Welcome to misalpav.com
लेखक: बाबा पाटील | प्रसिद्ध:
गर्भसंस्कार “ संस्कारो हि गुणान्तराधानम् ॥ ” जन्मजात प्रकृतिनुसार आलेल्या गुणांमध्ये चिकित्सेद्वारे केलेल्या संस्कारामुळे अधिक चांगले गुण निर्माण करता येतात. संस्कार प्रकृतिस्थित गुणांमध्ये बदल घडवून आणतात. संस्कार म्हणजे तो बदल जो गुणांमध्ये अधिक उत्तम गुणांचे वर्धन किंवा परिवर्तन करतो. दैनंदिन आयुष्य अगदी व्यस्त असते. बहुतेक सर्व दांपत्यांना एक किंवा दोन अपत्येच असतात. आपण त्यांना त्यांच्या अपत्यांमध्ये उत्तमोत्तम गुण येण्यासाठी प्रत्यत्न करु शकतो. जर आपण मुलांना जन्मानंतर वाढ होताना चांगले संस्कार करुन उत्तम व्यक्तिमत्व बनवू शकतो; तर गर्भावस्थेतही असे संस्कार का केले जाऊ नयेत ?? नक्कीच करता येतात… ह्यास गर्भसंस्कार असे म्हणतात.. त्यांचे महत्व आयुर्वेदाने सध्याच्या धावपळीच्या युगात अधोरेखित केले आहे. हजारो दांपत्यांनी गर्भसंस्काराद्वारे सुदृढ निरोगी व गुणी संतती अनुभवली आहे… अश्या वेळी आपण का बरे ह्याचा फायद घेऊ नये ? आयुर्वेदानुसार गर्भ संस्काराद्वारे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, स्वास्थ्य व गुणवर्धन केले जाते. गर्भसंस्काराचे टप्पे १. बीज संस्कार ( गर्भधारणेपुर्व माता-पित्याची बीजशुद्धी करुन बीजांना शुद्धीकरुन गुणवर्धन करणे ) २. गर्भ संस्कार ( गर्भ धारणा झाल्यावर प्रत्येक महीन्यात गर्भवाढीनुसार गुणवर्धन चिकित्सा करणे ) ३. शिशू संस्कार ( जन्मोत्तर बालकाच्या शारीरिक,बौद्धिक विकासाच्या दृष्टीकोणातून संस्कार करणे ) १. गर्भधारणपुर्व बीज संस्कार १. अ ] गर्भधारणोत्सुक स्री-पुरुषांची पुर्वतयारी १. प्रजननसंस्थेची व प्रजनन विधीची पुर्ण माहीती देणे. २. प्रकृतिपरिक्षण करणे. ३. पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी ४. पंचकर्मोत्तर रसायन वाजीकरण औषधींचा वापर. ५. योग ( प्राणायाम व आसन ) ह्याद्वारे मनाचा शरीरव्यापाराशी समतोल राखणे. ६. गरजेनुसार औषधी चिकित्सा ( जसे अम्लपित्त , मलावष्टम्भ , शिरःशूल , इ. ) ७. आहार मार्गदर्शन ( प्रकृति व पुर्व व्याधीनुसार , प्रत्येक ऋतुनुसार आहार पथ्य-अपथ्य मार्गदर्शन ) ८. दिनचर्या मार्गदर्शन ( प्रकृती व व्याधीनुसार व व्यवसाय विचारात घेऊन दिनचर्येचे मार्गदर्शन ) १. ब ] गर्भधारण संस्कार १. गर्भधारणार्थे नैष्ठिकी ब्रम्हचर्य व मैथुन विधी ( गर्भधारणापुर्वी पाळावयाचे १ मासिक ब्रम्हचर्य व गर्भधारणार्थ करावयाचा मैथुन विधी – ऋतुनुसार काळ , वेळ , मासिक पाळीनुसार दिवस ,इ.) २. गर्भधारण पुर्व स्री पुरुषांची गर्भासाठी मानस-शारीर-बौद्धिक गुणांचे आवाहन करणे. २. गर्भधारणाकालीन संस्कार ( गर्भसंस्कार ) गर्भधारणेपासून प्रसवापर्यंत म्हणजे जन्मापर्यंत साधारण ९ महिन्यांचे नवमास परिचर्या + संस्कार १. नवमास गर्भिणी परिचर्या ( सगर्भ मातेची काळजी ) २. गर्भवाढीच्या दृष्टीकोनातून मातेसाठी मासानुमासिक आहार ३. दिनचर्या ( पथ्य-अपथ्य ) ४. मानसिक व बौद्धिक स्वास्थ्यकर स्तोत्र मंत्र आदि चिकित्सा ५. योग ( प्राणायाम + आसने ) व ध्यान-धारणा ६. रंग चिकित्सा व गंध चिकित्सा ७. सौंदर्यचिकित्सा ह्यात काय काय केले जाते ? १. प्रत्येक महिन्यातील गर्भाची तपासणी बाळाची वाढ / परिक्षण / औषधी २. प्रत्येक महिन्यातील मातेची तपासणी व्याधी चिकित्सा ३. माता/पिता-गर्भ संवाद विधी ४. संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ) ५. प्रसव प्रक्रियेची माहीती. प्राकृत प्रसव व प्रसवकालीन व्याधी व चिकित्सा ६. प्रसवासाठी मानसिक व शारीरिक तयारी करणे. ७. प्रसव कालीन परिचर्या. ३. प्रसवोत्तर संस्कार ( माता व शिशू संस्कार ) १. शिशू संगोपन ( अभ्यंग – स्नान – धूपन - वस्र – क्रिडा – इ. ) २. शिशू षडमास परिचर्या ( स्तन्यपान विधी , निद्रा , बाळगुटी इ. ) ३. षडमासोत्तर बाल-आहार विधी ( क्षीरान्नाद व अन्नाद अवस्था ) ४. मातेस षडमास सूतिका परिचर्या (अभ्यंग धूपन स्नान पट्टबंधन औषधी आहार इ.) ५. शिशू संस्कार ( नालकर्तन स्वर्णप्राशन कर्णवेधन नामकरण इ. डॉ.प्रशांत व डॉ.प्रिया दौंडकर-पाटील. http://garbhasanskarpune.com/ & http://ayurvedandpanchakarma.com/
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास
अच्छा म्हणजे गर्भसंस्कार डॉक्टर लोकांसाठी आहे तर!! बाकी संक्षीनी म्हटल्याप्रमाणे यात फक्त ट्रेलर ( टेबल ऑफ कंटेंट)दिसला.. तपशील नाही..
करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो
मानसिक शांतीसाठी अशा गोष्टींची काडीचीही गरज वाटत नसल्यानेच कुठेही देवाचा संबंध जोडल्याने ते सर्व बाळ्बोध वाटते..

गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.. एकंदरीत घरात लहान मुल आले की घर बदलुन जाते.. ती प्रकिया सुरु होण्याची ही नांदी असावी.. अवांतर :- आमचा एक (डोक्यावर पडलेला) मित्र म्हणाला होता "बायको प्रेग्नंट झाली की तिला ९ महिने सी प्रोग्रामिंग शिकवणार आहे म्हणजे त्या बाळाचं "लॉजिक" चांगलं होइल"..!!

गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.
अगदी अगदी. आयुष्याची पहिली पाच सहा वर्ष बाळाच्या जडणघडणीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असतात.

माहितीपूर्ण लेख आहे. यात दिलेल्या बर्‍याच गोष्टी बाळ आणि त्याचे आई-बाबा यांना फायदेशीर ठरणार्‍याच दिसत आहेत. काहीजणांना गर्भसंस्कार या नावाची अ‍ॅलर्जी असावी. "प्रेगाकेअर" इ. काही नाव असते तर त्यांना कदाचित चालले असते! :P

संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ), याचासारखंच काही वय वाढलेल्या लोकांसाठी आहे का हो? माणसानी जरा शांतपणे शहाण्यासारखं वागावं, उगाच ज्याच्या त्याच्या अंगावर धावून जाउ नये, याच्यासाठी एखादा संगितिपचार असेल तर क्रुपया पाठवून द्या. आपल्या संस्थळाच्या पहिल्या पानावर चढवून ठेवते. किंवा मिपा ओपन असेल तेवढा वेळ आपोआप वाजेल असं काहीतरी करु.... हल्ली पित्त लई वाढतय लोकांचे.

+१००. जो उठतो तो शिंगे रोखून दुसर्‍याच्या अंगावरच येतो.