Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झीचा तद्दन टुकार आचरटपणा…….

म
माम्लेदारचा पन्खा
Mon, 08/18/2014 - 16:34
🗣 84 प्रतिसाद
आपलं टोकीज म्हणून मिरवणाऱ्या झीनं आता अक्षरशः डोक्याची मंडई करायला सुरुवात केलेली आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन हे चायनल सुरु करण्यात आले ते खूप छान वाटले होते. सुरुवातीला बरे वाटलेले सिनेमे दाखवून "ह्यांनी मराठीच्या पुनरुत्थानासाठी फार चांगली सुरुवात केली " असे म्हणणार होतोच पण तेवढ्यातच "प्रेक्षकांनी चायनलबद्दल असा काही विचार देखील मनात आणणे पाप आहे" असा ग्रह करून घेतलेल्या झीने स्वताच्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करायला सुरुवात केली आहे. काही ठराविक सिनेमे पुन्हा पुन्हा झळकू लागले पण एकदा चुकला तर परत लागतो म्हणून आम्ही आनंदाने ते स्वीकारले. त्यानंतर झीनं आपल्याच झालेल्या गतवर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे पुनःप्रक्षेपण सुरु केले . पुनःप्रत्ययाचा आनंद म्हणून आम्ही सुरुवातीला ते पहिलेही पण त्याच त्याच कार्यक्रमाच्या विनोदांवर हसू ही येईना हो …मग हळूहळू ह्याच आणि अश्याच कार्यक्रमांचे रेलचेल सुरु झाली. दिवसाच्या वेळापत्रकात एक तरी पुरस्कार सोहळा नित्यनेमाने दिसू लागला. दिवसाच्या वेळापत्रकाप्रमाणे झीनं ५ मराठी सिनेमे दाखवणे अपेक्षित होते. मराठी सिनेमा हे कुबेराच्या खजिन्यासारखे आहेत. रोज कितीही पाहिले तरी संपणार नाहीत एवढे विषय आणि कलाकृती आहेत त्यात…पुरस्कार सोहळा घुसवल्यामुळे आपसूकच काही सिनेमे बाद करण्यात आले. कवटी तेव्हाच सरकली होती पण म्हटले जाऊ दे … नंतर त्यांना त्यांची चूक उमजेल. पण झाले उलटेच…. दिवसेंदिवस झीनं मनमानी सुरूच ठेवली. काही ठराविक, रटाळ आणि साचेबद्ध सिनेमे परत परत दाखवायला लागले जणू काही प्रेक्षकांनीच त्यांना तशी गळ घातली असावी. हे चित्रपट असे आहेत कि त्यांचे निर्माते, दिग्दर्शक आणि त्यात काम करणारे कलाकार हे सुद्धा परत तो चित्रपट पाहण्याचे धाडस करणार नाहीत (सूज्ञ वाचकांच्या मनात एव्हाना त्या चित्रपटांची यादी केव्हाच घोळायला लागली असेल तेव्हा नमनाला घडाभर तेल नकोच !!) तर असे हे सिनेमे पाहून पाहून मेंदूची कल्हई निघायला लागली. रात्रंदिवस घातलेला हा रतीब पाहून मन पार विटून गेलं होतं…. तशातच सध्याचे जिथे तिथे घुसणारे आणि अभिनय करणारे "दाक्षिणात्य" नटसम्राट यांच्या नवीन कार्यक्रमाच्या प्रोमोमुळे वठलेल्या मनाला नवीन पालवी फुटली. आशेचा एक धूसर किरण दिसू लागला. वाटलं की आपली मागणी देवामार्फत झीच्या अधिकाऱ्यांच्या मेंदूपर्यंत पोचली असावी पण कसचे काय…. ह्यावेळी काय घेऊन आले तर "सौधींडीयन" भाषेतले डब म्हणजेच भाषांतरित केलेले मराठी सिनेमे जे इतर टुकार चायनल आधीच भरमसाट वेळा दाखवत आहेत तेच मराठी माणसांच्या गळ्यात मारणे सुरु झाले आहे. आता मी शब्दबंबाळ न होता एकच थेट प्रश्न विचारू इच्छितो…. इतके चांगले आणि वैविध्यपूर्ण मराठी सिनेमे जे तुम्ही अजून ही दाखवायची तसदी घेतली नाहीत ते मेले होते का जे आम्ही आता "रुद्रादेवी", "आर्य एक प्रेमवीर" असले टुकार सिनेमे पहायचे? त्यातले काही चांगले असतीलही पण आता तो विषयच नाही.विषय असा आहे की झीने ते आमच्या माथी आम्हाला न विचारता का मारावेत ? इथे राग प्रेक्षकांना गृहीत धरण्याचा आहे. मराठी चित्रपटांना कल्पनादारिद्र्य आलंय का? आजही असे कितीतरी छान मराठी चित्रपट आहेत ज्यांना पुरस्कार मिळालेला आम्ही सोहळ्यात पाहतो पण ते आमच्यापर्यंत कधी पोचतच नाहीत. झीला जर मराठीचा खरच कैवार घ्यायचा असेल तर त्यांनी असे चित्रपट मराठी माणसांपर्यंत पोचवावेत आणि आपल्या मराठीपणाचा दाखला द्यावा आणि सौधींडीयन तमाशे ताबडतोब बंद करावेत !! असले टुकार उद्योग करायला इतर चायनल आहेत…झीने तो कित्ता गिरवण्याची गरजच काय ? तेव्हा झी …. वेळीच जागे व्हा ……अन्यथा तुमची टाळेबंदी व्हायचा दिवस फार लांब नाही.

प्रतिक्रिया द्या
30552 वाचन

💬 प्रतिसाद (84)
र
रेवती Tue, 08/19/2014 - 18:40 नवीन
येस्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक
ब
बबन ताम्बे गुरुवार, 08/21/2014 - 10:59 नवीन
तो झुंज मराठमोळी नावाचा श्रेयस तळपदेंचा टुकार शो अजुन चालू आहे का हो? काय ते सहभागी लोकांचं मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक
र
रेवती Tue, 08/19/2014 - 18:38 नवीन
अहो प्यारे१जी, राखलेली फिगर असेल तर तसे बोलायची वेळ येत नाही ना! ;) आता हे लोक ज्या क्षेत्रात काम करतात त्यात शरीरयष्टी पर्फेक्ट नाही तरी बेताची बरोबर हवी असे माझे मत. हिरविनीची फिगर योग्य हवी म्हणताना बाकीच्या पात्रांना सुटायला परवानगी असते असे नाही.......हे म्हणताना आधी मी जरातरी बरी तब्येत राखून असायला हवे याची जाणीव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Tue, 08/19/2014 - 18:57 नवीन
बाळसं बाळगून असलेल्यांच्या चरबीसाठी 'फेमिनाईन रीलिफ फंड/ दुष्काळ निवारण निधी' असं गोंडस नाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मित्रहो Tue, 08/19/2014 - 09:36 नवीन
सिरीयल्स ज्याला बघायच्या असतील त्याने युट्यूबवर बघाव्या म्हणजे बंद करण्यासोबत फॉरवर्ड देखीन करता येतात.
  • Log in or register to post comments
N
NiluMP Tue, 08/19/2014 - 11:33 नवीन
मराठीचे गुणगान गाण्यासाठी झी चा सर्वसेवा हा काही मराठी माणूस नाही आहे आणि मराठी माणसांकडे ना मुसलमानांसारखा धर्मांतपणा आहे की जेव्हा अमेरिका आफगाणिस्तानातील मुसलमांनावर हल्ला करते तेव्हा येथे भारतातील मुसलमान अमेरिकन वस्तुवर बहिष्कार घालतो ना साउथवाल्यासारखे भाषाप्रेम की जेथे मातृभाषा व्यतिरिक्त इतर भाषा फाटयावर मारल्या जातात. नशीब समजा भोजपुरी सिनेमा डब करुन दाखवत नाहीय.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 08/19/2014 - 11:39 नवीन
भोजपुरी सिनेमा डब करुन दाखवत नाहीय
का नाही दाखवत खरं तर? लय भारी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP
त
तुषार काळभोर Tue, 08/19/2014 - 12:07 नवीन
व्हु'ज टॉकिंग!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP
ध
धन्या Tue, 08/19/2014 - 12:11 नवीन
मराठीचे गुणगान गाण्यासाठी झी चा सर्वसेवा हा काही मराठी माणूस नाही आहे आणि मराठी माणसांकडे ना मुसलमानांसारखा धर्मांतपणा आहे की जेव्हा अमेरिका आफगाणिस्तानातील मुसलमांनावर हल्ला करते तेव्हा येथे भारतातील मुसलमान अमेरिकन वस्तुवर बहिष्कार घालतो ना साउथवाल्यासारखे भाषाप्रेम की जेथे मातृभाषा व्यतिरिक्त इतर भाषा फाटयावर मारल्या जातात.
फार माजलेत लेकाचे. जाऊद्या तुम्ही. तुम्हीच अशी एखादी मराठी अस्मिता वगैरे जपणारी दुरदर्शन वाहिनी सुरु करा आता. सकाळी भक्तीसंगीताच्या चित्रफिती, दुपारी नाटके, सायंकाळी अशोक्स्राफ, लक्ष्या आणि म्हयेश कोटारेचे पिच्चर आणि रात्री महाराष्ट्राच्या कलागुणांना वाव देणारे म्हागुरु, स्वप्निल जोशी यांचे रीयालिटी शो. हाय काय आनी नाय काय. आपली अस्मिता आपणच जपायला हवी ना शेवटी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 09/02/2014 - 04:06 नवीन
ते म्हागुरु डोक्यात जातात....स्वप्निल जोशीचं मराठी दिव्य आहे. मक्याचे चित्रपट डोक्याची मंडई करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
क
काळा पहाड Tue, 08/19/2014 - 17:12 नवीन
की जेव्हा
की जेथे
ही प्रति़क्रिया एखाद्या इंग्रजी प्रतिक्रियेचा अनुवाद आहे का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP
स
सूड Tue, 08/19/2014 - 18:54 नवीन
>>ही प्रति़क्रिया एखाद्या इंग्रजी प्रतिक्रियेचा अनुवाद आहे का हो? आयडी बघा, MP लिहीलंय. तिकडे असं हिंदाळलेलं मराठी चालतं म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ध
धन्या Wed, 08/20/2014 - 09:38 नवीन
सूडजी, हा प्रकार इकडेही काही लोक करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 08/20/2014 - 11:51 नवीन
>>सूडजी, हा प्रकार इकडेही काही लोक करतात. हे बाकी खरं हो !! धन्या'जी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
पैसा Wed, 08/20/2014 - 12:48 नवीन
काय चाललंय रे धनाजी संताजी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ख
खटपट्या गुरुवार, 08/21/2014 - 00:26 नवीन
पूर्वी मी बैटमैन चा पंखा होतो. आता धन्या आणि सूड चा बी पंखा झालोय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 08/20/2014 - 12:54 नवीन
निलुशेठ, सहमत आहे तुमच्याशी. फक्त एखाद्याने भाषाप्रेम वगैरे म्हटले की त्याची टर उडवायची. बस्स. तुमचे निरीक्षण बरोबर आहे. मराठी माणूस आपल्याच माणसाचे पाय ओढणार. चालायचंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP
N
NiluMP Tue, 08/19/2014 - 12:00 नवीन
हो खरंच की म्हणून मराठी सिनेमासाठी मुबईत सिनेमागृह मिळत नाहीत.
  • Log in or register to post comments
भ
भाते Tue, 08/19/2014 - 12:50 नवीन
सध्या मराठीत वर्षाला शेकडो चित्रपट तयार होतात. त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच चित्रपट गल्ला जमवण्यात यशस्वी होतात. बाकीचे अर्थातच डब्यात जातात. ठराविक यशस्वी चित्रपट विकत घेण्यासाठी सगळे वाहिन्यावाले धडपडतात. डब्यात गेलेल्या चित्रपटांचे निर्माते पैसे वसुल करण्यासाठी ठराविक रकमेच्या खाली चित्रपटाचे हक्क वाहिन्यांना विकत नाहीत आणि ती रक्कम मोजायला वाहिन्यावाले तयार होत नाहीत. त्यामुळे अनेक 'पुरस्कार प्राप्त' चित्रपटसुध्दा या वाहिन्यांवर कधीच येत नाहित. मग तेच ते चित्रपट पुन्हा पुन्हा दाखवले जातात.
  • Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक Tue, 08/19/2014 - 15:36 नवीन
च्यानेल्सवर सिरीयल्सच्या दरम्यान जाहिरातींचे ब्रेक्स असतातच. त्या व्यतिरिक्त खाली एक पट्टी सरकत असते. त्यात परत केंव्हापदद्याच्या मधे वरच्या किंवा बाजुच्या कोपर्यात मधेच एखादे चित्र झळकते. जवळ जवळ अर्धा पडदा झाकला जातो. या वर काही दाद मागता येईल का? शेवटी आपण अमुक इतके पैसे देऊन जाहिरातींचा ब्रेकचा वेळ देतोच त्यात परत आपल्या बघण्याच्या आनंदांवर असे विरजण घातले जाते. मला तर ही प्रेक्षकांची फसवणुक वाटते,.
  • Log in or register to post comments
भ
भाते Tue, 08/19/2014 - 17:06 नवीन
कुठल्याही वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा/मालिकेचा अधिकृत वेळ ३० मिनिटे असतो. कार्यक्रम/मालिका नंतर/काही वेळाने तुनळी वर २०/२२ मिनिटांत बघायला मिळते. (पुढली २ मिनिटे शिर्षक गीत, कालच्या भागात, पुढे काय यांसाठी) म्हणजे २० मिनिटांसाठी १० मिनिटे जाहिराती असतात. (५०%). शिवाय कार्यक्रम/मालिका चालु असताना अक्षरश: कुठेही (वरती, खालती, सगळे कोपरे इ.) झळकणाऱ्या जाहिराती छळवाद करायला असतातचं. जाहिरातीमधुन इतका बक्कळ पैसा कमवुनदेखिल पुन्हा त्या केबल वाल्याला दर महिना काहीशे रुपये द्यायचे! जाहिराती पध्दल तर न बोललेलेच बरे! मुळ हिंदी जाहिरातीमध्ये अर्धे इंग्रजी अर्धे हिंदी शब्द असतात. भाषांतर (?) करणारे फक्त हिंदी शब्दांचे भाषांतर करतात. त्यामुळे अर्धी मराठी अर्धी इंग्रजी जाहिरात ऐकावी लागते.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Wed, 08/20/2014 - 11:40 नवीन
सिंपल लॉजिक आहे त्यांनी चोवीस तास वेगवेगळे कार्यक्रम दाखवले तरी तुम्ही २४ तास त्यांचाच चॅनेल लाऊन बसणार नाही. मग ते नवनवीन कार्यक्रम दाखवून एक्स्ट्राचे पैसे का गुंतवतील. सिनेमांचे हक्क फुकट तर मिळत नाही किंवा कार्यक्रम फुकट तर बनत नाहीत. त्यामुळे मग प्रत्येक चॅनेल असे धंदे करतेच. सोनीवर बघावे तेव्हा (मी नाही बघत) सीआयडी आणि त्यांचाच छोटा भाऊ सेटमॅक्स वर बघावे तेव्हा (हे देखील मी नाही बघत) सुर्यवंशम चालू असतेच ना .. आता वर्षभर आयपील खेळता येत नसल्याने त्यांना मग उर्वरीत वेळेत अशी वेळ मारून न्यावीच लागते.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Wed, 08/20/2014 - 14:01 नवीन
या बदलामागे पण काही ठोस कारणे असतील हे नक्की, याआधी झीने बरीच चांगले मराठी कार्यक्रम दिलेत. गंगाधर टिपरे, एका लग्नाची दुसरी गोष्ट इत्यादी. मी माझा अंदाज बांधतोय 1. हल्ली आवड बदललीय आणि लोकांना हेच आवडते ही मानसिकता. सध्या हिंदीत चालणारे चित्रपट, किंवा हिंदीतल्या मालिका बघितल्या तर झीचे काही चुकतेय असे वाटत नाही. आपण प्रेक्षकच असा आभास निर्माण करतोय. 2. विशिष्ट प्रकारचा शहरी मघ्यमवर्गीय सोडला तर साऱ्यांनाच लाउड इमोशन आवडतात हा ग्रह. माझ्या प्रेक्षकांना जर मी हे दिले नाही तर ते हिंदीकडे वळतील ही भिती. जमानाच झगमगतेचा आहे. त्याता संवेदनशील भावनांना विचारतो कोण. 3. लोकांना कंटाळा येत नाही, आला तरी ते एकदा सवय लागली कि ते बघतच राहतात. ज्यांना बघायचे नसते ते तसेही बघत नाही. त्यामुळे ताेचतोचपणा आला, रिपिट केले तरी चालते ही भावना. तेंव्हा कमी खर्चात हे करता येते. 4. कदाचित झीमराठीमधे काही आंतरीक बदल झाले असतील किंवा होत असतील. झीचे सर्वेसर्वा आधीही तेच होते आताही तेच आहेत. 5. झीचा चित्रपट थेटरात चालू असताना झीने चांगला चित्रपट जर टिव्हीवर दाखविला तर त्या थेटरातल्या चित्रपटाचे मार्केट जाते. 6. दहा वाइट गोष्टी दाखवून एक चांगला शो केला कि त्याला मिळनारा प्रतिसाद हा कल्पनेपलीकडला असतो. उदा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. -मित्रहो
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 08/21/2014 - 05:56 नवीन
लई भारी………… १ लंबर !!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/21/2014 - 08:00 नवीन
अहो लोकांना आताशा कुठल्याही नातेवाईकांकडे जायला होत नाही. ७ ते १० हा मालिकंचा वेळ. त्या हिंदी असोत कि मराठी असोत सगळे जण मंत्रमुग्ध झाल्यासारखे त्या इडियटबॉक्सच्या समोर बसतात. अशा वेळी आपल्याकडेही कोणी कडमडयला नको असे वाटते. पुर्वी मोठी माणसे पत्ते, कॅरम खेळायचे तर बायका शेजारणीशी गप्पा मारत मारत रात्रीचा स्वयंपाक करायच्या. आताशा चित्रच पालटले आहे. आणि पेठकरकाका आता त्या टी.व्ही वरिल मालिकातल्या बायड्यांबरोबर घरोघरातल्या बायकांची पण हालत कशी झाली आहे त्या करिता सध्या चे.पु. वर प्रसिध्द असलेले एक चित्र इकडे डकवतो. टॉ.व्ही. स्लिम झाले तर बायड्या प्यारे१ ने म्हंटल्या प्रमाणे भरताच्या वांग्याएवढ्या झाल्यात... Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 08/21/2014 - 12:09 नवीन
>>बायड्यांबरोबर घरोघरातल्या बायकांची पण हालत कशी झाली आहे हे लिहीताना पुरषांनी स्वतःच्या पोटाचे घेरही बघावेत एकदा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
क
कवितानागेश गुरुवार, 08/21/2014 - 12:33 नवीन
तीव्र सहमती! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
श
शिद गुरुवार, 08/21/2014 - 12:38 नवीन
हाहाहा...सहमत. -बिअर बेली वाला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 08/21/2014 - 14:38 नवीन
>>बिअर बेली वाला असं चारचौघात लिहू नये, आम्ही लिहीलंय का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
ध
धन्या गुरुवार, 08/21/2014 - 17:05 नवीन
बीयरची बी तरी खाल्लीय का तुम्ही कधी? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 08/21/2014 - 17:50 नवीन
>>बीयरची बी तरी खाल्लीय का तुम्ही कधी? आता तुम्ही बोललातच म्हणून स्पष्ट बोलतोय हो, आम्ही आमच्या सपाट पोटाबद्दल लिहीलंय का असं म्हणायचं होतं!! आता झायरात झायरात म्हणणार्‍यांना योग्य तेथे मारण्यात येईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
म
मित्रहो गुरुवार, 08/21/2014 - 16:50 नवीन
मॉनिटरची साइज कमी होत गेली आणि पुरुषांचे घेर वाढत गेले. जॉब्स तू चुकला रे तू मिनी आणला, पॅड आणला आणि आमची वाट लावून गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ध
धन्या गुरुवार, 08/21/2014 - 17:06 नवीन
कित्ती कित्ती सुंदर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
अ
अन्नू Wed, 08/27/2014 - 13:04 नवीन
आत्ताशी जरा मिपावर आल्यासारखं वाटलं!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा