अभिनंदन!
भाजपला पूर्ण आणि स्वच्छ बहुमत मिळाल्याबद्दल अभिनंदन. देशाला बदल हवा होता, तो मिळाला.
आज देशभर उत्सव साजरा होतो आहे. देशभरातच नव्हे तर परदेशातही जिथे जिथे भारतीय आहेत तिथे रात्री जागून लोक दिवाळी साजरी करीत आहेत.
पुढील वाटचालीसाठी मोदींना आणि त्यांच्या नवीन सरकारला मनापासून शुभेच्छा.
💬 प्रतिसाद
(103)
आ
आत्मशून्य
Fri, 05/16/2014 - 06:52
नवीन
पुन्हा तरुण झाल्यासारखे वाटु लागले आहे :)
- Log in or register to post comments
व
विटेकर
Fri, 05/16/2014 - 06:57
नवीन
एकदा निष्चित झाले की मला सही बदलायची आहे !
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Fri, 05/16/2014 - 07:07
नवीन
आत्ता तर मोजणी चालु झाली आहे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 07:09
नवीन
मनापासुन भारी वाटतंय.. जनतेला मुर्ख समजणार्या सरकारला जनता जागेवर आणेल हे माहीत होत, पण अगदी तोंडावर आपटेल याची कल्पना नव्हती.
मोदीं ची लाट नाही तर सुनामी होती... मोदींना त्यांच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा! जनतेच्या अपेक्षा पुर्ण होवोत ही प्रार्थना..
रात्रीचा १ वाजलाय अन इथे टाईम स्क्वेअर ला जल्लोषाचं वातावरण आहे. *yahoo*
- Log in or register to post comments
श
शुचि
Fri, 05/16/2014 - 14:49
नवीन
मस्त मस्त मस्त!!!! आज सेलिब्रेट करणारच!!!
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
Fri, 05/16/2014 - 15:37
नवीन
अगदी अगदी. आज सकाळी उठल्यापासून लक्ष फक्त निकालाकडेच होतं. आता आज सगळी भारतीय मित्र मंडळी मिळून पार्टी करणार. *clapping*
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Fri, 05/16/2014 - 07:12
नवीन
नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
भाजप व सहकारी पक्षांचे अभिनंदन.
नव्या सरकारला शुभेच्छा!!
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 05/16/2014 - 08:18
नवीन
नमोजींचे हार्दिक अभिनंदन. भारतीय जनता प्रगल्भ आहे. त्यांच्या विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपा सरकारला शुभेच्छा.
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Fri, 05/16/2014 - 07:14
नवीन
हल्ली लोकसत्तातले कुमार केतकरांचे संपासकीय लेख खुप मीस होतात.
त्यांचा आजचा व उद्याचा अग्रलेख वाचायला मजा आली असती
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 05/16/2014 - 07:19
नवीन
ते दिव्य मराठीत गेलेत. तिथे वाचायला मिळतीलच ;)
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Sat, 05/17/2014 - 03:13
नवीन
आजचा दिव्य मराठीतला अग्रलेख खुपच संतुलीत आहे. टीपिक केतकरी ट्च हरवला आहे. थोडी निराशाच झाली.
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 05/17/2014 - 05:02
नवीन
तिथल्या संपादक महाशयांचा आयडी हॅक झाला आहे का?
जातीय आणि धार्मिकतेत अडकलेल्या समाजाला विकास, सुप्रशासन या मुद्द्यावर आवाहन करून निवडणूक जिंकणे, ही या देशात अशक्यप्राय मानली गेलेली गोष्ट नरेंद्र मोदी यांनी शक्य करून दाखविली आहे.
अग्रलेखात हे वाक्य वाचले आणि भाजपाला स्वबळावर सत्ता काबीज करता येईल ह्या गेल्या २४ तासातील बातमीने पण धक्का बसला नाही इतका धक्का बसला. *yes3*
- Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन
Sun, 05/18/2014 - 18:12
नवीन
http://berkyanarad.blogspot.in/2014/01/blog-post_17.html कुमर केत्कर यानि रजिनम दिला आहे
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 05/16/2014 - 07:17
नवीन
शांततमय पद्धतीने सत्ताबदलाबद्दल सगळ्या नागरीकांचे अभिनंदन
भाजपा, एन्डीएच्या मतदारांचे व विजयी उमेदवारांचे विशेष अभिनंदन!
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 05/16/2014 - 07:29
नवीन
तुमचं अभिनंदन करायच का नाही?
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 05/16/2014 - 07:27
नवीन
मला दोन व्यक्तिं बद्धल आता विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
१) राहुल गांधी :- सध्या ही व्यक्ती कुठे आहे आणि कॉग्रेसच्या कामगिरी बद्धल त्यांचे मत.
२) केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक कुठला सुरु करणार ? शिवाय त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा.
जाता जाता :- अमेठीच्या निकालीची काय स्थिती /अंदाज आहेत ?
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Fri, 05/16/2014 - 07:39
नवीन
बाकी आशा आहे यापुढे देशात विकास व जागतिक सामर्थ्याच राजकारण सुरु होइल.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 05/16/2014 - 16:41
नवीन
नाही. आप त्या लायकीचा आहे असे वाटत नाही. मेधा पाटकर पडल्या त्याबद्दल आनंद वाटला. दमानिया, इल्मी पडल्या नाही तर चांगल्या आप्टल्या त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. याबद्दल आनंद झाला. विकास आणि सामर्थ्याचे राजकारण सुरु व्हावे याच्याशी मात्र सहमत.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Fri, 05/16/2014 - 19:38
नवीन
मानगुटीवर बसतात अगदी.
बाकी लोकांनी विज बिले न्हवती भरली सांगण्यावरुन. सत्ता आल्यावर विजबीलमाफी वगैरे सगळे ठीक आहे हो, पण राजीनामा दिला, सत्ता सोडली आणी विज बिले न भरलेल्यांची अवस्था आता घर का ना घाट का करुन टाकली. १४ पैकी १३ मुद्दे तर जनलोकपाल संबंधी न्हवते ? मग किमान ते सर्व मार्गी लावुन लोकांची/सपोर्टर्सची कुचंबणा होणार नाही अशी वेळ पाहुन जनलोकपालच्या मुद्यावर राजीनामा देता आला असता जनतेचा दुवा मिळाला असता, आता लोकांच्या मनात विश्वासघाताची भावना निर्माण केलीत, आणे विचारवंताना निवडणुकीत उतरवे.. न्हवे कुजवले. जनतेछा बळी देउन आंदोलन यशस्वी होउ शकते सत्तापद न्हवे. बसा आता बोंबलत. दिल्लीत कोणीच निवडुन आले नाही. समाधान इतकेच आहे जे चार निवडुन आले ते भाजपचा जोर असलेल्या परिसरातुन निवडुन आलेत. रुपेरी किनार ती हीच.
असो ३० वर्षापुर्वी भाजपचे फक्त २ सिटा आल्या होत्या आपच्या ४ ही काही वाइअट सुरुवात नाही. विरोधी पक्ष आपच हवा हे व्यक्तीगत मत आहे.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 05/20/2014 - 12:48
नवीन
मानगुटीवर बसायचा प्रेत्न करतात पण मूळातच हेतू स्वच्छ नसल्याने मार खातात. दमानिया बाई कुठे गायब आहेत आता. मोठ्या संतपदी विराजमान होउ पाहत होत्या. गडकरींनी कोर्टात ललकारल्यावर कुठे गायबल्या? म्हणजे अभ्यासू वृत्तीचा पूर्ण अभाव आणि नुसताच थयथयाट हा लायकिचा क्रायटेरीया म्हणायचा का?
बाकी आपचे आंदोलन म्हणजे रामदेवबाबाचा मुद्दा हायजॅक करण्यासाठीच होते असे नेहेमी वाटते.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Wed, 05/21/2014 - 21:11
नवीन
स्वच्छ हेतूनेच बसतात पण त्यांचाअभ्यास कमी पडतोय म्हणुन केविलवाणे भासवले जातात. कणा हिन् विरोधक ही देशाला लागलेली किड आहे.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 05/21/2014 - 15:52
नवीन
केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक कुठला सुरु करणार ? शिवाय त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा.
केजुच्या नौटंकीचा नवा अंक सुरु झाला आहे बरं का मंडळी ! ;)
अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात रवानगी
म्हंटल यांच्या नौटंकीचा नविन अंक अजुन सुरु कसा झाला नाही ? पण...
नक्की काय झाले ?
नितीन गडकरी यांच्यावर कोणतेही पुरावे नसताना भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना कोर्टानं माफी मागण्यास सांगितलं... परंतु, अरविंद केजरीवाल आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले आणि त्यांनी माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला. सोबतच कोर्टानं अरविंद केजरीवाल यांना जामीनासाठी 10,000 रुपयांचा बॉन्ड भरण्यास सांगितलं... पण, केजरीवाल यांनी जामीन भरण्यासही नकार दिला.
संदर्भ :- गडकरी अवमान प्रकरणी केजरीवाल दोन दिवस तुरुंगात
अजुन एक प्रकरण कळाले, अर्थात ते केजरीवाल यांच्या बद्धल नसुन, सोनिया गांधी यांच्या बद्धल आहे.
काय आहे हे प्रकरण ? तर या घोटाळ्याचे नाव आहे :- National Herald Scam
आता तुम्हा सर्वांची बघण्याची आणि श्रवण भक्तीची सोय करतो :-
श्रवण भक्तीची सोय इथे :- Congress’s role in National Herald scam
जाता जाता :- केजुच्या नौटंकीचा अंक तर सुरु झाला आहे, आता... तेल तापते तशा जिलब्या पाडतो असे ब्रिद वाक्य मिरवणारे जिलबीवाले बाबा यांच्या नव्या ताज्या घाण्याची वाट पाहुया ! ;)
- Log in or register to post comments
भ
भृशुंडी
गुरुवार, 05/22/2014 - 00:23
नवीन
सुब्रमण्यम स्वामीदेखील बरेचदा ताळतंत्र सोडून आरोपांचा धुरळा उडवण्यात माहिर आहेत.
त्यांच्या टोकाच्या मतांंमुळे आणि आरोपांमुळे "लांडगा आला रे आला" पातळीवरच त्यांची मतं विचारात घ्यावी लागतात.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 06/27/2014 - 03:35
नवीन
National Herald Scam
वरती ज्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता, त्यावर काल दिल्लीच्या न्यायालयाने सोनिया गांधी,राहुल गांधी आणि ४ जणांना समन्स पाठवले आहे.
संदर्भ :-Court summons Sonia, Rahul for alleged fraud
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेघा रे मेघा रे... :- प्यासा सावन
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 07/09/2014 - 18:39
नवीन
आजचा अपडेट :-
सोनिया गांधींना आयकर विभागाची नोटीस
आजची स्वाक्षरी :- Sachin Tendulkar Walks Out To Bat At Lord's - Entry Of A Legend कोण शारापोव्हा? ;)
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 05/16/2014 - 07:35
नवीन
आत्तापर्यंत फक्त बीजेपी = २६८
जे काही जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेय त्यासाठी २७२ फक्त बीजेपी ला मिळायला पाहिजेत. या बहुमताच्या जोरावर बीजेपीने एवढा विकास करून दाखवला पाहिजे कि पुढील १० ते १५ वर्षे दुसरा पर्याय लोकांसमोर नसेल. नाहीतर आप वाले आहेतच बोंबाबोंब करायला. राहुल गांधी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत. या नाराजीचा बीजेपी ने जर उपयोग करून नाही घेतला तर त्यांच्यासारखे करंटे तेच असतील.
बीजेपी मधील दिग्गजांना खुश ठेवून मोदिजी मुख्य खाती आपल्याकडे ठेवावी लागतील. मोदींची खरी परीक्षा बीजेपी मधील अंतर्गत राजकारणाला तोंड देण्यामध्ये असेल.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Fri, 05/16/2014 - 07:48
नवीन
मोदींचे, भाजपचे आणि एनडीएचे अभिनंदन. भारताचा विकास घडवून आणण्याचं आश्वासन पुरं करण्याची शक्ती मिळो आणि अनुकूल परिस्थितीही मिळो अशी मनोमन सदीच्छा.
ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे शांततमय पद्धतीने सत्ताबदलाबद्दल सगळ्या नागरिकांचे अभिनंदन. भारतीय लोकशाही कुचकामी आहे वगैरे म्हटलं जातं, पण वेळोवेळी जनता आपला कौल देऊन सरकार बदलते आणि ही प्रक्रिया बऱ्यापैकी शांततेने आणि पद्धतशीरपणे पार पडते. जवळपास दोन तृतियांश मतदारांनी यावेळी मतदान केलं. ही राजकीय जागृती अशीच राहो.
- Log in or register to post comments
म
मोहन
Fri, 05/16/2014 - 08:12
नवीन
मोदीजींचे हार्दिक अभिनंदन. !
आम्हा सगळ्या सामान्य जनांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची शक्ती ईश्वर आपल्याला देवो.!
- Log in or register to post comments
स
स्पार्टाकस
Fri, 05/16/2014 - 08:17
नवीन
आजचा आनंद साजरा करायला सगळे आहेत
तरी देखील काहीतरी अपुरे अपुरे वाटतय
उणिव भासते फक्त एका गोष्टीची
.
.
.
.
.
.
.
.
.
आज बाळासाहेब हवे होते !
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
Fri, 05/16/2014 - 08:20
नवीन
+ १ अगदी ..
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 05/16/2014 - 09:53
नवीन
..
- Log in or register to post comments
ओ
ओंकार सुतार
Fri, 05/16/2014 - 13:27
नवीन
खरच हवे होते...
विषेशतः राज , राणे आणि भुजबळांची स्थिती बघण्यासाठी तरी....
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 05/16/2014 - 16:34
नवीन
+१
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Fri, 05/16/2014 - 21:23
नवीन
उद्धवा
मोदीमय तुझे सरकार असे नवीन राजकीय गाणे झाले आहे.
भाजपच्या मित्रपक्षाला अकालीदलाला पर्याय म्हणून आप पक्ष पुढे आला त्यामानाने शिवसेनच्या पुढे राज ,राणे , भुजबळ असे दिग्गज होते.
पण शांत ,संयमी नेत्तृत्व , उत्कृष्ट व्यवस्थापन ह्यामुळे शिवसेनेची समाजाच्या सर्व थरात एक वेगळी व सकारात्मक व समंजस प्रतिमा उद्धव ह्यांनी निर्माण केली.
पूर्वीची शिवेसेना राडेबाज आणि त्याच मार्गावर जाणार्या राज ची मनसे ह्यांना मर्यादित यश होते.
भावनात्मक , आक्रमक भाषणाने पूर्वी शिवसेनेने व आज मनसेने गर्दी जमवली मात्र आजच्या उद्धवप्रणीत शिवसनेने
भाजपसह इतर पक्षांची मोट बांधून संघटीत विजय मिळवला आहे.
महाराष्टार्त भाजपच्या खालोखाल जागा मिळवणारा शिवसेनेने आमच्याशी युती करण्यास खरा फायदा आहे हे नमोंना दाखवून दिले.
पुढील विधानसभेत नमो ह्यांना उद्धव शी मसलत करणे अनिवार्य आहे.
शिवसेनेला मात्तबर केंद्रीय मंत्रिपद मिळेल असा माझा होरा आहे, कारण गुणवत्ता प्रमाण मानणारे नमो ह्यांच्याकडे उद्धव गुणी खासदारांचे नाव पुढे करेल ह्यात शंका नाही.
तळटीप
संघाचे बाळकडू घरातून मिळाल्याने भाजपचा कट्टर समर्थक असलेला मी शिवसेनेचा चाहता नव्हतो. किंबहुना
रथयात्रा , बाबरी मशीद ह्या राजकारणामुळे राजकारणातून मन उडाले होते.
नमो ह्यांचे विकास व सुराज्य ह्या संकल्पनेने भाजपशी परत नाळ जोडल्या गेली. उद्धव ह्यांच्या हातात शिवसेना आल्यावर तो पक्ष खर्या अर्थाने गुद्याने नाहीतर मुद्द्यांवर निवडणुका लढवणार पक्ष झाला व माझे त्या पक्षाविषयी अंकुल मत झाले.
उद्धव ज्यांची शेतीतील काही काळात नाही असे म्हणून खिल्ली उडवणारे आज त्याला ग्रामीण भागात प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्यात असे यश मिळवून स्वताला सिद्ध केले आहे.
राणे आता कोकणातील त्यांचे सर्व उपक्रम बंद करणार आहेत असे विधान केले आहे.
ह्या बद्दल कोकण वासियांनी त्यांचे आभार मानले पाहिजे.
मूळ मुद्दा असा आहे की अणु उर्जेवर मोदी ह्यांची काय भूमिका असेल व आता दाभोळ अरबी समुद्रात बुडणार का
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 05/17/2014 - 02:56
नवीन
कोकण प्रांताचे ग्रहण सुटले म्हणायला हरकत नाही.
- Log in or register to post comments
व
वॉल्टर व्हाईट
Sat, 05/17/2014 - 06:18
नवीन
बरोबर आहे निनाद तुमचे, तुमच्यासारखे अनेक मोदींच्या पॉझिटिव ट्च मुळे पुन्हा जोडले जात आहेत.
तसेच मोदींना काळाची पावले ओळखता येतात असे जाणवते, उदा. इंटरनेट आणि सोशल मिडीयावर वावर आणि त्याचा संतुलित वापर.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sat, 05/17/2014 - 21:46
नवीन
टेक्नोसेवी तरुणाई पुढे देवालये नाही तर शौचालये हवी म्हणणारे गुजरात मधील बेकायदेशीर मंदिरे तोडतांना विहिपी चा रोष ओढवून घेणारे ह्या निवडणुकीत संघ वगळता बजरंग दल व इतर हिंदू संघटना व त्यांच्या नेत्यांना लांब ठेवणारे व विकासाची व सुराज्याची भाषा करणारे मोदी ह्यांना हे यश अपेक्षित होते.
सोशल नेटवर्क वर मोदींना पंतप्रधान मानणारे मोदी भक्त असे म्हणून आम्हाला हिणवणाऱ्या लोकांचे चेहरे त्यांनी सेल्फी काढून येथे टाकावे .
घाबरू नये आम्ही तुम्हाला हसणार नाही
सबको साथ लेके चलना हे भाई
- Log in or register to post comments
स
संपत
Sat, 05/17/2014 - 20:53
नवीन
तुम्हाला जैतापूर म्हणायचे आहे का? कारण 'अर्थ'पूर्ण चर्चेनंतर दाभोळ एनर्जीला जीवदान मिळाले होते. जैतापूर बाबतीत देखील तसेच होईल.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sat, 05/17/2014 - 21:52
नवीन
सुधारणे बद्दल धन्यवाद
हो जैतपूर
उद्द्ध्व ला विधानसभेत राण्यांना हरवायचे आहे. त्यामुळे ह्या प्रकल्पाला विरोध हा असणारच
मोदी ह्यांना अणूउर्जेला विरोध ऐकिवात नाही आणि अपारंपरिक उर्जा ही भारतातील प्रचंड उर्जेची गरज पुरी करू शकत नाही तेव्हा सध्यातरी अणू उर्जेला पर्याय नाही
काय होते ते पाहणे मनोरंजंक आहे
महाराष्टार्त सौर उर्जेचे जाळे पसरणार जर्मन कंपन्यांना बाजारपेठ मिळणार तर महाराष्ट्राला प्रदूषणमुक्त उर्जा
अच्छे दिन ....
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 05/20/2014 - 12:53
नवीन
सहमत आहे. मोदींनी प्रगतीच्या आड येणारे पर्यावरण कायदे रद्द करावेत. आतल्या गोटातल्या माहीतीनुसार पुणे कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम या पर्यावरण वाल्यांनी अडवले आहे. (टोल मात्र वसूल होतो हा भाग वेगळा)
पुण्यातला नदीपात्रातला रस्ता तब्बल १० वर्षे या फालतू पर्यावरणवाद्यांनीच रोखून धरला होता. इतका लांब वळसा पडायचा सायकलवरून जाताना. असो.
जैतापूर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sun, 05/18/2014 - 15:44
नवीन
बर्याच अंशी सहमत.आत्ताच्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा भाजप बरोबर सेनेला झाला हे खरेच आहे मात्र उद्धवच्या काळात सेना ग्रामीण भागात बर्यापैकी विस्तारली. याचे एक उदाहरण म्हणजे मागच्या २००९च्या लोकसभेत सेनेची मुंबईमध्ये पूर्ण धूळधाण उडाली होती, ठाणे-कोकण मध्ये पण मर्यादित यश होते मात्र उर्वरित महाराष्ट्रात ९ जागा आल्या होत्या (एकूण ११ पैकी ९ मुंबई-ठाणे-कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रात). माझ्या मते असे यश बाळासाहेब भरात असताना पण मिळाले नसावे. सेना- भाजप युती बरोबर आर पी आय, स्वाभिमानी संघटना, रासप यांची मोट उद्धव ठाकरे आणि मुंडेंच्या पुढाकारानेच बांधली गेली आहे. उद्धव यांनी संयमी नेतृत्व सेनेला पुढे नेत आहे हे उशिरा का होईना लोकांना पण समजू लागले आहे.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Mon, 05/19/2014 - 19:11
नवीन
ह्या ९ पैकी काही जागा राष्ट्रवादीच्या बालेकील्यातील होत्या. जेव्हा मोदी लाट नव्हती तेव्हा एकहाती उद्धव ने हा पराक्रम गाजवला.
बाळासाहेब ,महाजन , मुंडे व हिंदुत्वाची हवा असतांना व कोन्ग्ग्रेज व राष्टवादी वेगेळे लढले तेव्हा सुद्धा असे आक्रित घडले नव्हते.
मी अचानक उद्धव ह्यांचा खांदा समर्थक वैगरे झालो नाही ,
पण शेट्टी ,आठवले व मुंडे व गडकरी ह्यांना राज पेक्ष्या उद्धव आश्वासक वाटतो. हे पाहून बंदे मे दम हे असे मला वाटते.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Tue, 05/20/2014 - 14:44
नवीन
राज पेक्ष्या उद्धव आश्वासक वाटतो.
राज ठाकरे यानी सेनेपासून फारकत घेणे व पवारानी कॉग्रेस पासून फारकत घेणे यात साम्य आहे. त्यांच्या दोघांच्याही अंदाजाने आणकी वीसेक वर्षे राजकारण हे एका पक्षाचे न रहाणारे असणार. अशा स्थितीत लहान पक्षाचा प्रमुख असणे मध्यम पक्षाच्या महत्वाच्या नेता असण्यापेक्षा मह्त्वाचे ठरते. मंत्रीपदावर कब्जा मिळविता येतो.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/16/2014 - 08:20
नवीन
सर्व भारतिय मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन !
ही निवडणूक म्हणजे भारतिय लोकशाहीचा विजय आहे !!
भारताला एक सुजाण, पुरोगामी आणि विकसनशील सुशासन मिळून देशाचा खराखुरा विकास व्हावा हीच सदिच्छा !!!
आज प्रत्येक भारतियाची मान अभिमानाने ताठ व्हायला हवी... मग त्याने / तिने मत दिलेला उमेदवार / पक्ष विजयी झालेला असो अथवा नसो.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 05/16/2014 - 09:10
नवीन
आवडला....
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 05/16/2014 - 10:15
नवीन
हेच म्हणतो.
- Log in or register to post comments
श
शिद
Fri, 05/16/2014 - 11:24
नवीन
असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 05/16/2014 - 08:23
नवीन
सर्वांचेच अभिनंदन! लोकांनी त्यांचा राग न बोलता मतपेटीतून दाखवला. आणि काँग्रेस हा दबलेला राग जाणून घेऊ शकली नाही. आपल्या एकेक मताने काय होऊ शकते हे भारतीय मतदारांनी दाखवले आहे. यासाठी आनंद!
- Log in or register to post comments
ज
जेपी
Fri, 05/16/2014 - 08:47
नवीन
सर्वांचेच अभिनंदन . जनतेने एकाच पक्षाला सत्तेचा कौल देऊन स्वत: प्रगल्भ होत असल्याचा कौल दिलाय. हे असेच राहावे.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 05/16/2014 - 09:36
नवीन
विजयी उमेद्वारांचे,मोदींचे अभिनंदन. १९७७ सारखेच होते आहे असे दिसतय. त्यावेळी जयप्रकाश नारायण व ईतर होते. ह्यावेळी मोदी.
पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »