Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुजरात विकासाचे मृगजळ..

ब
बंडा मामा यांनी
Wed, 03/05/2014 - 19:45  ·  लेख
लेख
अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे. संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे. प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्‍याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते. त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. भरपूर आकडेवारीही दिलेली आहे. केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे. लेख इथे वाचा: http://www.frontline.in/the-nation/mirage-of-development/article4430889.ece तातील काही तक्ते: chart chart chart आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.

प्रतिक्रिया द्या
32283 वाचन

💬 प्रतिसाद (163)

प्रतिक्रिया

व
विकास Fri, 03/07/2014 - 14:38 नवीन
या असल्या माकडचाळ्यांच्या तुलनेत मोदी अनंतपटींनी उजवे आहेत. ते अनंतपटीने जाउंदेत किंचीत डावे असते तरी चालले असते आम्हाला! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
व
विकास Fri, 03/07/2014 - 16:13 नवीन
Image removed. प्रतिमा आणि बातमी स्त्रोत डिएनए इंडीया. केजरीवालांचे म्हणणे आहे की माजी मुख्यमंत्री म्हणून मोदींनीच त्यांना बोलवायला हवे होते. पण आपण (म्हणजे एके) दहशतवादी नसतानाही थांबवले, त्यातून हे समजते की ते (मोदी) लोकशाहीवादी नाहीत. *aggressive* मला वाटते आता केजरीवालना पण लॉलीपॉप देण्याची वेळ आलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी Fri, 03/07/2014 - 18:36 नवीन
केजरीवालांचा नाटकीपणा आणि ढोंगीपणा आता डोक्यात जायला लागला आहे. पप्पू आणि मोदींना त्यांच्या हेलिकॉप्टर वापरण्यावरून धारेवर धरणारे केजरीवाल आज 'इंडिया टुडे'च्या काँक्लेव्हला त्यांच्याच चार्टर्ड विमानाने जयपूरहून दिल्लीला गेले. ढोंगीपणाचा हा कळस आहे. मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देऊन ३ आठवडे लोटले तरी अजून त्यांनी सरकारी निवासस्थान सोडलेले नाही. अफझल गुरूच्या फाशीला विरोध करणार्‍या व्यक्तीला त्यांनी आपचे तिकिट दिले आहे. ओरिसात नक्षलवाद्यांचे समर्थन करणार्‍याला सुद्धा आपचे तिकीट आहे. नाटकीपणा आणि ढोंगीपणा याबाबतीत कमालीचे नाटकी व ढोंगी असलेले आव्हाड, भुजबळ, वि.प्र.सिंग इ. मंडळी केजरीवालांच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाहीत. 'इंडिया टुडेच्या' कॉन्क्लेव्हमध्ये सुद्धा स्वतःबद्दल बोलताना, "अरविंदची लायकी नाही. अरविंद हा अत्यंत क्षुद्र व्यक्ती आहे." असा कांगावा आणि मेलोड्रामा करणार्‍या केजरीवालांचा आता संताप यायला लागला आहे. ढोंगीपणा करून मिळविलेले मुख्यमंत्रीपद या माणसाला २ महिने सुद्धा टिकविता आले नाही. पळपुटेपणा करून हे तिथून पळून आले आणि स्वतःकडे प्रामाणिकपणाचा मक्ता असल्याचा आव आणून निव्वळ ढोंग व ड्रामेबाजी सुरू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ब
बंडा मामा Sat, 03/08/2014 - 04:15 नवीन
केजरीवालांचा नाटकीपणा आणि ढोंगीपणा आता डोक्यात जायला लागला आहे.
निवडणूक जस जशी जवळ येईल आणि निकालांची सुरुवात होईन तस तसे अजूनच तुमचे डोके दुखणार आहे. काही तरी घरगुती उपाय तयार ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/08/2014 - 08:01 नवीन
सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद! घरगुती उपायांसाठी केजरीवालांशी बोलणार आहे. त्यांचा खोकला अचानक बंद झालेला दिसतोय. खोकल्यावर कोणते घरगुती उपचार घेतले ते जाणून घ्यायची इच्छा आहे. बादवे, तुमच्या आशावादाचे कौतुक वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
व
विकास Sat, 03/08/2014 - 15:17 नवीन
मध्यंतरी केजरीवालांसारखेच प्रशांत भूषणना पण खोकताना पाहीले. झालं काय तरूण मुले एनडीटीव्हीवर त्यांना अचानक भारती आणि काश्मीर वरून प्रश्न विचारायला लागली. त्याआधी भाजपा-काँग्रेस, भांडवलदारांच्या विरोधात बोलताना खोकल्याला खो दिला होता तो अचानक मग उफाळून आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विकास Fri, 03/07/2014 - 13:08 नवीन
केजरीवाल साधे रहाणार, यांव आणि त्यांव म्हणाले खरे पण अजून सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या घरातच रहात आहेत.
  • Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या Fri, 03/07/2014 - 16:10 नवीन
केजरीवाल एक नंबरचा चालू माणूस आहे. प्रत्येकाचा मस्त उपयोग करून स्वतःचे महात्म्य वाढवून घेत आहे. सुरवातीला फारच आवडला पण आता रोजच्या नाटकाने कंटाळा आला बुवा. दिल्लीमधून पळून गेला. तिथे स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर ह्याला कळले की आपण फार काही करू शकत नाही मग आता बाकीच्यांवर सतत शिंतोडे उडवून आपले चर्चेत राहणे हे एकाच काम आहे. किती दिवस चालणार हे?
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Fri, 03/07/2014 - 16:17 नवीन
केजरीवाल एक नंबरचा चालू माणूस आहे. वरील दोन ठळक केलेले शब्द एकाच वाक्यात म्हणजे द्वैरुक्ती आहे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
ख
खेडूत Fri, 03/07/2014 - 20:01 नवीन
शंभर!! :) बंडा मामा सिंदाबाद! नाई नाई- झिंदाबाद! बाकी केजरी महाराज सोळा मे ला काय पवित्रा घेणार याची उत्सुकता आहे. वीस वगैरे जागा मिळाल्या तर कुणा बरोबर जाणार? कारण सगळेच भ्रष्ट आहेत ते स्वतहा सोडून ,
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sat, 03/08/2014 - 04:04 नवीन
शिळ्या कढीला उत आणायच्या या प्रयत्नात प्रतिक्रीयांचे शतक मारल्याबद्दल धागाकर्त्या चाचांचे, माफ करा, मामांचे हार्दिक अभीनंदन.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 03/08/2014 - 05:30 नवीन
राहुल गांधी विमान वापरतो म्हणुन बोंबलणारा खेचरवाल काल इंडियाबुल्सच्या खाजगी विमानाने फिरत होता. त्याबद्दल पण लिहा ना आता.
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Sat, 03/08/2014 - 08:15 नवीन
http://www.ibtl.in/video/6788/arvind-kejriwal-virus-will-finish-india/
  • Log in or register to post comments
S
sagarparadkar Sat, 03/08/2014 - 08:52 नवीन
तथाकथित बुद्धिजीवी वर्गाला वाटणारं डाव्या विचारांचं आकर्षण हेरून काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचा यशस्वीपणे बुद्धिभेद केला. गांधी बाबांचं नाव घेवून त्यात आणखी नव-बुद्धीजीवी वर्गाला (ह्यात ते चाचा, अमोलरत्न वगैरे आलेच) पण घुमवण्यात आले. आता त्या भंपक डाव्या विचारांचं वैयर्थ सिद्ध होत आले (कारण रुबल्स ची किमत घसरली, सबब खिसे भरले जात असले तरी मूल्य वाढण्यापेक्षा ओझंच जास्त होतंय ). मग आता पुढील 'फोरीन-रिटर्नड' पिढीला घुमावायचे कसे? कारण त्या लोकांनी परदेशातील सुधारणा आणि प्रगती तर स्वत:च अनुभवली आहे …. मग त्याना टांग मारण्यासाठी हे केजरीवाल चे प्यादे कॉंग्रेसने पुढे आणले आहे … एकूणात काय तर प्रत्यक्षात उद्योगक्षेत्राला चालना देवून रोजगार निर्मिती वाढवून सर्वसमावेशक विकास ( बापरे … हे काय असतं ?) साधण्यापेक्षा जनतेचा बुद्धिभेद करत राहावे आणि आपला आनी आपल्यापुढे हुजरेगिरी करणार्या चार दोन टाळ्क्यांच्या कुटुंबांचाच काय तो विकास करत राहावे … भारतीय जनते इतकी पुन्हा पुन्हा फसवणुक करून घेण्यास उत्सुक (योग्य तो संस्कृत शब्द हवा असल्यास व्यनि करावा, येथे लिहिणे उचित वाटत नाही) जनता जगात कोठेही पाहिली नाही ....
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 03/08/2014 - 09:31 नवीन
भारतातील उद्योगधंद्यातील १)हल्दीराम ग्रुपचे मालक,२)मायक्रोमक्स मोबाईल चे मालक,३)सहाराचे मालक आता तुरुंगात अहेत. खेचरवाल अंबानी व अदानीना तुरुंगात टाकायला उत्सुक आहेत. त्यातुन कोन वाचते बघु, मग विकास करु.
  • Log in or register to post comments
ज
जयनीत Sat, 03/08/2014 - 12:04 नवीन
भारताला विकासाची गरज काय? भारत हा आधीच अतिशय, अत्यंत, महाभयंकर विकसित देश आहे ह्या देशाचा डोळे दिपवणारा आणि कान किटवणारा विकास इंडीया शायनिंग च्या काळात होऊन गेलेला आहे त्याची फळे पिढ्यानपिढ्या खाऊन संपणार नाहीत मग अजून काय करायचे उरले आहे?. चालू द्या! टेली शॉपिंग मधल्या बिफोर आफ्टर सारखे अवास्तव दावे करायला काय जातं? लालू प्रसाद ह्यांच्या काळातल्या बिहार किंवा समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश सरकार पेक्षा किंवा अनेक सरकारां पेक्षा गुजरात सरकार ने नक्कीच चांगले काम केले आहे हे मात्र मान्य. पण काही विभागात निर्देशांक चांगले आहेत म्हणून त्याचा उदो उदो करून विकास पुरुष म्हणवून घायचे अन जिथे अपयश आले ते झाकून ठेवायचे किंवा नाकारायचे खोटी आकडेवारी म्हणून ओरड करायची हे सोयीचे राजकारण. काँग्रेसच्या महाराष्ट्र सरकार चे रोजगार हमी योजना मॉडेल देशात चालतंय. बंगाल मधल्या डाव्या आघाडीचे मिड डे मिल ही योजना पूर्ण देशात आता सुरु आहे. भाजपच्या छत्तीसगढ सरकारचे योगदान ही महत्वपूर्ण आहेच सरकारी योजनांची कर्यक्षम अंमल बजावणी अन लोकांपर्यंत डिलीव्हरी चे मॉडेल सगळ्या देशाने उचलले आहे. कुठल्याही पक्षाच्या चांगल्या कामाला कुणीही नाकारू शकत नाही. पण अवास्तव अतिरंजित दावे ही मान्य होतील असे नाही.
  • Log in or register to post comments
ब
बंडा मामा Sat, 03/08/2014 - 18:34 नवीन
लालू प्रसाद ह्यांच्या काळातल्या बिहार किंवा समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश सरकार पेक्षा किंवा अनेक सरकारां पेक्षा गुजरात सरकार ने नक्कीच चांगले काम केले आहे हे मात्र मान्य.
अर्थातच मान्य आहे, पण तुलना लालू आणि मुलायमशी केली तर कुठलेही राज्य उठूनच दिसेल. मुद्दा आहे की मोदींनी विशेष असे काय केले आहे? विकास पुरुष हे संपूर्ण मार्केटिंग गिमिक असून तुम्ही दिलेला टेलेमार्केटींगचा मुद्दा अगदी चपखल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयनीत
श
शैलेंद्रसिंह Sat, 03/08/2014 - 20:30 नवीन
इथे केजरीवाल आणि आप ह्यांच्यावर टिका करणाऱ्यांनी आधी मोदींचे विकासाचे दावे सत्य कसे हे सांगावे. केजरीवालांचे १६ प्रश्न जर नीट पाहीलेत तर त्यातील बहुतेक प्रश्न हे सरकारी आकडेवारीवर आधारीत आहेत. उदा. ११% ची वाढ कृषीक्षेत्रात झाली म्हणायचे पण प्रत्यक्षात ती -१.१% झालेली आहे. इतके रेटुन खोटं बोलणारे चालतात पण केजरीवालांनी कुठला राजकीय डावपेच खेळला तर मात्र जळजळ. अनार्किस्ट केजरीवाल चांगले की देश सर्वबाजुने संकटात असतांना बाबरी मशीदीचा उन्माद निर्माण करणारे चांगले हे ज्यानेत्याने आपापले ठरवायचेय. केजरीवाल ह्यांचे राजकीय डावपेच भारताला नवीन नाहीत. कॉंग्रेस-भाजपा वर्षानुवर्ष तेच करत आहेत. पण आज तत्सम डावपेचांबद्दल त्यांच्या समर्थकांनी जो त्रागा चालवलाय त्याला दुट्टपीपणा म्हणावेसे वाटते. मिपावर आधीही मी आकडेवारीसकट एक धागा सुरु केला होता, पण वस्तुस्थितीपेक्षा श्रद्धा महत्वाच्या असतात हे तिथेही जाणवलं. आपलं राजकारणात त्यालाच अधिक महत्व असल्याने केजरीवालांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्यापेक्षा केजरीवालांवर अधिक लोकांची श्रद्धा बसु नये असाच प्रयत्न भाजपा करत राहिल.
  • Log in or register to post comments
श
शैलेंद्रसिंह Sat, 03/08/2014 - 21:21 नवीन
http://ibnlive.in.com/news/kejriwal-posts-17-questions-to-modi-after-he-refused-to-meet-him/456455-37-64.html
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 03/08/2014 - 23:21 नवीन
केजरीवाल यांनी निवडणूकी आधीच मोदीच पंतप्रधान होणार हे मान्य केलेले दिसतयं अर्थात म्हणूनच हार मान्य केली आहे असे वाटते. म्हणून नंतर परत पोटापाण्याकरता रस्त्यावर भागाबाई माकडचेष्टा कराव्या लागणार त्याचा सराव चालू केला की काय असे वाटते... असो. तुम्ही दिलेल्या आयबीएन्च्या बातमीत सुरवातीसच म्हणले आहे: He also made allegations against Modi's government but offered no evidence for his claims. त्यात सर्व आले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेंद्रसिंह
श
श्रीगुरुजी Sun, 03/09/2014 - 08:28 नवीन
>>> He also made allegations against Modi's government but offered no evidence for his claims. त्यात सर्व आले... केजरीवालांनी गाजावाजा करत गेले ४ दिवस गुजरातचा दौरा केला. संपूर्ण ४ दिवस मोदींवर निराधार आरोप करणे या व्यतिरिक्त त्यांनी काहीही केले नाही. एकाही आरोपाला आधार किंवा आकडेवारी किंवा पुरावे नाहीत. आपण किंवा आपला पक्ष काय करणार आहे किंवा गुजरातची तथाकथित दुरावस्था आपण कशी सुधारू इच्छितो याविषयी अवाक्षरसुद्धा काढलेले नाही किंवा ४ दिवसातील ४ मिनिटेसुद्धा ते यावर बोलेलेले नाहीत. या माणसाला केवळ नशीबाने मुख्यमंत्रीपद मिळाले होते, पण तिथून ते शेपूट घालून पळून आले. इतरांवर फक्त टीका करण्यापेक्षा मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेऊन काही बदल घडवून आणण्याची त्यांना संधी होती. पण अंगी भिनलेल्या ढोंगी व नाटकीपणामुळे काहीही करून दाखविण्याची त्यांची अपात्रता सर्वांसमोर येऊ लागताच राजीनाम्याचे नाटक करून धूम ठोकली. संपूर्ण ४ दिवस त्यांना फक्त मोदीफोबिया झालेला होता. त्यांना या कामगिरीवर कोणी पाठविले आहे हे उघडच आहे. काँग्रेसने स्वतः नामानिराळे राहून मोदींवर हा भाडोत्री माणूस सोडलेला आहे. त्यांचे प्रश्न वाचून गंमत वाटली. एक प्रश्न मोदी प्रचारासाठी हेलिकॉप्टर वापरतात त्याबद्दल आहे. याच ४ दिवसात इंडिया टुडेचे खाजगी चार्टर्ड विमान वापरून ते दिल्लीवारी करून आले याची त्यांना ना खंत ना खेद ना काही विरोधाभास दिसला. मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर आरोप करताना आपण सोमनाथ भारतींना मंत्रीमंडळात घेऊन त्यांचे ठाम समर्थन करत होतो याचा सोयिस्कर विसर पडलेला आहे. निवडणुक संपल्यावर केजरीवाल बिग बॉसच्या पुढील सत्रात असणार हे आता नक्की झाले आहे. त्यांच्याबरोबर बिग बॉस मध्ये दिग्विजय, आव्हाड, भुजबळ, लालू, सिब्बल, तिवारी इ. नौटंकी मंडळी पण असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Sun, 03/09/2014 - 14:06 नवीन
आपण किंवा आपला पक्ष काय करणार आहे किंवा गुजरातची तथाकथित दुरावस्था आपण कशी सुधारू इच्छितो याविषयी अवाक्षरसुद्धा काढलेले नाही किंवा ४ दिवसातील ४ मिनिटेसुद्धा ते यावर बोलेलेले नाहीत. या संदर्भात काल एक निरीक्षण वाचले. जेंव्हा केजरीवाल हे गुजरातमधे जेंव्हा तावातावाने मोदींच्या विरोधात भाषणे करत होते तेंव्हा मोदीं चाय पे चर्चा कार्यक्रमातून जनतेशी विकासासंदर्भात बोलत होते. ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बाळकराम Sun, 03/09/2014 - 15:58 नवीन
धन्यवाद! बाकी, आता मोदी येणार म्हणून मनात मांडे खाणारी ही येडचाप लोकं बघून त्यांची दया येते, हे येडे २००४ मध्ये इंडिया शायनिंग म्हणत म्ह्णत असेच थोबाडावर आपटले होते. तरीही शिकले काहीच नाहीत, च्यायला!
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Mon, 03/10/2014 - 04:11 नवीन
तुम्ही कॉम्रेड कि काँग्रेसी,गुरुजी जसे भाजपेयी वाटतात तसे तुम्ही कोण?आणी नरेंद्र मोदी कोण माहीत नसेल तर कुठल्याही भाजप कार्यालयात जावुन विचारा सांगतील ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
श
श्रीगुरुजी Mon, 03/10/2014 - 10:03 नवीन
तुम्ही समजता तसा मी भाजपेयी नाही. मी भाजपेयी आहे हे अर्धसत्य आहे, पूर्णसत्य नाही. मी कट्टर काँग्रेसविरोधक आहे, पण तितक्या प्रमाणात भाजपचा समर्थक नाही.१९८९ मध्ये वि.प्र.सिंग पंतप्रधान व्हावेत असे मला वाटत होते, पण त्यांनी भ्रमनिरास केला. २०१३ मध्ये म.प्र., छत्तीसगड व राजस्थान मध्ये भाजप यावा व दिल्लीत आप ने सरकार बनवावे असे मला वाटत होते. अगदी तसेच झाले, पण केजरवालांच्या ढोंगीपणा व नाटकीपणामुळे भ्रमनिरास झाला. मी उमेदवार व पक्ष असे दोन्ही बघून मत देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
श
श्रीगुरुजी Sun, 03/09/2014 - 16:28 नवीन
केजरीवाल अशी व्यक्ती आहे की ते अमेरिकेला जाऊन वॉशिंग्टन डीसी शहरात कॅपिटॉल हिल, व्हाईट हाउस च्या जवळपासच्या परिसरात रस्त्यावर बसलेल्या एखाद्या भिकार्‍याचा फोटो काढतील व तो प्रसिद्ध करून "अमेरिका विकसित देश आहे हे धादांत खोटे आहे. प्रत्यक्षात त्या देशात सर्व नागरिक रस्त्यावर भीक मागतात. हा बघा पुरावा." असे सांगत फिरतील.
  • Log in or register to post comments
र
रमताराम Mon, 03/10/2014 - 07:17 नवीन
बाकी चर्चा बिरचा आपलं काही काम नव्हे. फक्त इथे एकदोनदा तीन वेळा जिंकून येणे वगैरे 'लै भारी' असं लिवल्यालं दिसलं. म्हटलं बंगालमधे सलग ३६ वर्षे कम्युनिस्टांचं सरकार होतं हे जाता जाता कानावर घालू या. अरे हो आणखी एक. निवाशी भारतीयांपेक्षा अनिवाशांना मोदींची आक्रमक पाठराखण करणं अधिक आवडतं असं दिसतंय. फेसबुकवरच्याही सातत्यपूर्ण आक्रमक असणार्‍या मोदी-ब्रिगेडमधे अनिवाशांचेच बहुमत दिसते मला. म्हणतात ना ज्याचं जळणार नाही त्याला काय कळणार पुढे काय वाढून ठेवलंय ते. हे म्हणजे प्रेक्षक ग्यालरीत बसून ग्लॅडिएटरला अंगठा जमिनीकडे करून दाखवणे आहे. आमच्या केजरूबाबाचे समर्थक त्यामानाने डि-क्लास झालेले दिसताहेत. बाकी 'म्या भारी, माझा नेता लै भारी' वगैरे शड्डू ठोकणं चालू द्या.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 04/03/2014 - 23:05 नवीन
माझ्या टोपणनावाला साजेल अशी - Image removed. बाकीची मज्जा इथे आहे. -- आपली नम्र π विक्षिप्त अनिवासी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम
व
विकास Fri, 04/04/2014 - 01:31 नवीन
सकाळीच तो दुवा वाचला! हहपुवा! मला देखील त्यामुळे मज्जा करायला प्रेरणा मिळाली:

अगर वादा किया 'गॅसपे कम होगा अधिभार' तो केजरीवालभी बोलेगा... अबकी बार मोदी सरकार!

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
आ
आयुर्हित Fri, 04/04/2014 - 11:19 नवीन
थोडे थांबा फक्त गॅसच काय, सर्व महागाई(वीज,डीजेल-पेट्रोल,भाजीपाला,डाळीं-साळी,मटन मच्छी,सोने-चांदी)कमी होईल. फक्त चांगले काम करणाऱ्या पक्षाला मत द्यायला विसरू नका! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 04/04/2014 - 14:32 नवीन
काल संध्याकाळी ह्यांनी कट्ट्यावरून आणलेला- वाटीत चिवडा मोदींना निवडा. अख्ख्या भारताचा मूड आहे. मोदी काका ड्युड आहे. (मोदींचे कवतिक होत असूनही कोणाला मत द्यावे ह्या विचारात पडलेली)माई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
ब
बॅटमॅन Fri, 04/04/2014 - 14:35 नवीन
हा नक्की कुणाचा डु आयडी आहे बरं???? हम्म, भौतेक कयास खरा ठरला तर ;) (बॅटलॉक होम्स.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
विकास Fri, 04/04/2014 - 15:31 नवीन
ड्यु आयडी काय? "ताई, माई, अक्का, विचार करा पक्का आणि हातावर मारा शिक्का" मधल्या त्या माईसाहेब असाव्यात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 04/04/2014 - 15:33 नवीन
हा हा हा ;) बादवे दिग्गीराजांच्या नावावर खपवला जाणारा एक कोटः काँग्रेसचा जो हात आहे त्यामागेही आरेसेसचाच हात आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
श्रीगुरुजी Sat, 04/05/2014 - 08:58 नवीन
>>> हा नक्की कुणाचा डु आयडी आहे बरं???? नानासाहेबांचा स्त्रीपार्टी वाटतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विकास Fri, 04/04/2014 - 15:33 नवीन

अख्ख्या भारताचा मूड आहे एके४९ सुड* आहे

* सुड म्हणजे स्युडो (नाटकी) आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 04/04/2014 - 14:41 नवीन

फिजिक्समध्ये पास व्ह्यायला हवा न्युटनचा फोर्स. भारताच्या प्रगतीसाठी लावा आता मोदींचा कोर्स.

माई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विकास Fri, 04/04/2014 - 15:30 नवीन

फिजिक्समध्ये पास व्ह्यायला हवा न्युटनचा फोर्स काँग्रेसला निवडाल तर अजून एक होईल बोफोर्स!

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
वेताळ Mon, 03/10/2014 - 08:21 नवीन
अनिवासी भारतियानाच खेचर्वाल चा खुप पुळका आला आहे. भारतात राहणारे खेचरवाल ला आता दिग्विजयसिंगाचा सच्चा वारस म्हणुन बघतात.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Mon, 03/24/2014 - 05:37 नवीन
वडोदरा चा बस अड्डा आहे कि एअरपोर्ट?
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Mon, 03/24/2014 - 05:59 नवीन
अनुमोदन,गुजरातमध्ये विकासाच्या दृष्टीने खूप प्रयत्न झाले आहेत, भविष्यात विमानांची संख्या प्रचंड वाढल्यास बस स्टॅँडवर विमानांसाठी 'फलाट' तयार केले आहेत. विमानतळांवर नासाच्या(न्यासाच्या नाही) सहकार्याने बडोदा ते प्लुटो थेट फ्लाईटचे नियोजन केले आहे, मध्ये गुरुच्या चंद्रावर' हरहरमोदी' एअरस्टेशनचे बांधकाम चालू आहे. गुजरातमधल्या कॅनॉलवर सोलार पॅनल बसवले आहेत ,ज्यामुळे रिफ्लेशन येऊन चांदोबा लाल पडला आहे व आता चंद्रावर कविता करता येणार नाही म्हणुन सायबेरीयातले कवी नाराजले आहेत. गुजरातमधले रस्ते थेट बुलेट प्रुफ काचेचे आहेत व हे काम एंशी टक्के झालेले आहे ,इंटरनेट बरोबर नवीन टेलेपोर्टेशनच्या वायर टाकल्या आहेत तिथं ,नेटावर माल खरेदी करायचा डन म्हण्टले की लगिच दणादण माल टेलेपोर्ट होऊन घरात... गुजरातमधल्या बालकांचे इतके सुपोशन झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे आयुष्य दिडशे वर्ष डीक्लेर करुन टाकले आहे.आहात कुठे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
इ
इरसाल Mon, 03/24/2014 - 06:03 नवीन
म्हणजेच याचाच अर्थ असा की मोदी "अमेठी" ची कॉपी करत आहेत तर..............अरेरेरेरे काय वैट्ट दिवस आलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
व
विटेकर Mon, 03/24/2014 - 10:50 नवीन
अनुमोदन,गुजरातमध्ये विकासाच्या दृष्टीने खूप प्रयत्न झाले आहेत, भविष्यात विमानांची संख्या प्रचंड वाढल्यास बस स्टॅँडवर विमानांसाठी 'फलाट' तयार केले आहेत. विमानतळांवर नासाच्या(न्यासाच्या नाही) सहकार्याने बडोदा ते प्लुटो थेट फ्लाईटचे नियोजन केले आहे, मध्ये गुरुच्या चंद्रावर' हरहरमोदी' एअरस्टेशनचे बांधकाम चालू आहे. गुजरातमधल्या कॅनॉलवर सोलार पॅनल बसवले आहेत ,ज्यामुळे रिफ्लेशन येऊन चांदोबा लाल पडला आहे व आता चंद्रावर कविता करता येणार नाही म्हणुन सायबेरीयातले कवी नाराजले आहेत. गुजरातमधले रस्ते थेट बुलेट प्रुफ काचेचे आहेत व हे काम एंशी टक्के झालेले आहे ,इंटरनेट बरोबर नवीन टेलेपोर्टेशनच्या वायर टाकल्या आहेत तिथं ,नेटावर माल खरेदी करायचा डन म्हण्टले की लगिच दणादण माल टेलेपोर्ट होऊन घरात... गुजरातमधल्या बालकांचे इतके सुपोशन झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे आयुष्य दिडशे वर्ष डीक्लेर करुन टाकले आहे.आहात कुठे!!!! खुर्चीवर उभे राहून टाळ्या वाजवण्यात आल्या आहेत ..! आत्मुबाबा - एक स्मायली टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
श
श्री गावसेना प्रमुख Mon, 03/24/2014 - 10:51 नवीन
तुमच वय ६० पुर्ण झाल का नेफळे साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
श
श्रीगुरुजी Mon, 03/24/2014 - 08:55 नवीन
>>> वडोदरा चा बस अड्डा आहे कि एअरपोर्ट? मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बस अड्ड्यासारखा आहे. तर बडोद्याचा बस अड्डा विमानतळासारखा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
स
संपत Mon, 03/24/2014 - 13:31 नवीन
मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बस अड्ड्यासारखा आहे
अहो नाही हो. टर्मिनल २ बघा. एकदम चकाचक आहे. आंतरराष्ट्रीय म्हणावा असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बंडा मामा Wed, 03/26/2014 - 19:32 नवीन
ह्या मोदी मिनिअन्सना वडोदरा बस स्टँड मुंबईच्या टर्मिनल २ पेक्षा भारी वाटतो? =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
म
मैत्र गुरुवार, 03/27/2014 - 06:30 नवीन
मुंबई टर्मिनल २ गेली दहा एक वर्षे अस्तित्वात आहे आणि १ तर कित्येक दशकांपासून भारतातील आणि एशियातील सर्वोत्तम पैकी एक आहे. १ वरच्या सोयी सुविधा तर काय वर्णाव्या - तिथली आंतरराष्ट्रीय दर्जाची स्वच्छतागृहे, स्किफॉलला भारी पडतील असे एस्कलेटर्स, चांगी पेक्षा उत्तम प्रकाश योजना, हिथ्रोपेक्षा चांगली अंतर्ग्त माहिती आणि सोयी. विशेषतः भारतात परत आल्यावर बॅगेज साठी सेवा भावाने मदत क्ररणारे लोक - ती क्स्टम्सची प्रकाशाने उजळलेली आणि नव्या ग्रानाईटने चमकणारी बाजू.. त्या मोदी मिनिअन्स्ना काय त्या एका पुण्यापेक्षा ल्हान शहरासाठी एक चकचकीत बस स्टँड केल्याचं कौतुक. कधी स्वारगेटची शान पाहिली आहे का त्यांनी? तुम्ही लक्ष नका देऊ बंडामामा.. त्यांना पुणे शिवाजीनगर सारखं वैभवशाली बस स्टँड सोडून त्या गुजरातचं प्रेम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
ड
डँबिस००७ Fri, 03/28/2014 - 08:59 नवीन
मुंबईच आंतरराष्ट्रीय विमानतळ हेGVKनावाच्या कंपनीने बनवलेले आहे. महाराष्ट्र / भारत सरकारला हे काही शक्य नाहीय !! ह्या विमान तळावर पहील्यांदा उतरण्याचा मान मिळावा म्हणून एअर इंडीयाच्या विमान उतरण्याची वाट बघावी लागली. नेहेमी प्रमाणे ए.ईं.च विमान यायला उशीर झाला आणि एमीरेटच्या विमानाला ह्या नव्या कोर्या विमानतळावर पहील्यांदा उतरण्याचा मान मिळाला. विमानतळ चकाचकच आहे, सर्व व्यवस्था उत्तम आहेत पण ! हा पण सर्वी कडे घात करतो. ह्या विमान तळा वर भयंकर डास आहेत, गरम होत !! आणि इमिग्रेशन सर्वात सुस्त !! हे एक सरकारी विभाग आपल अस्तित्व दाखवणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
च
चिरोटा Fri, 03/28/2014 - 09:35 नवीन
ते डास रक्तचाचणीसाठी पाळले आहेत असे म्हणतात. मुंबै म्हंटल्यावर गरम होणारच. काय? नायतर सिमला,उटीची कनेक्टेड फ्लाईट असल तर बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा