Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नगर च्या घटनेत काहीतरी भयंकर घडलयं आणि ते लपवल जातयं.

ग
गुल-फिशानी
Sun, 05/11/2014 - 05:57
🗣 150 प्रतिसाद
आजच सकाळी दिव्य मराठी च्या “रसिक” पुरवणीत नितीन आगे या अहमद नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील दलिय युवकाच्या क्रुर हत्ये संदर्भातील नागराज मंजुळेचा “जब्याने मारलेला दगड समाजापर्यंत पोहोचलाच नाही” हा अतिशय संवेदनशील असा लेख वाचण्यात आला. याच पुरवणीत याच घटनेवरील प्रा. सतीश वाघमारे यांचा आणखी एक संवेदनशील लेख “पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो” या नावाने आलेला आहे. दोन्ही लेख अत्यंत विचार प्रवृत्त करणारे व अतिशय अस्वस्थ करणारे असे आहेत. ही बातमी अगोदर वाचनात आली होती पण हे लेख वाचल्यावर त्या घटनेच्या तीव्रतेने अतिशय सुन्न झालोय. त्याहुन अधिक अस्वस्थ झालोय ते यासाठी की नितीन आगे हा फ़क्त १७ वर्षांचा होता असे कळते. व त्याची क्रुर रीतीने हत्या झाली. वाघमारेंच्या लेखात उल्लेख येतोय की सकाळी ७.३० पासुन दुपारी ३.३० पर्यंत त्याचा अमानुष छळ सुरु होता व नंतर त्याला मारण्यात आले. नागराज मंजुळे पण या बाबतीत फ़ारस बोलत नाहीयेत. मी जी पहीली बातमी वाचली होती त्यात तर याचा काहीच उल्लेख नव्हता हत्या झाली इतकचं. निश्चीतच काहीतरी भयंकर घडलेल आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे हे नेमकं कस घडलयं हेच जाणीवपुर्वक लपविण्यात येतयं की कायं अस वाटतयं. मला एक कळत नाहीये की हे डीटेल्स काळजीपुर्वक का लपविली जात आहेत ? मला खालील प्रश्न पडलेत १-नितीन आगे ने जे काय केल होत ते नेमक काय होत त्याचा गुन्हा नेमका काय होता अस काय भयंकर पाप त्याने केल होत? त्या विषयी डीटेल माहीती बाहेर का येत नाही त्याचा इतका राग त्याच्या मारेकरयांना का आला? २-नितीन ला नेमकं कुठल्या भयंकर क्रुर रीतीने मारण्यात आलं ? त्याच्या झालेल्या टॉर्चर ला जाणीवपुर्वक लपवल जात आहे का ? यात मारेकरयांना वाचविण्याचा प्रयत्न होतोय का ? सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० त्याच्यावर काय अत्याचार करण्यात आला? या विषयी सर्वत्र इतकी गुप्तता का बाळगली जात आहे ? ३-एरवी उठ सुठ कुठल्याही फ़ालतु विषयाचा कंटाळा येइपर्यंत कीस काढणारी माध्यमं आश्चर्यकारक अस मौन बाळगुन आहेत. कुणीच काहीही बोलायला तयार नाही. मारेकरी कुठल्या राजकीय आर्थीक सामाजिक घटकांचा पांठीबा असलेले आहेत का ? ४-आचारसंहीता चालु आहे म्हणुन ही काही निर्बंध आहेत का ? की एकंदरीत उदासिनता च आहे घटनेविषयी ? मला एकच म्हणायचय की काहीतरी भयंकर घडलेलं आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे ते जनतेपासुन लपविण्याचा दडपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय.नुसता औपचारीक निषेध केला जातोय. तुमच्यापैकी कोणाला घटने संदर्भात काही माहीती असल्यास कृपया जनतेसमोर आणावी. सत्य समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. कोणाला कळलच नाही नेमक काय? कस? का? झालय तर पिडीताची बाजु तरी कोण घेणार आणि त्यांना न्याय तरी कसा मिळणार? तुर्तास या कोवळ्या मुलाचा लेखात दिलेला चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय आणि फ़ारच अस्वस्थ वाटतयं. काय केलं असेल त्यांनी याच्या बरोबर?

प्रतिक्रिया द्या
39755 वाचन

💬 प्रतिसाद (150)
प
प्रसाद गोडबोले Tue, 05/13/2014 - 14:00 नवीन
आपल्या पुर्ण मताशी सहमत नसलो तरी आपल्या मताचा आदर आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
स्पंदना Wed, 05/14/2014 - 04:19 नवीन
थेटरात शर्ट काढुन नाचणारी पोर पहायची होती सूड तुम्ही. अन जे अवघड असत ते करायला कोणी जात नाही, पण प्रेम काय हो पडल बाहेर जरा घराच्या की कोपर्‍या कोपर्‍याला होत. अन ज्या वयाच्या मुलांची ही कहाणी आहे त्या वयाच्या मुलांना जरा दम धरा म्हणण्या ऐवजी उलट संदेश पोहोचतो अश्या गल्लाभरु तुफान चालणार्‍या पिक्चर्स नी. आमच्या वेळी "एक दुजे के लिये" आला अन भरारा तरुण जोडप्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. गुंडगिरी करत रस्त्याने फिरण हे सुद्धा चित्रपटांचीच देणं आहे. बाकी तुमच्या विचार करुन वागण्याच कौतुकच आहे. घरात फक्त दोन माणस अन चार भिंती असण वेगळ, अन त्याच घर असण वेगळ हे समजलेलं दिसतय तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 05/14/2014 - 09:19 नवीन
अपर्णाताईंच्या याही प्रतिसादाशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
सूड Wed, 05/14/2014 - 11:28 नवीन
>> पण प्रेम काय हो पडल बाहेर जरा घराच्या की कोपर्‍या कोपर्‍याला होत. असो. प्रेम होणं इतकं सोपं असतं? >>आमच्या वेळी "एक दुजे के लिये" आला अन भरारा तरुण जोडप्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. त्या स्वत:ची अक्कल गहाण टाकलेल्यांनी केल्या असतील. माझ्यापेक्षा चार पावसाळे कदाचित जास्त पाह्यले असाल तुम्ही, पण प्रतिसाद पटला नाही. माझं म्हणणं इतकंच आहे सो कॉल्ड वाईट चित्रपट पाहून जर लोक तसे वागायला प्रवृत्त होत असतील तर चांगलं बघून त्याचासुद्धा परिणाम झाला पाहिजे. तसं होत नसेल तर एखादी गोष्ट, चित्रपट जबाबदार नसून लोकांच्या मनोवृत्ती त्यासाठी जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
सुबोध खरे Wed, 05/14/2014 - 15:38 नवीन
सूड साहेब, मुले घरी आई बाप म्हणत असलेले श्लोक शिकत नाहीत पण शिव्या मात्र पटकन शिकतात. हे forbidden fruit सारखे असते. म्हणून चित्रपटातील वाईट गोष्टी पटकन शिकल्या जातात पण चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यास फार काळ जावा लागतो. चित्रपटात सिगारेट ओढणे किंवा दारू पिणे याचे अतिरिक्त दर्शन करू नये असे जगभरातील संशोधन दाखवते आणि त्या गोष्टींच्या जाहिराती आणि उदात्तीकरणाला जगभरातील संशोधकांनी यासाठीच विरोध दर्शविला आहे. मुळात सिगारेट( किंवा दारूचा ग्लास) हातात धरून "आधुनिक" फार पटकन होता येते. पण आपल्या बायकोला/ आईला/ बहिणीला समान दर्जा देण्यासाठी त्याग करावा लागतो. modernism is not just smoking/drinking. It is a state of mind प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे. अवांतर -- बाकी मी कोणताच सिनेमा पाहिलेला नाही त्यामुळे सिनेमात काय दाखविलेले आहे याबद्दल मला सांगता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 05/14/2014 - 16:22 नवीन
>>म्हणून चित्रपटातील वाईट गोष्टी पटकन शिकल्या जातात पण चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यास फार काळ जावा लागतो. मान्य!! मग दोष चित्रपटांना द्यावा का? हाच माझा प्रश्न होता आणि आहे. वाईट गोष्टी लोक पटकन आत्मसात करत असतील तर तो चित्रपटाचा दोष कसा काय होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सूड Wed, 05/14/2014 - 16:24 नवीन
>>प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे. माझ्या दृष्टीने हा स्वैराचार आहे, प्रेम नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बॅटमॅन Wed, 05/14/2014 - 21:37 नवीन
भलतंच? अहो सूडपंत आपल्या महान सौन्स्क्रुतीप्रमाने प्रेम ह्योच एक स्वैराचार हाये नै का? शहाणी मुलं असल्या प्रेमाबिमाच्या भानगडीत पडत नैत, हो की नै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 05/14/2014 - 21:46 नवीन
हो!! तेही खरंच म्हणा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/15/2014 - 06:26 नवीन
@सौन्स्क्रुतीप्रमाने>>> *biggrin* आपल्याला सौन्स्क्रुती"गंडा"प्रमाने, असं म्हनायचं हुतं का??? Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सुबोध खरे गुरुवार, 05/15/2014 - 06:49 नवीन
आमचा एक मित्र "वास्तू"चा सल्लागार आहे. तो कोरेगाव पार्क च्या एका बंगल्यात गेला होता. तेथे राहणाऱ्या मुलीने बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर असलेल्या उत्तर भारतीय फळ विक्रेत्याबरोबर लग्न केले. आणि आजही कितीही विनवण्या करूनही ती मुलगी परत येण्यास तयार नाही. अत्यंत नैरासह्याने त्यांनी माझ्या मित्राला "वास्तुदोष" आहे का हे शोधण्यासाठी बोलावले. माझ्या एका नातेवाईकाची मुलगी कॉलेजात शिकते. ती एका मुलाच्या प्रेमात पडली आहे. हा मुलगा बारावी नंतर दोन वर्षे ड्रोप घेऊन घरी असतो. त्याचे वडील नाहीत आई आहे आणि त्याचे घर त्याच्या लग्न झालेल्या बहिणी पाठवत असलेल्या पैश्यात चालू आहे. माझ्या नातेवाईकाचे आंतरधर्मीय(प्रेमविवाहच ) लग्न आहे त्यामुळे त्याचा जाती धर्मा बद्दल काही म्हणणे नाही परंतु मुलमध्ये काहीतरी कर्तृत्व असावे एवढेच त्याचे म्हणणे आहे. माझ्या बायकोला एक वर्ष मागे असलेल्या एका डॉक्टर मुलीने कॉलेज समोर असलेल्या पानवाल्याशी लग्न केले. दोन वर्षाचा संसार आणि एक मुल पदरात आल्यावर ती आता आपला व्यवसाय करीत मुलाला वाढविते आहे. आमच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशीनी आपल्या मुलीचे १८ व्या वर्षी लग्न उरकले. आम्ही विचारले असे का तर त्या म्हणाल्या साहेब मी येथे कामाला येते घरी मुलगी एकटीच असते. दहावी पास झाल्यावर शिकायचंच नाही म्हणते. आजूबाजूची टवाळ पोरं घरी येऊ लागली. उगाच नसतं लफडं होण्यापेक्षा लग्न केलेलं बरं. याला आता प्रेम म्हणणार कि स्वैराचार. ते वय वेड असतं त्यात तारतम्य पाहण्याचे भान नसतं. म्हणूनच त्याला autonomic nervous system म्हणतात. आपल्या शेजारी सुंदर मुलगी बसली कि आपल्या छातीत धडधड सुरु होते जी थांबविणे आपल्या हातात नसते. विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच. अशा अनेक सुरस आणि चमत्कारीक कथा आहेत. शेवटी निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही हे खरे. यात जात धर्म किंवा पैसा काही करू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
र
राजेश घासकडवी गुरुवार, 05/15/2014 - 07:14 नवीन
आपल्या सख्ख्या मुलीने कोणाशी लग्न नक्की का केलं हे जर माहीत नसेल, आणि तसं होण्यामागे त्या 'वास्तुचा' दोष आहे असं वाटणारा बाप असेल तर त्या मुलीचीच दया वाटते. च्यायला सिनेमामुळे पोरं बिघडतात यापेक्षा ही विचित्र थियरी आहे! अहो, तुम्ही डॉक्टर असून त्याला समुपदेशकाला भेटण्याचा सल्ला का दिला नाहीत? वास्तुतज्ञाला काय शष्प तरी कळतं का मुली कोणाशी बापाच्या मनाविरुद्ध का लग्न करतात ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
राजेश घासकडवी गुरुवार, 05/15/2014 - 07:22 नवीन
सॉरी टाइप केलं आणि नंतर लक्षात आलं की तो बंगलेवाला तुमचा मित्र नव्हता तर वास्तुवाला तुमचा मित्र होता. त्यामुळे तुम्ही सल्ला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा मी तुुम्ही सल्ला देण्याबद्दलचं विधान मागे घेतो. बाकीची विधानं मात्र योग्य आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
स
सूड गुरुवार, 05/15/2014 - 11:36 नवीन
>>तेथे राहणाऱ्या मुलीने बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर असलेल्या उत्तर भारतीय फळ विक्रेत्याबरोबर लग्न केले. आणि आजही कितीही विनवण्या करूनही ती मुलगी परत येण्यास तयार नाही. अत्यंत नैरासह्याने त्यांनी माझ्या मित्राला "वास्तुदोष" आहे का हे शोधण्यासाठी बोलावले.>> आपली लेक कोणाशी लग्न करायला जातेय हे ठाऊक नसेल तर तो वास्तूचा की सिनेमाचा दोष? माझी लेक असती तर तो दोष माझा म्हटलं असतं मी. कारण लेकीने हे सांगण्याइतपतही तिला अवघड जात असेल तर तिचा विश्वास मिळवण्यात मी कुठेतरी कमी पडलो. >>आमच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशीनी आपल्या मुलीचे १८ व्या वर्षी लग्न उरकले. आम्ही विचारले असे का तर त्या म्हणाल्या साहेब मी येथे कामाला येते घरी मुलगी एकटीच असते. दहावी पास झाल्यावर शिकायचंच नाही म्हणते. आजूबाजूची टवाळ पोरं घरी येऊ लागली. उगाच नसतं लफडं होण्यापेक्षा लग्न केलेलं बरं. याला आता प्रेम म्हणणार कि स्वैराचार. ते वय वेड असतं त्यात तारतम्य पाहण्याचे भान नसतं. म्हणूनच त्याला autonomic nervous system म्हणतात. आपल्या शेजारी सुंदर मुलगी बसली कि आपल्या छातीत धडधड सुरु होते जी थांबविणे आपल्या हातात नसते. विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच. हे त्या मावशींनी कोणता सिनेमा बघून केलं ते कळलं तर तुमच्या म्हणण्याला दुजोरा मिळेल. >> शेवटी निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही हे खरे. यात जात धर्म किंवा पैसा काही करू शकत नाही. मग फायनली काय ठरलं, निसर्ग जबाबदार की चित्रपट??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 05/15/2014 - 15:57 नवीन
ते वयच विचित्र असतं. सिनेमाशी संबंध नाही पण सिनेमात पाहून बंगल्यातील मुलीला फळवाल्याशी लग्न करणे हे बरोबर आहे असेच वाटते. असे केल्याने आपली काय वाताहत होईल हा विचार करण्याची प्रगल्भता त्या वयात नसते. तो दिलवाला आहे आणि मला फार सुखात ठेवेल अशी भाबडी अशा त्या मुलीला सिनेमातून मिळाली तर दोष कुणाचा? कारण सिनेमात "झोपडीमे रहनेवाला उन्ची हवेलीमे रहनेवाली"से प्यार करता है तो दिलवाला वगैरे असतो आणि शेवटी श्रीमंत होऊन सासर्याला धडा शिकवतो. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती फार वेगळी आणि भीषण असते . व्यंकटेश माडगूळकरांच्या एका सत्यकथेत गावचा एक मुसलमान एका मराठ्याच्या मुलीबरोबर मुंबईला पळून येतो. (आपला गाव आणि माणसे सोडून). काही वर्षांनी माडगुळकर त्याच्या घरी जातात तेंव्हा त्याची झालेली परवड त्यांनी यथातथ्य शब्दात लिहिली आहे. शेवती तो माणूस म्हणतो," साहेब, जवानी फार खराब चीज आहे. माणूस बोकडाचा सुद्धा मुका घेतोय. ते काही खरं नाही" विशीत प्रेम किंवा मृत्यू हि एक सुंदर कविता असते. चाळीशीत ते एक रुक्ष गद्य होऊन जाते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
वामन देशमुख गुरुवार, 05/15/2014 - 13:54 नवीन
विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच. पाशवी आणि दानवी(!) शक्ती कुठे आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ह
हाडक्या गुरुवार, 05/15/2014 - 12:41 नवीन
प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे.
या वाक्यावर आक्षेप. इथे मुलं म्हणजे भुकेलेले कुत्रे असल्यासारखे लिहिले आहे. याचा दूसरा अर्थ असा की 'मुलं कायम तयार असतात' ही अतिशय चुकीची पद्धत झाली विचार करण्याची. वरून 'मुलगी तयार असेल तर' म्हणजे काय हो ? केली एखाद्या मुलीने दोन चार प्रेम-प्रकरणं, अगदी तुमच्या शब्दातली 'मजा' पण केली तिने.. मग काय बिघडलं इतकं ? त्यतून ती शिकेल बर्‍याच गोष्टी. यात सर्वात तिच्या महत्त्वाची बाब म्हणजे आयुष्याबद्दल तिला जबाबदारीची जाणीव असणे महत्त्वाचे. सर, तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून काही सांगू पाहतोय. 'मजा' हा शब्दप्रयोग खटकला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ए
एस Fri, 05/23/2014 - 12:02 नवीन
वरील प्रतिसादातील प्रत्येक शब्दास अनुमोदन. स्त्री म्हणजे भोगवस्तू आणि पुरुष म्हणजे भोगवादी हे वर्गीकरण डोक्यात तिडीक आणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ब
बॅटमॅन Wed, 05/14/2014 - 15:27 नवीन
किती शाळकरी निष्कर्ष काढावेत याला सीमा नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. असो, बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना गुरुवार, 05/15/2014 - 00:57 नवीन
समोरचा काय बोलतओ आहे हे खोलात जाउन समजायला सुद्धा वय असाव लागतं. बर्‍याच गोष्टी अनुभव शिकवतात. त्या अश्या बसल्या बसल्या कधीच येत नाहीत. बघालच आता टवाळ मुलांच्या तथाकथीत प्रेमाच्या गोष्टी समोर यायला लागतील. चित्रपट हे फार मोठं सामाजीक संवादाच साधन आहे. अन त्यातल्या जमतील त्या गोष्टी घेणं हे ही काही फारस नवं नाही. कपडे बदलले, हेअरस्टाइल बदलल्या, मानसिकता बदलली. अन हे सगळ चित्रपटांनी झटपट साध्य केलं. चांगले संस्कार व्हायला वेळ जावा लागतो पण हलकं फार लवकर उचलल जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 05/15/2014 - 08:36 नवीन
स्वतःच्या वैयक्तिक अनुभवापलीकडे जाऊन बघायला पण एक मॅच्युरिटी असावी लागते. स्वतःचाच चष्मा योग्य असे म्हणत बसलो तर कितीही अनुभव असला तरी तो शष्प कामाचा नाही. आणि हो, पिक्चर नसतानाचा समाज काय धुतल्या तांदळासारखा होता अशी गैरसमजूत असेल तर हॅ हॅ हॅ. धन्यवाद चकटफू मनोरंजनाबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ह
हाडक्या गुरुवार, 05/15/2014 - 12:17 नवीन
फक्त एक अवांतर: शष्प शब्दाचा अर्थ 'घंटा' आहे का हो ? ;) बाकी चालू द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड गुरुवार, 05/15/2014 - 12:31 नवीन
शष्पचा अर्थ खरंच माहीत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
आ
आदूबाळ गुरुवार, 05/15/2014 - 12:45 नवीन
It's a universal unit for measurement of small quantities.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ह
हाडक्या गुरुवार, 05/15/2014 - 12:46 नवीन
हे म्हणजे 'ये पीएस्पीओ नही जानता' सारखं वाटतय.. [अर्थ माहीतीये हो साहेब .. ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 05/15/2014 - 11:29 नवीन
>>चांगले संस्कार व्हायला वेळ जावा लागतो पण हलकं फार लवकर उचलल जातं. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!! हलकं लवकर उचललं जातं हा दोष कोणाचा? उचलणार्‍यांचाच ना? दाखवणार्‍यांनी सांगितलंय का आम्ही सांगतो तसं वागा? आपणच ठरवतो ना तसं वागायचं की नाही ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
म
माहितगार गुरुवार, 05/15/2014 - 07:40 नवीन
मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे.
उपरोक्त वाक्यावर "पितृसत्ताक रुढींनी लादलेल्या अपेक्षा" च्या समकक्ष आक्षेपांचा अभाव म्हणजे मिपाकडे घनघोर स्त्रीवाद्यांची कमतरता आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/15/2014 - 15:22 नवीन
मिसळपाव हा समाजाचा आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही. - मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ह
हाडक्या गुरुवार, 05/15/2014 - 16:12 नवीन
अंमळ जुने दिवस आठवले आदिती तै .. :) काय त्या लढाया, काय ते आवेश, काय त्या पाशवी शक्ती ! बाब्बौ..!! *biggrin* आता उरलंय फक्त अनाहिता महिला मंडळ आणि कंपुबाजी हो.. ( हव्या त्या स्माईली कल्पा इथे.. ) ( बादवे धाग्याची जाहिरात समजावी काय? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
नानासाहेब नेफळे Tue, 05/13/2014 - 12:29 नवीन
नळी फूंकली सोनारे .... पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो..
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 05/13/2014 - 12:31 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
स
सूड Tue, 05/13/2014 - 12:33 नवीन
एक्झॅक्टली !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
प
प्यारे१ Tue, 05/13/2014 - 12:39 नवीन
काय राव नेफळे आण्णा सॉरी नाना! माणसानं प्रामाणिक असू नये का काय? स्वतःची भूमिका स्वतःला ठरवणं ह्यात काय आला पुरोगामी अथवा प्रतिगामी पणा? दुसर्‍यानं कसं वागावं हे नाही ठरवू शकत पण स्वत:चं मत मांडणं म्हणजे 'नळी फुंकली सोनारे'?????? सूडनं प्रामाणिक मत मांडलंय त्याबद्दल त्याचं अभिनंदन. ह्यामागं 'माझ्या मते' सामाजिक विचार असतो. जिथं दोन पोटजाती मध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात तिथं वेगळ्या जाती अथवा धर्माच्या रुढी, रीतीभाती अगदीच वेगळ्या असतात. नव्या सून/ जावयानं त्या आत्मसात करणं अपेक्षित असतं. घराण्याचं पाठबळ अशा घटनांमधून त्या नव्या व्यक्तीला मिळत असतं. अगदी 'बघून' आणलेली सून जेव्हा एक गोष्ट चुकते तेव्हा तिच्या घराचा उद्धार बर्‍याच ठिकाणी होतो इथं सगळंच वेगळं असल्यानं सगळ्याचाच उद्धार होणार. ही मानसिकता आहे. सगळ्यांचीच. आधी मानसिकता बदलली जावी, गरज असेल तर. अन्यथा उगाच पुरोगामीत्वाचा आव आणू नये. सरधोपट वाट सोडून बिकट मार्गाला वहिवाट बनवण्याची कुवत सगळ्यांची नसते, गरज देखील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Tue, 05/13/2014 - 13:08 नवीन
सॉरी! सॉरी! नळी शोषली सोनारे.. प्रतिगामी महाराष्ट्राचा विजय असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ए
एस Tue, 05/13/2014 - 18:43 नवीन
थोडे प्रश्न, थोडे धक्के, थोड्या वेदना इथेही पोहोचलेल्या, थोडे हुंकार मग तिथेच दडपलेले. थोड्या संतापाला मौनात म्यान केलेले, किंचित ओले बाजूला वळवलेले. उद्याही असेल मी थोडासा जिवंत आजही फक्त थोडासाच तर मेलोय!
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 05/15/2014 - 09:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
आ
आजानुकर्ण Wed, 05/14/2014 - 16:02 नवीन
श्री नमोजी यांस, पंतप्रधान म्हणून खालील विनंतीवर कार्यवाही करणेचे आदेश आपल्याच अखत्यारीत असलेल्या समाजकल्याण मंत्रालयास देणेचे करावे. तात्पुरता उपाय म्हणून नगरच्या घटनेस कारणीभूत असलेल्या फँड्री, बालक-पालक, शाळा व टाईमपास या मराठी चित्रपटांवर लागलीच बंदी आणावी. त्याचबरोबर कायमचा उपाय म्हणून अशा स्वरुपाचे सिनेमे रिलीज करण्यास बंदी आणावी. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची बोंबाबोंब होऊ नये म्हणून असे सिनेमे येणार असतीलच तर प्रियकर व प्रेयसी एकाच जातीचे असावेत असा नियम करावा म्हणजे जातीभेद व दलितांवरील अत्याचाराचे निर्मूलन होईल असे वाटते. सदर निष्कर्ष सखोल चर्चा व काथ्याकुटातून काढण्यात येत आहे. आपला विश्वासू, आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 05/14/2014 - 16:12 नवीन
यापेक्षा सरळ मिपा वाचण्याची शिफारस करावी. गल्लीतल्या दीडदमडीच्या नगरसेवकापासून ते अमेरिकेच्या आर्थिक घडीपर्यंत सर्व गोष्टींचा अक्सीर इलाज मिपावर मिळेल यात सौंशय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/15/2014 - 05:39 नवीन
व्यक्ती द्वेषाचा कहर ! अहो ज्या महाराष्ट्रात घटना घडली त्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहा ना हे पत्र.... पण ते तुम्हाला जमणार नाही , मोदीचा जमेल तसा जमेल तिथुन द्वेष करणे आणि ते कसे "जातीयवादी" "धर्मांध" आहेत हा कोळसा उगाळत बसणे येवढेच तुम्हाला जमते वाटते . आणि हो , मोदी स्वतः मागासवर्गीय आहेत त्यामुळे तुम्ही असले उपरोधिक पत्र खरेच जरी लिहिलेत तरी त्यांना मुळ प्रसंगाचे गांभीर्य कळेल .... असो . देव तुमचे भले करो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
प्यारे१ गुरुवार, 05/15/2014 - 12:18 नवीन
>>>>मोदी स्वतः मागासवर्गीय आहेत इतर इतर.... ऑदर बी सी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
आ
आजानुकर्ण गुरुवार, 05/15/2014 - 15:01 नवीन
गिरीजाशेठ, अहो, नमोजी असे लिहिले आहे! 'जी' हा बहुवचनी आदरार्थी प्रत्यय आहे. व्यक्तीद्वेषाचा आरोप टाळण्यासाठी आता गोब्राम्हणगुजरातीप्रतिपालक, अविवाहिततरुणीपाळतकारक, मोदीकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज नरेंंद्रमहाराजसाहेब म्हणायचे की काय? नमोजींना जमणार नसेल तर पृथ्वीराजसाहेबांना सांगू. नमोजी कार्यकुशल असल्याचा प्रवाद असल्याने झटकन काम व्हावे म्हणून त्यांना सांगितले इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/15/2014 - 15:50 नवीन
नमोजींना जमणार नसेल तर पृथ्वीराजसाहेबांना सांगू. नमोजी कार्यकुशल असल्याचा प्रवाद असल्याने झटकन काम व्हावे म्हणून त्यांना सांगितले इतकेच.
अता कसं जरातरी सकारात्मक बोललात :) पृथ्वीराज साहेबांना खरचं पत्र लिहा . त्याचा फोटो इथे शेयर करा . त्यांचे उत्तर आले तर तेही शेयर करा ... आणि उत्तर नाही आले तर मी स्वतः मोदीजींना पत्र लिहिन ... तेही तुमच्या पत्राची अटॅचमेन्ट लावुन :) शेवटी कसं आहे की कोणत्याही सुसंस्कृत समाजात ही घटना नीचच आहे , अशा प्रवृत्तींचा नायनाट व्हायलाच हवा मग तो पृथ्वीरांजांच्या हातुन झाला की मोदींच्या ह्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही कारण आम्ही अश्या गंभीर विषयात राजकारण घुसडत नाही :) (फक्त पृथ्वीराजांच्या हातुन जर काही कारवाई झाली तर महाराष्ट्राचे प्रश्ण महाराष्ट्राला सोडवता येतात , सारखी दिल्लीची चरणधुळ घावी लागत नाही येवढेच काय ते समाधान मिळेल !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण गुरुवार, 05/15/2014 - 16:16 नवीन
शेवटी कसं आहे की कोणत्याही सुसंस्कृत समाजात ही घटना नीचच आहे , अशा प्रवृत्तींचा नायनाट व्हायलाच हवा मग तो पृथ्वीरांजांच्या हातुन झाला की मोदींच्या ह्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही कारण आम्ही अश्या गंभीर विषयात राजकारण घुसडत नाही
हो पण पृथ्वीराजजींऐवजी नमोदीजींना पत्र लिहिले तरी तुम्हाला राग आला आणि व्यक्तिद्वेषाचा आरोप तुम्ही केला. राजकारण घुसडायचे नव्हते तर पृथ्वीराजजींचा विषयही काढायचे कारण नव्हते. कोणाच्याही हातून नायनाट झाला तर नमोदीजींच्या हातून झाला तर काय हरकत आहे? पृथ्वीराजजींच्या हातून फाईल पुढे सरकत नाही असे म्हणतात आणि नमोदीजी कार्यकुशल असल्याची वावडी आहे मग दोन वेळा पत्र पाठवून प्रोसीजरमध्ये वेळ घालवायचा की प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/15/2014 - 16:30 नवीन
१.अहो घटना महाराष्ट्रात घडली आहे ,सो आधी महाराष्ट्रातच त्यावरचे उत्तर शोधुन काढले पाहिजे . २. तुम्ही नमो चे नाव घेवुन राजकारण घुसडलेत , त्या आधीच्या कोणत्याही प्रतिसादात कोणीही कोणत्याही राजकीय नेत्यावर ह्या घटनेचे खापर फोडल्याचे मलातरी दिसलेले नाही . त्यातही तुमचा प्रतिसाद सकारात्मक नाही , उपरोधिकच आहे हे कोणही सांगेल. "मोदी कार्यकुशल आहेत ते नक्कीच हा विषय योग्य रितीने हाताळु शकतील" असा प्रतिसाद असता तर हा इतका काथ्याकुट झालाच नसता ३.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या पृथ्वीराज आहेत (भले मग निवडुन आलेले नसले तरीही ) आणि मुख्यमंत्री ह्या नात्याने माणुसकीला काळीमा पुसणार्‍या ह्या घटनेचे जबाबदारी सर्वप्रथम त्यांच्यावर येत ...येतेच ! ४. मोदींकडुन प्रश्न सुटला तर आनंदच आहे हो ...पण सारखं काय दिल्ली कडे पळायचे ...महाराष्ट्र राज्य आहे , केन्द्रशासित प्रदेश नव्हे. ५.आता कोणताही गुन्हा घडल्यावर स्थानिक कोर्ट > जिल्हा न्यायालय > उच्च न्यायालय > सर्वोच्च न्यायालय असाच खटल्याचा प्रवास होतो ... आणि तो तसाच योग्य आहे . प्रोसीजर मधे वेळ गेला तरी तो योग्यच आहे . ६. केवळ प्रश्न दिल्लीकडे घेवुन जाणे म्हणजे प्रामाणिक प्रयत्न नव्हे.... आधी तो स्थानिक पातळीवर सोडवायचा प्रयत्न तरी करा . बाकी पत्र लिहुन झाले की मिपावर एकदा ड्राफ्ट दाखवा , सुजाण मिपाकर आनंदाने सुधारणा सुचवतील .... आणि तुम्ही पत्र पाठवले नाहीत तर निव्वळ काड्यासारायला मोदींच्या नावाने प्रतिसाद दिला होतात असे खेदाने म्हणावे लागेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 05/15/2014 - 16:32 नवीन
फक्त उद्याचा एक दिवस आहे गिरीजा काकू, नंतर आवाज बंद च होणार आहे त्यांचा. तुम्ही कशाला डोक्याला ताप करुन घेता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
आ
आजानुकर्ण गुरुवार, 05/15/2014 - 16:40 नवीन
नंतर आवाज बंद च होणार आहे त्यांचा
आमचा आवाज कोण बंद करणार आहे म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
आ
आजानुकर्ण गुरुवार, 05/15/2014 - 16:40 नवीन
१. महाराष्ट्र भारतात आहे. संपूर्ण भारतासाठी उत्तर शोधले तर महाराष्ट्रासकट इतर राज्यांमधील जातीभेदावरही उपाययोजना होईल की नाही? २. नमोंचे नाव घेतल्याने लगेच राजकारण कसे काय झाले बॉ? नमोंवर खापर वगैरे तर काहीच्या काहीच आरोप आहेत. नमो दलितांप्रती अन्यायकारक असल्याचे मी कुठे लिहिले आहे बॉ? ३. पृथ्वीराजजींवर जबाबदारी येतेच पण कामे करण्यात ते संथ आहेत की नाहीत? ४. मोदींकडून प्रश्‍न सुटल्याने आनंदच असणार आहे तर मग मोदींनी प्रश्‍न सोडवायला काय हरकत आहे? की मुळात प्रश्‍न सोडवायचाच नाहीये? ५. सदर गुन्हा प्रोसीजर पाळत बसण्याइतका सामान्य आहे का? निर्भया खटल्यात स्पेशल कोर्टाची स्थापना करुन झपाट्याने न्यायनिवाडा झाला होता. शिवाय न्यायालयात गेल्यास चित्रपटांसंबंधी अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि मानवाधिकार वगैरे नसती झेंगटे उपस्थित होतील. ६. या प्रश्‍नाच्या मुळाशी असलेल्या चित्रपटांवर बंदी आणण्याचे काम स्थानिक पातळीवर कसे काय होईल? चित्रपटांवर बंदी आणायची आहे की स्थानिक थेटरांवर? पत्र आधीच लिहिले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गंगामैयाची माफी ते पंतप्रधानांना विनंती ही सर्व कामे आंतरजालावरच होतात.
निव्वळ काड्यासारायला मोदींच्या नावाने प्रतिसाद दिला होतात असे खेदाने म्हणावे लागेल
तुम्हाला काय वाटते व म्हणायचे आहे यावर माझे नियंत्रण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/15/2014 - 17:43 नवीन
बरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
इ
इरसाल Tue, 05/27/2014 - 12:42 नवीन
आजकल फायरफॉक्स चालत नाय ;) !
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 10/27/2014 - 05:33 नवीन
२२ तारखेला घडलेल्या आणखिन एका घटनेनंतर हा धागा आठवला. :-(
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा