Welcome to misalpav.com
लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:
आम्ही काही काळापूर्वी http://misalpav.com/node/27418 ह्या काकू द्वारे गणपा खरंच मिपाशेफ बनतील का असा एक सर्व्हे घेतला होता. तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात 'गणपा' चा प्रचार काही जणांनी केला. त्यांच्या विरुद्ध देखील काही लोक बोलले. आज ह्या ठिकाणी निकालाच्या प्रसंगी गणपा जिंकून आलेला आहे. सगळ्या मिपाकरांनी गणपा लहरी आहे- आपलं- गणपा लहर आहे हे मान्य केलं आहे. तरी देखील गणपा जिंकला म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही. त्याला बर्‍याच पा कृ शिकायच्या आहेत, बनवून दाखवायच्या आहेत, सुगरणींच्या सल्ल्यांमधून नेमकेपणा आणायचा आहे. सर्व मिपाकरांना विनंती आहे की गणपाला जरी निवडून आणलेलं असलं तरी पुढच्या पाकॄंसाठी त्याला सगळ्या मिपाकरांच्या समर्थनाची गरज आहे. तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा. 'अच्छी रेसिपीज आनेवाली है' :)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

शाकाहारी (जातीयवादी) व मांसाहारी (शेकूलर ) यांच्या समाधानासाठी रोज नवे काय हा प्रशन गणपा सोडवू शकतील काय ? शिवाय पाककृती फसाव्या म्हणून गणपाविरोधकानी केलेले "षडयंत्र" याची ही त्याना काळजी घ्यावी लागेल. एफ डी आय म्हणजे फूड ड्युर्याबिलीटी इन्डेक्स वर त्याना सर्वाना बरोबर घेउन जाण्याचे खादकरण करावे लागेल ते वेगळेच. गणपा भाई त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !

अनेक ठिकाणी तो आजकाल चायनीज गाड्यावर मिळायला लागल्यापासून तर डोके दुखी फारच वाढली आहे.

@शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट कुणाकडे?हा प्रश्नही सोडवून घ्यावा.>>> +++१११ तिरंगी भाताच्या रेशिपीकडे जास्त लक्ष द्यावे! http://www.sherv.net/cm/emoticons/cook/cooking-dinner.gif त्याचबरोबर,विरोधी नॉन्व्हेज्यांसाठी पेटती भट्टी http://www.sherv.net/cm/emoticons/cook/steak-on-the-grill-smiley-emoticon.gif तयार ठेवावी! अंतर्गत फाटा-फुट करणार्‍या अंड्यां"ची वेळीच खांडोळीhttp://www.sherv.net/cm/emoticons/horror/egg-slicer-smiley-emoticon.gifउडवावी तसेच..नाराजांना नीट-सुपा'तhttp://www.sherv.net/cm/emoticons/cook/cooking.gif-घ्यावे! =)) एव्हढे केल्यानंतर खात्री बाळगावी-विजयhttp://www.sherv.net/cm/emoticons/cook/serving-food.gifआप'लाच होइल! =))

तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा. नायहो ! असे (चक्क "शेफ" बद्दलच्या धाग्यात) आवाहन करून ग्रेट (अ)विचारवंताच्या पोटावर पाय देउ नका हो ! =))