झीचा तद्दन टुकार आचरटपणा…….
आपलं टोकीज म्हणून मिरवणाऱ्या झीनं आता अक्षरशः डोक्याची मंडई करायला सुरुवात केलेली आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन हे चायनल सुरु करण्यात आले ते खूप छान वाटले होते. सुरुवातीला बरे वाटलेले सिनेमे दाखवून "ह्यांनी मराठीच्या पुनरुत्थानासाठी फार चांगली सुरुवात केली " असे म्हणणार होतोच पण तेवढ्यातच "प्रेक्षकांनी चायनलबद्दल असा काही विचार देखील मनात आणणे पाप आहे" असा ग्रह करून घेतलेल्या झीने स्वताच्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करायला सुरुवात केली आहे. काही ठराविक सिनेमे पुन्हा पुन्हा झळकू लागले पण एकदा चुकला तर परत लागतो म्हणून आम्ही आनंदाने ते स्वीकारले.
त्यानंतर झीनं आपल्याच झालेल्या गतवर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे पुनःप्रक्षेपण सुरु केले . पुनःप्रत्ययाचा आनंद म्हणून आम्ही सुरुवातीला ते पहिलेही पण त्याच त्याच कार्यक्रमाच्या विनोदांवर हसू ही येईना हो …मग हळूहळू ह्याच आणि अश्याच कार्यक्रमांचे रेलचेल सुरु झाली. दिवसाच्या वेळापत्रकात एक तरी पुरस्कार सोहळा नित्यनेमाने दिसू लागला. दिवसाच्या वेळापत्रकाप्रमाणे झीनं ५ मराठी सिनेमे दाखवणे अपेक्षित होते. मराठी सिनेमा हे कुबेराच्या खजिन्यासारखे आहेत. रोज कितीही पाहिले तरी संपणार नाहीत एवढे विषय आणि कलाकृती आहेत त्यात…पुरस्कार सोहळा घुसवल्यामुळे आपसूकच काही सिनेमे बाद करण्यात आले. कवटी तेव्हाच सरकली होती पण म्हटले जाऊ दे … नंतर त्यांना त्यांची चूक उमजेल. पण झाले उलटेच…. दिवसेंदिवस झीनं मनमानी सुरूच ठेवली. काही ठराविक, रटाळ आणि साचेबद्ध सिनेमे परत परत दाखवायला लागले जणू काही प्रेक्षकांनीच त्यांना तशी गळ घातली असावी. हे चित्रपट असे आहेत कि त्यांचे निर्माते, दिग्दर्शक आणि त्यात काम करणारे कलाकार हे सुद्धा परत तो चित्रपट पाहण्याचे धाडस करणार नाहीत (सूज्ञ वाचकांच्या मनात एव्हाना त्या चित्रपटांची यादी केव्हाच घोळायला लागली असेल तेव्हा नमनाला घडाभर तेल नकोच !!)
तर असे हे सिनेमे पाहून पाहून मेंदूची कल्हई निघायला लागली. रात्रंदिवस घातलेला हा रतीब पाहून मन पार विटून गेलं होतं…. तशातच सध्याचे जिथे तिथे घुसणारे आणि अभिनय करणारे "दाक्षिणात्य" नटसम्राट यांच्या नवीन कार्यक्रमाच्या प्रोमोमुळे वठलेल्या मनाला नवीन पालवी फुटली. आशेचा एक धूसर किरण दिसू लागला. वाटलं की आपली मागणी देवामार्फत झीच्या अधिकाऱ्यांच्या मेंदूपर्यंत पोचली असावी पण कसचे काय…. ह्यावेळी काय घेऊन आले तर "सौधींडीयन" भाषेतले डब म्हणजेच भाषांतरित केलेले मराठी सिनेमे जे इतर टुकार चायनल आधीच भरमसाट वेळा दाखवत आहेत तेच मराठी माणसांच्या गळ्यात मारणे सुरु झाले आहे. आता मी शब्दबंबाळ न होता एकच थेट प्रश्न विचारू इच्छितो…. इतके चांगले आणि वैविध्यपूर्ण मराठी सिनेमे जे तुम्ही अजून ही दाखवायची तसदी घेतली नाहीत ते मेले होते का जे आम्ही आता "रुद्रादेवी", "आर्य एक प्रेमवीर" असले टुकार सिनेमे पहायचे? त्यातले काही चांगले असतीलही पण आता तो विषयच नाही.विषय असा आहे की झीने ते आमच्या माथी आम्हाला न विचारता का मारावेत ? इथे राग प्रेक्षकांना गृहीत धरण्याचा आहे. मराठी चित्रपटांना कल्पनादारिद्र्य आलंय का? आजही असे कितीतरी छान मराठी चित्रपट आहेत ज्यांना पुरस्कार मिळालेला आम्ही सोहळ्यात पाहतो पण ते आमच्यापर्यंत कधी पोचतच नाहीत. झीला जर मराठीचा खरच कैवार घ्यायचा असेल तर त्यांनी असे चित्रपट मराठी माणसांपर्यंत पोचवावेत आणि आपल्या मराठीपणाचा दाखला द्यावा आणि सौधींडीयन तमाशे ताबडतोब बंद करावेत !! असले टुकार उद्योग करायला इतर चायनल आहेत…झीने तो कित्ता गिरवण्याची गरजच काय ? तेव्हा झी …. वेळीच जागे व्हा ……अन्यथा तुमची टाळेबंदी व्हायचा दिवस फार लांब नाही.
💬 प्रतिसाद
(84)
ध
धन्या
Mon, 08/18/2014 - 16:40
नवीन
त्यांचा धंदा आहे तो. त्यांनी काय दाखवावे आणि काय दाखवू नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे.
आपल्याने पाहवले जात नसेल तर हातातील रिमोटने चॅनल बदलावे. :)
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Mon, 08/18/2014 - 16:54
नवीन
हेच चाललंय हो सगळीकडे…. तो दूरचित्रवाणी संच काय पेटवायचा का आता??
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 08/18/2014 - 17:14
नवीन
हरकत नाही. फक्त मोकळ्या जागेत, लहान मुले, अपंग अथवा आजारी व्यक्ती, ह्यांना लांब ठेवून 'तशेच' जवळपास कुणी नसताना हा प्रयोग करता येईल.
पेटवण्यासाठी विशेष इंधन मिळत असल्यास त्याचाही उपयोग करावा.
- जनहीतार्थ जारी.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 08/18/2014 - 16:46
नवीन
ऐला हो?
वर्जिनल सिंघम दाखवला का हो डब करून? त्याचं हिंदी डबिंग बरंच हास्यस्फोटक आहे. मराठी अजून भारी असेल.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 08/18/2014 - 18:14
नवीन
+१ अगदी हेच्च!
- Log in or register to post comments
स
सुहास झेले
Mon, 08/18/2014 - 19:59
नवीन
इंग्रजी सिनेमे पण डब करून दाखवले होते काही... बॅटमॅन वगैरे वगैरे.... त्याचे भाषांतर ऐकून, स्फोटकांचे नवनवीन प्रकार अनुभवता आले असते ;-)
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 08/19/2014 - 03:51
नवीन
मला "ओशन्स १२" मराठी पाहुन घेरी आलेली !! त्यात ही वेस्ट कोस्ट च्या अॅक्सेंट ला अनुसरुन भाषा ही नाही !!!
ब्रॅड पिट जॉर्ज क्लुनी ला " डॅनी आता तु तुरुंगात वगैरे जाणार आहेस" असे काहीसे बोलला की ही माणसे बेलाजियो लुटणार की नानापेठेत प्लॅनिंग करुन बालेवाडीचे ऑर्किड लुटणार हेच कळेनासे होते!!!
- Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर
Tue, 08/19/2014 - 06:17
नवीन
==))
- Log in or register to post comments
स
सुहास..
गुरुवार, 08/21/2014 - 08:33
नवीन
पंखा शेठ , सध्या प्रत्येक च्यानलवर एक लाईन लिहुन येते , आपल्याला च्यानल विषयी वा त्या कार्यक्रमाविषयी आक्षेप असल्यास संस्थळावर नोंदवावा :)
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 08/18/2014 - 16:52
नवीन
शेवटी आईने मला काल की परवा एक जुना होणार सून त्या घरची चा एक एपि. पहायला लावला. त्यात एक मुलगी गणपतीच्या देवळात जाऊन गोग्गोड संवाद म्हणत होती व एका घरी रक्षाबंधनाचा कारेक्रम चालू होता. त्यात एक सशक्त बाई पळत होती व तिला मिळालेली भेटवस्तू मिळवायचा प्रयत्न करत होती. अर्धा एपिसोड पाह्यल्यावर कांपुटरात डोके घातले. मालिका अशा असतील तर शिनेमे कशे असतील याची कल्पना आली. जुन्यांबद्दल काही म्हणायचे नाही ते चांगले असणार पण यांनी दाखवायला हवेत ना!
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 08/18/2014 - 18:00
नवीन
चक्क अर्धा एपिसोड पाह्यलात म्हणजे भारीच धीट हो !! मी तर फेसबुकावर झी मराठीच्या पेजवर लिहून आलो होतो ही एक तद्दन टुकार सिरीयल आहे म्हणून.
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 08/19/2014 - 00:43
नवीन
हेच ते! तुझा अंदाज असा चुकायचा होता तर!
अनेकजण ती मालिका नियमीतपणे 'विनोदी' मालिका म्हणून पाहतात.
- Log in or register to post comments
न
नंदन
Mon, 08/18/2014 - 23:38
नवीन
=)) मेलो!
एका मराठी मालिकेत तर "अगं बडीशेप कुठेय? - तुला म्हैतीय ना अण्णांना जेवल्यावर बडीशेप लागते ते - शोधाशोध - बरं केलं बाई आणलीस ते - का हो अण्णा? - अगं जेवल्यानंतर बडीशेप खाल्ली नाही तर जेवल्यासारखंच वाटत नाही - मग आळीपाळीने पाच-सहा बायकांचे कृतकृत्य-सुजट-क्लोजअप चेहरे" हा शीन (बहुधा संवादलेखकांना अजून काही न सुचल्याने) चांगली दहा मिनिटं ताणला होता, त्याची आठवण झाली :)
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 08/19/2014 - 00:49
नवीन
अगदी हेच! त्या जानूच्या मालिकेतही रक्षाबंधनाचा कार्यक्रम पाहताना चार मेंटेन्ड फिगरवाल्या जावांचे अस्सं सासर सुरेख बाईवाले चेहरे होते.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 08/19/2014 - 11:13
नवीन
>>>> मेंटेन्ड फिगरवाल्या जावांचे.....
कित्ती ती जळजळ.....
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 08/19/2014 - 11:20
नवीन
ठ्ठो =))
अचूक पकडलेत हो =))
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 08/19/2014 - 11:27
नवीन
उपरोधानं लिहीलं असेल हो, नाहीतर त्या चार काकवा मेंटेंन्ड फिगरवाल्या असतील तर ऋजुता दिवेकरने एव्हाना 'लुज युअर वेट' पुस्तकं लिहीणं बंद करायला हवं!! ;)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 08/19/2014 - 11:43
नवीन
'झिरो' ही सुद्धा फिगरच आहे असं आम्ही मानतो.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 08/19/2014 - 11:49
नवीन
आपल्याला वर्कआऊट करायला कंटाळा येतो यावर पांघरुण घालण्यासाठी वरची ओळ चान चान आहे. ;)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 08/19/2014 - 11:56
नवीन
अगदी!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 08/19/2014 - 12:11
नवीन
त्यावरून तो क्वोट आठवला-
I am in shape. Round IS a shape!!!
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 08/19/2014 - 18:32
नवीन
अहो काका, काय हे? त्या सूडने ओळखले की! एका फ्रेममध्ये चारजणींना माववणे हेच मोठे कौशल्याचे काम आहे.
बादवे, देवाच्या क्रिपेने मी 'अबब' गटात मोडत नाही.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 08/19/2014 - 21:33
नवीन
*lol* *LOL*
>>>> देवाच्या क्रिपेने मी 'अबब' गटात मोडत नाही.
*lol* 'अबब' गटातले 'मोडत' काय, 'वाकतही' नाहीत. *LOL*
- Log in or register to post comments
श
शिद
Mon, 08/18/2014 - 16:59
नवीन
मागणी तसा पुरवठा. :)
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 08/18/2014 - 16:59
नवीन
माज्याकडं टीवीच नाय !!!!!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 08/18/2014 - 20:23
नवीन
तुमच्या कडे भरपूर वेळ दिसत आहे.
इथे आम्हाला मिपाचेच लेख वाचण्यासाठी पण वेळ मिळत नाही.
बादवे,
त्या टी.व्ही.ला डी.व्ही.डी. प्लेयर जोडा आणि तुम्हाला आवडतील ते सिनेमे बघा.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 08/19/2014 - 08:43
नवीन
+१
झी टॉकीज वर चांगले पिक्चर लागत नाहीत हा काय विचार करायचा विषय आहे का?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 08/19/2014 - 21:09
नवीन
+ १
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 08/21/2014 - 05:54
नवीन
डिव्हीड्यांची लैब्र्री सांगा की चांगली …
विकत घिऊन यक डाव पाहिली की कंटाळा येतोय आक्षी !!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 08/30/2014 - 20:56
नवीन
तुम्ही राहता कुठे?
डोंबोलीला यायला जमत असेल तर २ टेरा बाईटची हार्ड डिस्क घेवून या.
आमचे धाकटे चिरंजीव देतील कॉपी करून.
मोप सिनेमे मिळतील.
बिंधास र्हावा.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 08/31/2014 - 08:37
नवीन
मी आणेन कट्ट्याला आलो की
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 09/02/2014 - 20:56
नवीन
सिनेमे की हार्ड डिस्क?
सिनेमे आणणार असशील तर कुठले?
आम्ही खानावळीत जेवत नाही, हे तुम्हाला ठावूक नाही काय?
हार्ड-डिस्क आणणार असाल तर कुठली? म्हणजे कुठल्या कंपनीची?
नवी कोरी हार्ड-डिस्क असेल तर उत्तम आणि जुनी असेल तर क्रुपया त्यात व्हायरस नाही, ह्याची खात्री करून घेणे,
तुमच्या हार्ड-डिस्कच्या व्हायरस मुळे आमचा संगणक बिघडला तरी चालेल, पण आपल्या मैत्रीत खंड पडणार नाही......
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 09/03/2014 - 04:43
नवीन
हार्ड डिस्क आणेन...व्हायरस फ्री (म्हणजे व्हायरस नसलेली :) )
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 08/18/2014 - 22:53
नवीन
ये हुई काम की बात ।
तुम्ही पाहत नसाल परंतु सेट टॉप बॉक्स आणि त्यातले सिमकार्ड चानेलवाल्यांना अचूक माहिती देते की कितीजण सूनबाई आणि रुद्रादेवीकडे डोळे लावून बसले आहेत ते .
- Log in or register to post comments
ए
एसमाळी
Tue, 08/19/2014 - 05:33
नवीन
झीचा दर्जाच खालावलाय सगळ्या बाबतीत.त्यांचे न्युज पासुन सिनेमापर्यंत सगळेच भिकार झाले आहे.
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 08/19/2014 - 08:47
नवीन
कोण झी??
धन्यवाद!!
- Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक
Tue, 08/19/2014 - 08:52
नवीन
ही च्यानेले म्हणजे डब करणार्या आणी भाषांतर करणार्यांसाठी रोजगार हमी योजना ! हे एक नवीन क्षेत्र उदयास येऊ पहात आहे. उदा :हिराईनीने नवीन ड्रेस घातल्यावर हिरो म्हणतो ' हा तुझ्याबरोबर चांगला जातो !
आणि आपल्यासारखे लोक विसरता जी टीव्हीला एक बंद करण्याचे बटण असते !.
अर्थात काही निर्मात्यांच्या घरी जाऊन (त्यांचे) डोके फोडण्याचा पर्याय असता तर बरे झाले असते असे कधी कधी वाटते
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 08/19/2014 - 09:35
नवीन
>>> निर्मात्यांच्या घरी जाऊन (त्यांचे) डोके फोडण्याचा पर्याय असता तर बरे झाले असते असे कधी कधी वाटते
काय संबंध? निर्माते आपलं (म्हणजे त्यांचं) काम इमानदारीत करतात. त्यांच्यासाठी पैसे मिळवणं हे एकच काम असतं ते हे लोक 'व्य व स्थि त' करतात. आपण आपलं रिमोट कंट्रोल वापरायचं काम करायचं ना 'व्य व स्थि त'. ते नाही करत म्हणून त्रास.
बाकी रेवाक्का ला 'वेल मेन्टेन्ड फिगर' म्हणजे काय म्हणायचं आहे नक्की??
'होणार सून मी त्या (की ह्या) घरची' ही मालिका पाहण्याची नामुष्की आमच्यावर आलेली आहे. एकेकाळी चवळीच्या शेंगा असलेल्या मराठी नायिका सध्या भरताच्या वांग्याएवढ्या झाल्यात एवढंच म्हणू इच्छितो.
-भोपळा प्यारे
- Log in or register to post comments
ध
धन्या
Tue, 08/19/2014 - 11:58
नवीन
*lol*
- Log in or register to post comments
न
नंदन
Tue, 08/19/2014 - 12:32
नवीन
भरताड भरतीचे वानगीदाखल उदाहरण :)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 08/19/2014 - 12:37
नवीन
कोट्याधीश नंदन. _____/\___
पण भरताड म्हणवत नाही. सगळ्या चांगल्या कलाकार आहेत. कलेचं 'अंग' आहे सगळ्यांना.
जरा दोन चार मालिका मिळाल्या की एकदम सर्वार्थानं सुसाट सुटतात.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Tue, 08/19/2014 - 12:43
नवीन
भरताचे वांगे ते पण बामणोदचेच.......
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Tue, 08/19/2014 - 12:44
नवीन
तिकडचा टिपीकल शब्द (वांग्यांच्या बाबतीतला)लिहायचा राहिला म्हणुन हा नवा प्रतिसाद.
बामणोदचे गोलगिटिंग भरताचे वांगे.
- Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक
Tue, 08/19/2014 - 15:32
नवीन
काही निर्माते तर इतक्या भिक्कार सिरीयल्स बनवताहेत की त्यांना थांबवण्याचा हा एकच पर्याय वाटतो. प्रेक्षकाला ईतका बुद्दु समजताहेत की बास. कधीतरी मार खाण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहेच. कधीतरी राज ठाकरे एखादा एपिसोड पहातील अशी प्रार्थना आपण करु या !
- Log in or register to post comments
ध
धन्या
Tue, 08/19/2014 - 15:37
नवीन
तुम्ही माझी संध्याकाळ बनवलीत. :)
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 08/19/2014 - 17:02
नवीन
हा प्रतिसाद या धाग्यासोबत छान जातो.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 08/19/2014 - 17:06
नवीन
हे काय चाल्लंय समजून घेण्यासाठी माझी मदत करा प्लीज...
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 08/19/2014 - 18:48
नवीन
हिंदीतून मराठीत डब झालेल्या जाहिराती बघत चला, असा प्रश्न पडणार नाही.
एक शाम्पूच्या अॅडचं उदाहरण, लेकीची आईस म्हणते, "हिला बांधून ठेवू का मोकळी सोडू, मोकळी सोडू. पण एका अटीवर, केस गळण्याला परवानगी नाही"
- Log in or register to post comments
ध
धन्या
Wed, 08/20/2014 - 09:36
नवीन
अशा जाहीराती पाहण्यापूर्वी "विमा ही आग्रहाची विषयवस्तू" घेतलेली आहे ना याची खात्री करावी. ;)
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Wed, 08/20/2014 - 17:41
नवीन
आमच्या ऑफिसातील एका फटाकडीला "विमा" असं नाव पडलंय ! कारण बरयाच 'रसिकांच्या" मते ती आग्रहाची "विषय-वस्तू" आहे.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »