Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द

क
कौशिक लेले
Tue, 04/01/2014 - 18:53
🗣 123 प्रतिसाद
ऑनलाईन मराठी शिकवण्याच्या यशस्वी आणि लोकप्रिय उपक्रमानंतर काल गुढीपाडव्याच्या - मराठी नवीन वर्षाच्या - शुभमुहूर्तावर मराठी भाषा विषयक नवीन उपक्रम सुरू केला आहे. जो आहे - "नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द". चला, नवीन मराठी शब्द घडवूया; असा शब्द सुचला की जास्तित जास्त जणांपर्यंत तो पोचवूया; एकापेक्षा जास्त पर्याय असतील तर कुठला जास्त चांगला वाटतो ते ठरवूया; आणि असे नवीन शब्द मराठी भाषेत रुळवुया. इतका साधा सोपा उपक्रम आहे हा !!. हा उपक्रम माझं एकट्याचं किंवा कोणा एका व्यक्तीचं काम नाही. आपण सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे. आणि वाटतं तितकं हे काम अवघड नाही. या उपक्रमासाठी वेगळा वेळही काढायची गरज नाही. आपल्या रोजच्या मराठी बोलण्यात/वाचण्यात एखादा इंग्रजी शब्द ऐकला-वाचला की Back of the mind त्याचा सोपा मराठी शब्द काय असेल याचा विचार करायचा. आणि असा काही शब्द सुचला की आपल्या फेसबुक ग्रूप वर इतरांना सांगायचा. लोकांना कदाचित तो आवडून जाईल किंवा त्यातून अजून नवीन कल्पना सुचतील. साध्या मराठीत संगायचे तर तुमच्या "क्रिएटिव्हिटी" ला वाव आणि जरा "ब्रेन्स्टॉर्मिंग". रोजच्या धावपळीत ही "क्रिएटिव्हिटी" तुम्हाला "रिफ्रेशच" करेल. एकदम वैज्ञानिक संज्ञांवर उडी न मारता रोजच्या वापरातल्या, इंटरनेट वर वापरल्या जाणाऱ्या शब्दांपासून सुरूवात करूया. उदा. १) दुकानांवरच्या पाट्या २) टीव्ही वरच्या मराठी मालिकांमधले संवाद. उदा. "मी तुला खूप मिस्‌ करते" ई. ३) मराठी बातम्यांमधले शब्द उदा. ब्रेकिंग न्यूज, बंडखोराला तिकिटाची ऑफर, ई. ४) एफेम रेडीओ वरची रेडिओ-जॉकींची बडबड ५) वर्तमानपत्रांमधल्या. टीव्ही-रेडिओ वरच्या जाहिराती तुम्हाला जाणवलंच असेल की यासाठी भाषातज्ञ, व्याकरणतज्ञ असण्याची काही गरज नाही. साधीसोपी माणसं आणि त्यांचे साधे सोपे शब्द !! तर नक्की या फेसबुक पेजला जॉइन व्हा आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी नातेवईकांनाही जॉईन करायला सांगा. जितके जास्त सभासद तितक्या जास्त कल्पना आणि तितकी अधिक मजा एखादा ऑनलाईन गेम खेळल्या प्रमाणे ! https://www.facebook.com/groups/494409877351095/ आणि या ग्रूप वर चर्चा झालेले शब्द ह्या ब्लॉगवर टाकत जाईन जेणेकरून सगळे शब्द एकत्र बघता येतील. http://navin-marathi-shabda.blogspot.in/ म्हणतात ना -"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे". तुमचा हातही त्यातलाच एक नक्की आहे !!

प्रतिक्रिया द्या
93212 वाचन

💬 प्रतिसाद (123)
ख
खटपट्या Tue, 04/01/2014 - 19:05 नवीन
चांगला उपक्रम !!!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Tue, 04/01/2014 - 19:39 नवीन
चांगला उपक्रम आहे.
  • Log in or register to post comments
स
सचिन Tue, 04/01/2014 - 19:55 नवीन
अभिनन्दन आणि शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 04/01/2014 - 20:03 नवीन
मला मदत करशील या ऐवजी सरसकट सगळ्या मालीकांत " माझी मदत करशील ( मेरी मदद करोगे) असे हिन्दाळलेले शब्द येत असतात
  • Log in or register to post comments
स
सचिन Tue, 04/01/2014 - 20:10 नवीन
स्वैपाक करण्याऐवजी "जेवण बनवतात". .. असो, पण कौशिकभाऊंना इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द हवेत. शोधूया ...!!
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Wed, 04/02/2014 - 07:55 नवीन
कौ शिकलेले लै हुशार
  • Log in or register to post comments
श
शरद गोरडे Wed, 04/02/2014 - 08:04 नवीन
शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Wed, 04/02/2014 - 08:32 नवीन
पण ह्या मराठीकरणाच्या नादात भाषेला भयाण आणि अकलेचा खंदक दाखवणारे गचाळ शब्द बहाल करू नका ही नम्र विनंती. उदा: तूनळी - youtube थोबाडपुस्तक - facebook चोप्य-पस्त - copy paste ह्या वरच्या टुकार शब्दांबरोबरच काही चांगले समर्पक शब्दही मराठी भाषेला मिळाले आहेत. उदा: खरडवही - scrapbook जालनिशी - blog
  • Log in or register to post comments
म
मारकुटे Wed, 04/02/2014 - 08:35 नवीन
हा हा आयबॉल म्हणजे मीगोळा का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
र
रमेश आठवले Fri, 04/04/2014 - 08:36 नवीन
डोळागोळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
ध
धन्या Wed, 04/02/2014 - 14:09 नवीन
तूनळी - youtube थोबाडपुस्तक - facebook चोप्य-पस्त - copy paste
हे अतिउत्साही लोकांचे उपद्व्याप आहेत. ही सारी उदाहरणे "विशेषनामे" आहेत. विशेषनामांचे शब्दशः भाषांतर होत नाही. त्यामुळे इंग्रजीतील "युटयुब" हा शब्द असलेले वाक्य इतर भाषांमध्ये भाषांतरीत होतात "युटयुब" असेच राहायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
क
कंजूस Wed, 04/02/2014 - 10:31 नवीन
मराठी शब्दच वापरायचे असं ठरवलं तरी खूप झाले .
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/02/2014 - 13:48 नवीन
मला फेसबुक साठी 'मुखप्रुष्ठ' हा शब्द बरोब्बर वाटतो! :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 04/02/2014 - 13:50 नवीन
मला 'मुखप्रुष्ठ' ऐवजी 'मुखपृष्ठ' हा शब्द बरोबर वाटतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ध
धन्या Wed, 04/02/2014 - 14:18 नवीन
"फेसबुक" हे इतर भाषांमध्ये सुद्धा "फेसबुक"च राहायला हवे. ते विशेषनाम आहे. उदा. "अत्रुप्त आत्म्याने ताकाचे भांडे लपवले" हे वाक्य इंग्रजीत भाषांतरीत करताना ते "Atrupt Aatma hid buttermilk pot" असे होईल. "Unsatisfied soul hid buttermilk pot" असे नाही होणार. "Atrupt Aatma" हे विशेषनाम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 04/02/2014 - 14:33 नवीन
सहमत आहे. माझा आक्षेप फक्त 'मुखप्रुष्ठाविषयीच' होता.
अत्रुप्त आत्म्याने ताकाचे भांडे लपवले
वाक्य कितीही बरोबर असले तरी प्रत्यक्षात अत्रुत आत्मा भांडे लपवित नसून 'भांडे का लपविता' असे विचारीत असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
प्यारे१ Wed, 04/02/2014 - 15:44 नवीन
ते अत्रुप्त आत्मा असल्यानं मुखप्रुष्ठच बरोबर आहे. गॄप मधला प्यारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ध
धन्या Wed, 04/02/2014 - 15:51 नवीन
अत्रुप्त आणि अतृप्त तसेच मुखप्रुष्ठ आणि मुखपृष्ठ यामधील फरक काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बॅटमॅन Wed, 04/02/2014 - 15:58 नवीन
संस्कृतमधील ऋ या स्वराचा मराठीत 'रु' असा उच्चार होतो, इतकाच काय तो फरक. वरिजिनल ऋ चा उच्चार ३ प्रकारे केला तर चालतो. पण पाणिनीचे सूत्र पाहू अगोदर. ऋटुरषाणां मूर्धा| याचा अर्थ असा, की ऋ, ट-ठ-ड-ढ आणि ष या सर्व वर्णांचे उच्चारस्थान मूर्धा आहे. बाकी डीटेल्स जाऊद्यात. वरीलप्रमाणे ऋ चा उच्चार करणे अत्यंत सोपे आहे. आम्रविकन लोकांचे उच्चार ठौक असतीलच. त्यात उदा. we're going there या. वाक्यामध्ये r चा उच्चार कसा असतो? तसाच याचा उच्चार करावा. अन हा उच्चार मराठीत "ऴ" ने दाखवता येतो. "तमिऴ" मध्येही हाच उच्चार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ब
बॅटमॅन Wed, 04/02/2014 - 16:02 नवीन
किंवा अजून सोपे उदा. "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम" या गाण्यात "करते" हा शब्द, त्यातही "र" हे अक्षर लांबवलेले आहे. तो र चा उच्चार म्हणजेच संस्कृतचा ऋ म्हटला तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
श
शिद Wed, 04/02/2014 - 16:45 नवीन
किंवा अजून सोपे उदा. "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम"
आम्हाला आमच्या बाई/मास्तरांनी अश्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने समजावले असते तर आमचे पण व्याकरण थोडेफार सुधारले असते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ध
धन्या Wed, 04/02/2014 - 17:13 नवीन
मी ही हेच म्हणतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
य
यसवायजी Wed, 04/02/2014 - 17:21 नवीन
:) आम्हाला आमच्या बाईंनी अश्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने समजावले असते तर.. आमचे पंटर म्हन्ले अस्ते.. बहुत प्यार करते हैं, तुमको मॅडम्म.. हंम्महंम्म्..म्म ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
आ
आत्मशून्य Wed, 04/02/2014 - 18:12 नवीन
रच्याकने मुख आणी पृष्ठ हे दोन विरोधी शब्द नाहीत काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
प
प्यारे१ Wed, 04/02/2014 - 17:22 नवीन
हे उच्चार कुमार सानूनं म्हटलेले की बाबूजींनी (बाबूजी भक्तांनी हलकं घ्या. कुमार सानूभक्त फारसे नसावेत ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जातवेद Sat, 04/05/2014 - 16:46 नवीन
आता वाळिंब्यांनी असली उदाहरणे वापरायला सुरू केली पाहिजेत.. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 04/05/2014 - 19:04 नवीन
अर्थातच. त्याशिवाय लोकांना लगेच कळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 04/09/2014 - 06:30 नवीन
बहुत सुंदर ! "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम" या गाण्यात "करते" हा शब्द, त्यातही "र" हे अक्षर लांबवलेले आहे. तो र चा उच्चार म्हणजेच संस्कृतचा ऋ म्हटला तरी चालेल. अशी उदाहरणे देऊन मराठी शिकवायला सुरुवात केली तर "मराठी भाषेचा वापर कमी होत चालला आहे" किंवा "मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने लिहिली/बोलली जाते" ही भिती कमी व्हायला मदत होईल ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 04/02/2014 - 14:49 नवीन
शाळा कादंबरीतली व्याक्रणाची उदा. आठवली: "सुरेशने महेशला मारिले", "महेश दूध पितो", "महेश मार खातो", इ.इ.इ. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
व
विजुभाऊ गुरुवार, 04/03/2014 - 06:10 नवीन
धन्या काका तुमचे बरोबर आहे. आत्र एक चूक आहे फेसबुक या नावाचे भाषाम्तर करणे म्हणजे "नील आर्मस्ट्राँग" याचे भाषांतर निळूभाऊ भुजबळ असे किंवा उदा " मायकेल शूमाखर" चे भाषांतर "मायकेल चांभारे" असे भास्।आम्तर करण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/02/2014 - 17:06 नवीन
@मला 'मुखप्रुष्ठ' ऐवजी 'मुखपृष्ठ' हा शब्द बरोबर वाटतो.>>> राम..राम..राम..राम... कहर झाला. :-/ अहो ते मोबॉइल वरून पृ टाइप करता येत न्हाई! तिथे पृ च्या जागी प्रु च टाइप करावं लागतं ! :-/ तरिही खाली आलेलं खाटुकम्यानाचं अप्रतिम विवेचन पहाता.. झालं ते बरच(अवांतर) झालेलं असलं ;) तरी बरच झालं! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सचिन Wed, 04/02/2014 - 18:06 नवीन
अरे मूळ धाग्याचे काय झाले ??
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 04/02/2014 - 18:33 नवीन
आहे ती मराठी टिकवा त्यापेक्षा..... तू असं का बोलला? (या नंतरचा 'स' नेहमी गाळला जातो. 'बोललास' असं रूप असतं) मी तुला भेटेल. (भेटेल????? तृतीयपुरुष एकवचन आहे का?) मी तिला बोलली, ती मला बोलली..... (अरे काय!!!) अगणित चुका असतात... अगणित...! त्या सुधारायची मोहीम काढली तर बरं. अजून नवीन शब्दांची गरज नाही !
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 04/02/2014 - 18:39 नवीन
खरंय. बर्‍याच जागी पुस्तक, वह्या पण 'भेटतात' लोकांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ब
बॅटमॅन Wed, 04/02/2014 - 18:58 नवीन
म्हणणे अन बोलणे यातला फरकही लोक नजरेआड करतात. म्हणणे हे क्रियापद हद्दपारच होत चाललंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
य
यसवायजी Wed, 04/02/2014 - 20:57 नवीन
बराबर बोल्ला तू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ख
खटपट्या Wed, 04/02/2014 - 20:15 नवीन
खालील वाक्यांवर स्वतंत्र धागा होऊ शकतो.
मी चहा पिलो / प्यायलो / पिली / प्यायली (?) तो चहा/ती चहा (?)
सद्या मी "मी चहा प्यायलो" असेच म्हणतो/बोलतो. मी ठाण्याचा रहिवासी/रहिवाशी आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेश उमाजी पाजवे Wed, 04/02/2014 - 21:44 नवीन
केसं, दगडं किवा असेच काही .. आणि आजकालची मराठी गाणी सुद्धा याच वाटेने चालली आहेत. उदाहरणार्थ - आयचा घो आयचा घो येडा झाला का रे आयचा घो आयचा घो पागल हुआ है ये आपणच अशी गाणी लिहायची आणि वर मराठी भाषा कशी लोप पावत चालली आहे वगैरे यावर चर्चा झाडायची.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/03/2014 - 08:54 नवीन
हिंदीच्या अतिप्रचारामुळे आणि सुलभीकरणाच्या भोंगळ कल्पनांमुळे मराठीचा संपूर्ण साचा बदलत चालला आहे आणि माझ्या मते तो योग्य नाही. उदा. मी अकोला जातो. विभक्ती प्रत्यय कुठे गेला? माझा वाढदिवस पुण्यात मनवला. मनवला? साजरा केला असे म्हणतात मराठीत. विभक्ती प्रत्यय तर हरवत चालले आहेत. मी त्याची मदत केली हे आणखी एक उदाहरण. पैसे भेटले. भेटले? पैसे काय मनुष्य आहेत काय भेटायला? असो.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 08:58 नवीन
हिंदीच्या अतिप्रचाराबद्दल अतिशयच सहमत. तदुपरि भेटणे हे कियापद मिळणे या अर्थी वापरणे हे फक्त अलीकडचे नसावे असे वाटते. विदर्भ इ. भागांत अगोदरपासून असेच बोलत असावेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मारकुटे गुरुवार, 04/03/2014 - 09:45 नवीन
भाषा सतत बदलत असते. विभक्ती प्रत्ययांची रुपे बदलत असतात. इतर भाषांच्या संपर्कामुळे नवनवे प्रयोग होत असतात. जीभेला ऐकायला बोलायला जे नीट वाटतात ते रुढपावत असतात. असंच आणि असंच हवं या हव्यासापोटी संस्कृत मृत झाली. मराठीबद्दल अजुन आशा आहे. पैसे मिळाले हेच योग्य रुप हे कुणी ठरवल? त्यांना तो हक्क कुणी दिला? समोरचा माणुस पैसे भेटले म्हटल्यावर ज्याला सांगत आहे त्याला समजले ना? संवाद पूर्ण झाला. संवाद होणे महत्वाचे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/03/2014 - 13:09 नवीन
असहमत भाषा नवसंपर्क वगैरे वगैरे जरी असले तरी 'अति' वर्ज्य असावे आणि असावेच. मी मुंबईला जातोय च्या ऐवजी मी मुंबई जातोय हे कुठल्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही. अशा अतिरेकी सुलभीकरणामुळेच मराठीची पिछेहाट होत आहे हे नक्की. एकतर न्यूनगंडापायी इंग्रजीचा केला गेलेला अतिरेकी स्वीकार आणि भाषाभिमान नसल्यामुळे कुठलेही टुकार बदल 'झाला ना संवाद पूर्ण?' अशा मानसिकते पायी स्वीकारणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. विचारणार्‍याला विचारण्याचा हक्क कोणी दिला हे विचारण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला असाही उपप्रश्न विचारला जाऊ शकतो. झालंच तर आपल्या भाषेवर हिंदी, इंग्रजीचा प्रभाव पाडून घेण्यापेक्षा उलटा प्रयत्नही कधी करावा. भले लगेच जमणार नाही किंवा लगेच शक्यही नाही परंतु सुरुवात नक्की व्हावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 13:15 नवीन
पैसे भेटले हा प्रयोग हिंदीच्या प्रभावाखालीच होतोय याला विदा काय? हिंदीचा मराठीशी खूप जवळून संपर्क फारतर गेल्या पन्नासेक वर्षांचा. त्याआधी हा प्रयोग असेल तर काय म्हणणार मग? अन उलटा प्रभाव हिंदीवर थोडासा का होईना, आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/03/2014 - 14:24 नवीन
कदाचित हिंदीच्या प्रभावाचा मुद्दा आधी आल्यामुळे भेटणे वर त्याचा प्रादुर्भाव झाल्यासारखा वाटतो आहे. तसे नाही २न्ही मुद्दे स्वतंत्र आहेत. विदाच पहायचा झाला तर पूर्वीचे चित्रपट , झालंच तर आकाशवाणीवरच्या श्रुतीका, नाटके यात पैसे भेटणे या वाक्प्रचाराचा अभाव दिसेल आणि तो मी लहान असल्यापासून अनुभवलाच आहे. झालंच तर विदर्भात तो वापरात असेल तर तो वीर वामनराव जोशी या वैदर्भिय नाट्यकाराच्या नाटकांमधे तो दिसत नाही. आणि हो प्रभावाबद्द्लच बोलायचे झाले तर मराठीतील विभक्ती प्रत्यय बाद करण्याचे कारण मला उमजले नाही. मग भले विदर्भातले लोक "मी नागपूर जातो" म्हणत असतील तरी ते चूकच आहे. मग अशा बोलण्याला कोणी बोलीभाषेचा लेप देऊ पाहत असेल तर त्याला विरोध नक्की करावा. कारण माझे जवळचे नातेवाईक देखील विदर्भातील आहेत परंतु तेही असे बोलताना ऐकले नाही. अर्थात त्याच्याशी तुम्ही आधीच सहमत आहात असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 14:27 नवीन
विभक्तीच्या मुद्यावर सहमती आहेच. बाकी तुम्ही दिलेली उदा. 'प्रमाण' मराठीची आहेत. नाटककार वैदर्भी असले तरी नाटके वर्‍हाडी बोलीचे प्रतिनिधित्व करतील असे क्वचितच दिसावे. त्यामुळे फक्त बोलीभाषेतली उदा. पाहिजे होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
पैसा गुरुवार, 04/03/2014 - 14:47 नवीन
असे कोकणातही सर्रास बोलीभाषेत ऐकायला मिळते. प्रमाण मराठीत आहे तसा बोलीभाषेत 'मिळणे' आणि 'भेटणे' यात फारसा फरक नाही. याशिवाय 'गावले नाय' असंही म्हणतात. प्रमाण मराठीत मात्र 'गावले' म्हणजे फक्त 'सापडले'. कोंकणीतही मिळाले आणि भेटले या दोन्हीसाठी 'मेळ्ळे (मेळले)' असंच वापरलं जातं. तेव्हा हे शब्दप्रयोग चूक असं म्हणता येणार नाही. प्रमाण मराठीत वापरले जात नाहीत एवढंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 14:52 नवीन
सहमत. गावणे हाही शब्द आहेच. प्रमाण मराठी सोडूनही मराठीचे एक प्रचंड मोठे विश्व आहे त्यात काय काय घडतं याची नोंद करून ठेवणे मस्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुहासदवन गुरुवार, 04/03/2014 - 19:13 नवीन
सध्या मिपावर आणि इतर अनेक संस्थळांवर हे दिसत आहे.....
पूर्ण सहमत!!!!!!! खच्चून निषेध केल्या गेला आहे.
बर्‍याच मालिकांत ऐकू येते - मी काय म्हणली, तू काय म्हणला, ते काय म्हणले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 04/04/2014 - 08:59 नवीन
केल्या गेला आहे इ.इ. ही मिपावरची स्टाईल आहे, मराठवाड्यातल्या मंडळींनी पापिलवार केलेली. ती इतरांनी उचलली, इतकेच. अन म्हणला इ.इ. तर बोलीभाषा आहेच-फक्त त्यांना दरवेळेस अशुद्ध अशुद्ध म्हणून हिणवल्या जाऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन
स
सुहासदवन Fri, 04/04/2014 - 11:32 नवीन
पण इतर अव्याकरणीय जालीय संस्थळांच्या यादीत आपले मिपा मात्र नसावे हे माझे स्पष्ट मत आहे. ह्या संस्थळावर अनेक सुन्दर आणि अभ्यासपूर्ण लेख / लेखमालिका सातत्याने येत असतात. इस्पीकचा एक्का, ऋषिकेश, क्लिंटन, गवि, बॅटमॅन आणि इतर अनेक मान्यवर लेखक बरीच मेहनत घेऊन हे लेख मांडतात. त्या ले़खांचे प्रयोजन, त्यात असणारी माहिती, शब्दभांडार, व्याकरण, उपमा इत्यादी आम्हा सार्‍या वाचकांसाठी एक पर्वणीच असते. अगदी त्या लेखांखालील असणाऱ्या टिप्पण्या देखील बऱ्याचदा खूप मार्मिक आणि माहितीपूर्ण असतात. आजच्या युगात जिथे छापील पुस्तके आणि त्यातही व्याकरणासारखं काहीतरी कठीण वाचण्यास जेव्हा अजिबात वेळ नसतो त्यावेळी मिपा सारखी संस्थळे दर्जेदार वाचनाची भूक भागावितात. आणि हेच मिपाचे यश देखील आहे. पण ह्या लेखांनी आणि त्या खालील असणाऱ्या टिप्पण्यानी आपल्या दर्जा बरोबरच आपल्या मराठी भाषेची शब्द प्रामाण्यता टिकवली तर किती चांगले होइल... कारण अनेक युवक / युवती हे लेख आणि लेखमालिका आपल्या किंवा मित्रांच्या संदर्भांसाठी उतरवून घेतात, अशा वेळी आपली भाषा किती सशक्त आणि प्रमाणबद्ध हे माहित पडते. अशा वेळी अगदी एखादा चुकीचा शब्द किंवा चुकीचे व्याकरण भाषेचे सौंदर्य नकळत नष्ट करू शकते आणि चुकीच्या व्याकरणाचा पायंडा पाडू शकते. आणि मला वाटते ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, मराठी भाषा टिकवायची असेल तर… कारण चांगली सवय पटकन लागत नाही पण चटकन सुटते वाईट सवय पटकन सुटत नाही पण चटकन लागते. इथे कोणालाही सुनावण्याचा, दुखावण्याचा काहीही हेतू नाही. कृ. ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा