Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा दिवाळी अंक २०१४ - सूचना.

द
दिवाळी अंक
Sun, 08/24/2014 - 08:43
🗣 97 प्रतिसाद
राम राम मंडळी. :) मंडळी... कळविण्यास अतिशय आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत. तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २०/०९/२०१४ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने मिपा एडिटरमधे (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित चोप्य पस्ते करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल. १. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे. कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी, अन्य ललित लेखन, पाककृती,चित्रे, छायाचित्रे, व्हिडिओ इ. प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील, तरी दिवाळीच्या निमित्ताने स्वतंत्रपणे प्रकाशित करायला हरकत नाही. २. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने -विषय, आकार इत्यादिबाबतची) नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे. ३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : २०/०९/२०१४ ४. इतर अटी: साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच! ५. साहित्य पाठविण्याचा पर्याय. वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा. ६. अंकासाठी पाठवलेलं साहित्य पूर्व प्रकशित असू नये. आणि मिपा दिवाळी अंकात हे लिखाण प्रकाशित झाल्यावर निदान ३० दिवसांपर्यंत ते लेखन अन्यत्र प्रकाशित करू नये. मंडळी, आपल्या सहकार्याशिवाय कोणताच उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण २५ दिवस बाकी आहेत. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती ! आम्ही आपल्या लेखनाची वाट पाहात आहोत, धन्यवाद !!!

प्रतिक्रिया द्या
36027 वाचन

💬 प्रतिसाद (97)
स
सुहास झेले Sun, 08/24/2014 - 10:31 नवीन
ज्ये बात.... शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 10/17/2014 - 08:22 नवीन
कधी येतोय म्हणे हा अंक. फार वाट पहायला पाहू नका रे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
श
शिद Fri, 10/31/2014 - 10:55 नवीन
मिपा दिवाळी अंक - २०१४
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
प
प्रभाकर पेठकर Sun, 08/24/2014 - 10:57 नवीन
धन्यवाद आणि मिपाच्या पाठीवर एक कौतुकाची थाप. नक्कीच, दिवाळी अंकास एखादा लेख, एखादी पाककृती पाठवून सक्रिय सहभागाचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 08/24/2014 - 11:11 नवीन
उत्सुकतेने वाट पहात आहे..अंकाची
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/25/2014 - 09:25 नवीन
मी दिवाळी अंकासाठी तुझ्याकडून एखाद्या मस्त लेखाची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Mon, 08/25/2014 - 12:16 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/24/2014 - 14:18 नवीन
दिपावली अंकाला अनेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/25/2014 - 09:24 नवीन
लिवा एखादी मस्त अंतराळातली लाखों वर्षांची सफर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ए
एस Sun, 08/24/2014 - 18:53 नवीन
ह्यावर्षी चार ओळी दिवाळी अंकासाठी खरडण्याचा निश्चितच विचार केला जाईल.
  • Log in or register to post comments
V
vrushali n Mon, 08/25/2014 - 09:19 नवीन
प्लीझ प्लीझ खुप जास्त संखेत कथा कादंबरी लिहा सगळ्या लेखक्/लेखीकांनो
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/25/2014 - 09:26 नवीन
पेठकर काका, स्वॅप्स, धन्यवाद! लेखाची वाट बघत आहे. सुहास झेले, अजून जरा मोठ्या शुभेच्छा पाहिजेत, एक पानभर! :P
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Mon, 08/25/2014 - 09:51 नवीन
नक्कीच ताई..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्यारे१ Mon, 08/25/2014 - 09:47 नवीन
सुचना दीर्घ असायला हवी ना?... सूचना अशी?
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/25/2014 - 09:59 नवीन
बदल करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Mon, 08/25/2014 - 18:36 नवीन
आमच्या सूचनेचं काम संपलं. उडवायला हरकत इल्ले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ट
टवाळ कार्टा Mon, 08/25/2014 - 10:39 नवीन
डॉ.खरेंचे लेख असलेच पाहिजेत आणि तेसुध्धा नविन :)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 08/25/2014 - 11:13 नवीन
त्याचबरोबर आतिवास, स्नेहांकिता, गवि, रामदास, जयंत कुलकर्णी, रणजीत चितळे, जैक डेनियल, अभ्या, इ. नियमित न लिहिणार्या मंडळींनीही लिहायचं मनावर घ्यावं ही विनंती. मोजी आणि मकले यांनाही आग्रहाची विनंती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सौंदाळा Mon, 08/25/2014 - 11:31 नवीन
+१ आणि पिवळो डांबिस पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
स्पा Mon, 08/25/2014 - 11:32 नवीन
ह्येच बोल्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
प
पैसा Mon, 08/25/2014 - 11:45 नवीन
त्याशिवाय टवाळ कार्टा, आदूबाळ, सौंदाळा आणि स्पा याम्च्या लेखाच्या प्रतीक्षेत. (स्पा यांनी गेली २ वर्षे कबूल करून कल्टी मारली होती याची झाईर आठवण करून देत आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सस्नेह Mon, 08/25/2014 - 12:20 नवीन
ज्योती, यशोधरा, प्यारे १, मस्त कलंदर व मोदक यांनाही आग्रहाची लेखन विनंती Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सूड Mon, 08/25/2014 - 10:46 नवीन
नोटेड!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/25/2014 - 19:13 नवीन
नुसतंच नोट करू नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
भ
भाते Mon, 08/25/2014 - 11:30 नवीन
दिवाळी अंकासाठी समस्त मिपाकरांना लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा! दिवाळी अंकाची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 08/25/2014 - 11:42 नवीन
चला परत दर्जेदार साहित्यकृती वाचायला मिळणार तर! आतुरतेने वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/25/2014 - 19:12 नवीन
तुझी काहीतरी गोड पाकृ हवीच ना दिवाळीला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
र
रेवती Tue, 08/26/2014 - 22:29 नवीन
तसं कुठं ल्हिलय वर? पाकृ चालतील असा उल्लेख केला नसल्याने आम्ही माघार घेतली होती ना पैतै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मुक्त विहारि Mon, 08/25/2014 - 18:12 नवीन
तारीख काय?
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/25/2014 - 19:08 नवीन
दिवाळीच्या पहाटे प्रकाशित करू असा विचार आहे! आगे भगवान आणि नीलकांत की मर्जी आणि क्रिपा! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Mon, 08/25/2014 - 20:33 नवीन
क्रिसमसच्या वेळी जरी प्रसिद्ध झाला तरी, त्याचे स्वागत दिवाळी सारखेच केल्या जाईल. (मिपाभक्त) मुवि...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रभाकर पेठकर Mon, 08/25/2014 - 21:52 नवीन
माझ्या लहानपणी एकदा वर्तमानपत्रात बातमी छापून आली होती. 'हवामानखात्याच्या अंदाजानुसार यंदाही ७ जून रोजी पावसाळा सुरु होईल' ह्या बातमीचा संदर्भ देऊन दुसर्‍या दिवशी आचार्य अत्रे ह्यांची टिपण्णी आली होती, 'एक तारखेला पाऊस सुरु झाला तरी जनतेने, 'पावसाळा सुरु झाला आहे' असे मानू नये.'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 08/26/2014 - 09:01 नवीन
@पावसाळा सुरु झाला आहे' असे मानू नये.'>>> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
न
नगरीनिरंजन Mon, 08/25/2014 - 18:34 नवीन
दिवाळी अंकाला हार्दिक शुभेच्छा! संपादकांच्या निवडीच्या उमेदवार पानांमध्ये आम्हीही एखादं पान सरकवण्याचा प्रयत्न निश्चितच करु.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/25/2014 - 19:11 नवीन
विसरलात तर आठवण करून देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
स
सस्नेह Tue, 08/26/2014 - 08:56 नवीन
आश्वासन हवे. ननि तुम्ही मागच्या दिवाळीअंकानंतर मिपासाठी काहीच लिहिले नाही. लिहिते व्हा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
च
चौथा कोनाडा Mon, 08/25/2014 - 19:22 नवीन
मी पण भाग घेणार या वेळी .... (असं आत्ता तरी म्हणतोय )
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 08/26/2014 - 09:51 नवीन
कामाला लागतो... (स्वगतः असं म्हणून कविता होत नाही, पण... बघू..)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2014 - 21:46 नवीन
>>>>(स्वगतः असं म्हणून कविता होत नाही, पण... बघू..) कांहीतरी 'चुरण' घेऊन पाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
प
प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2014 - 21:50 नवीन
हलकेच घ्या हो. *biggrin* हसरी smiley टाकायला विसरलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
द
दशानन Tue, 08/26/2014 - 20:19 नवीन
यावर्षी माझा देखील सहभाग आहे, काही व्यक्तिगत कारणामूळे अनेक दिवस मिपावर मी उपलब्ध नव्हतो, पण आता असेन.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 08/26/2014 - 20:22 नवीन
चौथा कोनाडा, मिका आणि दशानन, लिखाणाची वाट बघते. पुढची आठवण कधी करू ते सांगा!
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 08/26/2014 - 20:26 नवीन
मी लिहतो आहे सध्या, आठवण करुन द्यावी लागेल असे वाटत नाही आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
च
चौथा कोनाडा गुरुवार, 08/28/2014 - 08:49 नवीन
उत्तेजनासाठी धन्यवाद, पैसाताई ! लिखाण चालू आहे. अधून मधून आठवण करून दिली तरी चालेल. असा पुश मिळाला की वेळेत होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ख
खुशि Wed, 08/27/2014 - 13:03 नवीन
दिवाळी अन्काची वाट पाहते.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 08/27/2014 - 13:10 नवीन
मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Wed, 08/27/2014 - 15:56 नवीन
शुभेच्छा : )
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 08/28/2014 - 10:47 नवीन
१. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे. कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी इ. प्रकारचे साहित्य पाठवावे.
चित्र चालेल काय हो? फोटूबिटू? की 'वर्थ अ थाउजंड वर्ड्स' हे वर्ड्समध्येच पाहिजे?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 08/28/2014 - 18:39 नवीन
फोटो, कलाकृती आणि पाकृन्चेपण स्वागत आहे
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/28/2014 - 20:00 नवीन
शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा