भाव चलित कुंडली आणि इतर षोडशवर्ग कुंडल्या ....
महत्वाची सुचना:
ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे.
त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद!!!
चर्चेचा विषय:
निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते??
लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ?
उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ?
लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते?
तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात?
उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ?
कृपया विस्तार पूर्वक चर्चा येथे अपेक्षित आहे.
धन्यवाद!!!
- नोकरी कधी लागेल
- कोणत्या प्रकाराची असेल
- कोणत्या क्षेत्रातली असेल
- नोकरी निमित्त सध्याचे राहण्याचे ठिकाण सोडून दूर जावे लागेल का
- नोकरी सुखावह असेल का,
- नोकरीत प्रगतिच्या संधी कितपत आहेत
- नोकरीत वरिष्ठांशी संबंध कसे राहतील
- ही मिळालेली नोकरी किती काळ टिकेल
- नोकरी फार काळ टिकणारी नसेल तर त्याचे कारण काय असू शकेल..
- नोकरी लाभदायक ठरेल का व्यवसाय
- कोणत्या क्षेत्रातली नोकरी / व्यवसाय लाभदायक ठरु शकेल
- नोकरी सांभाळून व्यवसाय करता येईल का
- आई वडिल, भाऊ बहिण, पत्नी वा अन्य जवळच्या नात्यातल्या व्यक्तीच्या नावावर धंदा केल्यास तो लाभदायक ठरेल का
- व्यवसायाचे योग असतील तर ते केव्हा
- व्यवसाय स्वतंत्र करणे लाभदायक ठरेल का भागीदारीतला
- भागीदारीतला व्यवसायच जर असेल तर भागीदार केव्हा मिळतील, ते कसे असतील
- व्यवसाया साठी लागणारे कर्ज उपलब्ध होईल का
- व्यवसाय करतान सरकार दरबार च्या काही अडचणीं येऊ शकतात का
- नोकरी / व्यवसाया निमित्त परदेश गमनाचे योग आहेत का , असल्यास केव्हा
अशा अनेक अंगाने त्या तरुणास मार्गदर्शन मिळू शकते. आणि हे सर्व एका जन्मकुंड्ली वरून ( अथवा प्रश्नकुंडली) वरुन बघता येते (जीला इथे कचर्याचा टोपलीत फेकून दिले आहे! ) नाणेफेकीचा कौल ही इतकी माहीती देऊ शकेल? 'वडा पाव ' पण पोट भरण्याचे काम करतो म्हणून त्याची 'गुजराथी थाळी' / 'फाईव्ह कोर्स' डिनर शी तुलना करायची का?