Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राजजामातांचे विमान जमिनीवर येणार ?

ह
हुप्प्या
Fri, 05/30/2014 - 16:48
🗣 64 प्रतिसाद
गांधी घराण्याचा आणि पर्यायाने देशाचा जावई असणारे श्रीमंत राबर्ट वदराजी सोनियाजींच्या राज्यात एखाद्या राज्याप्रमाणेच वावरत असत. त्यांच्याकरता खास अशी योजना होती की सामान्यांना लागू असणारी सुरक्षा तपासणी त्यांना लागत नसे. तसे बोर्ड तमाम भारतीय विमानतळावर होते. बाकी मंडळी ज्यांना अशी सवलत असते त्यांना विशिष्ट पदाकरता असते. त्यामुळे ह्या बोर्डावर त्या पदाचा उल्लेख असे. म्हणजे माजी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री वगैरे. केवळ राजजामातांचा उल्लेख निव्वळ नावाने होत असे. http://superblog.crazyengineers.com/wp-content/uploads/2012/01/Robert-Vadra-Airport-Security.gif भारतीय लोकशाहीविषयी आदर असणार्‍या कुठल्याही भारतीय नागरिकाचा ऊर अभिमानाने भरून यावा अशी ही खाशी सवलत होती. कुठलाही सामान्य माणूस केवळ राजघराण्याशी संबंध प्रस्थापित करून आपले स्थान उंचावू शकतो असा दिव्य संदेश ह्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणार्‍या राष्ट्राने दिला होता. तर तूर्तास राजघराण्याचे दिवस फिरल्यामुळे ही राजसवलत आता काढून टाकण्याचे कुटिल कारस्थान शिजते आहे. तमाम देशप्रेमींनी मोठ्ठे मोर्चे काढून, राजघाटावर आंदोलन करून ह्या धर्मांध शक्तींचा विरोध करून हा डाव हाणून पाडला पाहिजे. राजजामात हे राजजामातच रहाणार. निवडणुका, सरकार ह्यांचा त्यावर परिणाम होऊ शकत नाही. जब तक सूरज चांद रहेगा वद्रा तेरा नाम रहेगा! http://ibnlive.in.com/news/robert-vadra-may-lose-the-privilege-of-not-being-frisked-at-airports/475302-37-64.html

प्रतिक्रिया द्या
24257 वाचन

💬 प्रतिसाद (64)
न
नानासाहेब नेफळे Fri, 05/30/2014 - 17:36 नवीन
किती ती जळजळ.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 05/31/2014 - 15:53 नवीन
नानासाहेब, कुणाला आणि कशा मूळे जळजळ होते आहे ते ही सांगा की .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
श
श्रीरंग_जोशी Fri, 05/30/2014 - 19:18 नवीन
Priyanka Gandhi Vadra Asks for Special Privileges at Airports to be Withdrawn
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 05/31/2014 - 11:35 नवीन
बघा, बघा. एका मिपा बिल्बीचा किती प्रभाव पडला ते ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 05/31/2014 - 11:36 नवीन
बघा, बघा. एका मिपा जिल्बीचा किती प्रभाव पडला ते ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मुक्त विहारि Sat, 05/31/2014 - 11:36 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हुप्प्या Sat, 05/31/2014 - 14:10 नवीन
गांधी घराणे देशाकरता किती मोठमोठे त्याग करते ते पुन्हा अधोरेखित केले गेले. ह्याकरता बिटिया प्रियांकाला भारतरत्न देण्यात यावे आणि श्रीमंत राबर्ट वद्राजींचे नाव एखाद्या फर्मास विमानतळाला देण्यात यावे! देश ही ह्या खानदानाची वैयक्तिक जहागीर असताना इतका मोठेपणा दाखवणे हे केवळ राजघराण्यालाच जमते. चहावाले वगैरे येरागबाळ्यांचे तेथे काम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
व
विकास Mon, 06/02/2014 - 15:49 नवीन
प्रियांकाची बातमी वाचली तेंव्हा "कांगावखोर" हा शब्द आठवला. भारतीय कायद्याप्रमाणे, माजी पंतप्रधानाच्या कुटूंबियांना नंतरची दहा वर्षे अशी सुरक्षा मिळते. म्हणजे तसे देखील बघायचे तर सोनीयांना देखील त्या कारणासाठी ही सुरक्षा मिळण्याची गरज नाही. मोदींच्या पत्नीला देखील साधी म्हणजे पाच पोलिस (त्यातील एकाकडे रायफल!) असली सुरक्षा दिल्याचे आणि मोदींच्या आईस अजिबातच सुरक्षाकवच देण्यात आलेलेल नसल्याचे वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
भ
भाते Mon, 06/02/2014 - 17:03 नवीन
माजी पंप्र रागां यांच्या हत्येनंतर समस्त गांधी कुटुंबियांना आजन्म एसपीजी सुरक्षा देण्यात आली आहे असे वाचले होते. माझ्या माहितीप्रमाणे समस्त गांधी कुटुंबिय, माजी पंप्र अटलबिहारी वाजपेयी आणि (माजी) पंप्र ममो सिंग यांनाच एसपीजी सुरक्षा दिली गेली होती. आता माजी पंप्र ममो सिंगचे माहित नाही. :) त्यामुळे उद्या प्रियांका गांधीच्या मुलीच्या मैत्रिणीच्या मावस/चुलत भावा/बहिणीला सुध्दा अशीच सुरक्षा दिली तर नवल वाटायला नको. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
आ
आशु जोग Sat, 05/31/2014 - 12:08 नवीन
अय्या माहीतच नव्हते. आपण बातमी इथे चिकटवलीत हे फार छन केलेत
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 06/04/2014 - 09:54 नवीन
मुळात कोणाला सिक्युरीटी द्यावी हा निर्णय राजकीय असु नये. त्यामुळे सरकारने घेतलेली सद्य भुमिका योग्य आहे.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Sun, 06/08/2014 - 20:41 नवीन
परमआदरणीय महापराक्रमी वद्राजींची सुरक्षा व्यवस्था अबाधित राहिल अशी लक्षणे दिसत आहेत. हे वाचून आम्ही धन्य झालो! भारत काही इतका भिकेला लागलेला नाही की भारताचे एकमेव राजघराणे व त्यांचे नातेवाईक ह्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी आपल्या खिशातून करणे त्याला जड जाईल. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Sonia-Robert-Vadra/articleshow/36256512.cms
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sun, 06/08/2014 - 21:39 नवीन
मा़झ्या माहितीप्रमाणे रॉबर्टला त्याच्या बरोबर साला, पत्नी किंवा सासूबाई असल्यासच ही सोय लागू होती/आहे. पण प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी किती काटेकोरपणे होत होती ते देव जाणे!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 06/08/2014 - 22:03 नवीन
रॉबर्टः सोनिया किधर है? किधर है सोनिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा