मोदींच्या विजयाचे परीक्षण
२०१४च्या निवडणूकीत नमोंचा न भूतो असा विजय झाला आणि सगळी समीकरणेच बदलली. मोदींचा विजयाने आनंद होत असला, तरी त्या आनंदापेक्षा अश्या एकहाती विजयाबद्दल वाटणारे आश्चर्य हेच जास्त आहे. आणि त्याला पुष्टी देणारे घटक आहेत ते असे -
१. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. सर्व "धर्मनिरपेक्ष" पक्षांनी केलेला प्रचार या मतदारांनी फाट्यावर मारला याचे मला जरा आश्चर्यच वाटत आलेले आहे.
२. काँग्रेस ने नमोंविरुद्ध प्रचाराची प्रचंड राळ उठवून्ब दिल्ली होती. त्यलाही मतदारांनी भीक घातली नाही.
३. बहुतांश मतदार सर्वसामान्यपणे धर्मनिरपेक्ष पक्षांच्या बाजूने मतदान करतो. सर्व विचारवंत नेहमी भाजपाविरुद्धच बोलत असतात. त्यामुळे वातावरण नेहमी धर्मनिरपेक्ष आघाडीच्या बाजूनेच असते.
४. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जेथे जवळ जवळ १५ वर्ष कॉम्ग्रेसचा बालेकिल्ला होता, तिथे देखील मतदारांनी भाजपाला॑ कौल दिला आहे.
या सगळ्याचा विचार करता, केवळ आमच्यासारखे राजकारणाचे सामान्य अभ्यासकच नव्हे, तर भले भले राजकीय पक्ष देखील दि़ग्मूढ झाले आहेत. म्हणून त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
आता माझा अभ्यास मांडतो -
१. सर्वप्रथम या सार्याबद्दल मोदींचे कौतुक केलेच पाहिजे. गेली ३-४ वर्षे त्यांनी ज्याप्रकारे कॅम्पेन चालवली, ते पाहता त्यांच्याइतका दूरदृष्टीचा नेता भारतीय राजकारणात सध्या तरी नाही असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. भारताच्या राष्ट्रीय राजकारणात उपलब्ध असलेली गॅप हेरणे, त्याबद्दल नियोजन करून यंत्रणा चालवणे, आणि दूरदृष्टीने पावले टाकून देशातील सर्वोच्च सत्तस्थान काबीज करणे हे तेव्हढे सोपे नाही. तेदेखील बहुतांश गोष्टी प्रतिकूल असताना.
२. काँग्रेस ने मोदींना अंडरएस्टिमेट केले, ही त्यांची चूक झाली. आपल्या जातीच्या समीकरणांवर विसंबून राहून मोठीच चूक त्यांनी केली असे वाटते.
३. अॅण्टी इन्कंबसी या वेळेस जोरात होती, त्याची धार कमी करण्यात ते कमी पडले. केजरीवालांना त्यांनी याच हिशोबाने मैदानात उतरवले, पण कोंग्रेस्ची बी टीम असलेले केजरीवाल नकळतपणे भाजपाला कशी मदत करू लागले ते जिथे खुद्द केजरीवालांना कळले नाही, तर ते इतरांना काय कळणार? केजरीवालांनी भाजपाचा विजय सोपा केला, इतका, की आता केजरीवाल ही भाजपाचीच बी टीम होती की काय असा संशय यावा.
४. सत्तेबरोबर आलेला माज ही आणखीन महत्वाची गोष्ट - ज्याप्रकारे कपिल सिब्बल नी रामदेवबाबांचे आंदोलन हाताळले, त्यामध्ये आंदोलन हाताळण्यापेक्षा मी कसा वरचढ राजकारणी आहे हे दाखवण्यचाच भाग जास्त होता. अधिक अजित पवार (मुतू का :) ) त्यामुळे बरीच जनता त्यांच्या विरोधात गेली.
५. मोदींनी विकलेले गुजरातचे स्वप्न. गुजरातच्या शेजारी असलेल्या राज्यांनी उदा - महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान. या राज्यांमध्ये भाजपाने क्लीन स्वीप दिला आहे. लेव्हल २ म्हणजे कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा या ठिकाणी ५०- ६०% जागा भाजपाला मिळाल्या आहेत. त्याच्या पलिकडे त्रिपुराचा अपवाद वगळता भाजपाची डाळ फारशी शिजली नाही.
६. नवमतदारांवर पडलेली मोदींची मोहिनी- मी इथेच एका धाग्यावर म्हटल्याप्रमाणे, वाढलेली १०% मते किमान १०० जागांचा निकाल फिरवण्यास पुरेशी होती. हे १०% नसते, तर रालोआ २३० - २५० मध्येच रोखली गेली असती.
मोदींकडून असलेल्या माझ्या अपेक्षा, आणि मोदींची ५ वर्षांची स्ट्रॅटेजी काय असेल याबद्दलच्या माझ्या अंदाजाचा धागा लवकरच.
💬 प्रतिसाद
(74)
म
मदनबाण
Wed, 05/21/2014 - 15:34
नवीन
ओक्के, पाहतो आता. दोघांनाही धन्स ! :)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 05/22/2014 - 10:05
नवीन
हे संस्थळ नक्की कोण चालवते? ही माहिती कशासाठी वापरली जाईल? तिचा गैरवापर होणार नाही हे कशावरुन?
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 05/22/2014 - 12:56
नवीन
हे नरेंद्र मोदींचे अधिकृत प्रचार संस्थळ आहे. आता जरी प्रचार नसला तरी त्याचा वापर अशा पध्दतीने करणे आताच्या काळात कॉमन आहे. (उदा. बराकओबामा.कॉम). तरी देखील तुमच्या मुद्द्याशी सहमत.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
गुरुवार, 05/22/2014 - 13:07
नवीन
मला वाटलंच की ते प्रचारासाठिचे अधिकृत संस्थळ असेल. पण अशी माहिती उद्या पंतप्रधान कार्यालयानी सरकारी चॅनल्स कडुन मागवली तर एकवेळ ठिके.. पण ह्या संस्थळाची तशी खात्री वाटत नाही. लोक जनगणना करताना नीट माहिती देत नव्हते.. इथे तर खुप काही विचारलं आहे..
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 05/19/2014 - 15:18
नवीन
काँग्रेस ने मोदींना अंडरएस्टिमेट केले, ही त्यांची चूक झाली.
काँग्रेस मोदींना अंडरएस्टीमेट करत नव्हती. किंबहूना मौत का सौदागर म्हणले तेंव्हापासून किंवा त्याही आधीपासून काँग्रेसला (आणि डाव्यांना देखील) मोदीं राष्ट्रीय नेतृत्व आणि म्हणून आव्हान ठरतील ही भिती होती.
काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले. आता काळ बदलला आहे आणि तेच ते बोलून काही उपयोग होणार नाही तर जनतेला काम करणारे नेतृत्व हवे आहे. भ्रष्टाचारी आणि मक्ख नको आहे किंवा नुसतेच स्वतः स्वच्छ, भ्रष्टाचार विरुद्ध असे म्हणणारे आक्रस्ताळी नाकर्ते नेतृत्व नको आहे. पण हे यांच्या लक्षातच आले नाही. त्यांना वाटले, "दूर गाँव मे जब बच्चा रात को रोता है तो मॉ केहती है..." च्या चालीवर मोदींची भिती घातली की झाले. त्याला कुठल्याच धर्माधारीत जनतेने कमीअधिक प्रमाणात विश्वास ठेवला नाही.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 05/19/2014 - 15:41
नवीन
करेक्ट, बूल्झाय
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 05/19/2014 - 16:59
नवीन
बरोब्बर. कुमार केतकरांसारखे तर साहित्य सम्मेलनातूनही संधी सोडत नव्हते."मोदी विद्वेषाचे राजकारण करत आहेत',देश फोडत आहेत वगैरे .अशी भिती घातली की मग काम झाले असा त्यांचा समज होता.तिथे केजरीवालही तोच प्रकार. भ्रष्टाचाराविरुद्ध चीड आहे तर ज्या नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्याविरुद्ध तरी निवडणूक लढवायची-राणे,भुजबळ्,सिब्बल किंवा कॉन्ग्रेसची राज्ये.पण अरविंद फक्त गुजरातबद्दलच बोलायचा.त्यामुळे आपची मते फिरली.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 05/20/2014 - 12:41
नवीन
अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ? ;)
बाकी मोदींची घौड-दौड सुरु होण्याची चिन्हे आता पासुनच दिसु लागली आहेत असे वाटु लागले आहे...कारण,
Narendra Modi keen to deepen ties with Israel: Benjamin Netanyahu
जाता जाता :- इस्त्राइलचा उल्लेख आलाच आहे,तर मोदकाची Munich Massacre... ही लेखमाला जरुर वाचा.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 05/20/2014 - 14:12
नवीन
>>अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ? >>
हे मात्र खरं !! ;)
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 05/20/2014 - 15:09
नवीन
+१००
बाकी मोदींच्या सत्तारोहणाचे / प्रतिमेचे जागतिक राजकारणावर होणारे संभाव्य परिणाम या गोष्टीवर कोणीतरी लेख लिहावा अश्या प्रतीक्षेत आहे. नाहीतर मग आहेच आतासारखी एक जिलबी आणि चर्चा. पण माझा या विषयांवर फारसा अभ्यास नसल्यामुळे बरीच चुकीची माहिती लेखात मांडली जातेय असे दिसतय.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Wed, 05/21/2014 - 06:36
नवीन
मला राजकारणात विशेष कांही (किंवा कदाचित कांहीच) कळत नाही. तरीपण मला वाटतं काँग्रेसच्या राजवटीतील प्रचंड घोटाळे, मोदींची मुखदुर्बलता, राहूलची बालीश बडबड ह्यांना कंटाळलेल्या मतदारांना, मोदींच्या तडफदार व्यक्तिमत्वात एक आश्वासक नेता सापडला, संसर्गजन्य साथी प्रमाणे पसरलेली 'अब की बार मोदी सरकार' घोषणा, गुजराथ पॅटर्नचे आकर्षण, नवतरूणांमधील राजकारणातला वाढता रस आदी मुद्दे बिजेपीच्या फायद्यात गेले. काँग्रेससाठी काळ आणि वेळ दोन्ही आले होते.
वरचा चौकटराजा ह्यांचा हा प्रतिसाद मला जास्त पटला.
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 05/21/2014 - 06:43
नवीन
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Wed, 05/21/2014 - 08:30
नवीन
पेठकर काकांनी त्यांना राजकारणातले विशेष कळत नाही असे म्हंटले आहे.!!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/21/2014 - 08:35
नवीन
त्यांना (गतपंतप्रधान) "मनमोहन सिंग" असे म्हणावयाचे असावे... गलतिसे मिष्टेक होगया ऐसाईच लगताय ;)
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Wed, 05/21/2014 - 10:31
नवीन
मनमोहनसिंगच म्हणायचे होते. घाईघाईत मोदी लाटेत गटांगळ्या खाल्ल्या.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Wed, 05/21/2014 - 10:28
नवीन
@ सुनिल,
मुद्राराक्षसाचा विनोद. मला 'मनमोहनसिंग' म्हणायचे आहे. चुकी बद्दल दिलगिर आहे.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Wed, 05/21/2014 - 13:30
नवीन
मन्दमोहन म्हणायचे होते वाटते.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Wed, 05/21/2014 - 16:07
नवीन
मोदीच प्रधान मंत्री बनणार होते कारण
म नमो हन
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 05/21/2014 - 16:34
नवीन
आनंदा, पण भाई वैद्य तर म्हणतात कि हा विजय खोट्या स्वरूपाचा प्रचार करून लोकांना फसवून तो मिळविलेला आहे,
पहा सकाळ १९ मे
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 05/21/2014 - 16:45
नवीन
पकाका धन्स ! :)
धन्स अशासाठी कारण त्या लेखाच्या खाली ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यातली एक वाचुन मी शॉलिट्ट हसलो बघा !
ती प्रतिक्रिया मणोरंजनासाठी इथे चोप्य पेस्त करतो...
Ravi - सोमवार, 19 मे 2014 - 08:20 PM IST
अगदी बरोबर बोललात. शिवाय आंतरराष्ट्रीय मानवतावादाला मानणारे आणि झिम्बाब्वेचे माजी गोलंदाज पमेलेलो बांग्वा ह्यांनीही हा जातीयवादाचा विजय मानले आहे. एल्टन चिगुम्बरा आणि मौरीस ओडुम्बे यांनीही त्याला अनुमोदन दिले.ओडुम्बे हे मूळचे मराठी असल्याचे म्हटले जाते. पण हे भाई वैद्य कोण आहेत?
*LOL*
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 05/21/2014 - 16:54
नवीन
:-))
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 05/22/2014 - 06:54
नवीन
खिक्क!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/22/2014 - 11:19
नवीन
दुव्यासाठी धन्यु घाटपांडे साहेब !
असली माणसे तर आपले नेहमीचे अळणी जीवन मजेशीर बनवाणारे मीठ आहेत ! =))
ती जेवढी जास्त अगतिक बनतात तेवढी जास्त विनोदी होतात. पण सत्याचा सामना करणे त्यांना जरा कठीणच जाते, याची खंत वाटते :(
- Log in or register to post comments
व
व्युत्क्रम काेन
गुरुवार, 05/22/2014 - 00:55
नवीन
जनमानसाचा ठाव घेणारे हजरजबाबी वक्तृत्व , लाेकांना आश्वस्त करणारा आत्मविश्वास आणि गुजरातमधील कामगिरीचे वेळाेवेळी केलेले "उदाहरणासहीत स्पष्टीकरण" या गाेष्टींचा उल्लेख करावासा वाटताे.
एका निर्नायकी अवस्थेतल्या देशाला अशा व्यक्तीमत्वाची भुरळ पडणे सहाजिकच !
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2