आता माझी सटकली रे.........!
नंदन निलकेणी
एक सुशिक्षीत मान्यवर,
चांगल्या खाजगी संस्थेत प्रत्यक्ष कामाचा भरपूर अनुभव,
Managing Director, President, CEO या पदावरचा अनुभव,
देशासाठी चांगले काहीतरी करून दाखवायची तयारी,
Imagining India: The Idea of a Renewed Nation या पुस्तकाचे लेखक,
एक कॉंग्रेस नेता,
पद्मभूषण पुरस्कार विजेते,
आधारपत्र अध्यक्ष
कदाचित भावी पंतप्रधान(जर कॉंग्रेस बहुमतात आली तर),
निवडणूक तोंडावर आली असतांना सांगतात
"आरक्षण खाजगी संस्थेतही हवे"
याला काय म्हणावे?
आरक्षणाचे गाजर
दलितांच्या मतावर डोळा
लोकांच्या भावनांशी खेळ
जातीयवादाची विष पेरणी
फोडा आणि राज्य करा नीती
एक घाणेरडे राजकारण
खाजगी संस्थेच्या प्रगतीची वाट लावणे
देशाची अधोगतीकडे वाटचाल
Brain drain ला खुले आम प्रोत्साहन
cheap publicity stunt
इतर चांगल्या मुद्द्यांचा अभाव
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र
Productivity गेली चुलीत
नैपुण्याची ऐशी तैशी
शिक्षणाचा आईचा घो
राजकारणी लोकांचा एक समज
भारतीय समाज: एक मेंढरांचा कळप
प्रतिक्रिया
ओपनवाल्यांनी आधीच इतिहासात गरुड, पुष्कर विमाने... सीताहरणातील विमान यांतून एरोनॉटिक्स शिकलेले आहेच.तर्र वो! अजुनबी हे ओपन वालेच लोक काय काय मोठ-मोठे शोध लावत असत्याती- ऑस्कर म्हणू नका, नोबेल म्हणू नका, ग्रॅमी म्हनू नका, (पन म्याग्यासेसे तर अजाबात म्हनू नका (आजकाल त्याला लय वंगाळ समजत्यात)) समदीकडे हे आप्लेच ओपनवाले लोक बक्षिसं घ्येत असत्यात. कालच ही नोबेल वाल्यांची लिश्ट पघितली- तितं समदे आपले कूळ्करनी, आपटे, दामले आनि थत्तेच की वो! आता ह्यास्नी ज्ञानी न्हाय म्हनायचं तर कुनास्नी वो?