Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<पोरगीपटावशास्त्र - लग्न तरुणी, भावखाऊ तरुणी आणि इतर षोडशवर्ष तरुणी >

र
राजेश घासकडवी यांनी
Sun, 06/29/2014 - 17:13  ·  लेख
लेख
महत्वाची सुचना: पोरगीपटाव शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा.... चर्चेचा विषयच मुळात पोरगीपटाव शास्त्राशी संबंधीत आहे. त्यामुळे येथे "पोरगीपटाव शास्त्र खरे की खोटे" किंवा "पोरगीपटाव शास्त्राचा उपयोग होतो की नाही" यावर चर्चा अपेक्षित नाही. तेव्हा खबरदार जर कोणी याविरुद्ध बोलाल तर. मिपाला कुठच्याच विषयाचं वावडं नाही हे ध्यानात ठेवा!! धन्यवाद!!! चर्चेचा विषय: सुंदर पण भाव खाऊ तरुणी मध्ये नक्की काय बघायचे असते?? लग्न तरुणी कडून मिळणारे भाव फळ गोड असते की भाव खाऊ तरुणींकडून? उदा: तुमचा नंबर लग्न तरुणीच्या लिस्टवर तिसऱ्या स्थानावर आहे पण भावखाऊ तरुणीच्या यादीत तो सत्ताविसाव्या स्थानात आहे (अशी निदान तुम्हाला तरी आशा आहे) तर कोणत्या तरुणीच्या मागे लागून तुम्हाला फळ मिळेल ? भावखाऊ तरुणीच्या मागे लोचटपणा यशस्वी होण्यासाठी पोरगीपटाव शास्त्रात कुठचे उपाय सांगितलेले आहेत? लग्नासाठी पोरगी , नुसतीच फ्रेंडशिप देणारी पोरगी आणि भावखाऊ पोरगी यापैकी कोणत्या प्रकारच्या तरुणींना पटवावे? तसेच वरील ३ प्रकारच्या पोरींच्या आसपासच इतर अनेक षोडशवर्ष तरुणी दिसत असतात. त्या नेमक्या कशा व केव्हा पटवाव्यात? उदा: लिव्हिन नात्यात असताना इतर नॉनलिव्हिन तरुणी कशी पटवायची? मी या धाग्यात निम्म्यापेक्षा अधिक शब्द चर्चा कोणी करू नये हे सांगितलं असलं म्हणून काय झालं. तुमच्याकडून मात्र कृपया विस्तार पूर्वक चर्चा येथे अपेक्षित आहे. आणि पुन्हा एकदा, पोरगीपटावशास्त्राला एका शब्दानेही बरोबर की चूक विचाराल तर माझ्याशी गाठ आहे. (म्हणजे काय ते विचारू नये, कारण मी काही या धाग्यावर एकही प्रतिसाद देणार नाहीये...) धन्यवाद!!!

प्रतिक्रिया द्या
28178 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

ए
एस Sun, 06/29/2014 - 17:42 नवीन
मी पयला
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 06/30/2014 - 01:40 नवीन
शतक नक्की !!
  • Log in or register to post comments
ध
धन्या Mon, 06/30/2014 - 03:21 नवीन
पोरगीपटाव हे शास्त्र नाही. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 06/30/2014 - 04:59 नवीन
तो आण्भव अस्तो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
च
चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 05:49 नवीन
पोरगीपटाव शास्त्र अर्थात 'पोपशास्त्र' हे सुप्रसिद्ध 'कोकशास्त्र' याचा प्रथम अध्याय आहे. भारतीय संस्कृतीत या शास्त्राचा उगम शंकर-उमा यांच्या प्रणयातून झाला, असे समजले जाते. पाश्चात्त्य संस्कृतीत या शास्त्राचा आद्य पुरुष 'आदम' वा अ‍ॅडम हा असून त्याने ईव्ह नामेकरून पोरगीस पटविले, असे त्यांच्या 'ओल्ड टेस्टामेंट' नामक प्राचीन ग्रंथात प्रतिपादित केलेले आहे. पोपशास्त्रात अत्यंत प्रवीण असलेल्यास 'पोप' असे म्हणत, आणि ते लोक 'कोक' नामक पेय पीत. कालांतराने त्यांच्या प्रमुख धर्मगुरूस 'पोप' म्हणू लागले. Image removed..Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/30/2014 - 09:05 नवीन
ळॉळ ळॉळ =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
व
विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 04:34 नवीन
पहिल्या चित्रतील माणुस त्या म्हातार्‍या माणसाला का उचलतोय ? तो त्याचा होउ घातलेला सासरा किवा त्या खाली पडलेल्या स्त्रीचा पिता आहे का? तज्ञानी अज्ञांना खुलासा करावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Tue, 07/01/2014 - 04:48 नवीन
अहो तो म्हातारा दाढीवाला म्हणजे चक्क सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, परम दयाळू 'गॉड' आहे, आणि त्यानेच बनवलेल्या आदमने पोपशास्त्रात प्राविण्य मिळवून ईव्हला पटवल्याने संतापून तो त्या दोघांची हाकालपट्टी करतो आहे हेवन मधून. गॉडचे लांबलचक अंगरखे वगैरे सावरायला देवदूत तत्परतेने हजर आहेत. च्यामारी, त्या सर्वज्ञ, सर्वशक्तिमान गॉडास आधीच कसे कळले नाही, हे असले लफडे होणार म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 05:22 नवीन
गॉडचे लांबलचक अंगरखे वगैरे सावरायला देवदूत तत्परतेने हजर आहेत.
हे बरीक मजेशीर हो. ज्याला स्वतःचे अंगवस्त्र. अर्र चुकलो अंगरखा सावरता येत नाही त्याला गॉड म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/02/2014 - 19:18 नवीन
तो म्हातारा त्या बिचार्‍या स्त्रीच्या डोक्यावर पडू नये म्हणून त्या लहान मुलाचा प्रयत्न चालला आहे असेच दिसते आहे :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ए
एस Wed, 07/02/2014 - 20:38 नवीन
तो म्हातारा त्या बिचार्‍या स्त्रीच्या डोक्यावर पडू नये म्हणून त्या लहान मुलाचा प्रयत्न चालला आहे असेच दिसते आहे
अगदी अगदी! मलाही हे चित्र पाहिल्यापाहिल्या असंच वाटलं होतं... Image removed. *ROFL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
र
राजेश घासकडवी Mon, 06/30/2014 - 06:09 नवीन
धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... आमच्या होमिऑपॅथी ला शास्त्र मानत नाहीस , ज्योतिष शास्त्राला शास्त्र मानत नाहीस ... इथपर्यंत ठीक आहे. पण पोरगीपटाव शास्त्राला तू शास्त्र मानत नाहीस? आमच्या भावना दुखावल्या. आणि आमच्या भावना मरू देत. पण स्वतःला काही अनुभव नाही आला म्हणून शास्त्रच नाकारायचं? हे काही बरोबर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/30/2014 - 09:17 नवीन
धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... आमच्या होमिऑपॅथी ला शास्त्र मानत नाहीस , ज्योतिष शास्त्राला शास्त्र मानत नाहीस ... इथपर्यंत ठीक आहे. पण पोरगीपटाव शास्त्राला तू शास्त्र मानत नाहीस? आमच्या भावना दुखावल्या. धन्या , थांब तुझ्यावर राखी सावंतच सोडतो *biggrin* Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
श
श्री गावसेना प्रमुख Mon, 06/30/2014 - 06:09 नवीन
सुंदर पण भाव खाऊ तरुणी मध्ये नक्की काय बघायचे असते?? प्रेम आंधळ असत असे म्हनतात,त्यामुळे काहीच बघु नये
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Mon, 06/30/2014 - 06:18 नवीन
पोरगीपटाव शास्त्रच आहे पण पोरगी पटवणारे सगळे भंपक आहेत.. बाकी चालू द्या!!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 06/30/2014 - 12:35 नवीन
सगळे भंपक नाही, काही जण भंपक आहेत. ते शास्त्र कसं वापरायचं हे त्यांना कळत नाही. त्याांना चांगले अनुभव येत नाही. आणि मग त्या गोष्टीतल्या कोल्ह्याप्रमाणे 'शास्त्रच आंबट' म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
अ
अनुप ढेरे Mon, 06/30/2014 - 06:27 नवीन
या शास्त्राची चर्चा करणार्‍यांना कधीही फलप्राप्ती होत नाही. म्हणजे पोरगी पटत नाही.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 06:30 नवीन
सुंदर पण भाव खाऊ तरुणी मध्ये नक्की काय बघायचे असते??
आम्ही वरती दिलेल्या दोन चित्रांतून याचे उत्तर मिळावे.
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 06/30/2014 - 07:39 नवीन
काय बघायच त्याचा थोडासा अंदाज आलाय चित्रांवरुन पण अहो अस कुणी दाखवत का ? बघणारे लाख होते कालिंदीच्या तटाला ज्याला दाखविले प्रेम गोपींनी तो एकच कृष्ण होता. बाकी तुमची चित्र अतिशय सात्विक आणि उत्कट भाव उत्पन्न करणारी अशी आहेत. सत्यम शिवम सुंदरम चा प्रत्यय देणारी व कुठल्याही नियंत्रणाची गरज नसलेली आहेत. याने कुणाच्याही भावना दुखावु शकत नाहीत व ही अश्लील तर मुळीच नाहीत. आणी याने मिपा हे संस्थळ कीती प्रगल्भ सर्वसमावेशक मुक्त आधुनिक लोकशाहीवादी आहे याचा व मला इथे वावरता येते याचा अभिमान वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 11:10 नवीन
अस कुणी दाखवत का ?
बघावसं तर वाटतं, पण बघायला मिळत नाही, म्हणूनच चित्र, शिल्प, सिनेमा यातून प्रेक्षक ही हौस भागवून घेत असतात. काही आदिवासी जमातीत सर्व स्त्रीपुरुष अनावृत्त रहातात, ते चित्रे वगैरे काढत नाहीत. मी आर्टस्कुलात शिकत होतो, तेंव्हा आमचे सक्सेना सर सांगायचे, घरी बसू नका, नदीवर जा, आणि तिथे स्नान करणारांची स्केचेस करत जा. मंदिरांमधून प्राचीन मूर्तीकारांनी घडवलेल्या सुंदर मूर्तींना पुजारी, भक्त वगैरे बटबटीत वस्त्रे चढवून ठेवतात, ते मला अत्यंत अश्लील वाटते, आणि त्या मूर्तीकारांच्या कलेचा अपमान वाटतो. खालील चित्र बघा: याचे नाव 'Sacred and Profane Love असे आहे, आणि विषेश म्हणजे डावीकडील सवस्त्र स्त्री लौकिक/अपवित्र प्रेमाचे प्रतीक, तर उजवीकडील निर्वस्त्र स्त्री अलौकिक/पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे. Image removed. चित्रकारः Titian ( c. 1514) Oil on canvas 118 × 279 cm (46.5 × 109.8 in) या चित्राबद्दल वाचताना अचानक मला आणखी एक चित्र दिसले, त्याचा या धाग्याशी तसा संबंध नसला, तरी वाचकांनी ते बघावे असे वाटले, म्हणून देतो आहे: Image removed. चित्रकारः Joseph Anton Koch (1768 – 1839) 'Jacob Encountering Rachel with her Father's Herds' (1836) Oil on canvas, 66 x 92 cm -- Österreichische Galerie, Vienna
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/30/2014 - 11:19 नवीन
मंदिरांमधून प्राचीन मूर्तीकारांनी घडवलेल्या सुंदर मूर्तींना पुजारी, भक्त वगैरे बटबटीत वस्त्रे चढवून ठेवतात, ते मला अत्यंत अश्लील वाटते, आणि त्या मूर्तीकारांच्या कलेचा अपमान वाटतो.
१००% सहमत आहे ! काही मंदिरात काकड आरतीला उपस्थिर तहाण्याचा योग आल्याने देवांव्या निर्वस्त्र मुर्ती पाहण्याचे सौभाग्य मिळालेले आहे आणि त्या वस्त्रे घातलेल्या मुर्तींपेक्षा १०० पट जास्त सुंदर असतात ह्यात काहीच शंका नाही !! अवांतर १: चित्र क्रमा़ंक १ वरुन जे मुलतःच सुंदर नसतात त्यांनाच त्यांची कुरुपता लपवायला कपड्यांची गरज पडते असे अनुमान काढता येईल काय ? अवांतर २ : दुसरे चित्र लईच सुंदर आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
म
मारवा Mon, 06/30/2014 - 07:18 नवीन
राजेश घासकडवी जी ही चर्चा एसी अक्षरे वर न करता मिसळपाव हे संस्थळ या चर्चेसाठी निवडण्या मागे नेमके कुठले मनो-सामाजिक-राजकीय घटक कार्यरत आहेत यावर कृपया प्रकाश टाकावा. यामध्ये १- संस्थळाकडे बघण्याचा द्रुष्टीकोण २- सदस्यांकडे बघण्याचा द्रुष्टीकोण ३- विषय उचलला पाडणे जाण्यासंदर्भातील अदमास. ४- राजकीय भुमिका ५- कप्पेबंद मानसिकता या वरील खास पैलुंसंदर्भात खुलासा केल्यास संस्थळाकलन वाढीस मदत होइल व सदस्यांचे संस्थळ वाइज आचरण भिन्न का असते याचे ही आकलन होइल. हा प्रश्न कृपया व्यक्तीगत घेउ नये अनेक सदस्यांचे संस्थळ सापेक्ष वर्तन लेखन बदलते कसे का व कुठल्या घटकांच्या प्रभावाखाली याची एक उत्सुकता मला नेहमीच वाटत आली आहे म्हणुन हा प्रश्न विचारला पुन्हा एकदा विनंती प्रश्न पातिनिधीक आहे व्यक्तीगत घेउ नये माणुस पावलो पावली संस्थळी संस्थळी का वेगळा वागतो असा तात्विक आहे.
  • Log in or register to post comments
द
दिनेश सायगल Mon, 06/30/2014 - 10:07 नवीन
मिपाला कुठच्याच विषयाचं वावडं नाही हे ध्यानात ठेवा!! धन्यवाद!!!
लेखकमहोदयांना या विषयावर चर्चा अपेक्षित होती. तुम्ही मिपाकर वैट्ट आहात. भलत्याच गोष्टींबद्दल चर्चा करत बसलाय! शिवाय लेखकमजकूरांचं मिपावर किती प्रेम आहे हे विसरलात काय? ते एकवेळ स्वतःच्या सायटीवर लॉग इन करणार नाहीत, पण मीपावर नक्कीच करतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
र
राजेश घासकडवी Mon, 06/30/2014 - 12:30 नवीन
ही चर्चा एसी अक्षरे वर न करता मिसळपाव हे संस्थळ या चर्चेसाठी निवडण्या मागे नेमके कुठले मनो-सामाजिक-राजकीय घटक कार्यरत आहेत यावर कृपया प्रकाश टाकावा.
याचं उत्तर सोपं आहे. मिपावरच्या लेखाचं विडंबन करायचं तर ते मिपावरच करावं या मताचा मी आहे. एक म्हणजे इथल्या मूळ लेखाचे, त्यावर झालेल्या चर्चेचे संदर्भ इथेच ताजे असतात. दुसरं म्हणजे इतरत्र विडंबन केलं तर त्याला 'इथली धुणी तिथे धुण्याचा' वास येतो. माणूस संस्थळी संस्थळी वेगळा का वागतो याचं कारण प्रत्येक संस्थळाची प्रकृती वेगळी असते. असो, अवांतर आणि गंभीर चर्चा फार झाली. तुम्हाला पोरगीपटावशास्त्राबद्दल काही बोलायचं असेल तर बोला. नाहीतर या चर्चेपासून दूरच रहा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सुहास.. Mon, 06/30/2014 - 13:15 नवीन
हाहाहाहाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
न
नगरीनिरंजन Mon, 06/30/2014 - 07:55 नवीन
भारतीय सुसंस्कृत तारुण्य हे भारतीय पहरावावरून पाहिले जाते. तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आईवडिलांचे जे चारित्र्य असते तेच त्या व्यक्तीचे जन्म चारित्र्य समजले जाते. मात्र इंग्रजी चित्रपटांमधे जे लैंगिक/सामाजिक/भावनिक वगैरे तारुण्य येते त्यामधले चारित्र्य इंग्रजी संस्कृतीच्या धारणांवरुन ठरते. त्यामुळे भारतीय सुसंस्कृत तारुण्य आणि पश्चिमात्य तारुण्य यांच्यात सुसुत्रता असण्याची काही शक्यता असते का? तार्किकदृष्टया विचार करता ती तशी नसणार हे उघड आहे. मात्र काही सांगड घालणार्‍या बाबी असतील तर त्या जाणून घेण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Mon, 06/30/2014 - 10:32 नवीन
पश्चिमात्य संस्कृतीत जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय संस्कृतीत ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय संस्कृतीत फारच सर्वंकश विचार होतो असे वाटते. फक्त गुणमिलनाचा(फीचर्स) विचार करणे म्हणजे फक्त ठराविक घटक विचारात घेणे होय. पोरगीपटाव शास्त्र कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा सल्ले कोणी आणि कोणता आधार मानून दिले आहेत हे महत्वाचे आहे. उदा: सल्लुमियां हे गुणमिलन आधार मानुनच पोरी पटवितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
र
राजेश घासकडवी Mon, 06/30/2014 - 22:12 नवीन
हा प्रतिसाद किमान तीनदा यायला हवा होता, श्री थॉर माणूस. त्याशिवाय पुरेसा सर्वंकश विचार होत नाही. भारतीय संस्कृतीत गुणमीलनाचा विचार लग्न तरुणीच्या बाबतीत केला जातो. बाकीच्या तरुणींबाबत निव्वळ मीलनाचा विचार केला जातो. पोरगीपटावशास्त्राचे साधक अनेक वेळा याचमुळे असफल होतात. आणि मग शास्त्रालाच दोष देत बसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
थ
थॉर माणूस Tue, 07/01/2014 - 07:17 नवीन
आय माय स्वारी बरं का... हे लक्षातच आलं नाही आमच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
च
चित्रगुप्त Mon, 06/30/2014 - 11:15 नवीन
भारतीय सुसंस्कृत तारुण्य आणि पश्चिमात्य तारुण्य यांच्यात सुसुत्रता असण्याची काही शक्यता असते का?
इथे कोणते 'पश्चिमात्य तारुण्य' अभिप्रेत आहे, सुसंस्कृत की असंस्कृत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/30/2014 - 20:24 नवीन
सुसंस्कृत की असंस्कृत ? असा प्रश्न तुम्हाला का बरे पडला. दोन्हीं शब्दांची "संस्कृत" हीच जननी आहे हे तर त्या शब्दांवरून सिद्ध होते आहे. ते तारुण्य आहे एवढेच आताच्या धाग्यावर व्दिशतक करायला पुरेसे नाही काय ? मग ते 'अ' किंवा 'सु' काहीही 'असु' देत. काय फरक पडतो ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
व
विजुभाऊ Tue, 07/01/2014 - 04:41 नवीन
ते 'अ' किंवा 'सु' काहीही 'असु' देत. काय फरक पडतो ???
इस्पिकचा एक्का भाउ. खूप मोठा फरक पडतो हो. सु किंवा अ असल्यामुळे हेच घ्याना. सुंदर आणि अंदर हे दोन काय समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द नाहिय्येत. आपण म्हणताना ती कन्या सुंदर आहे असे म्हणतो. ती कन्या अंदर आहे असे म्हंटले तर वेगळाच अर्थ होतो. किंवा मग सुदूर दृष्टी आणि अदूरदृष्टी. लहानमुलाना लघवी करायची का असा प्रश्न विचारताना आया "सु " जायचे का असेच विचारतात." अ" ला जायचे का असे नाही विचारत. तात्पर्य काय सु आणि अ हे दोन स्वतन्त्र उपसर्ग आहेत त्यात गल्लत करुन चालणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मारवा Mon, 06/30/2014 - 08:03 नवीन
पोपशास्त्रात अत्यंत प्रवीण असलेल्यास 'पोप' असे म्हणत तुम्ही पोप या शब्दाचा उलगडुन दाखविलेला अर्थ तर तुमच्या कलाकाराच्या खास दुर्मिळ अशा अनिर्बंध कल्पनाशक्तीचा अविष्कार च आहे याने सर्व ख्रिश्चन बांधव साइभक्तांसारखे आनंदुन जातील फादर फ्रान्सीस दिब्रीटों व सिसीलिया कार्व्हालो यांचा तर पोप या शब्दाची ही नविन व्युत्पत्ती वाचुन उर आनंदाने अभिमानाने भरुन येइल अशीच आहे. पोप या शब्दाला तुम्ही दिलेला हा नविन पवित्र आयाम तर सर्व ख्रिश्चन बांधवांना तुमच कायमच प्रेम मिळवुन देइल. शिवाय तुमचा सेन्स ऑफ ह्युमर ही परत एकदा वाखाणला जाइल शिवाय याने मिपा या संस्थळाची सर्वधर्म समभावा प्रति असलेली जाणीव जागरुकता व संवेदनशीलता पण दिसुन येइल.यानंतर मिपा च्या लेखनातील सेन्स ऑफ ह्युमर ला कोणीही आव्हान देउ शकणार नाही आफ्टर ऑल ह्युमर इज द ग्रेटेस्ट रीलीजन इन द वर्ल्ड
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Mon, 06/30/2014 - 09:17 नवीन
मिपाचा दर्जा खालावतोय का हो ? तुर्त एव्हढेच...
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 06/30/2014 - 09:35 नवीन
ब्यान केला जाण्याची शक्यता वर्तवुन माझे दोन शब्द संपवतो...सं.म. ना दिवसपाळीच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 06/30/2014 - 10:47 नवीन
पोपशास्त्रावर धागा येणार। मिपाकर ते थोतांड मानणार॥ नेहमीची वादावादी होणार। राघा अडणार निश्चित॥ -शास्त्रज्ञ
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 06/30/2014 - 10:51 नवीन
स्त्रियांना अशी भोगवस्तू बनवणं काय पटलं नाय बुवा. पोरगी पटवणंबिटवणं काय? तरुणीला प्रेमाची गळ घालणं असं सांस्कृतिक बोला की. पोरी पण माणूसच असतात की. त्यांच्या मनाचा काय विचार हाय का नाय?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 06/30/2014 - 11:04 नवीन
तरुणीला प्रेमाची गळ घालणं असं सांस्कृतिक बोला की.
तरुणीला प्रेमाचा गळ टाकून ओढून घेणे हे रूपकच मुळात स्त्रीद्वेष्टे आणि पुरुषप्रधान आहे. स्त्रिया जणू कुठल्या तलावात तरंगत असतात आणि पुरुष क्रूरपणे त्यांना या पाशात ओढून घेतात हे रूपक हिंसक पुरुषी वृत्ती दर्शविते. तुम्ही ते 'द सेकंड केक्स' वाचा, सुप्राकॉन्शसच्या लेव्हलवरून ऑकल्ट एक्स्पीरिअन्सेस घेताना समजून जाईल बघा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ध
धन्या Mon, 06/30/2014 - 13:09 नवीन
तू पुर्ण वाचले का ते पुस्तक? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 06/30/2014 - 13:10 नवीन
होय. पण वाचल्याला बरीच वर्षे झालीत, पुन्हा एकवार नीट वाचले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
स
सामान्यनागरिक Tue, 07/01/2014 - 07:10 नवीन
परत एकदा अशी पुस्तके वाचायचा प्रयत्न करताय म्हणजे चाळीशी म्हणजे दुसरी जवानी आली की काय ? पण हल्लीच्या पोरी जरा अवघडच असतात हे ध्यानांत घ्यावे ! 'चल भिडु , पुढे जाण्यापूर्वी एकदा टेस्ट ड्राईव्ह करु या' म्हणाली तर तयारी आहेका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 07/01/2014 - 08:44 नवीन
वय आणि चष्मा या दोन्हीही अर्थी आम्ही चाळिशीपासून कोसो दूर आहोत. बाकी टेस्ट/स्ट्रेट/कव्हर ड्राईव्हचे काय ते आम्ही आणि तरुणी पाहून घेऊ ना, तुम्हांला भारी चवकशा? टेस्ट ड्राईव्हच्या प्रपोजलने घाबरलेलात की काय ओ तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/30/2014 - 11:05 नवीन
अवांतर :
त्यांच्या मनाचा काय विचार हाय का नाय?
खरयं...पोरी पण माणूसच असतात ... मन आणि स्वभाव चांगले असले की झाले ह्यावरुन , कॉलेजात असताना पोरं "मन" आणि "स्वभाव" हे दोन शब्द द्वयर्थी वापारायचे त्याची आठवण झाली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ब
बॅटमॅन Mon, 06/30/2014 - 11:07 नवीन
च्यायला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 06/30/2014 - 12:07 नवीन
ते दोन शब्द "स्वभाव" आणि "जबाबदारी" असे आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
वाडीचे सावंत Mon, 06/30/2014 - 19:38 नवीन
वरील शब्दांच्या अर्थाचा सांकेतिक भाषेत खुलासा कराल का ? नाही म्हणजे माझा सार्थ शब्दसमूह वाढेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/30/2014 - 12:13 नवीन
१)एखादी स्त्री आपल्याकडे पाहुन हसत असेल तर ती कोणत्या स्थानात आहे...असे समजावे? ;) २) एखादी स्त्री आपल्याकडे पाहुन गप्प बसत असेल तर (मग) ती कोणत्या स्थानात आहे...असे समजावे? ;)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 06/30/2014 - 12:58 नवीन
२) एखादी स्त्री आपल्याकडे पाहुन गप्प बसत असेल तर (मग) ती कोणत्या स्थानात आहे...असे समजावे?
अरे आत्मु :- इथे सुध्दा ती स्त्री नाही तर पहाणाराच कोणत्या स्थानात आहे हेच पहायला हवे. आठव तो धागा आठव ना स्त्रीची काहीच चुक नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
य
यशोधरा Mon, 06/30/2014 - 13:04 नवीन
ते कदाचित तुमच्याकडे पाहून असे नसू शकते. तुम्हांला पाहून असे असू शकते! *pardon* हलके घ्या अ आ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ख
खटपट्या Mon, 06/30/2014 - 19:23 नवीन
मुलीच्या हसण्यावर आणि कुत्र्याच्या शांत बसण्यावर कधी विश्वास ठेवू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा