Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भाव चलित कुंडली आणि इतर षोडशवर्ग कुंडल्या ....

न
निमिष सोनार
Wed, 06/25/2014 - 13:14
🗣 167 प्रतिसाद
महत्वाची सुचना: ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा.... चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे. त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद!!! चर्चेचा विषय: निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ? लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ? कृपया विस्तार पूर्वक चर्चा येथे अपेक्षित आहे. धन्यवाद!!!

प्रतिक्रिया द्या
84839 वाचन

💬 प्रतिसाद (167)
ब
बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 08:41 नवीन
"मिपाला बर्‍याच विषयांचं वावडं आहे, पण ते असं उघडपणे बोलून दाखवायचं नसतं इतकंच."
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विश्वनाथ मेहेंदळे Sat, 06/28/2014 - 17:09 नवीन
मिपावरील काही सदस्यांना ज्योतिष विषयाचे वावडे आहे. इतकेच नाही तर अशी लोकं ज्योतिषावर कुठलाही धागा आले की अक्षरश: चेकाळतात. विरोधाला विरोध नाही, पण धागा पूर्णपणे हायज्याक केला जातो. इतका की तिथे कुठल्याही प्रकारची चर्चाच होणे शक्य नाही. हे म्हणजे साधारण रोडीजच्या ग्रुप डिस्कशन मध्ये लोकं (किंवा संसदेत खासदार) आरडओरडा करून इतरांना बोलूच देत नाहीत, त्याचे जालिय रूप वाटते.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पैसा गुरुवार, 06/26/2014 - 07:20 नवीन
शिनेर सदस्य धाग्यावर अवांतर करताना आणि एक ज्येष्ठ संपादक धुमाकूळ घालताना बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. *blush*
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 07:21 नवीन
:/ -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 07:20 नवीन
ज्योतिष हे शास्त्र आहे की नै, श्रद्धा अंधश्रद्धा, विज्ञान, अरे धन्या लिहू द्या रे लिहिणा-यांना. -दिलीप बिरुटे
ध
धन्या गुरुवार, 06/26/2014 - 09:26 नवीन
सर लिहिण्याला आक्षेप नाहीच. आक्षेप आहे तो विरोधी मते असणार्‍यांनी आपली मते मांडूच नयेत या पवित्र्याला. कुणीही उठावं आणि केवळ काकतालिय न्यायाने खर्‍या ठरणार्‍या भाकितांना शास्त्र म्हणावे यालाही आमचा विरोध नाही. मात्र ते त्यांचे वैयक्तिक मत असावं. मिसळपावसारख्या मुक्त व्यासपीठावर अशी विधाने केल्यावर त्याला विरोध करुच नये हे म्हणणे पटत नाही. विशेष म्हणजे धागाकर्ते धागा टाकल्यांनतर इकडे फिरकलेच नाहीत. धाग्यावरील आक्षेपांना त्यांनी उत्तर देणे ही तर खुप दुरची गोष्ट झाली.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 06/26/2014 - 08:12 नवीन
पूर्वी उधृत केलेले माझेच वाक्य पुन्हा लिहीतो "आपला तो संतुलित विचार आणि दुसर्‍याचा तो अतिरेक असतो". @ निमिष,मला जोतिषात काही गती नाही. काही काही ज्योतिषी अचूक भविष्य वर्तवताना पाहीले आहेत. सनातन प्रभातमधे छापून आलेले एका गोपालकृष्णन किंवा तत्सम ज्योतिषाचे अंदाज ९५ % ठरल्याचे या इलेक्शनला अनुभवले. त्याबद्दल कुतुहल मात्र वाटते.
म
म्हैस गुरुवार, 06/26/2014 - 08:17 नवीन
ज्योतिष हे शास्त्र नाही
ज्योतिष हे शास्त्र आहे. ज्योतिषी खोटे आहेत . बाकी चालू दे . as usual
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 08:36 नवीन
स.मं.चा एक्स्लुझीव अधिकार आहे, तसाच धोरणाच्या मर्यादेत राहून चर्चा करण्याचा प्रत्येक सदस्याला अधिकार आहे. नाही तर एकमार्गी मतं रेटणार्‍या चर्चांचा उपयोग तो काय?
आपला नसेल पाया भक्कम त्यांचा आहे
तोच तर चर्चा विषय आहे. त्यांना पाया भक्कम आहे हे दाखवून देऊ द्या.
काही प्रश्नांंची उत्तर देता आली तर द्यावी नै तर आपण एकटेच वाचक आहोत असे समजून लिहित राहावे
मग डायरी आणि संकेतस्थळात फरक काय? योग्य प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे?
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/26/2014 - 08:44 नवीन
त्यांना पाया भक्कम आहे हे दाखवून देऊ द्या. >>> करेक्ट ! आम्हालाही इतकेच म्हणायचे आहे !
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्यारे१ गुरुवार, 06/26/2014 - 09:24 नवीन
>>> योग्य प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे? हे असंच लिहायचंय का @@@ प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे? @@@ असं लिहायचंय?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/26/2014 - 09:11 नवीन
>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात. >>> उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ? १२ व्या स्थानाचे >>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? अर्थातच राशी कुंडली >>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? नक्की माहिती नाही.
ज
ज्ञानव Mon, 06/30/2014 - 06:30 नवीन
>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? >>>बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात. ग्रहांचे अंश हे ग्रहांचे स्थान ठरवतात जर चलित कुंडलीत ग्रह एक घर मागे पुढे होत असेल तर चलित कुंडलीत त्याचे जे घर आहे ते लक्षात घ्यावे लागते. पण नुसतेच चलित कि नवमाश, राशी चंद्र असे चालत नाही तर प्रश्नानुसार कुंडली बघतात असा अनुभव आहे. पण >>>बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात. हे हि तितकेच खरे. >>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? >>>>अर्थातच राशी कुंडली मुळात कुंडली एकच असते पण त्याची मांडणी वेगवेगळ्या प्रकारे असल्याने ज्योतिषाने स्वकष्टार्जित तारतम्य वापरून फलादेश द्यायचा असतो पण सामन्यतः शिष्य, वाचन आणि गुरूने जेवढे सांगितले तेव्हढेच डोके चालवतात आणि गोंधळ होतो. >>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? >>>>नक्की माहिती नाही. पास. तुम्ही जर ज्योतिषाचा अभ्यास करत असाल तर मुळात तुमचा ज्योतिषी म्हणून त्या विषयाबाबत काय दृष्टीकोन आहे तेही मांडा म्हणजे उदा. "गुरु हा अर्थ कारणाचा कारक आहे" असे बरेच ज्योतिषी सांगतात ह्या वाक्याचा तुम्ही काय अर्थ लावता? किंवा एखादे तत्सम वाक्य तुम्ही उलगडून सांगा ज्याने माझ्या ज्ञानात ही भर पडेल.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सरळमार्गी गुरुवार, 06/26/2014 - 09:16 नवीन
>>>> मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही.<<<<< बिरुटे साहेब मिपा ला वावडे नसेल हो पण मिपाकरा^ना बर्‍याच विषयाची आलर्जी आहे त्याचे काय? >>> चर्चा करणा-या जाणकारांनी चर्चा करत राहावी. कितीही विरोध होत असला तरी आपल्या विषयाला प्रतिसादाला पुढे न्यायचं. कोण काय म्हणतं आणि का म्हणतं. आपण लिहित राहावे असे वाटते.<<< का म्हणून? जर चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच होणार असेल तरी ही ? एखाद्याने माहीती मिळवण्यासाठी व अनावश्यक प्रतिसादां बद्द्ल डिस्क्लेमर टाकून धागा काढला तरीही त्याची काय गत होते ते दिसतेय, मी म्हणत असलेल्या संस्थळावर संपादक मंडळाचे कडक नियंत्रण असते त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जात नाहीत. तसे इथे का होऊ शकत नाही?
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 10:47 नवीन
परा या सदस्यानं म्हटलं होतं की संकेतस्थळावरचं लेखन हे खिडकीत बसण्यासारखं आहे, मग कुणी शुकशुक केलं तर तक्रार करण्यात अर्थ नाही. बाय द वे, लेखकानं किंवा कुणीही कुंडली, आणि भविष्यकालीन घटनांचं वर्तांकन यातला कार्यकारण नि:संदिग्धपणे दाखवून द्यावा. कोणतंही वैज्ञानिक सत्य सिद्ध करायला : १) निर्वैयक्तिकता २) स्थल-काल निरपेक्षितता आणि ३) वारंवारिता हे तीन निकष आहेत. वैज्ञानिक निकषांवर जर तुम्ही कार्यकारण सिद्ध करु शकलात तर असल्या लेखनाला काही अर्थ आहे. आणि आय चॅलेंज यू, ओन धिस फोरम, तुम्ही कुंडली आणि भविष्यकालीन घटनांचं वर्तांकन यातला कार्यकारणभाव वैज्ञानिक सत्यतेच्या निकषांवर सिद्ध करु शकत नाही.
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
ध
धन्या गुरुवार, 06/26/2014 - 11:01 नवीन
कोणतंही वैज्ञानिक सत्य सिद्ध करायला : १) निर्वैयक्तिकता २) स्थल-काल निरपेक्षितता आणि ३) वारंवारिता हे तीन निकष आहेत. वैज्ञानिक निकषांवर जर तुम्ही कार्यकारण सिद्ध करु शकलात तर असल्या लेखनाला काही अर्थ आहे.
वैज्ञानिक सत्याची कसोटी इतक्या स्पष्ट आणि सोप्या शब्दांत मांडण्यासाठी धन्यवाद.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अर्धवटराव Mon, 06/30/2014 - 04:58 नवीन
हे वैज्ञानीक कसोटीचं सत्य आहे. आणि त्यात एक अत्यंत (सर्वात?) महत्वाचा क्लॉज म्हणजे "इन गिव्हन कंडीशन्स". हा एक क्लॉज सत्याची कसोट्यांपासुन फारकत करतो. वैज्ञानीक सत्य असं कसोट्यांवर तोलण्याइतपत पंगू नाहि. असो.
↩ प्रतिसाद: धन्या
म
म्हैस गुरुवार, 06/26/2014 - 09:44 नवीन
का म्हणून? जर चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच होणार असेल तरी ही ? एखाद्याने माहीती मिळवण्यासाठी व अनावश्यक प्रतिसादां बद्द्ल डिस्क्लेमर टाकून धागा काढला तरीही त्याची काय गत होते ते दिसतेय, मी म्हणत असलेल्या संस्थळावर संपादक मंडळाचे कडक नियंत्रण असते त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जात नाहीत. तसे इथे का होऊ शकत नाही?
exactly . संपादकांच नियंत्रण नसल्यामुळे (किवा संपादक ) पक्षपात करतात ह्याचं चांगला उदाहरण माझ्याकडे आहे. आणि बर्याच लोकांना इथे कुठलीही गोष्ट समजून घेण्यात किवा चर्चा करण्यात रस नसून स्वताच्या अर्धवट , तोकड्या माहितीच्या आधारे किवा आपल्या अर्धवट अकलेच्या आधारे फक्त चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच करण्यात रस आहे.
ज
ज्ञानव Mon, 06/30/2014 - 06:34 नवीन
+१
↩ प्रतिसाद: म्हैस
स
सरळमार्गी गुरुवार, 06/26/2014 - 11:43 नवीन
>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? भारतात प्रामुख्याने क्षेत्र कुंडली (लग्न कुंडली) प्रचलित आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भावचलित कुंडली तयार करण्या साठी लागणारी भावसाधनाची कोष्टके सहजासहजी उपलब्ध नसणे, अशी कोष्टकें उपलब्ध नसल्यास बरीच आकडेमोड करावी लागते, ती करणे बर्‍याच जणांना जमत नाही. मात्र आज संगणकाच्या मदतीने ही गणिते सहज सोपी झाली आहेत. राशीचक्राचे १२ भाग पाडून त्यांना १,, १२ भावात बसवणे या साठी सुमारे ३० पेक्षा जास्त पद्धती उपलब्ध आहेत. त्यापैकी ‘प्लॅसिड्स’ ही प्रणाली जास्त लोकप्रिय आहे, के.पी. मध्ये ‘प्लॅसिड्स’ प्रकाराने बनवलेली भावचलित कुंड्ली वापरतात. कृष्णमुर्तीनी (के.पी. चे जनक) ‘प्लॅसिड्स’ पद्धत स्विकारली कारण त्यावेळेला फक्त याच ‘प्लॅसिड्स’ पद्धतीची भावसाधन कोष्ट्के बाजारात सहजासहजी उपलब्ध होती (अशी कोष्ट्कें उपलब्ध असणे हेच ‘प्लॅसिड्स’ च्या लोकप्रिततेचे कारण आहे). कृष्णमुर्तीना आणखी काही वर्षांचे आयुर्मान लाभले असते तर त्यांनी निश्चितच दुसरी एखादी भावसाधन प्रणाली अवलंबली असती ( बहुदा ‘कोश’ ही जर्मन ज्योतिर्विदांनी तयार केलेली प्रणाली ) किंवा त्यांनी स्वत:च एखादी नविन प्रणाली निर्माण केली असती. कोणती कुंडली वापरायची हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे कोणती कुंडली वापरायची ते ज्या त्या ज्योतिर्विदाने स्वत:च्या अनुभवाच्या आधाराने ठरवावे. माझ्या मते भावचलित कुंडली वापरायची असेल तर महान गणिती ‘श्रीपती’ यांनी सुचवलेल्या पद्धतीने तयार केलेली भावचलित कुंडली वापरावी. ही वापरताना भावाच्या मध्या जवळचे ग्रह त्याच भावात व भावाच्या आरंभी वा शेवटी 5 अंशात असलेले ग्रह क्रमश: अलिकडच्या / पलिकडच्या भावात आहेत असे समजावे. हा नियम के.पी. मध्ये ही काही जण वापरतात. >>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? चंद्र एका राशीत साधारणपणे अडिच दिवस असतो, म्हणजेच एखाद्या संपूर्ण दिवसात तो एकाच राशीत असणार (चंद्र ज्या दिवशी राशी बदलेल तो दिवस अपवाद्) म्हणजेच त्या दिवशी जन्मलेल्या सर्व बालकांची राशी कुंडली एका सारखी असणार , कारण त्या दिवसभरात बाकीचे सर्व ग्रह ही एकाच राशीत व त्याच अंशात असणार.(दुसरा एखादा ग्रह नेमका त्याच दिवशी राशी बदलत असेल तर तो दिवस अपवाद्) मग अशा राशी कुंडली वरुन वर्तवलेले भविष्य ही एक सारखेच असणार, प्रत्यक्षात तसे आढळत नाही. याउलट जन्मलग्न साधारण पणे दर दोन तासाने बदलते म्हणजेच प्रत्येक दिवसात 12 जन्मकुंडल्या शक्य असतात, दिवसभरासाठी ची एकच एक राशी कुडली पेक्षा ही प्रत्येक 2 तासाची एक वेगळी कुंडली हि परिस्थिती बरी आहे. पण तरीही त्या दोन तासाच्या कालावधीत जन्मलेल्या बालकांच्या कुंडल्या एकच राहणार पर्यायाने अशा कुंडली वरुन वर्तवलेले भविष्य ही एक सारखेच असणार, प्रत्यक्षात तसे आढळत नाही. त्याला उत्तर म्हणून कृष्णमुर्तीनी (के.पी. चे जनक) ‘सब’ ची कल्पना मांडून 360 अंशाच्या राशीचक्राचे 249 भाग केले , या ‘सब’ मुळे साधारण पणे दिड दोन मिनीटांच्या फरकाने जन्माला येणार्‍या बालकांच्या पत्रिका वेगळ्या होतात. एव्हढे करुन ही सुक्ष्मता येत नाही हे लक्षात आल्यावर श्री एस पी खुल्लर यांनी कृष्णमुर्तीनी सुचवलेल्या ‘सब’ चे पुन्हा 9 भाग केले , त्यामुळे साधारण पणे काही सेकंदांच्या फरकाने जन्माला येणार्‍या बालकांच्या पत्रिका वेगळ्या होतात. अर्थात श्री एस पी खुल्लर आणि कृष्णमुर्ती यांनी सुचवलेल्या या पद्धतींचा अवलंब करताना जातकाची जन्मवेळ ही तितकीच अचूक असायला हवी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. >>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? या ‘भाग कुंडल्या ‘ एक प्रकारचे ‘हारमोनिक' चार्ट्स आहेत. अशी प्रत्येक कुंडली जातकाच्या आयुष्याचा एखाद्या विषिष्ठ अंगाचाच विचार करण्यासाठी असते उदा: विवाह, संतान, आयुर्दाय , आरोग्य, धन, व्यवसाय, गतजन्म, पुढचा जन्म ई. या भाग कुंडल्या सखोल अभ्यास करण्याच्या हेतूने बनवलेल्या सुपर स्पेशॅलिटी ‘कुंडल्या आहेत. जसा फरक साधा जनरल डॉकटर आणि गायनॅकोलऑजीस्ट, ईएंटी सर्जन यांच्यात असतो तसाच फरक जन्मलग्न कुंडली व भाग कुंड्ल्यांत असतो. या कुंडल्या बनवताना राशीचे 2,3,4.9 , 12 , 16, 32 असे करत 60, 120 व त्याही पलीकडे जाऊन सुक्ष्म भाग केले जातात. नाडि भविष्य कथनात 1/60 व 1/120 पद्ध्तीच्या पत्रिका वापरल्या गेल्याचे आढळते. याही पद्धतींचा अवलंब करताना जातकाची जन्मवेळ ही तितकीच अचूक असायला हवी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. उदा: नवमांश पत्रिका वापरायची असेल तर जातकाच्या जन्मवेळेतील चूक 13 मीनीटंपेक्षा जास्त असता कामा नये , अन्यथा नवमांश बदलेल व पर्यायाने नवमांश कुंडली बदलेल. पण गंमत अशी की या मर्यादेचाच खुबिने उपयोग करुन घेऊन जातकची जन्मवेळ बरोबर आहे का ते ठरवता येते व चुक दुरुस्त करता येते. अर्थात हे कोणा येरा गबाळ्याचे (कुडमुड्या चे ) काम नाही हे ओघानेच आले. दोन व्यक्ती एक सारख्या नसतात, अगदि जुळ्या मुलांत सुद्धा फरक असतो, मग त्यांच्या जन्मकुंडल्याही वेगळ्याच असायला हव्यात ना? त्यासाठीच तर हे एव्हढे सुक्ष्म गणित करावे लागते. पण हे एव्हढे सगळे गणिती व्याप करणे सगळ्यांनाच शक्य होते असे नाही.
आ
आयुर्हित गुरुवार, 06/26/2014 - 12:48 नवीन
मानले आपल्याला, खुप छान प्रतिसाद दिल्याबद्दल! आपल्याकडुन या विषयावर नवे लेखही येवू द्या, हि विनंति.
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
म
मूकवाचक गुरुवार, 06/26/2014 - 15:42 नवीन
+१
↩ प्रतिसाद: आयुर्हित
ह
हाडक्या गुरुवार, 06/26/2014 - 12:55 नवीन
उत्तम प्रतिसाद.. ज्योतिषातील काहीही कळत नसले ( आणि इंटरेस्ट नसला ) तरी ही अभ्यासपूर्ण आणि समजायला तितकेच सोपे. प्रश्न उरतो की इतके सगळे सायास करून त्याचा उपयोग काय ? जन्माला आलेले मूल हिटलर, न्युटन, गांधी अथवा शिवराय होणार असे काही खात्रीलायकरित्या सांगता येणार असेल तर ठिक नाहीतर कामकरी ठोकळ्यांच्या मांदियाळीतले अजून एक आले आणि त्यावर या 'गणितज्ञानी' डोके फोड करून ते 'आयबीएम मध्ये काम करणार, नवी फोर्ड गाडी वयाच्या विसाव्या वर्षीच घेणार' वगैरे सूक्ष्म माहीती शोधण्यात त्यांचे ज्ञान व्यर्थ घालवावे हे काही पटत नाही.
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
ध
धन्या गुरुवार, 06/26/2014 - 13:02 नवीन
उत्तम प्रतिसाद.. ज्योतिषातील काहीही कळत नसले ( आणि इंटरेस्ट नसला ) तरी ही अभ्यासपूर्ण आणि समजायला तितकेच सोपे.
सहमत आहे. ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही हा विषय बाजूला ठेवून या प्रतिसादाकडे पाहिले तर प्रतिसादकर्त्याने या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे हे जाणवते. असे अभ्यासू प्रतिसाद आले तर निकोप चर्चा व्हायला नक्कीच मदत होईल. विरोधी मत असणार्‍यांनी प्रतिसाद देऊ नये अशा मुजोरी भाषेने धाग्याची सुरुवात करुन मुख्य विषय एक दोन वाक्यांत गुंडाळणार्‍या धागाकर्त्याने या प्रतिसादकर्त्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. रच्याकने, ते धागाकर्ते आहेत कुठे? :)
↩ प्रतिसाद: हाडक्या
क
कंजूस गुरुवार, 06/26/2014 - 12:38 नवीन
पुढे सरकू द्याहो .
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 20:57 नवीन
आता आपण सविस्तर प्रतिसाद दिलायं, तेव्हा बाजू लावून धराल अशी अपेक्षा करतो. मी जर निरुत्तर झालो तर खुल्या दिलानं मान्य करीन, पण तुम्हाला उत्तर देता आलं नाही तर ज्योतिषशास्त्र निरुपयोगी आहे हे मान्य करा. माझे हितचिंतक चर्चा भरकटवणार नाहीत आणि सर्वांसाठी ती विधायक होईल; त्याचा सगळ्यांना लाभ होईल, अशी आशा करतो. _____________________ अस्तित्वाची संरचना एखाद्या अमर्याद आणि व्यापक देहासारखी आहे. इथे प्रत्येक गोष्ट इतर प्रत्येक गोष्टीशी अनाकलनीय रितीनं जोडलेली आहे. Existence is an Organic Unity & it is a Terrific Mystery. सूर्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, आपला निरंतर चालू असलेला श्वास अगणित वृक्षवल्लरींशी जोडलेला आहे, अरण्य पावसाशी आणि पृथ्वीशी जोडलेली आहेत; पाऊस अनेकानेक जलनीधींशी संलग्न आहे; त्या जलनीधींच्या अगम्य हालचालींचं चंद्राशी नातं आहे; चंद्र पृथ्वीशी एकसंध अंतर राखून आहे आणि वसुंधरा त्या चंद्रासमवेत असंख्य ग्रहमालिकांच्या अगम्य पसार्‍यातून, सूर्याशी समांतर आकर्षण ठेवत, अनंत काळ परिभ्रमण करते आहे. आणि या रहस्यांचं रहस्य असं की हे सगळं स्वयंप्रेरित आहे. या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कुणीही नाही. इथे उत्पत्ती, स्थिती आणि लय, स्वच्छंद आहे. या गूढ रहस्यमयतेत प्रत्येक गोष्ट अस्तित्वातल्या इतर गोष्टीशी संलग्न असल्यानं, एका अकल्पनीय कॅलिडोस्कोपसारखी, अस्तित्वाची स्थिती हरक्षणी अगम्यपणे बदलते आहे. कोणत्याही क्षणी सूर्य विझू शकतो, पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते, कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते. कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही. इतक्या अनंत, अगम्य, अनाकलनीय वैश्विक पसार्‍यात, एखाद्या छ जातकाच्या जन्माला (किंवा मृत्यूला) छ्दाम सुद्धा किंमत नाही. त्याच्या जन्म वेळची विविक्षित ग्रहस्थिती, कितीही काटेकोरपणे प्रस्थाप्तित केली, तरी मुळात इतक्या अफाट अस्तित्वात, हरक्षणी बदलणारी, इतकी अगम्य परम्युटेशन्स आणि काँबिनेशन्स आहेत की एकतर त्यांचा उलगडा होणच असंभव. आणि दुसरं म्हणजे, सगळी प्रक्रियाच इतकी व्यापक आणि डायनॅमिक आहे की, एका निष्कर्षाप्रत पोहोचण्यापूर्वी, तुम्ही विश्लेषण करायच्या आत, पुन्हा नवी स्थिती निर्माण होते! ______________________ तस्मात, जिथे अखिल अस्तित्वाच्या, अनेकानेक प्रक्रियाच एकमेकांशी जोडलेल्या आणि अनाकलनीय आहेत, तिथे यकःश्चित जातकाच्या व्यक्तिगत वर्तांकनाची कल्पनाच अज्ञानमूलक आहे. जर अस्तित्वाची Organic Unity ही वास्तविकता लक्षात आली तर व्यक्तिगत भविष्याचा वेध अशक्य आहे, हे सहज लक्षात येईल. कारण ज्या अस्तित्वाशी आपण एकसंध आहोत, खुद्द त्या अस्तित्वाचीच, सांप्रत स्थिती अनाकलनीय आहे... पुढच्या स्थितीची तर बातच सोडा!
स
स्पा Fri, 06/27/2014 - 08:11 नवीन
सूर्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, आपला निरंतर चालू असलेला श्वास अगणित वृक्षवल्लरींशी जोडलेला आहे, अरण्य पावसाशी आणि पृथ्वीशी जोडलेली आहेत; पाऊस अनेकानेक जलनीधींशी संलग्न आहे; त्या जलनीधींच्या अगम्य हालचालींचं चंद्राशी नातं आहे; चंद्र पृथ्वीशी एकसंध अंतर राखून आहे आणि वसुंधरा त्या चंद्रासमवेत असंख्य ग्रहमालिकांच्या अगम्य पसार्‍यातून, सूर्याशी समांतर आकर्षण ठेवत, अनंत काळ परिभ्रमण करते आहे. आणि या रहस्यांचं रहस्य असं की हे सगळं स्वयंप्रेरित आहे. या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कुणीही नाही. इथे उत्पत्ती, स्थिती आणि लय, स्वच्छंद आहे. या गूढ रहस्यमयतेत प्रत्येक गोष्ट अस्तित्वातल्या इतर गोष्टीशी संलग्न असल्यानं, एका अकल्पनीय कॅलिडोस्कोपसारखी, अस्तित्वाची स्थिती हरक्षणी अगम्यपणे बदलते आहे. कोणत्याही क्षणी सूर्य विझू शकतो, पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते, कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते. कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही.
सॉलिड प्रतिसाद , आवडेश
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ध
धन्या Fri, 06/27/2014 - 11:12 नवीन
यनिमित्ताने देऊळ चित्रपटातील मचाणावरीलच्या दृश्यातील आण्णांचे वाक्य आठवले, "माणूस म्हणजे काळाच्या पटावरील ठीपका आहे ठीपका". नुकतेच मुंबईच्या नेहरु तारांगणला असणार्‍या शोमध्ये विश्वात पृथ्वीचे स्थान किती नगण्य आहे हे दाखवले जाते तेही आठवले. :)
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 06/27/2014 - 17:42 नवीन
मला एकच मुद्दा मांडायचा होता, तो म्हणजे आपण अस्तित्वाशी समरुप आहोत आणि जर त्या व्यापकतेचीच नियती अज्ञात आहे, तर `व्यक्तिगत नियती' असं काही असू शकत नाही. सरळमार्गीनं, माझ्या इतक्या निर्विवाद प्रतिवादानंतर (मुद्दा बेशर्त मान्य करण्याऐवजी), असा स्टँड घेतल्यानं -
श्री आद्य शंकराचार्यांनी सुद्धा वादविवादा साठी तितक्याच तोलामोलाचे श्री मंडणमिश्र बघितले हो, एखाद्या चारघरी भिक्षुकी करुन पोटाची खळगी भरणार्‍या बाळंभटाशी नाही चर्चा करत बसले!
- आय हॅड टू गीव अप. अर्थात, त्यांनी ज्योतिषास्त्रातल्या दिग्गजांची नांव लिहून पुढे म्हटलंय :
ही मंड्ळी कदाचित आपल्या तोलामोलाची असावित असे मला वाट्ते (कदाचित शब्द यासाठीच वापरला की आपण या लोकांनाही भारी पडणार यात शंकाच नाही पण सामना अगदिच एकतर्फी होणार नाही असे वाटते) त्यांच्याशी चर्चा करण्यात समाधान आहे का एखाद्या नवख्या विद्यार्थ्याला चर्चेला बोलावून नामोहरम करण्यात आहे?
मी त्यांना भारी पडीन यात काही कौतुक नाही कारण जे लिहीलंय ती वस्तुस्थिती आहे. प्रतिसाद देण्याचा मूळ हेतू असा होता की सदस्यांना वस्तुस्थिती विशद व्हावी. एकदा ती झाली की मग इथला कुणीही सदस्य त्या विषयातल्या कुणाही दिग्गजाला निरुत्तर करेल. आणि संकेतस्थळावरच्या चर्चा अशाप्रकारे एका निश्चित निष्कर्शाप्रत यायला हव्या, तरच त्यांचा उपयोग आहे. थोडक्यात, आपण स्वतःला अस्तित्वापासून कोणत्याही प्रकारे वेगळं करु शकत नाही, आणि अस्तित्वाला नियती नाही. तस्मात, व्यक्तिचं भविष्य हा अंदाजपंचे दाहोदरसेचा खेळ आहे. कुणीही अडलानडलेला छ जातक, तितक्याच अज्ञानी फ कडे जाऊन `अब मेरा क्या होगा काल्या?' विचारतो आणि एक निरर्थक कुंडलीनामक कागदी घोड्यावरुन, फ त्याला कल्पनेच्या दुनियेत घुमवतो. यापलिकडे ज्योतिषास्त्राला अर्थ नाही. बाय द वे,
आपला नसेल पाया भक्कम त्यांचा आहे त्यांना लिहु द्या ना भो
असा प्रतिसाद देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेणं आहे; हे निदान जवाबदार मंडळींना तरी लक्षात (एव्हाना) यायला हवं. कारण ज्योतिर्विदांना निरुत्तर करणं फारसं अवघड नाही. पण त्याही पुढे जाऊन, पूर्वीच्या ऋषींमुनींनी केलेला ज्योतिषाचा अभ्यास, त्यांचा नेमका अध्यात्मिक निष्कर्श आणि त्यातून जगण्यासाठी मिळणारी दिशा, या सर्व गोष्टींवर सखोल चिंतन झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे, अशा प्रकारे निराधार विषयांना प्रोत्साहन देणं, सदस्यांची दिशाभूल आहे.
↩ प्रतिसाद: धन्या
आ
आदिजोशी Fri, 06/27/2014 - 13:48 नवीन
या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कुणीही नाही. हे वाक्य इतक्या ठामपणे लिहिण्याइतका पुरावा सापडलेला नाही. म्हणून, या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कोण आहे अथवा नाही हे माहिती नाही.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 06/27/2014 - 17:48 नवीन
द्यावा लागेल. `असा कुणीही नाही' म्हणणारे Null Hypothesis च्या अदर एंडला आहेत. अर्थात, तुम्ही नीट विचारपूर्वक पुढचा प्रतिसाद देऊ शकलात तर तुमच्या लक्षात येईल की, तुमच्याकडे अस्तित्वाचा कर्ता-करविता आहे याचा कोणताही पुरावा नाही.
↩ प्रतिसाद: आदिजोशी
अ
अर्धवटराव Mon, 06/30/2014 - 05:00 नवीन
तो अस्तित्व स्वतःच कर्ता आहे.
↩ प्रतिसाद: आदिजोशी
आ
आयुर्हित Sat, 06/28/2014 - 10:33 नवीन
कोणत्याही क्षणी सूर्य विझू शकतो, पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते, कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते. कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही.
संजय क्षीरसागरजी, उचलला कळफलक आणि लागले टंकायला? असे का करता आपण? फक्त अज्ञानी लोकच असे लिहु शकतात. सत्य असे आहे १)सुर्य विझेल हे खरे आहे पण त्याला अजुन करोडो वर्षे जीवन आहे. अभी तो मै जवान हु म्हणत आत्ताशी कोठे ४५६७००००००वर्षे(प्रुथ्वीवरील वर्ष)वय झाले आहे त्याचे, म्हणजे अजुन निम्मे आयुष्य बाकि आहे हो. २)पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते हे खरे करायचे असेल तर आन्तेरस (जेष्ठ नक्षत्र/ तारा) किंवा त्याच्यावस्तुमानाएवढे क्रुष्णविवर आपल्या सुर्यमालिकेत युरेनस ग्रहाच्या परिभ्रमण कक्षेच्या आत दाखल झाले पाहिजे, याचा अर्थ सध्या असलेल्या ५५० प्रकाशवर्षे अंतरावरुन प्रुथ्वीपासुन १८एयु अंतरावर यावे लागेल. 1 Astronomical Unit = 149,597,871 kilometers 1 light-year = 9,460,730,472,580,800 metres Image removed. ३)कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते हे खरे ठरायचे असेल तर गुरु ग्रह किंवा सुर्य आधि नष्ट झाला असेल तरच शक्य आहे. ४)कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही. हे ही खरे ठरण्यासाठी त्याव्यक्तिचे आयुष्य संपले तर पाहीजे.
इतक्या अनंत, अगम्य, अनाकलनीय वैश्विक पसार्यात, एखाद्या छ जातकाच्या जन्माला (किंवा मृत्यूला) छ्दाम सुद्धा किंमत नाही. त्याच्या जन्म वेळची विविक्षित ग्रहस्थिती, कितीही काटेकोरपणे प्रस्थाप्तित केली, तरी मुळात इतक्या अफाट अस्तित्वात, हरक्षणी बदलणारी, इतकी अगम्य परम्युटेशन्स आणि काँबिनेशन्स आहेत की एकतर त्यांचा उलगडा होणच असंभव. आणि दुसरं म्हणजे, सगळी प्रक्रियाच इतकी व्यापक आणि डायनॅमिक आहे की, एका निष्कर्षाप्रत पोहोचण्यापूर्वी, तुम्ही विश्लेषण करायच्या आत, पुन्हा नवी स्थिती निर्माण होते!
हेच तर शक्य करुन दाखविले आहे ज्योतिषशास्त्राने! तेव्हा पुढचे काही प्रश्न विचारण्यापुर्वी ज्योतिषशास्त्रावरची कमीत कमी विस पुस्तके नीट वाचून समजावून घ्यावेत हिच नम विनंति!
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ब
बॅटमॅन Sat, 06/28/2014 - 10:37 नवीन
आयुर्हितजी, डोक्यावर पडल्यागतच लिहावे असा काही नियम केला आहे काय आपण?
↩ प्रतिसाद: आयुर्हित
म
मूकवाचक Sat, 06/28/2014 - 10:57 नवीन
ज्योतिष्याविषयी थोडी जरी सहानुभूती दाखवली, तर त्या सदस्याला लूत भरलेल्या कुत्र्यागत हाडहाड करायचे अशी शपथ घेतली आहे का तुम्हा लोकांनी?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 06/28/2014 - 12:25 नवीन
ज्योतिषाच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहिले तरी त्याचे समर्थन करणे आणि त्याच्या विरुद्ध एक शब्द काढला तरी ढोंगी विज्ञानवादी इ.इ. हाडहाड करायचे या फ्याशनचे तुम्ही समर्थक आहात काय? सध्या अच्छे दिन आल्यामुळे स्यूडोसायन्सही प्युअर सायन्स होते असे वाटत असेल तर असूदे बॉ.
↩ प्रतिसाद: मूकवाचक
आ
आयुर्हित Sat, 06/28/2014 - 11:48 नवीन
बॅटमॅनजी, आजकाल असेच भास व्ह्यायला लागलेत वाटते! क्रुपया तज्ञांना दाखवुन लवकरात लवकर उपचार करुन घ्यावेत हि नम्र विनंति.तज्ञ काय म्हणाले यावर नविन धागाही येवु द्या! नहितर माझ्या प्रतिसादात काय चुक आहे/डोक्यावर पडल्यागतच लिहिले आहे हे तरि कळू द्या सर्वांना!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 06/28/2014 - 12:29 नवीन
ज्योतिषाने काय सिद्ध केले आहे याबद्दलचे तुमचे गैरसमज तेच दर्शवतात ओ. पण तुम्ही नाराज कशाला होता? जगात मूर्ख बनवणार्‍यांची कायमच चलती असते. मी किंवा अन्य कुणी काही बोलल्याने ज्योतिषांची दुकाने बंद थोडीच होणारेत?
↩ प्रतिसाद: आयुर्हित
म
मूकवाचक Sat, 06/28/2014 - 13:07 नवीन
माझा प्रश्न ज्योतिष्य, सायन्स, स्युडोसायन्सविषयी नसून 'हाडहाड' करण्याविषयी होता. त्यातून संपादक मंडळाने ज्योतिष्य हा विषय मिपावर प्रतिबंधीत नाही असे स्पष्ट करूनही सातत्याने ज्योतिष्यविषयक लिहीणार्‍यांची मुस्कटदाबी करू पाहणे हा संपादक मंडळाचा अपमान आहे असा माझा तरी 'ग्रह' झालेला आहे. असो.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 06/28/2014 - 22:19 नवीन
ज्योतिष विषयाबद्दल लिहिणे हे अलाउड आहे याचा अर्थ ज्योतिषावर टीका करणे ब्यान आहे हे आजच समजले. त्याला मुस्कटदाबी म्हणणे म्हणजे सशाने स्वतःच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यापैकी आहे. इतकीशी टीकाही सहन करता येत नसेल तर उ पयोग काय त्याचा? बरे, इतकं लिहून कुठल्या प्रश्नाला धड उत्तर नाही ते नाही, वर आणि मुक्ताफळे ऐकून घ्या. कोण सांगितलंय? संपादक मंडळाने अपमान इ. स्वतः सांगितले तर ठीक, नपेक्षा तुमच्या प्रतिसादातून तुम्ही ज्योतिष नामक भाकडकथेचे समर्थक आहात असेच वाटू लागले आहे. पण काळजी नसावी, ज्योतिषांची दुकाने आमच्या क्षीण आवाजामुळे बंद होणार नाहीत. या विषयावर एकदा ऑफिशिअल पोझिशन क्लीअर करूनच टाका आता संमं. ज्योतिष हा विषय वर्ज्य नाही हे समजले, त्याच्यावरची टीका वर्ज्य आहे की नाही तेही एकदाचे कळूदेच. म्हणजे मग कळेल अशा धाग्यांवर छानच, मस्तच, माझ्याही दशमस्थानात अकिलीस अन त्रयोदशस्थानात दुर्योधन आहे इ.इ. कमेंटी लिहायला बरे!
↩ प्रतिसाद: मूकवाचक
व
विश्वनाथ मेहेंदळे Sun, 06/29/2014 - 10:21 नवीन
मी काय म्हणतो, ज्योतिष ही वर्ज्य नको आणि त्याचा विरोधही. पण जे काही करायचे ते त्या त्या धाग्यावर करा ना. ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही यावर मिपावर खंडीभर धागे आहेत. पाहिजे तर अजुन एक काढावा, पण जिथे तशी चर्चा अपेक्षित नाही तिथे ती न करणे सहज शक्य व्हावे. समजा मला क्रिकेट खेळ बकवास आहे किंबहुना तो खरा खेळ नाहीच आहे आणि तो खेळणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असे वाटते. म्हणून मी आणि माझ्यासारख्या 10-12 लोकांनी क्रिकेटच्या प्रत्येक धाग्यावर जाऊन दंगा घालणे कितपत सभ्यपणाचे ठरेल ? Is it so hard to agree to disagree at least sometimes ?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सुबोध खरे Sun, 06/29/2014 - 17:08 नवीन
विमे एक फरक आहे. क्रिकेट बद्दल तुम्ही शिव्या घाला नाही तर ओव्या म्हणा माणसाच्या आयुष्यात फरक पडत नाही कारण माणसाची पुढची कोणतीही गोष्ट भारत जिंकला किंवा हरला (किंवा सामना "फिक्स" असेल तरीही) यावर अवलंबून नाही. परंतु एखादी उपचार पद्धती किंवा ज्योतिष यावर बर्याच माणसांचा पुढचा जीवनक्रम अवलंबून असण्याची "शक्यता" असते.आणि आपल्यापैकी कोणीही क्रिकेटचा सखोल अभ्यास केला आहे आणि त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध होईल असा दावा केलेला नाही. यामुळे हि तुलना एका पातळीवरची नाही. एवढे असले तरीही ज्योतिषावर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येक माणसाने आपली तर तम बुद्धी वापरूनच ठरवायचे आहे.
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 06/30/2014 - 09:50 नवीन
मान्य आहे. मुद्दाम जरा अतार्किक उदाहरण दिले होते. दुसरे काही उदाहरण दिले असते तर वेगळा वाद निर्माण होउ शकला असता. (क्रिकेट मुळे नुकसान झालेले लोकं पाहण्यात आहेत, पण तो मुद्दा अल्लग आहे :-) ) आपल्याला न पटण्याऱ्या धाग्याचे काश्मीर करणे हा काही मार्ग नाही. याच धाग्यावरील पहिल्या अनेक प्रतिक्रिया बघा. आणि हा प्रकार आजचा नाही, खूप जुना आहे. नावे बदलतात, स्टाईल सेम :-) मला एक सांगा, येथे समाजसुधारणेच्या उदात्त हेतूने कंठशोष करणार्या किती लोकांना तशी खरीच इच्छा असेल ? इथे प्रबोधन करता तसे बाहेरही करा म्हणावे. नातेवाईकांत कुणाच्या लग्नाचे बघत असतील तर पत्रिका बघण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करा म्हणावे. खरेतर यातील किती लोकांनी स्वत:चे लग्न ठरवताना बघितल्या असतील देव जाणे. कारण आजही लग्नाच्या बाजारात 95%+ लोकं पत्रिका बघतात. मग जालावरच हे पुरोगामित्व कुठून आले ?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संजय क्षीरसागर Mon, 06/30/2014 - 20:50 नवीन
खरेतर यातील किती लोकांनी स्वत:चे लग्न ठरवताना बघितल्या असतील देव जाणे. कारण आजही लग्नाच्या बाजारात 95%+ लोकं पत्रिका बघतात. मग जालावरच हे पुरोगामित्व कुठून आले ?
मी अजूनही पत्नीची पत्रिका बघितली नाही. ज्याला व्यक्तीची पारख करता येते तो पत्रिकेसारख्या छदाम गोष्टीला विचारत नाही. माझ्या लग्नपत्रिकेवर देवाचा उल्लेख नाही. मी फक्त रविवार हा सगळ्यांना सोयीचा वार पाहून, अक्षरशः एकही विधी न करता, रजिस्टर्ड मॅरेज केलं आहे. आणि सगळं उत्तम चालू आहे.
मला एक सांगा, येथे समाजसुधारणेच्या उदात्त हेतूने कंठशोष करणार्या किती लोकांना तशी खरीच इच्छा असेल ?
अर्थात!
इथे प्रबोधन करता तसे बाहेरही करा म्हणावे. नातेवाईकांत कुणाच्या लग्नाचे बघत असतील तर पत्रिका बघण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करा म्हणावे.
इथे आणि तिथे यात फरक काय? अंतरजाल हा प्रबोधनाचा मिडिया आहे. तुम्ही इथे बाष्कळ चर्चा चाललीये असा गैरसमज करुन घेऊ नका.
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
स
संजय क्षीरसागर Sat, 06/28/2014 - 22:30 नवीन
सूर्य विझणं, पृथ्वी परिभ्रमण कक्षेबाहेर फेकली जाणं, एखादा ग्रह पृथ्वीवर आदळणं यासरख्या घटना; दोन कारणांसाठी नमूद केल्या आहेत. एक, अस्तित्वाच्या व्यापकतेची कल्पना यावी आणि दोन, त्या मानवी नियंत्रणाच्या सर्वस्वी पलिकडे आहेत. थोडक्यात, कुंडलीसारख्या छ्दाम गोष्टीत त्या बसणं अशक्य आहे. तुम्ही थोडा जरी विचार करु शकलात तर इतक्या दूर जाण्याचीही गरज नाही. रक्ताभिसरण, पचन, अनेकविध संप्रेरकांचे स्त्रवण, उत्सर्जन, मेंदू आणि मज्जासंस्थेचं कार्य यासारख्या देह जीवंत राहण्यासाठी असलेल्या अत्यंत बेसिक प्रक्रिया, जातकाच्या इच्छेपलिकडे आहेत. आता अशी कल्पना करा की एखादी बस जातकाला एका विविक्षित वेळी उडवणार आहे. तर त्या बसचालकाच्याही उपरनिर्दिष्ट शारीरिक घटना, बसच्या मेकॅनिझमचं फेल्युअर, ऐन वेळी सदर जातक (ऊडवला जाण्यासाठी) नेमक्या जागी असणं, या सर्व गोष्टी जातकाच्या आणि ज्योतिष्याच्या इच्छेपलिकडे आहेत. तस्मात, जातकाच्या जीवनात अमुक एक घटना विविक्षित वेळी घडेल हे ग्रह-तार्‍यांच्या भविष्यकालीन स्थितीवरुन, वर्तमानात विदित करणं हास्यास्पद आहे. आता पुढे -
१) कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही.
ही वस्तुस्थिती हरेक क्षणी आहे. यावर तुम्ही म्हटलंय `हे ही खरे ठरण्यासाठी त्याव्यक्तिचे आयुष्य संपले तर पाहीजे.' आयुष्य केव्हा संपेल हे सांगता येत नाही, हा मूळ मुद्दा आहे. जर पुढचा क्षणच अनिश्चित आहे तर भविष्यवाणीला अर्थ नाही. आणि तुम्ही म्हणतायं आयुष्य संपले तर पाहिजे! आयुष्य संपल्यावर काय करणार भविष्यवाणी? २) आपण अस्तित्वाशी समरुप आहोत. आपण काहीही केलं तरी त्यापासून वेगळे होऊ शकत नाही. हे अस्तित्व इतकं व्यापक, अगाध आणि रहस्यमय आहे की ते एखाद्या यकःश्चित जातकाच्या कुंडलीवरनं, पुढल्या क्षणी काय रुप घेईल हे ठरवणं म्हणजे अज्ञानाची परिसिमा आहे. शिवाय कुंडली ही अखिल अस्तित्वाशी तुलना करता एका नगण्य व्यक्तीच्या जन्मवेळेची, अत्यंत तोकडी आणि अंशमात्र पॅरामिटर्स असलेली भूतकालीन घटना आहे. आणि कुंडलीचा संदर्भ घेणं म्हणजे अस्तित्व हे सदरहू व्यक्तीच्या जन्मापासून सुरु झालं असं समजणं आहे. तस्मात, जातकाच्या जन्मापूर्वीचा अस्तित्वाचा अनंत कालावधी, सोयिस्करपणे विसरणं ही सुद्धा तितकीच मूढता आहे. त्यामुळे तुमचं हे विधान :
हेच तर शक्य करुन दाखविले आहे ज्योतिषशास्त्राने!
सर्वस्वी फोल आहे. शेवटी आपण मला ज्योतिषशस्त्रावरची पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला आहे. त्यापेक्षा आपण ज्योतिषास्त्रावरची पुस्तकं वाचणं बंद केलंत तर वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक विचारसरणी विकसित होईल.
↩ प्रतिसाद: आयुर्हित
क
कंजूस Fri, 06/27/2014 - 03:19 नवीन
एकेक अंशापर्यँत जाऊन काय वेगळा शोध लावलेला नाही .त्यामुळे भावचलित अभ्यास निरर्थक वाटतो . आपल्याकडे चतुर्थ सुख स्थान संसारी(विशेषत: स्त्रिया) लोकांसाठी आणि व्ययस्थान साधूसंतांसाठी फार महत्त्वाचे आहे .इथे अंशात्मक चा काही उपयोग नाही .चांगले /वाईट होतेच . मुलगी सुखी होणार का हा प्रश्न सर्वाँना भेडसावत असतो .याचा निकाल लावायला एक लग्नकुंडली पुरेशी असते कशाला अंशात्मक खटाटोप करतात ? पुरुषांच्या बाबतीत हा किती कष्ट घेईल ,किती जणांचा पोशिंदा /आधार होईल हे महत्वाचे आहे .अंशात्मक भविष्य काढून सतरंजीवर बसेल का गादीवर याचा काही उपयोग नाही . जुळ्यांच्या कुंडलींचा अभ्यास हा शैक्षणिक उत्सुकतेपोटी केलेला प्रयत्न आहे .
म
मुक्त विहारि Fri, 06/27/2014 - 04:19 नवीन
ह्या साध्या प्रश्र्नाचे उत्तर कुणी देवू शकेल का?
स
सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 06:31 नवीन
माझा ज्योतिषशास्त्राचा थोडा म्हणजे अगदि प्राथमिक स्तरावरचा अभ्यास आहे, त्यादृष्टीने मी स्वत:ला अजून बिगरी ईयत्तेत आहे असेच समजतो, त्यामुळे आपण जे चर्चेचे विषय उपस्थित केले आहेत त्या विषयावर काही भाष्य करण्या इतकी माझी क्षमता नाही आणि लायकीही नाही. आपले काही लिखाण मी वाचले आहे त्यामुळे आपले चौफ्रर ज्ञान, व्यासंग किती दांडगा आहे याची मला कल्पना आहे त्यामुळे आपला हा चर्चेचा प्रस्ताव मला एकाद्या हिंदकेसरी पैलवानाने शड्डू ठोकून एखाद्या शाळकरी, शेंबड्या पोराला कुस्तीचे आमंत्रण दिल्यासारखे वाटले. आपल्याला अपेक्षित असलेली चर्चा करण्यास मी स्रर्वतोपरी असमर्थ आहे, क्षमस्व. थोडासा लहान तोंडी मोठा घास असे वाटेल, आपल्याला काही सुचवावे अशी माझी लायकीही नाही पण तरीही हा थोडासा उध्द्टपणा करतोय (त्यासाठीही आगावूच क्षमा मागतो): (1) माझा प्रतिसाद मूळ धागाकर्त्याच्या काही शंकांना माझ्या समजुती प्रमाणे उत्तर देणे हा होता. आपला चर्चा घडवून आणायचा उद्देश जरी स्त्युत्य असला तरि ह्या धाग्यावर तो करणे हे बरोबर नाही असे मला वाटते , त्यासाठी आपण दुसरा धागा काढावा असे नम्र पणे सुचवावेसे वाट्ते. मी अनेक चर्चा ग्रुप्स चा सभासद आहे , सर्वत्र एक नियम कसोशीनी पाळला जातो तो म्हणजे मूळ धाग्याच्या विषयाला व उद्देशाला धरुनच पुढले सर्व प्रतिसाद असावेत. मिपा वर दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही. संपादक मंडळाला कार्यबहुल्यामुळे कदाचित वेळ होत नसावा पण निदान आपल्या सारख्या विद्वान , सुसंस्कृत ,सर्वमान्य , वरिष्ठ सभासदांनी तरी स्वयंशिस्तीने हा नियम पाळावा असे मला मनापासून वाटते. (2) आपला ज्योतिषशास्त्रा वर चर्चा करण्याचा उद्देश चांगला आहे हे मान्य ,पण म्हणून काय दिसेल त्या कोणाही लुंग्यासुग्याला (म्हणजे मी) चर्चेचे प्रस्ताव देत फिरणार का ? ज्याच्याशी चर्चा करायची तो निदान आपल्या बरोबरीचा तरी आहे ह्याची खात्री तरी नको का करुन घ्यायला , श्री आद्य शंकराचार्यांनी सुद्धा वादविवादा साठी तितक्याच तोलामोलाचे श्री मंडणमिश्र बघितले हो, एखाद्या चारघरी भिक्षुकी करुन पोटाची खळगी भरणार्‍या बाळंभटाशी नाही चर्चा करत बसले! माझ्या अल्प माहीती प्रमाणे ,ज्योतिष या विषयातली अनेक ऋषीतुल्य व्यक्तीमत्वे सध्या हयात आहेत उदाहरणेंच द्यायची तर : पुण्यात श्री व.दा.भट , श्री जकातदार ,श्री मारटकर आहेत, मुंबईत श्री शरद उपाध्ये, श्री घोंडोपंत आपटे आहेत , ठाण्यात श्री सुनिल गोधळेकर आहेत, डोंबिवलीत श्री श्री श्र्री भट आहेत, नाशीक येथे श्री वाईकर आहेत, भोपाळ येथे श्री मदन त्रिवेदी , श्री हंसराज आहेत, रांची येथे श्री महापात्रा आहेत, बडोद्यात सौ कंकणा राठोड आहेत, नवी दिल्लीत श्री के एन राव ,सौ रिमा कोमार आहेत, इंदूर मध्ये श्री जयंत सोमण आहेत, चेन्नईत श्री के सुब्रमण्यम आहेत, हैद्रबादेत श्री पुन्नेश्वर राव ,श्री राजेंद्र निमजे (हे आय ए एस ऑफिसर आहेत) आहेत, प्रागज्योतिष्पुरात श्री संजय रथ आहेत, वाराणसी मध्ये श्री केवलराम आचार्य आहेत, अहमदबादेत श्री कनक बोस्मीया आहेत, मदुराईत श्री के भास्करन आहेत, अमेरिकेत श्री जेम्स ब्रहा , श्री रॉबर्ट स्वबोधा ,सौ लिझ ग्रीन , श्री पॉल व्होगन , श्री नोएल टील, सौ मार्था वेस्कॉट, सौ जेन हॅंपर, सौ ली लेहमन , श्री हार्त दी फऊ आहेत (जे सध्या भारतात नवी दिल्ली येथे आले आहेत) , लंडन मध्ये श्री जॉन फ्रावले आ, सौ कोमील्ला सूटन , सौ डोन्ना कनिंघॅम आहेत ,जर्मनी येथे श्री बाल्डुर रहेनोल्ड इबर्टीन आहेत, नेदर्लॅन्ड्स येथे सौ हमाकर झोंडॅग आहेत, द.कोरियात श्री टीन वीन आहेत ही मंड्ळी कदाचित आपल्या तोलामोलाची असावित असे मला वाट्ते (कदाचित शब्द यासाठीच वापरला की आपण या लोकांनाही भारी पडणार यात शंकाच नाही पण सामना अगदिच एकतर्फी होणार नाही असे वाटते) त्यांच्याशी चर्चा करण्यात समाधान आहे का एखाद्या नवख्या विद्यार्थ्याला चर्चेला बोलावून नामोहरम करण्यात आहे? पुन्हा एकदा मी आपण दिलेला चर्चेचा प्रस्ताव स्विकारु शकत नाही , माझी तेव्हढी क्षमता नाही काय करणार> तेव्हा या बद्दल क्षमस्व.
ब
बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 07:44 नवीन
सर्वत्र एक नियम कसोशीनी पाळला जातो तो म्हणजे मूळ धाग्याच्या विषयाला व उद्देशाला धरुनच पुढले सर्व प्रतिसाद असावेत. मिपा वर दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही.
इथे विषयाच्या मुळाशी जाउन प्रश्न विचारले गेले आहेत. अवांतर नव्हेत. जर त्याला उत्तर नसेल किंवा असे प्रश्न येउ नयेत असे वाटत असेल ज्योतिषविषयक एका क्लोजड ग्रुपची गरज आहे.. मिसळपावसारख्या खुल्या फोरमवर तशी अपेक्षा चुकिची आहे. बाकी तुमच्या यादितल्या ऋषीतुल्यंपैकी कोणाकडुनही, वरील किंवा ज्योतिषविषयक इतर मूलभूत प्रश्नांवर समाधानकारक उत्तर ऐकण्यास आतुर आहे.. कुठल्याही फोरमवर!!
↩ प्रतिसाद: सरळमार्गी
स
सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 08:49 नवीन
चांगला विचार आहे , मी यादी तर दिली आहे, या यादीतले सर्वच मान्यवर आहेत, प्रसिद्ध आहेत, बहुतेकांच्या स्वत:च्या वेबसाईटस, ब्लॉगज आहेत, काही फेसबुक वर आहेत, यादीतल्या 70% गुरुजनांनी ज्योतिषशास्त्रावर ग्रंथ लिहले आहे, ते बाजारात उपलब्ध आहेत, त्या ग्रंथांत त्यांचे परिचय आहेत, संपर्कासाठीचे पत्ते आहेत. गुगल केलेततरीही बरीच माहीती त्यांच्याबद्दल मीळू शकेल .' ऋषीतुल्यंपैकी कोणाकडुनही, वरील किंवा ज्योतिषविषयक इतर मूलभूत प्रश्नांवर समाधानकारक उत्तर ऐकण्यास आतुर आहे" हे मला सांगून काही उपयोग होणार नाही कारण मी थोडाच त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम बघतोय ! आपण त्याच्याशी संपर्क साधू शकता, काय चर्चा करायची ती करु शकता, तुम्हाला कोणीही आडवलेले नाही. खरे ना ?
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा