Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महापुरुषांची (ऑनलाईन) बदनामी: एक कायमची डोकेदुखी?

ह
हुप्प्या
Sun, 06/08/2014 - 20:14
🗣 102 प्रतिसाद
अलीकडे झालेल्या शिवाजी महाराज व बाळ ठाकर्‍यांच्या फेसबुकवरील काही प्रक्षोभक चित्रांमुळे पुण्यात काही भागात वातावरण तंग होते. त्यात एका निरपराध मुस्लिम युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला. हे अगदी चुकीचे आहे. त्याच्या खुनाला जबाबदार असणार्‍यांना शक्य तेवढी कठोर सजा व्हावी. अगदी फाशीदेखील. मग त्यांना आपण हुतात्मा आहोत असे वाटले तरी बेहत्तर. पण ह्यावर उपाय काय? फेसबुक वा ट्विटर जगभर वापरले जाते. कुणी कुठे काय प्रकारची पोस्ट करेल ह्याला काही धरबंध नाही. अनेक देशात टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. केवळ भारतात दंगे होतात म्हणून हे देश आपल्या नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला मुरड घालेल अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. पण असले उठसुठ दंगे होणे भारताला परवडेल का? तशात मोदींकडे कलुषित नजरेने बघणारे कमी नाहीत त्यामुळे असे काही घडले की थेट मोदींवर आरोप केले जाऊ शकतात आणि जातातही. लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान करणे सहन करायला शिकलेच पाहिजे असे मला वाटते. मग ते हिंदू असोत वा मुस्लिम वा अन्य कुणी. ड्यानिश व्यंगचित्रकाराचे प्रकरण आठवत असेलच. आपणास काय वाटते? ह्या विषयाशी संबंधित काही बातम्या. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Pune-IT-Engineer-murder/articleshow/36161829.cms http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/fear-drives-many-in-Pune-to-shun-skull-caps-Pathani-suits/articleshow/36243080.cms

प्रतिक्रिया द्या
33656 वाचन

💬 प्रतिसाद (102)
ख
खटपट्या Mon, 06/09/2014 - 01:45 नवीन
लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान करणे सहन करायला शिकलेच पाहिजे असे मला वाटते.
असहमत !!!
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Wed, 06/18/2014 - 09:57 नवीन
धाग्याची झाली शम्भरी....... सर्व महापुरुषांचा विजय असो!!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
मंदार कात्रे Mon, 06/09/2014 - 02:36 नवीन
लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान करणे सहन करायला शिकलेच पाहिजे असे मला वाटते.
यापेक्षा देवतांचा अपमान करण्याची खोडसाळ प्रव्रुत्तीच नष्ट केली तर?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 06/09/2014 - 02:53 नवीन
+१११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
ह
हुप्प्या Mon, 06/09/2014 - 04:48 नवीन
जगाच्या पाठीवरील सर्व देशात जाऊन तिथे लोकांचे प्रबोधन करायचे? शक्य तरी आहे का? नुसते पाकिस्तान आणि बांगलादेश बघा तिथे रहाणारे वा तिथून अमेरिकेत वा युरोपात जाऊन रहाणारे लोक हे शिवाजीविषयी आदर बाळगतील का? ठाकर्‍यांविषयी आदर बाळगतील का? फेसबुक वा ट्विटरवरुन हे लोक बदनामीकारक काहीतरी लिहिणे थांबवता येणे शक्य आहे का? मला वाटते नाही. आजिबात शक्य नाही. आपल्या एका क्षुल्लक पोस्टमुळे लोक डोक्यात राख घालून घेतात आणि जाळपोळ करतात ह्याचा असुरी आनंद होणेच जास्त शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
न
निलरंजन Mon, 06/09/2014 - 04:47 नवीन
आपल्या देवतांचे अपमान सहन न करण्याजोगे पोस्ट असतात पण काही प्रश्न पडलेले शिवराय आणि साहेब यांचे गलिच्छ फोटो नेमके धर्मवीर संभाजी महाराज या पेजवरच का टाकले गेले ? पोस्ट पाहिल्यावर वाॅटसअपवर शेअर करणारे खरेच भक्त होते का दहशतवादी? सोशल मीडीयाचा जास्त वापर करून हे प्रकरण जास्त चिघळले पण न्युज चॅनेल ने गैरसमज दूर केले नाही म्हणून संभ्रम अजूनच वाढला नव्हता का?
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Mon, 06/09/2014 - 06:08 नवीन
उत्साहाच्या भरात आपण काय शेअर करतोय हेही अनेक लोक विसरतात असा अनुभव आहे. शिवाय एखाद्याची बदनामी करुन त्याचा/तिचा अपमान करता येतो हा विचार प्रचंड हास्यास्पद वाटतो मला! पण त्याला अगदी स्वतःला शिक्षित म्हणवणारे लोक बळी पडतात. आपल्याला काही दिसलं तर थेट सायबर सेलकडे तक्रार करावी - पण अनेक मंडळी महापुरुषांच्या बदनामीचं कळत नकळत वितरण करत असतात हे मात्र विचित्र वाटतं. आपल्या भावना लोकांनी काबूत ठेवायला शिकणं, सायबर सेलकडे तक्रार करणं, बदनामीकारक साहित्याचा अजिबात प्रसार न करणं, आणि कायदा हातात न घेणं एवढी पथ्य लोकांनी पाळली की सामाजिक द्वेष आणि अशांतता फैलावणा-यांचा उद्देश यशस्वी होणार नाही.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 06/09/2014 - 06:21 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
स
सूड Mon, 06/09/2014 - 08:24 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
र
राजेश घासकडवी Mon, 06/09/2014 - 11:35 नवीन
शिवाय एखाद्याची बदनामी करुन त्याचा/तिचा अपमान करता येतो हा विचार प्रचंड हास्यास्पद वाटतो मला!
अगदी नेमकं. त्याहीपलिकडे जाऊन असा अपमान म्हणजे आख्ख्या जातीचा/समाजाचा/वर्गाचा अपमान असं मानून घेऊन 'आता आपल्यावर या अपमानाचा बदला घेण्याची जबाबदारी आहे. हे करणाऱ्या त्या साल्या जाती/समाज/वर्गाला इंगा दाखवलाच पाहिजे' हा विचारही होतो. नुसता विचारच नाही, तर त्यानुसार आचारही होतो हे फारच वाईट. महापुरुषांचं विभूतीकरण होतं. मग त्या महापुरुषाचं श्रेष्ठत्व विसरलं जाऊन त्यांचं केवळ एखाद्या मूर्तीत, प्रतिमेत, झेंड्यात किंवा बिरुदात रूपांतर होतं. त्यावर चिखलाचा एक थेबंही उडला तरी चवताळून उठायचं एवढाच त्यांचा उपयोग शिल्लक राहतो. हे दुर्दैव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
म
मनिष Tue, 06/10/2014 - 06:58 नवीन
+१ अगदी, अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2014 - 06:15 नवीन
>>>>अलीकडे झालेल्या शिवाजी महाराज व बाळ ठाकर्‍यांच्या फेसबुकवरील काही प्रक्षोभक चित्रांमुळे .... अशा शब्दप्रयोगांनीही कांहींच्या भावना दुखावतात. त्या ऐवजी, 'अलीकडे झालेल्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि माननिय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या फेसबुकवरील कांही प्रक्षोभक चित्रांमुळे...' अशी शब्दरचना जास्त आदरयुक्त वाटते.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Mon, 06/09/2014 - 06:58 नवीन
बाळ ठाकरे यांचा अनेकवचनी उल्लेख पुरेसा आदरणीय आहे. ठाकरे यांचा आणि ठाकर्‍यांचा ह्यात आदराच्या बाबतीत फार फरक नाही. बाकी आदरणीय, माननीय, हिंदूहृदयसम्राट, सेनानायक वगैरे बाकीच्या पदव्या लावाव्यात का नाही हा लेखकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. शिवाजी महाराज हे माझ्या लेखी आदरपूर्वक केलेले संबोधन आहे. ह्या महामानवाविषयी माझ्या मनात आदराशिवाय अन्य भावना नाही. पण अमकेच शब्द वापरा वा तमकीच विशेषणे वापरा असल्या आज्ञावजा सूचनांना मी फाट्यावर मारतो. असो. भरकटणे थांबवून मूळ विषयाकडे वळावे हे उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2014 - 16:33 नवीन
>>>>अमकेच शब्द वापरा वा तमकीच विशेषणे वापरा असल्या आज्ञावजा सूचनांना मी फाट्यावर मारतो. अशी कुठलीही आज्ञा अथवा सुचना माझ्या प्रतिसादात नाही. माझ्या प्रतिसादात नसलेल्या गोष्टी तुम्ही फाट्यावर मारणार असाल तर मला कांहीच आक्षेप नाही. मला काय आदरयुक्त वाटते तेवढे मी दिले आहे. तुम्ही त्याचे पालन कराच अशी आज्ञा, सूचना, विनंती त्यात नाही. शिवाय, मी ठळक केलेल्या अक्षरांविषयीच माझे मत मी दिले आहे. बाकी पदव्यांबाबत लेखकाचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित आहेच. >>>>असल्या आज्ञावजा सूचनांना मी फाट्यावर मारतो. मी सुद्धा. आपल्या मनाविरुद्धच्या वाक्यांचा एव्हढा राग येतो तर ज्यांच्या नजरेत हे महापुरुष आहेत त्या अजाणांना त्यांच्या दैवतावर केलेली चिखलफेक कशी सहन व्हावी? त्यांनी जशी सहनशक्ती अंगी बाणवावी तशीच त्यांना खडे बोल ऐकविण्याची इच्छा असणार्‍यांनीही बाळगावी असे नाही वाटत? माझा प्रतिसाद म्हणजे भरकटणे नसून मुख्य विषयाला धरुनच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Mon, 06/09/2014 - 22:20 नवीन
माझा राग हा माझ्या मनाविरुध्दच्या वाक्यांना नसून अमक्या व्यक्तीला आदर दाखवायचा असेल तर अमक्या पदव्या आणि तमकी बिरुदे वापरा ह्या आग्रहाविरुद्ध आहे. तशी बिरुदे वापरले नाहीत तर त्यांचा मोठा अपमान होतो ह्या आपल्या अध्याहृत अर्थाला आहे. मी असे काही मानत नाही. मला जे योग्य बिरुद वाटते ते मी वापरले. शिवाजी महाराजांना छत्रपती हे बिरुद न लावल्यामुळे त्यांचा मोठा अपमान होतो असे मी मानत नाही. किंबहुना तसे मानणार्‍यांच्या मानसिकतेवर हा लेख हा एक प्रहार आहे. एका धर्मात त्यांच्या संस्थापकांचा उल्लेख करताना त्यांना शांती मिळो असल्या अर्थाचे काही म्हणण्याची पद्धत आहे. आदर दाखवण्याची ही पद्धत आता इतकी अनिवार्य झाली आहे की तसे म्हटले नाही तर संस्थापकाचा मोठा अपमान होतो असे मानणारा वर्ग त्या धर्मात निर्माण झाला आहे. तसे शिवछत्रपती वा अन्य कुणाबाबत घडू नये अशी माझी इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 06/10/2014 - 09:55 नवीन
मग हेच जरा प्रेमाने सांगता आले असते की :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
प
प्रभाकर पेठकर Tue, 06/10/2014 - 14:32 नवीन
>>>>माझा राग हा माझ्या मनाविरुध्दच्या वाक्यांना नसून अमक्या व्यक्तीला आदर दाखवायचा असेल तर अमक्या पदव्या आणि तमकी बिरुदे वापरा ह्या आग्रहाविरुद्ध आहे. माझा मूळ प्रतिसाद कृपया पुन्हा वाचा. त्यात ठळक केल्या शब्दांबद्दलच मी, 'मला काय आदरयुक्त वाटते' ते लिहीले आहे. तुम्ही ते तसेच वापरा असा आग्रह, आज्ञा अजिबात कुठे नाही. बाकीच्या महापुरुषाच्या पदव्या, बिरुदं ही माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग म्हणून वापरली आहेत. ती तुमच्यावर कुठल्याही कोनातून लादली, सुचवली, आज्ञा केलेली नाही. मूळ मुद्दा सोडून जे सुचविलेले नाही अशी गोष्टच धरून ती तुम्हाला झोडपत बसायचे असेल तर चालू द्या. ती तुमची वैयक्तिक आवड म्हणून मी दुर्लक्ष करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Tue, 06/10/2014 - 20:01 नवीन
आपण असे लिहिले होतेत >> अशा शब्दप्रयोगांनीही कांहींच्या भावना दुखावतात. त्या ऐवजी, 'अलीकडे झालेल्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि माननिय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या फेसबुकवरील कांही प्रक्षोभक चित्रांमुळे...' अशी शब्दरचना जास्त आदरयुक्त वाटते. << ह्यात अशा शब्दप्रयोगांनी भावना दुखावतात असा आपला दावा आहे. आणि तो मुद्दा मला खोडायचा आहे. अशा शब्दप्रयोगामुळे लोकांनी आपल्या भावना दुखावून घेणे सोडावे. जगातील कुठल्या कानाकोपर्‍यात बसून कुणी काय लिहिल ह्याचे एककेंद्रीय नियंत्रण ठेवणे शक्य नाही तेव्हा सहनशक्ती वाढवा असे माझे म्हणणे आहे. मी मुद्दा सोडलेला नाही. आपण जे मागे जे म्हटलात ते मी म्हटलेच नव्हते असा दावा करत आहात. तो चुकीचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Tue, 06/10/2014 - 20:47 नवीन
>>>> अशा शब्दप्रयोगांनी भावना दुखावतात असा आपला दावा आहे. तुम्हाला तुमचाच हेका चालवायचा आहे. माझा मूळ प्रतिसाद वाचा..वाचा सांगून तुम्ही कांही तो वाचत नाही. त्यातील ठळक केलेल्या शब्दांबद्दलच मी माझं मत मांडलं आहे हे त्रिवार सांगूनही तुम्ही त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करता आहात. माझा प्रतिसाद पुन्हा चिकटविताना त्यातील मी ठळक केलेली अक्षरे पुसून ती इतर साध्या अक्षरांमधेच मिसळवून माझा संपूर्ण प्रतिसाद म्हणजे 'अशा शब्दप्रयोगांनी भावना दुखावतात असा आपला दावा आहे' असा थेट आरोप करताताना तसा, मला अभिप्रेत नसलेला, अर्थ तुम्ही त्याला चिकटविता आहात. आनंद आहे. तुम्हाला जो अर्थ घ्यायचा तो घ्या, तुम्हाला जी तुमची मते मांडायची ती मांडत राहा, माझ्याकडून ह्या विषयावर हा शेवटचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 06/15/2014 - 06:24 नवीन
जाऊ द्या हो. बाळासाहेबांचा वरील लेखातील तसा उल्लेख खटकणारा आहे हेच वास्तव आहे, समजून नसेलच घ्यायचं तर आपण करू शकतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ह
हुप्प्या Sun, 06/15/2014 - 07:41 नवीन
अहो तुम्हाला खटकणारे असे कुणी काही लिहिले तरी त्या व्यक्तीच्या मतस्वातंत्र्याचा मान राखून ते सहन करणे हीच तर व्यक्तीस्वातंत्र्याची कसोटी आहे. सगळ्यांना आवडेल आणि पटेल असेच लिहिले गेले तर त्याकरता स्वातंत्र्य वेगळे मागावे का लागेल? समजा तुम्हाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे लिहिले नाही तर खटकत असेल तर मला बाळ ठाकरे इतके म्हणून पुरत असेल. जर सभ्यतेच्या सीमेत राहून असे वेगवेगळे उल्लेख होत असतील तर ते चालू दिलेच पाहिजेत. मला खटकते म्हणून दुसर्‍याच्या उल्लेखाला धारेवर धरा असे करून चालणार नाही. तशात मिसळपाववर लिहिणारे जगात सगळीकडे असतात. निव्वळ मुंबईत राडा करुन अशा लोकांवर जरब बसेल का? मला वाटत नाही. तेव्हा व्यक्तीस्वातंत्र्याचा मान राखणे हेच इथे इष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हुप्प्या Sun, 06/15/2014 - 07:35 नवीन
मी उद्धृत केलेल्या वाक्याखेरीज त्यात कुठलेही अन्य वाक्य नाही.तेव्हा नसलेली वाक्ये मला वाचायला सांगून आपण काय साध्य करत आहात ते आपणच जाणत असाल. बाळ ठाकर्‍यांना बाळासाहेबच म्हटले पाहिजे हे मला मान्य नाही. माझ्या मते अनेकवचनी उल्लेख करणे हे सन्मान दर्शकच आहे. ठाकर्‍यांविषयी मला आदर आहेच. मतभेदही आहेत. अजून एक उदाहरण घ्यायचे तर पु. ल. देशपांडे हे मला ठाकर्‍यांपेक्षा जास्त आदरणीय आहेत. पण त्यांचाही उल्लेख मी पु. ल. देशपांड्यांनी अमुक एका पुस्तकात असे म्हटले आहे असा करेन. त्यात साहेब, अण्णा, भाई कुठलाही प्रत्यय लावायची गरज वाटत नाही. त्यात मला काहीही अनादरणीय वाटत नाही. ह्यात मतांतरे असू शकतात. पण त्याकरता मतस्वातंत्र्यावर गदा आणण्याची भाषा असू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ब
बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 07:38 नवीन
सहमत. रामकृष्णादि देवांचा उल्लेख जर एकवचनी केलेला चालतो तर शिवाजीमहाराज किंवा अन्य महापुरुषांचा उल्लेख एकवचनी केल्याने फरक का पडावा हे कोडे कै उलगडत नाही. पण ते एक असोच. मला डॉक्षावर उगी फतवा नकोय स्वतःच्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
प
प्रचेतस Tue, 06/10/2014 - 08:21 नवीन
रामकृष्णादि देवांचा उल्लेख जर एकवचनी केलेला चालतो तर शिवाजीमहाराज किंवा अन्य महापुरुषांचा
देवांविषयी प्रिती असते तर शिवाजी महाराज आदी महापुरुषांविषयी प्रितीयुक्त आदर असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 08:49 नवीन
शिवाय आपल्या भाषांमध्ये आदर=बहुवचन आणि अनादर=एकवचन अशी सिस्टिम उपटलीय. वरिजिनल संस्कृतात असे कधीच नव्हते. कितीही आदराने बोलले तरी ते लोक अरेतुरेच करायचे- मग तो कुणी मोठा राजा असो नैतर कोणी महान ऋषी असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 06/10/2014 - 08:56 नवीन
ते झालंच रे. पण तसंही बघितलं तर वडील/ आजोबांना आपण अहो जाहोच करतो आणि आई/आजीला अगं तुगं. हल्लीची पिढी मात्र हे संकेत पाळत नाही हे मात्र खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 09:00 नवीन
होय ते आहेच-पण वैयक्तिक मत विचारशील तर त्यात गैर काही नाही. उत्तरेत तर दोघांनाही अहोजाहो करतात. ते कितीतरी बरं. आपल्या इथे सिस्टिमिक भेदभाव इतका खोलवर आहे, की आईचा भाऊ म्हणून मामा तेवढा अरेजारे आणि वडिलांचा भाऊ म्हणून काका मात्र अहोजाहो? बरेचजण काकालाही एकवचनाने बोलावतात तो भाग वेगळा. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 06/10/2014 - 09:08 नवीन
गैर काहीच नाही. शेवटी ज्याच्या त्याच्या व्यकिगत आवडीनिवडीचा प्रश्न. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 09:17 नवीन
इंडीड. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मृत्युन्जय Tue, 06/10/2014 - 10:11 नवीन
नाही रे. काकाला अर्रे काकाच म्हणतो की आपण. ते सुद्धा मोठ्या काकाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 10:59 नवीन
तसे म्हणणारे अन न म्हणणारेही पुष्कळ पाहिलेत म्हणून म्हटले इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सुनील Tue, 06/10/2014 - 11:08 नवीन
त्याचं काय आहे - मामा म्हणताना ओठ एकमेकांच्या जवळ येतात (पक्षी जवळीक, बोले तो एकेरी) अन् काका म्हणताना ओठ एकमेकांपासून दूर जातात (पक्षी दूरावा, बोले तो बहुवचनी) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 11:35 नवीन
धन्य धन्य ते लॉजिक _/\_ =)) (उगीच द अंग्रेजमधील "मामा! मामा!! मामा!!!" आठवले.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 06/10/2014 - 14:03 नवीन
दुसर्‍यांना मामा बनवायला उत्तम लॉजिक आहे ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
पिशी अबोली Fri, 06/13/2014 - 13:52 नवीन
शिवाय आपल्या भाषांमध्ये आदर=बहुवचन आणि अनादर=एकवचन अशी सिस्टिम उपटलीय. वरिजिनल संस्कृतात असे कधीच नव्हते
विषयाशी अवांतर प्रतिसाद आहे, पण कोणत्याही भाषेचा विकास स्वतंत्रपणे होत असल्याने तिने 'वरिजिनल' व्हरायटीला चिकटून राहण्याची अपेक्षा नसावी. आणि काहीशा नंतरच्या काळातील संस्कृतमधे आदरार्थी बहुवचनाचा वापर होत असे असे काहीसे स्मरते. कदाचित शाकुंतल किंवा उत्तररामचरितात कुठेतरी उदाहरण असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 06/16/2014 - 09:34 नवीन
पूर्वार्धाशी सहमत आहे, उत्तरार्धाची उदा. पहायला आवडतील. पण एनीवे तो प्रक्षिप्त प्रकारच असावा. पाणिनीत अशा प्रकाराचा उल्लेख आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
म
माहितगार Mon, 06/09/2014 - 17:40 नवीन
मराठीच्या व्याकरणात काळानुरूप बदल होतो आहे काय ? परंपरागत मराठी व्याकरणात नामाचे नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप बदलते त्याला 'सामान्यरूप' म्हणतात. आणि आडनावांचे सामान्यरूप होणे ही बाब मागच्या पिढ्यांमध्ये सामान्यबाब असावी. (चूकभूल देणे घेणे, कृ. मराठी व्याकरण त़ज्ञांनी/अभ्यासकांनी मार्गदर्शन करावे) काळानुरूप नवीन मराठी पिढ्यांनी आडनावांचे सामान्यरूप करणे थांबवले असेल तर मराठी बोलणार्‍या जुन्या पिढ्यांना मराठी बोलण्याचे नवीन काळानुसार प्रशिक्षण द्यावे लागेल, म्हणजे गैरसमज होण्याची शक्यता कमी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
त
तिमा Mon, 06/09/2014 - 06:24 नवीन
विज्ञान हे माणसाच्या प्रगतीसाठी असते. पण ते माकडांच्या हाती पडले की विध्वंस ठरलेलाच!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 06/09/2014 - 06:26 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/09/2014 - 07:53 नवीन
@पण ते माकडांच्या हाती पडले की विध्वंस ठरलेलाच!>>> +++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
आ
आयुर्हित Mon, 06/09/2014 - 07:54 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
म
म्हैस Mon, 06/09/2014 - 07:56 नवीन
रिकामटेकडे आणि दंगली झाल्यावर असुरी आनंद मिळवणारे अश्या पोस्ट टाकत असतात . त्यांना दंगली हव्याच असतात . दंगल झाली कि ते अजून चेकाळतात . आणि हे कोणी परदेशी करत असतील अस वाटत नहि. त्यामुळे दंगल वगेरे न करता ताबडतोब तक्रार करून अश्या पोस्त काढून टाकाव्यात हा उपाय मला वाटतो .
देवतांचा अपमान करण्याची खोडसाळ प्रव्रुत्तीच नष्ट केली तर?
सहमत आहे . पण कशी ? कोण करणार ?
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 08:02 नवीन
होय, विशेषतः निवडणुक जवळ आली असेल तर...
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Mon, 06/09/2014 - 08:45 नवीन
अश्या प्रकारांकडे न चिडता दुर्लक्ष करायला शिकले की हे प्रकार वाढतील वाढतील आणि तरीही दुर्लक्ष केले की एकदाचे थांबतील. जरी दुर्लक्ष करणे शक्य नसेल किंवा आपल्या देवांचा आणि दैवतांचा अपमान सहन करणे हे कोणाला कमीपणाचे वाटत असले तरी पडद्यामागच्या खर्‍या सुत्रधाराला न पकडता तोडफोड करत वा दंगली घडवत शासनव्यवस्थेवर राग काढणेही चुकीचे हे तरी प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे कारण यात छळ सामान्यांचाच होतो. महाराजांचा अपमान या महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही या भावनेचे समर्थन मी देखील करतो पण अरे तो कोण आहे तो समोर तर दिसू दे.. जरी प्रत्येक माणसाचे प्रबोधन करणे शक्य नसले तरी संघटनांचे नक्कीच करू शकतो. कारण बरेचदा तोडफोड वा बंदच्या स्वरूपात निषेध एखाद्या संस्था संघटनेच्या मार्फत वा पुढाकाराने होतो. सरकारने अश्या गोष्टींचा पाठपुरावा करावा अशी अपेक्षा धरणे चुकीचे नाही, पण या देशात आणखीही बर्‍याच समस्या असताना आपली प्रायोरिटी काय हे आपण जनतेनेच ठरवण्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 06/09/2014 - 09:03 नवीन
दुर्लक्ष हाच उपाय आहे. सूर्यावर थुंकणार्‍यांना सीरियसलि कशाला घेतात लोक काय माहिती.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 06/09/2014 - 11:58 नवीन
अहो त्यांचे दुसरे च interset असतात. त्या निमित्तानी दुकान दार वगैरें कडुन जास्तीची खंडणी घेता येते. ह्या area मधे माझा जोर आहे हे राजकीय बॉस ला दाखवता येते ( त्याचा फायदा निवडणुकीत वसुल केला जातो ). लोकांना त्रास दिल्याचा असुरी आनंद मिळतो. अशी अनेक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध फक्त आणि फक्त स्वार्थाशी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 06/09/2014 - 12:06 नवीन
अशा वेळेस लोकांचा इलाजही चालत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2014 - 16:50 नवीन
कांही राजकिय कारणांसाठी सुरक्षा आणि सुव्यवस्था पाळता येत नसल्याने किंवा सरकार पाळत नसल्याने सर्वसामान्य जनता वैफल्यग्रस्त झालेली असते. त्यांच्या ह्या अवस्थेचाच फायदा घेत राजकिय पुढारी समाजात विष पसरवत असतात. 'दुर्लक्ष केले पाहिजे हे ज्यांना कळते' त्या अल्पसंख्य (म्हणजे विशेष समाज नाही) समाजाला कांही समजवावे लागत नाही आणि ज्यांना समजणे गरजेचे असते असे समाजकंटक समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. सरकारी हस्तक्षेप आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
माहितगार Mon, 06/09/2014 - 10:08 नवीन
मुख्य धागा लेखात वेगळ्या अर्थछटांचे शब्द कदाचित अधीक सुयोग्य ठरतील असे वाटते. अशा ठिकाणी हेतू बदनामी पेक्षा अपमान करून चाहत्यांच्या भावना जाणीवपुर्वक दुखवण्याचा असू शकतो नालस्ती किंवा अधिक नेमका शब्द वापरता येऊ शकेल असे वाटते. सहनकरणे आणि संयम यांच्या अर्थछटात अंतर आहे. मला वाटते वाक्य काहीसे खालील प्रमाणे असणे अधीक सुयोग्य होऊ शकेल. 'लोकांनी आपल्या दैवतांबद्दल अभ्यासपूर्ण टिका कठोर असली तरीही सहन करायला शिकलेच पाहिजे, आणि निंदकाकडून अपमानांबद्दल संयम दर्शवला पाहिजे. स्वतःस प्रीय विभूतींची भलावण करून हवे असणेही समजता येते, पण कौतुक जबरदस्तीने करवून घेता येते ? एखादी व्यक्ती जी स्वकतृत्वाने पुरेशी मोठी आहे, तीला मोठीच म्हणा हि सक्ती त्या व्यक्तीची प्रतिमा मोठी करते का ? आपल्या संयम सोडलेल्या वागण्याने इतरांच्या मनातील प्रतिमा उंचावण्या एवजी तडा तर जाणार नाही याचा चाहत्यांनी विचार करण्यास वाव आहे असे वाटते.'
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 06/09/2014 - 10:12 नवीन
या धागा लेखात ज्या विशिष्ट घटनांचा उल्लेख आहे त्यातील काहींना राजकीय उद्दीष्टे आणि रंग नाहीतना अशी शंका वाटली. वृत्तमाध्यमांमध्ये सुद्धा जबाबदारीच्या जाणीवेचा अभाव यावेळी प्रकर्षाने जाणवला.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा