ऑगस्ट महिना आला कि नव्या पिढीची धामधूम चालू होते ती फ्रेन्डशिप डे साजरा करण्याची.
रंगीबेरंगी पट्ट्या हातभार बांधून दिवसभर दिमाखात फिरणार. आता तर काय तोंडावर सुद्धा काहीबाही लिहिलेलं असतं.
आमच्या वेळी नव्हतं बुवा असलं काही.(इति आमची पिढी)
पण तरीही माझी शाळेत असताना झालेली मैत्री आजपर्यंत टिकून आहे
इ. ५ वी असताना मला खूप मैत्रिणी मिळाल्या.
त्यातील एक मैत्रीण माझी जिवाभावाची कधी झाली कळलेच नाही.
एकाच बेंच वर बसून वर्ग चालू असताना खुसूखुसू गप्पा मारणे,हळूच डबा उघडून खाणे अशा आमच्या गमती जमती चालत.
एकमेकी शिवाय करमत नसे. (तरी बरं त्यावेळी मोबाईल फोन नव्हते)
एकदा तर गंमत झाली ८ वीत असताना आमचे वीरबाला पथक कॅम्प साठी तीन दिवस बाहेर गावी गेले
तिथे आमचे ४-४ जणींचे ग्रुप बनवले. मी आणि माझी मैत्रीण वेगवेगळ्या ग्रुप मध्ये विभागल्या गेलो.
झालं आम्ही रडून रडून जो काही गोंधळ घातला की शेवटी आमच्या शिक्षकांनी आम्हाला एकाच ग्रुप मध्ये ठेवले
आजही आम्ही हे आठवून खूप हसतो. आमची मैत्री आजही तेव्हडीच ताजी आहे.
आम्ही फोनवर (हाताला काळ लागेपर्यंत) गप्पा मारतो
पण खूप दिवसात जर फोन झाला नाही किंवा भेट झाली नाही तरी कामात व्यस्त असेल असे समजून घेतो.
माझी दुसरी एक मैत्रीणही ५ वी पासूनच माझ्या बरोबर होती पण आमची मैत्री घट्ट झाली ती तिच्या मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर.
तिचा मुलगा आणि माझा मुलगा शाळेत बरोबरच होते.त्यामुळे रोजच भेट होत होती. माझ्या मुलाकडे पाहून तिला थोडफार समाधान वाटत असे.
तिचा नवरा व्यसनी असूनही ती संसाराचा गाडा हसतमुखाने ओढत होती.
मुलींची लग्नं, नवऱ्याचे निधन या साऱ्याला तिने खंबीरपणे तोंड दिले.
समाजात कधीही आपल्या दुःखाचे प्रदर्शन केले नाही
मात्र मला जेंव्हा तिचा फोन येतो की वेळ आहे का?तेंव्हा मी कितीही व्यस्त असले तरीही ते काम सोडून तिच्यासाठी वेळ देते. तिला बरोबर घेऊन बागेतील एका शांत कोपऱ्यात घेऊन जाते. तिचा हात हातात घेऊन फक्त थोपटते.आणि मग तिचे दुःख,आठवणी डोळ्यातून वाहू लागतात. कधी कधी त्या बोलाक्याही होतात त्यावेळेस मी फक्त श्रोत्याचे काम करते.आवश्यकता असल्यासच सांत्वन करते. आणि ती पुन्हा खंबीर होऊन निघून जाते. पण या खंबीरपणाच्या बुरख्याआडची रडवेली मैत्रीण एका अदृश्य मैत्रीच्या धाग्याने जोडलेल्या मैत्रिणीलाच दिसते.
आणि या साठी आम्ही कधीही एकमेकींना फ्रेन्डशिप बॅण्ड बांधले नाहीत.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
सुंदर.
ह्या निमित्ताने
संशय..
राष्ट्रकाकूंचा सल्ला मिळतोय
राष्ट्रकाकू
स्वसंपादन
मग १ काम करा, त्यातल्या एकीची
बिंधास भिडा...१ तरी नक्कीच
डोन्ट माईन्ड एक पर्सनल
?
स्मायल्या विषयांना अनुक्रमे
छान लिहिलय.
आवडला लेख!
प्रामाणिक कथन परंतू
फोनवर काळ
कळ
मनापासून लिहीलंय
छान आहे आवडलं
हल्ली?
Happy Friendship Day !
एका सुंदर नात्यावर पु.ल.देशपांडे. यानी लिहीले :