मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न - भाग १
मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न खालीलप्रमाणे (कृपया प्रामाणिक व खरीखुरी उत्तरे द्यावीत. कृपया प्रतिसाद गोडसे/गांधी/मोदी/सावरकर, धर्मनिरपेक्षता, काँग्रेस/भाजप, ब्राह्मण/अब्राह्मण इ. जहाल विषयांच्या वळचणीला नेऊ नये ही नम्र विनंती).
(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का?
(२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात. ते भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी स्वतः तयार केलेले नसूनसुद्धा 'राष्ट्रपतींनी भाषणात अमुक सांगितले', 'राज्यपालांनी भाषणात तमुक सांगितले' असे का म्हटले जाते?
(३) हिंदी चित्रपटाचे नाव सुरूवातीला हिंदीत, इंग्लिशमध्ये व नंतर उर्दु/अरेबिक मध्ये दाखविले जाते. हिंदी वगळता याच इतर २ भाषात नाव का दाखवितात? मल्याळम्, तेलगू, पंजाबी इ. सर्व भारतीय भाषांमध्ये नाव का दाखवित नाहीत?
(४) पूर्वीच्या गिअरच्या स्कूटर्सच्या गिअरची रचना जरा विचित्र असायची. पहिला गिअर टाकताना तो उलटा आपल्या दिशेने फिरवायला लागायचा. नंतर विरूद्ध दिशेने फिरविल्यानंतर न्यूट्रल गिअर व नंतर ओळीने दुसरा, तिसरा व चौथा गिअर असायचे. मोटारसायकलचे गिअर देखील असेच असतात. गिअर्सचा क्रम १-न्यूट्रल-२-३-४ असा असायचा. त्याऐवजी गिअर्सचा क्रम न्यूट्रल-१-२-३-४ असा व्यवस्थित क्रमाने का नव्हता?
(५) ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये असे म्हणतात. ते वेगवेगळे खावेत असे सांगितले जात. यामागचे कारण काय असावे? दोन्ही वेगवेगळे खाल्ले तरी शेवटी पोटात दोन्ही पदार्थ एकत्र होतीलच. मग एकत्र का खाऊ नयेत?
(६) एखादा मुलगा/मुलगी खूप खर्चिक मागणी करायला लागला/ली तर पूर्वीची माणसे "तुझे चोचले पुरवायला आम्ही काही लॉर्ड फॉकलंड नाही लागून गेलो" असे उपहासात्मक उद्गार काढून ती मागणी धुडकावून लावत असत. फॉकलंड नावाचे अर्जेंटिना देशाच्या जवळ एक छोटे बेट आहे. पण हा लॉर्ड फॉकलंड कोण होता? तो खूप श्रीमंत आणि उधळ्या होता का?
💬 प्रतिसाद
(75)
आ
आदूबाळ
Mon, 08/25/2014 - 09:33
नवीन
उत्तर ६:
मुम्बैतली वेश्यावस्ती फॉकलंड रोड आणि फोरास रोड अशा डॉन रस्त्त्यावर प्रामुख्याने होती. त्यात फोरास रोड हा सामान्य/स्वस्त/कमी प्रतीचा तर फॉकलंड रोड महाग/हुच्चभृ असा समजला जात असे. त्यामुळे "स्वत:ला लॉर्ड फॉकलंड (पक्षी: अती उच्चभ्रू) समजतोस का" असा वाक्प्रचार पडला.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Mon, 08/25/2014 - 10:05
नवीन
प्रश्न क्र ४:
http://mechanics.stackexchange.com/questions/2411/what-is-the-technical-reason-the-engineer-decided-the-motorcycle-gear-pattern-a
- Log in or register to post comments
स
संपत
Mon, 08/25/2014 - 10:06
नवीन
माझ्या एका आजोबांनुसार लॉर्ड फॉकलंडच्या काळात मुंबई मध्ये विजेची रोषणाई करण्यात आली त्यामुळे लॉर्ड फॉकलंड म्हणजे अतिशय श्रीमंत उधळपट्टी करणारा माणूस असे समीकरण पडले.
- Log in or register to post comments
व
विक्रान्त कुलकर्णी
Mon, 08/25/2014 - 10:07
नवीन
लॉर्ड फॉकलन्ड हा मुम्बई प्रान्ताचा १९ व्या शतकातील गव्हर्नर होता. त्याच्यावरुन त्या रस्त्याला फॉकलन्ड रोड नाव दिले गेले.फॉकलन्ड चा आणि उधळपट्टीचा काहि सम्बन्ध असावा असे वाटत नाही.कदाचित फॉकलन्ड हा राजघराण्याशी सम्बन्धीत असल्यामूळे हा वाक्प्रचार रुढ झाला असावा.
- Log in or register to post comments
स
संपत
Mon, 08/25/2014 - 10:08
नवीन
३) हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक प्रामुख्याने ह्या तीन लिपी समजणारे असतात म्हणून.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 08/26/2014 - 10:22
नवीन
हिंदी चित्रपटाच्या बहुसंख्य प्रेक्षकांना हिंदी समजणारच. परंतु इंग्लिश व अरेबिक लिपी समजणारे तुलनेने फारच थोडे प्रेक्षक असतात. अशा परिस्थितीत फक्त याच दोन जास्तीच्या भाषात शीर्षक का दाखविले जाते ते समजले नाही. असो.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Tue, 08/26/2014 - 10:48
नवीन
अरेबिक लिपी समजणारे तुलनेने फारच थोडे >>>>> गुरुजी- उत्तर भारतातले उर्दु भाषिक मुसलमान ( ८-१० कोटी ) अरेबिक समजतात. तसेच एकेकाळी पंजाबी लोक उर्दू लीपी सहज वापरायची. पंजाबी वर्तमानपत्र सुद्धा उर्दू लिपीत असायची.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 08/26/2014 - 11:11
नवीन
जवळपास तेवढीच लोकसंख्या मराठी/तामिळ्/मल्याळम्/तेलगू इ. भाषा समजतात. बहुसंख्य भारतीयांना दाक्षिणात्य लिपीप्रमाणे अरेबिक लिपी सुद्धा वाचता येत नाही. पण शीर्षक अरेबिकमध्ये दाखवितात आणि कोणत्याही दाक्षिणात्य भाषात दाखवित नाहीत.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Tue, 08/26/2014 - 11:18
नवीन
कारण दाक्षीणात्य लोक त्या हिंदी सिनेमाचे प्रेक्षक नव्हते ( पूर्वीचे सांगतोय ). सौथंडीयन प्रोड्युसरच्या सिनेमांना पण उर्दु मधे नाव असायचे.
नाव देवनागरी मधे असते त्यामुळे मराठी लोकांना समजतेच.
माझ्या मते आता थोडे बदलते आहे. हल्ली उर्दु मधले नाव नसते बर्याच वेळेला.
- Log in or register to post comments
स
सुनील
Tue, 08/26/2014 - 12:25
नवीन
भाषा आणि लिपी यांत गल्लत होते आहे काय?
उदा. 'हाथी मेरे साथी' हे हिंदी चित्रपटाचे नाव, देवनागरी, रोमन आणि उर्दू (ही अरेबिक की पर्शियन हे ठाऊक नाही) लिपींत लिहिलेले दाखवतात. कारण हिंदी चित्रपट पाहणारा बहुसंख्य (साक्षर) प्रेक्षकवर्ग ह्या तिहींपैकी किमान एखादी लिपी वाचू शकतो. एवढच!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 08/26/2014 - 20:06
नवीन
उर्दु आणि अरेबिक लिपीमधे फरक नाही का??
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 08/27/2014 - 06:54
नवीन
काही फरक आहेत. मूळ अरबी लिपीत नसलेली कैक चिन्हे उर्दूत आहेत, उदा. प, ट, ड, ग़, इ. साठीची अक्षरचिन्हे. शिवाय अरबीतल्या सर्व अक्षरचिन्हांचा उच्चार मूळ अरबीप्रमाणे होतो असे नाही, त्यातही फरक आहे.
बेशिक लिपी अरबी. पुढे फारसीने ती अंगीकारली तेव्हा आपल्या सोयीसाठी काही बदल केले. काही नवीन चिन्हे अॅड केली, तर जुनी चिन्हे तशीच ठेवली- जुना उच्चार कायम न ठेवता. हे सगळे भरताड भारतात आले तेव्हा वरील प्रक्रियेची पुनरावृत्ती झाली. सबब मूळ अरबी लिपीशी तुलना केली तर उर्दू लिपीत कैक चिन्हे जास्त आहेत.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 08/27/2014 - 08:09
नवीन
_/|\_
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Mon, 08/25/2014 - 10:28
नवीन
(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का?
उत्तरः नाही, नाही.
नख, केस प्रमाणेच खुरात मेलेल्या पेशी असल्याने वेदना/जखम होत नाही
नालेमूळे घोड्याला चांगली पकड मिळते त्यामूळे तो वेगात जावू शकतो.
(२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात. ते भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी स्वतः तयार केलेले नसूनसुद्धा 'राष्ट्रपतींनी भाषणात अमुक सांगितले', 'राज्यपालांनी भाषणात तमुक सांगितले' असे का म्हटले जाते?
उत्तरः राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात, त्यामुळेच!
(५) ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये असे म्हणतात. ते वेगवेगळे खावेत असे सांगितले जात. यामागचे कारण काय असावे? दोन्ही वेगवेगळे खाल्ले तरी शेवटी पोटात दोन्ही पदार्थ एकत्र होतीलच. मग एकत्र का खाऊ नयेत?
उत्तरः आयुर्वेदात काही विरुद्ध विपाक(पदार्थांचा एक गुणधर्म) असलेल्या पदार्थांना एकत्र खावू नये असे सांगितले आहे.
त्याप्रमाणे दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे, थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये असे सांगितले आहे.
ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये हे प्रथमच ऐकतो आहे. कारण हे तीनही पदार्थ एकच(ऊष्ण) विपाक असलेले आहेत.आम्ही स्वतः ताकात गूळ घालून खातो.
मठ्ठा हा मात्र थंड विपाकाचा असल्याने त्याबरोबर (खिरीसारखे) गूळ घातलेले पदार्थ खावू नयेत.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 08/25/2014 - 11:07
नवीन
हो, बरोबर.
दह्यामध्ये गूळ घालून केलेलं बोंगाली मिष्टी दोय असतंच की.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 08/25/2014 - 11:31
नवीन
तसं तर शिकरण आणि फ्रुट सॅलड सुद्धा असते फळे आणि दूधमिश्रीत पदार्थ म्हणून शिवाय त्यात साखरही असते.
दही उष्ण आणि ताक थंड (त्यात पाणी मिसळल्याने) असे लहानपणापासून ऐकत आलो आहे. मठ्ठ्यामध्ये आलं, मिरची असे उष्ण प्रकृतीचे पदार्थ मिसळयावर मठ्ठा थंड कसा होईल? असो. माझे ज्ञान अपुरे आहे.
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 08/25/2014 - 11:38
नवीन
उष्ण आणि थंड पदार्थ असे काही असतात (त्यांच्या प्रत्यक्ष तापमानाखेरीज) हीच मुळात भरपूर प्रचलित पण कोणताही तार्किक आणि रॅशनल बेस नसलेली समजूत आहे.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Mon, 08/25/2014 - 11:41
नवीन
+ प्रचंड सहमत
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 08/25/2014 - 11:54
नवीन
नाही. असे असते हे स्वानुभवावरून सांगू शकेन. चिकू, आंबा ही फळे उष्ण आणि केळी, द्राक्ष, कलिंगड इ.इ. फळे थंड आहेत. कवचयुक्त मासे (कोलंबी, खेकडे इ.इ.) गरम पडतात, अंडीही उष्ण प्रकृतीची आहेत. बेडूक (माझ्या ऐकीव ज्ञानानुसार) सर्वात जास्त उष्ण आहे. बेडकाच्या तंगड्या प्रमाणाबाहेर खाल्ल्यास शौचास रक्त पडू शकते. मसाल्यात धणे, जीरे, दालचीनी थंड आहेत तर काळेमिरे, लवंग उष्ण आहेत. दात दुखीवर लवंग दाताखाली धरून आराम मिळतो. पण जास्त लवंगा खाल्ल्या गेल्या तर तोंडात फोड येतात. आपली प्रकृतीही थंड - उष्ण असते. उष्ण प्रकृतीच्या माणसांनी जास्त उष्ण पदार्थ खाल्ले तर तोंडात फोड, डोळ्यांची जळजळ आणि शौचास/लघवीस जळजळ होऊ शकते तर थंड प्रकृतीच्या माणसांना थंड पदार्थांच्या सेवनाने सर्दी सारखे विकार होतात.
- Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ
Mon, 08/25/2014 - 18:46
नवीन
का हो तुम्हाला केळं किंवा पेरू खाऊन एकदाही सर्दी झाली नाही? किंवा संक्रांतीला तीळगूळ भरपूर खाल्याने उष्णता होऊन घसा दुखला नाही? मग थंड किंवा उष्ण पदार्थ नसतातच असे कसे म्हणता?
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Tue, 08/26/2014 - 10:51
नवीन
सर्दी होण्याचा संबंध उष्ण्/थंडाशी कुठे आहे? एकतर इन्फेक्श्न किंवा अॅलर्जी हे कारण आहे.
तसेच घसादुखी वगैरे.
उष्ण्/थंड हा आयुर्वेदाचा मुर्ख पणा आहे.
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 08/26/2014 - 11:03
नवीन
कदाचित हाय कॅलरी पदार्थ म्हणजे उष्ण ( उष्मांक या अर्थाने) आणि लो कॅलरी पदार्थ म्हणजे थंड असे मानले जात असावे अशी समजूत करुन पाहिली.. पण तसेही काही दिसत नाही.
रोगाचे मूळ कारण ॲलर्जी , बॅक्टेरिया किंवा तत्सम हे सर्व स्पष्ट होण्यापूर्वी एक थियरी म्हणून उष्ण थंड वात कफ इत्यादि संकल्पना मांडल्या असणार.
औषधे लागू पडतात त्यातली काही आजही.. त्यातल्या जंतुनाशक किंवा वेदनाशामक किंवा तत्सम थेट गुणांमुळे.
पण कारणमीमांसा कालबाह्य झाली तरी ती सोडली जात नाही.. अजूनही उष्ण पडणे वगैरे म्हटले जातेच.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 08/26/2014 - 18:50
नवीन
तुम्ही अजून या प्रश्नाचे उत्तर दिलेलेच नाही. माझी याबाबतची थिअरी अशी -
प्रत्येक पदार्थ पचताना काही रसायने निर्माण करतो. त्या रसायनांचे जोपर्यंत सन्तुलन आहे, तोपर्यंत माणूस आजारी पडत नाही. नाहीतर मी रोज भरपूर रोगजंतू असलेल्या रस्त्यावरून जातो, पण एकदाही आजारी पडत नाही, पण कधी जर असे भरपूर तिळगूळ खाऊन गेलो, तर मग आपण सर्दी सारख्या रोगान्ना व्हल्नरेबल होतो.
तुम्हाल रोगजंतू आजारी पाडत नाहीत, तुमची रोगप्रतिकारशक्ती तुम्हाला आजारी पाडते, असे आपले माझे मत.
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 08/28/2014 - 14:30
नवीन
गवी काकांचे खूपच कौतुक वाटते
छान मुद्देसूद प्रतिवाद करतात :)
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Wed, 08/27/2014 - 01:03
नवीन
@प्रसाद१९७१ काहि प्रश्नः
१)आपला असा एखादा प्रबंध नेचर्/सायंस वा तत्सम नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे काय?
२)आपण आयुर्वेदाची एखादि मोठ्ठी पदवि,पदविका निदान प्रमाणपत्र मिळवले आहे काय?
३)एखाद्या आयुर्वेदातील मान्यवरांनी लिहिलेले आयुर्वेदावरील पुस्तक वगैरे वाचले आहे काय?
नाहि, असेल तर कळु द्या सर्वांना!
नसेल तर
१)आपण आपल्या सुबुद्यअ डोक्यात आलेल्या शंकांचे निरसन केले आहे काय?
२)आयुर्वेदावरचे सोडा, साधे लिहिलेले (एकही शब्द न गाळता)वाचता तरी येते काय?
३)दहावी पास कोणी केले आपणास, हे कळेल काय?
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Wed, 08/27/2014 - 06:56
नवीन
@आयुर्हीत -
तुमचे काळ्या जादू/चुटुक्/प्लँचेट ह्या बद्दल काय मत आहे? हे मत देताना ह्या तिन प्रश्नांची उत्तरे आधी स्वताला विचारा
१)आपला असा एखादा प्रबंध नेचर्/सायंस वा तत्सम नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे काय?
२)आपण काळ्याजादू ची एखादि मोठ्ठी पदवि,पदविका निदान प्रमाणपत्र मिळवले आहे काय?
३)एखाद्या काळ्या जादु बद्दल मान्यवरांनी लिहिलेले एखादे पुस्तक वगैरे वाचले आहे काय?
विज्ञान प्रगत होयच्या आधी जमेल तसे औषध उपचार करण्याच्या अनेक पद्धती जन्माला आल्या. आयुर्वेद, युनानी, चिनी अश्या अनेक. त्या त्या काळानुसार त्या ठिक होत्या.
पण आयुर्वेदा ची गृहीतके ( जसे कफ, वात, पिक्त, उष्ण, थंड ) ही चुकीची आहेत, आणि त्यांना काही शास्त्रीय बेसिस नाहीये.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 08/27/2014 - 08:09
नवीन
नक्की का?? मलातरी वरचे वाक्य चुकीचे वाटतेय
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Wed, 08/27/2014 - 15:11
नवीन
मिपावरिल सर्व स्वयंघोषित गुगलिया डॉक्टरांना माझा साष्टांग दंडवत....मला अस वाटतय की झक मारली आणी साडेपाच वर्ष वैद्यकिय अभ्यासक्रमात घालवले.साला फक्त गुगल सर्च केल असत तर....आज............ प्रसाद राव कुठे असता हो तुम्ही मला तुमचे चरण स्पर्श करायचे आहेत.
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 08/27/2014 - 16:33
नवीन
प्रसादरावांचे उत्तर ते देतील न देतील पण इथे गूगलचा संबंध कुठून आला असावा? कफ वात पित्त या संकल्पना चुकीच्या आहेत असे गूगल सांगतेय का? शोधून पाहिले पाहिजे.
बाकी आयुर्वेदाविषयी कोणतीही यासम शंका घेतली गेली की प्रतिवाद कफ पित्त उष्ण थंड या संकल्पनांचे तार्किक सत्य मांडणारा कधीच न होता जनरली किती वर्षे शिक्षणक्रम आहे किंवा किती वर्षांचा अनुभव आहे आणि तो उगाच.. अश्या प्रकारचा येतो.
विचारणा-याला डिसक्वालिफाय करणे ही सुरुवात ठीक पण एकूण प्रतिवादच तितकाच ?
शिवाय खूप वर्षे एखाद्या गोष्टीचे व्यावसायिक शिक्षण घेतले म्हणून आपोआप त्या शास्त्राच्या संकल्पना कालसुसंगत होत नाहीत.
त्या तश्या असतीलही. पण उगीच शिक्षण घेतले असे म्हणून त्या सामान्य व्यक्तीला पटत नाहीत.
शास्त्र व्यावसायिक पातळीवर शिकायला कदाचित जन्म पुरणार नाही पण सामान्य आक्षेप कोणीही घेऊ शकतो.
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Wed, 08/27/2014 - 16:55
नवीन
आक्षेप घेणे, शंका घेणे, विचारणे हे सुज्ञ माणसाचेच एक उत्तम लक्षण आहे. याला कोणाचीच ना नाही/नसावे.
माझ्या मते मिपावर/तत्सम इतर संस्थळावर ज्ञानवर्धन होणे जितके जरुरिचे आहे तितकेच "जनसामान्यांत चुकिचा संदेश न जावू देणे" महत्त्वाचे आहे.
प्रसाद१९७१ यांनी "अभ्यास न करता आयुर्वेदाला मुर्ख ठरविणे" हे किति योग्य आहे?
त्यांचा अभ्यास असेलही तर ते त्यांनी जाहिर करावे!
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 08/27/2014 - 17:11
नवीन
मूर्खपणा वगैरे शब्दरचना निखालस चुकीची आहे. अर्थात इतर कोणाच्या शब्दरचनेबद्दल मी अधिक तपशिलात बोलू शकत नाही. म्हणणे त्याबद्दल नसून वेगळेच आहे.
समजा ॲंटिबायोटिक्स वाईट असतात किंवा अलोपथी रोगाचा वरवर इलाज करते किंवा तत्सम काही आक्षेप मोडर्न मेडिसिनवर कोणी घेतला तर त्या पथीचे डोक्टर जेव्हा प्रतिवाद करतात तेव्हा ते ॲंटिबायोटिकवर बोलतात.. ट्रीटमेंट प्रोटोकोलबद्दल बोलतात ( सर्व फक्त उदाहरणार्थ). आणि शंका खोडून काढतात. त्याउपर पटवणे शक्य किंवा वर्थ नसेल तर पुढे उत्तर देत नाहीत. पण ते कधीही स्वत:चे शिक्षण,विचारणा-याचे क्वालिफिकेशन, माझे कोणत्या जर्नलमधे आले आणि प्रश्नकर्त्याचे कोणत्या जर्नलमधे.. आपण उगाच इतकी वर्षे शिकलो अश्या जनरल व्यक्तीसापेक्ष मार्गाने खंडन करत नाहीत.
पण आयुर्वेद / होमिओ इत्यादि डोक्टर त्यांच्या शास्त्रावर टीका झाली की जनरली खालीलपैकी एक अप्रोच घेतात:
- विचारणा-याचे क्वालिफिकेशन
-एकमेकांचा पथीविषयक अनुभवकाल
-विचारणा-याचा किमान अभ्यास आहे का?
- हजारो वा शेकडो वर्षे उगीचच हे टिकून राहिले का?
-या पथीला किती सरकारी मान्यता आहे
किंवा यासम.
पण जंतुसंसर्ग / अलर्जी या तार्किक वस्तुनिष्ठ एंटिटीजशी वात कफ पित्ताचे कोरीलेशन किंवा समांतर कालसुसंगत बदल या मार्गावर कोणीच बाजू मांडत नाही.
हे निरीक्षण फार पूर्वीपासून सर्वच संस्थळांवर आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
गुरुवार, 08/28/2014 - 08:00
नवीन
द१९७१ यांनी "अभ्यास न करता आयुर्वेदाला मुर्ख ठरविणे" हे किति योग्य आहे?>>>>>>> त्याच न्यायानी तुम्ही चेटुक, मुठ मारणे हे पण असु शकते असे मान्य कराल का त्याला मूर्ख म्हणायला पण अभ्यास असायला पाहीजे असे म्हणाल.
एक साधी गोष्ट आहे. कोणी जर काही सिद्धांत मांडत असेल तर त्याची सिद्धता करणे हे त्याचेच काम आहे. तुम्ही सिद्धांत मांडायचे आणि दुसर्यांनी ते सिद्ध करायचे, हा कसला न्याय.
नल हायपोथिसीस ने सिद्ध करुन दाखवा उष्ण्/थंड पदार्थ ही कल्पना.
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Wed, 08/27/2014 - 17:06
नवीन
उचलली जिभ लावली टाळ्याला असे होवु नके,ही कुठली टाइमपास राजकिय चर्चा नसते. एक बेसिक प्रिन्सिपल आहे ' द्रव गुणेन कुरुते कर्म' कुठलेही द्रव्य हे त्याच्या गुणाने कार्य करते,जर हायड्रोजन हा ज्वलनशिल आहे हा त्याचा गुण जर त्याचा तुम्ही मान्य करत असाल तर् , शितोष्णादी गुण कसे मान्य होत नाहीत का ते भारतीय शास्त्र आहे म्हणुन टाकावु आहे ?
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Wed, 08/27/2014 - 17:19
नवीन
दुध - गुणधर्म पचायला जड,अग्निमांद्यकर शरिरातला कफ वाढवणारे,पित्त कमी करणारे, बल वाढवणारे, त्यापासुन तयार होणारे दही - अत्यंत पित्तकर्,सगळेच दोष वर्धन करणारे परंतु वात किंचित कमी करणारे,त्वचाविकाराचे प्रबळ कारण ( माझ्या कडे येणार्या सोरियॅसिसच्या ८०% रुग्णांमध्ये अत्याधिक दधीसेवन आढळते. तसेच या दह्यापासुन जे ताक व लोणी तयार होते ते ताक पचायला हलके किंचित पित्तकर अग्नीदिपन करणारे,पोटाचे विकार तुमच्या भाषेत आय बी एस . बरा करणारे,मुळव्याधवरचे रामबाण औषध,व लोणी हे परत पित्त कमी करणारे ,बल वर्धन करणारे,शरिराला बृहणिय. या लोण्यापासुन जे तुप तयार होते ते अनुष्ण परंतु पित्त कमी करणारे,अग्नीदिपण करणारे,बृहणिय. तसेच संस्कारानुवर्तनिय म्हणजे ज्या पदार्थाबरोबर सिद्ध कराल त्याचे गुण वाढवणारे.
आता दुधापासुन तुपापर्यंतचा गुणांचा प्रवास सांगितला आहे,ज्याला समजाला त्याने समजवुन घ्यावा बाकीच्यांना साष्टांग दंडवत
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 08/27/2014 - 17:24
नवीन
धन्यवाद.
ही उदाहरणे झाली. उष्ण किंवा थंड पडणे म्हणजे काय आणि उदा. सोरायसिसशी त्याची लिंक कशी आहे हे महत्वाचे.
काय थंड आणि काय उष्ण ही उपयुक्त माहिती असेल पण ते तत्व नव्हे.
सफरचंद पडते.. दगड पडतो.. चेंडूही पडतो.. ही उदाहरणे झाली.
पण गुरुत्वाकर्षण या बलाचे अस्तित्व मोजून दाखवणे हे तत्व असते..
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 08/28/2014 - 07:16
नवीन
सहमत. यावर शास्त्रीय संशोधन होणे आवश्यकच आहे. पण याचा अर्थ ते टाकाऊ आहे असा नव्हे. आणि अशास्त्रीय आहे असा तर मुळीच नव्हे. जर कार्यकारणभाव दिसत असेल तर त्याचे अस्तित्वच नाकारण्यात अर्थ नाही. फारतर अजून सिद्ध झालेले नाहे असे म्हणू. नाही का?
बाकी तुम्ही दिलेले उदाहरण एकदम चपखल बसते -
गुरुत्वाकर्षण तत्वाचा शोध लावण्यापूर्वी देखील ते तत्व अस्तित्वात होतेच. सफरचंद, चेंडू आणि दगड तेव्हाही पडत होते, न्यूटन ने मोजल्यावर त्यांनी पडायला सुरुवात केले असे नव्हे. फक्त न्यूटन ने गुरुत्वाकर्षण या तत्वाला शास्त्रीय परिभाषेत बसवले. आयुर्वेदावरदेखील असेच कोणीतरी संशोधन करावे, त्याशिवाय त्या शास्त्राचे सत्यत्व अधोरेखीत होणार नाही. आणि विरोधकांना आरोप करायची संधी मिळणारच.
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 08/28/2014 - 07:39
नवीन
चोक्कस..
यालाच मी तार्किक को-रिलेशन एस्टॅब्लिश करणे म्हणतोय. म्हणजे उदा.. इकडचा वात = तिकडचा इम्युनिटी loss..
किंवा यासम.. नुसते वात आहे कफ आहे किंवा कांदेपाक थंड आहे म्हणजे कालसुसंगत तार्किक कोरिलेशन नव्हे.
normalization , rationalization होत राहिले पाहिजे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
गुरुवार, 08/28/2014 - 07:55
नवीन
पण पुर्वी हलका पदार्थ खाली यायला जास्त वेळ लागतो असा समज होता, तो पिसाच्या मनोर्यावरुन प्रयोग केल्यावर च खोटा होता हे कळले.
फार खोलात नको, उष्ण पदार्थ आणि थंड पदार्थ ह्यांची कोणी व्याख्या तरी देवु शकेल का? तसेच हा पॅरॅमिटर मोजायचे युनिट काय? ताक थंड आणि कांदा पण थंड, ह्यांची तुलना कशी करायची?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/28/2014 - 08:55
नवीन
व्याख्या नक्की माहिती नाही. परंतु उष्ण पदार्थ आणि थंड पदार्थ अशी वर्गवारी नक्कीच असावी. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये असे सांगितले जाते कारण पपई उष्णता निर्माण करते व त्यामुळे गर्भाला धोका होऊ शकतो अशी समजूत आहे. माझा एक लांबचा विक्षिप्त नातेवाईक सलग २ महिने रोज १ पपई खात होता. काही काळाने सुरवातीला त्याचा मोतीबिंदू एकदम वाढला व इतर काहीतरी इन्फेक्शन होऊन एक डोळा काढावा लागला. अति पपई सेवनाने उष्णता निर्माण होऊन डोळ्यावर परीणाम झाला असे डॉक्टरांचे मत होते.
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 08/27/2014 - 17:19
नवीन
हायड्रोजन ज्वलनशील आहे हे मान्य करणे म्हणजे खाद्यपदार्थाचे शीतोष्ण गुणही मान्य करणे?
भारतीय म्हणून टाकाऊ असे दूरान्वयानेही म्हटले नसताना ते मनाततरी का यावे ?
गूळ उष्ण असतो असे असेल तर तो शरीरात गेल्यावर शरीराचे / आतड्याचे किन्वा कोणत्याही पेशीचे तापमान वाढवतो का?
क्यालरीज म्हणाव्या तर त्या अनेक थन्ड मानलेल्या पदार्थातही तेवढ्याच किन्वा जास्तही असतात.
पुन्हा नम्रपणे विनवतो. कफ वात पित्त यान्चे तार्किक को रिलेशन सान्गा.
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Wed, 08/27/2014 - 17:29
नवीन
आजच्या दिवस २०-२५ काळ्या मिर्या व लवंगा चावुन खा आणी त्यांतर एक दहा दिवसांनी घट्ट साय असलेल्या दुधाचे शिकरण एक दोन तिन दिवस सलग सकाळ संध्याकाळ घ्या शित आणी उष्ण गुणधर्माचा फरक लक्षात येइल,बी प्रॅक्टीकल.
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Wed, 08/27/2014 - 17:33
नवीन
मला दिड वर्ष लागले हो, ते इथे थोडक्यात कसे सांगु,शक्य असेल तर सार्थ वाग्भट गर्दे लिखित अप्पा बळवंतात मिळेल,संस्कृतचे उत्तम मराठी भाषांतर केलेले आहे,आयुर्वेदातला समजायला सगळ्यात सोप्पा ग्रंथ आहे,वाचा काही अडल तर व्यनी करा,निवांत चर्चा करु अथवा वेळ असेल तर भेटा.
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 08/27/2014 - 17:39
नवीन
मिळवून वाचतो. मूलतत्व अश्या अर्थाने सिद्ध झालेली रोगाची कारणे आणि त्याना समांतर कारणमीमांसा असे तार्किक काही सापडल्यास आनंदच होईल नक्की.
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
गुरुवार, 08/28/2014 - 08:48
नवीन
तेही सोडुन द्या,तुमच्या साठी सोप्पा,झणझणीत मिसळचा रस्सा दोन दिवस सकाळ संध्याकाळ फक्त २-२ वाट्या प्यायचा उष्ण गुणधर्म काय असतो ते दुसर्यादिवशी सकाळी कळेल्,पात्तळ जुलाब होताना जे काही खाली जळत ना तो पदार्थाचा उष्ण गुणधर्म, तसाच प्रकार शित गुणाचे शिकरण सारखा पदार्थ दररोज खा त्यानंतर फुफ्फुसात जो काही चिकट स्रावी पदार्थ साठतो तो कफ. वर्षानुवर्ष धावपळीत आयुष्य गेल्यावर सांधे आवाज करायला लागतात्,वेदना सुरु होतात्,तो वाताचा चल आणी रुक्ष गुण.
हे सर्व ठिक आहे,पण कृपया आयुर्वेदाला अॅलोपॅथीच्या चड्डीत घालायाचा प्रयत्न करु नका,दोन्ही शास्त्रातला तो बेसिक फरक आहे,त्यामुळे त्यातुन निष्पन्न काहीच होणार नाही फक्त गोंधळ वाढेल.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 08/28/2014 - 08:54
नवीन
समर्पक प्रतिसाद
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
गुरुवार, 08/28/2014 - 08:57
नवीन
झणझणीत रस्सा आणि शिकरण.. यांच तिखट आणि गोड असं सरळ वर्गीकरण होतं.. उष्ण, थंड वर्गीकरणाचे या उदाहरणाने समाधान होत नाही.
या वाक्याला हशा, टाळ्या मिळतील.
एखादी गोष्ट पटवण्याच्या दृष्टीने ते वाक्य निरुपयोगी आहे..
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 08/28/2014 - 09:34
नवीन
यग्जाक्टलि अस्सेच म्हणतो.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/28/2014 - 10:16
नवीन
सहमत आहे.
हिरवी मिरची, हिरव्या मिरचीचे लोणचे जरी खाल्ले तरी शौचास, मुत्रविसर्जनास जळजळ होते. डोळ्यांची, तळपायांची जळजळ होते. शरीराचे तापमान नुसत्या पाण्यानेही समतोल राखले जाते. दोन-चार दिवस पाणी बंद करून पाहिले तरी शरीरातील उष्णता वाढल्याचे दृष्टोत्पत्तीस येईल. शरीरातील उष्णता वाढली असेल कांही त्रास होत असेल तर शहाळ्याच्या पाण्यानेही आराम मिळतो असा अनुभव आहे.
थंडीत येणार्या सणांमध्ये तिळगुळ, गुळाच्या पोळ्या, पुरणपोळ्या आदीपक्वान्ने केली जातात तर उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या खीरी आणि दुध वगैरे तत्सम पदार्थांपासून पक्वान्न बनविली जातात.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 08/28/2014 - 07:32
नवीन
उष्ण / थंड यांचा संबंध क्यालरीशी नाही. तर एखादा पदार्थ पोटात गेल्यावर तो पचताना जी रसायने तयार होतात, त्यांचे शरीरावर होणारे परिणाम म्हणजे उष्ण/ थंड.
त्यातील काही रसायने प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या शरीराचे तापमान वाढवतात, किंवा तापमान वाढल्याचा अनुभव देतात. उदा - अति खोबरे खाल्यामुळे शरीराच्या काही अवयवा>मध्ये विषाणूवाढीसाठी पोषक स्थिती उत्पन्न होते, त्याचा परिणाम म्हणून तेथे विषाणू>चा संसर्ग होतो. परिणाम - तेथील शरीराची उष्णता वाढते. म्हणून ते उष्ण. किंवा खोबरे/ गूळ पचताना अधिक प्रमाणात आम्ल तयार होते. या आम्लाचा निचरा शरीरांतर्गत न झाल्यामुळे शौच्यावाटे बाहेर पडते, परिणाम मलमार्गाची जळजळ, पुन्हा उष्णता.
असेच थंड पदार्थांबद्दल देखील होते. आता यामध्ये कोणत्या अभिक्रिया होतात ते केवळ संशोधनांतीच कळू शकेल. पण या सार्यांमध्ये काहीतरी समान धागा असण्याची शक्यता पण नाकरता येत नाही. याबद्द्ल काहीच अभ्यास नसताना या थिअरींना पूर्ण नाकारणे दीर्घकालीन परिणामांच्या दॄष्टीने फार घातक असेल असे माझे मत आहे. आणि हे माझे मत केवल आयुर्वेदच नव्हे, तर सार्याच प्राचीन विद्याबद्दल आहे.
तुम्ही असे म्हणा, की अजून पुरावा मिळालेला नाही, किंवा सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून असे सिद्ध होत नाही, मला मान्य आहे. पण त्यांचे अस्तित्व नाकारू नका, न जाणो, काही वर्षांनी त्याचा पुरावा मिळेल देखील.
जाता जाता,
तुम्ही कधी नाडीपरीक्षेचा अनुभव घेतला आहे का हो? त्यातील जाणकार वैद्यांकडून, जसे की पुण्याचे भट वैद्य, (ते आता आहेत का ते मला माहीत नाही).
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 08/28/2014 - 07:41
नवीन
तुम्ही माझे मत / म्हणणे अधिक चांगल्या रितीने आणि सकारात्मक मांडलेत. धन्यवाद.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »