक्की सांगू शकतो की ग्रहस्थितीचा जीवनावर नक्कीच परीणाम होतो. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्यानुसार त्या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये दिसून येतात व ती रास त्या व्यक्तीची जन्मरास समजली जाते. उदा. जन्माच्या वेळी मिथुन राशीत चंद्र असेल तर ती व्यक्ती मिथुन राशीची असते. मिथुन राशीच्या व्यक्ती बोलण्यात अतिशय चतुर, बोलक्या व अत्यंत धारदार, जिव्हारी लागेल अशा बोलणार्‍या असतात. कन्या रास असणारे बहुतेक नास्तिक आढळतात तर मीन व कर्क राशीच्या व्यक्ती अत्यंत श्रद्धाळू, देवभोळ्या अशा असतात. वृषभ व तूळ या दोन्ही रसिक राशी, पण वृषभ हे शृंगारिक रसिक असतात व तूळवाले कलाप्रेमी असतात. कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावावरून त्या व्यत्कीची जन्मरास ओळखता येते तसेच कोणत्याही व्यक्तीच्या राशीवरून त्या व्यक्तीचा स्वभाव समजतो. या अगदी प्राथमिक गोष्टी झाल्या. याचा काय उपयोग आहे? जन्मवेळच्या ग्रहस्तिथीचा व नंतर तत्कालीन ग्रहस्थितीचा आयुष्यावर नक्कीच प्रभाव पडतो व त्यानुसार आपली दिशा ठरवायला मदत होते. उदा. पोलिस इन्स्पेक्टर हा कधीही मीन/कर्क अशा मृदु स्वभावाच्या राशींचा नसावा. त्यासाठी मेष, मकर अशा राशींच्या कर्तव्यकठोर व धाडसी व्यक्तीच योग्य ठरतात. मिथुन राशीच्या व्यक्तींशी वाद घालण्याच्या भानगडीत पडू नये. मी पूर्वी एक हलकाफुलका लेख लिहिला होता. वेळ असल्यास जरूर वाचावा. http://www.misalpav.com/node/24104
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
ब
बाळ सप्रे Fri, 03/07/2014 - 08:32 नवीन
ही राशीनुसार स्वभाववैशिष्ट्ये ही हलकाफुलका लेख वाचण्यापुरतीच ठीक असतात. :-) त्याहुन जास्त त्यात तथ्य नसते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/07/2014 - 18:18 नवीन
:smile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
म
म्हैस गुरुवार, 03/06/2014 - 12:52 नवीन
घाटपांडे काकांच्या ब्लोग वर हसताय होय. मग ठीक आहे.
तुम्हाला घडणार्‍ञा गोष्टी मनासारख्या वाटत नसल्याप्रमाने का उत्तरे लिहताय ?
अहो नाहीच वाटत मला घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या. तुम्हाला प्रतिसाद समजलं नसेल तर सोडून द्या. ज्याला उद्देशून लिहिलंय त्याला समजलं ना मग बास
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/06/2014 - 13:02 नवीन
@घाटपांडे काकांच्या ब्लोग वर हसताय होय. मग ठीक आहे. >>> अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र..........म्हशी, वाचायला'च येत नाही होय अजुन? मग र्‍हायलं! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस
आ
आत्मशून्य गुरुवार, 03/06/2014 - 14:55 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस
आ
आत्मशून्य गुरुवार, 03/06/2014 - 14:58 नवीन
अहो नाहीच वाटत मला घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या.
जरा नामस्मरण वाढवा मग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
च
चौकटराजा गुरुवार, 03/06/2014 - 15:52 नवीन
पूर्वीच्या काळी लोकाना आजच्या सारखे बरेच उद्योग वगैरे काही नसत. वीजेचा शोध लागलेला नव्हता. रात्री टीव्ही बघण्याची सिनेमाच्या तिसर्‍या शो ची काही सोय नव्हती. तीन पाळ्यात काम कारणारे कारखाने ही नव्हते. आजच्या सारखी सामान्य लोकात बर्यापैकी देखील सुबत्ता नव्हती. मग माणसाने एक करमणूक शोधून काढली.रात्री आकाशात तासंतास डोळे लावून पहात रहायचे. त्यात बदल काय होतात हे समजून घ्यायचे. विज्ञानातील प्रगति यथातथाच असल्याने मानवी जीवनात घडणार्‍या अनेक घटनांचा अर्थ लावता येत नसे. सबब एका बाजूला आपले जीवन कसे घडत असेल या मागे पृथेवीवरील घटकांखेरीज काही घटक बद्ल घडवून आणत असतील काय अशा उत्सुकतेपायी आकाशातील हालचाल व आपले नशीब यांचा संबंध आहे असा ग्रह मानवाने करून घेतला. मग जलद हालचाल कोण करतो तर चंद्र . म्हणून चंद्राला रास ठरवण्यात महत्व प्राप्त झाले. कारण त्याची हालचाल जास्तीत जास्त कॉम्बेनेशन निर्माण करू शकते. मग कोण लुकलुकतात कोण नाही यावरून ग्रह व तारे, तसेच कधीतरी उगवणारे धूमकेतू यांचा प्रवेश या कोम्बीनेशन मधे झाला. हळू चालणारा शनि , वर आकाशात कधीही न येणारे बुध व शुक्र व बाकीचे असा फरक समजून आला. मग आणखी निरूद्योगी लोकानी युती, प्रतियुती, दशा महादशा असल्या गोष्टी घुसडवून हे शास्त्र जीवनाइतकेच अतर्क्य करून टाकले. तार्‍याना या तथाकथित शास्त्रात काहीही महत्व नाही कारण त्यांचे अचलत्व.बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने तारकाना महत्व मिळणे शक्य नव्हते. मग त्यांचा उपयोग फक्त एखाद्या नाटकात मागचा पडदा असतो त्याप्रमाणे नक्षत्रांच्या आकृती ग्रह्स्थानांच्या संदर्भासाठी झाला. आज जगातील एकूण लोकसंख्येचा विचार केला तर अस्तिकांची व जोतिष शास्त्रावर विश्वास न ठेवणार्‍यांची संख्या जास्त आहे. नस्तिकांचा या शास्त्रावर अबलंब जवळ जवळ शून्य असतो. पण देव मानणारे देखील फालतू कारणासाठी पूर्वीसारखे पंचांग हातात घेऊन आज काय आमावास्या आहे का शनिवार आहे का वाईट दिवस आहे का, खरेदी करू का असे काही पहात बसत नाही. एकच प्रयोग करून पाहाण्यासारखा आहे. गुरूपुष्यामृत नसतानाही सोने स्वस्त करून पहा खरेदी होते की नाही ते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा