'आजचा भारत' आणि 'नाझी भस्मासुराचा उदयास्त'
इतिहास म्हणजे भूतकाळात यदृच्छया घडलेल्या, व वरवर पाहता विस्कळित, असंबंधित भासणाऱ्या घटनां असून, त्यामागे काही योजनेचे सूत्र असते; म्हणजे ह्या घटनांत एक साचा, आकृतिबंध (पॅटर्न) असतो; इतिहासात उलगडत जाणाऱ्या ह्या आकृतिबंधात इतिहासाचा ‘अर्थ’ सामावलेला असतो हा आकृतिबंध समजून घेण्यानेच, आपल्याला वर्तमान परिस्थितीचा अर्थ, तिच्यात गर्भित असलेल्या प्रवृत्ती आणि ह्या प्रवृत्तींमुळे जो भविष्य वर्तमानातून अटळपणे उद्भवणार आहे, तो भविष्यकाळ ह्या साऱ्यांचे आकलन होऊ शकते”
(संदर्भ: मराठी विश्वकोश)
"नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.
हे वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या गेल्या ५-६ वर्षात दिसून आलेल्या महागाई, भ्रष्टाचार, अराजकतेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीत हिटलर जन्मास आला नसता तर नवलच होते, जर्मन जनतेच्या नेमक्या याच वेदनेवर हिटलरने त्याच्या जाहीर सभांमधून बोट ठेवले. जर्मनीला वैभव प्राप्त करुन देण्याचे भव्य स्वप्न हिटलरने जर्मन जनतेला दाखवले.जनता त्याच्या मागे हळूहळू जाऊ लागली, सोबत जोसेफ गोबेल्सचा झंजावाती प्रचार होताच (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर हा नं २ चा नेता ), नंतर घेतलेल्या सार्वमतात हिटलरला ९९.९९ % बहुमत होते (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर ती हिटलरची त्सुनामी होती असे आपण म्हणू), यामध्ये त्याला 'ऐस ऐस' अश्या शिस्तबद्ध सेमी मिलिटरी संघटनेची व संघटनेच्या स्वयंसेवकांची मदत मिळाली (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर...जाऊ दे, नाव नाही घेत ), यावरुन हे लक्षात यावे. हिटलर जेव्हा जर्मनीचा चेन्सेलर झाला तेव्हा कोणत्या मुद्द्यावर तो निवडून आलेला होत ते पहा
- लाखो लोकांची बेकारी (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर भारतात जवळजवळ १० टक्का) )
- जर्मन मार्क ह्या चलनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील हास्यास्पद पत (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर १ डॉलर = ६५ रु (गेल्या काही महिन्यातील ) )
अर्थात ज्यूंवरचे अत्याचार व गॅसचेंबर्समधील अमानवीपणा या पशूपेक्षाही हीन पातळीवरच्या योजनांनी हिटलरच्या आत लपलेल्या राक्षसाचेच दर्शन घडते. (आजच्या कॉन्टेक्स मध्ये बघाल तर तो हिटलरचा हिडन अजेंडा होता असे आपण म्हणू)
हिटलर का ये इतिहास आज भी हमारे लिए बहुत अर्थ रखता है. इसलिए नहीं कि इतिहास हमेश कोई ना कोई सबक़ देता है बल्किन इसलिए क्योंकि इतिहास से हमें चेतावनी भी मिलती है. आर्थिक संकट में लाखों लोगों ने एक ऐसे व्यक्ति को अपना नेता मान लिया जो केवल इसलिए करिश्माई बन गया क्योंकि वो लोगों के डर, उनकी आशा और अपनी परेशानियों के लिए दूसरों को ज़िम्मेदार ठहराने की आदत का लाभ उठाना जानता था.
लेकिन लाखों लोगों को इसके गंभीर परिणाम भुगतने पड़े.------( रेफ: आर्टिकल 'मामूली आदमी से तानाशाह तक हिटलर का सफर' लॉरेंस रीस (इतिहासकार))
💬 प्रतिसाद
(72)
स
सुबोध खरे
गुरुवार, 05/22/2014 - 14:44
नवीन
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचे भाषांतर वाचल्यासारखे वाटले.
असो आपण ज्या रंगाचा चष्मा लावला जग तसेच दिसते
- Log in or register to post comments
व
विनोद१८
Fri, 05/23/2014 - 13:02
नवीन
*lol* *lol*
हा मणिशंकरने हळुवारपणे घेतलेल्या चाव्यापासून झालेल्या जंतुसंसर्गाचा परिणाम असावा असे वाटते...दुसरे काय ???
- Log in or register to post comments
त
तिमा
गुरुवार, 05/22/2014 - 14:50
नवीन
कोणाचीही राजकीय मते काहीही असू शकतात, पण नव्या सरकारचा अजून जन्मही झाला नाहीये. त्यांना निदान काम तरी करु दे, तेवढी तरी वाट बघण्याचे सौजन्य दाखवावे अशी अपेक्षा.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 05/22/2014 - 15:01
नवीन
बराच वेळ विचार करत होतो हे काय असावं. मग "धी टाईम्स ऑफ ईंडिया", "सटैंडरड वैकुअम ओयल कंपनी" वगैरेची आठवण झाली आणि "ऐस ऐस"चं कोडं ऐसेच सुटलं.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/22/2014 - 15:09
नवीन
नाय हो !
पगला साय्बांना भौतेक मड्डमनी किंवा शैजाद्यानं कायपण म्हटलं की "एस, एस" म्हणणारी गुलामांची फौज असं म्हणायचं असेल.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
गुरुवार, 05/22/2014 - 15:04
नवीन
तिमा +१ ..
ह्ये नुस्तं ट्यारपी वडायला बगतंय आसं वाटतय बगा.. काय बी प्रतिक्रिया द्यायची गरज नाय.
(अवांतरः साम्य दाखवणार्यानी हिटलरचे पहिल्या दहा वर्षातील देश उभारणीतील काम, त्याच्या त्या काळातील अद्वितीय प्रशासकिय व्यवस्थेची निर्मिती आणि मोडकळीस आलेल्या देशाला पुन्हा प्रगतीशील अर्थव्यवस्था बनवण्यातील त्याचे योगदान या बाबी देखील अभ्यासल्या असतील असे समजतो..
हिटलरने जे काही केले ते निंद्य अगदी वाईट वाईट असले तरी पण त्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास न करता फक्त असली उथळ तुलना करण्यासाठी केलेला वापर पाहूपाकीव कराविशी वाटली. )
- Log in or register to post comments
श
शिद
गुरुवार, 05/22/2014 - 15:07
नवीन
कहना क्या चाहते हो पगले?
- Log in or register to post comments
श
शिद
गुरुवार, 05/22/2014 - 15:17
नवीन
- Log in or register to post comments
ज
जेम्स बॉन्ड ००७
Fri, 05/23/2014 - 13:00
नवीन
हिरवं द्या त्यांना
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 05/22/2014 - 15:08
नवीन
देशात सर्वप्रकाराचे भेद जागृत ठेवणारे काँग्रेस अथवा त्याच प्रकारातील (+ नक्षलवादी, काश्मीर अतिरेकी समर्थक) असलेले आप यांचा धुव्वा उडालेला आहे. त्यामुळे हिटलरी वृत्ती नामोशेष झालेली आहे. त्या व्यतिरीक्त, "हा हंत हंत गज नलिन्युच्चहार" (अर्थात "कमळाने हत्तीचा पाडाव केला") घडले आहे, जी निवडणुका आणि भारतीय राजकारणात आश्वासक अशी घटना आहे.
आता "सबका साथ सबका विकास" म्हणणारे नेतृत्व आणि विचारसरणी राज्यावर आली आहे. थोडक्यात काळजी नसावी. बर्याचदा "आपल्याला माहीत नाही हेच आपल्याला माहीत नसते" असे होते... अथवा कळले तरी वळणे तर त्याहूनही अवघड असते... तेंव्हा अगदीच फार त्रास होत असेल काळजी वाटत असेल तर हे अवश्य आणि हवे तितके घ्यावेत.
- Log in or register to post comments
र
राही
गुरुवार, 05/22/2014 - 21:08
नवीन
अवतरण (जर मुळाबरहुकूम द्यायचे असेल तर) थोडी चुकले आहे. अर्थ तर उलटच घेतला आहे.
पूर्ण श्लोक असा आहे : रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् | भास्वान् उदेष्यति हसिष्यति पङ्कजश्री: | इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे | हा हन्त, हन्त नलिनीं गज उज्जहार || अर्थ : कमलकोशात शिरलेला भुंगा असा विचार करीत होता की रात्र निघून जाईल, प्रभात होईल, सूर्य उगवेल, कमळे फुलतील, (आणि आपली सुटका होईल.) पण अरेरे ! तो असा विचार करीत असतानाच हत्तीने ती कमलवेल उपटून टाकली.
अर्थात या श्लोकावरून वेगळे वचन बनवले असेल तर गोष्ट निराळी.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 05/23/2014 - 03:17
नवीन
मुद्दामच उलटे लिहीले होते... या निवडणुकीत कमळाने (भाजपाने) हत्तीला (बसपाला) उडवून लावले म्हणून :)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/22/2014 - 15:12
नवीन
नमो लाटेचे साईड ईफेक्ट
- Log in or register to post comments
ध
धन्या
गुरुवार, 05/22/2014 - 15:18
नवीन
पगला गया का गजोधरभईया?
- Log in or register to post comments
प
प्रसाद प्रसाद
गुरुवार, 05/22/2014 - 15:29
नवीन
"नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.
ह्या वाक्याला तीव्र असहमती. अत्यंत एकतर्फी विचाराने लिहिलेले पुस्तक आहे हे. हिटलरने ज्यू लोकांचा जो काही छळ, कत्तली केल्या त्याचे अजिबात वर्णन पुस्तकात नाही. उलट ह्या अमानुष कत्तलीमागे ज्यू लोकांचे वागणेच कसे कारणीभूत होते अशा नीच वृत्तीचे प्रत्यक्षरीत्या समर्थन करणारे हे पुस्तक आहे.
अवांतर - कुठलेतरी संदर्भ कुठेतरी जोडणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 05/22/2014 - 16:06
नवीन
ते विल्यम शिररच्या पुस्तकाचं भाषांतर आहे. कानिटकर तरी काय करतील बिचारे?
- Log in or register to post comments
प
प्रसाद प्रसाद
Fri, 05/23/2014 - 10:10
नवीन
ते विल्यम शिररच्या पुस्तकाचं भाषांतर आहे. कानिटकर तरी काय करतील बिचारे?
नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक विल्यम शिररच्या कोणत्याही पुस्तकाचं एकटाकी भाषांतर नाही आहे. पुस्तकाची प्रस्तावना वाचून जे काही यासंबंधी कळते ते असे नाझी भस्मासुराचा उदयास्त वि. ग. कानिटकर- राजहंस प्रकाशन 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' ही लेखमाला 'माणूस' नियतकालातून जून १९६४ पासून क्रमश: प्रसिद्ध झाली. त्याचे हे पुस्तकरूप.
त्याचबरोबर पुस्तकाच्या यशाचा वाटा लेखक विल्यम शिरर, अॅलन बुलॉक, विन्स्टन चर्चिल आणि आणखी दोघा तिघांना प्रस्तावनेत देतो. ह्या लोकांच्या विचारांचा प्रभाव लेखकावर आहे हे स्पष्ट आहे, पण पुस्तक भाषांतरीत नाही आहे. पुस्तकातले विचार वि. ग. कानिटकर यांचेच आहेत हे स्पष्ट आहे.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 05/23/2014 - 06:29
नवीन
ह्या वाक्याला तीव्र असहमती. अत्यंत एकतर्फी विचाराने लिहिलेले पुस्तक आहे हे. हिटलरने ज्यू लोकांचा जो काही छळ, कत्तली केल्या त्याचे अजिबात वर्णन पुस्तकात नाही. उलट ह्या अमानुष कत्तलीमागे ज्यू लोकांचे वागणेच कसे कारणीभूत होते अशा नीच वृत्तीचे प्रत्यक्षरीत्या समर्थन करणारे हे पुस्तक आहे.
ज्यू कत्तलींचे समर्थन हा उद्देश नाही पण त्या रोषाला ज्यू कारणीभूत नसतीलच असेही नाही. अशीच ज्यू कत्तल २० व्या शतकाच्या सुरुवातीस रशियामधे झाली होती. त्यास पोग्रॉम असे म्हणतात. अशा ज्यू कत्तली युरोपात अन्य ठीकाणीही होऊन गेल्या. मिपावरील एका चर्चेत अरेबियन नाईटसच्या अल्लदिनच्या कथेत बनेल ज्यू व्यापारारी आणि भला अरबी व्यापारी अशी तुलना पण केलेली दिसते. कदाचित ज्यूंचे वर्चस्व वेगवेगळ्या वेळेला वेगवेअळ्या लोकांना असह्य होऊन त्यांनी ज्यूंची कत्तल केली. अर्थात आश्चर्य याचे वाटते की तरीही ज्यू लोक अजूनही जगामधे अनेक क्षेत्रात वर्चस्व गाजवून आहेत.
बाकी अर्थातच चालूद्या.
- Log in or register to post comments
अ
असंका
Sun, 05/25/2014 - 05:30
नवीन
म्हणजे " कदाचित ज्यू लोकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली असेल.हा विषय आता संपला. बाकी कुठ्ल्या विषयावर बोला" असं म्हणायचं आहे का?
फक्त इथल्या वाचकांच्या ज्ञानासाठी आपल्या मौल्यवान वेळेतून थोडा आणखी वेळ काढून, एकच सांगा - दुसर्या महायुद्धात किती ज्यू नागरीक मारले गेले? माहित असेलच आपल्याला. त्याशिवाय का इतक्या अधिकारवाणीने आपण वरचा निकाल दिलात...त्यामुळे शोधाशोध न करता हा आकडा सांगा ही विनंती. वाट्ल्यास एका मर्यादेत सांगा, म्ह्णजे १०-२०, १००-२०० वगैरे.
(सहसा मी खोड्कर प्रतिसादांकडे दुर्लक्ष करून स्वस्थ बसतो. पण ज्यू लोकांचे हत्याकांड हा माणुसकीवरचा इतका मोठा डाग आहे, की जगण्यावरचा विश्वास उडावा....केवळ त्यामुळे आपल्याला मी हा प्रश्न विचारायचं धाडस केलं आहे. )
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 05/29/2014 - 10:55
नवीन
ज्यूंचा कसलाही दोष नव्हता. उगीच त्यांच्या कत्तलीचे समर्थन करू नका. दुसर्या महायुद्धात हिटलरने एकट्यानेच ६० लाख ज्यू मारले. अजूनही कैक लोक मेले.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
गुरुवार, 05/22/2014 - 15:46
नवीन
हु आर यु ?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 05/22/2014 - 16:05
नवीन
ह्या बाबतीत "एकमत".
ड्युड, हु आर यु?
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 05/22/2014 - 16:10
नवीन
या निवडणुकीत पडलेल्यांच्या "ऐस ऐस" संघटनेतील स्वयंसेवक असावेत. म्हणून अचानक असले आयडी उगवतात आणि लपून छ्पून लिहीत बसतात! ;)
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Fri, 05/23/2014 - 05:02
नवीन
पण आपली सहमतिअसहमती मजला द्खलपात्र नाही हे नम्रपणे बोल्ड करतो.
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
गुरुवार, 05/22/2014 - 16:12
नवीन
आम्ही भारतीय जरा सनकी आहोत.उठ सुठ कधीही कुनाच्याही मागे अविचाराने पळत नाही.जस डोक्यावर घेवुन नाचतो ना तस वेळ आली की पार डोक्यावरुन टाकतो पण शिवाय आमची आर्मी उठ सुठ दिला पंतप्रधानाने किंवा जनरलने आदेश म्हणुन घेतला देश ताब्यात असा काही प्रकार करत नाही.जर वरिष्ठ अधिकारी देशविघातक आदेश देत असेल तर त्याला स्पष्ठ शब्दात इथला शिपाईगडीपण नकार देतो.त्यामुळे इथे तुमचा हिटलर जन्म घेइल असला काय विचार करुन स्वतःच नाव सार्थक करु नका.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 05/22/2014 - 16:20
नवीन
जबरा प्रतिसाद.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
गुरुवार, 05/22/2014 - 16:24
नवीन
हिटलर शनिवारी जन्मला. हा नराधम शनिवारी जन्माला आला. आजच्या काळाचा संदर्भ, भारताचा आजचा नेता रविवारी जन्मला. म्हणजे एक पाऊल पुढे! म्हणजे हा हिटलरच्याही दशांगुळे वर असणार की काय?
हिटलरला त्याची ती खास नाकाखाली असणारी मिशी होती. त्यामुळेच त्याला असे अत्याचार करायचा मोह झाला. आजच्या काळाचा संदर्भ, आज जो भारतीय नेता म्हणून मिरवतो आहे त्याला तर पूर्ण मिशी आणि दाढी आहे, तीही पांढरी स्वच्छ! म्हणजे हिटलरच्याही दोन पावले पुढे!
हिटलरने बंड केले आणि त्याला तुरुंगात डांबले होते. तिथे त्याने माईन काम्फ (माझा संघर्ष) असे आत्मचरित्र लिहिले. भारताचा भस्मासूर ना तुरुंगात गेला ना आत्मचरित्र लिहिले. म्हणजे आपले नीच उद्दीष्ट गुप्त ठेवण्यात हिटलरच्या दोन पावले पुढेच!
शिवाय हिटलरला दोन डोळे होते, दोन हात होते, दोन पाय होते, दोन कान होते. आता हे सगळे भारताच्या सर्वोच्चपदी बसलेल्या राक्षसालाही आहेत हे एखाद्या दूधखुळ्यालाही कळेल!
तर अनेक बाबतीत हिटलरशी साम्य तर अनेक बाबतीत हिटलरच्या पुढे असणार्या ह्या नेत्याकडे बघून आम्हाला भारताच्याच नव्हे तर जगाच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. लवकरच जग सोडून अन्यत्र जावे म्हणतो!
अस्तु अस्तु!
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
गुरुवार, 05/22/2014 - 16:33
नवीन
अजून काही साम्ये !! सही प्रतिक्रिया!
हिटलरची एक प्रेयसी होती - इव्हा ब्राऊन. यांची कोणीच नाही. म्हणजे अजून एक पाऊल पुढे ?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/23/2014 - 02:23
नवीन
=))
जब्राट!!!
- Log in or register to post comments
ज
जेम्स बॉन्ड ००७
Fri, 05/23/2014 - 13:03
नवीन
*ROFL*
- Log in or register to post comments
ह
हरकाम्या
गुरुवार, 05/29/2014 - 10:50
नवीन
तुम्ही कमालखान्चे अनुकरण करायला काहीच हरकत नही. तोही असाच भारत सोडुन गेला
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 05/22/2014 - 16:27
नवीन
मला असे वाटते की ते आपले नाव सार्थ करत आहेत], तेव्हा शहाण्यांनी त्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 05/22/2014 - 16:48
नवीन
असो. असाच उत्साह पुढची ५ वर्षे टिकवा म्हणजे झाले..
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
गुरुवार, 05/22/2014 - 16:28
नवीन
राग मानू नका पण गजोधार साहेब, तुम्हाला मोदी आणि गुजरात बाबत काहीच माहित नसावी किंवा कळत असूनही वळत नाही वाली गत आहे. जो व्यक्ती सर्वाना घेऊन चालतो. जिथे अल्पसंख्यक देशात सर्वात जास्त सुरक्षित आहे. (प. उत्तर प्रदेशच्या अल्पसंख्यकाना विचारा दिवसासुद्धा ते सुरुक्षित नाही, नेताजींची कृपा )(मे महिन्यात एक आठवडा मी त्या भागातल्या एका गावात होतो माझ्या माहिती प्रमाणे त्यांनी ही मोदींच्या नावावर मतदान मोठ्याप्रमाणात केले आहे.(३०-५०% टक्के पर्यंत) गाजियाबाद येथे तर सर्वांची जमानत जब्त झाली. अल्पसंख्यकानी सर्वात जास्त प्रगती गेल्या १२ वर्षात गुजरात मध्ये केली आहे. पोलीस दलात ही सर्वात जास्त अल्पसंख्यक गुजरात मधेच भर्ती झाले आहे (मोदींच्या राज्यात). अल्पसंख्यक मंत्रालयाने सुद्धा१५ सूत्री कार्यक्रम चांगल्या रीतीने राबविल्याने गुजरात ची स्तुती केली आहे. शिवाय अल्पसंख्यक लोकांना वाचविण्या सर्वात जास्त दंगेखोरांना गुजरात पोलीसने कंठस्नान घातले आहे (विश्वास नसेल तर RTI टाकून सर्व राज्यातल्या दंग्यांची आणि पोलीस कार्यवाही ची माहिती मागवून घ्या, निश्चित डोळ्यांत अंजन पडेल)
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 05/22/2014 - 16:42
नवीन
निकालानंतर मिसळपाववर एक विशिष्ट गोष्ट जाणवते आहे. लक्षात येतेय का बघा....इथे विरोध होत नाहीये तुमच्या बोलण्याला.
असं का असावं हा प्रश्न नाही पडत तुम्हाला?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/22/2014 - 17:16
नवीन
कशाला उगाच ताकाला जाऊन भांडे लपविता? शीर्षकात स्पष्टपणे "मोदी भस्मासुराचा उदयास्त" असे लिहायला हरकत नव्हती.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 05/22/2014 - 17:35
नवीन
मला वाटते ते राहूल अथवा केजरीवालांच्या बाबतीत म्हणत असतील. कारण मोदींचा अजून तरी उदयच होत आहे. बा़इ दोन पात्रांचा उदय पण होऊन गेला आणि अस्त देखील झाला! ;)
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 05/22/2014 - 18:22
नवीन
गजोधरशेठ,
गुजरातेत दंगल झाली म्हणून भारतातही तसेच होईल असे नाही. दंगल झाल्यानंतर काय बोलायचे ते बोला.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 05/22/2014 - 18:30
नवीन
तेंव्हातरी बोलतील की नाही कुणास ठावूक.
मुझफ्फर दंगल आणि आझाद मैदान दंगल ह्या दोन्ही साक्ष आहेत.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 05/22/2014 - 18:36
नवीन
सहमत. मात्र बोलताना पुरावे हवेत. अन्यथा कोर्टात खटले टिकणार नाहीत.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 05/22/2014 - 18:44
नवीन
१९६९ साली काँग्रेसच्या राज्यात दंगलींना सुरवात झाली. असे म्हणले जाते की तो टर्निंग पॉइंट होता. आता असे म्हणता येऊ शकते की असले अंतर्गत विभाजन हे काही न करता सत्ता आबाधित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. १९८४ -८५ च्या शिख दंगलींनी मात्र निचांक गाठला असे म्हणावेसे वाटते. गुजरातेत हे अगदी मोदी मुख्यमंत्री झाले त्याकाळापर्यंत म्हणजे अगदी ते मुख्यमंत्री आल्यानंतर २ महीने चालू राहीले. पण नंतर गेल्या १२ वर्षात गुजरातमधे नुसत्या दंगलीच झाल्या नाहीत असे नाही तर काँग्रेस तीन निवडणुका हरली...
थोडक्यात जे काही १९६९ ला चालू झाले होते ते मोदी राज्यात पूर्ण बंद झाले. तेंव्हा काही काळजी करू नका.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 05/22/2014 - 18:53
नवीन
काँग्रेसच्या काळातील शीख दंगलींमुळे मोदींच्या कारकीर्दीतल्या दंगलींचे गांभीर्य प्रचंड प्रमाणात कमी झाले आहे असा माझाही अंदाज आहे. शिवाय शीख समुदायाविरोधात काँग्रेसची वर्षानुवर्षे चालू असलेल्या कारवाया ममोसिंगासारख्या बाहुल्याला पंतप्रधानपदावर बसवून कमी होणाऱ्या नाहीत.
अच्छे दिन आने वाले हय त्यामुळे काळजी नाहीच.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 05/22/2014 - 19:06
नवीन
काँग्रेसच्या काळातील शीख दंगलींमुळे मोदींच्या कारकीर्दीतल्या दंगलींचे गांभीर्य प्रचंड प्रमाणात कमी झाले आहे असा माझाही अंदाज आहे.
अच्छा म्हणजे ३०००+ शिखांना भारतभर मारले गेले ह्या पेक्षा त्यामुळे गुजरात दंगलींचे गांभिर्य कमी झाले याचे तुम्हाला दु:ख आहे. छान छान!
बाकी गेल्या दहा वर्षात काँग्रेसने पंतप्रधानपदाचे पोतेरे केले खरे, पण मनमोहनसिंगांनी स्वतः निवृत्त होत असताना अनेक ठिकाणी अनेकांनी म्हणल्याप्रमाणे, काँग्रेसला बुडवून एका अर्थी सूड उगवला असेच म्हणावे का काय कळत नाही!
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 05/22/2014 - 19:30
नवीन
गुजरात दंगलींचे समर्थन करण्यासाठी शीखविरोधी दंगलींचा वापर होऊ नये असे म्हणायचे आहे. दोन्ही दंगली सारख्याच गंभीर होत्या.
काय सांगता? मला वाटले होते की दंगली या एखाद्या धर्माच्या अनुयायांविरुद्ध उमटलेली संतप्त आणि प्रतिक्षिप्त क्रिया असते व सत्ताधारी दंगली घडवून आणत नाहीत.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 05/22/2014 - 19:48
नवीन
गुजरात दंगलींचे समर्थन करण्यासाठी शीखविरोधी दंगलींचा वापर होऊ नये असे म्हणायचे आहे. दोन्ही दंगली सारख्याच गंभीर होत्या.
समर्थन कोणीच केले नाही. पण गुजरात दंगलीचा गैरवापर मात्र डाव्यांनी, काँग्रेसने आणि स्युडोसेक्यूलर विचारवंतांनी केला. टिस्टा सारख्या बाईने तर त्याचा गैरवापर पैसे हडप करण्यासाठी देखील केला अशी तक्रार आहे. गुजरात दंगलीनंतर जितक्या त्वरीत कारवाई मोदी सरकारने करण्याचा प्रयत्न केला तिच्या एक दशांश कारवाई देखील शिख हत्याकांडाच्या वेळेस केली गेली नाही. त्यातले प्रमुख आरोपी हे उजळ माथ्याने काँग्रेसचे खासदार झाले. आयोगांवर आयोग चालू राहीले... त्या ऐवजी गुजरातमधल्या दंगलीत सुप्रिम कोर्टापर्यंत सर्वांनी आयोग स्थापले त्यांचे निकाल देखील लागले. कदाचीत मोदी हे पहीले मुख्यमंत्री असतील जे स्वतः चौकशीला सामोरे गेले. इतर वेळेस एकाही मुख्यमंत्र्यास सामोरे जावे लागले नाही. अगदी ९२/९३च्या मुंबई दंगलीत देखील नाकर्तेपणाबद्दल काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यास (मला वाटते सुधाकरराव नाईक होते) सामोरे जावे लागले नाही. तेंव्हा समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. पण मोदी-भाजप-संघ विरोधकांनी त्याचा गेली १२ वर्षे बदनामी करण्यासाठी गैरवापर केला ही वस्तुस्थिती आहे, इतकेच.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 05/22/2014 - 19:51
नवीन
मीदेखील हेच म्हटले होते. दंगली झाल्यानंतर चर्चा करता येईल. दिल्लीत शीखविरोधी किंवा गुजरातेत मुसलमानविरोधी दंगल झाली म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात होईलच असे नाही.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Fri, 05/23/2014 - 11:40
नवीन
मुळात शीख विरोधी दंगल आणि मुसलमान विरोधी दंगल ह्या एकाच पारड्यात तोलणे ही मोठी चुक आहे, कारण तसे करुन शीख आणि मुसलमान एकाच पारड्यात तोलता आहात.
हा शीख लोकांवर मोठा अन्याय आहे.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 05/22/2014 - 19:35
नवीन
हे सारकॅस्टिकली म्हटलं आहे का?
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 05/22/2014 - 19:40
नवीन
हो.
(Explain the sarcasm and ruin it!!)
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 05/22/2014 - 19:50
नवीन
हे सारकॅस्टिकली म्हटलं आहे का?
अर्थातच! तुम्हाला माहीत नाही का की राहूल गांधी मंत्रीमंडळात नसूनही काही वाट्टेल ते बोलले तर मनमोहनसिंग त्यांना कसे सुनवायचे ते? ते कसे काय बाहुले म्हणता तुम्ही?
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »