मतदारयाद्यांचा घोळ
नेमेची येतो पावसाळा, तशा निवडणूका नेहमीच येत असतात. भारतीय लोकशाहीला आता अनेक वर्षे झाली. एवढ्या वर्षात तंत्रज्ञानाचा बराच विकास झाला. पण पुन्हा एकदा "मतदारयाद्यांचा घोळ" आणि "नियमीत मतदारासही मतदान करता आले नाही" याच्या बातम्या आल्याकी भारतीय लोकशाहीला किती वर्षे झाली ती मोजवत नाहीत.
माझे मतदान व्यवस्थीत झाले. पण टिव्ही वृत्तपत्र पहातो तर पुन्हा या बातम्या आहेतच. हि इसकाळ वरील बातमी हि एबीपी माझा ची बातमी
तुम्ही तुमच्या पुरते तात्कालीक मत व्यक्त करू शकताच आणि विसरून जाऊ शकताच, मिपासारख्या संस्थळांचा उद्देशच तो आहे. अर्थात हा विषय संदर्भा सहीत मांडल्यास ज्ञानकोशीय लेखन केल्यास मराठी हिंदी इंग्रजी आणि इतर भाषी विकिपीडियातूनही या विषयावर लेख तयार होऊ शकतात. मला काय त्याचे म्हणून विकितील ऋक्ष नेटकेपणाला फाट्यावर मारू शकता अथवा चांगली माहिती एकत्रित करून स्वतःला मदत करू शकता, निर्णय तुमचे.
नकारात्मक प्रचाराचे प्रकारांची माहिती नोंदवण्या करता वेगळा धागा काढला आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदार संघातील मते मतदार पेट्यात बंद झाली आहेत. आपण स्वतःतर काही निवडणूकीस उभे नाही आहोत तेव्हा प्रचारात कितीही चुकला तरी आपलाच पक्ष म्हणजे बाब्या हि भूमीका बाजूला ठेऊन निष्पक्ष परिक्षण करण्याचे प्रयत्न आपण करू शकू का ?
💬 प्रतिसाद
(67)
श
शुचि
गुरुवार, 04/17/2014 - 17:24
नवीन
होय हा उद्देश्य तर आहेच पण अन्य संस्थळांचे फायदेही आहेत. (१) माझ्यापुरता बोलायचे झाले तर "मिपा" आदि संस्थळांमुळे माझ्या वैयक्तिक "अंधश्रद्धाप्रवण विचारसरणीत" खूप बदल सकारात्मक घडलेला आहे. बराच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजला आहे. (२) काही "डुक्करमुसंडी" "ब्लेम करणार्या" प्रतिक्रिया वाचून निदान हे कळू लागलेले हे की लेखकाच्या भूमिकेत शिरुन, त्याच्या दृष्टीने लेख वाचायचा असतो. म्हणजे हा एक फायदाच आहे.
(३) वादविवाद कौशल्य (डिबेट या चांगल्या अर्थाने) अजिबातच नव्हते ते नगण्य का होईना डेव्हलप झाले आहे.
(४) संस्थळांचा अजून एक मुख्य फायदा मला हा जाणवतो की "आपापल्या आयव्हरी टॉवरमध्ये न बसता", समाजातील विविध बॅकग्राऊंड्मधून आलेल्या घटकांचे परस्परांशी मिळून मिसळून रहाणे/वागणे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 04/17/2014 - 17:53
नवीन
क्षमा असावी, मी आपल म्हणण नाकारत नाही. विधानाचा उद्देश मिपा आणि इतर संस्थळांवर टिका करण्याचा नाही. विकिवरील संदर्भासहीत लेखन पुढील संदर्भा करता वापरता येत माहितीतील गॅप्स नेमकेपणाने लक्षात येतात. तीच ती टेप वाजण्यापेक्षा सकारात्मक मार्ग शोधण्यासाठी नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकते. अर्थात प्रत्येकाच आपापल विचार स्वातंत्र्य आहे.
अवांतरः अवांतर प्रतिसाद डिफॉल्ट मध्ये झाकलेले राहतील अशी या द्रुपल संस्थळांना सोय हवी. - या वाक्याची सही बनवू कि काय या विचारात असलेला
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 04/17/2014 - 18:02
नवीन
होय माहीत आहे आपला हेतू तसा नाही :) काळजी नसावी. कलोअ :)
- Log in or register to post comments
ध
धन्या
Sat, 04/19/2014 - 08:08
नवीन
या वाक्यातील "डुक्करमुसंडी" हा शब्द मुळचा इंग्रजी वाटतो. तसे असेल तर तो शब्द कोणता हे सांगाला का?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 04/21/2014 - 06:44
नवीन
नाही.. तो मूळ मराठी शब्दच आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 04/18/2014 - 06:13
नवीन
प्रदत्त मतदान- एकच नाव असलेले दोन मतदार.. दोघांचा पत्ताही एकच
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 04/18/2014 - 08:10
नवीन
आमच्या घरातही काल हा अनुभव आला. माझ्या कुटुंबातील अर्ध्या सदस्यांची नावे वगळलेली होती. त्यांनी त्याच पत्त्यावर गेले ३-४ निवडणूकांत मतदान केले आहे. माझ्या परिचितांपैकी काहिंचे निवासस्थान गेली २५ वर्षे तेच असूनही यावर्षी नाव वगळले गेले होते.
मतदान झाल्याची टक्केवारी मोठी दिसते आहे कारण एकूण मतदारसंख्या कमी झाली आहे की खरेच अधिक व्यक्ती बाहेर पडल्या हे कळायला मार्ग नाही.
- Log in or register to post comments
आ
आशु जोग
Fri, 04/18/2014 - 08:18
नवीन
पुण्यात काँग्रेस सोडल्यास बहुतेक उमेदवारांनी यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काँग्रेसचा उमेदवाराने नंतर सूरात सूर मिसळला आहे...
.
यापुढे एककलमी कार्यक्रम...
मतदारांना न्याय देणे... लोकशाही वाचवणे
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Fri, 04/18/2014 - 13:51
नवीन
प्रत्यक्ष मतदान करण्यापुर्वी आपले नाव मतदार यादीत असल्याचे प्रत्येक व्यक्तिने तपासून पाहणे गरजेचे आहे. जर तसे केले गेले नसेल तर, व आपले नाव कोणत्या केंद्राच्या यादीत आहे या स्लिप्स घरोघरी येऊन वाटल्या जातात. त्या तशा मिळाल्या नसतील तर का मिळाल्या नाहीत याची चौकशी केली होती काय ऐन वेळी गिल्ला केला काय वगैरे प्रश्न उपस्थित होतात.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 04/18/2014 - 14:45
नवीन
अगदी प्रत्येक मतदानापुर्वी (स्थानिक प्रशासन ते लोकसभा किमान ३ वेळा; विधानपरिषदेकरीता पदविधर मतदार संघ असतो तो तुम्ही आणि मी मोजत सुद्धा नाही; त्या शिवाय मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रीया प्रशासनाने पाच वर्षात ७ वेळा केली तर दहा वेळा?) मतदारयादीतले नाव तपासण्याची प्रक्रीया तर्कसुसंगत रहात नाही. खरेच प्रत्येक मतदार तपासणी साठी आला तर तेवढा ताण घेण्याची क्षमता प्रशासनात तरी आहे काय.
एक तर माणसे स्थानांतरीत होतात किंवा मरतात (क्वचीत हरवतात, पण त्यांच नाव ७वर्षेपर्यंत मतदार यादीतन काढता येत नसाव). आजच्या काळा मजुरांचे स्थानांतर सुद्धा प्रत्यक्षात लेबर काँट्रॅक्टर शिवाय होत नाही. बोटावर मोजणारी व्यावसायिकांच्या स्वस्थानांतरा शिवाय बाकी स्थानांतरे शैक्षणिक अथवा अस्थापनांची असतात. स्थानांतराचे रेकॉर्ड उपलब्ध करण्याची जबाबदारी आस्थापनांवर टाकली आणि तो डाटा मतदार अद्ययावत करण्यासाठी वापरला की ते काम संपते त्या शिवाय मृतांचा डाटा स्थानिक प्रशासन संस्थांकडून डेथ रेकॉर्डस मधून येऊ शकतो.
भारतात लोकशाहीची सुरवात झाली तेव्हा गावातले राजकीय कार्यकर्ते वस्तीतील प्रत्येक नागरीकाला ओळखत; मतदार याद्या अद्ययावत करण्यात स्थानांतरीतांची नावे जोडणे लावणे हे काम उत्साहात करत मृतांची नावे वगळत. आजच्या काळात वस्तीतील कार्यकर्ता स्वयंसेवी असणे आणि प्रत्येक नागरीकाला ओळखत असणे मागे पडले आहे. आज पुण्यासारख्या मेट्रोपॉलीटन शहरातील पेड कार्यकर्ते आपापल्या वस्तीतील कितीशा नागरीकांना ओळखतात ? नावे वगळण्याची आणि जोडण्याची प्रक्रीया मात्र या भाडोत्री कार्यकर्त्यांच्या हातची बटीक झाली नाही काय. ५ टक्के गैरसोईची नावे वगळा ५ टक्के डुप्लिकेट जोडा एकुण १० टक्क्याचा फरक सहज मारता येतो ? आणि कुणाला काही थांगपत्ता नाही. ज्यांना मतदान करता आले नाही ते ५ टक्केच असतात तुम्ही मतदार यादी का तपासली नाही म्हणून त्यांच्यावरच व्हिक्टीम ब्लेमींग करण्यात सारेच सहभागी होतात.
आधारकार्ड सारखा डाटाबेस मतदार याद्या अद्ययावत करण्यास वापरण्याच्या आड न्यायव्यवस्थासुद्धा आनंदाने येते. माझ्या स्वत;च्या मतदानावर अशी संक्रांत अद्याप आलेली नाही पण अशी संक्रांत येई पर्यंत मीही दुसर्यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष करतो आणि नियमात राहून मतदारयादीचा गोंधळ चालू राहतो.
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Fri, 04/18/2014 - 14:29
नवीन
'मतदान करू शकलेले' आणि 'मतदान करू न शकलेले' असे दोन वर्ग समाजात आहेत याची जाणीव झाली. जे मतदान करू शकले ते ज्या पद्धतीने 'मतदान करू न शकलेल्या' लोकांवर टीका करताहेत ('आधी झोपला होतात काय' वगैरे थाटाची) ती पाहून करमणूक होते आहे. मतदाता म्हणून नाव नोंदवण्यासाठी अनेक लोकांनी दिलेल्या मुदतीत प्रयत्न करूनही त्यांची नावं का आली नाहीत; असलेली नावं गायब कशी झाली; एकाच घरातील काहींची नावं आहेत तर काहींची नाहीत - असे बरेच घोळ आहेत. ते घोळ निस्तरावेत यासाठी यंत्रणेत काय सुधारणा झाल्या पाहिजेत याचीही चर्चा होते आहे - पण सुधारणा होतील का किंवा कधी होतील हा एक प्रश्नच आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 04/18/2014 - 14:46
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 04/19/2014 - 07:30
नवीन
माझ्या मते अनेक लोकांनी आपले नाव आत्ताच्या निवडणूकीसाठी मतदार यादीत आहे कि नाही हे आयत्या वेळी पाहिले. जर घोळ होउ शकतात असे गृहीत धरले असते तर त्याना हे जरा अगोदर समजले असते. अर्थात अगोदर समजले तरी काय? हा प्रश्न राहतोच. जसे की अमोल पालेकारांना महिनाभर अगोदर माहित होते कि आपले नाव यादीत नाही. अपडेट लिस्ट मधे पण आले नाही
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 04/19/2014 - 07:49
नवीन
पोलिस आयुक्तांचीही आयोगाकडे लेखी तक्रार (मटा वृत्त) हि बातमी घ्या पुण्याचे दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तांनी यादीत स्वतःचे नाव येण्याकरता लागणार्या सर्व कागदोपत्री बाबी पूर्ण केल्या तरी त्यांचेही नाव आलेले नाही. प्रशासकीय सेवेत आहेत कागदोपत्री पुर्तता कशा करावयाच्या त्यांना माहीत नसण्याची शक्यता कमी.
या सकाळ वृत्तात खापर सॉफ्टवेअर आऊट सोर्सींग एजन्सीवर फोडलेले दिसत असले तरी, आऊट सोर्सींग एजन्सीची बीले क्लिअर केली नाही की ती मंडळी गायब होणे अशक्य नाही. "या सर्व अर्जांची डाटा एन्ट्री करण्याचे काम बाहेरच्या जिल्ह्यातून करून घ्यावे लागले." असे वृत्तात म्हटले आहे पण या तथाकथीत बाहेरच्या जिल्ह्याचे नाव वृत्तामध्ये गुलदस्त्यात ठेवले दिसते आहे.
मतदारयादी छायाचित्र नसलेल्यांची नावे वगळावीत असा कोणत्यातरी आदेशाचा अर्थ लावून नावे ऊडवली गेली. आणि ज्यांनी आपले नाव यादीत आले नाही हे पाहून अर्ज भरले त्यांची येऊ शकली नाहीत. हे जाणीवपुर्वक नसावे अशी आशा करणेच हातात असते. कारण पुराव्यांशिवाय बोलता येत नाही.
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Sat, 04/19/2014 - 16:29
नवीन
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी लोकांनी किती वेळ खर्च करणे, किती हेलपाटे घालणे अपेक्षित आहे?
सरकार मतदानासाठी जशी एक दिवसाची सुट्टी देतं तशी नावनोंदणीसाठी एक दिवसाची आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तीन दिवसांची पगारी सुट्टी देईल काय? ;-)
बाकी या देशातल्या ९०% (त्याहून जास्त खरं तर!)लोकांना ऑनलाईन नाव नोंदण्याची आणि तपासून पाहण्याची सोय नसते - त्यांनी पाठपुरावा करावा म्हणजे नेमकं काय करावं हे कुणी सांगेल काय?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 04/19/2014 - 16:47
नवीन
+१
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Sat, 04/19/2014 - 18:22
नवीन
माझ्या पुण्यातील एका सुशिक्षीत मित्राने सर्व कुटुंबियांचे नाव नोंदवण्यासाठी चक्क ३ वेळेला फोटो देवून फॉर्म भरून देवून सुद्धा त्यांचे नाव यादीत आलेले नाही, शेवटी त्याला व त्याच्या सर्व कुटुंबियांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे.
हे एक उदाहरण पाहून जी युवाशक्ती पहिल्यांदाच मतदान करणार होती, तीच्या मतदानाच्या अपेक्षा पूर्ण होणे कठीण वाटते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 04/18/2014 - 15:41
नवीन
एनी वे, मतदार याद्या तयार करण्याची अद्ययावत करण्याची प्रक्रीया कशी होते. संबंधीत इतिहास सोबत घोळांचा इतिहास, निवडणूक कायद्यातील सबंधीत कलमे, लेखांचे दुवे इत्यादी माहिती कुणी उपलब्ध केल्यास विकिवरील लेखास सुरवात करता येईल.
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Fri, 04/18/2014 - 18:16
नवीन
याद्यांमध्ये अक्षम्य कसूर झालेली आहे. अशा या हलगर्जीपणा बद्दल कोणती कायदेशीर कारवाई करता येईल?
जर्मनीवरून मतदानासाठी आले अन् हताश होऊन मतदान न करताच गेले
पुणेकरांकडून संताप
- Log in or register to post comments
भ
भाते
Sat, 04/19/2014 - 09:05
नवीन
पुण्यातल्या लाखभर मतदारांची नावे मतदार यादीतुन गायबली. २४ तारखेला मुंबईत सुध्दा थोडयाफार प्रमाणात हेच चित्र दिसल्यास नवल वाटणार नाही.
स्थलांतरित (युपी, बिहार, बांग्ला… इ.) लोकांमुळे आधीच या शहरांची लोकसंख्या वाढत आहे. या स्थलांतरित लोकांना गैरमार्गाने स्थानिक नागरिक म्हणुन रेशन कार्ड तर सहज मिळते. कदाचित मुळ मतदारांची नावे मतदार यादीतुन गायब करून या स्थलांतरित लोकांची नावे तर मतदार म्हणुन या यादीत घुसवली गेली असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय २०-२५ वर्षे एकाच ठिकाणी वास्तव्य करणार्यांची आणि एकाच कुटुंबातील काही सदस्यांची नावे कशी काय वगळली जातात?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 04/19/2014 - 09:12
नवीन
निवडणूक आयोग ज्यांच्या कडून काम करवून घेते त्यात सहसा राज्यशासनाच्या कर्मचार्यांचे एका अर्थाने मराठी लोकांचे प्राबल्य असावे. (नेते आणि चमचे सोडून) सर्वसामान्य मराठी माणूस सहसा असा खालच्या स्तरावर जाऊन प्रकार करणार नाही असे वाटते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 04/19/2014 - 09:15
नवीन
आणि युपी, बिहारचेही लोक महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणामुळे मराठी लोकांवर थोडेफार नाराज असू शकतील पण असे काही करतील असे खरे म्हणजे वाटत नाही.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 04/19/2014 - 16:17
नवीन
http://indianexpress.com/article/cities/pune/reliable-voters-from-citys-slums-swell-by-four-lakh-since-last-lok-sabha-polls/
त्याचवेळी २ लाख नावे गायब आहेत असे पोलीस कमिशनर म्हणत आहेत.
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/About-2L-names-missing-from-voters-list-Pune-police-commissioner/articleshow/33874102.cms
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 04/19/2014 - 18:00
नवीन
माझा अनुभव -
आम्ही जून २०१३मध्येच वेबसाईटवर नावे शोधली होती .नव्हती .ऑगस्ट २०१३ पर्यंत २०११च्या छापील याद्या होत्या आणि ज्यांचे फोटो स्पष्ट नव्हते त्यांची नावे वेबसाईटवर दाखवत नव्हते .जी गोष्ट आमच्याबाबत झाली होती.आमचे नवीन फोटो (फॉम वगैरे न भरता) जुन्या फोटोंवर चिकटवून सही घेतली आणि साहेबांनी सही केली .पाच मिनीटे लागली .
ऑगस्ट नंतर २०१४च्या कच्च्या छापील यादीत आमचे नवीन फोटो छापून आले .पण वेबसाईटवर फेब्रु० मध्येच नावे येतील असे सांगितले तशी आली .कार्डे जानेवारीत मिळाली .वेळीच जागे झाल्यामुळे काम झाले .
- Log in or register to post comments
आ
आशु जोग
Sat, 04/19/2014 - 21:16
नवीन
पुण्यातल्या दुर्दैवी नागरीकांनी
http://tiny.cc/pune2014
या वेबसाइटवर आपली माहिती नोंदवावी...
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sat, 04/19/2014 - 22:57
नवीन
बँकांची डेबिट कार्ड असतात. त्यावरील खातेदाराची माहिती आणि फक्त त्यालाच माहित असलेला पिन कोड वापरून जगात कुठूनही खात्यातील पैसे खातेदाराला काढता येतात. तसेच दिवसाची मर्यादा उलटून गेल्यावर पैसे काढता येत नाहीत.
अशी कांही कार्ड व्यवस्था मतदानासाठी करावी. जेणे करून निदान भारतात तरी कुठूनही (स्थलांतरीतांनाही) मतदान करता येईल. असे कांही अस्तित्वात आल्यास बरेचसे गोंधळ आटोक्यात येतील असे वाटते.
ह्यालाच पुढे जाऊन परदेशस्थांना दूतावासात जाऊन मतदान करता येईल.
- Log in or register to post comments
प
प्रश्नलंका
Sun, 04/20/2014 - 01:52
नवीन
आधार कार्ड, जन गणना अशा लोकांची माहिती गोळा करणार्या उपक्रमांची आताच अंमल बजावणी झालेली असून ही त्याचा इथे वापर करु न शकणे हे अनाकलनीय आहे.. एकच काम (लोकांची माहीती गोळा करणे) हे वेगवेगळ्या मार्गांनी करून देखील गोंधळ घालणे हा तर निव्वळ मूर्खपणा झाला.!
बाकी पेठकरकाकांशी सहमत पण जे या एवढ्या डोकेफोड आणि वेळखाऊ कामातदेखील घोळ (पक्षी: भ्रष्टाचार) करु शकतात ते त्या कार्ड व्यवस्थेत तर काय काय करतील.. :)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 04/20/2014 - 06:21
नवीन
लाख-दोन लाख लोकांची नावे यादीतुन डिलीट कशी काय होतात ?
या धाग्याशी अवांतर एक प्रश्न विचारावासा वाटतो... तो म्हणजे हे राजकारणी संपत्ती जाहिर करतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यांच्या स्वतःच्या नावावर कुठलेही {४ चाकी} वाहन नसते.असे का ?
प्रमाणाच्या बाहेर अवांतर :-
राज ठाकरेंची मला आवडलेली "रोखठोक" मुलाखत...
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/20/2014 - 11:40
नवीन
हाच प्रश्न आम्हालाही पडला, मदनबाणांना मिपा वर कुणी चार्टर्ड अकाऊंटट आहेत का ? (स्वप्नातल्या उत्तरांवर विश्वास ठेऊ नये त्या अफवा असतात, मला जे स्वप्नात 'चाअ' उत्तर मिळाल ते असं: "चाकाखावरून संपत्ती संस्थांच्या नावावर ठेवायच्या असतात, त्या आपल्या खात्या(ण्या)त दाखवायच्या नसतात; ज्या काखावरून स्थावर येतात त्या 'खा'त्यात हिशेबीपणे दाखवायच्या असतात. पुढच्या वर्षांना स्थावरची वाढीव किंमत मार्केट मध्ये वाढते त्या पेक्षा अधिक दाखवायची म्हणे? असे का ? हा प्रश्न विचारे पर्यंत स्वप्न तूटल 'चाअ' निघोन गेले. भावी उमेदवारांनो ह.(शिकोन) घ्या. ;) )
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/20/2014 - 11:48
नवीन
वरील प्रतिसाद देताना 'कारखाना' या शब्दाची व्युत्पत्ती काय असेल असाही प्रश्न आम्हाला पडला :)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/20/2014 - 12:09
नवीन
आत्ताच कळलेल्या व्युत्पत्तीशी/व्याख्येशी सहमत नसलो तरी जिज्ञासू मिपाकरांकरीता देतो आहे "ज्या संस्थेच्या नावावर खान्यासहीत, कारचा (सर्व) खर्च टाकता येतो आणि कारही फिरवता येते अशा संस्थेस कारखाना म्हणतात" 'ने'ता(हाटॉ)वर करून बगला होतो सर्वसामान्य कार नसलेला 'ने'ता पाहून पगला होतो :)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/20/2014 - 11:55
नवीन
स्वप्नातील भाषिक त्रुटीत खालील प्रमाणे सुधारणा सुचवली गेली. मी सहमत नसलो तरी जिज्ञासू मिपांकरांकरता देतो ती खालील प्रमाणे.:
(स्वप्नातल्या उत्तरांवर विश्वास ठेऊ नये, त्या अफवाच असतात, मला जे स्वप्नात 'चाअ' उत्तर मिळाल ते असं: "चाकाखावरील संपत्ती संस्थांच्या नावावर ठेवायच्या असतात, त्या आपल्या खात्या(ण्या)त दाखवायच्या नसतात; ज्या काखावरून स्थावर येतात त्या 'खा'त्यात शिस्तीत हिशेबीपणे दाखवायच्या असतात. पुढच्या वर्षांना स्थावरची वाढीव किंमत मार्केट मध्ये वाढते त्या पेक्षा अधिक दाखवायची म्हणजे स्थावरचे सुटॉवर होतात ! असे का ? हा प्रश्न विचारे पर्यंत स्वप्न तुटले, 'चाअ' निघोन गेले. भावी उमेदवारांनो ह.(शिकोन) घ्या. ;) )
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/20/2014 - 12:28
नवीन
@ म.बा. तुमचा वरचा प्रश्न (फक्त साहित्यिक दृष्ट्याच) भलताच प्रेरणादायी ठरला आहे. एक म्हण सूचली खास
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sun, 04/20/2014 - 13:17
नवीन
प्रेमात नि युद्धात सगळं काही क्षम्य असतं ना?
निवडणुका म्हणजे हल्लीचं युद्धच की!
पुणेकरांना आपण फार हुशार वाटतं नै? बसा 'व'रडत! ;)
-(आव्हान दिलं की पुणेकर पेटतात हे ठाऊक असलेला) प्यारे
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Mon, 04/21/2014 - 05:27
नवीन
साभार:मतदार याद्यांत गोंधळ- नाव, वय आणि पत्त्यात बदल
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 04/21/2014 - 05:42
नवीन
निवडणूक आयोग ही एक स्वायत्त सरकारी संस्था आहे. पण या आयोगाचे काम मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर असेच असते.कडक धोरण बिरण सगळे याना खरे तर बकवास वाटते. भारतीय कायद्याप्रमाणे आपल्या मतदानाच्या अधिकाराची जबाबदारी मूलत: ( प्रायमरी) नागरिकाची असून ती आयोगाची दुय्यम ( सेकंडरी) आहे अशी व्यवस्था असेल तर आयोग जिंकला नाहीतर आयोगावरच महाअभियोग चालवला गेला पाहिजे. कारण आयोगातील अधिकारी करदात्यानी दिलेल्या पैशातूनच वेतन घेत असतात.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 04/21/2014 - 05:49
नवीन
व्यक्तींवर कारवाई अथवा महाभियोगाने केवळ व्यक्ती बदलतात. केवळ व्यक्ती बदलल्याने व्यवस्थेतील त्रुटी दूर होतात का या बद्दल साशंक आहे. माझ्या मते गरज व्यवस्था आधूनिकीकरणाची आहे.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 04/21/2014 - 06:02
नवीन
या मतदार याद्यां अद्ययावत करण्याचे काम कोणा खाजगी कंपनीला दिले होते असे आता सांगत आहेत. कंपनीचे नाव मात्र सांगायला तयार नाहीत. आर टी आय खाली कोणाला माहिती मिळवता येते का बघा. विशिष्ट हेतूने खाजगी कंपनीचे काम प्रभावित करणे हा राजकारण्यांच्या डाव्या हाताचा मळ आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 04/21/2014 - 06:17
नवीन
पै ताई मी कधी आर टी आय वापरला नाही सल्लाही देण्यापासून दूर असतो. पण जे ऐकुन आहे जिथे सत्ता संपत्तीचा खेळ चालू असतो, तेथे स्वसंरक्षणाची काळजी न घेता आर टी आय मध्ये पडू नये असे म्हणतात, त्या बाबत अधिक न बोललेल बरं अशी स्थिती आहे म्हणे
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 04/21/2014 - 06:21
नवीन
त्यावरून कित्येक लोकांचे खून झाल्याच्या बातम्या माहिती असताना आपला जीव धोक्यात का घाला! पण इच्छाशक्ती असेल तर एखादा माणूस एखाद्या राजकीय पक्षाच्या पाठिंब्याने कदाचित माहिती मिळवू शकेल. कोणी सांगावं!
किंवा इथे धमक्या देणारे काही डेरिंगबाज लोक असतात, त्यातला कोणी असली कामं करून सगळ्यांचा दुवा घेऊ शकेल. बघा, हाय का पावर कोणाच्यात! आपण तर घाबरट आहोत. सरळ कबूलच आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 04/21/2014 - 06:47
नवीन
"त्यांना" नको तीथे तुम्ही बोट ठेवत नाही तो पर्यंत महाराष्ट्र एक सभ्य सुरक्षीत राज्य आहे. उत्तरप्रदेश बिहारात त्यांच्या नेत्यांची असभ्यता समोरूनच रफ वागणूकीतन दिसत असल्याने विरोधी कार्यकर्यांना कुणा पासून काळजी घ्यायची ते समजण सोपतरी जात असेल. महाराष्ट्रातील सभ्यतेचे बुरख्यांमुळे समोरून समजतही नाही. करून सरून नामा निराळे राहण्यात महाराष्ट्राचा हात बिमारू राज्येही धरू शकत नाहीत. रादर महाराष्ट्रीय राजकारण्यांसारख व्हिक्टीम ब्लेमींग अजून कोणी करू शकत नाही.
अशा बाबतीत पोलीसदले पत्रकार सारेच किती पोखरले गेलेय ते तुमच्या माझ्या सारख्यांना कल्पनाही येत नाही. एवढ्यातून काही बाहेर आलच तर समाजही दुर्लक्ष करतो. म्हणजे स्वतःचा आणि कुटूंबाचा जीव धोक्यात घालूनही समाज त्यांच्या मागे उभा रहात नसेल तर उद्दीष्ट आणि श्रम दोन्ही पाण्यात जात असावेत.
ज्यांची नावे मतदारयादीत शील्लक राहतात त्यांनीच प्रस्थापितांना मतपेटीतून दूर केले, काही व्यवस्था परिवर्तन झाले तरच काही फरक पडेल.
अवांतरः यात मला एक गंमत वाटते जे लोक अशा राजकारणाचे घरी दारी साक्षी राहीलेले असतात त्यातील काहींना परदेशात सुरक्षीत राहण्याचीही संधी मिळते ते स्वतःच का बोलते होत नाहीत, त्यामुळे राजकारणात काय चालू आहे हे सामान्य माणसाला अंदाजा असला तरी नेमके ठाऊक नसते. आणि समाजाला माहिती होऊन जाग येत नाही तो पर्यंत बदल अशक्य नसले तरी अवघड जातात
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Mon, 04/21/2014 - 06:29
नवीन
सामान्य आणि अ सामान्य
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 04/21/2014 - 06:36
नवीन
महाराष्ट्रात ८.०६ कोटी मतदार आहेत. त्यातले ६० लाख मतदार जागा सोडून गेले म्हणून त्यांची नावे काढून टाकली, असं सांगितलं जातंय. हा आकडा जरा जास्तच वाटतोय. शहरात लोकांच्या बदल्या वगैरे होतात, पण गावातून इतके लोक जागा बदलत नाहीत.
१० वर्षांपूर्वी आमच्या अख्ख्या बिल्डिंगची नावे अशीच गायब झाली होती. (१६ फ्लॅट्स, किमान ३५ मतदार) तेव्हा आमच्या घरात पूर्णवेळ एक मोलकरीण असायची. म्हणजे घरात कोणी नव्हते हे शक्यच नाही. कोणी चौकशीला आले नव्हते हेच त्यात खरे.
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Mon, 04/21/2014 - 06:56
नवीन
नाशिकचे मतदारही धास्तावले; हजारोंची नावे यादीतून गायब
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Mon, 04/21/2014 - 07:03
नवीन
पनवेलमधील मतदार यादीत घोळ
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Mon, 04/21/2014 - 07:17
नवीन
पुण्यातल्या ज्या मतदारांची नावं गायब झाली आहेत, त्यांना तक्रार करण्यासाठी ही एक ऑनलाईन सोय आहे:
https://docs.google.com/forms/d/1SzieR4jH8uIWRJ-aAJYDVe4RYTLS7CQKBasNYY6AEGo/viewform
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 04/21/2014 - 07:21
नवीन
पण आता नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रत्नागिरी, नाशिक, पनवेल, मुंबई सगळीकडेच मोठ्या प्रमाणात नावे गायब झाल्याच्या बातम्या येत आहेत. महाराष्ट्रातले लोक बर्याच प्रमाणात जागरूक आहेत आणि मतदान करायला मिळालं नाही म्हणून लगेच ओरडतात. बाकी राज्यांत काय अवस्था आहे देवजाणे!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 04/21/2014 - 07:28
नवीन
ही वेब साईट कोणाची आहे? ही माहिती कुठे अणि कोणाकडे जमा होईल? आणि पुढील प्लॅन ऑफ अॅक्शन काय असेल? तुम्ही दिलेल्या दुवावर पान उघडले असता ह्यापैकी काहीच माहिती दिसली नाही, म्हणून विचारत आहे.
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Mon, 04/21/2014 - 07:36
नवीन
अर्धवट माहितीबद्दल क्षमस्व. मला आलेला दुवा जसाच्या तसा डकवला आहे आधी.
ही वेबसाईट आहे - खाली पत्ता आणि फोन क्रमांकही आहेत.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 04/21/2014 - 07:49
नवीन
क्षमस्व कशाला? :) अगोदरच्या दुव्यावर काहीच आगापीछा कळला नाही त्यामुळे जाणून घ्यायच्या उद्देशाने विचारले.
धन्यवाद. :)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »