<पोरगीपटावशास्त्र - लग्न तरुणी, भावखाऊ तरुणी आणि इतर षोडशवर्ष तरुणी >
महत्वाची सुचना:
पोरगीपटाव शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
चर्चेचा विषयच मुळात पोरगीपटाव शास्त्राशी संबंधीत आहे.
त्यामुळे येथे "पोरगीपटाव शास्त्र खरे की खोटे" किंवा "पोरगीपटाव शास्त्राचा उपयोग होतो की नाही" यावर चर्चा अपेक्षित नाही. तेव्हा खबरदार जर कोणी याविरुद्ध बोलाल तर. मिपाला कुठच्याच विषयाचं वावडं नाही हे ध्यानात ठेवा!! धन्यवाद!!!
चर्चेचा विषय:
सुंदर पण भाव खाऊ तरुणी मध्ये नक्की काय बघायचे असते??
लग्न तरुणी कडून मिळणारे भाव फळ गोड असते की भाव खाऊ तरुणींकडून?
उदा: तुमचा नंबर लग्न तरुणीच्या लिस्टवर तिसऱ्या स्थानावर आहे पण भावखाऊ तरुणीच्या यादीत तो सत्ताविसाव्या स्थानात आहे (अशी निदान तुम्हाला तरी आशा आहे) तर कोणत्या तरुणीच्या मागे लागून तुम्हाला फळ मिळेल ? भावखाऊ तरुणीच्या मागे लोचटपणा यशस्वी होण्यासाठी पोरगीपटाव शास्त्रात कुठचे उपाय सांगितलेले आहेत?
लग्नासाठी पोरगी , नुसतीच फ्रेंडशिप देणारी पोरगी आणि भावखाऊ पोरगी यापैकी कोणत्या प्रकारच्या तरुणींना पटवावे?
तसेच वरील ३ प्रकारच्या पोरींच्या आसपासच इतर अनेक षोडशवर्ष तरुणी दिसत असतात. त्या नेमक्या कशा व केव्हा पटवाव्यात?
उदा: लिव्हिन नात्यात असताना इतर नॉनलिव्हिन तरुणी कशी पटवायची?
मी या धाग्यात निम्म्यापेक्षा अधिक शब्द चर्चा कोणी करू नये हे सांगितलं असलं म्हणून काय झालं. तुमच्याकडून मात्र कृपया विस्तार पूर्वक चर्चा येथे अपेक्षित आहे. आणि पुन्हा एकदा, पोरगीपटावशास्त्राला एका शब्दानेही बरोबर की चूक विचाराल तर माझ्याशी गाठ आहे. (म्हणजे काय ते विचारू नये, कारण मी काही या धाग्यावर एकही प्रतिसाद देणार नाहीये...)
धन्यवाद!!!
जर हे शास्त्रच नसतं तर मनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली असती कामनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली ती पोरगीपटावशास्त्रामुळे? आमच्या मास्तरनं जीवशास्त्रात कायतरी वेगळं सांगीतल्यालं. फकस्त पटवून काय उप्योग? :))मी म्हणतो थियरी मरो, प्रॅक्टिकल करा, प्रॅक्टिकल. अनुभव घ्याहे बराबर..