Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकत्र कुटुंब - काळाची गरज?

म
मंदार दिलीप जोशी
Wed, 03/26/2014 - 06:23
🗣 76 प्रतिसाद
सद्ध्याच्या ढासळलेल्या नीतीमूल्ये व संस्कारांच्या काळात तसेच वाढत्या किंमती लक्षात घेतल्या तर एकत्र कुटुंब ही काळाची गरज आहे असे वाटते का? मिपाकरांकडून भरपूर चर्चेची अपेक्षा. तीन गोष्टींवर चर्चा व्हावी (१) नीतीमूल्ये व संस्कार. (२) शेतजमीन व एकत्र कुटुंबपद्धतीने आपसूक होणारी गटशेती. (३) वाढत्या किंमती (आवाक्याबाहेर गेलेले वस्तूंचे भाव) व एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे.

प्रतिक्रिया द्या
54167 वाचन

💬 प्रतिसाद (76)
ऋ
ऋषिकेश Wed, 03/26/2014 - 06:34 नवीन
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर एकत्र कुटुंबसंस्था ही २०-३० वर्षांपूर्वीच मोडून पडलेली व्यवस्था आहे. आता आर्थिक नाईलाजास्तव काही कुटुंबे पूर्वीसारखी १०-१२ व्यक्तींच्या संख्येने राहतही असतील परंतु हल्ली ४ ते ६ ही सामान्यतः कुटुंबांची कमाल सदस्यसंख्या आहे. राष्ट्रीय स्तरावर विविध प्रदेशाच्या भौगोलिक व आर्थिक निकषांवर कुटुंबे एकत्र वा विभक्त असणे अधिक फायद्याचे हे बदलत असते. निव्वळ भावनात्मक बंधनाने एकत्र कुटुंबे टिकु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Wed, 03/26/2014 - 06:38 नवीन
चांगला विषय आहे, परंतु एकत्र कुंटुंबात प्रायव्हसी काँम्प्रमाईज करावी लागते, जे आजच्या लोकांना नकोय चार भावातले दोघे बांडगुळी वृत्तीचे असतात एकाची तरी बायको कजाग असते मुलं मोठी झाली ,आई बाप म्हातारे झाले की कटकटी सुरु होतात व शेवटी कुटुंब विभक्त होतात. पुर्वी एकत्र कुटुंबं शक्य असायची कारण घराचे आकारमान मोठे असायचे ,दहा खोल्या ,चार दिशेला चार दरवाजे, आंगण, पडवी ,शेतातले घर नी काय नी काय ... आता 3 BHK घेतला तरी अशी एकत्र राहुनही काही प्रमाणात विभक्तीचा फील देणारी व्यवस्था राहिलेली नाही.
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Wed, 03/26/2014 - 06:41 नवीन
आमच्या हापिसातला एक जण एका वास्तूशांतीला जाऊन आला. त्यांनी दोन ३ BHK एकत्र करुन एक फ्लॅट केला आहे. म्हणजे राहणे वेगळेच पण एक स्वयंपाकघर आणि इतर खर्च एकत्र. तपशील कळले नाहीत पण आयडिया सॉलिड वाटते.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 03/26/2014 - 06:49 नवीन
१) नीतीमूल्ये व संस्कार:- यासाठी आजकाल प्रसार माध्यमे (वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, इतर खाजगी वाहिन्या),आपण शहरात ज्या सहकारी गृहसंस्थेत राहतो व ज्या शाळेत आपल्या पाल्यांना पाठवितो यावरच सारे काही अवलंबून आहे. २) शेतजमीन व एकत्र कुटुंबपद्धतीने आपसूक होणारी गटशेती: यात जो मनुष्य शेतात राब राब राबतो, तोच मागे राहतो.इतर बांधव जे गाव सोडून इतर खेड्यात व शहरात येतात व स्थाईक होतात ते काळाच्या ओघात पुढे जातात. ३) वाढत्या किंमती(आवाक्याबाहेर गेलेले वस्तूंचे भाव): यासाठी किंवा इतर कारणांसाठी मराठी माणसे गुण्यागोविंदाने एकत्र राहूच शकत नाहीत. कारण मराठी माणसांना व्यवहारी राहता येत नाही. ४) एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे कमी व तोटे जास्तच आहेत.(आपल्या सौ. ना विचारावे) पण हे सर्व फायदे घ्यायचे असतील तर कोणत्याही मोहात न पडता, आपण आपला आवडीचा मार्ग शोधणे व त्यानुसार स्वत: पुढे जाणे व इतरांना त्यांनी निवडलेल्या मार्गावर प्रगतीसाठी मदत करणे हेच होय! त्यासोबत उत्पन्न वाढविण्याचे आधुनिक मार्ग शोधणे व भरपूर बचत/गुंतवणूक करून आपले भवितव्य उज्ज्वल बनविणे.
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री Wed, 03/26/2014 - 07:56 नवीन
४) एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे कमी व तोटे जास्तच आहेत.(आपल्या सौ. ना विचारावे)>>> +++++++++++++++++++++++++++++ १ हल्ली लांब /दूर राहूनच संबंध चांगले राहतात . रोज रोज भांड्याला भांड लागल तर स्वतःचे सगळ्यात जास्त नुकसान आपण करून घेत्तो . *DASH* पूर्वीच्या सगळ्याच गोष्टी आताच्या काळात तेवढ्याच मोलाच्या आहेत / असतील हि अपेक्षा ठेवू नये . काळाप्रमाणे बदलावे लागतेच नाहीतर आपणच मागे राहतो .जुने ते सोने म्हणताना सगळे हे विसरतात कि प्रत्येक गोष्ट कधीनाकधी नवीनच असते कालांतराने ती जुनी होते . बाकी शेतजमीनच नाही त्यामुळे मौन . मराठी माणसेच आपल्या माणसांचे पाय ओढतात . स्वतःच्या सख्ख्या भावंडांची प्रगती बर्याच लोकांना सहन होत नाही . मोठ्या गप्पा मारायला असे लोक कायम तयार असतात . अर्थातच यालाही अपवाद आहेतच . आर्थिक फायद्यांपेक्षा मानसिक स्वाथ्य जास्त महत्वाचे आहे असे मला वाटते . पूर्वी किती लोकांना मधुमेह , हृदयरोग आणि बाकीचे आजार / व्याधी तिशीत /चाळीशीत होत ? एकत्र कुटुंबात सगळ्यात जास्त मानसिक कुचंबना तरुण पिढीची होते . काही झाल कि सगळेच संस्काराचे सूर आळवायला तयार असतात . पुरुषांचे जास्तच हाल होतात एकीकडे आई दुसरीकडे बायको . :( बर्याच वेळा एक बाजू बरोबर असते मग हळू हळू वाद , भांडणे यांचे रुपांतर संघर्षात होते . संपूर्ण कुटुंबाचे मानसिक स्वाथ्य जर जपायचे असेल तर एकत्र कुटुंब पद्धतीचा आग्रह / हट्ट सध्याच्या काळात धरू /करू नये असे मला वाटते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
म
मंदार दिलीप जोशी Wed, 03/26/2014 - 08:44 नवीन
मते वाचनीय.. एकंदर ज्यामच कठीण आहे असे दिसते. तोटेच जास्त आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
अ
अनुप ढेरे Wed, 03/26/2014 - 06:56 नवीन
हे दोन लेख वाचनात आले अलिकडे. http://www.theguardian.com/society/2014/mar/24/dependent-generation-half-young-european-adults-live-parents आणि http://www.theguardian.com/money/2014/jan/21/record-levels-young-adults-living-home-ons त्यात पण मुख्य कारण घरांच्या वाढत्या किमती आणि बेरोजगारी आहे असा निष्कर्ष काढला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 03/26/2014 - 08:46 नवीन
हे दोन्ही लेख युरोपची सध्य परिस्थिती वर्णन करत आहेत,ज्यात सध्या युरोपात स्लो-डाऊन/रिसेशन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
न
नानासाहेब नेफळे Wed, 03/26/2014 - 07:07 नवीन
नितीमुल्ये आणि संस्कार हे पुर्वी वडीलधार्यांच्या धाकाने व्हायचे, माझा एक मित्र एकत्र कुटुंबात राहायचा ,त्याला वडीलांपेक्षा काकांची जास्त भीती वाटायची, दोन पालकांऐवजी सहा सात पालक असायचे, त्यामुळे मुलं कायम धाकात असायची. गटशेती- आता लोकसंख्येमुळे शेतकरी अल्पभूधारक झाला आहे, पाच एकराचे शेत तीन भाउ कशाला करतील? एकजण ते बघेल दुसर्यांकडे इतर कामाशिवाय पर्याय नाही.. वाढत्या किमती एकत्र कुटुंबात फारतर दहा टक्क्यांनी कमी होतील तुर्तास' गेले ते दीन गेले 'आळवत बसण्याशिवाय पर्याय नाही...
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 03/26/2014 - 08:16 नवीन
एकत्र कुटुंब सध्याच्या काळात तरी इम्प्रॅक्टिकल आहे. एखादे कुटुंब अधून मधून तसे पहावयास मिळते, पण ते अगदी अपवादभूत आहे. एकत्र कुटुंबात खेकडावृत्ती पॉलिटिक्स प्रचंड चालते. अन त्यात फक्त बायकाच असतात असे नाही-पुरुष, बैका सगळे २४*७ तो कुरघोडीचा गेम खेळत असतात. ते पॉलिटिक्स मग भावंडांपर्यंत झिरपते अन भावंडांतील हागरीपादरी भांडणेही नंतर कौटुंबिक महाभारतात रूपांतरित होतात. त्यात परत कुटुंबप्रमुखाचा फेव्हरीट जो असेल त्याला इंप्युनिटी मिळते अन दीडदमडीचा वकूब नसलेले फालतूचा फॉर्म करतात. त्यात परत मुलगाच पायजे इ.इ. हट्ट धरणारे असतील तर संपलंच. अशा घरात चुकूनमाकून मुलगी पैदा झाली तर तिचे हाल कुत्रा खात नै. त्यामुळे दूर राहूनच गोडी दाखवलेले बरे असते. एकत्र कुटुंबाचे तसे फायदेही असतात, नै असं नै-पण तोटे फारच वैट्ट. शेवटी प्रायव्हसी अन स्वातंत्र्य जपावयाचे तर विभक्त राहिलेलेच बरे असते. जिथे सकाळी भाजी कुठली करावी आणि कुणाला रागवावे इथपर्यंत भांडाभांडी अन रेग्युलेशन चालते तिथे कसलं बोडख्याचं आलंय प्रेम????? असो. सिलेक्शन बायस प्रत्येकाचा असतो तसाच माझाही आहे. पण ही बाजू मांडणे आवश्यक वाटले (अजून कुणी मांडली नाही असे नै, पण तरी..) म्हणून लिहिले.
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Wed, 03/26/2014 - 08:44 नवीन
मते वाचनीय.. एकंदर ज्यामच कठीण आहे असे दिसते. तोटेच जास्त आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रकाश घाटपांडे Wed, 03/26/2014 - 09:33 नवीन
यकदम बरुब्बर हाये. हित नवरबायको ने यकमेकाच व्यक्तिस्वातंत्र्य जपत सहजीवन जगायच म्हंजीच तारेवरची कसरत हाय तिथ यवढ्या मोठ्या बारदानात कस काय जमनार? सध्या म्हन्ल तर यकत्र म्हन्ल तर शेपरेट असा मोड यकदम भारी हाये. कॉमन मिनिमम प्रोग्रामवर युती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/26/2014 - 09:39 नवीन
सध्या म्हन्ल तर यकत्र म्हन्ल तर शेपरेट असा मोड यकदम भारी हाये. कॉमन मिनिमम प्रोग्रामवर युती.
अगदी अगदी!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
न
नानासाहेब नेफळे Wed, 03/26/2014 - 09:47 नवीन
कॉमन प्रोग्रॅम मंजै काय .. दिवाली पाडवा एकत्र, विवाह श्राद्धादी संस्कार, कुणाची साक्षसुपारी... बाकीचा सगला शेपरेट पोग्राम असतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नितिन थत्ते Wed, 03/26/2014 - 09:13 नवीन
एकत्र कुटुंब असणे नसणे हा आर्थिक निर्णय असतो.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 03/26/2014 - 09:45 नवीन
समजा वडील आणि मुलं दोघही आर्थिकदृष्ट्य्या भक्कम असतील तर ते एकत्र रहात नाहीत असं म्हणायचं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
द
दिव्यश्री Wed, 03/26/2014 - 10:04 नवीन
दुर्दैवाने हो ...या प्रश्नाचे उत्तर हो असेच आहे . असंख्य उदाहरणे आजूबाजूला आहेत . त्यातील एक सांगते . अतिशय संपन्न , आर्थिक दृष्ट्या अस एक कुटुंब आहे . दोन मुले ...दोन्ही वेगळे राहतात . कर्तव्य सगळी पार पाडतात पण आम्ही एकत्र राहू शकत नाही अस सरळ म्हणतात . याला कारण त्यांच्या आई वडिलांनी अतिशय विचित्र पणे वागणे हे आहे . आमचे स्वतःचे ३ बिएचके घर आहे , पेन्शन आहे , आम्ही धडधाकट आहोत आम्हला कोणाचीही गरज नाही ई. असंख्य कारणे आहेत . जी आता सगळ्यांना तोंडपाठ आहेत . एक मुलगा कामानिमित्त परदेशात असताना बायकांची काहीतरी कारणाने वादावादी झाली तर सासर्यांनी रात्री सुनाबाईना अकराच्या दरम्यान अक्षरशः घराबाहेर काढले हे पहिले आहे. :( तरी देखील तो मुलगा आणि सून सासूसासर्यांची काळजी घेतात . शेवटी घरोघरी गेसच्या शेगड्या . हल्लीचा काळच असा आहे कि पोटचा मुलगा आईबापाला जड होतो पण मुलं-सुना कर्तव्य म्हणून का होयीना काही गोष्टी करतात त्यात सगळ्याच गोष्टींचा समावेश आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बॅटमॅन Wed, 03/26/2014 - 10:06 नवीन
हल्लीचा काळच असा आहे कि पोटचा मुलगा आईबापाला जड होतो पण मुलं-सुना कर्तव्य म्हणून का होयीना काही गोष्टी करतात त्यात सगळ्याच गोष्टींचा समावेश आहे .
ही फक्त एक बाजू आहे ओ. नपेक्षा आयुष्यभर खस्ता काढून वाढवलेल्या पोरांनी/पोरींनी म्हातारपणी भातातला खडा काढून फेकावा तसे आईबापाकडे दुर्लक्ष केलेली उदा. देखील कमी नाहीएत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
द
दिव्यश्री Wed, 03/26/2014 - 10:29 नवीन
ही फक्त एक बाजू आहे ओ. नपेक्षा आयुष्यभर खस्ता काढून वाढवलेल्या पोरांनी/पोरींनी म्हातारपणी भातातला खडा काढून फेकावा तसे आईबापाकडे दुर्लक्ष केलेली उदा. देखील कमी नाहीएत. >>> हो माहिती आहे . सध्या एक धाग्यावर त्याची चर्चा चालू आहे . यातील मुलीची बाजू कायम आईबापच घेतात ती सासुरवाशीण आहे , तीच्यावर आता अधिकार नाही ई . फक्त तिला माहेरपणाला बोलावणे आणि परस्पर पैसे देणे (मुलाच्या कष्टाचे, जो मुलगा रक्ताचं पाणी करून घाम गळून पैसे कमावतो) ,मुलाचे -सुनेचे खोटे नाटे गाऱ्हाणे सांगणे , सगळ्या नातलगात स्वतःच्या मुलाचीच धिंड काढणे आणि बरेच खालच्या पातळीला जाऊन वागणे असे असंख्य पदर /बाजू याला आहेत . स्वतःच्या आईबापाची लाज जाऊ नये म्हणून मुलगा हे सगळ सहन करतो आणि त्यांना हे माहिती असल्यामुळे भावनिक छळ/ छलकपट हा चालूच राहतो . :( पूर्वापार हेच फक्त लोकांसमोर आल आहे . नाण्याची दुसरी बाजू नाहीच असे नाही ना. स्वतःच्या मुला आणि मुलीमध्ये भेदभाव करणारे असंख्य पालक आहेत . मुलगी किती गरीब ,बिचारी ई . म्हणून मुलाने आईबापाला पाठवलेले पैसे परस्पर मुलीच्या तिजोरीत , पर्समध्ये जातात . बिच्यार्याला मुलाला याची पुसटशी शंकाही येत नाही . आईवडील हे देवच असावेत , देव कधीही भेदभाव करत नाही . देवतुल्य आई माझी देवतुल्य बाबा हे म्हणायला फार नशीबवान असाव लागत आणि मी अतिशय नशीबवान आहे . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/26/2014 - 10:32 नवीन
सहमत आहे हे वेगळे सांगणे न लगे.... बाकी आईवडिलांच्या बाबतीत आम्हीही अतिशय नशीबवान हाओत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
द
दिव्यश्री Wed, 03/26/2014 - 10:43 नवीन
बाकी आईवडिलांच्या बाबतीत आम्हीही अतिशय नशीबवान हाओत. >>>इस बात पे हाथ मिलाये ...आपले नशीब चांगले म्हणून असे आईवडील आपल्याला लाभले . त्यांना त्याची जाणीवही नसते कि ते आपल्यासाठी काय आहेत . यातच त्याचं मोठेपण / महानता सामावली आहे . माझ एकच मागण आहे देवाला जर पुढचा जन्म( या जन्मीची पाप जर याच जन्मी नाही फिटली तर ;) :P ) असेल तर मला हेच आईवडील हवे आहेत . या साठी मी पुण्याची पुंण्याची( पुण्याची / पुणे शहराची नाही *beee* ) कामे करत आहे . कमीत कमी ते तरी उपयोगी येवो म्हंजे झाल . :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मंदार दिलीप जोशी Wed, 03/26/2014 - 11:12 नवीन
सेम हिअर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
ह
हाडक्या Fri, 03/28/2014 - 20:20 नवीन
ते ठीक आहे हो.. पण ज्या मुलींना त्यांचे आई वडील (पैसे अथवा इतर स्वरूपात) मदत करत असतील, त्यांना पण असेच (हेच आई-वडील पुढील जन्मी मिळो वगैरे) वाटत असणार की.. (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
द
दिव्यश्री Tue, 04/01/2014 - 10:38 नवीन
बरोबरच आहेच तुमच फक्त त्यासाठी (मदतीसाठी ) ते (मुलीचे आईवडील ) हयात /जिवंत असले पाहिजे ना ...अजून काही शंका - कुशंका ? कोणालाही ?? (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ब
बॅटमॅन Tue, 04/01/2014 - 10:41 नवीन
अगदी सहमत आहे, फक्त हाच विवेक कुणी एक बाई गोरी नसून सावळी आहे म्हणून तिच्या सौंदर्याबद्दल रेसिस्टपणे नापसंती दर्शवताना जागृत ठेवला असता तर अजून बरं झालं असतं, नै? की ते चालतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
द
दिव्यश्री Tue, 04/01/2014 - 10:45 नवीन
आलेच :) ...आपलीच वाट बघते होते . यालाच म्हणत असावेत वड्याच..वांग्यावर ... नाही का ? याच उत्तर तिथेच मिळेल जिथे हा प्रश्न विचारण्यात आला पहिल्यांदा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 04/01/2014 - 10:50 नवीन
उत्तर द्यायचं तर द्या नैतर नका देऊ. बाकी काही असलं तरी या निमित्ताने तुमची दुटप्पी विचारपद्धती कळून आली त्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
द
दिव्यश्री Tue, 04/01/2014 - 11:01 नवीन
जरा बघा कि ओ मूळ धागा ...मगच बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 04/01/2014 - 11:06 नवीन
तिकडेही उत्तर दिलेय ओ रेसिस्ट बै. जरा मिपा रिफ्रेशवण्याचे कष्ट घ्यावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
प
पैसा Tue, 04/01/2014 - 11:08 नवीन
परत हिब्रु व्हर्सेस तामिळ काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
इ
इरसाल गुरुवार, 04/03/2014 - 10:29 नवीन
ते ग्रीक विरुध्ध सौंदिडियन हय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आत्मशून्य Tue, 04/01/2014 - 10:45 नवीन
हीच आकाशाकडे प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
आ
आत्मशून्य Tue, 04/01/2014 - 10:47 नवीन
तुम्हाला शामची आइ हे पुस्तक भेट म्हणून मिळुदे हीच आकाशाकडे प्रार्थना असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
न
नितिन थत्ते Wed, 03/26/2014 - 10:15 नवीन
हो. म्हणजे एकत्र कुटुंब असलेल्या बहुतांश ठिकाणी आर्थिक भक्कमपणा नसण्याची शक्यता खूप जास्त असते. [अतिवार्धक्य/आजारपण वगैरे कारणांनी एकत्र राहणे वेगळे]. आर्थिक बाजू ठीकठाकच असेल (कैच्या कै भक्कम नसेल) तर एकत्र कुटुंबाचे इकॉनॉमी ऑफ स्केलचे फायदे घेण्यासाठी एकत्र राहण्याचा पर्याय कधीकधी स्वीकारला जात असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
न
नगरीनिरंजन Wed, 03/26/2014 - 12:17 नवीन
१००% सहमत! आणि आर्थिक परिस्थितीच्या मुळाशी अतिरिक्त ऊर्जा आहे. जोवर ऊर्जेवर चालणारे यांत्रिक गुलाम दिमतीला आहेत तोवर लोकांची गरज नाही. फक्त त्या यांत्रिक गुलामांचा खर्च उचलणारा जोडीदार असला म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गणपा Wed, 03/26/2014 - 09:26 नवीन
टिव्हीवरच्या कौटुंबीक मालिकांची संख्या पहाता एकत्र कुटुंब पद्धतीला इतक्यात मरण नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री Wed, 03/26/2014 - 09:48 नवीन
हा हा हा ...ह्या ह्या ... ;) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 03/26/2014 - 11:27 नवीन
तसे नाहि हो गणपाभौ ते एकत्र कुटुंब आता फक्त मालिकांमध्येच राहिलेय, प्रत्यक्षात शक्य नाहिये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
स
स्मिता चौगुले Fri, 03/28/2014 - 11:49 नवीन
आणि या आशा मालिकांमधुन दा़खवले जाणारे प्रसंग म्हणजे अबब... किती अवास्तव, घरातली सून जी एकाच वेळी नौकरी करते, घर सांभाळते, अगदी सगळी कामे करून घरातल्या ज्येष्ठांचे सेवा करुन, ऑफिसमध्ये देखिल आघाडीवर , वर ती पुढचे शिक्षण ही घेत असते बरंका महाराजा. मग ते घरातले कितिही वाईट वागोत ही बयो सगळ्याचे चांगलेच चिंतत असते, त्यांच्यावर आलेली संकट निवारण्याचे आद्य कर्तव्यपण हिच पूर्ण करत असते. परंतू या अशा मालिका पहाणारा वर्ग हा मुख्यतः घरातील ज्येष्ठ मंडळी असल्याने आपसूकच ते त्या सिरीयलिच्या सूनेला आपल्या सुनेशी रिलेट करुन आवाजवी अपेक्षा ठेवायला लागतात.तिथेच पहिली ठिणगी पडते त्या एकत्र कुटूंब पध्द्तीला आणि त्या ठिणगीचा सुरुंग होतो. याला दुसरी बाजूही आहे, लग्नाळू मुली त्या राजश्री प्रोडक्षण छाप चित्रपट पाहूण सगळ गोडुल गोडूल होईल अशा स्वप्नात असतात. पण त्या चित्रपट छाप सासू-सासरे मिळण (बहू नही बेटी टाइप डायलॉग) हे कठिण असते, हजारात एखादी तशी भाग्यवान असते, प्रत्यक्षात सासूही सासूच असते हे मान्य करायला तयार होत नाहीत आणि लग्नानंतरच्या काही दिवसात जेंव्हा ही जाणिव होते तेंव्हा हळूहळू कुरबुरी सुरु होतात आणि असह्य होवून एक दिवशी स्पोट, वेगळे राहणे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
अ
अनन्न्या Wed, 03/26/2014 - 14:39 नवीन
मी त्या कुटुंबाचा एक घटक आहे. काही फायदे काही तोटे दोन्हीकडे आहेत. मी माझ्या मुलाला ठेवून कुठेही कधीही जाऊ शकते. कामांची वाटणी होते. माझा मुलगा बालवाडीत असताना त्याने एकूण भावंडे ५ आणि भावंडातील क्र्मांक चौथा असे सांगितले होते, म्हणजेच मुलांना एकटेपणा जाणवत नाही. कठीण प्रसंगी मनुष्यबळ कमी पडत नाही. घरातील वडीलधाय्रा माणसांना सांभाळणे, दवाखाने या गोष्टी परस्पर सहकार्याने होतात. बरेच खर्च कमी होतात. यामध्ये आर्थिक बाबी फार परीणाम करतात, कुटुंबातील कमावत्या व्यक्तींच्या उत्पन्नातील फरक, प्रत्येकाची समजून घेण्याची वृत्ती, कामाची जबाबदारी उचलण्याची प्रत्येक सदस्याची तयारी या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. कोणताच माणूस परीपूर्ण नसतो, भांड्याला भांडे लागतेच, ते तसे लागलेच पाहिजे, फक्त भांडण झाल्यावर ते विसरून प्रत्येकानेच दुसय्राशी बोलण्याची तयारी ठेवली तर बरेच कलह टळतात. निर्णय घेताना सर्वानुमते घेणे ही कुटुंबप्रमुखाची जबाबदारी असते. सोळा वर्ष झाली मला या एकत्र कुटुंबात राहून..काही गोष्टी खटकतात पण एकदा मला एकत्र रहायचे आहे हे नक्की झाल्यावर होते सुरळीत सगळे.....अजून तरी सासू सासरे आणि त्यांच्या तिन्ही मुलांचे परीवार एकत्र आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 03/27/2014 - 12:28 नवीन
नुस्ते तोट्याचे च आहे असे नाही, माझ्या मते मुर्खपणाचे आहे एकत्र कुटुंब. त्याला थोडासा गुलामगिरीचा पण वास येतो मला. १-२ लोक सत्ताधीश आणि बाकिच्यांची किंम्मत नोकरा सारखी
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Fri, 03/28/2014 - 11:57 नवीन
१००% मान्य. हे असे घडताना पाहीले आहे.सगळे सासूच्या हाती, घरात सासर्‍यांचे वर्चस्व. अगदी स्वतःच्या मर्जीने त्या सुनांनी स्वयपाकात एखादा पदार्थही करायाचा नाही. कितीही कुचंबना!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
आ
आनन्दा Tue, 04/01/2014 - 10:47 नवीन
तुमची एकत्र कुटुंबपद्धतीची व्याख्या चुकलीय असे वाटते.. तुम्हाला बहुधा सिरीयल्स मध्ये दाखवतात तसे एकत्र कुटुंब वाटत असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
श
शिद गुरुवार, 03/27/2014 - 12:53 नवीन
१. एकुलत्या एका मुलाने काय करावे? २. बायकोचे ऐकुन वेगळे रहावे की आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांच्यासोबतच रहावे? ३. त्यांनी मुलासाठी केलेली सगळी मेहनत, त्याग, ई. मुलाने विसरुन जावे व बायकोचे म्हणणे ऐकुन वेगळी चुल मांडावी? ४. एकुलत्या एका नातु/नाती बरोबर खेळण्या-बागडण्यापासून आजी-आजोबांना वंचित ठेवावे? ५. मग ह्यात आपला स्वःत चा स्वार्थ नाही का?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 03/27/2014 - 13:00 नवीन
१. एकुलत्या एका मुलाने काय करावे?
मी प्रतिसाद देताना एकत्र कुटुंब म्हणजे पहिली पीढी, दुसर्‍या पिढीतले २, ३ भाऊ आणि त्यांच्या बायका. तिसर्‍या पिढीतली मुले असे धरले होते. एकुलत्या एक मुलानी एकत्र रहावे कींवा घर जवळ घ्यावे. तब्येत ठीक असे पर्यंत शक्यतो एकत्र राहू नये. थोडे दुर पण गोडीत रहावे.
बायकोचे ऐकुन वेगळे रहावे की आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांच्यासोबतच रहावे?
मुलाला स्वताला वेगळे रहावे असे वाटत नसेल का? प्रत्येक वेळेला बायकोनी च कशाला सांगायला पाहिजे? आणि बायको नी तरी का तिच्या आई वडलांपासुन वेगळे रहावे?
त्यांनी मुलासाठी केलेली सगळी मेहनत, त्याग, ई. मुलाने विसरुन जावे
मुले जन्माला घालतानाच हा विचार करावा आई वडिलांनी. जर मुला/मुली साठी जे काही करतो आहे ते आपले कर्तव्य च आहे त्यात त्याग वगैरे काही नाही हे जर पटत असेल तर च मुले जन्माला घालावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
श
शिद गुरुवार, 03/27/2014 - 13:12 नवीन
धन्यवाद, आपण ३ प्रश्नांची उत्तरे दिलीत त्याबद्दल. अर्थातच सगळी मते पटलीच असे नाही पण तुमच्या मताचा आदर आहे...असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
द
दिव्यश्री गुरुवार, 03/27/2014 - 14:44 नवीन
मुलाला स्वताला वेगळे रहावे असे वाटत नसेल का? प्रत्येक वेळेला बायकोनी च कशाला सांगायला पाहिजे? आणि बायको नी तरी का तिच्या आई वडलांपासुन वेगळे रहावे? >>> मुले जन्माला घालतानाच हा विचार करावा आई वडिलांनी. जर मुला/मुली साठी जे काही करतो आहे ते आपले कर्तव्य च आहे त्यात त्याग वगैरे काही नाही हे जर पटत असेल तर च मुले जन्माला घालावी. >>> प्रचंड सहमत . मला खर्च काळात नाही नेहमी बायकांनाच का बर इतक नीच पातळीवर गेल्याच दाखवतात ? काय वायीट आहे वेगळ राहण्यात ? वेगळं निघाल कि सुनेने मुलाला तोडलं , हिला झाल्यावर बघू ई. पासून सुरवात होते शिनेर लोकांची ते का नाही कोणी कधी बोलत बर ? काही झाल कि बायकांवर सगळे दोष देऊन रिकामे होतात . स्वतःच्या आईबापाला मुलगाच जास्त चांगल्या पद्धतीने ओळखतो . सून म्हणजे खरतर प्रत्येकच तोंडीलावानच असते . आईबापाचा राग कुणावर तर बायकोवर ... मुलाचा राग , नातवांचा राग , कोणाचाही राग काढण्याची एकमेव व्यक्ती तीही हक्काची , सो कौल्ल्ड संस्कृतीने यांना बहाल केली आहे .तिचे आईवडील बिचारे लग्नात तिच्यावर पाणी सोडतात अक्षरशः . कन्यादानाच्या नावाने . काय वाटत असेल तेंव्हा त्या दोघांना . पोटाचा गोळा अशा लोकंच्या हातात देताना . आणि जर मुलगी एकुलती एक असेल तर हो ? साहजिक आहे याच कोणालाही काहीही देण घेण नसत . तरी काही नशीबवान असतात ज्यांना खर जावई मुलासारखा मिळतो . मुल जन्माला घालतानाच हा स्वार्थी विचार असतो कि म्हातारपणाची काठी . बाकी सगळेच पालक काही त्याग बिग करत नाही . नियमाप्रमाणे यालाही अपवाद आहेतच . जर वेगळ राहूनही मुलगा सून सगळी कर्तव्य पार पडत असतील तर वेगळा राहण्यात काहीही वायीट नाही अस माझ स्पष्ट मत आहे . शिनेर लोकांच स्वतःच आयुष्य मनाप्रमाणे जागून झालेलं असत आपल अजून कुठल्या कुठे जायचं आहे . असो . शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
र
रेवती गुरुवार, 03/27/2014 - 15:44 नवीन
सो कौल्ल्ड अल्हाददायक शब्द! गारीग्गार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
प
पिलीयन रायडर Fri, 03/28/2014 - 08:20 नवीन
सगळं पटलय!! मला एक कळत नाही.. लग्न झालं की नवरे बायकोच्या हातात जातात / तिनी सांगितलं म्हणुन आई बापांना सांभाळत नाहीत वगैरे कसं काय म्हणु शकतात लोक.. १. जर २५ दिवसात बायकोच्या आहारी मुलगा जात असेल तर चुक कुणाची? जन्मापासुन २५ वर्ष स्वतःच्या मुलाला "संस्कार" देऊनही तेवढं घट्ट नातं न तयार करु शकणार्‍या आई-बापाची , की आईबापाचा विचार न करणार्‍या मुलाची की अगदी काहीच दिवसांपुर्वी घरात येणार्‍या बायकोची?.. चला असं समजु की बायको अगदी व्हॅम्प आहे.. अरे पण तुम्ही तिचं ऐकायला काय कुक्कुलं बाळ आहात का? उलट असे पुरुष जे बायकोचं कारण देतात ते खरं तर बायकोच्या खांद्यावर बंदुक ठेवुन निशाणा साधत असतात.. प्रायव्ह्सी कुणाला नको असते? फक्त ती बायकोचं कारण दाखवुन मिळवु नका.. काय ते स्पष्ट बोला.. की बाबा राहु देत आम्हाला काही वर्ष एकटं.. तुम्हाला गरज पडली की आहोतच आम्ही.. २. आजकाल सगळ्याच बायका कमावतात.. अशा वेळी जी व्यक्ती घरात पैसा आणते तिच्या हातात सत्ता जाणार हे निश्चित.. पण जनरली सासु-सासर्‍यांना हे सत्तांतर अवघड जातं.. सुन कमावणारी तर हवी पण निर्णय आमच्या हातात, मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाहि असं होऊ शकत नाही.. त्यातुन जास्त वाद उद्भवण्या पेक्षा दोन घरात आपापली सत्ता चालवणे इष्ट.. ३. आई वडीलांना म्हातारपणी सांभाळणं हे मुलगा मुलगी दोघांचेही कर्तव्य आहे.. भले त्यांनी आपल्याला म्हातारपणाची काठि समजो वा न समजो.. समजलं तरी मला त्यात अगदीच गैर वाटत नाही.. त्यांनी लहानपणी आपल्या साठी खुप काही केललं असतं.. आपण त्यांच्या पडत्या काळात त्या सगळ्याची परतफेड करायलाच हवी.. कारण जर आपण सांभाळणार नसु (रादर मुलं आई बापाला सांभाळणार नसतील..) तर त्यापेक्षा पोरं बाळं जन्माला न घालता आहे तो पैसा उडवत दोघांनीच मस्त रहाणं कुणीही पसंत करेल.. करण तसंही म्हातारपणी एकटंच रहायचं आहे..माणुस शेवटी रिटर्न्स पहाणारच ना.. त्यात गैर काय? त्याच्या कष्टाला, त्यागाला अर्थ काय उरतो मग? ४. मुलगी पण आई वडीलांना सोडूनच रहाते.. तेव्हा हा बाऊ होत नाही.. मग तेव्हा कुणी आम्हाला ऐवत नाही की "नवरा आला की आईबापाला विसरली".. रादर आम्ही तसं करणंच अपेक्षित आहे.. मग मुलाचे आई वडील दुसर्‍या घरात राहिले तर त्यात एवढं काय बिघडलं? एकाच शहरात मी माझ्या आई बाबांपासुन वेगळ्या घरात रहाते.. आणि सगळ्यांनाच ते बरोबर वाटतं.. पण मी माझ्या सासरी जाउन वेगळं बिर्‍हाड थाटलं तर किती गजहब होईल? माझे सासु सासरे आमच्या कडे राहिले तर ते ओके.. पण उद्या माझे आई वडील आले तर त्याची चर्चा होणार हे निश्चित.. मी काल परवाच एका ६०-६५ वर्षांच्या काकांशी बोलत होते.. त्यांनी मला अगदी आवर्जुन सांगितलं की माझी सासु पण माझ्या कडेच असते.. त्याम्ची आई सुद्धा असते.. पण ते तर नियमाला धरुनच आहे ना.. सासुला सांभाळतो म्ह्णजे किती ग्रेट..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
स
स्मिता चौगुले Fri, 03/28/2014 - 12:06 नवीन
पिलीयन रायडर, विचार आवडले आपले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा