Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत...
नमस्कार,
पुन्हा थोडा त्रास देतीये
आत्ता दोन दिवसांपुर्वी बाबांच्या मोबाइलवर असा मेसेज आला
thank you for using your sbi debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxxxxx
बाबांनी असली काहीही खरेदि केलेली नाहिये,बाबा लगेच बॅन्केत गेलेत्, atm मधे जाउन चेक केले तेव्हा पैसे कापलेले दिसलेत्,बॅन्केच्या अधीकारी लोकांनी हात वर केलेत
PayTM वाले फोन न देत नाहीत(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो)
care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत
CCAvenue च्या अकाऊंट मधे पण पैसे कटुन परत पुन्हा वापस दिलेले दिसत आहेत
हा सगळा काय प्रकार आहे ? हॅकींग ? की अपघात?
जर हॅकींग असेल तर , एका ब्लॉग वर वाचले होते की जर २४ तासांच्या आत तुम्ही जर जिथे पैसे कापल्या गेलेत तिथे तक्रार केलीत तर तुम्हाला पैसे परत मिळु शकतात कारण No merchant would like to do business with a stolen card. They will readily block the transaction and revert the amount
पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो,ते लोक इमेल बघणार कधी आणी action घेणार कधी?
आणखी कोणाला असे अनुभव आले आहेत काय? अशावेळी पैसे परत मिळण्याची किती शक्यता असते??
आणी आम्ही आणखी काय करु शकतो?
💬 प्रतिसाद
(181)
इ
इनिगोय
Mon, 09/01/2014 - 14:20
नवीन
प्रसाद१९७१ यांच्या मूळ प्रतिसादात असा काही निगेटिव्ह टोन असल्याचे जाणवले नाही. लेखिकेने अपूर्ण माहिती दिलीय, ती पूर्ण द्यावी एवढेच तर म्हणणे होते. आणि मुळात इथे 'जाहीर धागा काढलाय तर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येणारच' या सुचनेची अपेक्षा होती.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Mon, 09/01/2014 - 14:24
नवीन
याचा अर्थ एखाद्याच्या तिर्थरुपांवर वैयक्तिक हल्ले करावेत का? ते ही काही ओळख-पाळख नसताना.
- Log in or register to post comments
इ
इनिगोय
Mon, 09/01/2014 - 14:30
नवीन
अर्थातच नाही.
मोठी खरेदी करून ती सरप्राईज ठेवायची असेल असा अर्थ काढण्याजोगं वाक्य होतं ते. अर्थात नेमकं काय म्हणायचं होतं ते तेच सांगू शकतील.
- Log in or register to post comments
V
vrushali n
Mon, 09/01/2014 - 14:38
नवीन
पाठीशी उभे रहिल्याबद्दल आभार
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 09/03/2014 - 11:51
नवीन
गन्पाशी सहमत, इनिगोय कडून अशा प्रतिसादांची अपेक्षा नव्हती, असो
- Log in or register to post comments
इ
इनिगोय
Wed, 09/03/2014 - 11:56
नवीन
स्पाजोबा, गाडी चुकलीय, गणपाने ज्या प्रतिसादाला उद्देशून ते लिहिलंय, तो उडवला गेलाय, आणि तो माझा नव्हता.
बेटर लक नेक्ष्ट टाइम.
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 09/03/2014 - 12:05
नवीन
तुमचे सगळे प्रतिसाद वाचतोय इनिआजी , ण उडलेले म्हणतोय
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Mon, 09/01/2014 - 16:22
नवीन
अजुन एक गंमत बघा. धागा काढताना लिहीले ४३,३५० चे डेबिट पडले नंतर लिहीले ८८०००
:-)
- Log in or register to post comments
V
vrushali n
Mon, 09/01/2014 - 18:12
नवीन
३००० हजार bsnl 3g recharge चे कापल्या गेलेत्,अजुन recharge पण झाला नाही आणी रक्कम पण मिळाली नाही,ति किरकोळ अस्ल्याने मी लिहिली नाही
आधी रक्कम कापल्या गेल्याचा मेसेज आल्याबरोबर बँकेत जाउन card block केले आणी बँक अधीकारी लोकांशी बोललेत
paytm वाल्यांशी आधी इमेल आणी नंतर त्यांनी नं दिल्यावर ते लोक बोललेत कि त्या पैशांचे product deliver
झाले आहे आणी FIR/Bank statment दिल्याशिवाय ते लोक आम्हाला काही माहीती देणार नाही
त्या बँक अधीकार्याच्या पत्नीने असेच डेबिट कार्ड वापरुन पैसे बुडवले ,जे परत नाही मिळाले,ते म्हणाले अशा प्रकरणात
चौकशी तिही आपल्याच मागे लगते आणी पैसे परत मिळ्त नाही,मग इतका मनस्ताप करुन घेण्यापेक्शा आणी इतर ठीकाणी सांगितलेल्य करणांमुळे बाबा शांत बसुन आहेत्,आम्ही पोलीसांकडे तक्रार करा म्हटल ,पण त्यांची इछ्छा नाहिये
ते त्यांनीच कमवलेले अस्ल्याने त्यांना हव तस करण्यचा पुर्ण अधीकार आहे
आणी तुम्ही कोण सांगणारे लोकांनी किती पैसे बुडल्यावर शांत बसावे आणी किती किती पैसे बुडल्यावर हातपाय मारावेत(कदाचीत त्यांना जे पैसे मिळ्णारच नाहीत्,त्यांच्या मगे लागुन मनस्ताप करुन घेण्यपेक्शा तितकेच पैसे कसे कमवता येतील हा विचार करणे योग्य वाटत असेल)
to each his own right?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Mon, 09/01/2014 - 19:41
नवीन
फक्त एक गोष्ट क्लिअर कराल का?
म्हणजे त्या अधिकार्याच्या पत्नीचे पैसे असेच कार्ड हॅक होऊन गेलेत (त्याला बुडवले म्हटल्यामुळे आमचा गैरसमज झाला)
आता एक साधी शंका आहे, जर कार्डहोल्डरनं कार्ड वापरलंच नव्हतं तर चवकशीचा ससेमिरा कसा लागेल?
कुणी किती पैसे सोडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, एकदम मान्य! पण कार्ड वापरलं नाही आणि शंभर रुपये जरी डेबिट झाले तरी आम्ही बँकेच्या नाकी नऊ आणतो म्हणून इंटरेस्ट आहे. कृपया व्यक्तिगत घेऊ नका. तुमच्या स्पष्टीकरणानं आमचं कार्ड प्रोटेक्ट होईल.
- Log in or register to post comments
V
vrushali n
Tue, 09/02/2014 - 10:37
नवीन
debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxx
care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत
गंमतच आहे बाइ लोक पुर्ण वाचायचे कष्टही घेत नाहीत
- Log in or register to post comments
स
सुहास पाटील
Mon, 09/01/2014 - 13:36
नवीन
काहितरि गडबड आहे
- Log in or register to post comments
V
vrushali n
Mon, 09/01/2014 - 14:21
नवीन
गडबड असेल तर ती paytm वाल्यांची आहे हे नक्की
बाकी माझे वडील कधीही पोलिस स्टेशन ची पायरी न चढल्याने कींवा त्यांचा पोलीसांवर विश्वास नसल्याने मी समजु शकते,बाकी वडीलांच् पण बिसनेस करतांना कधीकधी नुकसान झाले असल्याने त्यांनी हे प्रकरण फारसे लावुन धरले नाही,आणी बाकी आम्ही बहीणी सगळ्या डॉक्टर( MBBS,MD,BDS)व इन्जीनीअर अस्ल्याने,ही रक्कम आम्ही नक्कीच भरुन काढू
बाकी काही माहीत नसतांना derogatory नाही लिहील तरी चालेल
- Log in or register to post comments
श
शिद
Mon, 09/01/2014 - 14:24
नवीन
derogatory = मानहानिकारक/अपमानजनक
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Mon, 09/01/2014 - 14:33
नवीन
बॅम्क सुरुवातीला नेहमीच हात वर करत असते. पण हॅकिन्ग झालेले असेल तर ती बॅन्केचीसुद्धा जब्बबदारी आहे. बॅन्केच्या अजून वरच्या ऑफिसरला भेटा आणि बॅन्केविरुद्धच तक्रार करा ग्राहक मंचाकडे. मग ते मदत करतील.
मागे मी १००० रुपयासाठी HDFC च्या लोकांचे डोके खाल्ले होते.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 09/02/2014 - 14:04
नवीन
हजार रुपयेही खूप झाले माऊली ... मी तर एकदा डी मार्ट मधे विकत घेतलेले प्रॉडक्ट हे एक्पायर्ड आहे लक्षात आल्यावर तत्क्षणी परत केले त्याची किम्मत काहीतरी १२३.६० पैसे होत म्हणुन मला तिथल्या सेल्समॅनेजर ने १२३.०० रुपये परत दिले. तेव्हा मी ६० पैशासाठी भांडलो होतो... आपला हक्काची कमाई, कष्टाची कमाई,हलाल कमाई आहे ... मग एक हलाला तरी का सोडा ? *biggrin*
बाकी सदर प्रकरणात आपला एकच सल्ला आहे : तुम्हाला जर तुमच्या बाजुने काहीच चुक नाही ह्याची खात्री असेल तर हे प्रकरण लावुन धरा पोलीसात जा , आर बी आय कडे जा ग्राहक मंचा कडे जा, मीडीयात बोंब ठोका... शेवटी न्याय मिळेलच ... कारण सत्यमेव जयते ! ( अनुभवाचे बोल आहेत हे , मागे एकदा मला १३ हजाराला गंडा बसला होता , जेव्हा पोलीसात जाऊन बोंब ठोकली तेव्हा पै न पै परत मिळाली )
)हां , अर्थात तुम्ही जर गच्छम काळ्या पैशाच्या ईस्टेटीची मालकी बाळगुन असाल तर जाऊन द्या , विषय सोडुन द्या न्याय झाला असे समजुन विसरुन जावा .... कारण कर्मणो गहना गति !! *biggrin*
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
Mon, 09/15/2014 - 15:37
नवीन
तुम्ही चूक करताय व्रुशालीजी ... तुम्हि भगिनी उच्चपदस्थ अथवा सधन असल्याने ८८,०००/- रुपये भरुन देउ वगैरे मुद्दे विसन्गत आहेत. मूळ प्रश्न पैसे कसे व का गेले ? हा आहे. पोलिस/ सायबर क्राइम अथवा पेटीएम वाले /बॅन्क यांच्या भोंगळ कारभार अथवा त्रुटी याबद्दल नक्कीच चर्चा करणे अथवा दाद मागणे आवश्यक आहे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 09/01/2014 - 14:27
नवीन
शिकलो बरेच.
- Log in or register to post comments
V
vrushali n
Mon, 09/01/2014 - 14:29
नवीन
मानहानिकारक बरोबर आहे
काहितरि गडबड आहे हे वाक्य मला माझ्याकरीता अथवा घरच्यांसाठी मानहानिकारक वाटले
- Log in or register to post comments
स
सुहास पाटील
Mon, 09/01/2014 - 15:00
नवीन
> काहितरि गडबड आहे हे वाक्य मला माझ्याकरीता अथवा घरच्यांसाठी मानहानिकारक वाटले
हे वाक्य मी तुमच्या साठी किवा तुमच्या घरच्यान साठी नाही लिहिले ते त्या बँक वाल्या करता होते जो सांगतो कि डेबिट कार्ड ने online purchas केल्यास प्रोब्लेम होतो निव्वळ लबाड पणा आहे हा त्या बँक वाल्याचा
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Mon, 09/01/2014 - 18:11
नवीन
पहिल्यांदा हे ठरवा, लेखिकेला सहानुभूती हवीये का सल्ला? सल्ला हवा असेल तर सगळ्या गोष्टी क्लिअर द्यायला हव्यात. सहानुभूती हवी असेल तर सल्ल्याचा प्रश्नच येत नाही.
अर्थात, सल्ला घेतला असेल तर शेवटी काय झालं हे इथे कळवणं ही किमान जवाबदारी आहे कारण त्याचा सर्वांना उपयोग होईल. आणि सहानुभूती हवी असेल तर स्वतःची चूक नसतांना फटका बसला इतपत बाजू स्पष्ट असायला हवी.
लेखिकेनं फायनली घेतलेला स्टँड असाय :
सगळे धाग्यात इंटरेस्टेड आहेत कारण धाग्याचं शीर्षकंच भन्नाट आहे (Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत). आणि अशी वेळ कुणावरही येऊ शकते म्हणून सगळे इथे जमलेत. It is that simple!
आता तो उलगडा करायला, झालेल्या नुकसानाची शहानिशा करायला कार्डहोल्डरच तयार नाही. इथपर्यंत काही हरकत नाही कारण तो त्यांचा प्रश्न आहे. पण ...
यामुळे धागा गोंधळात गेलायं. इथे व्यक्तीस्वातंत्र्य, धागा काढून पश्चात्ताप वगैरे मुद्दे गैर लागू आहेत.
अगदी साधी गोष्ट आहे, कार्डहोल्डरनं ट्रन्झॅक्शस केली होती का नाही? विषय संपला!
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 09/01/2014 - 18:18
नवीन
सहमत आहे. आधी किती का वैध ट्रान्झॅक्शन करेना, त्याचा कार्डच्या अवैध वापराशी काय संबंध? "कर नाही त्याला डर कशाला" या तत्त्वाप्रमाणे चौकशी झाली तर प्रॉब्लेम काय आहे? प्रस्तुत बँक मॅनेजरचा सल्ला - अॅट बेस्ट - चुकीचा आहे हे वर अनेकांनी लिहिलंच आहे.
- Log in or register to post comments
इ
इनिगोय
Tue, 09/02/2014 - 06:51
नवीन
शत प्रतिशत सहमत. मदत करण्याच्या हेतूने आलेल्या प्रतिसादांचा अशा त-हेने वेगळा अर्थ काढून काय साध्य झाले? सुहास पाटील यांच्या प्रतिक्रियेबाबतही तसंच.
जर झालेल्या ट्रान्झॅक्शन्सचे लिखित पुरावे हातात असतील तर नेटाने पाठपुरावा करून नुकसानभरपाई मिळवता येतेच. मिळवलेली आहे. नियमित ट्रान्झॅक्शन्स करणा-या व्यक्तीला तर अधिकच जाणीवपूर्वक पाठपुरावा करणे शक्य आहे.
ज्या बँकांचे उल्लेख इथे केलेत, त्या नावाजलेल्या, प्रतिष्ठा जपणा-या नक्कीच आहेत, अशावेळी 'त्यांच्या फेसबुक पेजवर झालेला प्रकार पोस्ट करणे' एवढा साधा उपायसुद्धा लागू पडू शकतो.
संक्षींनी म्हटल्याप्रमाणे सल्ला हवाय, तर तो लागू पडला का, हे सांगणे हे ज्यांनी प्रतिसाद दिले त्यांच्यासाठी आवश्यक नाही का? मुदलात लोक इथे प्रतिसाद देत आहेत ते तुमच्या वडिलांचे स्वकष्टाचे पैसे परत मिळावेत या चांगल्या हेतूने, हे तरी मान्य करायला हरकत नसावी..
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 09/02/2014 - 08:47
नवीन
जर लेखिका म्हणतेयं त्याप्रमाणे कार्डहोल्डर ट्रॅन्झॅक्शन्स घरच्या डेस्कटॉपवरनं करत असेल आणि हा फटका कार्ड हॅकिंगमुळे (म्हणजे कार्ड त्यांच्या ताब्यात असतांना) बसला असेल तर मी हे काम प्रोफेशनल असाईन्मंट म्हणून घ्यायला तयार आहे! सगळ्या फॅक्टस वर्णन केल्याप्रमाणे असतील तर पैसे नक्की परत मिळतील.
- Log in or register to post comments
म
मनिष
Tue, 09/02/2014 - 09:19
नवीन
अगदी. अगदी. पैसे परत मिळालेच पाहिजे!
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 09/02/2014 - 09:29
नवीन
ये ब्बात..
खणखणीत थेट मदतीचा हात.
आवडले.
- Log in or register to post comments
V
vrushali n
Tue, 09/02/2014 - 10:38
नवीन
आपला इमेल मिळु शकेल काय?
- Log in or register to post comments
V
vrushali n
Tue, 09/02/2014 - 11:00
नवीन
याहू वर इमेल केला आहे
तुम्ही काही करु शकलात तर बघा,बाकी व्य.नी तुन बोलुया
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 09/02/2014 - 14:08
नवीन
संक्षी , आपला प्रतिसाद वाचुन उत्सुकता निर्माण झाली ... आपला फायनान्शीयल क्राईम डीटेक्शन मधे काही अनुभव आहे काय ?
मागे , ह्या धीच्या जॉब मधे , मी जॉब / लॉटरी वगैरेंशी संबंधीत फ्रॉड डिटेक्ट/ प्रेडीक्ट करायची मॉडेल बनवत होतो :)
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 09/02/2014 - 14:13
नवीन
आणि फ्रॉड डिटेक्शनचा अनुभव आर्टिकलशिपपासून आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 09/02/2014 - 14:18
नवीन
एकदा ह्या विषयावर सविस्तर चर्चा करायला पाहिजे ...
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 09/02/2014 - 14:15
नवीन
ज्जे बात. इस को बोलता हय कान्फिडन्स.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 09/02/2014 - 14:30
नवीन
माझ्याकडे पेपर्स आल्यापासनं चार तासाच्या आत ही प्रगती आहे :
- Log in or register to post comments
V
vrushali n
Tue, 09/02/2014 - 16:28
नवीन
जरी सायबार क्राइम वाले असे म्हणत आहेत की हॅकींग झाले नाही,तरीही तुम्ही एक बाब बघितली का?बाबांनी जेव्हा जेव्हा रिचार्ज केलेत्,त्याच्या दुसर्याच दिवशी मोठया रकमा काढल्या गेल्यात हा प्रत्येक वेळेस योगयोग असु शकतो की paytm चा कोणी व्यक्ती असु शकतो,अस बाबांनी मला आत्ता फोन वर सांगीतल आहे
(रच्याकने मी मला जितकी तुट्पुंजी माहीती मिळतेय्,मी लगेच इथे क्रिकेट मॅच च्या प्रत्येक ओव्हर सारखी लगेच अपडेट करतेय...मला वाट्तेय मी पुर्ण माहीती निघाल्याशिवाय इथे जास्त काही बोलु नये हे उत्तम)
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 09/02/2014 - 19:15
नवीन
*yes3*
- Log in or register to post comments
स
सुहास पाटील
Tue, 09/02/2014 - 10:16
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 09/01/2014 - 18:27
नवीन
सदर लेखिकेने रीअल टाईम ट्रान्साक्शन रेकॉर्ड्स बँकेकडे मागावेत. म्हणजे पैसे कोणी काढले, कशासाठी काढले ह्या गोष्टींचा उलगडा होईल.
- Log in or register to post comments
द
दशानन
Mon, 09/01/2014 - 20:40
नवीन
असो!
आमचे काही शब्द वाया गेले, हरकत नाही.
इतर कोणालातरी कामी येतीलच.
पण, हा प्रकार पुन्हा घडू नये ही आशा.
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Mon, 09/01/2014 - 22:12
नवीन
To make online shopping safer, the RBI has made it mandatory, from 1st August onwards, for all online transactions to have an extra level of authentication. The ‘extra’ level, is a password that you will have to enter after entering your credit/debit card details while making online payments. You will require this ‘extra password’ for transacting on any website in India. This new technology is called VBV – Verified by Visa or MSC – MasterCard SecureCode.
All you have to do is log on to your bank’s website, register your card for Verified by Visa (or MasterCard SecureCode) and get your password. Each bank has its own process for card registration. So, hop on to your bank’s website and register now:
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Mon, 09/01/2014 - 22:15
नवीन
Internet Banking Guidelines In India By RBI
Source: Corporate Laws In India.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 09/02/2014 - 07:08
नवीन
सगळा धागा आणि प्रतिक्रिया वाचल्या.
खरं तर एकंदरीतच कधी कुणी कुणाची उगाच मापं काढु नयेत हा संकेत आहे.. वास्तव जगात..आभासी जगात..कुठेही..
त्यात आपल्याला सगळंच माहिती नसतं हे एक कारण आहे.. आणि माहिती असलं तरी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. त्यामुळे कुणी लेखिकेला / त्यांच्या वडिलांना अर्धवट माहितीवर काही बोलणे चुकच आहे..
पण लेखिकेला एकच मुद्दा सांगावा वाटतो की ही जी काही अर्धवट माहिती लोकांकडे आहे, ती तुम्हीच दिली आहेत.. आधी सल्ला मागितलात तेव्हा तो सगळ्यांनी मनापासुन दिला.. पण मग जेव्हा तुम्ही एक एक माहिती द्यायला सुरवात केलीत त्यामुळे इथे गोंधळाचे वातावरण तयार झाले असे दिसते. लोकांनी गोंधळ उडाल्यास सुद्धा भाषा जपुन वापरावी ही तुमची अपेक्षा गैर नाही, पण अपेक्षा दुहेरी असतात.. तुम्ही सुद्धा गोंधळात पडणारी माहिती द्यायला नको होती ही लोकांची अपेक्षा गैर नाही. (मलाही बँक मॅनेजरच्या बायकोने पैसे "बुडवले" हे समजलेलं नाही. बाकि प्रतिसादात तुमचे मराठी उत्तम आहे असे दिसते.. मग तुम्हाला नक्की "बुडवले" असंच म्हणायचं आहे का? कारण तुमच्या वडीलांच्या ह्या परिस्थितीची तुलना तुम्ही सतत त्या बाईंच्या परिस्थिती सोबत करत आहात.. आणि तुमच्या वडीलांनी पैसे बुडवलेले नसुन त्यांनाच फटका पडला आहे..)
दुसरं असं की आधी तुम्हाला ८८०००/- ही रक्कम जास्त वाटली आणि स्वतःला वडिल आणि बहीणी कडुन जुजबी माहिती असतानाच वडिलांना काहीतरी मदत व्हावी ह्या हेतुने तुम्ही इथे धागा काढलात. आणि आता तुम्ही "मनस्ताप होण्यापेक्षा जाऊ देत ८८०००/-" असा पवित्रा घेतला आहेत. मुळात ८८०००/- जाऊ देत असे म्हणु शकणारी मंडळी इथे कमीच असतील.. आम्हाला १००/- जरी विनाकारण गेले तरी बँकेत जाउन पाठपुरावा करण्याची सवय आहे.. शिवाय ह्या प्रकरणात तुमच्या वडीलांची काहीच चुक नाही, तुम्हीच म्हणताय त्या प्रमाणे एवढा शिकला सवरलेला माणुस दोन शुन्य जास्त टाकली वगैरे चुका करणार नाही.. तर त्यांना हे ही कळत असेलच की बँकेच अधिकारी जे सांगत आहेत (की चौकशी तुमच्याच मागे लागेल..) ते तद्दन खोटे आहे.. तरीही ते हा सल्ला मान्य करत आहेत हे गोंधळात पाडणारे नाही का? चौकशी मागे केव्हा लागते? जेव्हा तुम्हीच काही तरी गुन्हा केलाय असं पोलीसांना वाटतं.. पण असं मुळात होईलच कशाला? जो माणुस असे काही गफले करेल आणि ट्रान्झॅक्शन लपवु पाहिल, तो पोलीस स्टेशनात जाउन तक्रारी कशाला करत बसेल? शिवाय तुम्ही म्हणताय तसं तुमच्या कडे पुरावे आहेतच.. अशा वेळेस तुमच्या "जाउ देत" ह्या स्टॅण्ड ने लोक हैराण झाले तर नवल काय? { तुम्हाला "चौकशी मागे लागेल" म्हणजे "आपल्यालाच खेटे मारावे लागतील" असे मह्णायचे आहे का? कारण चौकशी मागे लागणेचा अर्थ वेगळा होतो }
मला त्याहुनही एका गोष्टीची काळजी वाटते की आपले कार्ड / अकाउंट असे हॅक झाले.. तर कुणीही आधी तक्रार देऊन ठेवेल. कारण उद्या कुणी तुमच्या अकाउंटचा गैरवापर केला (जसे की देशविघातक कृत्य वगैरे..) तर पुरावा म्हणुन तुमच्या कडे तक्रार हवीच (आमची गाडी चोरीला गेली तेव्हा आम्ही पहिल्यांना तक्रार नोंदवुन ठेवली.. कारण गाडी कुठे चोर्या करायला वापरल्या गेली तर ती तेव्हा आमच्याकडे नव्हती ह्याचा पुरावा..) अशावेळी मागे हटणे मी समजु शकत नाही..
अर्थातच तुमच्या वडीलांचे पैसे आहेत.. त्यांनी काय करावं हा त्यांचाच प्रश्न आहे... तुम्ही केवळ वडीलांना मदत व्हावी ह्या हेतुने धागा काढलात.. मिपाकरांना तेवढे जवळचे समजलात हे ही चांगलेच आहे.. तुम्हाला नंतर अजुन वेगवेगळी माहिती मिळत गेली आणि सरते शेवटी तुम्ही गप्प बसण्याचा निर्णय घेतलात. त्याचाही आदर आहेच.
मिपा आपलंच आहे... धन्यवाद...
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 09/02/2014 - 09:01
नवीन
आधीचे व्यवहार, पोलिसांचा ससेमिरा वगैरे लागत नाही. FIR फक्त फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यापुरता असतो. FIR चा अर्थ इतकाच की तक्रार जेन्युईन आहे. पुढची सगळी कामं पोलीस, बँक आणि पेमंट ऑपरेटरच्या मागे लागून करुन घ्यायला बांधिल असतात.
फक्त तीन गोष्टी सिद्ध कराव्या लागतात :
१) कार्ड, कार्डहोल्डरच्या ताब्यात होतं
२) कार्डहोल्डरला फोन-पीन आला नाही, आणि
३) रक्कम खात्याला डेबीट झालीये.
बास! मग सगळी जवाबदारी बँक आणि पेमंट गेट वे ऑपरेटरची आहे.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 09/02/2014 - 09:25
नवीन
हो मग तेच तर म्हणतेय मी.. ह्यात आपल्याच मागे चौकशी लागली असं कसं होईल?
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Tue, 09/02/2014 - 09:04
नवीन
@ पि.रा. - मी जे म्हणालो तेच तुम्ही गोड गोड शब्दात लिहीलेत की !!! :-)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 09/02/2014 - 09:22
नवीन
प्रसादराव,
तुमचा आमचा नि सरांचा प्रॉब्लेम हाच आहे. (एका लायनीत बसवत नाही, शक्यच नाहीये ते ;) )
सांगतो ते 'कसं' सांगतो हे फार फार महत्त्वाचं असतंय.
आपल्या (मी माझं सांगतो) लक्षात येत नाही बर्याचदा.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 09/02/2014 - 09:30
नवीन
शब्दच तर महत्वाचे असतात ना भाऊ..!! आत्ता त्या टेन्शन मध्ये असणार.. त्यामुळे त्यांच्यावर लोक का शंका घेत आहेत हे लक्षात न घेता त्यांना राग येत असेल.. म्हणुन गोड गोड..! (अर्थात कुणी त्यांच्या वडीलांवर घसरलं तर त्यांना राग येणारच..)
पण ह्या रागा लोभापेक्षा सुद्धा त्यांच्या वडिलांचे पैसे मिळणं आणि असं नेमकी कसं झालं ह्याच उत्तर शोधुन खबरदारी घेणं हे जास्त महत्वाचं आहे..
खरं तर इथे सल्ले देताना लोक "आपल्यासोबत सुद्धा असं होऊ शकतं" ह्या विचारानी जास्तीत जास्त चर्चा घडवुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.. त्यामुळे संभाव्य धोक्यांची माहिती मिळु शकते.. त्यामुळे सिरियसली.. होऊ दे चर्चा...
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 09/02/2014 - 09:32
नवीन
कोणाच्याही मूळ जेन्युइन मदतीच्या हेतूबद्दल कधीच शंका नव्हती. पिरा यानी संयतपणे लिहून उदाहरणानेच बरेच काही दाखवून दिले.
उत्तम.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 09/02/2014 - 09:42
नवीन
हो पण आता धागाकर्तीच्या वैयक्तिक प्रश्नांबद्दलची चर्चा खुप झाली. त्यांनी अर्धवट माहिती दिली की खोटी याबद्दल अशी खुलेआम चर्चा करण्यात काही हशील आहे असे वाटत नाही खास्करुन जेव्हा धागाकर्तीने इथे कोणालाही फसवलेले नाही, तिचा कोणाचीही थट्टा करण्याचा अथवा त्याला लुबाडण्याचा हेतु नव्हता, धागाकर्ती स्वतः बास झाले आता सांगत आहेत.
अगदी खरे सांगु का इथे मला काय वाटते आहे? एखाद्या मुलीची अब्रु लुटली गेली आहे आणि गल्लीतले लोक "तिनेच फूस लावली असेल हो" किंवा "दिवसाढवळ्या असे कसे होउ शकते" किंवा " पोलिसात तक्रार केली नाही म्हणजे नक्कीच काहितरी काळेबेरे आहे" किंवा "ती कपडे थोडे असेतसेच घालायची म्हणा" असली काहितरी विधाने करत आहेत.
बास झाले ना आता. गपा की. या विषयाच्या अनुषंगाने काय काळजी घ्यावी, काय उपाय असु शकतात यावर चर्च करा वाटल्यास. धागाकर्ती, तिचे वडील, बँक मॅनेजरची बायको या वैयक्तिक गोष्टी कशाला? खासकरुन धागाकर्तीलाच ते आता नको असताना.
- Log in or register to post comments
स
सुहास पाटील
Tue, 09/02/2014 - 10:14
नवीन
इथे मी असतो तर त्या बँक वाल्याला आधी धरला असता ८८००० हि काय फुकट नाही. पण ठीक आहे विषय बन्द.
- Log in or register to post comments
V
vrushali n
Tue, 09/02/2014 - 10:47
नवीन
तुमच्या वडीलांनी पैसे बुडवलेले नसुन त्यांनाच फटका पडला आहे >तसेच त्या बँके अधिकार्याच्या बाइकोसोबत झाले
मला असे म्हणायचे होते(ते काका बाबांचे चांगले मित्र आहेत)
बाकी तुमचे मुद्दे अत्यंत योग्य आहेत
मला त्याहुनही एका गोष्टीची काळजी वाटते की आपले कार्ड / अकाउंट असे हॅक झाले.. तर कुणीही आधी तक्रार देऊन ठेवेल. कारण उद्या कुणी तुमच्या अकाउंटचा गैरवापर केला (जसे की देशविघातक कृत्य वगैरे..) तर पुरावा म्हणुन तुमच्या कडे तक्रार हवीच
मला हे पटलेले आहे,बाबांना convince करुन तक्रार करा असे सांगणे महत्त्वाचे झाले आहे
आणी सं.क्षी. सर फारश्या कटकटकीतुन न जाता आपले पैसे मिळु शकत असेल तर क्या कहने!!
बाकी कोणाला अधीक उने बोलले गेले असल्यास क्षमस्व
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »