Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा दिवाळी अंक २०१४ - सूचना.

द
दिवाळी अंक
Sun, 08/24/2014 - 08:43
🗣 97 प्रतिसाद
राम राम मंडळी. :) मंडळी... कळविण्यास अतिशय आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत. तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २०/०९/२०१४ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे. अन्यथा जणू धागाच प्रकाशित करतो आहोत अशा रितीने मिपा एडिटरमधे (इमेज टॅग्जसकट) लिहीलेली पोस्ट तशीच्यातशी एचटीएमएल टॅग्जसहित चोप्य पस्ते करुन टेक्स्ट फाईल (नोटपॅड) जीमेलवर अटॅच करुन पाठवली तरी दिवाळी अंक संपादकांचे काम सोपे होईल. १. कोणकोणत्या साहित्यप्रकारात लेखन अपेक्षित आहे. कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, कादंबरी, अन्य ललित लेखन, पाककृती,चित्रे, छायाचित्रे, व्हिडिओ इ. प्रकारचे साहित्य पाठवावे. अंक पीडीएफ स्वरूपातही काढायचा आहे त्यामुळे मल्टिमिडिया फाईल्स असतील तर त्या पीडीएफ अंकात फक्त लिंक या स्वरूपात येतील, तरी दिवाळीच्या निमित्ताने स्वतंत्रपणे प्रकाशित करायला हरकत नाही. २. कोणत्या प्रकारचे साहित्य स्वीकारता येणार नाही (बंधने -विषय, आकार इत्यादिबाबतची) नेहमीचे म्हणजे अगदी एकोळी दोनोळी साहित्य पाठवू नये, तसेच उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट ट्रॅजेडीने भरलेले असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे. ३. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : २०/०९/२०१४ ४. इतर अटी: साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत दिवाळी अंक संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. दिवाळी अंकात समाविष्ट न होऊ शकलेलं साहित्य तुम्ही नेहमीप्रमाणे मुख्य बोर्डावर प्रसिद्ध करू शकताच! ५. साहित्य पाठविण्याचा पर्याय. वर लिहिल्याप्रमाणे mipa.sampadak@gmail.com या जीमेल आयडीला पाठवल्यास उपकृत राहू. पण काही कारणाने ते शक्य नसेल तर दिवाळी अंक आयडीला मिपावर व्यनि करावा. ६. अंकासाठी पाठवलेलं साहित्य पूर्व प्रकशित असू नये. आणि मिपा दिवाळी अंकात हे लिखाण प्रकाशित झाल्यावर निदान ३० दिवसांपर्यंत ते लेखन अन्यत्र प्रकाशित करू नये. मंडळी, आपल्या सहकार्याशिवाय कोणताच उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अजून साधारण २५ दिवस बाकी आहेत. तरी सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती ! आम्ही आपल्या लेखनाची वाट पाहात आहोत, धन्यवाद !!!

प्रतिक्रिया द्या
36027 वाचन

💬 प्रतिसाद (97)
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 08/29/2014 - 06:18 नवीन
एक कविता पाठवली आहे...
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 08/29/2014 - 06:21 नवीन
एक कविता पाठवली आहे...अकु श्टाईल..
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 08/31/2014 - 10:52 नवीन
अंकासाठी टंकणे क्रमप्राप्त आहे !!
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 09/01/2014 - 07:57 नवीन
दिवाळी अंकासाठी शुभेच्छा.. मागील दोन अंकांप्रमाणे हा दिवाळी अंकदेखील दर्जेदारच असणार ह्याबद्दल शंका नाही.. :-)
  • Log in or register to post comments
M
Maharani Tue, 09/02/2014 - 09:58 नवीन
दिवाळी अंकाची वाट पहात आहे.....
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Tue, 09/02/2014 - 11:32 नवीन
काहितरि लिहिण्याची इच्छा आहेच.पाककृती आणि कलाविभागातील चालेल ना!पण गणपती उत्सवाची गडबड संपल्यानंतर जमेल.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 09/04/2014 - 10:22 नवीन
ईशा१२३, माम्लेदारचा पंखा, लिहायला सुरुवात झाली का?
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 09/08/2014 - 11:40 नवीन
विषयच गावना....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/08/2014 - 12:40 नवीन
दूरचित्रवाणीवरील जाहिराती. वाचन संस्कृती मागे पडते आहे का? स्त्रिचा सन्मान - मुलांवर करायचा संस्कार. ऐहिकतेचा प्रभाव आणि मनःस्वास्थ. आरोग्यदायी जीवनपद्धती. व्यायामाचे महत्व. बचतीचे महत्व आणि मार्ग. ऋतु हिरवा. पावसाळी सहल. पर्यावरण रक्षण. कौटुंबिक विनोदी प्रसंग. कुटुंबप्रमुख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
प
प्यारे१ Mon, 09/08/2014 - 12:53 नवीन
आता दिवाळी अंकासाठी विषय सांगता का काका? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/08/2014 - 13:01 नवीन
अरे असं सारखं सारख गीतावाचन करायला लावू नकोस मला. *sad*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Mon, 09/08/2014 - 13:02 नवीन
एकदम गावामधलं 'ढ' झाल्यासारखं वाटलं. गा आणि व मध्ये ढ. थॅन्क यु, 'काका'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 09/08/2014 - 12:55 नवीन
चला...ह्या निमित्ताने का होईना .... श्रीगणेशा करावा म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/08/2014 - 13:03 नवीन
चावट विषय देऊ का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 09/08/2014 - 13:25 नवीन
आम्ही "बा म वि प" नाही होऊ देत !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
च
चौकटराजा Fri, 09/05/2014 - 02:23 नवीन
एक पी डी एफ करून ती ई -मेलवर पाठवू का ?. त्यात मजकूर व चित्रेही असतील. विषय - युरोपातील वास्तुकलेचा खजिना .
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 09/05/2014 - 02:46 नवीन
काहीतरी वेगळं पहायला मिळणार अस वाटतय. पण पीडीएफ अ‍ॅक्सेस करता येणार नाही अस वाटतय मागच्या अनुभवावरुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Fri, 09/05/2014 - 03:34 नवीन
बर. मग धाग्याप्रमाणेच लेखन करायचे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना Fri, 09/05/2014 - 04:13 नवीन
हो. ते जास्त बर पडेल अस वाटतय. विशेष्तः चित्र लावताना लिंकाच बर्‍या पडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
पैसा Fri, 09/05/2014 - 05:55 नवीन
धाग्याप्रमाणे लेखन करून जी फाईल तयार होते (टेक्स्ट फाईल) ती जीमेल वर पाठवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
स्पार्टाकस Sat, 09/06/2014 - 16:20 नवीन
काहीतरी लिहीण्याचा निश्चितच प्रयत्न करेन
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 09/14/2014 - 19:13 नवीन
लेख पाठवला आहे (हुश्श्य ! झाला बाबा मुदतीत पुर्ण लिहून ! कॉलेज सबमिशनचे दिवस आठवले) ७ एमबी ची वर्ड फाईल पोहोचली असेल ना जीमेलने ? काय म्हणतायत संपादक ?
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/14/2014 - 19:35 नवीन
लेख छान आहे! मात्र उत्तर पाठवलंय तशी टेक्स्ट फाईल पाठवा प्लीज! इतकी चित्रे असतील तर आम्हाला पुन्हा मिपावर अपलोड करायला फार त्रास होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Mon, 09/15/2014 - 15:34 नवीन
अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद ! कुठे "दिपावली" या विभागातच लेखन करायचे ना ? मला Insert Picture असा पर्याय कुठे दिसला नाही. स्क्रीन वर दिसणारा "Add a New File" " Browse" आणी "Upload' हाच तो पर्याय का? याने केले व पूर्वपरीक्षण ला क्लिक केले तरी Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 09/15/2014 - 15:51 नवीन
व्यनि केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
स
सूड Mon, 09/15/2014 - 11:23 नवीन
आम्हाला काही अजून मुहूर्त लागलेला नाही लिहायला. तरी प्रयत्न नक्कीच करेन.. :)
  • Log in or register to post comments
व
विटेकर Mon, 09/15/2014 - 11:28 नवीन
आम्ही प्रतिसादापुरते , ते नक्की लिहू...
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 09/17/2014 - 03:39 नवीन
प्रतिसादक्स मिपाकी शान है ! सगळेच मोजी झाले तर लेखाच्या पायाला कोण वाली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
क
काउबॉय Mon, 09/15/2014 - 12:20 नवीन
ही कसर एखाद्या सकस कथेने दिवाळी अंकात भरून निघो हीच प्रार्थना.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 09/15/2014 - 13:03 नवीन
तुम्ही मोजींचे फ्यान दिसत नाही. नाहीतर ही तक्रार केली नसतीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय
क
काउबॉय Mon, 09/15/2014 - 15:19 नवीन
यावर दुमत नाही पण तो एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे. मी कथानक रहस्यमई असणार्या कथाबिजाबाबत बोलत आहे.... नुसतेच रहस्यमयी शब्द असणार्या कथांबाबत न्हवे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 09/16/2014 - 20:23 नवीन
दिलाय ब्वा लेख....गोड मानून घ्या संपादक मंडळी !!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 09/17/2014 - 01:51 नवीन
दिवाळी अंकासाठी कष्ट उपसणार्‍या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 09/17/2014 - 08:03 नवीन
अर्धा टंकून व्यनि करायला गेलो स्वतःला आणि मिपा बंद पडले. :-( पुढच्या दिवाळीच्या आत लिहून पूर्ण करण्याचे आश्वासन देतो. :-)
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 09/17/2014 - 08:31 नवीन
असं कुठं झालंय! सगळ्यांनाच २ दिवस जास्त देऊ, मिपा बंद पडलं होतं तेवढे! पण लेख पायजेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2014 - 09:56 नवीन
>>>> सगळ्यांनाच २ दिवस जास्त देऊ. उत्साहवर्धक बातमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सूड Wed, 09/17/2014 - 12:04 नवीन
>>सगळ्यांनाच २ दिवस जास्त देऊ धन्यवाद्स संपादककाकू !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एस Fri, 09/19/2014 - 16:54 नवीन
प्रयत्न जोरात सुरू आहेत. शनिवार/रविवारपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करेन. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ए
एस Sat, 09/20/2014 - 15:35 नवीन
हुश्श्... ग्वॉड मानुन घ्या जी. आसलं काय ल्हायची पयलीच कोशिस हाय आमची. लय तरास झाला काय सांगू! :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
आ
आनन्दिता Fri, 09/19/2014 - 18:16 नवीन
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Fri, 09/19/2014 - 18:18 नवीन
मोजींनी दिवाळी अंकासाठी काही लिहीलं नाही का? :)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 09/19/2014 - 18:23 नवीन
काय की! पण लिहिल्यास मुद्रितशोधनाविना ते लेखन पाँस व्हावं ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2014 - 10:30 नवीन
दिवाळी अंक २०१४ ची साहित्य स्विकारण्याची तारीख उलटून गेल्यामुळे दिवाळी अंक २०१४ चे दरवाजे आता बंद झाले आहेत का? कि किलकिले उघडे आहेत?
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 09/30/2014 - 14:18 नवीन
मलाही हाच प्रश्न पडलाय. मला माहीत आहे आता फारच उशीर झालाय पण काय करणार माझी कविता फारच लहरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
इ
इनिगोय Tue, 09/30/2014 - 04:54 नवीन
कधी? ...कधी?
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 10/31/2014 - 09:29 नवीन
दिवाळी अंक उत्तम झाला आहे. :) गवि, रामदास काका, प्रभु सर, जेपी, जॅक डॅनियल्स ह्यांनी देखील लेखणी सरसावयला हवी होती असं वाटलं. अजुन मोठा अंक वाचायला आमची ना नाही :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 11/04/2014 - 05:42 नवीन
मूळ विषया पासुन जराचे अवांतर :- आपले मिपा आयबीएन लोकमतच्या "वाचाल तर वाचाल" कार्यक्रमात दिसले. :) इतर मराठी संकेतस्थळे सुद्धा दिसली. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा