Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुजरात विकासाचे मृगजळ..

ब
बंडा मामा यांनी
Wed, 03/05/2014 - 19:45  ·  लेख
लेख
अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे. संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे. प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते. त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. भरपूर आकडेवारीही दिलेली आहे. केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे. लेख इथे वाचा: http://www.frontline.in/the-nation/mirage-of-development/article4430889.ece तातील काही तक्ते: chart chart chart आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.

प्रतिक्रिया द्या
32283 वाचन

💬 प्रतिसाद (163)

प्रतिक्रिया

क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 03/07/2014 - 13:03 नवीन
"मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद"
हा हा हा!!!!! महाराष्ट्राच्या गावभागात ""मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद" असाच कारभार आहे. आणि आम्हाला विकास करायला परत सत्ता द्या म्हणणारे सद्ध्याचे सत्ताधारी आहेतच की. साठ पासष्ठ वर्षात नको ते दिवे लावले, जे लावणं अपेक्षित होतं तेवढे मात्र सोयीनी विसरले गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 03/06/2014 - 12:31 नवीन
केजरीवाल हे परकीय यंत्रणेचे हस्तक आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. आमदारकीची लॉटरी लागल्यावर त्यांनी दिल्लीच्या लोकांना अचानक वार्यावर सोडून आपल्या लोकांना आता लोकसभेच्या उमेदवारीसाठी उभे करत आहे. गुजरात च्या लोकांनी मोदी ह्यांना तीनवेळा निवडून दिले म्हणजे एकहाती सत्ता दिली , अशी एकहाती सत्ता नेहरू व इंदिरा व सुरवातीला राजीव ह्यांना मिळाली मग सुरु झाली त्यांच्या पक्षांची अधोगती. आजतागायत जनतेने सलग तीन वेळा एकगठ्ठा मतदान केले नाही. मात्र राजकारणात देवाण घेवाण करण्यात ते विरोधकांच्या पेक्ष्या सरस ठरले म्हणूनच जमवाजमव करून कसेबसे सरकार बनवले , ह्या निवडणुकीत त्यांचे ९० टक्के सहकारी पक्ष जराशी संधी मिळाली तर तिसरी आघाडी स्थापन कार्रून स्वतःच्या पक्षाकडे जास्तीजास्त मलाईदार खाती पदरात पडून घेण्यात धन्यता मानतील. दरवेळी आकडेमोड दाखवून गुजरात च्या विकासाचे वाभाडे काढून सामान्य लोकांवर काहीही परिणाम होणार नाही. गुजरात मधील जनता ही सुजाण आहे , जे त्यांना कळले ते पुढच्या निवडणुकीत समस्त भारतात कळून येईल
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस गुरुवार, 03/06/2014 - 13:04 नवीन
आजतागायत जनतेने सलग तीन वेळा एकगठ्ठा मतदान केले नाही.
??? अहो, मध्य प्रदेशात, छत्तीसगडमधे भाजपाची तिसरी टर्म चालू आहे की! आसाम, मणीपूरमधे काँग्रेसची तिसरी टर्म चालू आहे. (जोडीनं संसार आणि सतत बदलणारे मुख्यमंत्री हे चालणार असेल तर महाराष्ट्र सुद्धा घेता येईल.)
ह्या निवडणुकीत त्यांचे ९० टक्के सहकारी पक्ष जराशी संधी मिळाली तर तिसरी आघाडी स्थापन कार्रून स्वतःच्या पक्षाकडे जास्तीजास्त मलाईदार खाती पदरात पडून घेण्यात धन्यता मानतील.
याचीच सर्वात जास्त भीती वाटतेय मला. छोटे/नवे पक्ष मते तरी खातील किंवा काही मोजक्या सीटस पटकावतील (ज्या घोडेबाजारात महत्वाच्या ठरतात). मग राष्ट्रीय पक्षांच्या उरलेल्या, एकमेकांच्या नेत्यांवर राळ उडवण्यात धन्यता मानणार्‍या उमेदवारांपैकी योग्य आकडा निवडून नाही आला तर आहेच मायनॉरीटी सरकार... आणि त्याचा इतिहास, त्याची परीणीती दोन्ही आपल्याला माहिती आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 03/06/2014 - 22:36 नवीन
अहो मणिपूर मध्ये तिसरी टर्म जर चालू आहे तर तेथील एखाद्या नेत्याला करावे की पंतप्रधानपदाचा उमेदवार बाकी भाजपच्या इतर राज्यात सुद्धा तिसरी टर्म चालू आहे, पण तेथे भाजपला व तेथील नेत्यांना प्रसार माध्यमांनी लक्ष्य केले नव्हते, मोदी ह्यांची दंगली वरून प्रचंड बदनामी करून त्यांना हिटलर ची उपमा देऊन ते परत परत निवडून आले आणि पंतप्रधान पदासाठी त्यांचे प्रभावी वक्तव्ये , पक्षासाठी निधी जमा करण्यासाठी कॉर्पोरेट जगताचा पाठिंबा , अनिवासी भारतीयांच्या मध्ये असलेली लोकप्रियता व अशी अनेक कारणे आहेत. गुजरात कश्यात मागे आहे हे काही विचारजंत प्रवृत्तीने कितीही वेळा सांगितले तरी मूळ विरोधी पक्ष व त्यांचे पाठीराखे प्रसारमाध्यमे ह्यांनी मोदी ह्यांना फक्त दंगलीवरून लक्ष्य करून एकप्रकारे जनतेत गुजरात मधील विकासाच्या मुद्याला अप्रत्यक्ष संम्मती दिली. खुद जे तथ्य ह्या लेखात मांडण्याचा प्रयत्न झाला ते काय केजरीवाल ह्यांना माहिती नसेल का पण त्यांनी गुजरात मध्ये अभ्यास दौऱ्या च्या नावाखाली एखादा टिपिकल नेता करतो तशी नौटंकी केली. उद्या भाजप असेही म्हणेन की ह्यांना अभ्यास दौर्यात काही विशेष आढळणार नाही असे कळल्यावर ह्यांनी उगाच बनाव रचला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
थ
थॉर माणूस Fri, 03/07/2014 - 07:16 नवीन
तर तेथील एखाद्या नेत्याला करावे की पंतप्रधानपदाचा उमेदवार
भारत आहे... अमेरीका नव्हे. भारतात संसदीय लोकशाही आहे अध्यक्षीय नव्हे. इथे पंतप्रधानपदाचा उमेदवार वगैरे जाहिर करणे काहीही गरजेचे नसते. निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात.
एखादा टिपिकल नेता करतो तशी नौटंकी केली.
आपला तो बाब्या, दुसर्‍याचं ते कार्ट हे सगळीकडेच होतं. नमो साहेबांनी त्या बिचार्‍या सिकंदरला बिहारपर्यंत ओढत आणला होता म्हणे, जवळपास प्रत्येक सभेत काहीतरी घोळ घालतात असं ऐकलंय. राहुलबाबांचं तर काय बोलायलाच नको. थोडक्यात काय, कुण्या एकाच्या बाजूने बोलायचं म्हटलं की इतरांच्या डोळ्यातली कुसळे दिसणारच. गुजरातची प्रगती झाली असेल, नक्कीच झाली असेल. पण फुगा प्रमाणाबाहेर फुगवल्यावर काय होतं हे मोदी समर्थकांना लक्षात येत नाहीये. सरकार फक्त भाजपाचे येणार नाही, NDA चं येणार आहे. मोदींना गुजरातमधे वाट्टेल ते करता आलं कारण तिथे भाजपा एकटे आहे. आता मोदी आलेतर हे असं मोठ्ठं अपेक्षांचं ओझं त्यांचेच समर्थक त्यांच्या पाठीवर टाकतायत. आणि त्यांच्या विरोधी पार्टीत बसणार्‍यांचं काम सोपं करतायत. उलट काँग्रेस आघाडीवर सध्या काहीच दबाव नाही. त्यांना आधीच माहिती आहे की त्यांच्या नावेला भोक पडलंय. त्यांना परत सत्तेत यायचं असेल तर जुगाडवाली बोटच वापरावी लागणार आहे. शक्यता कमीच आहे की ते परत येतील. २०० सीट मिळाल्या तरी डोक्यावरून पाणी. मते खाऊ पक्षांबाबत काय बोलणार? ते सत्तेत तर येणार नाहीत. पण समीकरणे बिघडवतील हे नक्की. आणि त्यात ते यशस्वी झाले तर परत अर्धवट कालावधीची सरकारे पहायची वेळ आलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … Sat, 03/08/2014 - 03:03 नवीन
@निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात. नेहरू , इंदिरा ह्यांच्या निधानंतर कर्तुत्ववान व अनुभवी मंडळीना डावलून राजकारणाचा फारसा अनुभव नसलेल्या व्यक्तीस केवळ तो एका विशिष्ठ घराण्याशी संबंधीत आहे म्हणून आपला प्रमुख निवडणे एवढे त्यांना जमते राजीव ह्यांच्या मृत्यूनंतर असेच होणार होते पण देशाच्या सुदैवाने अनुभवी नरसिंह राव ह्यांना प्रमुख केले व जे नेहरू व गांधी परिवाराने ह्यांनी आजतागायत भारतात होऊ दिले नाही ते ह्या माणसाने करून दाखवले , त्याची मधुर फळे भारतीय चाखत असतांना त्यांच्या मृत्युनंतर परत घात झाला. अनुभवी व्यक्तींना डावलून परत अनुभवी व्यक्तीस प्रमुख केले व पुढचे पाढे पंचावन केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत. त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. उद्या जर राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा आहेस की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/08/2014 - 05:41 नवीन
निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात. हे माझे अज्ञान असेल पण भारतात हे किती वेळा झालेले आहे याबद्दलची आकडेवारी वाचायला फार आवडेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
द
देव मासा गुरुवार, 03/06/2014 - 12:42 नवीन
वाचत आहे , सम्ब्र्हमाता ( sambrhamat ) पडलो आहे . खरे खोटे काही समजत नाही , एक शंका , विषयाला फाटे नाही पाडत पण जर आप खरच ढोंगी पक्ष आहे तर मग मेधा पाटकर ''आप'' पक्षाच्या तिकिटावर मुंबईत निवडणुक का लढवणार आहेत ?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 03/06/2014 - 12:50 नवीन
आप हा मिथ्यासमाजवादी, मिथ्याधर्मनिरपेक्षतावादी आणि मिथ्यासाम्यवादी लोकांचा प्रमुख पक्ष होणार आहे लवकरच. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक चांगले लोक यास बळी पडतील, आणिबाणीच्या वेळेस झाले तसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देव मासा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 03/06/2014 - 13:37 नवीन
आप हा मिथ्यासमाजवादी, मिथ्याधर्मनिरपेक्षतावादी आणि मिथ्यासाम्यवादी लोकांचा प्रमुख पक्ष होणार आहे लवकरच.
+११११११११......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
संपत गुरुवार, 03/06/2014 - 13:08 नवीन
मेधा पाटकर ह्यादेखील परकीय यंत्रणेचे हस्तक आहेत असे नरेंद्र मोदीनी अगोदरच सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देव मासा
व
विकास गुरुवार, 03/06/2014 - 13:25 नवीन
'आप'ला राजकारणाची थोडी घाईच झाली! -मेधा पाटकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देव मासा
स
संपत गुरुवार, 03/06/2014 - 13:57 नवीन
मेधा पाटकरांचे पूर्ण वाक्य :
त्यानंतर लगेच दिल्लीची निवडणूक लढविण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यात घाई झाली, तरी दुसरा पर्याय नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
र
रमेश आठवले गुरुवार, 03/06/2014 - 13:05 नवीन
गुजरात मधील जनतेला आणि तेथील मतदारांना मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे कॉंग्रेस किंवा इतर राजकीय पक्षांपेक्षा जास्त चांगले वाटते असे त्यांनी त्रिवार सांगितले आहे. आणि हे सत्य सोयीस्कर मांडलेल्या आकडेवारी पेक्षा महत्वाचे आहे. गुजराती जनतेची अशी खात्री पटली आहे कि देशातील इतर मोठ्या राज्यांपेक्षा आपण जास्त प्रगती करत आहोत. कॉंग्रेस किंवा आप पार्टी आणि काही तथाकथित डावे बुद्धिवादी मोदी सरकार विरुद्ध सारखा प्रचार करतात हे अपेक्षित आहे पण महत्वाचे नाही. You can fool some people for sometime but you cannot fool all the people all the time There are lies, damn lies and then there is statistics.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 03/06/2014 - 13:46 नवीन
केजरीवालांचा उदय झाला त्यावेळेला एक राजकारणामधे कोणीतरी चांगलं काम करेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती पण दिल्लीमधे "आप"ल्या लोकांनी जे काही असंविधानिक चाळे केले त्यानंतर पुर्णपणे मनातुन उतरले. स्वतःला दिल्लीमधे चांगलं काम करायची संधी असताना राजकीय खेळीचा एक भाग म्हणुन त्यांनी सत्ता सोडली. आता गुजरातमधे जाऊन विकासाचा आढावा घ्यायच्या नावाखाली काड्या सारायची काही एक गरज नव्हती. ह्याच्यामागे कोणाचे छक्के "पंजे" आहेत ह्याचा विचार करायलाच हवा. निश्चित आकडेवारी माझ्या हाताशी नाही पण मोदींच्या काळात नक्कीचं जास्त प्रगती झाली आहे. अवांतर : गेल्या पन्नास वर्षात बर्याचं वेळा अभ्यासक्रम बदलला पण भुगोलाच्या पुस्तकातलं एक वाक्यं मात्र अजुन तसच आहे. "भारत एक विकसनशील देश आहे." आणि आम्ही ह्यावेळी नकी विकास करु म्हणुन कुठला पक्ष स्वातंत्र्यापासुन मतांचा जोगवा मागतोय हे ही विसरु नका. ह्यावेळी बदल हवाय. क्रॉसिंग फिंगर्स फॉर चेंज अँड बेटर सरकार.
  • Log in or register to post comments
स
संपत गुरुवार, 03/06/2014 - 14:06 नवीन
भुगोलाच्या पुस्तकाचे ठाऊक नाही पण मोदी सत्तेवर आले तर इतिहासाचे पुस्तक बदलण्याची शक्यता बरीच वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
व
विकास गुरुवार, 03/06/2014 - 14:40 नवीन
सध्याचा इतिहास केवळ डावे आणि कम्युनिस्ट धार्जिण्यांनी लिहीलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 03/06/2014 - 14:45 नवीन
घराणेशाही वाला पक्ष विसरलात की हो. सगळीकडे त्यांचीच तर जय हो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 03/06/2014 - 15:04 नवीन
घराणेशाहीवाल्या पक्षाने ते डाव्या विचारवंतांना आउटसोअर्सिंग केले होते/आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
व
वेताळ गुरुवार, 03/06/2014 - 15:00 नवीन
लोकसत्ता मध्ये दिले आहे वाचा.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक गुरुवार, 03/06/2014 - 15:22 नवीन
योग्य जोड्या जुळवा: गट १: अ)गुजरातचा विकास ब)काँग्रेस आघाडीचे राज्य क)आप चे स्वच्छ आणि स्थिर प्रशासन गट २: अ)मृगजळ ब) मरूस्थळ क) हागणदरी
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 03/06/2014 - 16:25 नवीन
अबब!!!!!! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
प
प्यारे१ गुरुवार, 03/06/2014 - 16:27 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
व
विवेकपटाईत Fri, 03/07/2014 - 15:02 नवीन
आपने आपल्या अल्पवाधीच्या काळात भ्रष्टाचार वाढविण्याचेच कार्य केले आहे. पाण्याची चोरी लोकांना शिकविली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
प
पैसा Fri, 03/07/2014 - 15:04 नवीन
अगागागा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
स
सुहास झेले Mon, 03/24/2014 - 10:58 नवीन
हा हा हा =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
व
विवेकपटाईत गुरुवार, 03/06/2014 - 15:57 नवीन
हिमाचल प्रदेश मध्ये सामान्य माणसाचे 'रहन-सहन' महाराष्ट्रातल्या सामान्य माणसापेक्षा किती तरी पट चांगले. आहे. तरी ही प्रतिव्यक्ती आय महाराष्ट्रात जास्त आहे. (काही श्रीमंत लोकांमुळे- मुंबई पुणे काढून टाका महाराष्ट्र कदाचित बिहारपेक्षा ही मागे दिसेल. दुसरी कडे दिल्लीची प्रतिव्यक्ती आय दाखविल्या पेक्षा जास्त असू शकते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/06/2014 - 16:47 नवीन
ते स्वतःच गुजरात मध्ये रहात असल्याने, त्यांना नक्कीच जास्त माहीत असणार.
  • Log in or register to post comments
ब
बंडा मामा गुरुवार, 03/06/2014 - 18:46 नवीन
एकंदरीत मोदींच्या कारभारात गुजरातचा नक्की काय विकास झाला ह्यावर मते मांडण्यात कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही, आणि काही प्रतिसादातली भाषा आणि टोन बघता ह्यावर काही साधक बाधक चर्चा होऊ शकेल ह्याची सुतरामही शक्यता दिसत नाही. जय हो!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/06/2014 - 18:53 नवीन
चला मस्त पैकी भेळ खावू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
आ
आनन्दा गुरुवार, 03/06/2014 - 19:13 नवीन
काय आहे माहीत आहे का, जे पेराल ते उगवते. तुम्ही मोदींना क्रिटिसाउझ करायला लेख लिहिला. प्रतिक्रिया पण तशाच येणार नाही क? नाहीतर ह्र वाक्य कशाला हवे होते?
केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.
आणि हे पण
प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे
असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/06/2014 - 19:30 नवीन
जे गुजरात मध्ये रहात आहेत, त्यांचे काय म्हणणे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sat, 03/08/2014 - 12:47 नवीन
त्यचा माझ्या प्रतिसादाशी काय संबंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 03/06/2014 - 22:41 नवीन
बंडा मामा तुम्हाला गुजरात , मोदी ह्यांच्या विषयी लेख काढावासा वाटला हेच तर खरे मोदी ह्यांच्या सध्याच्या तरुणाई व जनतेवर पडलेल्या मोहिनेचे कर्तब आहे, आता नितीश कुमार ह्यांच्या बिहार मधील दाव्यांवर कोणी चर्चा करत का नमो नमः
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
प
पिवळा डांबिस Fri, 03/07/2014 - 06:04 नवीन
एकंदरीत मोदींच्या कारभारात गुजरातचा नक्की काय विकास झाला ह्यावर मते मांडण्यात कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही,
कारण तो उद्देश्य मूळ धाग्यातच दिसत नाही. धाग्याचा सगळा रोख तर गुजरातची प्रगती कितीही झालिये असं म्हंटलं तरी ती कशी झालेली नाही हे दाखवण्यावर दिसत आहे....
काही प्रतिसादातली भाषा आणि टोन बघता ह्यावर काही साधक बाधक चर्चा होऊ शकेल ह्याची सुतरामही शक्यता दिसत नाही.
कारण सुरवात तुम्हीच केलेली आहे. जरा वेगळं मत दर्शवणारा प्रतिसाद दिसताच "स्वच्छ चश्मा वापरा" वगैरे उद्धटपणाचे प्रतिसाद तुम्हीच देऊन सुरवात केलेली आहे. आता मिपाकरांकडून लाक्षणिक मुखभंग झाल्यावर हे सगळं शहाणपण सुचतं आहे!!!! वर म्हंटल्याप्रमाणे पेरले ते उगवते!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
अ
अनुप ढेरे Fri, 03/07/2014 - 07:24 नवीन
+१ धाग्याचा हेतू खोडसाळ वाटतो. बरं विकासाबद्दल चर्चा करायची तर 'मोदी यायच्या आधीची स्थिती आणि आत्ताची स्थिती यांची तुलना करावी' या वरती दिलेल्या सूचनेची सुद्धा दखल घेतलेली दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ब
बंडा मामा Sat, 03/08/2014 - 04:13 नवीन
स्वच्छ चष्म्यातुन बघा अशा साठी लिहिलं होतं कारण तुम्ही रॅली/सभा काढल्यामुळे अटक केली असे लिहिले होते. नंतर तुम्ही प्रतिसादात ते सावरुन घेतलं होतं. प्रतिसादातील भाषा/टोन हा मुद्दा तुमच्या प्रतिसादाला उद्देशुन नव्हता. तुम्हाला मागे आयुर्वेदाच्या चर्चेत मी टिका करणारे प्रतिसाद लिहिले होते म्हणून तुम्ही माझ्या विषयी काहीतरी पूर्वग्रह केलेला दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
L
lakhu risbud गुरुवार, 03/06/2014 - 19:57 नवीन
केजू चं "आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून" असं काहीसं चाललं आहे. प्रशासनाची संधी होती तेव्हा सरकार मधून पळ काढला आणि आत्ता इतर जे प्रशासनात आहेत त्यांना नावे ठेवण्याची कामं चालू आहे.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 03/07/2014 - 04:31 नवीन
केजरीवाल यांनी आचारसंहीतेचा भंग केला असे प्रथमदर्शनी पुराव्यानुसार सिद्ध होत आहे असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. ही बातमी सर्वच माध्यमात आली आहे पण ती वाचायला गुगलावे लागते. पहील्या पानावर गुजरात पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याच्या अथवा सिसोडीयांच्या गाडीवर गुजरातमधे दगडफेक झाली असल्या बातम्या आहेत. आता ही दगडफेक तिसरी आहे. हे तक्रार न नोंदवता नुसते भाजपाने केले असे कसे म्हणू शकतात? आणि हो केजरीवालांच्या अभ्यासदौर्‍याचे पुढे काय झाले? का २५ गाड्यांचा ताफा आचारसंहीतेमुळे घेऊन जाता येत नाही म्हणून मधेच ड्रॉप घेतला? का लक्षात आले की एक अंबानी-अडानी म्हणत बसण्याव्यतिरीक्त काही करता येणार नाही आणि जनता इतकी अडानी नाही. (सगळे थोडेच आप समर्थक आहेत? *mosking* )
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Fri, 03/07/2014 - 04:36 नवीन
केजरीवाल यांनी गुजरातच्या आपल्या दौर्यात मिळवलेल्या अनुभवा बद्दल लिहिले आहे आणि सांगितले आहे . त्यांच्या ह्या भेटीचा उद्देश मोदींच्या विरुद्ध प्रचार करणे आणि त्या साठी कारणे शोधणे हे आधी पासूनच ठरलेले होते. त्यांच्या reports वरून Katherine Mayo या अमेरिकन बाईने १९२७ साली लिहिलेल्या Mother इंडिया या नावाच्या पुस्तकावरील महात्मा गांधी यानी दिलेल्या अभिप्रायाची आठवण झाली. त्या अभिप्रायातील पुढील वाक्य उद्धृत करत आहे. --- But the impression it leaves on my mind is that it is the report of a drain inspector sent out with the one purpose of opening and examining the drains of the country to be reported upon, or to give a graphic description of the stench exuded by the opened drains.-
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Fri, 03/07/2014 - 06:33 नवीन
सहीच माहिती :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
स
संपत Fri, 03/07/2014 - 09:04 नवीन
मोदी शायनिंग :)
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 03/07/2014 - 09:34 नवीन
काही गुजराती मित्रांशी(जे तेथील गावांमध्ये लहानाचे मोठे झाले) ह्यावर बोलणे झाले. गेल्या दहा/बारा वर्षात गुजरातमध्ये बर्‍यापैकी सुधारणा झाल्या आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक गावात २४ तास वीज आहे.प्रशासन ईतर राज्यांसारखे भ्रष्ट्,वेळकाढू असायचे. मोदी आल्यानंतर ह्यात बर्‍यापैकी बदल झाले आहेत असे त्यांचे म्हणणे. हे जाणवण्यासारखे बदल झाल्यामुळे लोकांनी तेथे भाजपाला/मोदींना निवडून दिले. बंडामामा, आकडेवारे बाजूला ठेवा. ती पाहिजे तशी शिजवता येते.फ्रंटलाईनवाले तर त्यात पी.एच्.डी.आहेत. गुजरातमधील लोकांशी, मध्यम वर्गाशी प्रत्यक्ष बोला. मग अनुभव सांगा.
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Fri, 03/07/2014 - 09:51 नवीन
असेच चांगले अनुभव मी ही ऐकले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
आ
आनंदी गोपाळ Fri, 03/07/2014 - 19:27 नवीन
असल्या थापा मीदेखिल भरपूर ऐकल्या आहेत. फेकू असे काहीतरी म्हणतात म्हणे आजकाल नेटवर यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
ज
जयनीत Sat, 03/08/2014 - 12:31 नवीन
माझा ही एक मोदी समर्थक मित्र गुजरात मध्ये एका शहरात जाउन आला अन तेथील विकास बघून त्याचे डोळे दिपले, तीन चार रस्त्यावर फिरून सखोल पहाणी दौरा केल्या नंतर त्यास असे आढळून आले की गुजरात मधला साधा चपराशी सुध्दा करोडपती असतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
क
क्लिंटन Fri, 03/07/2014 - 11:54 नवीन
चेतन भगत या लेखकाच्या लिखाणाविषयी माझे मत फारसे चांगले नाही आणि मी त्याचा फॅन वगैरे तर अजिबात नाही.तरीही त्याचे ट्विटरवरील ट्विट इथे लिहायचा मोह आवरत नाही (कोणीही लिहिले असले तरी तो मुद्दा चुकीचा कसा ठरेल? ) : "मी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामांच्या ऑफिसमध्ये आधी न वेळ न ठरविता मिडिया कॅमेरे घेऊन जाऊन थडकणार आहे.जर त्यांनी माझी भेट घेतली नाही तर ते एक तर भ्रष्ट आहेत किंवा मला घाबरत आहेत" :) नेहमीप्रमाणे केजरीवालने आपली नाटके चालूच ठेवली आहेत.एखादे लहान मूल आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायला भोकाड पसरते किंवा अन्य काही चाळे करते त्याप्रमाणे हा सगळा प्रकार चालला आहे असे स्पष्ट दिसते आहे.या असल्या माकडचाळ्यांच्या तुलनेत मोदी अनंतपटींनी उजवे आहेत. खरे तर मी पण या धाग्यावर वाचनमात्रच राहणार होतो.तरीही इतर अनेकांप्रमाणे मलाही लिहायचा मोह आवरता आला नाही. (केजरीवालचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) क्लिंटन
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Fri, 03/07/2014 - 12:20 नवीन
सहमत आणि अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
थ
थॉर माणूस Fri, 03/07/2014 - 12:30 नवीन
सहमत. पण तरीही हे असले पक्ष येतात आणि मते तर कधी कधी जागाही घेऊन जातात. आजवरचा इतिहास पहाता यामुळे फायदा कमी आणि नुकसानच जास्त झालेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मूकवाचक Fri, 03/07/2014 - 13:35 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा