Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महापुरुषांची (ऑनलाईन) बदनामी: एक कायमची डोकेदुखी?

ह
हुप्प्या यांनी
Sun, 06/08/2014 - 20:14  ·  लेख
लेख
अलीकडे झालेल्या शिवाजी महाराज व बाळ ठाकर्‍यांच्या फेसबुकवरील काही प्रक्षोभक चित्रांमुळे पुण्यात काही भागात वातावरण तंग होते. त्यात एका निरपराध मुस्लिम युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला. हे अगदी चुकीचे आहे. त्याच्या खुनाला जबाबदार असणार्‍यांना शक्य तेवढी कठोर सजा व्हावी. अगदी फाशीदेखील. मग त्यांना आपण हुतात्मा आहोत असे वाटले तरी बेहत्तर. पण ह्यावर उपाय काय? फेसबुक वा ट्विटर जगभर वापरले जाते. कुणी कुठे काय प्रकारची पोस्ट करेल ह्याला काही धरबंध नाही. अनेक देशात टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. केवळ भारतात दंगे होतात म्हणून हे देश आपल्या नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला मुरड घालेल अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. पण असले उठसुठ दंगे होणे भारताला परवडेल का? तशात मोदींकडे कलुषित नजरेने बघणारे कमी नाहीत त्यामुळे असे काही घडले की थेट मोदींवर आरोप केले जाऊ शकतात आणि जातातही. लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान करणे सहन करायला शिकलेच पाहिजे असे मला वाटते. मग ते हिंदू असोत वा मुस्लिम वा अन्य कुणी. ड्यानिश व्यंगचित्रकाराचे प्रकरण आठवत असेलच. आपणास काय वाटते? ह्या विषयाशी संबंधित काही बातम्या. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Pune-IT-Engineer-murder/articleshow/36161829.cms http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/fear-drives-many-in-Pune-to-shun-skull-caps-Pathani-suits/articleshow/36243080.cms

प्रतिक्रिया द्या
33656 वाचन

💬 प्रतिसाद (102)

प्रतिक्रिया

उ
उगा काहितरीच Mon, 06/09/2014 - 10:14 नवीन
असे काही दिसले तर सरळ report करा. फेसबूकवाले दोन तिन दिवसात परीक्षण करतात, बहुतेक वेळा काढतातच (बरेचदा आला आहे अनुभव).
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 10:28 नवीन
बदनामी कोणाला चुकते ? सगळ्यांचे चाहते आपापल्या श्रध्दास्थानाची बदनामी वर्षानुवर्षे सहन करत आलेले आहेत, राहतील, ठोस पर्याय याला उपलब्ध्द नाही. विटंबना जरा संवेदन्शील मुद्दा असतो. विटंबना चाहत्यांच्या भावना दुखावते. विटंबना चाहत्यांच्या श्रध्दास्थानाशी असलेली निष्ठा डिवचते. म्हणून चाहत्यांचा तोल जातो. मी स्वतः जेंव्हा जेंव्हा ज्या ज्या लोकांच्या श्रध्दास्थानाची विटंबना केली जाइल तेंव्हा त्या लोकांनी एकत्र येउन धडकी भरेल असा विराट मुकमोर्चा काढुन निषेध नोंदवावाच या मताचा आहे. पण मला कोणत्याही प्रकारे भारतीय समाजाची शारीरीक, मानसीक, आर्थीक हानी होणे पसंत नाही भलेही मी अशा दुश्कृत्या विरोधा प्रचंड शक्ती प्रदर्शन मी आवश्यक मानतो. - जय महात्मा गांधी.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Mon, 06/09/2014 - 10:33 नवीन
यांच्या या http://www.misalpav.com/comment/586771#comment-586771 प्रतिसादाला उत्तर म्हणून दिला होता. शक्य झाल्यास तेथे हलवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
श
श्रीगुरुजी Mon, 06/09/2014 - 11:15 नवीन
महाराष्ट्रात काँग्रेसचा १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी जेमतेम १५ जागा मिळवून (भाजप १८ + शिवसेना १५ अशा एकूण ३३ जागा युतीला मिळाल्या होत्या) काँग्रेसचा पुन्हा एकदा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर १९९७ मध्ये मुम्बईतील रमाबाई आंबेडकर नगरात आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे दंगल होऊन पोलिस गोळीबारात १० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यावेळी युतीचे सरकार जवळपास बरखास्त होत आले होते. त्या सरकारची बरखास्ती थोडक्यात टळली. नंतर १९९८ च्या निवडणुकीत दंगलीचा प्रमुख मुद्दा होता व त्यात युतीचा दारूण पराभव झाला होता (काँग्रेस ३३ + रिपब्लिकन ४ = ३७ आणि युती = १०). याच निवडणुकीत प्रमोद महाजनांचाही पराभव झाला होता. आता २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला आहे. ऑक्टोबर मध्ये विधानसभेची निवडणुक आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे बदनामी प्रकरण घडलेले आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी व २ दिवसांपूर्वी आंबेडकरांची बदनामी करण्यात आली आहे. लगेचच "केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर १५ दिवसांतच जातीय तणाव वाढण्यास सुरुवात झाली" अशी फुसकुली पवारांनी सोडलेली आहे. एकंदरीत हा प्रकार योजनाबद्ध असावा व विधानसभा निवडणुकीपूर्वी १९९७ प्रमाणे वातावरण निर्मिती करून युतीला बदनाम करावे अशी योजना असावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 06/09/2014 - 11:25 नवीन
असेही असेल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सूड Mon, 06/09/2014 - 11:30 नवीन
एक्षच्त्ल्य!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
काळा पहाड Mon, 06/09/2014 - 14:52 नवीन
माझ्या मते हा त्याच्या पुढचा प्रकार आहे. काँग्रेसचा पराभव करण्यात सोशल नेटवर्क आघाडीवर होते. आता राज्यातील निवडणुका आहेत. तर ह्या निमित्ताने सोशल नेटवर्क वर अ‍ॅक्टीव्ह असणार्‍यांना धमकावण्याचा तर हा प्रकार नसेल? म्हणजे कसं तर अश्या पोष्ट स्वतःच टाकायच्या, दंगल स्वतःच्याच कार्यकर्त्यांकरवी करायची, मग सोशल नेटवर्क वापरणार्‍या लोकांना धमकी द्यायची. लोकांना माहीतच नसेल की कोणती पोष्ट ऑफेन्सिव्ह बनू शकते ते. बाकी पवारांच्या स्टेटमेंट्स बद्दल बोलणे म्हणजे चिखलात दगड मारणं होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आजानुकर्ण Mon, 06/09/2014 - 15:25 नवीन
हिंदूराष्ट्र सेना हे काँग्रेसचे पिलू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र काँग्रेसला सगळ्याच दंगलींचा फायदा झालेला नाही. उत्तरप्रदेशात मुझफ्फरपूरमध्ये निवडणुकीपूर्वी दंगली घडवून आणल्या तर काँग्रेसलाच त्याचा तोटा झाला. याउलट दंगलखोरांचा धीरोदात्तपणे प्रतिकार करणाऱ्या भाजपाच्या खासदाराला मंत्रीपदाचे सुयोग्य बक्षीस मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रातील दंगलींचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होईल असे नाही. जनता सूज्ञ आहे. धनंजयभाई देसाईदेखील महाराष्ट्राचे भावी मंत्री होऊ शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
भ
भृशुंडी Mon, 06/09/2014 - 19:21 नवीन
उपरोध आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आयुर्हित Tue, 06/10/2014 - 08:42 नवीन
काळा पहाडजी, यु आर राईट! Maharashtra deputy CM demands ban on social media
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
न
नानासाहेब नेफळे Mon, 06/09/2014 - 16:33 नवीन
आधी रथयात्रा मग बाबरी ,त्यामुळे झालेले मुंबैचे स्फोट,...... ९५साली युतीचे सरकार.... नंतर लगेचच केंद्रात भाजपचे सरकार..... . . . . परंतु हा योगायोग असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/10/2014 - 11:46 नवीन
रथ यात्रेच्या आधी काय काय झाले ते पण सांगा की राव ... *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ट
टवाळ कार्टा Tue, 06/10/2014 - 12:27 नवीन
त्याच्या आधी फाळणी आणि काश्मिर झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/10/2014 - 12:40 नवीन
त्याच्या आधी बरंच काही झालं हो... ... पण ते नेफळेराव सांगतात का ते पहायचय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 06/10/2014 - 13:04 नवीन
हा हा हा....त्याचा ब्याक्लॉग बराच मोठा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
श
श्रीगुरुजी Tue, 06/10/2014 - 16:59 नवीन
>>> आधी रथयात्रा मग बाबरी ,त्यामुळे झालेले मुंबैचे स्फोट,...... ९५साली युतीचे सरकार.... नंतर लगेचच केंद्रात भाजपचे सरकार..... अरे माईसाहेब, आयुष्यात कधीतरी सुधार रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ह
हाडक्या Wed, 06/11/2014 - 18:39 नवीन
@गुरुजी, मला एक प्रश्न पडलाय वो.. या लोकांना 'ग्रेट थिन्कर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर', 'नाना नेफळे', 'माईसाहेब' वगैरे डु-आयडी इतक्या फटाफट कसे काय मिळतात हो ? (यात संपादकीय हात असावा काय? असा आमचा संशय आहे.. परंतु तुमची या डु-आयडींबरोबर घनिष्ठ मैत्री असल्याने हा प्रश्न ) बादवे आमाला एक आयडी मिळवायला चार महिने लागले.. आशा सोडली होती तेव्हा ई-पत्र आले की या मिपावर म्हणून.!! *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/12/2014 - 11:18 नवीन
ते सचिन आणि उद्दाम राहिलेकी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/12/2014 - 13:30 नवीन
>>> @गुरुजी, मला एक प्रश्न पडलाय वो.. या लोकांना 'ग्रेट थिन्कर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर', 'नाना नेफळे', 'माईसाहेब' वगैरे डु-आयडी इतक्या फटाफट कसे काय मिळतात हो ? हा प्रश्न मलाही पडलाय. चव्हाण, उत्तर द्या. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने डू-आयडी कसे मिळविलेत ते सांगता का जरा. >>> परंतु तुमची या डु-आयडींबरोबर घनिष्ठ मैत्री असल्याने हा प्रश्न ) :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
भ
भृशुंडी Mon, 06/09/2014 - 19:23 नवीन
असहमत. हिंदू-मुस्लिम अशा रीतीने समाजातील मतांची विभागणी करून काँग्रेसला फायदा नाही. त्याउलट काँग्रेसला नेहेमीचं जातीय राजकारण करून मतं मिळवणं सोयीचं आहे, आणी त्यात काँग्रेस दरवेळी यशस्वी झालेली आहे. त्याला काटशह देण्यासाठी "धर्माचं" कार्ड खेळणं, हे दरवेळी भाजपाचं सूत्र राहीलं आहे. तेव्हा दंगलींंमुळे होणारं मतांचं ध्रुवीकरण हे "भाजपा"लाच सोयीचं आहे. (१९९२ नंतरचा भाजप उदय) उत्तरप्रदेशात मुझफ्फरपूरमध्ये हीच रणनीती वापरली गेलीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
र
राजेश घासकडवी Mon, 06/09/2014 - 19:38 नवीन
तुमच्या प्रतिसादात मला सरळसरळ विभूतींची विटंबना करण्याचा प्रयत्न मला दिसतो. भाजपाला आख्ख्या देशाने एकमताने निवडून दिलेलं असताना त्या पक्षाविरुद्ध काही बोलणं हेच ब्लास्फेमस आहे. तुम्ही यातून संपूर्ण भारताच्या संपूर्ण जनतेच्या भावना दुखवत आहात. याला देशद्रोहच का म्हणू नये असा मला प्रश्न पडतो. ही ही असली मानसिकता ठेचून काढली पाहिजे. अशा कुरापतखोर माणसांमुळेच दंगली होतात. असल्या विभूतीभंजनाच्या कृतीने भक्तांच्या भावना दुखावल्या की मग ते बिचारे नाइलाजाने चवताळून उठतात. मग त्यातून दंगली झाल्या तर दोष कुणाचा? शब्दांनी उचकवणारे आणि लाठ्याकाठ्यांनी डोकी फोडून खून पाडणारे तत्वतः सारखेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी
भ
भृशुंडी Mon, 06/09/2014 - 23:10 नवीन
सॉरी शक्तीमान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ग
गवि Mon, 06/09/2014 - 11:40 नवीन
राजीव साने यांचा एक वाचनीय लेख अगदी याच विषयावर बोलतो. त्याची लिंक खाली आहे. अद्याप वाचला नसेल तर जरुर वाचावा. http://www.loksatta.com/sampadkiya-news/emotion-get-hurt-271325/ शीर्षक : दुखऱ्या समूहभावनांना उद्रेकाधिकार? थोडे अंश खाली चोप्य पस्ते करत आहे: एकटय़ा व्यक्तीला सातत्याने टोचून बोलून आत्महत्या करायला भाग पाडले जाऊ शकते व तो गुन्हा आहेही, पण यावरून 'समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार' द्यावा काय? कारण एखाद्या समूहातला कोणीही उपटसुंभ, जणू काही तो अख्ख्या समूहाचा प्रतिनिधी असल्याच्या थाटात, एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध रीतसर गुन्हाही दाखल करू शकतो. यातून 'दुखऱ्या समूहभावने'ला, चिथावणीला व झुंडशाहीला वैधता प्राप्त होत नाही काय? सात शेपटय़ांचा उंदीर असे म्हणून चिडविला जाणारा उंदीर एकेक शेपटी कापत जातो. एक शेपटी उरल्यावर त्याला 'एक शेपटीचा उंदीर' म्हणूनही चिडविले जातेच. खरे तर एक शेपटीचा म्हणजे नॉर्मल! पण हा तीही कापतो!! ही गोष्ट, 'चिडवून घेण्यात' मुख्य दोष आहे, हे शिकविते. आपल्या देशात 'गोतगटीय' अस्मिताबाजी व जमातवादांमुळे वातावरण इतके दूषित आणि कलुषित झाले आहे, की शब्दाशब्दाला अडखळायला होते. एखाद्या व्यवसायाचा उल्लेख मराठीत केला तर तो भावना दुखावणारा ठरू शकतो. मग एक तर संस्कृतोद्भव शब्द वापरायचा किंवा इंग्लिश शब्द वापरायचा. मुस्लिमांना सरळ मुस्लीम न म्हणता 'मॉमेडियन' असे दबक्या सुरात का म्हणायचे? 'विशिष्ट समूह' का म्हणायचे? जिच्यावर झुंडशाहीचा हल्ला होतो, ती व्यक्ती भावना दुखावण्याच्याच नव्हे, तर इतर कोणत्याही गुन्हय़ात दोषी होती की नव्हती, हा मुद्दाच गरलागू आहे. कोणत्याही कथित अपराध्याला शासन करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त शासनसंस्थेलाच राहिला पाहिजे. अगदी 'रेडहॅण्ड' सापडलेल्या 'पाकीटमारा'ला जमावाने मारहाण करणे हेदेखील शासनाच्या सार्वभौमतेचा आणि पाकीटमाराच्या नागरी अधिकाराचा भंग करणेच ठरते. 'रेडहॅण्ड' पाकीटमाराचे उदाहरण अशासाठी, की त्याची दंडार्हता तुम्हाला 'साक्षात' असेल, पण तुम्ही दंडाधिकारी नाही आहात, हे कसे विसरता? ज्या क्षणी आपण ग्रस्तता ही गोष्ट 'समूहाला' बहाल करतो, त्या क्षणी आपण झुंडशाहीला अधिमान्यता देत असतो. कायदा असा हवा की, उदाहरणार्थ समजा मला कोणी जन्मावरून 'भटुरडय़ा' म्हटले तर म्हणणाऱ्याला काहीही शिक्षा नको, पण मी जर 'ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या गेल्या' असे म्हटले, तर मला शिक्षा झाली पाहिजे. प्रिव्हेन्शन ऑफ प्रोव्होकेटिव्ह पब्लिक क्लेिमग ऑफ कम्युनल इन्सल्ट अ‍ॅक्ट! याने टवाळखोरी वाढेल की काय अशी चिंता वाटेल, पण मुद्दा आहे तो, टवाळखोरी 'गंभीर'पणे न घ्यायला शिकण्याचा, दुखरेपणा घालवायचा आणि खोडसाळपणाच्या उपद्रवमूल्यातली हवा काढून टाकण्याचा! सर्व विचार सर्वांना पटतील असं नाही, पण मांडणी लाजवाब आहे.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 06/09/2014 - 15:22 नवीन
चांगला विचार आहे. भावना भडकल्या असा दावा करणाऱ्यांच आत टाकले की काम भागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
कलंत्री Mon, 06/09/2014 - 12:09 नवीन
आपण इतरांच्या हातातील बाहुले बनत जात असतो याचे भान ठेवायला हवे. मागच्या १० दिवसामध्ये हजारो गाड्यांच्या काचा फुटल्या, दोन समाजात तेढ निर्माण झाली, काही लोक भयाच्या सावलीत जगत होते याचा विचार करता स्वप्रबोधन हाच खरा मार्ग आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/09/2014 - 12:44 नवीन
@पण यावरून 'समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार' द्यावा काय? कारण एखाद्या समूहातला कोणीही उपटसुंभ, जणू काही तो अख्ख्या समूहाचा प्रतिनिधी असल्याच्या थाटात, एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध रीतसर गुन्हाही दाखल करू शकतो. यातून 'दुखऱ्या समूहभावने'ला, चिथावणीला व झुंडशाहीला वैधता प्राप्त होत नाही काय?>>> काही दिवसापूर्वीच हा अनुभव आला. फेसबुकावर भूत नावाचा एक ग्रुप आहे.तिथे मी भूत बनविण्याची पाककृती नावाचा छोटा लेख टाकला. त्याच्यावर काहि वेळातच परित्राणाय साधूनाम नावाचा एक पेज धारक(आय.डी.) येऊन वाट्टेल तसं आणि वाट्टेल ते बरळू लागला.माझं लेखन मार्मिक आणि प्रबोधनात्मक अंगानी जाणारं होतं.त्यात कोणत्याही विशिष्ट धर्माचा अपमान इत्यादी काहिही नव्हता. तरी त्यानी माझ्यावर जोरदार हल्ला चढवला. कारण त्यात सनातन कल्पनांची मी रेवडी उडवली होती..(किंबहुना ज्यांनी हल्ला केला,तसल्याच दुष्प्रवृतीं विरोधात जाणारी मत त्यात होती..ते एष धर्मः तन्नातन्नः वाले होते! हे निश्चित ) मी ही प्रतिवाद करत होतो. पण अ‍ॅडमिननी त्याला सुनावण्या ऐवजी सदर पोस्टच डिलिट केली(नंतर त्या सर्व कोल्ह्यांन्नी मिळून,तिथे माझ्यासारख्याला खिजवता येइल अशी पोस्ट टाकून बराच राग शमवून घेतला..आणि ती पोस्ट मात्र राहिलीच!) शेवट मीच त्या ग्रुपला त्याच्या एडमिन सह समजून घेतले..आणि त्यांन्ना त्यांच्या भयाण भवितव्यावर सोडून दिले. :)
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 06/09/2014 - 15:07 नवीन
अतिशय दुर्दैवी प्रकार! विद्या विवादाय, धनं मदाय, खलस्य शक्ति: परपीडनाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
पोटे Mon, 06/09/2014 - 13:11 नवीन
बदनामी सगळेच करत असतात. कोण गान्धीन्ची करतो , कोण शिवाजीन्ची. व्यक्ती आनी पaddhat यात फरक आसाटॉ.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 06/09/2014 - 14:58 नवीन
आसाटॉ आसाटॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पोटे
म
माहितगार Mon, 06/09/2014 - 15:38 नवीन
एका खासगी बसवरील दगडफेकीत डोक्याला दगड लागून जखमी झालेली प्रवासी वसंत रूपनर (वय ४०, रा. सांगोला) नावाची व्यक्ती कोमामध्ये गेली आहे असे वृत्त आहे. संदर्भ: १. दैनिक लोक्सत्ता ९ जून २०१४ २. पुणे मिरर Jun 9, 2014, ३. इंडीयन एक्सप्रेस June 9, 2014
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/10/2014 - 12:07 नवीन
ह्यासमस्येला एक जालीम उपाय आहे ... कोणाला महापुरुष म्हणुच नको ... सगळे तुमच्या आमच्या सारखे सामान्यच होते हो *pleasantry*
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 06/10/2014 - 13:11 नवीन
अस्मितांची गळवे आधीच नाजुक होती. आता तर बघायला नको, त्यांना धक्का लावला नाही तरी कधी फुटतील नेम राहिलेला नाही! :(
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 06/10/2014 - 16:45 नवीन
आपली सहनशीलता संपत चालली आहे. यात राजनीती ही असू शकते. पण ज्या देशात चार्वाकला ही ऋषीचा दर्जा मिळाला आहे. तिथे निंदा नालस्ती सहन करण्याची शक्ती का हरवली याचा विचार करणे गरजेचे आहे. कबीरदास यांनी म्हंटलेले आहे, निंदा करणार्याची झोपडी घराचा शेजारी असलेली बरी. त्या वेळी देशात प्रचलित असलेल्या हिंदू मुस्लीम दोन्ही धर्मांच्या आडंबरांचा विरोध केला, त्यांची भाषा ही कडक होती तरी ही त्यांना आपल्या विचारांचा प्रचार करण्याची मुभा होती. दोन्ही धर्मावालंबी त्यांना संत मानतात. कुठल्या ही व्यक्तीचे किंवा धर्माचे आपल्या परीने विश्लेषण करण्याची स्वतंत्रता असली पाहिजे. तालिबान प्रमाणे आपण ही धर्मांधतेने वागू लागलो तर देशाचे तीन तेरा व्हायला उशीर लागणार नाही.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 06/10/2014 - 19:53 नवीन
नुकतंच हे वाचलं - मोदींचा फोटो केवळ इतर नकारात्मक चेहेऱ्यांच्या रांगेत छापला म्हणून चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल. भारतात आणीबाणीत हे सर्रास व्हायचं.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Tue, 06/10/2014 - 20:10 नवीन
ही कारवाई कुणाच्या अख्त्यारीत झाली? राज्य सरकार की केंद्र सरकार? माझ्या माहितीप्रमाणे मोदींनी आणीबाणी घोषित करुन तमाम राज्यांची सूत्रे (अजून तरी) हातात घेतलेली नाहीत. पोलिस खाते हे माझ्या माहितीनुसार राज्य सरकारच्या हाताखाली असते तेव्हा आपल्या उचंबळून येणार्‍या भावनांना काबूत ठेवा. थोडा धीर धरा. लवकरच मोदी भारताचे हुकुमशहा बनतील आणि आपला धर्मांध चेहरा दाखवतील मग तुम्हाला रान मोकळे होईल. चिंता नसावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
आ
आयुर्हित Tue, 06/10/2014 - 20:38 नवीन
राजेश घासकडवी, आपण दिलेले शिर्षक वाचुन कोणालाही त्या विद्ध्यार्थ्यांची/प्राचर्यांची खरोखर किव येइल हो! आपल्या दुर्दैवाने व आपली इच्छा नसतांना मोदी आता पंतप्रधान झाले आहेत. आता तरी घास गोड मानुन खा. किती दिवस दुस्वास करणार? मोदींचा फोटो केवळ इतर नकारात्मक चेहेऱ्यांच्या रांगेत छापला म्हणून नव्हे तर आपली भारताच्या पंतप्रधानंबद्दल संकुचीत मानसिकता व अल्पबुद्धि दाखविल्या बद्दल गुन्हा दाखल झाला आहे. देव आपले व त्या नादान विद्द्यार्थ्यांचेही भले करो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
भ
भृशुंडी Tue, 06/10/2014 - 20:59 नवीन
नाही तर काय? देशाच्या पंतप्रधानाबद्द्ल वाट्टेल ते कसं लिहू शकतं कुणी? स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी म्हणूनच ते मासिक जाळले. साधी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
र
राजेश घासकडवी Wed, 06/11/2014 - 18:55 नवीन
आपली भारताच्या पंतप्रधानंबद्दल संकुचीत मानसिकता व अल्पबुद्धि दाखविल्या बद्दल गुन्हा दाखल झाला आहे.
संकुचित मानसिकता आणि अल्पबुद्धि हा गुन्हा! अईशप्पथ, खरंच अच्छे दिन आले आहेत भारतात! पण आपल्या न्यायव्यवस्थेवर अतिरेकी ताण येईल याची काळजी वाटते. असो, ही बातमी देण्याचं कारण म्हणजे केवळ ऑनलाइनच नव्हे, तर छापील मीडियातही भक्तांच्या भावना किती चटकन दुखावल्या जातात हे लेखाच्या मूळ मुद्द्याशी सुसंगत विधान करायचं होतं. पण असं विधान करणं म्हणजेही न सहन होणारी टीका अनेकांना वाटते, त्याला काय करणार? चालूद्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
ह
हुप्प्या गुरुवार, 06/12/2014 - 04:05 नवीन
मोदींविरुद्ध वादग्रस्त लिहिलेल्या गोष्टीवर बंदी घालणारे त्यांचे भक्त हे आपण कसे ठरवले? केरळातील पोलिसांनी ही कारवाई केली असेल तर ती त्या राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली. केरळात आपले लाडके काँग्रेसचे सरकार आहे. तेव्हा जो दोष द्यायचा तो खुल्या दिलाने काँग्रेसला द्यावा. ह्या लेखावरील बंदीमागे मोदी समर्थक आहेत असे कुठेही दिसत नाही. आपल्या दिव्य (की पूर्वग्रहदूषित) दृष्टीलाच ते दिसतात असे वाटते. त्यामुळे हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे. आणि तो आपण दामटून, खोटेनाटे सांगून लोकांच्या गळी उतरवत आहात ह्याचा राग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/11/2014 - 19:23 नवीन
अरे, अरे ! केरळमध्ये भाजप चे सरकार निवडून आलेसुद्धा !!!??? की आणीबाणी जाहीर करून कायदे बदलून दिल्लीतल्या सरकारने सगळ्या राज्यातील पोलिसदले ताब्यात घेतली ???!!! =)) , =)) , =)) (काल झोपी जाण्यापूर्वीपर्यंत पोलीस हा राज्यांच्या ताब्यातला विषय असल्याचे ऐकून होतो !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
भ
भृशुंडी गुरुवार, 06/12/2014 - 20:14 नवीन
ह्या बातमीनुसार तक्रार भाजपच्या युवा मोर्चाने केली आहे. करणारच! भाजपाच्या मुख्य नेत्यावर टीका करणे सोपे नाही, हे सगळ्यांना समजावण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर कोणीही सोम्यागोम्या उद्या टीका करायचा. भाजपा कार्यकर्यांनी डोळ्यात तेल घालून जागृत राहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विकास गुरुवार, 06/12/2014 - 20:21 नवीन
भारतीय दंड विधानाच्या १५३ वे कलम हे पोलीसांनी लावले. हे कलम "Provoking with the intend to create rioting" साठीचे आहे. भाजपाच्या युवा मोर्चाने (मोदी विरोधकांना अपेक्षित असलेली) दंगल करण्याऐवजी दंगलीसाठी उद्युक्त करण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीबद्दल प्रस्थापित कायद्यानुसार तक्रार केली. त्यात काही गैर दिसत नाही. तुम्हाला नक्की काय चुकीचे वाटते आहे? मला स्वतःला असल्या कारणावरून (कुठल्याही पुस्तक/लेख/विचारांवर) बंदी, अटक अथवा दंगल काहीच घडू नये असे वाटते. पण दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी नाही. दंगली घडवण्याच्या उद्देशानेच हे घडते. त्यामुळे, जो पर्यंत खोडसाळपणे हिंसेला उद्युक्त करणार्‍या घटना घडत असतील तेथे बंदी नाही पण असे खोडसाळपणा करणार्‍यांना अटक जरूर करावी आणि कायद्याप्रमाणे शिक्षा करावी असे नक्की वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी
भ
भृशुंडी गुरुवार, 06/12/2014 - 21:39 नवीन
महाविद्यालयातील एका मासिकात व्यक्त केलेली मते दंगल घडवण्यासाठी असतील, असं वाटत नाही. काहीशी चुकीची तुलना होती- नक्कीच. या इतर अनेक मान्यवरांमध्ये जॉर्ज बुशसाहेबही होते! पण त्या प्रमादासाठीच्या शिक्षेचे प्रमाण म्हणजे अटक (प्राचार्यांनादेखील) काहीच्या काही आहे. तथापि भाजपाच्या अतीउत्साही कार्यकर्त्यांनी दंगल किंवा गेला बाजार शिवसेनेची ट्रेडमार्क असलेली जाळपोळ, दगडफेक केली नाही, आणि निव्वळ तक्रार केली - याबद्दल त्यांचे खरंच अभिनंदन. ह्याच उद्या समजा एखाद्या महाविद्यालयीन हस्तलिखित अनियतकालिकात मोदी-उमा भारती यांची व्यंगचित्रे जर खोमेनी-KKK ह्यांबरोबर आली तर काय होईल ते बघणं ईंटरेस्टिंग असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 06/12/2014 - 23:03 नवीन
म्हणूनच म्हणले की मला बंदी हा प्रकार मान्यच नाही. पण "भावना दुखावल्या" ह्या नावाखाली बंदी घातली जाते तसेच "भावना भडकवल्या" म्हणून कायदा वापरला जाऊ शकतो. तसे बघायचे गेले तर असे कायदे वापरणे हे मला वाटते भाजपावाले डाव्या आणि स्युडो विचारवंतांकडूनच शिकले असावेत. म्हणूनच फार कमी वेळा वापरला गेलेला एक अमेरीकन विचित्र कायदा या असल्या भारतीय वंशांच्या विचारवंतांनी आणि त्यांच्या संघटनांनी मोदींविरुद्ध वापरून त्यांचा व्हिसा रद्द करायला लावला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी
य
यशोधरा Fri, 06/13/2014 - 12:36 नवीन
मोदींविरुद्ध काही केले की लोकशाहीची बूज राखणे असते हे आपल्यासारख्या अनेक मिपा कारकीर्दी पाहिलेल्या मिपाकरास ठाऊक नाही, हे पाहून एक मिपाकर म्हणून... वगैरे वगैरे वगैरे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
वेल्लाभट Fri, 06/13/2014 - 12:30 नवीन
हा भावना हा प्रकार कमालीचा व्हल्नरेबल होत चाललाय आजकाल. आणि कशाला किती महत्व द्यायचं हे कळलंय का कधी आपल्याला? कुणी थोर व्यक्ती म्हणून गेला की `व्हॉट्स इन अ नेम' .... आपण नेम तर सोडाच त्यापाठची बिरुदं नी असल्या गोष्टींनाही डोंगराइतकं महत्व देतो. विचार, कार्य हे बाजूलाच पडतं नेहमी.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 06/13/2014 - 13:13 नवीन
हा भावना हा प्रकार फारच व्हल्नरेबल झालाय आजकाल. कशाने दुखावतील नेम नाही. महत्व कशाला द्यावं कशाला नाही हे तर आपल्याला कळतच नाही.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 06/13/2014 - 15:38 नवीन
सहमत. मला वाटतं एकदा होळीच्या निमित्ताने सगळ्या (सर्व जाती, भाषा, धर्म, विचार, इत्यादीच्या) ह्या "भावना विवश" पब्लीकला एकत्र करावे आणि संध्याकाळी सहा ते सकाळी सहा एक्मेकांविरुद्ध नुसते ठणाणा बोंबलायला लावावे. एकदा का असे ऐकून कान आणि डोके बधीर झाले की मग भावना दुखावणे बंद होईल अशी एक वेडी आशा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
भ
भृशुंडी Fri, 06/13/2014 - 18:11 नवीन
एकदम बराबर बोल्या तुम! भावना दुखावल्या जाण्यावर अक्सीर इलाज!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
इ
इरसाल Wed, 06/18/2014 - 09:00 नवीन
लुव्र संग्राहलयाच्या धर्तीवर एक मोठ्ठे गोडावुन बांधुन त्यात भारतात असणारे सगळे पुतळे/पुतळी, फ्लेक्स हलवावे. आणी ज्यांचे अस्मितांचे गळवे हळवे आहेत त्यांना तिथे जावुन दर्शन घ्यायला लावावे आणी त्यासाठी जबरदस्त तिकीटही लावावे. असेल प्रेम आस्था तर जातील तिथे आणी पुतळा विटंबना वगैरे प्रकार बंद होतील.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा