नगर च्या घटनेत काहीतरी भयंकर घडलयं आणि ते लपवल जातयं.
आजच सकाळी दिव्य मराठी च्या “रसिक” पुरवणीत नितीन आगे या अहमद नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील दलिय युवकाच्या क्रुर हत्ये संदर्भातील नागराज मंजुळेचा “जब्याने मारलेला दगड समाजापर्यंत पोहोचलाच नाही” हा अतिशय संवेदनशील असा लेख वाचण्यात आला. याच पुरवणीत याच घटनेवरील प्रा. सतीश वाघमारे यांचा आणखी एक संवेदनशील लेख “पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो” या नावाने आलेला आहे. दोन्ही लेख अत्यंत विचार प्रवृत्त करणारे व अतिशय अस्वस्थ करणारे असे आहेत. ही बातमी अगोदर वाचनात आली होती पण हे लेख वाचल्यावर त्या घटनेच्या तीव्रतेने अतिशय सुन्न झालोय.
त्याहुन अधिक अस्वस्थ झालोय ते यासाठी की नितीन आगे हा फ़क्त १७ वर्षांचा होता असे कळते. व त्याची क्रुर रीतीने हत्या झाली. वाघमारेंच्या लेखात उल्लेख येतोय की सकाळी ७.३० पासुन दुपारी ३.३० पर्यंत त्याचा अमानुष छळ सुरु होता व नंतर त्याला मारण्यात आले. नागराज मंजुळे पण या बाबतीत फ़ारस बोलत नाहीयेत. मी जी पहीली बातमी वाचली होती त्यात तर याचा काहीच उल्लेख नव्हता हत्या झाली इतकचं. निश्चीतच काहीतरी भयंकर घडलेल आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे हे नेमकं कस घडलयं हेच जाणीवपुर्वक लपविण्यात येतयं की कायं अस वाटतयं.
मला एक कळत नाहीये की हे डीटेल्स काळजीपुर्वक का लपविली जात आहेत ? मला खालील प्रश्न पडलेत
१-नितीन आगे ने जे काय केल होत ते नेमक काय होत त्याचा गुन्हा नेमका काय होता अस काय भयंकर पाप त्याने केल होत? त्या विषयी डीटेल माहीती बाहेर का येत नाही त्याचा इतका राग त्याच्या मारेकरयांना का आला?
२-नितीन ला नेमकं कुठल्या भयंकर क्रुर रीतीने मारण्यात आलं ? त्याच्या झालेल्या टॉर्चर ला जाणीवपुर्वक लपवल जात आहे का ? यात मारेकरयांना वाचविण्याचा प्रयत्न होतोय का ? सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० त्याच्यावर काय अत्याचार करण्यात आला? या विषयी सर्वत्र इतकी गुप्तता का बाळगली जात आहे ?
३-एरवी उठ सुठ कुठल्याही फ़ालतु विषयाचा कंटाळा येइपर्यंत कीस काढणारी माध्यमं आश्चर्यकारक अस मौन बाळगुन आहेत. कुणीच काहीही बोलायला तयार नाही. मारेकरी कुठल्या राजकीय आर्थीक सामाजिक घटकांचा पांठीबा असलेले आहेत का ?
४-आचारसंहीता चालु आहे म्हणुन ही काही निर्बंध आहेत का ? की एकंदरीत उदासिनता च आहे घटनेविषयी ?
मला एकच म्हणायचय की काहीतरी भयंकर घडलेलं आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे ते जनतेपासुन लपविण्याचा दडपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय.नुसता औपचारीक निषेध केला जातोय.
तुमच्यापैकी कोणाला घटने संदर्भात काही माहीती असल्यास कृपया जनतेसमोर आणावी. सत्य समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. कोणाला कळलच नाही नेमक काय? कस? का? झालय तर पिडीताची बाजु तरी कोण घेणार आणि त्यांना न्याय तरी कसा मिळणार?
तुर्तास या कोवळ्या मुलाचा लेखात दिलेला चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय आणि फ़ारच अस्वस्थ वाटतयं. काय केलं असेल त्यांनी याच्या बरोबर?
मला आणखीन एक उत्तर सुचतं म्हणजे हा दगड मारला जातो तेव्हा तो 'चौथी भिंत' पार करून प्रेक्षकांकडे येतो. म्हणजे हे सर्व ढळढळीतपणे चाललेलं दिसत असतानाही ते नुसतं बघत राहणाऱ्या निष्क्रिय प्रेक्षकी वृत्तीवर मारलेला तो दगड आहेया आधी काहि धाग्यांवर प्रतिसाद म्हणुन हे वाक्य दिलं होतं पुन्हा एकदा - लोकशाही खिळखिळी होण्याचे प्रमुख कारण - लोकशाही उपभोगणार्या लोकांची निष्क्रियता!