काल विश्रांती अवस्थेत गेल्यानंतर मिसळपाव समोर आले ते बदललेल्या स्वरुपातच.
मिसळपावचा नवा लोगो (किंवा नावाचा टाईप) आवडला. एकदम रेट्रो टाईप.
नवा फाँट देखील सुबक दिसतोय.
पण मला नवीन आलेले प्रतिसाद लाल टाईपात दिसत नाहियेत (उदा. ३ नवीन प्रतिसाद) . कुणाला ही अडचण जाणवतेय काय ?
अजून काय काय बदल झाले आहेत ?
नवीन अपिअरन्स चांगला आहे
पण नवीन प्रतिसाद दिसत नाहीयेत तसेच पूर्वी एकच यादी दिसायची आणि डावीकडे त्यांचे प्रकार दिसायचे
आत्ता सगळे वर्गीकरण करून डिसप्ले केले आहे त्यामुळे कदाचित नवीन प्रतिसाद दिसत नसावेत
कृपया जाणकारांनी अधिक मार्गदर्शन करावे
तसेच user friendliness कुठल्या डिसप्लेत अधिक वाटायचा हे हि सांगा
पुर्वीची रचना काढून टाकलेली नाही. वरच्या मेन्यु मध्ये नवे लेखन किंवा उजव्या समासात नवे लेखन नावाचा दूवा आहे जो तुम्हाला पुर्वी होता तश्या पानावर घेऊन जाईल.
एक विनंती आहे, ते पेज दिफॉल्ट करता येइल का? म्हणजे मी लोगिन असलो तर मला तेच पेज दिसेल (अर्थात तसे सेटिंग केले असेल तर) गेस्ट युसर्सना स्वगृह दिसेल असा.
हेच बोलतो.
बाकी इतके लेख एकदम बघुन नक्कि कोणती लिंक उघडावी याचा मनात थोडा गोंधळ होतोय्,पण सरावाने सगळ व्यवस्थीत होउन जाइल असे वाटते. अन्यथा मिपा धमाल फॉर्मात असतानचा प्राचीन टु कॉलम लेआउटही सुटसुटीत होता.
नैतर सरळ युजर ची प्रायवसी ट्रॅक करुन त्याच्या आवडीचे कॉल्म्स डीस्प्ले करा मुखपृष्ठावर ;)
पण "माझा सहभाग (लेख व प्रतिक्रिया)" हा कॉलम मात्र लोगीन झालेल्या सदस्याच्या मुखपृष्ठावर हवाच हवा. सदस्याना अतिशय उपयोगी अन मिपाची बँडवीड्थ नक्किच वाचवणारा कॉलम ठरेल तो.
नवीन फॉन्ट गरजेपेक्षा कृश मनुष्यासारखा वाटतो आहे.
आणि त्यापेक्षाही नाही आवडला तो वरचा मिसळ पाव लोगो - तो पाहून अशोक सराफचे किंवा इतर पडेल पिक्चर ८० च्या दशकातले इस्टमन कलर इ. चे फॉन्ट किंवा नावे लिहिण्याची स्टाईल आठवते.
आधीचा लोगो जास्त देखणा होता.
मुख पृष्ठावरची नवीन रंग संगती सुंदर आहे.
फक्त नवे लेखन हा पर्याय उजव्या बाजूला शेवटी दिल्यास लवकर आणि सहजपणे वापरता येईल.
आणि त्यापेक्षाही नाही आवडला तो वरचा मिसळ पाव लोगो - तो पाहून अशोक सराफचे किंवा इतर पडेल पिक्चर ८० च्या दशकातले इस्टमन कलर इ. चे फॉन्ट किंवा नावे लिहिण्याची स्टाईल आठवते.
आधीचा लोगो जास्त देखणा होता.
अगदी तस्सेच वाटले. पण आवडला नाही असे नाही. बरा आहे. ठेवला तरी चालेल. बाकी अभ्याचे ह्या लोगोबद्दल मात्र कौतुक.
मालक,
तेव्हढं मिपाच्या "टॅगलाइन" संपल्यावर शेवटी उदगारवाचक चिन्ह किंवा पूर्णविराम यापैकी जे योग्य असेल ते दिले तर ते वाक्य व्याकरणदृष्ट्या बरोबर होईल असे मला वाटते.
वेगळच वाटत आहे मिपा आता.. नवे लेखन वर जाऊन जुन्या पद्धतीने मिपा पहता येते हे बघुन जीवात जीव आला.. आधी इतके सारे लेख पाहुन गोंधळ उडत होता. शिवाय सर्वात हॉट आणि हाय ट्यार्पी वाले धागे कळेना झाले (एखादा धागा सतत वरच राहिला की तिथे काहीतरी गरम चर्चा चालु आहे हे पुर्वी पटकन समजायचं ना.. आता ते कळेना झालंय..!! ;) )
माझा सहभाग कुठे आहे? (नवे लेख च्या बाजुचा टेब होता आधी.. आपण ज्या ज्या धाग्यांवर प्रतिक्रिया दिली आहे ते ते धागे फक्त दिसायचे..)
मिपाचे नविन लूक आवडले :)
पुर्णब्रह्ममध्ये बाकीचे पोस्ट का दिसत नाही? मुख्यपानावर पुर्णब्रह्मखाली काही ठराविक पाकृंचे धागे दिसत आहे. त्यात आधीचे लिखाण / लिंक्स कुठे वाचायला / बघायला मिळतील? वरच्या मेन्यु मध्ये पुर्णब्रह्मचा टॅब नाहीये.
एवढं केलं तर तेवढं 'नविन संकेताक्षर बोलवा' बदला बुवा.
संकेताक्षर बोलवापेक्षा 'मागवा' चांगलं वाटेल.
दुसरं 'अमुक' ची खरडवही पेक्षा 'अमुक' यांची खरडवही असा उल्लेख आवडेल.
कारण काही वेळा आत्ता आहे ती वाक्यरचना वाचायला विचित्र वाटते.
उदा. समजा 'बैल' असा आयडी असेल तर ' बैलची खरडवही' हे चुकीचं आहे.
'बैलाची खरडवही' किंवा ' बैल यांची खरडवही' बरोबर.
(म्हणजे तो अगदी पहिल्या मिपासारखा आहे). आताच्या बदलापूर्वीचा, वाचायला सोपा होता. सध्या देखिल लिहीतांना दिसणारा फाँट मस्त आहे. प्रकाशित केल्यावर तो पुन्हा स्लीम होतो आणि फिका झाल्यानं सुस्पष्ट वाचायचा आनंद मिळत नाही.
बदल चांगला की वाईट हे महत्वाचे नाही तर बदल होत राहणे नेहमीच चांगले. नाहीतर तेच तेच दृष्य बघून बोअर व्हायला होते.
प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार चांगल्यावाइट प्रतिक्रिया येणार मात्र फ्रेश वाटतेय एवढे नक्की.
मिपावर आता वापरलेला योगेश फॉण्ट माझ्या पीसीवर इन्स्टॉल केलेला आहे आणि युनिकोड अॅक्टिव्हेट केलेल आहे. कदाचित त्यामुळे मला आयई आणि क्रोम दोन्हीकडे नवा योगेश फॉण्ट व्यवस्थित दिसतो आहे. या फॉण्टमधे फक्त "शत्रु" मधला त्र वेगळा दिसतो आहे.
प्रतिक्रिया