भारत वि. इंग्लंड क्रिकेट मालिका - २०१४
भारत व इंग्लंड यांच्यात इंग्लंड येथे २६ जून २०१४ ते ७ सप्टेंबर या दरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
या मालिकेत भारत इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाविरूद्ध ५ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने व एक २० षटकांचा सामना खेळेल. तसेच स्थानिक संघांविरूद्ध दोन ३-दिवसीय सामने व १ एकदिवसीय सामना आयोजित केलेला आहे.
भारत २६ जून पासून लिस्टरशायर विरूद्ध ३ दिवसांच्या सामन्याने मालिकेचा शुभारंभ करेल व ७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या २० षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्याने मालिकेची सांगता होईल. एकूण ७४ दिवसांचा प्रदीर्घ दौरा आहे.
प्रदीर्घ कालावधीनंतर भारत ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यापूर्वी भारत ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका १९९१-९२ मध्ये खेळला होता. त्यानंतर बहुतेक सर्व मालिका २, ३ किंवा जास्तीत जास्त ४ कसोटींच्या होत्या.
भारताचा कसोटी संघ असा आहे.
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), वरूण एरॉन, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, गौतम गंभीर, रविंद्र जडेजा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईश्वर पांडे, पंकज सिंग, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, ईशांत शर्मा, रोहीत शर्मा, मुरली विजय
दौर्याचे वेळापत्रक
सराव सामने
२६ जून - २८ जून वि. लिस्टरशायर
१ जुलै - ३ जुलै वि. डर्बीशायर
कसोटी सामने (सर्व सामने भा.प्र.वे. नुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होतील)
पहिला कसोटी सामना : ९ जुलै - १३ जुलै (स्थळ - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम)
दुसरा कसोटी सामना : १७ जुलै - २१ जुलै (स्थळ - लॉर्ड्स, लंडन)
तिसरा कसोटी सामना : २७ जुलै - ३१ जुलै (स्थळ - रोझ बाऊल, सदम्पटन)
चौथा कसोटी सामना : ७ ऑगस्ट - ११ ऑगस्ट (स्थळ - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर)
पाचवा कसोटी सामना : १५ ऑगस्ट - १९ ऑगस्ट (स्थळ - केनिंग्टन ओव्हल, लंडन)
एकदिवसीय सराव सामना
२२ ऑगस्ट - वि. मिडलसेक्स
५० षटकांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (सर्व सामने भा.प्र.वे. नुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होतील)
(१) २५ ऑगस्ट (ब्रिस्टल)
(२) २७ ऑगस्ट (कार्डिफ)
(३) ३० ऑगस्ट (ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम)
(३) ०२ सप्टेंबर (एजबॅस्टन, बर्मिंगहॅम)
(३) ०५ सप्टेंबर (हेडिंग्ले, लीड्स)
आंतरराष्ट्रीय ट-२० सामना (भा.प्र.वे. नुसार संध्याकाळी ७:३० वाजता)
(१) ०७ सप्टेंबर (एजबॅस्टन, बर्मिंगहॅम)
भारतीय संघात एकूण ६ मध्यमगती गोलंदाज आहेत (वरूण एरॉन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, पंकज सिंग, ईश्वर पांडे, ईशांत शर्मा). या व्यतिरिक्त स्टुअर्ट बिन्नी हा देखील मध्यमगती गोलंदाजी टाकतो. अश्विन व जडेजा हे दोनच फिरकी गोलंदाज संघात आहेत. रोहीत शर्मा देखील कामचलाऊ फिरकी गोलंदाजी करतो आणि विराट कोहलीच्या गोलंदाजीत काहीही दम नसला तरी धोनी त्याला प्रत्येक सामन्यात काही षटके तरी गोलंदाजी करायला लावतो. स्वतः धोनीसुद्धा रनअप् घेऊन गोलंदाजी टाकू शकतो.
संघात धोनीव्यतिरिक्त वृद्धिमान साहा व अजिंक्य रहाणे असे दोन यष्टीरक्षक आहेत. जडेजा व काही प्रमाणात अश्विन हे अष्टपैलू खेळाडू आहेत. उरलेले सर्व निखळ फलंदाज आहेत.
गौतम गंभीरचे पुनरागमन झाले आहे. परंतु मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी इ. ची निवड धक्कादायक आहे. मुरली विजय परदेशात फारसा यशस्वी ठरलेला नाही. रोहीत शर्मा देखील परदेशात फारसा यशस्वी नाही. ईशांत शर्मा बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो. परंतु नुकत्याच संपलेल्या न्यूझीलँड विरूद्धच्या मालिकेत त्याने परदेशात २ वेळा एका डावात ६ बळी मिळविल्याने त्याची वर्णी लागली असावी. महाराष्ट्राच्या केदार जाधवने रणजी स्पर्धेत धावांचा रतीब ओतला होता. पण त्याला कसोटी संघात न घेता नुकत्याच संपलेल्या बांगलादेश विरूद्ध झालेल्या एकदिवसीय संघात घेतले व एकही सामन्यात न खेळविता परत आणले. मुरली विजयऐवजी तो चालला असता. तसेच अजून एखादा फिरकी गोलंदाज हवा होता (अमित मिश्रा, हरभजन सिंग किंवा अक्षर पटेल). अश्विन हा भारतीय खेळपट्ट्यांवरचा वाघ आहे. त्याने आतापर्यंत मिळविलेल्या बळींपैकी ८० टक्क्यांहून अधिक बळी भारतात मिळविलेले आहेत. परदेशात तो चालत नाही. नुकत्याच संपलेल्या न्यूझीलँडमधील मालिकेत ५ एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त २ बळी मिळविले होते. कसोटी सामन्यात देखील तो निष्प्रभ ठरला होता. एकंदरीत मुरली विजय, शिखर धवन, रोहीत शर्मा, अश्विन, जडेजा इ. मंडळी भारताबाहेर अनेकवेळा निष्प्रभ ठरलेली आहेत. मध्यमगती गोलंदाजात विनयकुमारला संधी हवी होती. पण त्याला, मोहीत शर्माला व उमेश यादवला संधी मिळालेली नाही. विनयकुमारने रणजी स्पर्धेत त्याने चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्याऐवजी तब्बल ५ महिने क्रिकेट न खेळलेल्या ईशांत शर्माला घेऊन निवडसमितीने काय मिळविले खुदा जाने.
कसोटीत साधारणपणे खालील संघ असेल असे वाटते.
गंभीर, धवन/मुरली विजय, पुजारा, कोहली, रहाणे, धोनी, जडेजा, अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरूण एरॉन्/ईशांत शर्मा.
इंग्लंड सध्या वाईट अवस्थेतून जात आहे. ६ महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मायदेशात ५-० असा सपाटून मार दिला. त्यानंतर न्यूझीलँड मध्ये इंग्लंडला न्यूझीलँडला हरविण्यात यश आले नाही. कालच संपलेल्या मायदेशातील श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत श्रीलंकेने इंग्लंडला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-२ व कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी मात दिली. इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा फारच वाईट ठरला. ०-५ असा मानहानिकारक पराभव झाला. पण त्याबरोबर अपयशामुळे व नैराश्यामुळे जोनाथन ट्रॉट दौरा अर्धवट सोडून परतला, तर ग्रॅमी स्वॅनने अकाली निवृत्ती घेतली. कुक गेल्या ९ कसोटी सामन्यात बहुतेक डावात अपयशी ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियातील अपयशामुळे केव्हिन पीटरसनला डच्चू देण्यात आला. अँडरसन व ब्रॉडला मायदेशी खेळत असूनही गोलंदाजीत फारसे काही करून दाखविता आलेले नाही. सध्या फक्त इयान बेल व काही प्रमाणात जो रूट सातत्य टिकवून आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरविण्याची भारताला सुवर्णसंधी आहे.
२०११ व २०१२ च्या कटू आठवणी अजून ताज्या आहेत. इंग्लंडमधील २०११ च्या मालिकेत भारत सर्व म्हणजे ४ कसोटी सामने हरला होता. ५ एकदिवसीय सामन्यांपैकी भारत ३ सामने हरला होता, एक बरोबरीत सुटला होता व एक पावसामुळे रद्द झाला होता. त्या संघातील फारच थोडे खेळाडू आताच्या संघात आहेत. धोनी, अश्विन, गंभीर, जडेजा, कोहली, ईशांत शर्मा वगळता इतर खेळाडू आताच्या संघात नाहीत. त्यानंतर २०१२ मधील भारतातील मालिकेत इंग्लंडने भारताला २-१ अशी मात दिली होती. सध्या भारताच्या फलंदाजीची मदार फक्त पुजारा, कोहली व काही प्रमाणात रहाणे यांच्यावर आहे. बाकीच्यांची अजिबात खात्री नाही. गोलंदाजीत फक्त भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी हेच काहीतरी करून दाखवतील. इतर फारसे प्रभावी पडतील असे वाटत नाही. फिरकी गोलंदाजांचा तर आनंदच आहे.
या कटू आठवणींच्या पार्श्वभूमीवर २०१४ मध्ये भारत विजयी व्हावा हीच अपेक्षा आणि सदिच्छा!
💬 प्रतिसाद
(129)
ए
एस
Wed, 06/25/2014 - 09:52
नवीन
बीसीसीआयच्या संघाला हरवून पुन्हा फॉर्मात येण्याची इंग्लंडच्या संघाला सुवर्णसंधी आहे. :-|
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 06/25/2014 - 10:21
नवीन
कुक नक्की फॉर्ममध्ये येणार. ओपनिंगला विजय/धवन ऐवजी शर्माही चालेल. गंभीरही फार दिवे लावेल असं वाटत नाही. पण वर म्हटलं तसं, ब्याटिंगची भिस्त ३-४-५, कोहलीम पुजारा आणि रहाणेवर आहे. नॉटिंगहममध्ये पहिली मॅच आहे हे पाहून झहीरची आठवण झाली. बॉलिंग मध्ये झहीर असायला पाहिजे होता. झहीर, भुवनेश्वर आणि शर्मा.
प्रॅक्टिस म्याचेस आहेत २ ते चांगलं आहे. मागच्या वेळेला हार झाल्याचं कमी प्रॅक्टीस मॅचेस हे एक कारण होतं.
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 08/18/2014 - 15:22
नवीन
चला, बीसीसीआयच्या संघाला पुनरेकवार हरल्याबद्दल किंचित सहानुभूती आणि इंग्लंडच्या संघाचं विजयाबद्दल जोरदार अभिनंदन. आगामी भारत दौर्यातही इंग्लंडला अशाच सुवर्णसंधी पुन्हापुन्हा देत रहा बरं का रे.
(इथून पुढचं जाहीर लिहिण्यासारखं नसल्याने फक्त मनातल्या मनात. कसंय, तुम्हांला जरी लाजीरवाण्या पद्धतीनं हरल्याबद्दल शब्दशः लाज वाटत नसली तरी आम्हांला अपशब्द जाहीरपणे वापरायची लोकलाज अजूनही वाटते.)
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 06/25/2014 - 10:40
नवीन
अश्विन आणि जडेजा फुलटाईम गोलंदाज नाहीयेत.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 06/25/2014 - 10:48
नवीन
याऐवजी मी ईशांत शर्मा भारतात बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो. असे म्हणेन.
मागच्या ईग्लंड दौर्यावर (तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण असताना आपण सपाटुन हारलो होतो तो दौरा) ईशांतने चांगली गोलंदाजी केली होती.
बाकी कालची कसोटी थरारक झाली. अंडरसन एक चेंडु शिल्लक असताना आउट झाला. आणि हीच स्थिती श्रीलंकेची पहील्या कसोटीला होती आणि त्यांनी सामना अनिर्णयीत ठेवण्यात यश मिळवले.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 06/25/2014 - 13:21
नवीन
>>> बाकी कालची कसोटी थरारक झाली.
+१
जबरदस्त कसोटी झाली. इंग्लंडने पराभव टाळण्याचा जीवापाड प्रयत्न करूनसुद्धा कसोटीतला फक्त १ चेंडू शिल्लक असताना त्यांना हार पत्करावी लागली. पहिल्या डावात १०८ धावांनी मागे असताना सुद्धा श्रीलंकेने झुंझून विजय मिळविला.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 06/25/2014 - 11:07
नवीन
फार फार दिवसांनी क्रिकेटवर मोठा लेख आला.. प्रत्येक पिढीचे आवडते हीरो असतात.. ते रीटायर झाले की आवड कमी होते .. तसाच कहीसा झाला आहे. सध्याच्या टीम मधे अजून तरी फार इंटरेस्ट नाहिये..
बादवे ते ष्टकार नावाचा पाक्षिक मिळता का अजून ?
- Log in or register to post comments
प
पामर
Wed, 06/25/2014 - 12:42
नवीन
ह्याच दौ-यात अजुन एक आकर्षण म्हणजे ५ जुलै रोजी क्रिकेट पंढरी-लॉर्ड्सला तब्बल २०० वर्ष पुर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने 'मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC)वि.Rest of the world XI' असा एक प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला आहे. MCC च्या संघात -सचिन तेंडुलकर (कर्णधार),ब्रायन लारा, राहुल द्रवीड,ब्रेट ली,शिवनारायण चंद्रपॉल व इतर खेळाडु आहेत तर उर्वरीत जगाच्या संघात- शेन वॉर्न (कर्णधार),अॅडम गिलख्रिस्ट, मुथैया मुरलीधरन,शाहीद आफ्रिदी,केवीन पिटर्सन ,युवराज सिंग वगैरे खेळाडु आहेत.भारतात स्टार चॅनल वर हा सामना दा़खवणार आहेत. *clapping*
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 06/25/2014 - 13:04
नवीन
मेलबर्न असा उच्चार आहे का? मला वाटायचे मेरिलबोन (Marylebone)!!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 06/25/2014 - 13:34
नवीन
भारताविरूद्धच्या मालिकेसाठी बहुतेक मधूसुदन पानसरेला (आणि रवि बोपाराला) पाचारण करतील असं वाटतंय. केव्हिन पीटरसनलाही परत बोलावतील का? (तो परत यावा अशी इच्छा आहे)
- Log in or register to post comments
फ
फारएन्ड
गुरुवार, 06/26/2014 - 06:06
नवीन
झहीर ला का डच्चू दिला काही कल्पना आहे का? रोहित शर्मा ला मागच्या वेळेस झेपले नव्हते इंग्लंड. सध्या फॉर्मात असताना काय करतो बघू. स्विंग सपोर्ट असताना मुनाफ ला ही संधी द्यायला हवी होती.
सध्या इरफान पठाण कोठे गायब आहे?
गंभीर ला तोंडदेखले घेतले असावे असे वाटते. धोनीशी त्याचे बरे आहे असे वाटत नाही. "खुद धोनी" सोडला तर गांगुलीच्या काळात आलेले बरेच लोक आता बाहेर आहेत. गंभीर शेवटचा बहुधा.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 06/26/2014 - 08:58
नवीन
>>> झहीर ला का डच्चू दिला काही कल्पना आहे का?
झहीर हा २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे ब्रह्मास्त्र होता. त्याने ९ सामन्यात २१ बळी घेऊन जवळपास प्रत्येक सामन्यात भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला होता. आता तो संघात नाही त्याची ३ कारणे आहेत.
१) झहीर २०११ च्या विश्वचषकानंतर त्याचा फॉर्म हरपला आहे. आजतगायत त्याला फॉर्म परत मिळविता आलेला नाही. ज्या मोजक्याच सामन्यात तो खेळला, त्यात तो निष्प्रभ ठरला. आयपीएल मध्ये सुद्धा तो चमकलेला नाही.
२) त्याला तंदुरूस्तीची तीव्र समस्या आहे. १-२ सलग सामने खेळले की तो मोडतो आणि नंतर ५-६ महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असतो.
३) तंदुरूस्तीमुळे त्याला पुरेसा सराव मिळत नाही व त्यामुळे तो ज्या सामन्यात खेळतो त्यात चमकत नाही.
>>> रोहित शर्मा ला मागच्या वेळेस झेपले नव्हते इंग्लंड. सध्या फॉर्मात असताना काय करतो बघू.
रोहीत शर्मा २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगला खेळला होता. परंतु एकंदरीत तो अपवाद वगळता परदेशात तो बहुतेक वेळा अपयशी ठरलेला आहे. तो, अश्विन आणि ईशांत शर्मा हे धोनीचे लाडके असावेत असं वाटतंय, कारण अनेकवेळा अपयशी ठरल्यानंतर ते परत परत संघात दिसतात.
>>> स्विंग सपोर्ट असताना मुनाफ ला ही संधी द्यायला हवी होती.
मुनाफ २०११ च्या विश्वचषकानंतर पूर्णपणे निष्प्रभ आहे. त्याला नाही घेतलं तेच बरं केलं.
>>>> सध्या इरफान पठाण कोठे गायब आहे?
इरफान पठाणला गेल्या ३-४ वर्षात अजिबात प्रभाव पाडता आलेला नाही. २०१२ मध्ये बांगला देशात झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत बांगला देश विरूध्द त्याने व प्रवीणकुमारने अत्यंत सुमार गोलंदाजी करून तब्बल २९० धावांचे लक्ष्य बांगलाला सहज पार करून दिले होते.
>>> गंभीर ला तोंडदेखले घेतले असावे असे वाटते. धोनीशी त्याचे बरे आहे असे वाटत नाही. "खुद धोनी" सोडला तर गांगुलीच्या काळात आलेले बरेच लोक आता बाहेर आहेत. गंभीर शेवटचा बहुधा.
सहमत! धोनीला आपल्या कर्णधारपदाच्या सुरूवातीच्या कालखंडात वरीष्ठ खेळाडूंची सतत भीति वाटायची. आपण थोडेसे अपयशी ठरलो तर आपल्याकडून कर्णधारपद हिसकावले जाऊन कोणत्यातरी वरीष्ठ खेळाडूच्या हातात नेतृत्वाची धुरा जाईल या दडपणामुळे त्याने वरीष्ठ खेळाडूंना सतत बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. २००७ च्या ट-२० च्या विश्वचषकात सुद्धा त्याने वरीष्ठ खेळाडूंना ने घेण्याच्या अटीवर कर्णधारपद स्वीकारले होते. गंभीर, सेहवाग, सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, झहीर, हरभजन आणि कुंबळे या वरीष्ठ खेळाडूंपैकी ५ जण निवृत्त झाले असून उरलेले ४ जण अजून खेळत आहेत. त्यापैकी तिघेजण संघात नाहीत. त्यामुळे धोनीला फारशी भीति नाही.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 06/26/2014 - 13:09
नवीन
पठाण बद्दल सहमत. प्रवीण कुमार चालला असता. मागच्या दौर्यात जीव तोडून बोलिंग केली होती.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 06/26/2014 - 07:47
नवीन
पण ते चेन्नई सुपर किंग मध्ये आहेत हे जास्त महत्वाचे निवडीसाठी.मोहीत शर्माला पण संधी त्यामुळेच मिळाली.
खरे खोटे "श्री" जाणे!
आप्ण गुमान पहाणे!
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 06/26/2014 - 11:38
नवीन
म्हटले, की जून ९६ चा "तो" दौरा आठवतो...
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 06/26/2014 - 19:03
नवीन
सुरूवात तर चांगली झाली. आजच्या पहिल्याच सराव सामन्यात पहिल्या दिवशी भारताने ४० षटकांत ४ बाद ३३३ अशी चांगली कामगिरी केली. त्यातल्या मुरली विजय (२०) व कोहली (२९) वगळता इतरांनी चांगल्या धावा केल्या. गंभीर, धवन व पुजाराने अर्धशतक केले.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 06/29/2014 - 17:30
नवीन
इथे येऊन शिव्या घालायला बरं आहे! *biggrin*
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 06/29/2014 - 17:40
नवीन
पहिला सराव सामना पावसामुळे फक्त २ दिवस चालला. भारतीय फलंदाजांनी बर्यापैकी फलंदाजी केली. गोलंदाजांनी मात्र सपाटून मार खाल्ला. भारतीय गोलंदाजांना दिवसभरात फक्त ३ फलंदाज बाद करता आले. असो. या सामन्याच्या निमित्ताने थोडा सराव तरी झाला. अजून एक सराव सामना बाकी आहे. नंतर ९ जुलैला पहिला कसोटी सामना सुरू होईल. सध्या विश्वचषक फूटबॉल फिव्हरमध्ये आणि त्याचवेळी विम्बल्डन सुरू असताना क्रिकेट थोडे निस्तेज झाले आहे. विंडीज वि किवीज आणि इंग्लंड वि. लंका या सामन्यांच्या बातम्या सुद्धा वृत्तपत्रात येत नव्हत्या. साधारणपणे १५ जुलैनंतर क्रिकेटला परत चांगले दिवस येतील.
- Log in or register to post comments
अ
अनुज०९९०
Mon, 06/30/2014 - 08:12
नवीन
This is very useful information shared here. I am really thankful for this.
http://www.99th.co.in
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 07/02/2014 - 09:13
नवीन
कालपासून भारताचा दुसरा सराव सामना डर्बीशायर विरूद्ध सुरू झाला. आधीच्या सामन्याप्रमाणेच भारतीय गोलंदाजांची चांगलीच पिटाई झाली. भारतीय गोलंदाजांना दिवसभरात फक्त ५ फलंदाज बाद करता आले. दोन्ही सामन्यात मिळून एकूण २ दिवसांच्या गोलंदाजीत भारतीय गोलंदाजांना जवळपास ६६५ धावांच्या मोबदल्यात फक्त ८ गडी बाद करता आले आहेत. एकंदरीत गोलंदाजांचे या दौर्यावर हाल होतील असं वाटतंय.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 07/04/2014 - 09:16
नवीन
दुसरा सराव सामना भारताने जिंकला. पहिल्या दोन्ही सराव सामन्यात भारताची फलंदाजी बर्यापैकी झाली. पण गोलंदाजांनी बराच मार खाल्ला. स्थानिक संघाविरूद्ध त्यांना फारसे बळी मिळविता आले नाहीत. अर्थात हे नेहमीचंच रडगांणं आहे. आता ९ जुलैपासून पहिला कसोटी सामना सुरू होत आहे. बघूया काय होतंय ते. सलामीला मुरली विजयला न घेता गंभीरला घेतील असं वाटतंय. रहाणे देखील आत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित रोहीत शर्माला बाहेर बसावं लागेल. गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, जडेजा आणि ईशांत शर्मा नक्की आत येतील.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 07/05/2014 - 11:55
नवीन
तो १४/१६ च्या टीममधे कसा काय येतो परत परत??? मग ११ त आला तर खरेतर आश्चर्याच्या धक्क्याने आम्ही मरायलाच पाहिजे!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 07/06/2014 - 10:37
नवीन
कितीही खराब खेळले तरी शर्मा बंधू (रोहीत आणि ईशांत) हे कायम १६ जणांच्या चमूत असतात. रोहीत शर्माला २०१२ मध्ये एकूण १४ एकदिवसीय सामन्यात खेळविले होते. त्यात त्याने एकूण १६८ धावा केल्या होत्या. त्यापैकी एका सामन्यात ८३ व उर्वरीत १३ सामन्यात एकूण ८५ धावा होत्या. तरीसुद्धा त्याला संघातून एकदाही वगळले नव्हते. श्रीलंकेत त्याच वर्षी झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण १४ धावा केल्या होत्या (सर्वाधिक ८). इतका खराब खेळ करूनसुद्धा त्याच मालिकेतल्या ट-२० सामन्यात त्याला निवडले होते. त्याच्यामुळे मागील ३-४ वर्षे रहाणे संघात असून त्याला फारशी संधी मिळालेली नाही. तीच गोष्ट ईशांत शर्माची. अत्यंत खराब गोलंदाजी करूनसुद्धा तो परत परत खेळताना दिसतो. निवडसमितीत किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळात किंवा दोन्हीकडे त्यांचा कोणीतरी प्रभावशाली गॉडफादर असावा.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Fri, 07/04/2014 - 09:41
नवीन
अवांतर : उद्या MCC 11 vs Rest of world असा एक दिवसीय सामना असुन सचिन, द्रविड, शेन वॉर्न, सेह्वाग, आफिदी, लारा वगैरे दिग्गज त्यात खेळणार आहेत.
संघांची लिंक
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 07/04/2014 - 12:10
नवीन
कुठल्या चॅनेलवर थेट प्रक्षेपण आहे का?
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Fri, 07/04/2014 - 13:42
नवीन
स्टार स्पोर्ट्स १/२/३ वर असावे.
जाहीरात त्याच्यावरच पाहीली होती.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 07/04/2014 - 17:11
नवीन
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व भारतातील क्रिकेट मालिका बहुतेकवेळा 'स्टार' वर असतात. वेस्ट इंडिज, दुबई/शारजा, द. आफ्रिका व न्यूझीलॅंड येथील मालिका टेन क्रिकेट किंवा सोनी सिक्सवर असतात. पूर्वी या मालिका 'निओ'वर असायच्या. पण आता 'निओ' क्रिकेट प्रक्षेपणातून बाहेर पडलेलं दिसतंय आणि त्यांची जागा सोनी सिक्सने घेतलेली दिसतेय.
- Log in or register to post comments
स
स्पार्टाकस
Fri, 07/04/2014 - 19:14
नवीन
आफ्रीदीसारखा वाचाळ आणि टिनपाट खेळाडू दिग्गज कधीपासून झाला ??
केवळ अंदाधुंद बॅटींग (जीदेखील गेली काही वर्षे चालत नाही) आणि कामचलाऊ बॉलींग करणारा महान झाला?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 07/05/2014 - 09:24
नवीन
+१
आफ्रिदीप्रमाणेच विश्व संघात टिनो बेस्ट, सिड्ल्, तमीम इक्बाल इ. "महान आणि दिग्गज" खेळाडू आहेत.
तर एम सी सी च्या संघात उमर गुल, शॉन टेट, व्हिटोरी, एरॉन फिंच, रीड असे "महान आणि दिग्गज" खेळाडू आहेत.
- Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक
Sat, 07/05/2014 - 14:18
नवीन
हरो किंवा जिंको, पण संध्याकाळी घरी आल्यावर ईंग्लंडच्या वातावरणातील कसोटी सामने बघणे नेत्रसुखद अनुभव असतो.
फक्त दादा, सचिन, द्रविड आणि हो, वीरूही नसल्याने ती मजा यंदा कितपत येईल हा प्रश्नच आहे.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Wed, 07/09/2014 - 12:54
नवीन
पहिली कसोटी सुरु झालीय.. बिन्नीला संधी मिळालीय..
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Wed, 07/09/2014 - 12:55
नवीन
पहिली कसोटी सुरु झालीय.. बिन्नीला संधी मिळालीय..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 07/09/2014 - 17:17
नवीन
पहिल्या कसोटीत आतापर्यंत बरी फलंदाजी झाली आहे. कोहली व धवन अपयशी ठरले, तर पुजारा आणि रहाणे स्थिरावल्यावर बाद झाले. एकटा मुरली विजय किल्ला लढवतोय. भारताने किमान ४०० धावा करायला हव्यात.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
गुरुवार, 07/10/2014 - 14:10
नवीन
दुसरा दिवस, जेवण ३४२/५.
चांगल्या धावा झाल्या आहेत. अजुन किमान एक सेशन तरी भारताने खेळायला पाहीजे म्हणजे सामन्यावर पकड घेण्याची संधी मिळेल.
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
गुरुवार, 07/10/2014 - 14:32
नवीन
धोनी उपखंडाबाहेरचं पहिलं शतक मारेल का याची उत्सुकता आहे... काय ते कळेलच पुढच्याच सेशनमधे. त्यानंतर (किंवा धोनी बाद झाला तर) डाव घोषित करतील बहुतेक.
- Log in or register to post comments
स
स्पार्टाकस
गुरुवार, 07/10/2014 - 20:15
नवीन
भुवनेश्वर आणि शमीने इंग्लंडवर बॅटींगमध्ये गिलेस्पी-मॅकग्राथ प्रयोग केला आहे!
(गिलेस्पी आणि मॅकग्राथ यांनी न्यूझीलंडविरुध्द १००+ ची पार्टनरशीप केली होती. मॅकग्राथने चक्क ६३ रन्स काढल्या होत्या!)
अॅलीस्टर कूकला पुन्हा एकदा सस्त्यात गाशा गुंडाळावा लागला आहे. जाडेजा कदाचीत धोकादायक ठरु शकेल. एकून टेस्ट बोअरींग होणार नाही अशी अपेक्षा आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 07/11/2014 - 06:28
नवीन
भारताला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. आज इंग्लंडच्या उर्वरीत फलंदाजांना बाद करून किमान १५० धावांची भक्कम आघाडी घेतली पाहिजे. इयान बेल (आणि कदाचित मॅट प्रॉयर) हाच मोठा अडथळा आहे. उर्वरीत फलंदाज नवे आहेत.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Fri, 07/11/2014 - 07:16
नवीन
टू अर्ली टु से थिस.. खेळपट्टी खूपच निर्जीव आहे. आणि भारतीय गोलंदाजीची अवस्था फार काही चांगली नाहिये.. हाय स्कोरींग ड्रॉची शक्यता जास्त आहे..
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Sat, 07/12/2014 - 14:09
नवीन
दोन्ही संघांच्या तळातल्या फलंदाजांनी (अर्थात रूट काही तळातला फलंदाज नाही म्हणा) जो खेळ केला, त्यावरून क्रिकेट मध्ये किती अनिश्चितता असते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 07/12/2014 - 17:23
नवीन
भारतीय गोलंदाज विशेषत: इशांत शर्माने आज पुन्हा एकदा मठ्ठ बैलासारखी गोलंदाजी केली. इंद्रसेन (अॅण्डर्सन) मागील ३-४ डावात उसळत्या चेंडूवर बाद झाला होता. २९८/९ असताना तो खेळायला आल्यावर त्याला बाद करण्यासाठी शर्मा व इतरांनी त्याला सातत्याने फक्त उसळते चेंडू टाकले. पडणारा प्रत्येक चेंडू हा उसळताच असेल हे गृहीत धरून अशा चेंडूचा सामना करण्यासाठी तो आधीच तयार असायचा आणि असे सर्व चेंडू त्याने सहजगत्या खेळून काढले व भरपूर धावा करून गोलंदाजांना रडविले. उसळता चेंडू अनपेक्षितरित्या अंगावर आला तर बाद होण्याची शक्यता असते. पण येणारा प्रत्येक चेंडू हा छाती किंवा खांद्यापर्यंत उसळणार आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा असे चेंडू खेळण्याच्या तयारीनेच फलंदाज उभा असतो. इंद्रसेनला सातत्याने उसळते चेंडू टाकण्याऐवजी यॉर्कर, स्लोअर वन, आत/बाहेर जाणारे चेंडू अशी विविधता आणली असती तर तो लवकर बाद झाला असतो.
असो. भारताने सुरवातीला २०२/७ व नंतर २९८/९ अशा उत्तम परिस्थितीतून मोठी आघाडी घ्यायची संधी आपल्या करंटेपणाने घालविली. आता सामना अनिर्णित होण्याचीच शक्यता आहे.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 07/13/2014 - 08:17
नवीन
मला वाटते अधिकृत कसोटी सामने झाल्या पासून बहुदा हा एकच सामना असावा ज्यात दोन्ही बाजूच्या शेवटच्या भागीदारीसाठी १०० पेक्षा जास्त धावा झाल्या असाव्यात. क्रिकेट हा खेळ किती विचित्र आहे !
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Sun, 07/13/2014 - 09:04
नवीन
११ व्या फलंदाजाबद्दल हा एक चांगला लेख.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/13/2014 - 13:53
नवीन
ज्यो रूट आणि अँडरसनने भारतीय गोलंदाजाच्या नाकात दम आणला अतिशय निष्प्रभ गोलंदाजी. १९५ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि कसोटीने अनिर्नित अवस्थेकडे प्रयाण केले. शेवटच्या विकेटसाठी इतकी भागीदारी व्हावी अतिशय लज्जास्पद आहे भारतीय गोलंदाजीसाठी.
बाकी, विश्वचषक फूटबॉल संपला की इकडे हजर होत राहीन. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 07/13/2014 - 17:11
नवीन
मी तरी नाय हजर होणार ब्वा इकडे.
मायला जडेजा, धोनी अन् बिन्नीसाठी काय सामने बघायचे... *boredom* *sorry2* *fool*
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 07/13/2014 - 17:04
नवीन
सामना अनिर्णित होणार हे नक्की. दुसर्या डावात चहापानाला भारत ३४७/८. उर्वरीत वेळात भारताचे उर्वरीत फलंदाज बाद करून सामना जिंकणे इंग्लंडला अशक्य आहे. पहिले ३ दिवस भारताने वर्चस्व राखले होते. आज ५ व्या दिवशी ३९ धावांनी मागे पडलेल्या भारताची अचानक ६ बाद १८४ अशी अवस्था झाली तेव्हा भारताकडे फक्त १४५ धावांची आघाडी होती व दिवसातली किमान ७७ षटके शिल्लक होती. अचानक इंग्लंडला विजयाची संधी निर्माण झाली. परंतु बिन्नी, जडेजा व भुवनेश्वर कुमार यांनी उत्तम फलंदाजी करून भारताला पराभवापासून खूप लांब नेले आणि आता उर्वरीत ३१ षटकात सामन्याचा निकाल लागणे अशक्य आहे.
एकंदरीत या सामन्यात कोहली (व काही प्रमाणात धवन) वगळता इतर सर्वांनी किमान एका डावात फलंदाजीत चांगले योगदान दिले. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, शमी व शर्माने बर्यापैकी गोलंदाजी केली. अर्थात शेपटाने त्रास देण्याची परंपरा याही कसोटीत सुरू राहिली. तळाच्या २-३ फलंदाजांना बाद करणे हे भारतीय गोलंदाजांसाठी अवघड काम होऊन बसले आहे.
असो. पुढील कसोटीत हाच संघ कायम राहील असे वाटते. अश्विन किंवा वरूण एरॉनला आत यायची संधी दिसत नाही.
दुसरा कसोटी सामना गुरूवारी १७ जुलैला लॉर्ड्स वर सुरू होईल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 07/17/2014 - 08:18
नवीन
आजपासून दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरू होतोय. खेळपट्टी हिरवीगार असण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचा टिकाव लागतोय का याचीच उत्सुकता आहे.
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/17/2014 - 08:25
नवीन
जडेजा ऐवजी, अश्विनला खेळवून पाहावे
कारण जादेजापेक्षा अश्विनचे फलंदाजीचे तंत्र जास्त चांगले आहे, शिवाय त्याने शतकही झळकावलेले आहे
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 07/17/2014 - 09:43
नवीन
सहमत. अर्थात दोघेही फिरकी तिथे काय करणार कप्पाळ पण ब्याटींगला अश्व्या बराय !
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 07/17/2014 - 11:15
नवीन
- जडेजा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. अश्विनचे क्षेत्ररक्षण अत्यंत भिकार आहे.
- फलंदाजीत अश्विनच्या तुलनेत जडेजाने फारश्या धावा केलेल्या नाहीत.
- भारताबाहेर दोघेही निष्प्रभ गोलंदाज आहेत.
एकंदरीत दोघांपैकी कोणालाही घेतले तरी फारसा फरक पडत नाही.
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/17/2014 - 11:46
नवीन
कसोटीत क्षेत्र रक्षण टी२० किंवा एकदिवसीय सामान्यैतके महत्वाचे दिसून येत नाही, कारण अगदी एक एक धावा वाचवताना कोणी दिसत नाही अर्थात अपवाद असेलच
भारतभर दोघेही कुचकामी ठरलेले असले तरी आत्ताच्या इंग्लंड च्या पिचेस आणि माग्च्या दौर्यातल्या पिचेस ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »