Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

ग — गंगाधर मुटे, Sun, 04/13/2014 - 01:51
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये

एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये

कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये

जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?

कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?

तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये

बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये

                                         - गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==


प्रतिक्रिया द्या
33866 वाचन

💬 प्रतिसाद (83)
ग
गंगाधर मुटे Sat, 04/19/2014 - 16:45 नवीन
श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह

       आमच्या ग्रामविकास भागवत कमेटीच्या वतिने श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताहाच्या आयोजनाचं हे १२ वे वर्ष.

दिनांक : १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०१४

Image removed.
* * * *
Image removed.
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
Image removed.
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
Image removed.
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई. या निमित्ताने बालगोपालही आपापल्यापरिने सहभाग नोंदवतात.
* * * *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
म
मृगनयनी Sat, 04/19/2014 - 16:54 नवीन
मुटे.... व्हेरी गुड पॉलिसी हं!!!!!..... कीप इट अप!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
म
मृगनयनी Sat, 04/19/2014 - 16:58 नवीन
अर्थात या फोटोंचा या धाग्याशी काहीही संबंध नाही... हे आपल्यालाही माहित आहे. आणि हे फोटो इथे कश्यासाठी टाकलेत.. हे सूज्ञांना सांगायला नको!!!!!!! :) :) हरे राम हरे कृष्ण !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
ग
गंगाधर मुटे Sun, 04/20/2014 - 17:26 नवीन
मृगनयनी, गेली १२ वर्षे मी "श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाचे" आयोजन करत आहे, हा माझा ढोंगीपणा आहे, असे तुम्हाला म्हणायचे असेल तर http://www.misalpav.com/node/24663 या लिंकवरील गझलेतील माझाच एक शेर माझ्याच विरोधात माझा कबुलीजबाब म्हणून वापरू शकता. :) सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
व
विवेकपटाईत Fri, 04/18/2014 - 18:12 नवीन
अवकाळी पावसासाठी वरुण देवाला दोष देण्यात अर्थ नाही. यात माणसाची शुद्र आणि स्वार्थ बुद्धीचा दोष अधिक आहे. आपण (माणसे) स्वत: देव बनून परमेश्वराने निर्मित केलेल्या सृष्टीत वाजवी पेक्षा जास्त ढळवा-ढवळ करत आहोत आणि त्याचे परिणाम ही आपण भोगतो आहे. वर विना कारण देवाला दोष देत आहोत. मुटे साहेब निराशा सोडून या मागचे वास्तविक कारणे काय आहेत याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे आणि त्या वर उपाय शोधणे ही.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Fri, 04/18/2014 - 19:49 नवीन
यात वरूण गांधी कुटाय
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 04/18/2014 - 20:24 नवीन
मुटे साहेब आपल्या कविता विशेषकरुन नागपुरी तडके फार आवडतात. या कवितेबद्दल, उगाच वितंडवादात उर्जेचा अपव्यय करण्यापेक्षा, एक मस्त तडका लिहून टाका. जे झालं ते झालं त्यावर चर्वितचर्वण अन आरोप-खंडण-प्रत्यारोप-खंडण मध्ये कशाला उर्जेचा व्यय करता? बघा मला तरी असे वाटते. बाकी आपण सूज्ञ आहातच.
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 04/18/2014 - 20:32 नवीन
*खंडन असे वाचावे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
म
मृगनयनी Sat, 04/19/2014 - 07:58 नवीन
Live in the Fear of God
अरे व्वा!!!.. हे वाक्य काय मुटें'साठी आहे का?... व्वा व्वा!!!.... आवडली स्टाईल... कीप इट अप!!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Sat, 04/19/2014 - 15:19 नवीन
नाही नाही माझी सही आहे बस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी Sat, 04/19/2014 - 15:46 नवीन
नाही नाही माझी सही आहे बस! Live in the Fear of God अच्छा!!!... पण या धाग्याच्या पार्श्वभूमीवर ती सही फारच "रोचक" आणि धागालेखकासाठी संवेदनशील आणि उचित संदेशकारक वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ध
धन्या Sat, 04/19/2014 - 08:03 नवीन
धाग्यावर नेहमीचा प्रतिसाद खेचक विषय घुसल्यामुळे आता, "आयेगा मजा अब बरसात का" :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 04/19/2014 - 16:08 नवीन
कविता आणि बिरुटे सरांनी केलेले रसग्रहण आवडले. आपल्याकडे संतांनीही देवाला भरपूर शिव्याशाप दिले आहेत. जनाबाईचा अभंग पटकन आठवला. त्याचा अर्थ भले वेगळा आहे पण वरकरणी शिव्याच आहेत. "अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी" त्यामुळे इथे वरूणदेवाला शिव्या देण्यात काही आक्षेपार्ह वाटले नाही. आई आपल्याला लेकराला कधी रागाने "मर मेल्या" म्हणते, तेव्हा तिला तो मरावा असे खरेच वाटते का? कधीच नाही! तसाच हा कवीचा त्रागा आहे!
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Sat, 04/19/2014 - 16:51 नवीन
पैसाताई... कृपया इथे जनाबाईंची तुलना गंगाधर मुटेंशी करण्याचा मोह टाळला, तर बरे होईल.... कारण दोघांच्या मतांमध्ये आणि देवाविषयी वाटणार्‍या भावांमध्ये प्रचंड तफावत आहे. शब्दार्थांमध्ये जरी वर वर साधर्म्य दिसत असले, तरी दोघांचा देवाविषयीचा भाव खूप वेगळा आहे. जनांबाईंच्या ओव्यांमधून भक्तीरस ओथंबून वाहतो आहे.. तिच्या विठुरायावर तिचा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे...आणि तिच्या शिव्यांमध्येही तिने विठुरायाची गुणगानच गाईले आहे.- तिचा विठ्ठल हा मूळ-महामायेचाच एक अंश आहे...आपण दिलेल्या जनाबाईंच्या ओव्यांमधल्या दोन ओळींमधल्या विरोधाभासातलाही अर्थ खूप गहन आणि विठ्ठलभक्तीने ओथंबलेला आहे.. जनाबाईच्या विठुरायामुळे रांडही जन्मसावित्रीचा पवित्र चुडा घालू शकते. आणि काळानेही विठुरायापुढे हात टेकले आहेत..... ही ओवी खरंच खूपच भावपूर्ण आहे... आणि जनाबाई काय कुणीही संतानी काय देवाला शिव्या घातल्या म्हणून आपणही घालायच्या.. वरकरणी शिव्या भासवून जातीयवादा'ची आपली भडास पुरी करून घ्यायची... खरंच खूप हास्यास्पद आहे हे!!!.. मुटेंसाठी "देव" हा कुणीतरी वेगळा माणूस आहे. आणि त्याच्यावर श्रद्धा नसलेल्यांच्या शेतात तो गारपीट करतो.. असे काहीसे त्यांचे म्हणणे आहे...... वर मला दिलेल्या एका प्रतिसादात गंगाधर मुटेंनी हे सुस्प्ष्टपणे लिहिले आहे.. की देवाला गारपीट करायची असेल तर "त्याच्या भक्तांच्या शेतात करावी.. आम्हला कश्याला त्रास देतोय" ...
गंगाधर मुटे - Fri, 18/04/2014 - 18:46 मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच. मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile माझी वाङ्मयशेती - Facebook Page बळीराजा डॉट कॉम उत्तर द्या
इथे एखादी आई जरी आपल्या मुलाला शिव्या देत असली.. तरी तिच्या मनात.. त्याच्याबद्दल मनातून प्रेम असते.. जे, की जनाबाईंच्या ओव्यांमधून विठ्ठलाबद्दल जाणवते. पण मुट्यांच्या प्रतिसादातून मात्र देवाविषयी प्रेम कमी आणि तिरस्कार जास्त जाणवतोय. स्पेशली त्यांचा भर हा "जाती"वर आहे. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचे"च असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. या त्यांच्या वाक्यातून "देवा" बद्दल त्यांना "अ‍ॅक्चुली" काय वाटतेय.. हे एखाद्या शेंबड्या पोरालाही कळेल.. असो!!!!... मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 04/19/2014 - 18:31 नवीन
मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!
हे फारच झालं हो! मी कोण कोणाला पाठीशी वगैरे घालणारी! गंगाधर मुटे या व्यक्तीबद्दल मी बोलत नाही. कवितेत दिसणार्‍या कवी/निवेदकाबद्दल बोलते आहे. कवितेत आहे ते मुटेसाहेब म्हणताहेत असं म्हटलं तर खुनाच्या कथा लिहिणारा माणूस स्वतः खुनी असायला हवा नाही का! कोणतीही कलाकृती ही कलाकारापासून स्वतंत्र असते. तिचा कलाकाराने सांगितलेला अर्थ आणि एखाद्या वाचकाने लावलेला अर्थ संपूर्ण वेगळा आणि त्या व्यक्तीपुरता खरा असू शकतो ना! आणि इथे मी मुटेसाहेबांची जनाबाईशी तुलना केली नाही तर या भावनांची तुलना केली आहे. आपणही काही मनासारखं झालं नाही की देवाला शिव्या घालतो. त्यात काही विशेष नाही. जनाबाईचा अभंग पटकन आठवला म्हणून त्याचा दाखला दिला. एवढंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
व
विश्वनाथ मेहेंदळे Sat, 04/19/2014 - 21:36 नवीन
पैसाताई, देव हा तुमचा विषय आहे का ? नाही. तुम्ही केवळ बँकेबद्दल आणि गोव्याबद्दल बोला. अध्यात्माबद्दल, देवाबद्दल, संतांबद्दल तुम्हाला काय कळते ? तो त्यांचा एरिया आहे. आल्या, जनाबाईचे संदर्भ देत. हभप, इतर देव भप, बेढबमैत्रीणमदतकर्त्या, निस्पृह समाजसुधारक, मुर्गनैनीबै प्रवचन देत असताना तुम्हाला मध्ये पडायचे कारणच काय, तुम्ही फार फार तर कापूस घेऊन या, वाती वळू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/20/2014 - 04:11 नवीन
@कापूस घेऊन या, वाती वळू.>>> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
प
पैसा Sun, 04/20/2014 - 05:00 नवीन
आलेच कापूस घेऊन! मला वाटलं विषय कवितेचा आहे, म्हणून तोंड उघडलं. परत मिश्टिक होणार नै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/20/2014 - 07:25 नवीन
वरुणदेवा आरं पाहतोय ना ! मुटेंना गारपीटांचा मारा आणि प्रतिसादांचाही मारा. तब्येत खराब होईल ना त्यांची :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 04/20/2014 - 09:25 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, काळजी नसावी. नियतीच्या घावांनी मला एवढे 'टणक" (कणखर) बनविले आणि त्यासोबतच वास्तवशास्त्राची जोड यामुळे मी पाकिस्थान, अमेरिका, मानव, दानव आणि देवाच्या बापालाही पुरून उरेल. :) बिघडल्याच तर इतरांच्याच तब्बेती बिघडतील. :) जाळल्या कोंबड्याला कुठे अग्नीची भिती असते? :D (हा अहं नाहीये आणि रावणी दर्पोक्ती पण नाहीये.)
  • Log in or register to post comments
ब
बालगंधर्व Sun, 04/20/2014 - 10:51 नवीन
मुटे सहेब, अता उन एत्का वदहला अहे के, सुरय्य देवने पन तेची जात दावु नये असे महनावे लगेल.[ थनदेइ कुनामुले पदते ते महित नहे. नायतर तयचए पन कदलि असते थन्दिमधये. अहो जात कदलि मह्नुन अन्गनाआवर भुनकाअयाल तो कय बओस अहे क? शिवया घलतना बओसच चेरा समोर अनयचाअ. :) कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/20/2014 - 10:54 नवीन
काय लिहिलंय..................मेलो ना मी =)) >>>>>>>> कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व
द
दादा कोंडके Sun, 04/20/2014 - 11:48 नवीन
:)) :)) :)) या बाल्याला कुणितरी आवरा रे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बालगंधर्व Sun, 04/20/2014 - 14:28 नवीन
नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे
बिरुते सर, मि अप्ला अबहरि अहे. नय्तर इक्दे बहव्नचा कुहुप इसुह्यु होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
द
दिनेश सायगल Sun, 04/20/2014 - 14:34 नवीन
असे लिहायला "कुहुप" त्रास होतो ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व
क
किसन शिंदे Sun, 04/20/2014 - 19:28 नवीन
तब्बल पंधरा मिनिटे लागली प्रतिसाद वाचून समजायला. :) रच्याकने खूप कष्ट पडले असतील नै, जाणून बुजून अशुध्द टंकलेखन करायला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व
प
पैसा Sun, 04/20/2014 - 19:58 नवीन
चुकून होतं ते अशुद्धलेखन. लोकांना बेशुद्ध करण्यासाठी केलेलं ते बेशुद्धलेखन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
क
किसन शिंदे Sun, 04/20/2014 - 20:08 नवीन
ओह! धन्यवाद पै नविन व्याख्या समजावून सांगितल्याबद्दल. पण बालगंधर्व अचानक कसे काय अवतरले ब्वॉ? अन् ते ही मुंटेंच्या धाग्यावरच??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ध
धन्या Sun, 04/20/2014 - 14:33 नवीन
हल्ली भावना भलतीच संवेदनशील झाली आहे राव. जरा कुठे खुट्ट वाजलं की ती दुखावते. :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 04/20/2014 - 16:34 नवीन
काय ठरलं मग? जात पडताळणी / वैधता कागदपत्रांची पूर्तता झाली का? शेवटची मुदत कधीपर्यंत? मेन ऑफिस पुण्यालाच आहे ना अजून? मुळात हे 'देव'लोक जातीचं प्रमाणपत्र घ्यायला लायक आहेत का? आर टी आय खाली माहिती मिळेल काय?
  • Log in or register to post comments
ब
बोबो Sun, 04/20/2014 - 22:23 नवीन
छान .आवडली.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sun, 04/20/2014 - 23:05 नवीन
कविता आवडली. मुटे सरांचे प्रतिसाद आवडले .
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 04/21/2014 - 11:49 नवीन
कविता आवडली.. गाभ्रीचा पाउस हा चित्रपट आठवला.. बाकी सगळा वाद म्हणजे निव्वळ **पणा..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा