Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत...

V
vrushali n
Sat, 08/30/2014 - 15:34
🗣 181 प्रतिसाद
नमस्कार, पुन्हा थोडा त्रास देतीये आत्ता दोन दिवसांपुर्वी बाबांच्या मोबाइलवर असा मेसेज आला thank you for using your sbi debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxxxxx बाबांनी असली काहीही खरेदि केलेली नाहिये,बाबा लगेच बॅन्केत गेलेत्, atm मधे जाउन चेक केले तेव्हा पैसे कापलेले दिसलेत्,बॅन्केच्या अधीकारी लोकांनी हात वर केलेत PayTM वाले फोन न देत नाहीत(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो) care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत CCAvenue च्या अकाऊंट मधे पण पैसे कटुन परत पुन्हा वापस दिलेले दिसत आहेत हा सगळा काय प्रकार आहे ? हॅकींग ? की अपघात? जर हॅकींग असेल तर , एका ब्लॉग वर वाचले होते की जर २४ तासांच्या आत तुम्ही जर जिथे पैसे कापल्या गेलेत तिथे तक्रार केलीत तर तुम्हाला पैसे परत मिळु शकतात कारण No merchant would like to do business with a stolen card. They will readily block the transaction and revert the amount पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो,ते लोक इमेल बघणार कधी आणी action घेणार कधी? आणखी कोणाला असे अनुभव आले आहेत काय? अशावेळी पैसे परत मिळण्याची किती शक्यता असते?? आणी आम्ही आणखी काय करु शकतो?

प्रतिक्रिया द्या
54154 वाचन

💬 प्रतिसाद (181)
प
पिलीयन रायडर Tue, 09/02/2014 - 11:55 नवीन
ताई, तुम्ही सतत त्या बँक मॅनेजरचा उल्लेख करत आहात आणि सांगत आहात की ते तुमच्या वडीलांचे चांगले मित्र आहेत. पण इथे आलेल्या प्रतिक्रिया वाचुन हे तरी नक्की समजले असेल ना की एक बँक मॅनेजर असुन त्यांनी दिलेला सल्ला अगदी चुकीचा आहे. तुम्ही थोडावेळ मैत्री बाजुला ठेवा आणि विचार करा की एखादा बँक मॅनेजर असा सल्ला का देत असेल? अगदी त्यांच्या बायकोचे १.७५ लाख गेले तरी कुणी स्वस्थ कसं बसु शकतं? आपण स्वतः त्याच बँकेत मोठ्या पदावर असुनही? ह्यात वरकरणी तुमच्या वडीलांची काहीच चुक, हलगर्जी / निष्काळजीपणा दिसत नाही.. मग नक्की का स्वस्थ बसा? आणि ८८०००/- ही काही सामान्य रक्कम नाही.. आणि तुम्हाला अर्थात थोडा पाठपुरावा करावा लागणारच.. वडीलांच्या वतीने तो तुम्ही करु शकता. पण संक्षी म्हणतात तसं हे पैसे परत मिळु शकतात.. तुम्ही हा मुद्दा सोडु नये.. मिपावर ह्या प्रश्ना संबधित क्षेत्रात काम करणारे अनेक लोक आहेत.. त्यांची मदत जरुर घ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
च
चिगो Tue, 09/02/2014 - 11:57 नवीन
पिराताईंशी आणि संक्षीजींशी पुर्णपणे सहमत.. प्रश्न "कर नाही त्याला डर कशाला" ह्याचा असावा. ज्यांनीपण सल्ले दिलेत, त्यांनी कळकळीने, मनापासून सल्ले दिलेत. मला अजूनही कन्फ्युअजन आहे ते हे, की त्या बँक अधिकार्‍याच्या पत्नीने पैसे "बुडवले" की तिचे पैसे "बुडले"? जर पैसे बुडले असतील तर एवढे पैसे (१.७५ लाख रुपये) बुडूनही गप्प बसण्याचा निर्णय घेणे आणि तसाच सल्ला दुसर्‍याला देणे, नक्कीच संशयास्पद आहे.. आणखी एक गोष्ट, काहीही कारण नसतांना लोक उगाचच पोलिसांबद्दल गैरसमज करुन बसतात आणि फैलवतात. माझ्या पोलिसांशी आलेल्या संबंधावरुन (पुर्वीचा किंवा आताचा) तक्रारीची बाबतीत मलातरी कधीच वाईट अनुभव आला नाहीये. तेव्हा, आपलं नाणं खणखणीत असेल तर घाबरायची गरज नाही, हेच सांगतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
V
vrushali n Tue, 09/02/2014 - 12:32 नवीन
नुकतेच बाबांकडुन कळले आहे की आमच्या जावयाने पोलीस तक्रार करा असे सांगीतल्या बरोबर लगेच काल पोलीसांकडे गेलेत( मी डोक फोडुन सांगुनही एकत नव्हते,आणी म्हने जावयाच म्हणन कसटाळायचे?)पुरुष प्रधान संस्कुती ती हीच!!! असो आज चंद्रपुर च्या सायबर क्राइम मधु१५१ तासाआधी कळले की ज्याला बाबांचे सगळे पिन नं आणी इतर नं माहीती आहेत त्या व्यक्तीचे हे काम आहे, ४२००० हजाराची एक खरेदी कळली ती आहे apple iphone,पण तो कोणी घेतल ते नाव fir केल्याशिवाय शकत नाही?आणी fir झाले तर अशा गुन्ह्यात अटक झाल्याशिवाय रहात नाही,आम्ही केस मागे घेतो म्हंटल तरीही आता बाबांची चांगली पंचाइत होउन आहे घरच्या p c ला access असणारे लोक कमी आहेत,आणी बाबा सगळ्या शकयता पडताळुन बघताहेत बघु आता काय होइल ते पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन एनीवेज थँक्य सगळ्यांना
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/02/2014 - 14:15 नवीन
पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन
येवढ्या लगेच रीलॅक्स होवु नका . अ‍ॅपलची अजुन बरीच प्रॉडक्ट आहेत बाजारात *blum3* बाकी आयफोन हाच सर्व पापांचे मुळ कारण आहे ! आयफोनखिलं पापमुलम ! *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
प
प्रसाद१९७१ Tue, 09/02/2014 - 14:29 नवीन
हा प्रतिसाद वाचुन मनात काही बेसिक प्रश्न आले आहेत, पण आधीच भाषेच्या वापरा मुळे मार खाल्या मुळे आता विचारणार नाही. पण मला मारणार्‍यांनी तरी विचार करावा की मला जे प्रश्न पडत होते ते चुकीचे होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
V
vrushali n Tue, 09/02/2014 - 12:33 नवीन
१ तासाअधी
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Tue, 09/02/2014 - 16:04 नवीन
शंभरी पुर्ण झाली. आता १०१ % खात्यात पैसे जमा झाल्याची बातमी येइल.
  • Log in or register to post comments
अ
अकिलिज Tue, 09/02/2014 - 16:22 नवीन
माझ्या बाबांच्या बाबतीत एक प्रकार घडला होता. सांगलीला एटीएम मधून रात्रीचे पैसे काढताना कार्ड आणि पैसे एटीएम मध्येच अडकले. थोड्या वेळ विचार करुन बाबा घरी आले. दुस-या दिवशी सकाळी बँकेत तक्रार नोंदवायला गेल्यावर बँकवाले 'असे कसे कार्ड सोडून घरी गेलात म्हणून तुमचीच चूक आहे' म्हणून टाळाटाळ करत होते. आता रात्रीच्या वेळी जर एकट्या माणसाला एटीएम बाहेर राखण करत बसणे सोईचेहि नव्हते. मुख्य म्हणजे बँकेला कार्ड आणि पैसेहि मिळाले नव्हते. शेवटी पोलीस तक्रार केली. थोड्या दिवसांनी (२ महीन्यांनी) पाठपुरावा करून पैसे परत मिळवले. अर्थात पोलीसांना चौकशी करणे, उलटे अर्थ काढणे आणि बँकेने कार्ड वापरायच्या सूचनांची अंमलबजावणी न करणे या आरोपांमूळे थोडा त्रास झाला. पण यात आपली काही चूक नाही या एका गोष्टीवर बाबांचा आत्मविश्वास टिकून होता. सरकारी नोकरीत आयुष्या काढणा-या माणसाला उतारवयात संगणक, अ‍ॅन्ड्रॉईड, एटीएम अश्या गोष्टींचा सामना करणं थोडं जडच जातं. पण समजून घेतल्यावर भीड चेपली जाते. काळजी करू नका. तुमच्या बाबांचेही पैसे बुडणार नाहीत याचा त्यांना विश्वास द्या.
  • Log in or register to post comments
V
vrushali n Tue, 09/02/2014 - 16:43 नवीन
माझे बाबा पण आत्ता इंटरनेट वरुन खरेदी करायला शिकलेत वरुन आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल? की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल(एक तर अ‍ॅपल फोन आहे असे सायबर क्राइम वाले पोलीसांना म्हणत आहेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अकिलिज
क
किसन शिंदे Tue, 09/02/2014 - 20:30 नवीन
आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल? की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल
हा परिच्छेद वाचून 'पुन्हा' बरेच प्रश्न पडलेत, पण आता विचारत नाही. कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
क
कवितानागेश Wed, 09/03/2014 - 12:25 नवीन
इंटरनेटवर 'one time pin' वापरायची सोय असते. तो नंबर फोनवर येतो आणि १० मिनिटे व्हॅलिड असतो. ही पद्धत सेफ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
ए
एस Wed, 09/03/2014 - 15:26 नवीन
सिमकार्ड क्लोन करून तेही बायपास करता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
V
vrushali n Wed, 09/03/2014 - 16:12 नवीन
नेट बँकींग नाही,पैसे डिरेक्टली डेबीट कार्ड मधुन वळते झालेत्,त्यात one time pin ची गरज नसते,फोन वर डिरेक्ट transaction च मेसेज येतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
V
vrushali n गुरुवार, 09/04/2014 - 03:39 नवीन
debit card नी online खरेदी करतांना one time password ची गरज नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
र
रेवती Tue, 09/02/2014 - 17:06 नवीन
वाचतिये. नस्ते उपद्व्याप मागे लागले की चिडचिड होते अगदी! मलाही माझ्या कार्डांची काळजी वाटायला लागलीये. संक्षीच्या उपायांना यश येवो आणि तुमचे पैसे परत मिळोत.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Tue, 09/02/2014 - 20:22 नवीन
वरुन आपली सगळी महत्त्वाची माहीती ,पिन नं एका फोल्डर मधे ठेवली,पी.सी बाहेरच्याच रुम मधे आहे आता घरी इतके येणारे जाणारे असतांना कोणी ती माहीती बघीतली कि बाबांना transaction करतांना कोणी बघुन ठेवल? की paytm चा कोणी आहे,जो आम्ही रीचर्ज केल्यावर लगेच दोनदा दुसर्या दिवशी इतक्या मोठ्या रकमांची खरेदी केली हे येत्या दोनेक दिवसांत कळेल
ए अरे हे काय चाल्लंय? कुणीतरी "इस्कटून" सांगेल का नक्की काय चाल्लय ते? डोक्याचं दही झालंय.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 09/02/2014 - 20:27 नवीन
तपास सुरु आहे. योग्य वेळी माहिती देण्यात येईल. (धागाकर्तीस डिस्क्लेमर: आपली कुठल्याही प्रकारची चेष्टा करण्याचा कोणताही हेतू नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
प
प्रसाद१९७१ Wed, 09/03/2014 - 07:04 नवीन
४२००० हजाराची एक खरेदी कळली ती आहे apple iphone,पण तो कोणी घेतल ते नाव fir केल्याशिवाय शकत नाही?आणी fir झाले तर अशा गुन्ह्यात अटक झाल्याशिवाय रहात नाही,आम्ही केस मागे घेतो म्हंटल तरीही आता बाबांची चांगली पंचाइत होउन आहे
कोणाला अटक होयची असेल तर होऊ दे की. तुम्ही FIR करणे गरजेचे आहे. त्या शिवाय पैसे परत मिळणार नाहीत.
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Wed, 09/03/2014 - 09:35 नवीन
मौन ठेवा (की जरा) अकरा दिवस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
V
vrushali n Wed, 09/03/2014 - 07:27 नवीन
येत्या काही दिवसांत फायनल कळेल ते सांगते श्री किसन शिंदे धागा असल्या कारणांसाठी द्वीशतकी किंवा शतकी व्हावा,तेही अख्खे घरचे धींडवडे निघुन असे मलातरी वाटत नाही, जितकी छटाक माहीती होती ती सांगितली ही माझी मोठी चुक होती,आता पुर्ण तपास झाल्यावार इथे माहीती देइल(बाबा पोलीसांकडे आधी जायला इछ्छुक नव्हते,आता झालेत्,सायबर वाल्यांच व्हरडीक्ट काय आहे,ते तपास करत आहेत्,शेवटी पैसे परत मिळतात की नाही हे सांगते नक्की
  • Log in or register to post comments
स
सुहास पाटील Wed, 09/03/2014 - 07:48 नवीन
इथे मला वाटत नाही तुमच्या घरचे धिंडवडे निघाले आहेत कदाचित कोणालाच असा वाटत नसावे. पण पैसे मिळाले कि नक्की सांगा. आता प्रतिसाद देणार्यांनी इतके आयकून घेतले आहे कि जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर फार वाइट वाटेल इथे आलेल्या सगळ्यांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
V
vrushali n Wed, 09/03/2014 - 07:59 नवीन
आणी कमाल आहे ,म्हणे प्रतिसाद देणार्यांनी इतके आयकून घेतले आहे >की लोकांनी आमची इज्जत काढलीये प्रतीसादक उवाच १ धागा शतकी झाला की पैसे परत मिळतील अशी बातमी येइल्, २ कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील. ३ ह्यांनीच मोठी खरेदी केली आणी लपवायची आहे ४ कोणी इतके पैसे सोडतात का? ५ कथा सांगत आहेत ६" उत्कंठा" वाढवुन पळुन जात आहेत अजुन काही राहीले असेल तर सांगा बुवा
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Wed, 09/03/2014 - 09:35 नवीन
हो. वृषाली काकू, मला वाटतंय की तुम्ही एक्तर खोटं बोलताय किंवा तुम्हाला मानसिक उपचाराची गरज आहे. इथे बरेच प्रतिसाद संयत आणि कळकळ दाखवणारे आहेत. पण तुमच्या सगळ्या पोष्ट पाहिल्या तर भडक आणि दुसर्‍यावर सरळ सरळ आरोप वगैरे करणार्‍या आहेत. बाकी लोकाना ष्टोर्‍या ऐकण्यामध्ये ईंटरेस्ट असतो, तुमचे पुरूष प्रधान संस्कृती बद्दलचे उच्च विचार आणि तुमची प्रत्येक पोष्ट्बद्दल होणारी जळजळ आणि किटकिट ऐकण्यात नाही. आणि खरं सांगायचं तर लोकांनी जी काही इज्जत वगैरे काढलीय असं तुम्ही म्हणताय, ते तुमच्या पोष्ट, तुमचं सामान्यज्ञान आणि तुमचा अ‍ॅटिट्युड वगैरे बघता त्यात काही नवल नाही. खरं तर लोकांनी इतकं ऐकून घेतलय हेच नवल. तुम्ही असं बोलताय कि इथे तुम्हाला उत्तर देणारे तुमच्या घरी पाणी भरायला वगैरे कामाला आहेत. तुमच्या पोष्टवरून असं दिसतय की तुमच्या घरातीलच कुणी तरी तुमच्या पिताश्रींना चुना लावून आयफोन की काय तो विकत घेतलेला आहे. आणि म्हणूनच तुमचे पिताश्री एफ.आय.आर. करायला का-कू करताहेत. (कारण तुम्हीच म्हटल्याप्रमाणे अटक तर होणारच वगैरे). तेव्हा ही सोंगं बंद करा आणि तुमची कापडं तुमच्या घरीच धुवा. तुम्हाला इतके डिटेल पोष्ट लिहायला वेळ आहे, तर घरच्यांच्यावर उपकार करा आणि तो वेळ जरा कारणी लावा आणि अभ्यास करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
V
vrushali n Wed, 09/03/2014 - 10:54 नवीन
मी एकही वाक्य तुम्हाला उद्देशुन बोललेले नसताना इतक चिडुन बोलयचे काय कारण आहे? तुम्ही मला अथवा माझ्या वडीलांना ओळ्खता काय? नाही तर त्यांच्यवर असे आरोप लावायचे कारण कळु शकेल काय? मिसळपाव वर असे व्यक्तीगत आरोप असलेले वाक्य चालतात काय? मी आधीच माफ करा,माझी चुक झाली म्ह्ट्ल्यावर ,आमचेपण मागेपुढे असेच नुकसान होउ शकते,ते टाळण्यासाठी अशा बाबी वर चर्चा व्हायला हवी असे का म्हणत होतेत मी जेव्हा तुमचे पुरूष प्रधान संस्कृती म्हटल तेव्हा ते कौतुकाने म्हटल होत(आम्ही सांगुन एकत नव्हते,रसीक नी एकदा म्हट्ल्याबरोबर तक्रार करायला गेलेत म्हणुन) बरेच प्रतिसाद संयत आणि कळकळ दाखवणारे आहेत> त्या प्रतीसादांना मी मजकडुन प्रामाणीक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे,मी सं.क्षी सरांना सगळे इमेल पण पाठवलेत्,मग पुढचा तपास सायबर क्राइम का करेनात तुम्ही असं बोलताय कि इथे तुम्हाला उत्तर देणारे तुमच्या घरी पाणी भरायला वगैरे कामाला आहेत >तसेच आम्हीपण इथे कोणाकडे पाणी भरत नाही,मग श्री प्रसाद ह्यांना असे आरोप का करावसे वाटलेत? बाकी माझ्या अभ्यासाची काळजी घेण्यास मी समर्थ आहे,काळजी नसावी,धन्यवाद्,लक्षात ठेवुन अभ्यासाची काळजी घेतल्यबद्दल क्रुपया मी तुम्हाला उद्देशुन काहीही बोललेले नसतांना आणी तुम्हाला ह्या केस मधले शेंडा न बुड माहीत नसतांना व्यक्तीगत आरोप टाळावेत धन्यावाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
किसन शिंदे Wed, 09/03/2014 - 09:41 नवीन
कदाचित उद्या धागा द्विशतकी होताना आणखी काही गोष्टी नव्याने माहीत पडतील.
यात तुमच्या घरच्या लोकांची इज्जत काढण्यासारखं काय होतं हे कृपया विस्कटून सांगाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
म
मधुरा देशपांडे Wed, 09/03/2014 - 09:59 नवीन
मलाही हेच कळत नाहीये. प्रत्येक प्रतिसादाचा आणि वाक्याचा रोख धागाकर्तीच्या घरच्यांना मानहानीकारक आहे असे का वाटते आहे? कोणी इतके पैसे सोडते का? हा प्रश्न खरंच पडला मला (आणि इतरांनाही). म्हणून तसे सांगितले. यात पैसे परत मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत एवढीच इच्छा होती. इथले अनेक प्रतिसाद तळमळीने फक्त पैसे परत मिळावेत यासाठीच होते. तुम्ही न घाबरता तक्रार करा, पैसे परत मिळतील असा धीर देणारे होते. यात अपमान कुठे केला गेला हे नाही कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
त
त्रिवेणी Wed, 09/03/2014 - 10:42 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे
त
त्रिवेणी Wed, 09/03/2014 - 10:42 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे
V
vrushali n Wed, 09/03/2014 - 11:16 नवीन
जर तुम्ही खवट पणे ते नाही वाक्य म्हटलत; तर मी चुकले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
य
योगी९०० Wed, 09/03/2014 - 09:52 नवीन
सो आज चंद्रपुर च्या सायबर क्राइम मधु१५१ तासाआधी कळले की ज्याला बाबांचे सगळे पिन नं आणी इतर नं माहीती आहेत त्या व्यक्तीचे हे काम आहे, ..... पण बाबा relax आहेत,कोणी हॅक केल नाही म्हणुन आता मला सांगा की हे हॅकींग नाहीतर दुसरे काय? बाबांनी स्वतः कोणाला पिन व इतर details तर नाही ना दिले?
  • Log in or register to post comments
V
vrushali n Wed, 09/03/2014 - 11:05 नवीन
मला हॅक म्हणजे कोणीतरी जबरदस्तीनी अकाउंट फोडले नाही असे म्हणायचे होते,ज्या व्यक्तीला सगळ माहीत आहे,असे लोक कमी असतील सहज सापडु शकतील ना,मग ते त्या paytm चे का असेना कदाचीत known devil is better than unknown असे त्यांना वाटले असावे आणी बाबांना हे समधान की बाबांनी कुठल्याही suspicious email/phone entertain केले नाही,म्हणजे त्यांची कसलीच चुक नाही,आणी आता अश्या व्यवहारांना अटकाव होउ शकेल ना? जर त्यांनी suspicious email/phone entertain केले असते तर त्यांच मन त्यांना नक्कीच खात असत अस मला वाटत बाबांनी अजुन कोणालाही स्वताहुन पिन व इतर details दिले नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
य
योगी९०० Wed, 09/03/2014 - 13:42 नवीन
मला हॅक म्हणजे कोणीतरी जबरदस्तीनी अकाउंट फोडले नाही असे म्हणायचे होते जबरदस्तीने जर कोणी तुमचा पासवर्ड / पिन घेतला तर त्याला हॅक म्हणतच नाहीत... known devil is better than unknown आम्हाला तर ओळखीचा चोर जीवानिशी मारी हेच माहित आहे. बाकी हॅकर घरचा असो वा बाहेरचा त्याला पोलिसांपर्यंत घेऊनच जा..८८००० ही काही कमी रक्कम नाही आहे. त्यातून आम्हा सर्वांना पिन / पासवर्ड कसे सांभाळावेत हे सुद्धा कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
इ
इरसाल Wed, 09/03/2014 - 10:17 नवीन
आणी बाकी आम्ही बहीणी सगळ्या डॉक्टर( MBBS,MD,BDS)व इन्जीनीअर अस्ल्याने,ही रक्कम आम्ही नक्कीच भरुन काढू हे वाचले असतेत ना आधी तर धपाधप सल्ले पाडले नसतेत तुम्ही. आणी हो माझ्या मनात तुमच्या सम्स्येविषयी बिलकुलही शंका नाही. जे झाले ते योग्य नाही पण पब्लिक देत आहे ना सल्ले सगळे स्वीकारयलाच हवे असे नाही.११५ प्रतिसादात ५ वाकडे असतील पण ११० तिकडे आहेत त्यांचा मान ठेवा .
  • Log in or register to post comments
V
vrushali n Wed, 09/03/2014 - 11:31 नवीन
मला खरच कळत नव्हत कोण खवट बोलतोय्,कोण ह्या क्या फेक रही म्हणतोय मला जे genuine वाटलेत्,त्यांना मी खरच प्रमानीक पणे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय(अर्थातच मलाच छ्टाक माहीती असताना,त्यामुळे काही कच्चे दुवे नक्कीच राहिले असतील्,हे मी नाकारत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
प
पिलीयन रायडर Wed, 09/03/2014 - 10:21 नवीन
अरे बापरे.. खुप काही झालय की ह्या धाग्यावर... कुणी तरी व्यवस्थित प्न नंबर वापरुन खरेदी केली आहे.. आता जर एखाद्या फोल्डर मध्ये सगळी माहिती लिहुन ठेवली असेल तर ती कुणीही वापरु शकतं.. आणि मग हे कसं प्रुव्ह करणार की ती खरेदी तुम्ही केलेली नाही तर कुणा दुसर्‍याने केली आहे..? (हा मी सिरियस प्रश्न विचारत आहे..) परत घरतल्या कॉम्पुटर वरुन ही माहिती चोराला मिळली तर असा अ‍ॅक्सेस कुणाकुणाला आहे.. अर्थातच जवळच्याच व्यक्तिंना.. मग तुमचे वडील रिलॅक्स कसे? उलट जास्तच वैतागले असायला हवेत कारण अशा केस मध्ये डायरेक्ट अटक वगैरे पर्यंत जाता येत नाही.. ऑनलाईन खरेदी केली तर ऑर्डर कुठल्या तरी पत्त्यावर मागवावी लागते ना? मग जो काही अ‍ॅपलचा फोन मागवला आहे तो नक्की कोणत्या पत्त्यावर मागवलाय हे तरी शोधता येईल का? तुमच्या घरच्याच पीसीला वापरुन हे काम केलं असेल तर काही हिस्टरी मध्ये वगैरे जाऊन बघता येईल का की कोणत्या आयडीने खरेदी झाली? समजा दुसरा पीसी वापरला असेल तर त्याचा आयपी वगैरे शोधणे शक्य असते का? मुळात इअतकी महत्वाची माहिती एका फोल्डर मधे लिहुन ठेवुन तो पीसी बाहेरच्या रुम मध्ये ठेवला.. ती माहिती कुणी तरी घेतली आणि वापरुन मोकळा पण झाला... आता मला ८८०००/- का सोडावे लागणारेत हे समजतय.. आणि हो.. paytm मधला कुणी व्यक्ति असं करत असावा असं वाटत नाही कारण नक्कीच त्या सिस्टिम तेवढ्या फुल्प्रुफ असाव्यात.. (मलातरी तसं वाटतं.. अर्थात मी जाणकार नाही... योग्य लोक सांगतीलच काय ते..)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 09/03/2014 - 10:28 नवीन
.. paytm मधला कुणी व्यक्ति असं करत असावा असं वाटत नाही कारण नक्कीच त्या सिस्टिम तेवढ्या फुल्प्रुफ असाव्यात
नक्कीच असतात त्यांना जो पासवर्ड, पीन वगैरे जातो तो Encrypted असतो, कोणी ऐरागैरा तो शोधु शकत नाही.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 09/03/2014 - 10:30 नवीन
हं तेच तर.. नाही तर कशाला लोक ऑनलाईन व्यवहार करतील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
V
vrushali n Wed, 09/03/2014 - 11:09 नवीन
त्या paytm वाल्याच्या जेव्हा लक्षात आले की रक्कम मोठी आहे,तेव्हा त्यांनी नं दिला,तेव्हा तो व्यक्ती बाबांना असे बोलला की " सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी" ह्याचा अर्थ आत्ता आम्ही लावत बसलोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
पिलीयन रायडर Wed, 09/03/2014 - 11:18 नवीन
" सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी"
असं लोक स्वतःच्या कंपनीबद्दल बोलतात? कस्टमर सोबत? डायरेक्ट? आणि केवळ मोठी रक्कम आहे म्हणुन कंपनीमध्ये फ्रॉड आहे असा निष्कर्ष पण काढतात? आणि तो लागलीच बोलुन दाखवतात? ऐकावं ते नवलच होत चाललय आता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
V
vrushali n Wed, 09/03/2014 - 11:26 नवीन
जेव्हा ४३३५० वाला मेसेज आला,तेव्हा १ तासात आम्ही इमेल केली के तो व्यवहार आमचा नाही थांबवा लगेच,तर हे लोक तीन दिवसांनी इमेल पाठवुन म्हणतात,we are sorry product is delivered,plz sent bank statment or through cyber cell बाबांनी त्याला काहीतरी माणुसकी ठेवा,तुम्ही लगेच का कार्यवाही केली नाही? फोन न क देत नाहीतल्,फोन असता तर लगेच हे थांबवता आल असत ना? आम्ही आता काय करायच अस म्हट्ल्यावर तो ओशाळुन असे बोलला आत्ता त्य वाक्याचा अर्थ शोधत आहोत आम्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 09/03/2014 - 11:42 नवीन
अर्थ शोधताय? कशाला? अहो काहीही बोलला तो.. तोंडाला येईल ते.. कंपनीत फ्रॉड चालु आहे असं कुणी कस्टमर केअर लेव्हलचा माणुस म्हणले का? बरं म्हणलाच.. तुम्ही तरी काय मनावर घेताय... त्यांनी ३ दिवस उत्तर दिलं नाही ह्यावर तुम्ही तक्रार करु शकता. मुद्दे बघा.. "माणुसकी" वगैरे भावना सोडा... मुळात माझा प्रश्न हा आहे की समजा घरातल्या कुणी त्या माहितीचा गैरवापर करुन खरेदी केली असेल तर तुम्ही ते सायबर सेल समोर प्रुव्ह करणार कसं? की ही खरेदी तुमच्या वडिलांनी केलेली नाही... किंवा तो माणूस सापडलाच तर तो असंही म्हणेल की तुमच्या वडीलांनीच मला हे डिटेल्स दिले.. (अर्थात त्यांनी दिलेले नाहीत...पण चोराच्या उलट्या बोंबा..) तरी जवळचा माणूस असेल तर पुन्हा तुम्ही ते सिद्ध करणार कसं? तुम्हीच म्ह्णताय की हे हॅकिंग नाही.. (paytm नी जर तुमच्या माहितीचा वापर केला असेल तर ते हॅकिंगच.. पण ती शक्यता खरंच फार फार कमी आहे.. ते तुम्ही सोडाच..)...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
प
प्रसाद१९७१ Wed, 09/03/2014 - 12:00 नवीन
FIR करणे हेच ह्या वरचे उत्तर आहे. FIR शिवाय पैसे परत मिळणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
V
vrushali n Wed, 09/03/2014 - 13:22 नवीन
एक तर तो माणुस असा बोलला वरुन बँक स्टेटमेंट असे दाखवत आहे की ज्या वेळेस बाबांनी रीचर्ज केलेत्,अगदी त्याच वेळेस अथवा त्याच्या दुसर्या दिवशी सगळ्या मोठ्या रकमा दुसरीकडे वळवल्या गेल्यात्,एकदा योगायोग असु शकतो,पण तीनदा?पोलीस इन्स्पेक्टर पण ह्या तर्काला पुष्टी देताहेत आणी आत्ताच श्री धर्मराज ह्यांच्या नातेवाइकांच्या अनुभवान असाच काहीसा आहे आणी fir दाखल केली आहे,सायबर क्राइम वाले आपले काम करीत आहेत दोन्ही ठीकाणी अत्यंत ह्दय अनुभव आलेत ,पोलीस इन्स्पेक्टर बाबांसोबत लगेच चन्द्र्पुर च्या सायबर सेल मधे गेलेत आणी ते बाबांना म्हणत होते की आम्ही काहीही झाले तरीही तुमचे पैसे परत मिळ्वुन देउ,आणी त्यांनी पोलीसांबद्दलचा गंड कमी करा असे इतरांना सांगायला सांगितले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 09/03/2014 - 13:25 नवीन
हे तर फारच छान! नेटाने प्रयत्न करत आहात आणि इथेही उत्तरे देत आहात.. तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
आ
आदूबाळ Wed, 09/03/2014 - 14:19 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रसाद१९७१ Wed, 09/03/2014 - 14:41 नवीन
हे उत्तम केलेत FIR केलेत ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
म
मधुरा देशपांडे Wed, 09/03/2014 - 11:27 नवीन
म्हणजे उद्या हीच रक्कम ४०० रुपये किंवा १०००० असती किंवा कदाचित ४ लाख असती तर उत्तर बदलले असते का? बदलायला हवे का? ही रक्कम जास्त आहे हे आता कुणी ठरवले? त्या पेटीएम वाल्याने? आणि हो, वृषाली ताई, हा प्रश्न खरंच पडलाय. तुमच्या घरच्यांविषयी यात काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्यारे१ Wed, 09/03/2014 - 10:44 नवीन
सध्या आपण काही गोष्टी गृहीत धरतोय असं वाटतंय. गृहीतकं धाग्यावर दिलेल्या माहितीवर आधारित आहेत आणि त्यापेक्षा जास्त आपल्या आपल्या अनुभवांवर नि अकलेवर अवलंबून आहेत. १. सगळ्यांना इंटरनेट उत्तम समजतं. २. सगळ्यांना ऑनलाईन व्यवहार जमतात. ३. सगळ्यांना कार्ड आणि पिन नंबर ह्यांची माहिती गुप्त ठेवावी ह्याचं ज्ञान असतं. ४. सगळे जण संगणकाशी तितकेच सक्षमपणं जोडले गेलेले आहेत. (मटामराठी प्रभाव) ५. धागाकर्तीला पैसे महत्त्वाचे नाहीत. ६. धागाकर्तीच्या वडलांची सगळ्या उस्तवार्‍या करण्याची क्षमता आहे. मागच्या पिढीतल्या एका फार मोठ्या नसलेल्या गावातल्या एका प्राध्यापकांनी थोड्या अपुर्‍या माहितीवर नि कशाला कोण काय करतंय अशा निष्काळजीपणानं (त्यांच्या लेखी ते निष्काळजीपण नाही कारण माहिती कमी आहे) हॉलमध्ये असलेल्या पीसीमध्ये एक फोल्डर ठेवला ज्यात सगळी माहिती होती. (माझ्या आईकडं एकदा डेबिट कार्ड देऊन पिन नंबर सांगितलेला. आईनं आपल्या टेलिफोन डायरीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवला होता. नसतं माहिती राव. लेट्स अ‍ॅक्सेप्ट.) कुणीतरी ओळखीच्याच व्यक्तीनं/ पीसी सर्व्हिसिंग करणारानं हे उद्योग केलेले असण्याची जास्त शक्यता आहे. तपास तशा प्रकारे करावा असं वाटतं.
  • Log in or register to post comments
V
vrushali n Wed, 09/03/2014 - 11:18 नवीन
असे असेल अथवा payमधला,कारण तो प्रतीनीधी असा बोलला " सर इसका मतलब कंपनीमे बहोत बडा फ्रॉड चल रहा,मुझे बॉस से बात करनी पडेगी" ह्या वाक्याचे अनेक अर्थ निघु शकतात ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
श
शिद Wed, 09/03/2014 - 10:48 नवीन
आजच्या म.टा. मध्ये आलेली ह्याच संदर्भातील बातमी: ‘कार्ड स्वाइप’वर व्हायरसची हॅट्ट्रिक
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा