कल्पना चांगली आहे.
पण फक्त 'कादंबरी'पुरतं विश्व मर्यादित करण्याचा उद्देश समजला नाही. महिनाभरात जे काही वाचलं त्यावर लिहायचं असं ठरलं असतं तर जास्त सोपं झालं असतं लिहायला.
सुरुवात म्हणून
कादंबरीचे नाव - आनंदी गोपाळ
लेखक - श्री. ज. जोशी
भारताबाहेर जाऊन पाश्चात्य वैद्यकशास्त्र शिकलेल्या डॉ. आनंदी बाई गोपाळ जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. स्त्रियांनी शिक्षण घेणे हा सुद्धा जेव्हा गुन्हा समजला जात होता, त्या काळात नवऱ्याच्या हट्टामुळे प्राथमिक शिक्षणापासून ते पुढे वैद्यकीय पदवी मिळेपर्यंतचा प्रवास यात वाचायला मिळतो. गोपाळरावांच्या विक्षिप्तपणाचा त्यांना झालेला त्रास, तरीही जिद्दीने पूर्ण केलेले शिक्षण आणि दुर्दैवाने या सगळ्याला तोंड देताना ओढवलेला शेवट. पुस्तक वाचून आनंदी बाईंच्या प्रतीचा आदर अधिक दुणावतो. त्या काळातले स्त्रियांचे समाज जीवन, संघर्ष, गोपाळ रावांचे काळाच्या पुढचे विचार आणि तरीही अनेक बाबतीत दिसणारा दुराग्रहीपणा, सगळे काही सुन्न करून टाकते. मला आवडलेल्या पुस्तकांपैकी एक.
"दॅट क्वेल रॉबर्ट" नावाचं १००-१५० पानी, छोटेखानी पण जबरदस्त पुस्तक वाचते आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं पुस्तक आहे. अर्धे वाचून झाले आहे.
डॉक्टर अन त्यांच्या पत्नी मिल्ड्रेड यांनी जंगलमय्/रानटी भागात घर घेतले. दोघांना पक्षी नीरीक्षणाची अतिशय आवड. एके दिवशी पहातात तो काय क्वेल मादी व क्वेल(quail) नर दोघे खुरडत खुरडत, जखमी असल्यासारखे चालले आहे. ताबडतोब त्यांच्या लक्षात आले की निसर्गातील पालकांच्या अतिव शौर्याचे उदाहरण ते पहात आहेत. आपल्या पिलांवर लक्ष जाऊ नये म्हणून हे दोघं क्वेल स्वतःकडे लक्ष वेधून घेत होते. मग डॉक्टर व मिल्ड्रेड सुरक्षित अंतरावर गेले अन क्वेल आई तिच्या १२ पिलांना घेऊन गेली.
पण गंमत ही झाली की क्वेलच्या चिमुकल्या व व्यवस्थित लपवलेल्या घरट्यात त्यांना एक अंडे सापडले. ते अंडे त्यांनी दिव्याच्या ऊबेत्/प्रकाशात ठेवले असता ते ऊबले, फुटले व इवलसं ओलं बंबलबी च्या आकाराचं पिलू अंडं फोडून बाहेर आलं. १५ मिनीटात ते पटापट सुकलं अन आक्रोडाच्या आकाराचं दिसू लागलं. त्याचं नाव त्यांनी ठेवलं बॉबी व्हाईट.
पण मग अजून भारदस्त नाव हवं म्हणून ते "रॉबर्ट" या नावात बदललं. मग या दांपत्याने रॉबर्ट्पाशी लहान वाटुलीत दाणा-पाणी ठेवले.आता कोणाला वाटेल की पिलाला जबरदस्तीने खायला घातलं असेल पण नाही हे पिलू ८ तासानंतर स्वतःचे स्वतः खाऊ-पीऊ लागले. फक्त एकदाच त्याला मदत लागली ती म्हणजे त्याची चोच पहील्यांदा पाण्यात बुडवायला. मग मात्र ते स्वावलंबी झाले.
मग त्या पिलाचे स्वभाववैशिष्ट्य, गुणविशेष सगळे पुस्तकातून उलगडू लागतात अन एका क्वेलला किती अक्कल असते, माया असते, लळा असतो इतकेच काय आवडीनिवडी/ पसंत-नापसंत असते ते वाचून थक्क व्हायला होते. हळूहळू रॉबर्ट्ला सुंदर ठीपक्या ठीपक्यांची पिसे आली, तो वयात आला, वगैरे मोहक्/रोचक वर्णने येतात.
पुस्तक अक्षरक्षः खाली ठेववत नाहीये. अॅमेझोनवर ६६ - ५ चांदण्या मिळालेले हे पुस्तक नशीबाने ग्रंथालयात "चकटफू" विभागात मिळाले. बसमध्ये, घरात, ऑफीसात लंच टाइम मध्ये वाचन सुरु आहे.
फ्लिपकार्ट आणि अॅमॅझॉन दोन्हींवर उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर महाग आहे. दुवे -
http://www.flipkart.com/that-quail-robert/p/itmczyn6bphxd6xu?pid=9780060812461&otracker=from-search&srno=t_1&query=that+quail+robert&ref=ce523a93-e6e0-440c-bf35-4fa5130ff2cb
http://www.amazon.in/That-Quail-Robert-Margaret-Stanger/dp/006081246X/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1404310224&sr=8-1&keywords=that+quail+robert
... वाचता वाचता वाढे...
मित्रांनो,
नुकतीच अंधार छाया कादंबरी वाचली.आवडली.
लेखक - मिपाकरांच्या परिचयाचे. शशिकांत ओक.
विषय - अर्थात ऑकल्ट सायन्सेस...
ही छोटेखानी कादंबरी ईबुक म्हणून उपलब्ध. पाने फक्त ७०-७५.
समर्पक मुखपृष्ठ संकल्पना... कादंबरीतील अंधार छायेला रेखाटणारी...
कादंबरी सत्य घटनेवर आधारित असा लेखकाचा दावा. त्याला पूरक त्यातील पात्रे व व्यक्तिरेखा प्रत्यक्ष कशा आहेत त्यांचे फोटो व सध्याचे जीवनयापन या बाबी कादंबरी वाचकांना नाविन्यपुर्ण आहेत.
बलस्थाने-
१. बोली भाषेतील घरगुती संवाद,
२. आत्मकथन शैलीमुळे व्यक्तीरेखेच्या मनातील संवादातून कथानक पुढे सरकवायची लेखकाची खुबी.
३. विचित्र घटनांचे आवेग, त्यातून फुलणारे नाट्यमय प्रसंग हाताळताना निर्माण भावनांचा कल्लोळ.
४. या अकल्पित घटनांमागील कार्यकारण भाव शोधणारी दादा व्यक्तिरेखा अनेक अंगांनी पुढे येते .
५. जपसाधना करणे ही फावल्या वेळातील म्हातारपणचा विरंगुळा नसून योग्य प्रकारे केल्यास अनाकलनीय शक्तींचा यशस्वी प्रतिकार करता येतो याची प्रचीती देणारे विचार व अनुभव श्रद्धा आणि सबूरीला बळकटी देतात.
६. लेखकाचे मनोगत बरेच काही व्यक्तिगत जीवना बद्दल सांगून जाते.
दुर्बल स्थान - सुरवातीला संथपणा व पात्रांची ओळख गोंधळात टाकणारी. यावर तोड म्हणून लेखकाने पात्रांची ओळख मनोगत प्रस्तावनेत करून दिली आहे. रंजक व विचार करायला लावणारी वैशिष्ट्य पूर्ण कादंबरी...
गिरीश कुबेरांचं "युद्ध जीवांचे"... तसं बरच काहि सांगता येईल पुस्तकाबद्दल.
एका वाक्यात सांगायचं तर बारुदच्या ढिगावर बसुन मक्याची कणसं भाजत बसणार्या आजच्या जगाची कहाणी आहे ति.
जैवीक अस्त्रांचं संशोधन, गेल्या शतकभरातला त्यांचा वापर, अगदी गल्लीबोळातल्या दादा लोकांपर्यंत त्यांचा वापर, रासायनीक युद्धं व प्रदुषण... सर्वच एकदम खतरनाक.
ही छोटेखानी (फक्त ६३ पानं) कादंबरी वाचून झाली. मूळ कादंबरी "नग्न रुख" (ओ.पी. शर्मा 'सारथि') डोगरी भाषेत आहे. इंग्रजी अनुवाद श्री. शिवनाथ यांनी केला आहे.
या कादंबरीत रुढार्थाने पात्रं नाहीत आणि पारंपारिक शैलीतली वर्णनंही नाहीत. आहेत त्या एकामागोमाग घडणा-या घटना; त्या घटनांबद्दल प्रश्न निर्माण करणारा भारत (कादंबरीमधली व्यक्तिरेखा). जणू आपला सभोवताल आणि आपली जाणीव यांची ही दोन्ही प्रतीकं. काहीकाही आठवतं. वाचलेलं; पाहिलेलं; अनुभवलेलं; घुसमट करणारं; दंगली, बॉम्बस्फोट यांच्यातून तगताना हतबल करणारं – काहीतरी जे लिंपून टाकलंय आपण सगळ्यांनी, पण अविरत आपला हिस्सा असणारं! जे प्रश्न विचारतं राहतं... ते .. आपल्यामधलं एक आवर्तन..
विस्तारभयास्तव अधिक लिहित नाही.
'राग दरबारी' या माझ्या अत्यंत आवडत्या हिंदी कादंबरीबद्दल मी यापूर्वी इथं लिहिलं आहे.
बाकी अजून सांगण्याजोगं पुष्कळ आहे - नंतर सांगते :-)
जैत रे जैत..
गोनीदांच्या कर्नाळा किल्ल्याच्या पार्श्वभूमीवरील ही छोटेखानी पण तितकीच प्रभावी कादंबरी. चित्रपटापेक्षा तर कितीतरी सुंदर.
ठाकरांच्या जीवनशैलीचे मनोज्ञ दर्शन गोनीदांनी आपल्या चित्रदर्शी शैलीत सादर केले आहे.
नाग्या, चिंधी हे कथानायक्/नायिका तर अक्षरशः मनावर गारूड करून राहतात.
ह्या कादंबरीतला एक सुंदर उतारा देतो.
पावसकाळातल्या कर्नाळ्याचे बदललेल्या दर्शनाचे वर्णन करत असताना गोनीदा कसे आपल्या लेखणीचेही सौंदर्य प्रकट करतात ते पहा.
हे दोन अडीच महिने डोंगराचं दर्शन होणे कठीण. महादेवाचं ध्यान सुरू आहे. तो डोळे मिटून चिंतना करतोय. सगळीकडे पाऊस पडला की नाही. सगळी रानं जोगवली की नाही. अवघी धरित्री भिजली की नाही. कुठं उणं राहिलं असेल, तर त्या अंगाला तो मेंघांना पाठवतो. त्याच्यापाशी लई मेघ. त्याच्या दाराशी हुकमाची वाट पाहात ते उभे असतात. त्याच्या ध्यानात पटदिशी येतं, का अमुक एका डोंगराच्या घळीत पाऊस झाला नाही. तिथले ओढेनाले वाहिले नाहीत. खाचरं पाण्यानं तुडुंब भरली नाहीत. त्या रानचे बेडूक बोलू लागले नाहीत. तिथं काजवे लुक्लुकू लागले नाहीत. तिथल्या कड्यांना गवतं वाढली नाहीत. कड्यांच्या पोटांशी भारंगीचे ठोंब उगवले नाहीत. चवेणीच्या कंदांना हिरवी पानं धरली नाहीत. त्या रानाला अजून भुईकमळं दिसू लागली नाहीत.
मग महादेव ढगांचा ताफाच्या ताफाच तिकडे धाडतो. ढग तिकडे सरू लागतात. कधी घाईघाईनं. एकापाठोपाठ एक. कधी एकमेकांच्या अंगावर कोसळत. कधी सावकाश. चुकार कामकर्यासारखे. पण शेवटी ते तिथं पोचतात. बरसायला लागतात. न बरसून करतील काय? टंगळमंगळ केली तर महादेवाचा बिजलीचा चाबूक काडदिशी पाठीत बसतो. केवढा आवाज होतो. डोंगर गदगदा हलू लागतात. अशा रीतीनं चहू अंगांना पाऊस पडतो.
मग महादेवाच्या ध्यानी येतं, की आता चहूकडे हिरवं झालं आहे. गाईगुजी जोगवू लागल्या आहेत. शेरडं चरू लागली आहेत. खाचरं जळानं तुडुंबलेली आहेत. भाताचे लोंबे जळाच्या साईवर डोकी उचलीत आश्चर्यानं चहूदिशांना बघू लागले आहेत. असं अवघं शांत झालं आहे.
मग हळूहळू महादेव ध्यानातून बाहेर येतो. ध्यानाला बसला तेव्हा तो जख्ख म्हातारा होता. ध्यानातून बाहेर येतो तेव्हा तो जवान होऊन येतो. डुईवरचे केस पुन्हा हिरवेगार झालेले असतात. पापण्या पुन्हा ताज्यातवान्या झालेल्या असतात. तो आपल्या डुईत भुईकमळं खोचतो. रंगारंगाची. बहुधा सगळी गुलाबीतांबडी. पण महादेवाला पांढरा रंग आवडतो. म्हणून तो काही पांढरी भुईकमळं अंगावर वागवतो. असा तो कोवळा दरदरीत दिसू लागतो. त्याच्या अंगावरून गंगाबाई खाली उतरत असते. कुठं टंगळमंगळ करीत. कुठं धावत धडपडत. मग तो डुईवर एखाद दुसर्या ढगाची चिंधुकली वागवतो, तेवढंच. यापलीकडे मग बाकी ढगांना तो दूरच्या गंगनी धाडून देतो.
पावसकाळाभर महादेवाच्या गळ्यातला मधमाशांच्या पोळ्यांचा हार गडचीप असतो. पावसकाळा उलटला, की मग त्यांचं गाणं सुरू होतं. ते गुंग गाणं काही फार मोठ्यानं ऐकू येत नाही. पण तरी हजारपाचशे माशी एक्या ठायी झाली, की मग चांगला घुमारा ऐकू येतो. कधी त्या गंगनात तिथल्या तिथं गाणं म्हणत घुमतात. कधी नाच करतात.
चित्रपटात फक्त स्मिता पाटील असल्यानी तो बघवतो, असं माझं टोकाचं मत आहे. ती बरोब्बर 'चिन्धी' दिसते. बाकीचे सगळे 'शहरी' दिसतात. आपण 'ठाकरं' बघतोय असं वाटत नाही. कादंबरी सुंदरच आहे. कधीही हातात घेउन कुठूनही वाचायला सुरुवात करता येते.
हर्षदा भुरे यांची अबोल नात ही एक अतिशय सुंदर मनोरमा प्रकाशनाची कादांबरी. 100-150 पानी च असेल, पण मनाला भावून टाकनारी...!!!! मी तर हातात घेतली अन् 5-6 तासात संपवून टाकली होती... तुम्हाला ही मिळाली तर नक्की वाचा....
कादंबरी विषय असल्याने गंगाधर गाडगीळांनी लिहीलेली "दुर्दम्य" ही चरीत्रात्मक लोकमान्य टिळकांवरील कादंबरी आठवली. दोन-तिनदा तरी वाचलेली आहे. प्रभावी लेखन आणि संशोधन/अभ्यासावर आधारीत आहे. दोन खंडात आधि मिळायची. मध्यंतरी अमेरीकेत येताना नव्याने एकाच पुस्तकात, ते देखील हार्डकव्हर मधे मिळाल्याने घेऊन आलो. नंतर पाहीले तर मधली काही पाने कोरी! :(
दुसरी कादंबरी: "यज्ञ" - भा.द.खेर आणि शैलजा राजे यांनी एकत्रित लिहीलेली सावरकरांवरील चरीत्रात्मक कादंबरी. आठवते त्या प्रमाणे, सावरकरांच्या अखेरच्या काही वर्षांमधे त्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यावर आधारीत "आत्मकथन" स्टाईल मधे लिहीलेली कादंबरी आहे.
दोन्ही वास्तवाला धरून आहेत.
गेल्या काही वर्षात वाचलेली एक कादंबरी म्हणजे, "हंगर गेम्स"! लेकीच्या आग्रह केला म्हणून वाचली. वयात येणार्या मुलांना थ्रिलर वाटावी अशी कहाणी ज्यावरचा चित्रपट कदाचीत तुम्ही पाहीला असेल. पण एकंदरीतच हिंसा अंमळ जास्तच आणि अतिरंजीत वाटली. पण विशेष अर्थ न काढता, कल्पनाविष्कार म्हणून चांगली आहे.
विज्ञान कादंबरी मालीका म्हणून आयझॅक अॅसिमोव्हची "फाउंडेशन" पुस्तक सांगेन. सायको हिस्ट्री, रोबोटीक्स अशा संकल्पना मांडत मांडत शेवटी "आपण सगळे एक आहोत" (वसुधैव कुटुंबकम) मानणार्या "गया" नामक तत्वज्ञानापर्यंत जाणारी कथा वाचण्यासारखी आहे. या लेखात मिपावरच अधिक लिहीले होते. "violence is the last refuge of the incompetent" हे त्यातले एक रोचक वाक्य. (त्यावर आधारीत नंतर "intellectual violence is the last refuge of the intellectually incompetent" असे म्हणले गेले. ;)
आर्थर सी क्लर्कचे २००१ ए स्पेस ओडीसी पण वाचले नसल्यास अवश्य वाचा. स्पेस एक्स्प्लोरेशनच्या आधीचे कल्पनाशक्तीवर केलेले स्पेस एक्स्प्लोरेशन, महासंगणक हॅल ("HAL") आणि शेवटी कुठेतरी जन्म - मृत्यूचे चक्र मानण्याकडे वळलेले तत्वज्ञान वाचताना एकाकीपण येते. चित्रपट पहाताना देखील असेच होते.
अरूंधती रॉय यांची ही एकोणिसशे सत्त्याण्णव सालची मॅन बुकर पारितोषिक विजेती इंग्रजी कादंबरी.
कादंबरीतील मुख्य घटना घडतात १९६९ साली. पण जेव्हा कादंबरीतील पात्रांमधील दोन जुळ्या भावंडांपैकी 'राहेल' वयाच्या एकतिसाव्या वर्षी 'अयमेनम हाउस' या तिच्या आजोळच्या घरी परत येते तेव्हा कादंबरीची सुरुवात होते. राहेल आणि तिचा अठरा मिनिटांनी मोठा असलेला जुळा भाऊ 'एस्था' यांच्याभोवती आणि त्यांच्या भावविश्वात घडत राहणार्या छोट्यामोठ्या गोष्टींची दोलायमान गुंफण लेखिका तिच्या वाचकांभोवती विणत राहते. त्या दोघांच्या आणि प्रामुख्याने राहेलच्या सात-वर्षे-वयाच्या संवेदनशील नजरेतून आपल्यासमोर कादंबरीचा पट उलगडत जातो.
पण असे असले तरी या कथानकाचा कर्ता प्रथमपुरुषी नाही. लेखिका एखाद्या मनस्वी चित्रकाराप्रमाणे फ्लॅशबॅक, लांबलेली उपकथानके, लहान मुलांना असते तेवढी समज आणि त्यातून त्यांना त्यांच्या निरागस नजरेने दिसणारे कठोर जग, त्यातून त्यांनी आपल्या परीने स्वतःच शिकलेले शहाणपण, तथाकथित मोठ्यांचा तितकाच दांभिक व्यवहारीपणा, भारताचा जातिव्यवस्थेच्या, स्पृश्यास्पृश्यतेच्या कठोर सामाजिक वास्तवाची आणि राजकीय-आर्थिक बदलांची सरमिसळ, त्यात होरपळणारे निर्दोष समाजघटक, वसाहतवादी इतिहासातून स्वातंत्र्यात येताना अॅन्ग्लोफाइल उच्चभ्रू वर्गाला भेडसावणारा त्रिशंकू सिंड्रोम, निसर्गाची मुक्त अर्थव्यवस्थेत येताना झालेली वाताहत आणि कादंबरीतील पात्रांच्या जीवनाच्या अवमूल्यनाशी याचा दिसणारा समांतरपणा या सगळ्या कथाबीजांचा, पात्रांचा, पार्श्वभूमीचा आणि लेखनतंत्राचा वापर करून काळाच्या पटलावर पुढेमागे तिच्या लेखणीचे स्वैर फटकारे मारीत राहते...
कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत ही दोन जुळी भावंडे. त्याबरोबर कादंबरीत येणारी विविध पात्रे त्यांच्या अनावृत्त वृत्ती-प्रवृत्तींसह आणि कथानकातील घटनांच्या त्यांच्यावरील परिणामांसकट वाचकाला पदोपदी भेटतात. एस्था आणि राहेल यांची घटस्फोटीत तरूण आई 'अम्मू', त्यांचे रागीट आजोबा व सहनशील आजी, त्यांचा ऑक्सफर्डवरून शिकून परत आलेला आणि आजीचा व्यवसाय सांभाळणारा मामा 'चाको', त्याची पूर्वाश्रमीची इंग्लिश पत्नी 'मार्गारेट' आणि गोरीपान मुलगी 'सोफी', अविवाहित राहिलेली आणि त्यांच्याशी फणकार्याने वागणारी त्यांच्या आईची आत्या 'बेबी कोचम्मा', पोलिस निरीक्षक आणि मार्क्सिस्ट नेता अशी माणसे आणि सर्वात महत्त्वाचा या सगळ्यात त्यांच्याशी प्रेमळपणे वागणारी एकमेव व्यक्ती अस्पृश्य कामगार 'वेलुथा'.
दारुड्या नवर्याला सोडून परत आलेली अम्मू आपल्या दोन मुलांसकट तिच्या माहेरी रहायला येते. तिच्या रागीट बापाला आणि आत्याला ते आवडलेले नसते. याचा परिणाम म्हणून त्यांचे अयमेनम हाउसमधील स्थान नेहमीच दुय्यम राहणार असते. अम्मूची अविवाहित आत्या बेबी कोचम्मा हिने कधी काळी 'नन' बनण्याचा प्रयत्न केलेला, पण त्या निर्णयामागे देवाची भक्ती नसून तिला तेव्हा भेटलेला कुणी फादर मुलिगन आणि तरूण नवोमीचे त्याच्याकडे आकर्षित होणे असते. हा प्रेमभंग नंतर तिचे कठोर व्यक्तिमत्त्व बनण्यास आणि अम्मूच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरणार असतो का? की त्यांचा मामा चाको आणि त्याचा विक्षिप्त गर्विष्ठपणा? चाको ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकतानाच एका इंग्लिश वेट्रेसच्या, मार्गारेटच्या प्रेमात पडलेला असतो. पण मार्गारेटच्या पालकांना तिने एका काळ्याशी, भारतीयाशी लग्न करावे हे आवडलेले नसते. पण हे लग्नही जास्त टिकत नाही. चाको आणि मार्गारेटच्या मुलीच्या - सोफीचा जन्मानंतर ते विभक्त होतात. मार्गारेट गरोदर असतानाच दुसर्याच्या प्रेमात पडलेली असते. वैवाहिक आणि शैक्षणिक अपयश पदरात घेऊन चाको भारतात परततो ते घरचा लोणची बनवण्याचा व्यवसाय सांभाळायला. आता तो एक श्रीमंत उद्योजक म्हणून आपल्याला भेटतो. इकडे इपे कुटुंबाचा परंपरागत वृद्ध नोकर वेल्ल्या पापेन आणि त्याचा तरूण मुलगा वेलुथा हे त्यांना जातिव्यवस्थेने मिळालेली अस्पृश्यता आणि सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतील खालचे स्थान सांभाळत जगत असतात. वेलुथा काहीसा बंडखोर आहे. तो मार्क्सवादी असल्याचा बेबी कोचम्माला आणि इन्स्पेक्टरला संशय आहे. त्यामुळे बेबी कोचम्माला वेलुथाबद्दल अनामिक भीती वाटतेय. तीच भीती जी सामर्थ्यवान घटकाला दुर्बल घटकांबद्दल सतत वाटत राहते, दुर्बल पुढेमागे सबल होऊन त्यांची सत्ता उलटून देतील अशी भीती. हीच भीती पुढे वेलुथाला आणि तो प्रेम करत असलेल्या जुळ्या भावंडांना व त्यांच्या तरूण आईला उद्ध्वस्त करणार असते का?
त्या रात्री काय घडले? घुसमट आणि अन्याय यांपासून कुठले जीव पळू पाहत होते? कोणाच्या डोळ्यांनी अशी स्वप्ने पाहिण्याचे धाडस केले ज्या स्वप्नांना इतिहासाच्या नियमचौकटींची मान्यता नव्हती? कुठले चिमुकले हात त्या रात्री बोट उलटल्यावर अनोळखी पाण्यावर परत आले नव्हते? त्या अंधार्या झाडीत कोणाच्या डोळ्यांनी एक गुन्हा पाहिला होता ज्या गुन्ह्याचे साक्षीदार होण्याचे अपील परिस्थितीच्या न्यायव्यवस्थेने त्यांना झिडकारले होते? लहानग्या, शहाण्या एस्थाने उरलेल्या आयुष्यभर अबोलपणे वावरावे असे त्याला काय बोलायला लावले गेले साक्षीदाराच्या कठड्यात?
गुन्हा काय होता? कोणी केला होता? कोणाला शिक्षा झाली आणि कोण मेले त्या रात्री?
रॉय यांची लेखणी परंपरेने चालत आलेली लेखनाची चौकट नाकारते, उलटून लावते. त्यांची भाषा कधी अल्लड निरागसतेने कर्मठ वाचकांना त्रास देत व्याकरणाचे-शुद्धलेखनाचे नियम तोडते, तर कधी स्थितप्रज्ञाच्या गांभीर्याने इतिहासातून उतरलेले धागे विणत मानवी आयुष्याचा त्यासमोरचा क्षुद्रपणा दाखवत या नाट्यावर भाष्य करते. कादंबरीची पानेही पारंपारिक एकमार्गीपणा नाकारतात. यातील प्रत्येक भाग आणि प्रत्येक प्रसंग कालाच्या पटलावर एकसुरीपणे आपापली जागा घेत असला तरी कादंबरीत मात्र सर्व सोबतच येत राहते. मग तो त्र्याण्णव सालचा राहेल परत आल्यावर तिला दिसलेला अबोल एस्था असो वा एकोणसत्तरचा विमानतळावर सोफीमोल आणि मार्गारेटला आणायला जाणारा 'घरातील पुरुष' मुलगा एस्था असो. अभिलाष टॉकीजमध्ये साउंड ऑफ म्युजिक पाहताना ऑरेंजमॅन-लेमनमॅनकडून एस्थाचे होणारे लैंगिक शोषण किंवा वेलुथाला काहीही अपराध नसताना लाथाबुक्क्यांनी होणारी कोठडीतील मारहाण असो. या घटना आणि त्यानंतर येणारी मानवी आयुष्यांची वाताहत, उद्ध्वस्तता रॉय फ्लॅशबॅकमधून मागेपुढे रेखत जातात. त्यांच्या लेखणीत परिणाम आधी येतो आणि मग कारण. आणि जणू काही त्यांचा परस्परसंबंध अधोरेखित करत उरणारी अपरिहार्यता वाचकांच्या मनात सांडत जाते - लाइक टी फ्रॉम टीबॅग.
अनेकांना हे पुस्तक आवडले नाही. कित्येकांना झेपलेही नाही. मलाही बर्याचदा वाचल्यानंतर आणि इतकी वर्षे डोक्यात घोळवल्यावर त्यावर चार शब्द लिहिता आलेत. अरूंधती रॉय यांची इतर मते व त्यांची वादग्रस्तता हा वेगळा विषय आहे. पण माझ्यापुरता माझ्या मनावर विलक्षण परिणाम करणारी ही मला सर्वात जास्त आवडणारी कादंबरी आहे.
"द रिडल ऑफ लेबिरिंथ" नामक मार्गालिट फॉक्स या लेखिकेचे पुस्तक वाचले. लिनिअर बी या लिपीचा उलगडा करणार्या संशोधकांपैकी जॉन चॅडविकचे पुस्तक अगोदर वाचले होते, त्यानंतर त्याच विषयावरचे हे पुस्तक वाचले. बेशिक तेच तेच असले तरी अॅलिस कोबेर या भाषाशास्रज्ञ बाईंबद्दल पहिल्यांदा डीटेल माहिती यात मिळते. महायुद्धाच्या काळात कागद मिळेना म्हणताना लायब्ररीतील पुस्तकांच्या नेआणवाल्या स्लिपा, सिगरेटची पाकिटे, ग्रीटिंग कार्ड आणि वह्यांचे पुठ्ठे, इ.इ. जे काय मिळेल ते वापरून तिने जवळपास १,८०,००० छोटी नोंदकार्डे बनवली आणि लिनिअर बीचा जवळपास फडशाच पाडला. पण जॉन मायर्सची किरकीर, तसेच कॉलेजचा शिकवण्याचा लोड, इ.इ. लडतरींमुळे बिचारीला काही पुढं जाता आलं नाही. पण जे केलं त्याचा मायकेल व्हेंट्रिसला पुढं लै उपयोग झाला. अॅलिस कोबेरची नव्याने ओळख झाल्याचा लैच मोठा फायदा झाला या पुस्तकामुळे.
आता नेक्ष्ट टार्गेट 'द मायसीनिअन वर्ल्ड' बाय जॉन चॅडविक. लिनिअर बीच्या जवळपास ६००० मृत्तिकालेखांतून आपल्याला काय काय माहिती मिळते त्याचा आढावा घेणारं पुस्तक आहे. अपोलो, पोसायडन, इ. देवांची नावे, ट्रॉयहून आणलेल्या गुलाम स्त्रिया, गुलामांना दिलेली अपमानजनक नावे, झालंच तर अकिलीसचे नाव कोरलेले मिळणे, इ.इ. बर्याच गंमतीजमती आहेत.
"प्रिन्सेस-अ ट्रू स्टोरी बिहाईंड द व्हेल इन सौदी अरेबिया" हे जीन सॅसनचे पुस्तक मध्ये वाचले. सौदी राजघराण्यातल्या एका सुलताना नामक राजकन्येचे (नाव बदलून पण खर्रेखुर्रे) आत्मवृत्त आहे. काळ १९७० पासून पुढचा. नॉट विदौट माय डॉटर, सोन्याच्या धुराचे ठसके, मयादा, इ. पुस्तके वाचलेल्यांना काही नवीन नाही. पण राजघराण्यातील व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तिथल्या स्त्रियांच्या पशुवत् स्थितीचे वर्णन कधी वाचले नव्हते ते या निमित्ताने वाचायला मिळाले. वर्णनशैली 'व्हिव्हिड" (मराठी?) आहे, खिळवून ठेवणारी आहे. बर्याच गोष्टींबद्दल आधी कुठेसे वाचले असले तरी इथे त्या एकदम अंगावर येतात. सौदी राजघराण्याची अगणित संपत्ती आणि शिवाय स्त्रियांवरच्या बंधनांमुळे येणार्या कंटाळ्याचे, रितेपणाचे वर्णन यथार्थ आहे. अशी वर्णने कैकदा डिसमिसिवली जातात, सुख टोचतंय इ.इ. म्हणून. पण त्यामुळे त्यांची सत्यता कमी होते असे मला तरी वाटत नाही. असो. सौदीमध्ये अलीकडे झालेले काही बदल त्या तुलनेने बरेच स्वागतार्ह आहेत.
बाकी, जीन सॅसनबद्दल फ्रॉडचे आरोपही झालेत, तेव्हा किती खरेखोटे ते तो एक अल्लाच जाणे. पण पुस्तक रोचक आहे हे नक्की.
कदाचित अनेकांनी वाचली असेल तरीही
अमृतवेल - वि. स. खांडेकर
सगळ्यात पहिल्यांदा वाचली तेव्हा आवडली होती पण समजण्या एवढी कुवत नव्हती. पण तेव्हा आवडलेल्या ओळी, परिच्छेद हे एका वहीत किंवा डायरीत लिहून ठेवले जायचे. परत कधीतरी वहीतून हे संग्रहित साहित्य वाचून आनंद मिळायचा. अशीच एक वही वाचताना ही कादंबरी पुन्हा वाचावीशी वाटली. पुन्हा शोध घेऊन वाचली. तेव्हा ती अधिक समजली. आधी ज्या ओळी केवळ पुस्तकी किंवा आलंकारिक म्हणून जास्त आवडल्या होत्या, त्या नंतर वाचताना अधिक उमगल्या. वयानुसार आणि काळानुसार वेगळ्या दृष्टीने वाचली गेली. अनेक व्याख्या बदलल्या होत्या. पण तरीही आवडीच्या यादीत अजूनच फिट्ट बसली. त्यापैकीच काही निवडक देतेय…(आता ती वही राहिली नाही, ती लिहून ठेवायची सवयही नाही, तेव्हा आंतरजालावरून साभार)
"भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळ दंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचे वरदानही लाभले आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे, त्या धडपडीतला आनंद लुटणे, आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळ लेल्या पायानी दुसर्या स्वप्नामागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो त्यामुळे."
वि.स.
लहानपणी वाचली होती तेह्वा मलाही खूप आवडली होती अमृतवेल. आता कथानक वाचूही शकत नाही.
पण त्यातील संवाद, भाषा सुरेख होती हे मात्र खरेच. आता अमृतवेल कथानकासाठी वाचवत नाही पण भाषेसाठी संग्रही ठेवली आहे. :)
खांडेकर म्हणल्यावर दोन पुस्तके आठवली.
एक म्हणजे "ययाती" - लहानपणी वाचले तेंव्हा खूप आवडले. जसे होते तसे एक कादंबरी म्हणून समजून घेतले. नंतर दुर्गाबाई भागवतांची त्यावरील टिका वाचली आणि त्यातील चुका समजल्या.
दुसरे पुस्तक म्हणजे, "सोनेरी स्वप्न भंगलेली" - नीट आठवत नाही. पण गांधीवादी पिढीला आलेले स्वातंत्र्योत्तर नैराश्य (फोलपणा) ह्यावर आधारीत कथानक होते.
Comments
कल्पना चांगली आहे.
ही फक्त सुरुवात आहे.
छान उपक्रम.
होय ही कादंबरी वाचली आहे. मला
थोडक्यात करुन दिलेली पुस्तक
थोडक्यात चांगली ओळख
हो बरोबर. चरित्रात्मकच आहे.
अगदीच काल्पनिक नसली तरी
या कादंबरीविषयी माहिती नव्हती
चांगला धागा.
"दॅट क्वेल रॉबर्ट" नावाचं १००
अरे वा शुचि, हे पुस्तक मला
+१
'दॅट क्वेल रॉबर्ट'
अंधार छाया कादंबरी वाचली.आवडली
छान उपक्रम.
चर्निंग ऑफ द सिटी
बाकी अजून सांगण्याजोगं पुष्कळ
जैत रे जैत
सुरेख!
किती सुंदर!!!
मस्त!
सुंदर प्रकटन
चित्रपटात फक्त स्मिता पाटील
सुंदर!
हर्षदा भुरे यांची अबोल नात ही
हं! मराठीतले नवे लेखक-लेखिका
चरीत्रात्मक
इंंग्रजी
फौंडेशन सेरीज हा जगातला भारी
फेवरिट्ट विज्ञान (?) कादंबरी
वाचायचे आहे
भाषा मराठीच हवी असे काही नाही
'द गॉड ऑफ् स्मॉल थिंग्ज्'
अरूंधती रॉय यांची ही एकोणिसशे सत्त्याण्णव सालची मॅन बुकर पारितोषिक विजेती इंग्रजी कादंबरी.
पण असे असले तरी या कथानकाचा कर्ता प्रथमपुरुषी नाही. लेखिका एखाद्या मनस्वी चित्रकाराप्रमाणे फ्लॅशबॅक, लांबलेली उपकथानके, लहान मुलांना असते तेवढी समज आणि त्यातून त्यांना त्यांच्या निरागस नजरेने दिसणारे कठोर जग, त्यातून त्यांनी आपल्या परीने स्वतःच शिकलेले शहाणपण, तथाकथित मोठ्यांचा तितकाच दांभिक व्यवहारीपणा, भारताचा जातिव्यवस्थेच्या, स्पृश्यास्पृश्यतेच्या कठोर सामाजिक वास्तवाची आणि राजकीय-आर्थिक बदलांची सरमिसळ, त्यात होरपळणारे निर्दोष समाजघटक, वसाहतवादी इतिहासातून स्वातंत्र्यात येताना अॅन्ग्लोफाइल उच्चभ्रू वर्गाला भेडसावणारा त्रिशंकू सिंड्रोम, निसर्गाची मुक्त अर्थव्यवस्थेत येताना झालेली वाताहत आणि कादंबरीतील पात्रांच्या जीवनाच्या अवमूल्यनाशी याचा दिसणारा समांतरपणा या सगळ्या कथाबीजांचा, पात्रांचा, पार्श्वभूमीचा आणि लेखनतंत्राचा वापर करून काळाच्या पटलावर पुढेमागे तिच्या लेखणीचे स्वैर फटकारे मारीत राहते...
कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत ही दोन जुळी भावंडे. त्याबरोबर कादंबरीत येणारी विविध पात्रे त्यांच्या अनावृत्त वृत्ती-प्रवृत्तींसह आणि कथानकातील घटनांच्या त्यांच्यावरील परिणामांसकट वाचकाला पदोपदी भेटतात. एस्था आणि राहेल यांची घटस्फोटीत तरूण आई 'अम्मू', त्यांचे रागीट आजोबा व सहनशील आजी, त्यांचा ऑक्सफर्डवरून शिकून परत आलेला आणि आजीचा व्यवसाय सांभाळणारा मामा 'चाको', त्याची पूर्वाश्रमीची इंग्लिश पत्नी 'मार्गारेट' आणि गोरीपान मुलगी 'सोफी', अविवाहित राहिलेली आणि त्यांच्याशी फणकार्याने वागणारी त्यांच्या आईची आत्या 'बेबी कोचम्मा', पोलिस निरीक्षक आणि मार्क्सिस्ट नेता अशी माणसे आणि सर्वात महत्त्वाचा या सगळ्यात त्यांच्याशी प्रेमळपणे वागणारी एकमेव व्यक्ती अस्पृश्य कामगार 'वेलुथा'.
दारुड्या नवर्याला सोडून परत आलेली अम्मू आपल्या दोन मुलांसकट तिच्या माहेरी रहायला येते. तिच्या रागीट बापाला आणि आत्याला ते आवडलेले नसते. याचा परिणाम म्हणून त्यांचे अयमेनम हाउसमधील स्थान नेहमीच दुय्यम राहणार असते. अम्मूची अविवाहित आत्या बेबी कोचम्मा हिने कधी काळी 'नन' बनण्याचा प्रयत्न केलेला, पण त्या निर्णयामागे देवाची भक्ती नसून तिला तेव्हा भेटलेला कुणी फादर मुलिगन आणि तरूण नवोमीचे त्याच्याकडे आकर्षित होणे असते. हा प्रेमभंग नंतर तिचे कठोर व्यक्तिमत्त्व बनण्यास आणि अम्मूच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरणार असतो का? की त्यांचा मामा चाको आणि त्याचा विक्षिप्त गर्विष्ठपणा? चाको ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकतानाच एका इंग्लिश वेट्रेसच्या, मार्गारेटच्या प्रेमात पडलेला असतो. पण मार्गारेटच्या पालकांना तिने एका काळ्याशी, भारतीयाशी लग्न करावे हे आवडलेले नसते. पण हे लग्नही जास्त टिकत नाही. चाको आणि मार्गारेटच्या मुलीच्या - सोफीचा जन्मानंतर ते विभक्त होतात. मार्गारेट गरोदर असतानाच दुसर्याच्या प्रेमात पडलेली असते. वैवाहिक आणि शैक्षणिक अपयश पदरात घेऊन चाको भारतात परततो ते घरचा लोणची बनवण्याचा व्यवसाय सांभाळायला. आता तो एक श्रीमंत उद्योजक म्हणून आपल्याला भेटतो. इकडे इपे कुटुंबाचा परंपरागत वृद्ध नोकर वेल्ल्या पापेन आणि त्याचा तरूण मुलगा वेलुथा हे त्यांना जातिव्यवस्थेने मिळालेली अस्पृश्यता आणि सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतील खालचे स्थान सांभाळत जगत असतात. वेलुथा काहीसा बंडखोर आहे. तो मार्क्सवादी असल्याचा बेबी कोचम्माला आणि इन्स्पेक्टरला संशय आहे. त्यामुळे बेबी कोचम्माला वेलुथाबद्दल अनामिक भीती वाटतेय. तीच भीती जी सामर्थ्यवान घटकाला दुर्बल घटकांबद्दल सतत वाटत राहते, दुर्बल पुढेमागे सबल होऊन त्यांची सत्ता उलटून देतील अशी भीती. हीच भीती पुढे वेलुथाला आणि तो प्रेम करत असलेल्या जुळ्या भावंडांना व त्यांच्या तरूण आईला उद्ध्वस्त करणार असते का?
त्या रात्री काय घडले? घुसमट आणि अन्याय यांपासून कुठले जीव पळू पाहत होते? कोणाच्या डोळ्यांनी अशी स्वप्ने पाहिण्याचे धाडस केले ज्या स्वप्नांना इतिहासाच्या नियमचौकटींची मान्यता नव्हती? कुठले चिमुकले हात त्या रात्री बोट उलटल्यावर अनोळखी पाण्यावर परत आले नव्हते? त्या अंधार्या झाडीत कोणाच्या डोळ्यांनी एक गुन्हा पाहिला होता ज्या गुन्ह्याचे साक्षीदार होण्याचे अपील परिस्थितीच्या न्यायव्यवस्थेने त्यांना झिडकारले होते? लहानग्या, शहाण्या एस्थाने उरलेल्या आयुष्यभर अबोलपणे वावरावे असे त्याला काय बोलायला लावले गेले साक्षीदाराच्या कठड्यात?
गुन्हा काय होता? कोणी केला होता? कोणाला शिक्षा झाली आणि कोण मेले त्या रात्री?
रॉय यांची लेखणी परंपरेने चालत आलेली लेखनाची चौकट नाकारते, उलटून लावते. त्यांची भाषा कधी अल्लड निरागसतेने कर्मठ वाचकांना त्रास देत व्याकरणाचे-शुद्धलेखनाचे नियम तोडते, तर कधी स्थितप्रज्ञाच्या गांभीर्याने इतिहासातून उतरलेले धागे विणत मानवी आयुष्याचा त्यासमोरचा क्षुद्रपणा दाखवत या नाट्यावर भाष्य करते. कादंबरीची पानेही पारंपारिक एकमार्गीपणा नाकारतात. यातील प्रत्येक भाग आणि प्रत्येक प्रसंग कालाच्या पटलावर एकसुरीपणे आपापली जागा घेत असला तरी कादंबरीत मात्र सर्व सोबतच येत राहते. मग तो त्र्याण्णव सालचा राहेल परत आल्यावर तिला दिसलेला अबोल एस्था असो वा एकोणसत्तरचा विमानतळावर सोफीमोल आणि मार्गारेटला आणायला जाणारा 'घरातील पुरुष' मुलगा एस्था असो. अभिलाष टॉकीजमध्ये साउंड ऑफ म्युजिक पाहताना ऑरेंजमॅन-लेमनमॅनकडून एस्थाचे होणारे लैंगिक शोषण किंवा वेलुथाला काहीही अपराध नसताना लाथाबुक्क्यांनी होणारी कोठडीतील मारहाण असो. या घटना आणि त्यानंतर येणारी मानवी आयुष्यांची वाताहत, उद्ध्वस्तता रॉय फ्लॅशबॅकमधून मागेपुढे रेखत जातात. त्यांच्या लेखणीत परिणाम आधी येतो आणि मग कारण. आणि जणू काही त्यांचा परस्परसंबंध अधोरेखित करत उरणारी अपरिहार्यता वाचकांच्या मनात सांडत जाते - लाइक टी फ्रॉम टीबॅग.
अनेकांना हे पुस्तक आवडले नाही. कित्येकांना झेपलेही नाही. मलाही बर्याचदा वाचल्यानंतर आणि इतकी वर्षे डोक्यात घोळवल्यावर त्यावर चार शब्द लिहिता आलेत. अरूंधती रॉय यांची इतर मते व त्यांची वादग्रस्तता हा वेगळा विषय आहे. पण माझ्यापुरता माझ्या मनावर विलक्षण परिणाम करणारी ही मला सर्वात जास्त आवडणारी कादंबरी आहे.
कादंबरीची ओळख आवडली.
अगदी छान ओळख !
धन्यवाद यशोधरा व मितान!
"द रिडल ऑफ लेबिरिंथ" नामक
"प्रिन्सेस-अ ट्रू स्टोरी
'व्हिव्हिड" (मराठी?)
व्हिव्हिड म्ह. ठळक.
व्हिव्हिड वर्णनशैली : म्हणजे
परफेक्ट शब्द. धन्यवाद.
अमृतवेल
अमृतवेल मधे तुम्ही वर
प्रत्येकाची आवड वेगळी असू
लहानपणी वाचली होती तेह्वा
खांडेकर
ययाती माझे अजूनही आवडते
बाईंची टिका मूळ पौराणिक
Pagination